Return to Video

आपल्याला स्वप्ने का पडतात ? अमी अडकिन्स

  • 0:07 - 0:08
    तीन हजार वर्षापूर्वी ,
  • 0:08 - 0:14
    मेसोपोटामियाच्या राजाने आपल्याला
    पडलेले स्वप्न त्याच्या अर्थासह नोंदविले.
  • 0:14 - 0:15
    त्यानंतर एक हजार वर्षांनी,
  • 0:15 - 0:17
    जुन्या इजिप्शियन्सनी
    स्वप्नावर पुस्तक लिहिले.
  • 0:17 - 0:21
    त्यात शंभरहून अधिक स्वप्नांचा
    अर्थ लावला होता.
  • 0:21 - 0:22
    त्यावेळेपासून,
  • 0:22 - 0:26
    आपण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नाचा
    अर्थ लावत आहोत.
  • 0:26 - 0:28
    यावर विज्ञानाने बरेच संशोधन केले
  • 0:28 - 0:30
    विकसित तंत्रज्ञान
  • 0:30 - 0:31
    आणि सातत्य
  • 0:31 - 0:36
    असूनही अद्याप आपण याचे कारण शोधले नाही,
    पण त्याबद्दल काही मजेशीर सिद्धांत आहेत.
  • 0:36 - 0:41
    आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
    स्वप्ने पडतात.हा एक सिद्धांत आहे
  • 0:41 - 0:42
    १९००व्या शतकाच्या सुरुवातीस,
  • 0:42 - 0:47
    सिग्मंड फ्राइड नुसार आपली स्वप्ने
    आणि भयानक स्वप्ने
  • 0:47 - 0:50
    हा एक प्रकारचा संग्रह असतो जागेपणीच्या
    आपल्या अनुभूतीचा.
  • 0:50 - 0:52
    तरीही त्यांचा अर्थ हा संकेता सारखा असतो.
  • 0:52 - 0:55
    आपल्या जागृत अवस्थेतील मनातील
    इच्छापूर्तीशी त्याचा संबंध असतो.
  • 0:55 - 0:59
    फ्राइडने सिद्धांत मांडला, स्वप्नातून
    जागे झाल्यावर आपल्याला जे काही आठवते.
  • 0:59 - 1:01
    जे एका संकेता प्रमाणे असते.
  • 1:01 - 1:06
    आपल्या अबोध मनातील विचार इच्छा
    अपेक्षाशी ते संबंधित असतात,
  • 1:06 - 1:08
    फ्राइडला वाटे, की
    स्वप्नातील आठवलेल्या बाबींचे
  • 1:08 - 1:12
    विश्लेषण केल्याने अबोध मनातील इच्छा
    आपल्या बोध मनात शिरतात.
  • 1:12 - 1:15
    आणि त्यांना दडपल्यामुळे उद्भवणाऱ्या
  • 1:15 - 1:18
    मानसिक समस्या शोधून,
    त्या सोडवता येतात.
  • 1:18 - 1:21
    स्वप्ने आपल्याला स्मरण घडवून देतात.
  • 1:21 - 1:23
    त्याने आपली मानसिक कार्यक्षमता वाढते.
  • 1:23 - 1:25
    झोप ही चांगली बाब आहे.
  • 1:25 - 1:27
    पण स्वप्न पडणे हे त्याहून चांगले आहे.
  • 1:27 - 1:29
    २०१०मधील संशोधनानुसार आढळले
  • 1:29 - 1:33
    एका थ्री डी चक्रव्युहातून तुम्हाला
    बाहेर पडायचे आहे.
  • 1:33 - 1:37
    आणि त्यांना जर डुलकी लागली व स्वप्न पडले
    दुसऱ्या प्रयत्नापूर्वी
  • 1:37 - 1:40
    तर ते यावेळी १० पट यशस्वी होतील
  • 1:40 - 1:44
    ज्यांनी दोन्ही प्रयत्नात केवळ त्यातून
    बाहेर पडण्याचा फक्त विचारच केला.
  • 1:44 - 1:49
    आणि ज्यांना डुलकी लागली पण असे
    स्वप्न पडले नाही, त्यांच्यापेक्षा.
  • 1:49 - 1:51
    संशोधकानी सिद्धांत मांडला
    काही स्मरण प्रक्रिया
  • 1:51 - 1:53
    फक्त झोपेतच कार्यान्वित होतात.
  • 1:53 - 1:58
    आणि स्वप्न हा एक प्रकारचा संदेश असतो
    या स्मरण प्रक्रिया चालू झाल्याच्या.
  • 1:58 - 2:03
    स्वप्ने विस्मरणही पाडतात.
  • 2:03 - 2:05
    १०,००० ट्रीलीयन न्युरोंस
  • 2:05 - 2:08
    मेंदूच्या रचनेत असतात.
  • 2:08 - 2:12
    त्यांची निर्मिती तुमची कृती व विचार
    यावर होत असते .
  • 2:12 - 2:16
    १९८३च्या न्युरोजीवविज्ञानच्या
    सिद्धांतानुसार उलट अध्ययन
  • 2:16 - 2:19
    घडत असते जेव्हा आपण झोपेच्या
    स्वप्न पडण्याच्या अवस्थेत(REM ) असतो.
  • 2:19 - 2:23
    मेंदूतील न्युरोकार्टेक्स या
    न्युरोनच्या जोडणीची पाहणी करतो.
  • 2:23 - 2:25
    आणि अनावश्यक असणारे काढून टाकतो.
  • 2:25 - 2:27
    ही उलट अध्ययन प्रक्रिया स्वप्न पाडते.
  • 2:27 - 2:29
    ती नसती तर
  • 2:29 - 2:32
    तुमचा मेंदू अनावश्यक
    न्युरोन्सच्या जोडणीने भरला असता.
  • 2:32 - 2:35
    आणि जीवघेणे आगंतुक विचाराने
    तुमची चांगली विचारसरणी बाधित झाली असती.
  • 2:35 - 2:37
    जी तुमच्या जागेपणी असते.
  • 2:37 - 2:43
    आपला मेंदू तरतरीत ठेवण्यासाठी
    आपल्याला स्वप्ने पडतात.
  • 2:43 - 2:46
    हा सिद्धांत सांगतो मेंदू तरतरीत
    ठेवण्यासाठी ही स्वप्ने पडतात,
  • 2:46 - 2:52
    त्याने मेंदूला दीर्घकालीन
    स्मृती जतन करण्याचे सामर्थ्य वाढते.
  • 2:52 - 2:53
    ज्यामुळे तो अधिक कार्यक्षम होतो.
  • 2:53 - 2:56
    जेव्हा बाहेरील संकेत एका
    पातळीपेक्षा कमी होतात,
  • 2:56 - 2:57
    जसे तुम्हास झोप लागते तेव्हा,
  • 2:57 - 2:59
    मेंदू आपोआप क्रियाशील होतो .
  • 2:59 - 3:02
    आपल्या स्मृती भांडारातून तो
    माहिती निर्माण करतो
  • 3:02 - 3:04
    जी तुम्हाला विचार वा भावना
    स्वरुपात जाणवते.
  • 3:04 - 3:07
    स्वप्नात तुम्ही ते अनभवू शकता.
  • 3:07 - 3:08
    दुसऱ्या शब्दात ,
  • 3:08 - 3:11
    हा एकप्रकारचा स्क्रीन सेव्हर असतो
    जो झोपेतील मेंदूला ऑन करतो.
  • 3:11 - 3:14
    पण तो पूर्णपणे बंद होत नाही .
  • 3:14 - 3:18
    स्वप्न आपल्यासाठी सराव असतो .
  • 3:18 - 3:22
    भयावह व धोकादायक स्वप्ने पडणे
    ही सामान्य बाब आहे.
  • 3:22 - 3:24
    तो सराव आहे प्रामुख्याने
    मूळ निसर्ग भावनेचा
  • 3:24 - 3:28
    स्वप्नातील घटना ही
    मेंदूच्या कार्यप्रणालीचा भाग आहे
  • 3:28 - 3:32
    उदा अरण्यात तुम्ही फिरत आहात मागे
    अस्वल लागले आहे तुम्ही भयभीत झालात .
  • 3:32 - 3:34
    पण लढत आहात अंधारात त्याच्याशी
  • 3:34 - 3:38
    हे स्वप्न तुमची मुकाबला करण्याचा शक्ती
    वाढविण्याचा सरावच असतो.
  • 3:38 - 3:42
    ज्यायोगे वास्तव जीवनात तुम्हास हा सराव
    उपयोगी पडेल.
  • 3:42 - 3:44
    पण नेहमीच काही स्वप्ने भयावह नसतात.
  • 3:44 - 3:46
    तुम्हा तुमच्या आकर्षक
    शेजाऱ्याचे स्वप्न पडते
  • 3:46 - 3:51
    ते तुम्हास प्रजनन सुखाचा सराव देणारे असते.
  • 3:51 - 3:55
    बरे होण्यासाठीही आपल्याला स्वप्ने पडतात.
  • 3:55 - 3:58
    ताणाची न्युरो ट्रान्समीटर ही
    कमी क्रियाशील असतात
  • 3:58 - 4:00
    झोपेच्या REM अवस्थेत
  • 4:00 - 4:02
    अगदी वेदनामय स्वप्नाच्या अवस्थेतही
  • 4:02 - 4:04
    असा सिद्धांत मांडला जातो
  • 4:04 - 4:09
    की स्वप्नाचा एक हेतू वेदनेची तीव्रता
    कमी करून
  • 4:09 - 4:11
    मानसिक आराम मिळणे हा असतो.
  • 4:11 - 4:14
    स्वप्नात, वेदनेचा अनुभव कमी तणावाखाली
    असताना आपण अनुभवतो.
  • 4:14 - 4:16
    त्यामुळे एक स्वच्छ दृष्टिकोन मिळतो.
  • 4:16 - 4:20
    त्या वेदनांचा सामना योग्य रीतीने करण्याची
    मनाची क्षमता वाढते.
  • 4:20 - 4:25
    काही मानसिक अवस्थेत झोप मिळत नाही
  • 4:25 - 4:28
    शास्त्रज्ञ म्हणतात स्वप्न न पडल्याने
  • 4:28 - 4:33
    आजार उद्भवण्याची शक्यता असते.
  • 4:33 - 4:37
    स्वप्न आपल्या समस्या सोडविण्यासाठी पडतात.
  • 4:37 - 4:40
    जे नेहमीचे नियम पळत नाहीत
  • 4:40 - 4:43
    स्वप्नात अमर्यादित दृश्ये असू शकतात.
  • 4:43 - 4:45
    तुम्हाला समस्येचे निदान होण्यासाठी
  • 4:45 - 4:49
    त्यातच तुम्हाला समस्येची उकल मिळते
    जी जागेपणी मिळत नाही.
  • 4:49 - 4:52
    जॉन स्टेइनबेक यास झोपेची समिती म्हणतो
  • 4:52 - 4:53
    आणि अधिक शोध विशद करतात
  • 4:53 - 4:57
    स्वप्नांची समस्या सोडण्याच्या सामर्थ्यावर
  • 4:57 - 4:59
    सुप्रसिद्ध रसायन शास्त्रज्ञ
    ऑगस्ट केक्युलीने
  • 4:59 - 5:02
    बेन्झींनच्या रेणूंच्या रचनेचे कोडे
    सोडविले स्वप्नामुळेच.
  • 5:02 - 5:05
    म्हणून म्हणावेसे वाटते सर्वात उत्तम
    समस्येचे निराकरण होते
  • 5:05 - 5:07
    झोपल्यावर.
  • 5:07 - 5:10
    या काही प्रमुख उपपत्ती आहेत
  • 5:10 - 5:14
    जसजसे तंत्रज्ञान विकसित होईल व आपण मानवी
    मेंदूबद्दल अधिक जाणू,
  • 5:14 - 5:15
    तेव्हा एकदिवशी शक्य होईल
  • 5:15 - 5:18
    स्वप्नांचा निश्चित अर्थ.
  • 5:18 - 5:22
    तोपर्यंत आपण स्वप्ने पाहू या.
Title:
आपल्याला स्वप्ने का पडतात ? अमी अडकिन्स
Speaker:
Amy Adkins
Description:

स्वप्नांची कारण मीमांसा करणारे सात सिद्धांत अमी आडकिन्स सांगतात
त्यांची आवश्यकत प्रतिपादन करतात आज जरी याचे निश्चित कारण माहित नसले तरी
स्वप्ने ही आरोग्यास उपयुक्त असत्तात

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
05:38
Abhinav Garule approved Marathi subtitles for Why do we dream?
Abhinav Garule edited Marathi subtitles for Why do we dream?
Retired user accepted Marathi subtitles for Why do we dream?
Retired user edited Marathi subtitles for Why do we dream?
Retired user edited Marathi subtitles for Why do we dream?
Retired user edited Marathi subtitles for Why do we dream?
Retired user edited Marathi subtitles for Why do we dream?
Arvind Patil edited Marathi subtitles for Why do we dream?
Show all

Marathi subtitles

Revisions