Return to Video

बालीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याची आमची चळवळ

  • 0:01 - 0:04
    मेलाती विजसेन: बाली - देवांचे बेट.
  • 0:05 - 0:08
    इसाबेल विजसेन: एक हिरवा स्वर्ग.
  • 0:09 - 0:11
    मेलाती: किंवा..
  • 0:11 - 0:12
    एक हरवलेला स्वर्ग.
  • 0:13 - 0:14
    बाली -
  • 0:15 - 0:17
    कचऱ्याचे बेट.
  • 0:18 - 0:19
    इसाबेल: बालीमध्ये,
  • 0:19 - 0:25
    आम्ही दर दिवशी ६८० घनमीटर
    प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो.
  • 0:26 - 0:29
    म्हणजे एखाद्या १४ मजली इमारतीएवढा.
  • 0:29 - 0:31
    आणि प्लास्टिक पिशव्यांचं म्हणाल, तर
  • 0:31 - 0:34
    पाच टक्क्यांहूनही कमी पिशव्या
    रीसायकल केल्या जातात.
  • 0:35 - 0:38
    मेलाती: हे ऐकून तुमच्या मनातलं
    आमच्या बेटाचं चित्र बदललं असेल.
  • 0:39 - 0:41
    तसं ते आमचंही बदललं,
    जेव्हा आम्हाला कळलं, की
  • 0:41 - 0:46
    बालीमधल्या बहुतेक सगळ्या
    प्लास्टिक पिशव्या आपल्या गटारात पोहोचतात.
  • 0:46 - 0:47
    आणि मग आपल्या नद्यांमध्ये
  • 0:47 - 0:48
    आणि मग समुद्रात.
  • 0:49 - 0:51
    आणि ज्या समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत,
  • 0:51 - 0:54
    त्या जाळतात किंवा तशाच टाकतात.
  • 0:54 - 0:56
    इसाबेल: आम्ही ठरवलं, यासाठी
    काही केलं पाहिजे.
  • 0:57 - 0:59
    आणि जवळपास गेली तीन वर्षं
    आम्ही यावर काम करतो आहोत.
  • 0:59 - 1:03
    आमच्या बेटावर प्लास्टिक पिशव्यांना
    मज्जाव करण्याचा प्रयत्न करतो आहोत.
  • 1:03 - 1:05
    आम्हाला काही बाबतीत मोठं यश मिळालं आहे.
  • 1:07 - 1:09
    मेलाती: आम्ही दोघी बहिणी आहोत.
  • 1:09 - 1:11
    आणि आम्ही जगातल्या
    सर्वोत्कृष्ट शाळेत जातो.
  • 1:12 - 1:14
    ग्रीन स्कूल, बाली.
  • 1:14 - 1:18
    ग्रीन स्कूल बांधायला बांबू वापरलेत.
    पण तिचं वेगळेपण इतकंच नाही,
  • 1:18 - 1:20
    तर तिथलं शिक्षणही वेगळं आहे.
  • 1:21 - 1:24
    आम्हाला वर्तमान काळाचे
    नेते व्हायला शिकवलं जातं.
  • 1:25 - 1:27
    साधं पाठ्यपुस्तक या तोडीचं
    काही शिकवू शकत नाही.
  • 1:28 - 1:30
    इसाबेल: एकदा आम्हाला शाळेत एक धडा शिकवला,
  • 1:30 - 1:33
    महत्त्वाच्या व्यक्तींविषयी.
  • 1:33 - 1:34
    नेल्सन मंडेला,
  • 1:34 - 1:35
    लेडी डायना,
  • 1:35 - 1:37
    महात्मा गांधी.
  • 1:37 - 1:38
    शाळेतून घरी येताना,
  • 1:38 - 1:42
    आपणही महत्त्वाची व्यक्ती व्हायचं,
    यावर आमचं एकमत झालं.
  • 1:43 - 1:45
    पण महत्त्वाची व्यक्ती व्हायला, का बरं
  • 1:45 - 1:46
    मोठं होईपर्यंत थांबायचं?
  • 1:46 - 1:48
    आम्हाला आत्ताच काहीतरी करायचं होतं.
  • 1:49 - 1:51
    मेलाती: त्या रात्री सोफ्यावर बसून,
  • 1:51 - 1:54
    आम्ही बालीला भेडसावणाऱ्या
    सगळ्या प्रश्नांचा खूप विचार केला.
  • 1:54 - 1:56
    आणि आम्हाला सगळ्यात जास्त जाणवला, तो
  • 1:56 - 1:58
    प्लास्टिकचा कचरा.
  • 1:59 - 2:01
    पण ती समस्या प्रचंड मोठी आहे.
  • 2:01 - 2:05
    म्हणून आम्हा मुलांना योग्य
    असं ध्येय आम्ही शोधलं.
  • 2:06 - 2:07
    प्लास्टिक पिशव्या.
  • 2:07 - 2:08
    आणि एका कल्पनेचा जन्म झाला.
  • 2:09 - 2:11
    इसाबेल: आम्ही संशोधन सुरू केलं.
  • 2:11 - 2:14
    आणि इतकंच सांगते,
    जितकं जास्त संशोधन केलं,
  • 2:14 - 2:17
    तितकं हेच कळलं, की प्लास्टिकच्या
    पिशव्यांमध्ये चांगलं काहीच नाही.
  • 2:17 - 2:19
    आणि, ठाऊक आहे ना,
  • 2:19 - 2:20
    आपल्याला त्यांची गरज सुध्दा नसते.
  • 2:21 - 2:25
    मेलाती: इतर ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर
    बंदी घालण्याचे झालेले प्रयत्न
  • 2:25 - 2:26
    आम्हाला प्रेरणा देत होते.
  • 2:26 - 2:28
    हवाई पासून रवांडा पर्यंत, आणि
  • 2:28 - 2:31
    ओकलंड आणि डब्लिन सारख्या शहरांपर्यंत.
  • 2:32 - 2:37
    इसाबेल: आणि या कल्पनेतून निर्माण झाली,
    "बाय बाय प्लास्टिक बैग्स"
  • 2:39 - 2:41
    मेलाती: या चळवळीच्या काळात
  • 2:41 - 2:43
    आम्ही खूप काही शिकलो.
  • 2:44 - 2:46
    धडा पहिला:
  • 2:46 - 2:48
    आपण एकटेच सगळं काही करू शकत नाही.
    तर त्यासाठी
  • 2:48 - 2:51
    आपल्यासारखे विचार असणाऱ्या
    मुलांची टीम लागते
  • 2:51 - 2:54
    म्हणून आम्ही
    "बाय बाय प्लास्टिक बैग्स" चमू तयार केला.
  • 2:54 - 2:58
    या स्वयंसेवकांच्या टीममध्ये
    पूर्ण बेटावरची मुलं सामील आहेत.
  • 2:58 - 3:00
    स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधली
  • 3:01 - 3:02
    आणि त्यांच्याबरोबर आम्ही
  • 3:02 - 3:03
    एक उपक्रम अनेक पातळ्यांवर सुरू केला.
  • 3:03 - 3:07
    ऑन आणि ऑफलाईन
    सह्यांच्या मोहिमा.
  • 3:07 - 3:10
    शाळांतून शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरण
  • 3:10 - 3:15
    आम्ही याविषयी लोकांची जाणीव वाढवतो.
    बाजारात, उत्सवात, किनारे सफाईवेळी
  • 3:15 - 3:16
    आणि शेवटचं पण महत्त्वाचं
  • 3:16 - 3:18
    आम्ही पर्यायी पिशव्यांचं वाटप करतो.
  • 3:18 - 3:20
    जसं की जाळीच्या पिशव्या,
  • 3:20 - 3:21
    वर्तमानपत्रापासून केलेल्या,
  • 3:21 - 3:24
    किंवा १००% सेंद्रिय पिशव्या
  • 3:24 - 3:26
    बेटावरच्या स्थानिक उपक्रमांनी बनवलेल्या.
  • 3:27 - 3:28
    इसाबेल: आम्ही एक
  • 3:28 - 3:30
    मार्गदर्शी गाव बनवलं आहे.
    ८०० कुटुंबांचं घर.
  • 3:31 - 3:33
    या गावाचे महापौर आमचे पहिले मित्र.
  • 3:33 - 3:35
    आमचे टी शर्ट आवडले
    म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली.
  • 3:36 - 3:39
    आम्ही ग्राहकांना
    जाणीव करून देण्याकडे लक्ष दिलं.
  • 3:39 - 3:41
    कारण बदलाची गरज तिथेच आहे.
  • 3:42 - 3:44
    या गावाने आत्ताच प्लास्टिक पिशवीमुक्त
  • 3:44 - 3:46
    होण्याच्या मार्गावर
    २/३ अंतर कापलं आहे.
  • 3:47 - 3:52
    बाली सरकारला यात सामील करून घेण्याचे
    आमचे पहिले प्रयत्न फसले.
  • 3:53 - 3:54
    म्हणून आम्ही ठरवलं,
  • 3:54 - 3:59
    हं..एक दशलक्ष सह्यांची मोहीम!
  • 3:59 - 4:01
    त्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत, बरोबर?
  • 4:01 - 4:02
    मेलाती: बरोबर!
  • 4:02 - 4:04
    इसाबेल: पण कुणाला ठाऊक होतं,
  • 4:04 - 4:08
    दशलक्ष म्हणजे हजार गुणिले हजार म्हणून?
  • 4:08 - 4:10
    (हशा)
  • 4:10 - 4:12
    आम्ही तिथेच अडकलो,
  • 4:13 - 4:15
    दुसरा धडा शिकेपर्यंत
  • 4:16 - 4:17
    रोजच्यापेक्षा वेगळा विचार करा.
  • 4:18 - 4:19
    कुणीतरी म्हणालं,
  • 4:19 - 4:25
    बाली विमानतळावर दरवर्षी
    १६ दशलक्ष प्रवासी ये जा करतात.
  • 4:26 - 4:30
    मेलाती: पण विमानतळाच्या आत कसं जायचं?
  • 4:30 - 4:32
    आणि आता धडा तिसरा:
  • 4:32 - 4:34
    चिकाटी
  • 4:34 - 4:36
    आम्ही तडक विमानतळावर गेलो.
  • 4:36 - 4:37
    दरवानाला पार करून पुढे
  • 4:38 - 4:40
    त्याच्या बॉसच्या बॉसकडे.
  • 4:40 - 4:42
    नंतर असिस्टंट ऑफिस मैनेजरकडे.
  • 4:42 - 4:43
    नंतर ऑफिस मैनेजर.
  • 4:43 - 4:45
    आणि मग …
  • 4:45 - 4:47
    पुन्हा आम्हाला दोन पायऱ्या
    खाली पाठवलं गेलं
  • 4:47 - 4:49
    आणि पुन्हा दरवानापाशी आलो.
  • 4:50 - 4:52
    बरेच दिवस दारं ठोठावल्यावर,
    आणि
  • 4:52 - 4:54
    केवळ ध्येयवेड्या मुली म्हणून
    काही दिवस काढल्यावर
  • 4:54 - 4:58
    शेवटी आम्ही बाली विमानतळाच्या कमर्शियल
    मैनेजरपर्यंत पोहोचलो.
  • 4:58 - 5:02
    त्यांना "प्लास्टिक पिशव्यावाली बाली"चं
    भाषण दिलं. आणि ते इतके चांगले आहेत, की
  • 5:02 - 5:06
    ते म्हणाले, (पुरुषी आवाजात),
    मी हे बोलतोय यावर माझाच विश्वास बसत नाही.
  • 5:06 - 5:08
    पण मी परवानगी देणार आहे,
  • 5:08 - 5:11
    कस्टम्स आणि इमिग्रेशन मागून
    सह्या गोळा करण्यासाठी.
  • 5:11 - 5:13
    (हशा)
  • 5:13 - 5:17
    (टाळ्या)
  • 5:17 - 5:19
    इसाबेल: तिथल्या पहिल्याच दीड तासात
  • 5:19 - 5:22
    आम्ही सुमारे १००० सह्या गोळा केल्या.
  • 5:22 - 5:23
    कसलं भारी ना?
  • 5:24 - 5:26
    चौथा धडा:
  • 5:26 - 5:29
    आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांत
    पाठीराखे हवेत.
  • 5:29 - 5:33
    विद्यार्थ्यांपासून ते कमर्शियल मैनेजर्स
    ते प्रसिध्द व्यक्तींपर्यंत.
  • 5:34 - 5:36
    आणि ग्रीन स्कूलच्या महत्त्वामुळे
  • 5:36 - 5:39
    आमचा प्रसिध्द व्यक्तींशी सतत संपर्क असे.
  • 5:40 - 5:41
    बान की मून यांनी शिकवलं,
  • 5:41 - 5:45
    की युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल
  • 5:45 - 5:46
    अर्जांवर सह्या करत नसतात.
  • 5:46 - 5:47
    (हशा)
  • 5:47 - 5:49
    मुलांनी कितीही छानपणे विचारलं, तरीही.
  • 5:49 - 5:51
    पण त्यांनी प्रचार करण्याचं वचन दिलं
  • 5:51 - 5:53
    आता आम्ही युनायटेड नेशन्सच्या
    बरोबर काम करतो.
  • 5:54 - 5:57
    मेलाती: जेन गुडाल यांनी
    माणसं जोडण्याचं महत्त्व शिकवलं.
  • 5:57 - 6:00
    त्यांनी एकाच रूट्स एंड शूट्स ग्रुपने
    सुरुवात केली.
  • 6:00 - 6:03
    आणि आता जगभर त्यांचे ४००० ग्रुप्स आहेत.
  • 6:03 - 6:05
    आम्ही त्यापैकी एक आहोत.
  • 6:05 - 6:06
    त्या मूर्तिमंत प्रेरणा आहेत.
  • 6:07 - 6:08
    आपणही रोटरी सदस्य असाल, तर
  • 6:09 - 6:10
    खूपच छान.
  • 6:10 - 6:11
    आम्ही इंटरएक्टर्स आहोत.
  • 6:11 - 6:13
    रोटरी इंटरनेशनल चा सर्वात तरूण विभाग.
  • 6:15 - 6:18
    इसाबेल: आम्ही चिकाटीविषयी बरंच काही शिकलो.
  • 6:18 - 6:20
    मेलाती: निराशेचा सामना कसा करायचा,
  • 6:20 - 6:21
    इसाबेल: नेतृत्वगुण
  • 6:21 - 6:22
    मेलाती: टीमबरोबर काम
  • 6:22 - 6:24
    इसाबेल: मैत्री
  • 6:24 - 6:26
    मेलाती: बालीनीज लोक आणि त्यांची संस्कृती
    याबद्दल शिकलो.
  • 6:26 - 6:30
    इसाबेल: आणि आम्ही बांधिलकीचं
    महत्त्व शिकलो.
  • 6:30 - 6:32
    मेलाती: ते नेहमीच सोपं नसतं.
  • 6:32 - 6:35
    कधी कधी बोले तैसा चाले हे थोडं कठीण होतं.
  • 6:36 - 6:38
    इसाबेल: पण गेल्या वर्षी आम्ही हेच केलं.
  • 6:39 - 6:40
    आम्ही भाषणासाठी भारतात गेलो होतो,
  • 6:40 - 6:42
    आणि आमचे पालक आम्हाला घेऊन गेले,
  • 6:42 - 6:44
    महात्मा गांधींचं स्वतःचं जुनं घर पाहायला.
  • 6:45 - 6:47
    आम्हाला उपोषणाची ताकद कळली,
    ज्यामुळे त्यांचं
  • 6:47 - 6:49
    ध्येय साकार झालं होतं.
  • 6:49 - 6:51
    हो, घर पाहून झाल्यावर बाहेर
  • 6:51 - 6:53
    जेव्हा आमचे पालक भेटले, तेव्हा
  • 6:53 - 6:55
    आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितला
  • 6:55 - 6:56
    "आम्ही उपोषण करणार!"
  • 6:56 - 6:57
    (हशा)
  • 6:58 - 7:00
    मेलाती: त्यांचे चेहरे कसे झाले असतील,
    तुम्हीच कल्पना करा.
  • 7:00 - 7:03
    आम्हाला पुष्कळ पटवावं लागलं.
  • 7:03 - 7:04
    आमच्या पालकांनाच नव्हे,
  • 7:05 - 7:07
    तर आमच्या मैत्रिणींना आणि शिक्षकांनादेखील.
  • 7:08 - 7:11
    इसाबेल आणि मी अगदी ठाम होतो.
  • 7:11 - 7:12
    आम्ही एका आहारतज्ज्ञाला भेटलो.
  • 7:12 - 7:14
    आणि एक तोडगा काढला.
  • 7:14 - 7:18
    सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत
    न खाण्याचा.
  • 7:18 - 7:21
    "बालीत प्लास्टिक पिशव्या बंद कशा कराव्या"
  • 7:21 - 7:24
    हे बोलण्यासाठी भेटण्याचं, बालीचे गव्हर्नर
    मान्य करीत नाहीत, तोपर्यंत.
  • 7:25 - 7:29
    इसाबेल: आमचं इंडोनेशियन भाषेत
  • 7:29 - 7:30
    "मोगाक माकान" सुरु झालं.
  • 7:30 - 7:32
    सोशल मिडिया वापरून आम्ही पाठिंबा मिळवला.
  • 7:32 - 7:34
    आणि दुसऱ्याच दिवशी
  • 7:34 - 7:36
    आमच्या घरी आणि शाळेत पोलीस येऊ लागले.
  • 7:37 - 7:39
    ह्या दोन मुली काय करताहेत?
  • 7:39 - 7:42
    आमच्या उपोषणामुळे गव्हर्नरांची
    प्रतिमा उजळणार नव्हती
  • 7:42 - 7:44
    हे आम्हाला ठाऊक होतं.
  • 7:44 - 7:45
    आम्ही तुरुंगात गेलो असतो.
  • 7:46 - 7:48
    अहो, पण काम फत्ते झालं.
  • 7:48 - 7:49
    चोवीस तासांनंतर,
  • 7:49 - 7:50
    आम्हाला शाळेतून सुरक्षितपणे
  • 7:50 - 7:52
    गव्हर्नरांच्या ऑफिसात नेण्यात आलं.
  • 7:53 - 7:55
    मेलाती:आणि गव्हर्नर सामोरे आले
  • 7:55 - 7:57
    (टाळ्या)
  • 7:57 - 7:59
    भेटीसाठी, बोलणी करण्यासाठी.
  • 7:59 - 8:02
    बालीचं सौंदर्य आणि पर्यावरण
    जपण्याच्या इच्छेबद्दल
  • 8:02 - 8:04
    आम्हाला धन्यवाद आणि पाठिंबा देत.
  • 8:05 - 8:06
    त्यांनी बालीतल्या
  • 8:06 - 8:09
    प्लास्टिक पिशव्या रोखण्यात
    मदत करण्याच्या वचनावर सही केली.
  • 8:09 - 8:10
    आता आम्ही मित्र आहोत.
  • 8:10 - 8:11
    आम्ही सतत त्यांना, आणि
  • 8:11 - 8:15
    त्यांच्या टीमला, त्यांनी दिलेल्या
    वचनाची आठवण करून देत असतो.
  • 8:15 - 8:17
    आणि खरोखरच,
  • 8:17 - 8:18
    हल्लीच त्यांनी ठरवलं आणि सांगितलं आहे,
  • 8:18 - 8:23
    की, बाली २०१८ पर्यंत
    प्लास्टिक मुक्त होणार आहे.
  • 8:23 - 8:30
    (टाळ्या)
  • 8:31 - 8:36
    इसाबेल: बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील
    आमचे समर्थक
  • 8:36 - 8:41
    २०१६ मध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील
    बंदीचं धोरण आखण्याचा बेत करीत आहेत.
  • 8:41 - 8:43
    मे: प्लास्टिक पिशव्या
    मोफत देणं बंद करा.
  • 8:43 - 8:45
    पुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या आणा.
  • 8:45 - 8:48
    हा आमचा संदेश
    लोकांचे विचार बदलण्यासाठी आहे.
  • 8:49 - 8:51
    इसाबेल:आमची अल्पमुदतीची चळवळ,
  • 8:51 - 8:53
    "एक बेट / एक आवाज"
  • 8:53 - 8:54
    याबद्दलच आहे.
  • 8:54 - 8:57
    जी दुकानं आणि रेस्टोरंट्स स्वतःला
    प्लास्टिक पिशवीमुक्त
  • 8:57 - 9:00
    म्हणवतात,
    ती आम्ही तपासतो आणि त्यांना मान्यता देतो.
  • 9:00 - 9:02
    त्यांच्या दारावर आम्ही हा स्टीकर लावतो.
  • 9:02 - 9:04
    त्यांची नावं सोशल मीडियावर आणि बालीतल्या
  • 9:04 - 9:06
    महत्त्वाच्या मासिकांतून प्रसिद्ध करतो.
  • 9:07 - 9:08
    यामुळे घडतं ते उलटंच.
  • 9:08 - 9:11
    स्टीकर नसलेले जास्त उठून दिसतात.
  • 9:11 - 9:12
    (हशा)
  • 9:13 - 9:16
    मेलाती:तर, आम्ही हे सगळं तुम्हाला
    खरोखर का सांगतो आहोत?
  • 9:17 - 9:19
    थोडं अशासाठी, की आमच्या टीमबरोबर
  • 9:19 - 9:21
    आम्ही जे यश मिळवलं, त्याचा
  • 9:21 - 9:22
    आम्हाला अभिमान वाटतो.
  • 9:22 - 9:25
    आणि अशासाठीही, की या मार्गाने चालताना,
  • 9:25 - 9:27
    मुलंही काही करू शकतात, हे आम्ही शिकलो.
  • 9:27 - 9:29
    आम्ही गोष्टी घडवू शकतो.
  • 9:30 - 9:32
    इसाबेल आणि मी केवळ
    १० आणि १२ वर्षांच्या होतो.
  • 9:32 - 9:34
    त्यावेळी आम्ही सुरुवात केली.
  • 9:34 - 9:36
    आमच्याजवळ काही आराखडा नव्हता.
  • 9:36 - 9:37
    ठरलेले डावपेच नव्हते.
  • 9:37 - 9:39
    काही छुपे हेतू नव्हते.
  • 9:39 - 9:42
    आमच्यासमोर होती केवळ एक कल्पना
  • 9:42 - 9:44
    आणि आमच्याबरोबर काम करणारे मित्र.
  • 9:44 - 9:46
    आम्हाला फक्त
    आमच्या सुंदर घराला गुंडाळून टाकून
  • 9:46 - 9:49
    गुदमरवणाऱ्या त्या प्लास्टिक पिशव्यांना
    रोखायचं होतं.
  • 9:50 - 9:52
    मुलांमध्ये एक अमर्याद शक्ती असते
  • 9:52 - 9:56
    आणि जगात आवश्यक असणारा बदल
    स्वतःच होण्याची प्रेरणा असते.
  • 9:56 - 10:01
    इसाबेल: तर, या सुंदर पण आव्हानात्मक
    जगातल्या सर्व मुलांनो,
  • 10:02 - 10:03
    व्हा पुढे!
  • 10:03 - 10:05
    तो बदल घडवून आणा.
  • 10:05 - 10:07
    ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही.
  • 10:08 - 10:10
    पण ते फार मोलाचं असेल, इतकं सांगतो.
  • 10:10 - 10:15
    आम्ही मुलं जगाच्या लोकसंख्येच्या
    २५ टक्केच असू.
  • 10:15 - 10:18
    पण आम्ही भविष्याचे १०० टक्के आहोत.
  • 10:19 - 10:22
    मेलाती:आम्हाला अजून पुष्कळ काम करायचं आहे.
  • 10:22 - 10:23
    पण आम्ही तोपर्यंत थांबणार नाही,
  • 10:23 - 10:28
    जोपर्यंत बाली विमानतळावर येणाऱ्यांना
    प्रथम विचारलं जात नाही,
  • 10:29 - 10:30
    दोघी: बालीत आपलं स्वागत आहे.
  • 10:30 - 10:32
    आपल्या सामानात प्लास्टिक पिशव्या आहेत का?
  • 10:32 - 10:34
    (हशा)
  • 10:34 - 10:36
    ओम शांति शांति शांति ओम
  • 10:36 - 10:38
    धन्यवाद.
  • 10:38 - 10:47
    (टाळ्या)
Title:
बालीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्याची आमची चळवळ
Speaker:
मेलाती आणि इसाबेल विजसेन
Description:

प्लास्टिक पिशव्या नष्ट करणं अशक्य आहे. तरीही त्या वापरून निष्काळजीपणे फेकून दिल्या जातात. बहुतेक पिशव्या समुद्रात पोहोचतात, पाणी प्रदूषित करतात आणि सागरी जीवनाला अपाय करतात. बाकीच्या पिशव्या कचऱ्याच्या ढिगाबरोबर जाळल्या जातात. त्या वातावरणात अपायकारक डायोक्सिन्स सोडतात. मेलाती आणि इसाबेल विजसेन एका कामगिरीवर आहेत: प्लास्टिक पिशव्यांना, बाली या त्यांच्या सुंदर बेटरूपी घराला गुदमरवण्यापासून रोखण्य़ाच्या. त्यांच्या प्रयत्नांना - सह्यांची मोहीम, किनाऱ्याची सफाई, उपोषणं सुध्दा - यश आलं. त्यांनी त्यांच्या गव्हर्नरांना, २०१८ पर्यंत बाली प्लास्टिक पिशवीमुक्त करण्याची प्रतिज्ञा करायला भाग पाडलं. इसाबेल इतर होतकरु कार्यकर्त्यांना सांगते, "तुम्ही खूप लहान आहात किंवा तुम्हाला समजणार नाही असं कुणालाही म्हणू देऊ नका. ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही. तर ते मोलाचं असेल, असं सांगतो आहोत."

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
11:00
Abhinav Garule approved Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Retired user edited Marathi subtitles for Melati and Isabel Wijsen
Show all

Marathi subtitles

Revisions