WEBVTT 00:00:00.580 --> 00:00:04.054 मेलाती विजसेन: बाली - देवांचे बेट. NOTE Paragraph 00:00:05.301 --> 00:00:07.642 इसाबेल विजसेन: एक हिरवा स्वर्ग. NOTE Paragraph 00:00:09.139 --> 00:00:10.552 मेलाती: किंवा.. 00:00:10.576 --> 00:00:12.393 एक हरवलेला स्वर्ग. 00:00:13.075 --> 00:00:14.234 बाली - 00:00:14.696 --> 00:00:16.639 कचऱ्याचे बेट. NOTE Paragraph 00:00:17.707 --> 00:00:18.859 इसाबेल: बालीमध्ये, 00:00:18.883 --> 00:00:24.834 आम्ही दर दिवशी ६८० घनमीटर प्लास्टिकचा कचरा निर्माण करतो. 00:00:25.801 --> 00:00:28.657 म्हणजे एखाद्या १४ मजली इमारतीएवढा. 00:00:29.205 --> 00:00:31.426 आणि प्लास्टिक पिशव्यांचं म्हणाल, तर 00:00:31.450 --> 00:00:34.018 पाच टक्क्यांहूनही कमी पिशव्या रीसायकल केल्या जातात. NOTE Paragraph 00:00:34.900 --> 00:00:38.206 मेलाती: हे ऐकून तुमच्या मनातलं आमच्या बेटाचं चित्र बदललं असेल. 00:00:38.666 --> 00:00:41.150 तसं ते आमचंही बदललं, जेव्हा आम्हाला कळलं, की 00:00:41.174 --> 00:00:45.735 बालीमधल्या बहुतेक सगळ्या प्लास्टिक पिशव्या आपल्या गटारात पोहोचतात. 00:00:45.759 --> 00:00:47.009 आणि मग आपल्या नद्यांमध्ये 00:00:47.033 --> 00:00:48.404 आणि मग समुद्रात. 00:00:48.900 --> 00:00:51.364 आणि ज्या समुद्रापर्यंत पोहोचत नाहीत, 00:00:51.388 --> 00:00:53.501 त्या जाळतात किंवा तशाच टाकतात. NOTE Paragraph 00:00:54.183 --> 00:00:56.441 इसाबेल: आम्ही ठरवलं, यासाठी काही केलं पाहिजे. 00:00:56.812 --> 00:00:59.311 आणि जवळपास गेली तीन वर्षं आम्ही यावर काम करतो आहोत. 00:00:59.335 --> 00:01:02.687 आमच्या बेटावर प्लास्टिक पिशव्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 00:01:02.711 --> 00:01:05.175 आम्हाला काही बाबतीत मोठं यश मिळालं आहे. NOTE Paragraph 00:01:06.835 --> 00:01:08.867 मेलाती: आम्ही दोघी बहिणी आहोत. 00:01:08.891 --> 00:01:11.458 आणि आम्ही जगातल्या सर्वोत्कृष्ट शाळेत जातो. 00:01:12.061 --> 00:01:13.586 ग्रीन स्कूल, बाली. 00:01:13.610 --> 00:01:18.233 ग्रीन स्कूल बांधायला बांबू वापरलेत. पण तिचं वेगळेपण इतकंच नाही, 00:01:18.257 --> 00:01:20.220 तर तिथलं शिक्षणही वेगळं आहे. 00:01:20.864 --> 00:01:23.551 आम्हाला वर्तमान काळाचे नेते व्हायला शिकवलं जातं. 00:01:24.518 --> 00:01:26.951 साधं पाठ्यपुस्तक या तोडीचं काही शिकवू शकत नाही. NOTE Paragraph 00:01:27.813 --> 00:01:29.834 इसाबेल: एकदा आम्हाला शाळेत एक धडा शिकवला, 00:01:29.858 --> 00:01:32.571 महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 00:01:32.595 --> 00:01:34.083 नेल्सन मंडेला, 00:01:34.107 --> 00:01:35.258 लेडी डायना, 00:01:35.282 --> 00:01:36.507 महात्मा गांधी. 00:01:37.244 --> 00:01:38.401 शाळेतून घरी येताना, 00:01:38.425 --> 00:01:41.733 आपणही महत्त्वाची व्यक्ती व्हायचं, यावर आमचं एकमत झालं. 00:01:42.614 --> 00:01:44.651 पण महत्त्वाची व्यक्ती व्हायला, का बरं 00:01:44.675 --> 00:01:45.933 मोठं होईपर्यंत थांबायचं? 00:01:46.420 --> 00:01:48.494 आम्हाला आत्ताच काहीतरी करायचं होतं. NOTE Paragraph 00:01:49.135 --> 00:01:50.835 मेलाती: त्या रात्री सोफ्यावर बसून, 00:01:50.859 --> 00:01:53.695 आम्ही बालीला भेडसावणाऱ्या सगळ्या प्रश्नांचा खूप विचार केला. 00:01:54.332 --> 00:01:56.396 आणि आम्हाला सगळ्यात जास्त जाणवला, तो 00:01:56.420 --> 00:01:57.784 प्लास्टिकचा कचरा. 00:01:58.536 --> 00:02:00.603 पण ती समस्या प्रचंड मोठी आहे. 00:02:01.189 --> 00:02:04.671 म्हणून आम्हा मुलांना योग्य असं ध्येय आम्ही शोधलं. 00:02:05.589 --> 00:02:06.820 प्लास्टिक पिशव्या. 00:02:06.844 --> 00:02:08.237 आणि एका कल्पनेचा जन्म झाला. NOTE Paragraph 00:02:08.983 --> 00:02:10.964 इसाबेल: आम्ही संशोधन सुरू केलं. 00:02:10.988 --> 00:02:13.928 आणि इतकंच सांगते, जितकं जास्त संशोधन केलं, 00:02:13.952 --> 00:02:17.041 तितकं हेच कळलं, की प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये चांगलं काहीच नाही. 00:02:17.401 --> 00:02:18.671 आणि, ठाऊक आहे ना, 00:02:18.695 --> 00:02:20.273 आपल्याला त्यांची गरज सुध्दा नसते. NOTE Paragraph 00:02:21.003 --> 00:02:24.544 मेलाती: इतर ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे झालेले प्रयत्न 00:02:24.568 --> 00:02:26.438 आम्हाला प्रेरणा देत होते. 00:02:26.462 --> 00:02:28.444 हवाई पासून रवांडा पर्यंत, आणि 00:02:28.468 --> 00:02:31.013 ओकलंड आणि डब्लिन सारख्या शहरांपर्यंत. NOTE Paragraph 00:02:31.784 --> 00:02:37.449 इसाबेल: आणि या कल्पनेतून निर्माण झाली, "बाय बाय प्लास्टिक बैग्स" 00:02:38.658 --> 00:02:40.850 मेलाती: या चळवळीच्या काळात 00:02:40.874 --> 00:02:43.436 आम्ही खूप काही शिकलो. NOTE Paragraph 00:02:43.984 --> 00:02:45.626 धडा पहिला: 00:02:46.233 --> 00:02:48.391 आपण एकटेच सगळं काही करू शकत नाही. तर त्यासाठी 00:02:48.415 --> 00:02:50.607 आपल्यासारखे विचार असणाऱ्या मुलांची टीम लागते 00:02:50.631 --> 00:02:53.802 म्हणून आम्ही "बाय बाय प्लास्टिक बैग्स" चमू तयार केला. 00:02:54.459 --> 00:02:57.574 या स्वयंसेवकांच्या टीममध्ये पूर्ण बेटावरची मुलं सामील आहेत. 00:02:57.598 --> 00:02:59.997 स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधली 00:03:00.505 --> 00:03:01.656 आणि त्यांच्याबरोबर आम्ही 00:03:01.680 --> 00:03:03.430 एक उपक्रम अनेक पातळ्यांवर सुरू केला. 00:03:03.454 --> 00:03:06.750 ऑन आणि ऑफलाईन सह्यांच्या मोहिमा. 00:03:06.774 --> 00:03:10.210 शाळांतून शैक्षणिक आणि प्रेरणादायी सादरीकरण 00:03:10.234 --> 00:03:14.719 आम्ही याविषयी लोकांची जाणीव वाढवतो. बाजारात, उत्सवात, किनारे सफाईवेळी 00:03:14.743 --> 00:03:15.894 आणि शेवटचं पण महत्त्वाचं 00:03:15.918 --> 00:03:17.964 आम्ही पर्यायी पिशव्यांचं वाटप करतो. 00:03:17.988 --> 00:03:19.712 जसं की जाळीच्या पिशव्या, 00:03:19.736 --> 00:03:21.058 वर्तमानपत्रापासून केलेल्या, 00:03:21.082 --> 00:03:23.802 किंवा १००% सेंद्रिय पिशव्या 00:03:23.826 --> 00:03:26.339 बेटावरच्या स्थानिक उपक्रमांनी बनवलेल्या. NOTE Paragraph 00:03:26.898 --> 00:03:28.292 इसाबेल: आम्ही एक 00:03:28.316 --> 00:03:30.428 मार्गदर्शी गाव बनवलं आहे. ८०० कुटुंबांचं घर. 00:03:30.952 --> 00:03:32.775 या गावाचे महापौर आमचे पहिले मित्र. 00:03:32.799 --> 00:03:35.265 आमचे टी शर्ट आवडले म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली. 00:03:36.077 --> 00:03:38.745 आम्ही ग्राहकांना जाणीव करून देण्याकडे लक्ष दिलं. 00:03:38.769 --> 00:03:41.487 कारण बदलाची गरज तिथेच आहे. 00:03:42.266 --> 00:03:44.463 या गावाने आत्ताच प्लास्टिक पिशवीमुक्त 00:03:44.487 --> 00:03:46.492 होण्याच्या मार्गावर २/३ अंतर कापलं आहे. NOTE Paragraph 00:03:47.330 --> 00:03:52.205 बाली सरकारला यात सामील करून घेण्याचे आमचे पहिले प्रयत्न फसले. 00:03:52.696 --> 00:03:53.846 म्हणून आम्ही ठरवलं, 00:03:54.391 --> 00:03:58.691 हं..एक दशलक्ष सह्यांची मोहीम! 00:03:58.715 --> 00:04:00.708 त्याकडे ते दुर्लक्ष करणार नाहीत, बरोबर? NOTE Paragraph 00:04:00.732 --> 00:04:01.895 मेलाती: बरोबर! NOTE Paragraph 00:04:02.258 --> 00:04:04.093 इसाबेल: पण कुणाला ठाऊक होतं, 00:04:04.117 --> 00:04:08.279 दशलक्ष म्हणजे हजार गुणिले हजार म्हणून? NOTE Paragraph 00:04:08.303 --> 00:04:09.930 (हशा) NOTE Paragraph 00:04:10.270 --> 00:04:11.835 आम्ही तिथेच अडकलो, 00:04:12.747 --> 00:04:14.738 दुसरा धडा शिकेपर्यंत 00:04:15.507 --> 00:04:17.462 रोजच्यापेक्षा वेगळा विचार करा. 00:04:17.808 --> 00:04:18.959 कुणीतरी म्हणालं, 00:04:18.983 --> 00:04:25.384 बाली विमानतळावर दरवर्षी १६ दशलक्ष प्रवासी ये जा करतात. NOTE Paragraph 00:04:26.294 --> 00:04:29.610 मेलाती: पण विमानतळाच्या आत कसं जायचं? 00:04:29.993 --> 00:04:31.686 आणि आता धडा तिसरा: 00:04:32.236 --> 00:04:33.676 चिकाटी 00:04:34.141 --> 00:04:35.768 आम्ही तडक विमानतळावर गेलो. 00:04:35.792 --> 00:04:37.444 दरवानाला पार करून पुढे 00:04:37.819 --> 00:04:39.705 त्याच्या बॉसच्या बॉसकडे. 00:04:39.729 --> 00:04:41.990 नंतर असिस्टंट ऑफिस मैनेजरकडे. 00:04:42.014 --> 00:04:43.399 नंतर ऑफिस मैनेजर. 00:04:43.423 --> 00:04:44.594 आणि मग … 00:04:44.618 --> 00:04:46.765 पुन्हा आम्हाला दोन पायऱ्या खाली पाठवलं गेलं 00:04:46.789 --> 00:04:48.954 आणि पुन्हा दरवानापाशी आलो. NOTE Paragraph 00:04:49.537 --> 00:04:51.585 बरेच दिवस दारं ठोठावल्यावर, आणि 00:04:51.609 --> 00:04:53.925 केवळ ध्येयवेड्या मुली म्हणून काही दिवस काढल्यावर 00:04:53.949 --> 00:04:57.837 शेवटी आम्ही बाली विमानतळाच्या कमर्शियल मैनेजरपर्यंत पोहोचलो. 00:04:58.368 --> 00:05:02.281 त्यांना "प्लास्टिक पिशव्यावाली बाली"चं भाषण दिलं. आणि ते इतके चांगले आहेत, की 00:05:02.305 --> 00:05:06.003 ते म्हणाले, (पुरुषी आवाजात), मी हे बोलतोय यावर माझाच विश्वास बसत नाही. 00:05:06.027 --> 00:05:08.270 पण मी परवानगी देणार आहे, 00:05:08.294 --> 00:05:11.251 कस्टम्स आणि इमिग्रेशन मागून सह्या गोळा करण्यासाठी. NOTE Paragraph 00:05:11.275 --> 00:05:12.619 (हशा) NOTE Paragraph 00:05:12.643 --> 00:05:16.938 (टाळ्या) NOTE Paragraph 00:05:16.962 --> 00:05:18.906 इसाबेल: तिथल्या पहिल्याच दीड तासात 00:05:18.930 --> 00:05:21.605 आम्ही सुमारे १००० सह्या गोळा केल्या. 00:05:21.954 --> 00:05:23.255 कसलं भारी ना? NOTE Paragraph 00:05:24.340 --> 00:05:25.851 चौथा धडा: 00:05:25.875 --> 00:05:28.876 आपल्याला समाजाच्या सर्व स्तरांत पाठीराखे हवेत. 00:05:29.486 --> 00:05:33.295 विद्यार्थ्यांपासून ते कमर्शियल मैनेजर्स ते प्रसिध्द व्यक्तींपर्यंत. 00:05:34.097 --> 00:05:36.209 आणि ग्रीन स्कूलच्या महत्त्वामुळे 00:05:36.233 --> 00:05:38.899 आमचा प्रसिध्द व्यक्तींशी सतत संपर्क असे. 00:05:39.937 --> 00:05:41.136 बान की मून यांनी शिकवलं, 00:05:41.160 --> 00:05:44.521 की युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल 00:05:44.545 --> 00:05:46.196 अर्जांवर सह्या करत नसतात. NOTE Paragraph 00:05:46.220 --> 00:05:47.221 (हशा) NOTE Paragraph 00:05:47.245 --> 00:05:49.082 मुलांनी कितीही छानपणे विचारलं, तरीही. 00:05:49.106 --> 00:05:50.791 पण त्यांनी प्रचार करण्याचं वचन दिलं 00:05:50.815 --> 00:05:53.328 आता आम्ही युनायटेड नेशन्सच्या बरोबर काम करतो. NOTE Paragraph 00:05:53.701 --> 00:05:56.644 मेलाती: जेन गुडाल यांनी माणसं जोडण्याचं महत्त्व शिकवलं. 00:05:57.055 --> 00:06:00.095 त्यांनी एकाच रूट्स एंड शूट्स ग्रुपने सुरुवात केली. 00:06:00.119 --> 00:06:03.410 आणि आता जगभर त्यांचे ४००० ग्रुप्स आहेत. 00:06:03.434 --> 00:06:04.607 आम्ही त्यापैकी एक आहोत. 00:06:04.631 --> 00:06:06.073 त्या मूर्तिमंत प्रेरणा आहेत. NOTE Paragraph 00:06:06.731 --> 00:06:08.483 आपणही रोटरी सदस्य असाल, तर 00:06:08.507 --> 00:06:09.797 खूपच छान. 00:06:09.821 --> 00:06:10.972 आम्ही इंटरएक्टर्स आहोत. 00:06:10.996 --> 00:06:13.327 रोटरी इंटरनेशनल चा सर्वात तरूण विभाग. NOTE Paragraph 00:06:14.573 --> 00:06:17.816 इसाबेल: आम्ही चिकाटीविषयी बरंच काही शिकलो. NOTE Paragraph 00:06:17.840 --> 00:06:20.097 मेलाती: निराशेचा सामना कसा करायचा, NOTE Paragraph 00:06:20.121 --> 00:06:21.272 इसाबेल: नेतृत्वगुण NOTE Paragraph 00:06:21.296 --> 00:06:22.465 मेलाती: टीमबरोबर काम NOTE Paragraph 00:06:22.489 --> 00:06:23.640 इसाबेल: मैत्री NOTE Paragraph 00:06:23.664 --> 00:06:26.323 मेलाती: बालीनीज लोक आणि त्यांची संस्कृती याबद्दल शिकलो. NOTE Paragraph 00:06:26.347 --> 00:06:29.505 इसाबेल: आणि आम्ही बांधिलकीचं महत्त्व शिकलो. NOTE Paragraph 00:06:30.106 --> 00:06:31.840 मेलाती: ते नेहमीच सोपं नसतं. 00:06:31.864 --> 00:06:35.329 कधी कधी बोले तैसा चाले हे थोडं कठीण होतं. NOTE Paragraph 00:06:35.830 --> 00:06:38.257 इसाबेल: पण गेल्या वर्षी आम्ही हेच केलं. 00:06:38.663 --> 00:06:40.266 आम्ही भाषणासाठी भारतात गेलो होतो, 00:06:40.290 --> 00:06:41.845 आणि आमचे पालक आम्हाला घेऊन गेले, 00:06:41.869 --> 00:06:44.457 महात्मा गांधींचं स्वतःचं जुनं घर पाहायला. 00:06:45.216 --> 00:06:47.470 आम्हाला उपोषणाची ताकद कळली, ज्यामुळे त्यांचं 00:06:47.494 --> 00:06:48.770 ध्येय साकार झालं होतं. 00:06:49.329 --> 00:06:51.327 हो, घर पाहून झाल्यावर बाहेर 00:06:51.351 --> 00:06:53.002 जेव्हा आमचे पालक भेटले, तेव्हा 00:06:53.026 --> 00:06:54.692 आम्ही आमचा निर्णय त्यांना सांगितला 00:06:54.716 --> 00:06:56.472 "आम्ही उपोषण करणार!" NOTE Paragraph 00:06:56.496 --> 00:06:57.497 (हशा) NOTE Paragraph 00:06:57.521 --> 00:07:00.420 मेलाती: त्यांचे चेहरे कसे झाले असतील, तुम्हीच कल्पना करा. 00:07:00.444 --> 00:07:02.722 आम्हाला पुष्कळ पटवावं लागलं. 00:07:02.746 --> 00:07:04.478 आमच्या पालकांनाच नव्हे, 00:07:04.502 --> 00:07:06.794 तर आमच्या मैत्रिणींना आणि शिक्षकांनादेखील. 00:07:07.561 --> 00:07:10.532 इसाबेल आणि मी अगदी ठाम होतो. 00:07:10.556 --> 00:07:12.165 आम्ही एका आहारतज्ज्ञाला भेटलो. 00:07:12.189 --> 00:07:14.029 आणि एक तोडगा काढला. 00:07:14.053 --> 00:07:18.318 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत न खाण्याचा. 00:07:18.342 --> 00:07:20.947 "बालीत प्लास्टिक पिशव्या बंद कशा कराव्या" 00:07:20.971 --> 00:07:24.458 हे बोलण्यासाठी भेटण्याचं, बालीचे गव्हर्नर मान्य करीत नाहीत, तोपर्यंत. NOTE Paragraph 00:07:25.118 --> 00:07:29.138 इसाबेल: आमचं इंडोनेशियन भाषेत 00:07:29.162 --> 00:07:30.313 "मोगाक माकान" सुरु झालं. 00:07:30.337 --> 00:07:32.326 सोशल मिडिया वापरून आम्ही पाठिंबा मिळवला. 00:07:32.350 --> 00:07:34.117 आणि दुसऱ्याच दिवशी 00:07:34.141 --> 00:07:36.407 आमच्या घरी आणि शाळेत पोलीस येऊ लागले. 00:07:36.724 --> 00:07:38.921 ह्या दोन मुली काय करताहेत? 00:07:39.466 --> 00:07:41.976 आमच्या उपोषणामुळे गव्हर्नरांची प्रतिमा उजळणार नव्हती 00:07:42.000 --> 00:07:43.881 हे आम्हाला ठाऊक होतं. 00:07:43.905 --> 00:07:45.339 आम्ही तुरुंगात गेलो असतो. 00:07:45.768 --> 00:07:47.697 अहो, पण काम फत्ते झालं. 00:07:47.721 --> 00:07:48.947 चोवीस तासांनंतर, 00:07:48.971 --> 00:07:50.383 आम्हाला शाळेतून सुरक्षितपणे 00:07:50.407 --> 00:07:52.430 गव्हर्नरांच्या ऑफिसात नेण्यात आलं. NOTE Paragraph 00:07:53.283 --> 00:07:54.796 मेलाती:आणि गव्हर्नर सामोरे आले NOTE Paragraph 00:07:54.820 --> 00:07:57.029 (टाळ्या) NOTE Paragraph 00:07:57.053 --> 00:07:58.983 भेटीसाठी, बोलणी करण्यासाठी. 00:07:59.007 --> 00:08:01.557 बालीचं सौंदर्य आणि पर्यावरण जपण्याच्या इच्छेबद्दल 00:08:01.581 --> 00:08:04.193 आम्हाला धन्यवाद आणि पाठिंबा देत. NOTE Paragraph 00:08:04.812 --> 00:08:05.963 त्यांनी बालीतल्या 00:08:05.987 --> 00:08:08.738 प्लास्टिक पिशव्या रोखण्यात मदत करण्याच्या वचनावर सही केली. 00:08:08.762 --> 00:08:09.916 आता आम्ही मित्र आहोत. 00:08:09.940 --> 00:08:11.336 आम्ही सतत त्यांना, आणि 00:08:11.360 --> 00:08:14.657 त्यांच्या टीमला, त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत असतो. 00:08:15.372 --> 00:08:16.523 आणि खरोखरच, 00:08:16.547 --> 00:08:18.453 हल्लीच त्यांनी ठरवलं आणि सांगितलं आहे, 00:08:18.477 --> 00:08:23.120 की, बाली २०१८ पर्यंत प्लास्टिक मुक्त होणार आहे. NOTE Paragraph 00:08:23.144 --> 00:08:29.980 (टाळ्या) NOTE Paragraph 00:08:31.498 --> 00:08:36.115 इसाबेल: बाली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आमचे समर्थक 00:08:36.139 --> 00:08:40.701 २०१६ मध्ये प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचं धोरण आखण्याचा बेत करीत आहेत. NOTE Paragraph 00:08:41.186 --> 00:08:43.173 मे: प्लास्टिक पिशव्या मोफत देणं बंद करा. 00:08:43.197 --> 00:08:44.893 पुन्हा वापरता येणाऱ्या पिशव्या आणा. 00:08:44.917 --> 00:08:48.361 हा आमचा संदेश लोकांचे विचार बदलण्यासाठी आहे. NOTE Paragraph 00:08:49.405 --> 00:08:51.102 इसाबेल:आमची अल्पमुदतीची चळवळ, 00:08:51.126 --> 00:08:52.558 "एक बेट / एक आवाज" 00:08:52.582 --> 00:08:54.016 याबद्दलच आहे. 00:08:54.040 --> 00:08:56.719 जी दुकानं आणि रेस्टोरंट्स स्वतःला प्लास्टिक पिशवीमुक्त 00:08:56.743 --> 00:08:59.586 म्हणवतात, ती आम्ही तपासतो आणि त्यांना मान्यता देतो. 00:08:59.610 --> 00:09:01.983 त्यांच्या दारावर आम्ही हा स्टीकर लावतो. 00:09:02.007 --> 00:09:04.325 त्यांची नावं सोशल मीडियावर आणि बालीतल्या 00:09:04.349 --> 00:09:06.425 महत्त्वाच्या मासिकांतून प्रसिद्ध करतो. 00:09:06.829 --> 00:09:07.980 यामुळे घडतं ते उलटंच. 00:09:08.004 --> 00:09:10.829 स्टीकर नसलेले जास्त उठून दिसतात. NOTE Paragraph 00:09:10.853 --> 00:09:12.240 (हशा) NOTE Paragraph 00:09:12.731 --> 00:09:16.050 मेलाती:तर, आम्ही हे सगळं तुम्हाला खरोखर का सांगतो आहोत? 00:09:16.673 --> 00:09:18.591 थोडं अशासाठी, की आमच्या टीमबरोबर 00:09:18.615 --> 00:09:20.686 आम्ही जे यश मिळवलं, त्याचा 00:09:20.710 --> 00:09:22.066 आम्हाला अभिमान वाटतो. 00:09:22.469 --> 00:09:24.557 आणि अशासाठीही, की या मार्गाने चालताना, 00:09:24.581 --> 00:09:27.421 मुलंही काही करू शकतात, हे आम्ही शिकलो. 00:09:27.445 --> 00:09:29.099 आम्ही गोष्टी घडवू शकतो. 00:09:29.891 --> 00:09:32.318 इसाबेल आणि मी केवळ १० आणि १२ वर्षांच्या होतो. 00:09:32.342 --> 00:09:33.901 त्यावेळी आम्ही सुरुवात केली. 00:09:33.925 --> 00:09:35.978 आमच्याजवळ काही आराखडा नव्हता. 00:09:36.002 --> 00:09:37.226 ठरलेले डावपेच नव्हते. 00:09:37.250 --> 00:09:39.169 काही छुपे हेतू नव्हते. 00:09:39.193 --> 00:09:41.633 आमच्यासमोर होती केवळ एक कल्पना 00:09:41.657 --> 00:09:43.770 आणि आमच्याबरोबर काम करणारे मित्र. 00:09:44.195 --> 00:09:46.441 आम्हाला फक्त आमच्या सुंदर घराला गुंडाळून टाकून 00:09:46.465 --> 00:09:49.107 गुदमरवणाऱ्या त्या प्लास्टिक पिशव्यांना रोखायचं होतं. 00:09:49.933 --> 00:09:51.641 मुलांमध्ये एक अमर्याद शक्ती असते 00:09:51.665 --> 00:09:55.830 आणि जगात आवश्यक असणारा बदल स्वतःच होण्याची प्रेरणा असते. NOTE Paragraph 00:09:56.454 --> 00:10:01.179 इसाबेल: तर, या सुंदर पण आव्हानात्मक जगातल्या सर्व मुलांनो, 00:10:01.690 --> 00:10:02.844 व्हा पुढे! 00:10:02.868 --> 00:10:04.623 तो बदल घडवून आणा. 00:10:05.057 --> 00:10:07.476 ते सोपं असेल असं आम्ही म्हणत नाही. 00:10:07.500 --> 00:10:09.767 पण ते फार मोलाचं असेल, इतकं सांगतो. 00:10:10.221 --> 00:10:14.592 आम्ही मुलं जगाच्या लोकसंख्येच्या २५ टक्केच असू. 00:10:14.616 --> 00:10:17.923 पण आम्ही भविष्याचे १०० टक्के आहोत. NOTE Paragraph 00:10:19.050 --> 00:10:21.706 मेलाती:आम्हाला अजून पुष्कळ काम करायचं आहे. 00:10:21.730 --> 00:10:23.395 पण आम्ही तोपर्यंत थांबणार नाही, 00:10:23.419 --> 00:10:27.844 जोपर्यंत बाली विमानतळावर येणाऱ्यांना प्रथम विचारलं जात नाही, NOTE Paragraph 00:10:28.682 --> 00:10:30.016 दोघी: बालीत आपलं स्वागत आहे. 00:10:30.040 --> 00:10:32.207 आपल्या सामानात प्लास्टिक पिशव्या आहेत का? NOTE Paragraph 00:10:32.231 --> 00:10:33.644 (हशा) NOTE Paragraph 00:10:33.668 --> 00:10:36.404 ओम शांति शांति शांति ओम NOTE Paragraph 00:10:36.428 --> 00:10:37.579 धन्यवाद. NOTE Paragraph 00:10:37.603 --> 00:10:47.396 (टाळ्या)