Return to Video

फेकून दिलेल्या प्लास्टिकचं नक्की काय होतं? - एमा ब्राईस

  • 0:07 - 0:10
    ही कथा आहे प्लास्टिकच्या तीन बाटल्यांची.
  • 0:10 - 0:12
    रिकाम्या, फेकून दिलेल्या बाटल्यांची.
  • 0:12 - 0:14
    यापुढचा प्रवास तिघी
    वेगवेगळ्या मार्गाने करतील.
  • 0:14 - 0:19
    त्यांच्या प्रवासाचे परिणाम चक्क
    आपल्या पृथ्वीचं भविष्य ठरवतील.
  • 0:19 - 0:21
    कसं शक्य आहे हे?
  • 0:21 - 0:26
    त्यांचा अंत कसा होतो ते पाहण्यापूर्वी
    त्या निर्माण कशा झाल्या, ते पाहू.
  • 0:26 - 0:30
    आपल्या कथेच्या नायिकांचा जन्म
    या खनिज तेलाच्या रिफायनरीत झाला.
  • 0:30 - 0:31
    या बाटल्या तयार होण्यापूर्वी
  • 0:31 - 0:36
    तेल आणि वायूच्या रेणूंच्या संयुगातून
    रासायनिक प्रक्रियेद्वारे
  • 0:36 - 0:37
    एकलक निर्माण झाले.
  • 0:37 - 0:43
    मग या एकलकांच्या संयुगातून बहुलकांच्या
    लांबलचक साखळ्या निर्माण झाल्या,
  • 0:43 - 0:47
    तेच करोडो छोट्या गोळ्यांच्या
    स्वरूपातलं प्लास्टिक.
  • 0:47 - 0:51
    ते वितळवून, साच्यात घालून,
    त्या लवचिक प्लास्टिकमधून
  • 0:51 - 0:55
    आपल्या तिळ्या नायिका निर्माण झाल्या.
  • 0:55 - 0:58
    यंत्रांद्वारे त्यांच्यात
    गोड फेसाळतं पेय भरण्यात आलं.
  • 0:58 - 1:02
    मग रंगीत वेष्टन लावून त्यांची विक्री झाली.
    त्या उघडल्या गेल्या,
  • 1:02 - 1:06
    आणि पेय संपल्यावर
    बिनबोभाट टाकून दिल्या गेल्या.
  • 1:06 - 1:07
    आता त्या इथे पडल्या आहेत.
  • 1:07 - 1:10
    पुढच्या अज्ञात प्रवासाची वाट बघत.
  • 1:10 - 1:15
    पहिली बाटली तिच्या करोडो भाईबंदांप्रमाणेच
  • 1:15 - 1:17
    जमिनीच्या भरावात टाकली गेली आहे.
  • 1:17 - 1:19
    हा कचऱ्याचा ढीग रोज वाढत चालला आहे.
  • 1:19 - 1:24
    रोज आणखी कचरा येत राहतो,
    जास्त जागा व्यापत राहतो.
  • 1:24 - 1:28
    कचऱ्याच्या थरांमध्ये प्लास्टिक दबलं जातं.
  • 1:28 - 1:30
    त्यातून पावसाचं पाणी वाहतं.
  • 1:30 - 1:34
    त्या पाण्यात विरघळणारी रासायनिक संयुगं
    त्याच्याबरोबर वाहून जातात.
  • 1:34 - 1:37
    त्यापैकी काही अत्यंत विषारी असतात.
  • 1:37 - 1:41
    त्यापासून एक घातक मिश्रण तयार होतं.
    त्याला म्हणतात लीचेट.
  • 1:41 - 1:44
    हे मिश्रण जमिनीखालच्या पाण्यात झिरपतं.
    मातीत आणि झऱ्यांत मिसळतं.
  • 1:44 - 1:48
    पर्यावरण दूषित करतं.
    वन्य प्राणिजगताची हानी करतं.
  • 1:48 - 1:54
    एका बाटलीचं संपूर्ण विघटन होण्यासाठी
    १००० वर्षं लागतात.
  • 1:54 - 1:59
    दुसऱ्या बाटलीचा प्रवास निराळा आहे,
    पण त्यातही चांगलं काही नाही.
  • 1:59 - 2:02
    ती एका नाल्यातून वाहत गेली आहे.
  • 2:02 - 2:04
    नाला पुढे एका नदीला जाऊन मिळतो,
  • 2:04 - 2:07
    आणि नदी समुद्राला.
  • 2:07 - 2:08
    अनेक महिने समुद्रात काढल्यानंतर
  • 2:08 - 2:13
    ती एका प्रचंड भोवऱ्यात खेचली गेली आहे.
    तिथे सगळीकडचा कचरा गोळा होतो आहे.
  • 2:13 - 2:18
    या जागेचं नाव आहे,
    "द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच."
  • 2:18 - 2:22
    इथे समुद्रातल्या प्रवाहांनी प्लास्टिकचे
    करोडो तुकडे आणून गोळा केले आहेत.
  • 2:22 - 2:27
    कचऱ्याने भरलेले असे पाच भोवरे जगात आहेत.
  • 2:27 - 2:32
    प्रदूषक रसायनांमुळे तिथलं पाणी म्हणजे
    प्लास्टिकचं गढूळ सरबत झालं आहे.
  • 2:32 - 2:36
    समुद्रातले जलचर या जंजाळात अडकतात.
  • 2:36 - 2:41
    किंवा, चकाकतं, रंगीत प्लास्टिक
    अन्न समजून गिळतात.
  • 2:41 - 2:45
    प्लास्टिक त्यांच्या पोटातली जागा व्यापतं,
    पण पोषण देऊ शकत नाही.
  • 2:45 - 2:47
    त्यामुळे ते भुकेपोटी मरतात.
  • 2:47 - 2:50
    आता प्लास्टिकमधलं विष
    अन्नसाखळीत पुढे ढकललं जातं.
  • 2:50 - 2:53
    उदाहरणार्थ, लँटर्नफिश नावाचा मासा
    प्लास्टिक खातो.
  • 2:53 - 2:55
    स्क्विड मासा त्याला खातो.
  • 2:55 - 2:57
    मग त्या स्क्विडला ट्यूना मासा खातो.
  • 2:57 - 3:00
    शेवटी माणसं ट्यूना मासा खातात.
  • 3:00 - 3:03
    प्लास्टिकचं जैविक विघटन होत नाही.
  • 3:03 - 3:07
    म्हणजे त्यांचे फक्त बारीक बारीक तुकडे
    होत राहतात.
  • 3:07 - 3:09
    त्याला सूक्ष्म प्लास्टिक म्हणतात.
  • 3:09 - 3:13
    ते अनंत काळ समुद्रात असेच फिरत राहणार.
  • 3:13 - 3:17
    तिसऱ्या बाटलीच्या नशिबी हे भोग आले नाहीत.
  • 3:17 - 3:19
    ट्रकमधून ती प्रक्रिया केंद्रात आली.
  • 3:19 - 3:22
    तिथे तिच्या अनेक भाईबंदांबरोबर
    तिला चेपून सपाट करण्यात आलं.
  • 3:22 - 3:25
    मग त्यांच्यावर दाब देऊन
    एक ठोकळा तयार झाला.
  • 3:25 - 3:28
    हेही काही फारसं चांगलं वाटत नाही ना?
    पण थांबा...
  • 3:28 - 3:29
    यापुढे चांगलं काही घडणार आहे.
  • 3:29 - 3:32
    या ठोकळ्यांचे बारीक तुकडे करण्यात येतात.
  • 3:32 - 3:34
    ते धुवून घेऊन, मग वितळवले जातात.
  • 3:34 - 3:38
    आता हा कच्चा माल तयार होतो,
    पुन्हा वापरण्यासाठी.
  • 3:38 - 3:42
    म्हणजे या जादूमुळे, तिसऱ्या बाटलीचा
  • 3:42 - 3:44
    दुसऱ्याच एखाद्या स्वरूपात
    पुनर्जन्म होणार आहे.
  • 3:44 - 3:48
    अक्षरशः कचऱ्यातून पुनर्जन्म मिळालेल्या
    या नव्या प्लास्टिकला
  • 3:48 - 3:51
    आता एकाएकी आभाळ तोकडं झालं आहे.
Title:
फेकून दिलेल्या प्लास्टिकचं नक्की काय होतं? - एमा ब्राईस
Speaker:
एमा ब्राईस
Description:

संपूर्ण धडा इथे पहा: http://ed.ted.com/lessons/what-really-happens-to-the-plastic-you-throw-away-emma-bryce

प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्यांचा पुनर्वापर करा, असं आपल्याला सतत सांगितलं जातं. पण प्लास्टिक फेकून दिलं, तर त्याचं नक्की काय होतं? इथे एमा ब्राईस प्लास्टिकच्या तीन बाटल्यांची निरनिराळी जीवनचक्रं समजावून सांगताहेत. फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे जगात कोणते धोके निर्माण होतात, हेही या धड्यात स्पष्ट होतं.

शिक्षिका: एमा ब्राईस
ऍनिमेशन: शॅरन कोलमन.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
04:07

Marathi subtitles

Revisions