0:00:06.794,0:00:09.803 ही कथा आहे प्लास्टिकच्या तीन बाटल्यांची. 0:00:09.803,0:00:11.740 रिकाम्या, फेकून दिलेल्या बाटल्यांची. 0:00:11.740,0:00:13.949 यापुढचा प्रवास तिघी[br]वेगवेगळ्या मार्गाने करतील. 0:00:13.949,0:00:18.546 त्यांच्या प्रवासाचे परिणाम चक्क [br]आपल्या पृथ्वीचं भविष्य ठरवतील. 0:00:18.546,0:00:20.731 कसं शक्य आहे हे? 0:00:20.731,0:00:25.938 त्यांचा अंत कसा होतो ते पाहण्यापूर्वी[br]त्या निर्माण कशा झाल्या, ते पाहू. 0:00:25.938,0:00:29.688 आपल्या कथेच्या नायिकांचा जन्म [br]या खनिज तेलाच्या रिफायनरीत झाला. 0:00:29.688,0:00:31.358 या बाटल्या तयार होण्यापूर्वी 0:00:31.358,0:00:35.692 तेल आणि वायूच्या रेणूंच्या संयुगातून [br]रासायनिक प्रक्रियेद्वारे 0:00:35.692,0:00:37.495 एकलक निर्माण झाले. 0:00:37.495,0:00:43.112 मग या एकलकांच्या संयुगातून बहुलकांच्या [br]लांबलचक साखळ्या निर्माण झाल्या, 0:00:43.112,0:00:46.610 तेच करोडो छोट्या गोळ्यांच्या [br]स्वरूपातलं प्लास्टिक. 0:00:46.610,0:00:50.692 ते वितळवून, साच्यात घालून, [br]त्या लवचिक प्लास्टिकमधून 0:00:50.692,0:00:55.228 आपल्या तिळ्या नायिका निर्माण झाल्या. 0:00:55.228,0:00:58.205 यंत्रांद्वारे त्यांच्यात [br]गोड फेसाळतं पेय भरण्यात आलं. 0:00:58.205,0:01:02.288 मग रंगीत वेष्टन लावून त्यांची विक्री झाली.[br]त्या उघडल्या गेल्या, 0:01:02.288,0:01:05.501 आणि पेय संपल्यावर [br]बिनबोभाट टाकून दिल्या गेल्या. 0:01:05.501,0:01:06.970 आता त्या इथे पडल्या आहेत. 0:01:06.970,0:01:10.283 पुढच्या अज्ञात प्रवासाची वाट बघत. 0:01:10.283,0:01:14.550 पहिली बाटली तिच्या करोडो भाईबंदांप्रमाणेच 0:01:14.550,0:01:16.761 जमिनीच्या भरावात टाकली गेली आहे. 0:01:16.761,0:01:19.235 हा कचऱ्याचा ढीग रोज वाढत चालला आहे. 0:01:19.235,0:01:23.633 रोज आणखी कचरा येत राहतो, [br]जास्त जागा व्यापत राहतो. 0:01:23.633,0:01:27.931 कचऱ्याच्या थरांमध्ये प्लास्टिक दबलं जातं. 0:01:27.931,0:01:30.081 त्यातून पावसाचं पाणी वाहतं. 0:01:30.081,0:01:34.074 त्या पाण्यात विरघळणारी रासायनिक संयुगं [br]त्याच्याबरोबर वाहून जातात. 0:01:34.074,0:01:36.926 त्यापैकी काही अत्यंत विषारी असतात. 0:01:36.926,0:01:41.006 त्यापासून एक घातक मिश्रण तयार होतं. [br]त्याला म्हणतात लीचेट. 0:01:41.006,0:01:44.471 हे मिश्रण जमिनीखालच्या पाण्यात झिरपतं. [br]मातीत आणि झऱ्यांत मिसळतं. 0:01:44.471,0:01:48.102 पर्यावरण दूषित करतं. [br]वन्य प्राणिजगताची हानी करतं. 0:01:48.102,0:01:54.014 एका बाटलीचं संपूर्ण विघटन होण्यासाठी[br]१००० वर्षं लागतात. 0:01:54.014,0:01:58.509 दुसऱ्या बाटलीचा प्रवास निराळा आहे, [br]पण त्यातही चांगलं काही नाही. 0:01:58.509,0:02:01.560 ती एका नाल्यातून वाहत गेली आहे. 0:02:01.560,0:02:03.558 नाला पुढे एका नदीला जाऊन मिळतो, 0:02:03.558,0:02:06.674 आणि नदी समुद्राला. 0:02:06.674,0:02:08.465 अनेक महिने समुद्रात काढल्यानंतर 0:02:08.465,0:02:13.417 ती एका प्रचंड भोवऱ्यात खेचली गेली आहे.[br]तिथे सगळीकडचा कचरा गोळा होतो आहे. 0:02:13.417,0:02:17.722 या जागेचं नाव आहे, [br]"द ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच." 0:02:17.722,0:02:22.304 इथे समुद्रातल्या प्रवाहांनी प्लास्टिकचे [br]करोडो तुकडे आणून गोळा केले आहेत. 0:02:22.304,0:02:27.342 कचऱ्याने भरलेले असे पाच भोवरे जगात आहेत. 0:02:27.342,0:02:32.168 प्रदूषक रसायनांमुळे तिथलं पाणी म्हणजे [br]प्लास्टिकचं गढूळ सरबत झालं आहे. 0:02:32.168,0:02:35.984 समुद्रातले जलचर या जंजाळात अडकतात. 0:02:35.984,0:02:41.321 किंवा, चकाकतं, रंगीत प्लास्टिक[br]अन्न समजून गिळतात. 0:02:41.321,0:02:44.660 प्लास्टिक त्यांच्या पोटातली जागा व्यापतं, [br]पण पोषण देऊ शकत नाही. 0:02:44.660,0:02:46.581 त्यामुळे ते भुकेपोटी मरतात. 0:02:46.581,0:02:50.343 आता प्लास्टिकमधलं विष [br]अन्नसाखळीत पुढे ढकललं जातं. 0:02:50.343,0:02:52.938 उदाहरणार्थ, लँटर्नफिश नावाचा मासा [br]प्लास्टिक खातो. 0:02:52.938,0:02:55.126 स्क्विड मासा त्याला खातो. 0:02:55.126,0:02:57.114 मग त्या स्क्विडला ट्यूना मासा खातो. 0:02:57.114,0:03:00.133 शेवटी माणसं ट्यूना मासा खातात. 0:03:00.133,0:03:02.504 प्लास्टिकचं जैविक विघटन होत नाही. 0:03:02.504,0:03:06.521 म्हणजे त्यांचे फक्त बारीक बारीक तुकडे [br]होत राहतात. 0:03:06.521,0:03:08.610 त्याला सूक्ष्म प्लास्टिक म्हणतात. 0:03:08.610,0:03:12.750 ते अनंत काळ समुद्रात असेच फिरत राहणार. 0:03:12.750,0:03:17.379 तिसऱ्या बाटलीच्या नशिबी हे भोग आले नाहीत. 0:03:17.379,0:03:19.177 ट्रकमधून ती प्रक्रिया केंद्रात आली. 0:03:19.177,0:03:22.068 तिथे तिच्या अनेक भाईबंदांबरोबर [br]तिला चेपून सपाट करण्यात आलं. 0:03:22.068,0:03:24.704 मग त्यांच्यावर दाब देऊन [br]एक ठोकळा तयार झाला. 0:03:24.704,0:03:27.944 हेही काही फारसं चांगलं वाटत नाही ना? [br]पण थांबा... 0:03:27.944,0:03:29.395 यापुढे चांगलं काही घडणार आहे. 0:03:29.395,0:03:32.183 या ठोकळ्यांचे बारीक तुकडे करण्यात येतात. 0:03:32.183,0:03:33.859 ते धुवून घेऊन, मग वितळवले जातात. 0:03:33.859,0:03:37.896 आता हा कच्चा माल तयार होतो,[br]पुन्हा वापरण्यासाठी. 0:03:37.896,0:03:42.038 म्हणजे या जादूमुळे, तिसऱ्या बाटलीचा 0:03:42.038,0:03:44.486 दुसऱ्याच एखाद्या स्वरूपात [br]पुनर्जन्म होणार आहे. 0:03:44.486,0:03:47.908 अक्षरशः कचऱ्यातून पुनर्जन्म मिळालेल्या [br]या नव्या प्लास्टिकला 0:03:47.908,0:03:50.902 आता एकाएकी आभाळ तोकडं झालं आहे.