Return to Video

जादुई घरे, बांबूपासून बनवलेली

  • 0:01 - 0:03
    मी जेव्हा ९ वर्षांची होते, तेव्हा
  • 0:03 - 0:07
    तेव्हा मला माझ्या आईने विचारले -
    मला कसं दिसणारं घर आवडेल?
  • 0:08 - 0:10
    त्यावर मी परिकथेतलं हे
    अळंबीचं चित्र काढलं.
  • 0:11 - 0:13
    आणि नंतर तिने खरंच तसं घर बांघलं
  • 0:13 - 0:14
    (हशा)
  • 0:14 - 0:16
    मला वाटतं मला त्यावेळी
    त्याचा वेगळेपणा जाणवला नव्हता.
  • 0:17 - 0:18
    कदाचित आताही जाणवत नाही,
  • 0:19 - 0:21
    कारण आताही मी घरांची रचना करते.
  • 0:23 - 0:27
    हे बाली बेटावर बांधलेलं सहामजली घर आहे.
  • 0:27 - 0:30
    ते जवळजवळ संपूर्णपणे बांबूपासून बनवलं आहे.
  • 0:30 - 0:34
    त्याच्या चौथ्या मजल्यावरच्या
    बैठकीच्या खोलीतून दरी दिसते.
  • 0:34 - 0:37
    तुम्ही घरात एका पुलावरुन प्रवेश करता.
  • 0:38 - 0:40
    विषुववृत्तीय प्रदेशात खूप गरम होऊ शकते,
  • 0:40 - 0:45
    म्हणून आम्ही वारा येण्यासाठी
    कमानीदार छपरे करतो.
  • 0:45 - 0:48
    पण काही खोल्यांना उंच खिडक्या आहेत,
    त्याने खेळती हवा आत येते,
  • 0:48 - 0:51
    आणि किडे बाहेर जातात.
  • 0:52 - 0:54
    आम्ही ही खोली उघडी राहू दिली होती.
  • 0:54 - 0:58
    त्यात आम्ही तंबूसारखा व
    हवा खेळती रहाणारा पलंग केला.
  • 0:59 - 1:03
    एका ग्राहकाला बैठकीच्या खोलीच्या
    कोपऱ्यात टी व्हीची खोली हवी होती.
  • 1:03 - 1:06
    आम्हाला उंच भिंतींनी खोली विभागणे
    बरोबर वाटले नाही.
  • 1:07 - 1:11
    त्याऎवजी आम्ही हा भव्य विभाग विणून काढला.
  • 1:12 - 1:15
    आता आम्ही स्नानगृहसारख्या गरजेच्या
    सर्व सुखसोयी केल्या आहेत.
  • 1:16 - 1:20
    ही बैठकीच्या खोलीच्या कोपऱ्यातली
    एक टोपलीच आहे.
  • 1:21 - 1:25
    आणि तुम्हाला सांगते, काही लोक
    ते वापरायला चक्क संकोचतात.
  • 1:25 - 1:28
    आम्ही अजून आवज बाहेर जाऊ न
    देण्याची सोय करु शकलो नाही.
  • 1:28 - 1:31
    (हशा)
  • 1:31 - 1:33
    म्हणजेच आमचं अजून बऱ्याच गोष्टींवर
    काम चालू आहे.
  • 1:33 - 1:35
    पण मी एक गोष्ट शिकले आहे की
  • 1:35 - 1:38
    तुम्ही बांबू चांगल्या प्रकारे वापरलात
    तर तो तुमच्याशी नीट वागतो.
  • 1:39 - 1:41
    बांबू खरेतर एक जंगली गवत आहे.
  • 1:41 - 1:44
    ते वैराण जमिनीवर वाढते,
  • 1:44 - 1:47
    ते दऱ्यामधे वाढते,डोंगर उतारावर वाढते.
  • 1:47 - 1:51
    त्याला पावसाचे पाणी,
    झऱ्याचे पाणी, उन सर्व चालते,
  • 1:52 - 1:56
    जगात वाढणाऱ्या बांबूंच्या
    १४५० जातींपैकी
  • 1:56 - 1:58
    आम्ही फक्त ७ जाती वापरतो.
  • 1:59 - 2:00
    हे माझे वडील आहेत.
  • 2:00 - 2:02
    त्यांनी मला बांबूंचे बांधकाम
    करायला लावले,
  • 2:02 - 2:04
    ते ज्या कोंबांमधे उभे आहेत,
  • 2:04 - 2:08
    ते डेंड्रोकेलेमस अस्पर निगर बांबू असून
    त्यांनी ते सात वर्षांपूर्वी लावले.
  • 2:08 - 2:11
    दरवर्षी त्याच्यावर कोंबांची
    नवी पिढी जन्मते.
  • 2:11 - 2:15
    आम्ही हा कोंब गेल्या आठवड्यात
    ३ दिवसात १ मीटर वाढलेला पाहिला.
  • 2:15 - 2:19
    अशाप्रकारे आपल्याकडे ३ वर्षात
    टिकाउ लाकूड बनते.
  • 2:20 - 2:23
    आता आम्ही कुटुंबांच्या मालकीच्या
    शेकडो बांबूंची लागवड करतो.
  • 2:23 - 2:26
    हे बेटुंग-बांबू
    बरेच लांब असतात.
  • 2:26 - 2:28
    ह्याचा १८ मीटर लांब भाग
    वापरता येतो.
  • 2:30 - 2:32
    हा ट्रक डोंगरावरुन खाली
    नेऊन दाखवा.
  • 2:33 - 2:37
    बांबू मजबूत आहे.त्याची ताण सहन करण्याची
    क्षमता स्टीलसारखी आहे,
  • 2:37 - 2:40
    आणि दाब सहन करण्याची क्षमता
    कॉंक्रीटसारखी आहे.
  • 2:40 - 2:43
    एका खांबावर तुम्ही
    ४ टनाचा भार टाका,
  • 2:43 - 2:45
    आणि तो ते सहन करेल.
  • 2:45 - 2:48
    तो पोकळ असल्याने
    वजनाला हलका आहे,
  • 2:49 - 2:51
    इतका हलका की त्याचे वजन
    थोड्या पुरुषांना पेलेल,
  • 2:52 - 2:54
    किंवा एका बाईलाही पेलेल.
  • 2:54 - 3:00
    (हशा) ( टाळ्या )
  • 3:02 - 3:05
    जेव्हा माझ्या वडिलांनी
    बालीमधे ग्रीन स्कूल बांधले,
  • 3:05 - 3:10
    तेव्हा त्यांनी केंपसमधल्या सर्व
    इमारतींसाठी बांबूची निवड केली.
  • 3:10 - 3:12
    कारण त्यांना ह्यातून एक
    वचन दिसत होते.
  • 3:12 - 3:14
    ते मुलांना दिलेले वचन आहे.
  • 3:14 - 3:18
    हे असे टिकाऊ साधन आहे
    जे त्यांना कधीच कमी पडणार नाही.
  • 3:19 - 3:23
    मी जेव्हा ६ वर्षांपूर्वी ही
    बांधकामे चाललेली पाहिली,
  • 3:23 - 3:26
    मला वाटलं हे करण्यात किती अर्थ आहे.
  • 3:27 - 3:29
    हे आपल्या भोवती वाढत आहे,
  • 3:29 - 3:31
    हे मजबूत आणि दिमाखदार आहे
  • 3:31 - 3:34
    हे भूकंपाचा सामना करु शकते.
  • 3:34 - 3:38
    ह्याचा वापर आधीच का नाही झाला?
    यापुढे आपण याचा काय उपयोग करु शकतो?
  • 3:38 - 3:42
    म्हणूनच ग्रीन स्कूल ज्यांनी
    बांधली, त्यांच्याबरोबर
  • 3:42 - 3:44
    मी इबुकूची स्थापना केली.
  • 3:45 - 3:51
    इबू म्हणजे आई आणि कू म्हणजे माझी,
    इबुकू माझ्या भूमातेचे प्रतिनिधित्व करते.
  • 3:51 - 3:55
    इबुकूमधे आम्ही कारागिर,
    गृहशिल्पी आणि रचनाकार यांचा गट असून,

  • 3:55 - 3:59
    एकत्रपणे असे काम करतो,
    ज्याने बांधकामाचा नवा मार्ग बनेल.
  • 4:00 - 4:03
    गेल्या ५ वर्षांमधे आम्ही एकूण
  • 4:03 - 4:08
    ५० वैशिष्ट्यपूर्ण इमारती बांधल्या,
    ज्यातल्या बहुतेक बालीमधे आहेत.
  • 4:08 - 4:12
    यातील ९ ग्रीन व्हिलेजमधे आहेत--
  • 4:12 - 4:15
    ज्यातल्या काहींचा आतला भाग
    मी तुम्हाला दाखवला आहे--
  • 4:15 - 4:19
    आम्ही त्या दर्शनी लाकूडसामानाने
    भरल्या आहेत.
  • 4:19 - 4:21
    आम्ही त्यांच्याभोवती भाजीचे मळे केले आहेत,
  • 4:21 - 4:24
    तुम्हाला एकदा तिथे येण्याचे आमंत्रण देणे
    आम्हाला खूप आवडेल.
  • 4:24 - 4:26
    आणि तिथे असताना तुम्ही
    ग्रीन स्कूलही पाहू शकाल--
  • 4:26 - 4:29
    दरवर्षी आम्ही तिथे नवे वर्ग बांधत असतो--
  • 4:29 - 4:33
    आणि परिकथेतले अळंबीचे घरही अद्ययावत करतो.
  • 4:34 - 4:37
    आम्ही एका छोट्या घराचे काम करतो आहोत
    जे निर्यात करता येईल.
  • 4:37 - 4:41
    ही एका पारंपरिक सुंबानिज घराची
    प्रतिकृती आहे.
  • 4:41 - 4:45
    त्यातील कापडी सामान आणि
    बारकावेही तसेच केले आहेत.
  • 4:45 - 4:48
    हे खुले स्वयंपाकघर असलेले रेस्तरा पहा.
  • 4:48 - 4:51
    हे बरेचसे स्वयंपाक घरासारखे दिसते ना?
  • 4:52 - 4:56
    हा २२ मीटर लांब असलेला नदीवरचा पूल आहे.
  • 4:57 - 5:01
    आम्ही करतो आहोत ते काम
    पूर्णपणे नवे नाही,
  • 5:02 - 5:06
    छोट्या झोपडीपासून जावातल्या ह्या
    गुंतागुंतीच्या पुलापर्यंत,
  • 5:06 - 5:09
    जगाच्या विषुववृत्तीय भागात बांबूचा
    वापर पूर्वीपासून होत आला आहे,
  • 5:09 - 5:12
    अगदी शेकडो हजारो वर्षांपासून.
  • 5:12 - 5:18
    अनेक बेटांवर आणि खंडांवर माणूस
    पहिल्यांदा बांबूच्या तराफ्यावरुन पोहोचला!
  • 5:18 - 5:20
    पण अगदी आतापर्यंत,
  • 5:20 - 5:25
    बांबूला कीटकांपासून खात्रीलायकरित्या
    वाचवणे जवळजवळ अशक्य होते,
  • 5:25 - 5:29
    त्यामुळे आतापर्यंत केलेले बांबूचे बहुतेक
    काम नाहीसे झाले आहे.
  • 5:30 - 5:33
    बांबू असुरक्षितपणे ठेवला तर खराब होतो.
  • 5:33 - 5:36
    तो प्रक्रीयेशिवाय ठेवला तर कीटक तो खातात.
  • 5:36 - 5:40
    म्हणून बहुतेक लोकांना , विषेशत:
    आशियातल्या लोकांना,
  • 5:40 - 5:44
    वाटते की तुम्ही गरीब किंवा
    ग्रामीण भागातले असाल,
  • 5:44 - 5:45
    तरच बांबूच्या घरात रहाल.
  • 5:45 - 5:48
    आणि म्हणूनच आम्ही असा विचार केला,
  • 5:48 - 5:50
    की त्यांचे मन बदलायला काय करावे,
  • 5:50 - 5:54
    बांबू बांधकाम करण्यालायक असतो
    हे लोकांना पटवून देणे,
  • 5:54 - 5:55
    आपण करण्यात अर्थ आहे का ?
  • 5:56 - 5:59
    पहिल्यांदा, बांबूच्या प्रक्रीयेसाठी
    सुरक्षित द्रव्याची गरज आहे.
  • 5:59 - 6:01
    बोर्रोक्स हे नैसर्गिक मीठ आहे.
  • 6:01 - 6:04
    ते बांबूला बांधकामायोग्य साधन बनवते.
  • 6:04 - 6:07
    बांबूची प्रक्रीया नीट करा,
    रचना काळजीपूर्वक करा,
  • 6:07 - 6:09
    आणि त्याचे बांधकाम तुमच्या
    आयुष्यभर टिकू शकेल.
  • 6:10 - 6:14
    दुसरे म्हणजे त्याचे
    काहीतरी असामान्य बनवा,
  • 6:14 - 6:16
    लोकांना प्रेरणा द्या.
  • 6:16 - 6:17
    सुदैवाने,
  • 6:17 - 6:19
    बाली संस्कृती कारागिरीला उत्तेजन देते.
  • 6:19 - 6:21
    ते कारागिरांचे महत्व जाणतात.
  • 6:21 - 6:24
    ह्या गोष्टींची सांगड अशा
    साहसी प्रयोगवीरांशी घाला-
  • 6:24 - 6:27
    जे नव्या पिढीतले तिथेच
    प्रशिक्षित झालेले कारागीर,
  • 6:27 - 6:31
    रचनाकार आणि अभियंते आहेत.
  • 6:31 - 6:34
    आणि नेहमी लक्षात ठेवा तुम्ही
    वळणदार, अरुंद होत जाणाऱ्या
  • 6:34 - 6:37
    पोकळ बांबूंची रचना करत आहात.
  • 6:37 - 6:41
    कोणतेही दोन खांब सरळ किंवा
    एकमेकांसारखे नसतात.
  • 6:41 - 6:42
    २ बाय ४ ची पद्धत इथे लागू होत नाही.
  • 6:42 - 6:48
    कारगिरांची प्रयोगसिद्ध आणि कौशल्याने
    केलेली सूत्रे आणि परिभाषा
  • 6:48 - 6:49
    इथे कमी येत नाही.
  • 6:49 - 6:51
    आमचे नियम आम्हालाच
    शोधून काढावे लागतात.
  • 6:51 - 6:56
    आम्ही बांबूला विचारतो - तो कुठली गोष्ट
    चांगली करेल? त्याला काय व्हायचे आहे?
  • 6:56 - 7:01
    त्यावर तो म्हणतो त्याला मान द्या,
    त्याच्या मजबूतीचा रचनेत वापर करा.
  • 7:01 - 7:04
    त्याला पाण्यापासून वाचवा, त्याच्या
    वळणांचा जास्तीत जास्त वापर करा.
  • 7:04 - 7:06
    म्हणून आम्ही
    त्रिमितीमधे रचना करतो,
  • 7:06 - 7:08
    बांधकामाची छोटी प्रतिकृती करतो-
  • 7:08 - 7:11
    त्याच साधनांनी, ज्याचे पुढे
    घर बांधले जाणार आहे.
  • 7:11 - 7:13
    आणि बांबूची प्रतिकृती करणे एक कला आहे,
  • 7:14 - 7:17
    आणि ते खास अभियंत्याचेही काम आहे.
  • 7:18 - 7:20
    तर ही पहा घराची रुपरेखा.
  • 7:24 - 7:26
    ( हशा )
  • 7:27 - 7:29
    ही आम्ही बांधकामाच्या ठिकाणी आणतो,
  • 7:29 - 7:31
    आणि एका चिमुकल्या मोजपट्टीने
    त्याचा प्रत्येक खांब मोजतो,
  • 7:31 - 7:36
    प्रत्येक वळणाचा विचार करतो, व बांबूच्या
    ढिगातून असा तुकडा निवडतो,
  • 7:36 - 7:39
    जो तसेच घर उभारु शकेल.
  • 7:40 - 7:43
    बारकाव्यांचा विचार करताना आम्ही
    सर्वच गोष्टींचा विचार करतो.
  • 7:43 - 7:46
    दरवाजे नेहमी आयताकृतीच का असतात?
  • 7:46 - 7:47
    ते गोल का नसतात?
  • 7:47 - 7:49
    तुम्ही दरवाजा कसा सुधारु शकता?
  • 7:49 - 7:50
    बिजागऱ्याची स्पर्धा
    गुरुत्वाकर्षणाशी आहे,
  • 7:50 - 7:53
    आणि शेवटी विजय गुरुत्वाकर्षणाचाच होणार,
  • 7:53 - 7:55
    तर मग दरवाजा त्याच्या मध्याभोवती
    फिरता का ठेवू नये?
  • 7:55 - 7:58
    त्याचा तोल सांभाळण्यासाठी तो कसा ठेवावा?
  • 7:58 - 8:02
    आता असेही पहा की दरवाजाचा आकार
    थेंबासारखा का असू नये?
  • 8:02 - 8:05
    मर्यादांमधे काम करायला आणि
    निवडक फायदे मिळवायला
  • 8:05 - 8:07
    आमची ह्या माध्यमामधे
  • 8:07 - 8:09
    खरोखरच कसोटी लागते.
  • 8:09 - 8:14
    या मर्यादांमधेच आम्हाला काही नवे करायला
    अवसर मिळाला आहे.
  • 8:15 - 8:18
    हे आव्हान आहे.तुमच्याकडे
    सपाट फळ्या नसल्या,
  • 8:18 - 8:21
    तर तुम्ही छ्प्पर कसे कराल?
  • 8:21 - 8:25
    तुम्हाला सांगते, मला कधीकधी दगडी फरशा
    आणि प्लायवुडची स्वप्नं पडतात.
  • 8:25 - 8:27
    ( हशा )
  • 8:28 - 8:31
    पण जर तुमच्यकडे कुशल कारागीर,
  • 8:31 - 8:34
    आणि बांबूच्या छोट्या पट्ट्या असतील,
  • 8:34 - 8:36
    तर त्यांच्यापासून छप्पर विणून काढा.
  • 8:36 - 8:40
    त्याच्यावर केनव्हास ताणून बसवा, लाख लावा.
  • 8:40 - 8:42
    तुम्ही स्वयंपाकघरातले टिकाऊ ओटे कसे कराल,
  • 8:42 - 8:45
    जे आताच्या कमानदार बांधणीला न्याय देईल?
  • 8:45 - 8:49
    एका पथ्थराचा ब्रेडसारखा काप करा,
  • 8:49 - 8:51
    हाताने खोदकाम करुन ते एकमेकात बसवा,
  • 8:51 - 8:53
    त्याचे वरचे कवच तसेच ठेवा,
  • 8:53 - 8:57
    आणि आपल्याला मिळलेली गोष्ट जवळजवळ
    पूर्णपणे हाताने बनलेली आहे.
  • 8:57 - 8:59
    आमच्या इमारतींच्या बांधणीतले जोड
  • 8:59 - 9:05
    आम्ही स्टीलच्या सांध्यांनी मजबूत करतो, आणि
    बांबूच्या खिळ्यांनीही मजबूत करतो.
  • 9:05 - 9:09
    प्रत्येक फरशीत असे
    हजारो खिळे असतात.
  • 9:09 - 9:13
    टिकाऊ व चकचकीत बांबूपासून
    ही फरशी बनवली आहे.
  • 9:13 - 9:17
    त्याच्यावर अनवाणी चालून तुम्हाला
    त्याचा पोत समजतो.
  • 9:17 - 9:20
    आणि तुम्ही कशा फरशीवर चालता,
  • 9:20 - 9:21
    त्याचा चालण्यावर
    परिणाम होतो का?
  • 9:21 - 9:26
    तुम्ही शेवटी जगात ज्या पाऊलखुणा ठेवून
    जाणार आहात ते ह्याने बदलेल का?
  • 9:26 - 9:28
    मला माझे ९ वर्षांचे असणे आठवते,
  • 9:28 - 9:30
    आणि आश्चर्य वाटणे,
  • 9:30 - 9:32
    आणि कदाचित,
  • 9:32 - 9:34
    थोडासा आदर्शवाद.
  • 9:34 - 9:37
    आणि आपल्याला अजून खूप मोठी
    मजल मारायची आहे,
  • 9:37 - 9:40
    शिकण्यासारखे बरेच काही बाकी आहे,
  • 9:40 - 9:45
    पण मला एक गोष्ट माहिती आहे की,
    बांधिलकी आणि सृजनशीलतेच्या मदतीने
  • 9:45 - 9:49
    तुम्ही निर्माण करु शकता -
    सोदर्य आणि सुखसोयी,
  • 9:49 - 9:52
    सुरक्षितता आणि चैनसुद्धा,
  • 9:52 - 9:55
    अश्या साधनाने जे पुन्हा निर्माण होऊ शकते.
  • 9:55 - 9:58
    धन्यवाद.
  • 9:58 - 10:03
    ( टाळ्या )
Title:
जादुई घरे, बांबूपासून बनवलेली
Speaker:
एलोरा हार्डी
Description:

तुम्ही अशी घरे कधी पहिली नसतील. बालीमधे एलोरा हार्डी आणि तिच्या गटाने बांधलेली ही नेत्रदीपक घरे आपल्याला त्याच्या प्रत्येक वळ्णाने आणि पिळाने आपल्याला आश्चर्यचकित करतात. ती जुन्या संकेतांना आव्हान देतात कारण बांबू स्वत:च खूप गूढ आहे. बांबूचे कुठलेही दोन खांब एकसारखे नसतात, त्यामुळे घर, पूल आणि स्नानगृह उत्कृष्टपणे अद्वितीय असतात. ह्या सुंदर, मग्न करणाऱ्या भाषणात त्या, बांबूची ताकद, एक शाश्वत संसाधन आणि कल्पनेसाठीचा एक विचार आपल्यासमोर ठेवतात. त्या म्हणतात "आपल्यालच आपल्या स्वतःच नियमांचा शोध लावावा लागतो."

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
10:17

Marathi subtitles

Revisions Compare revisions