Return to Video

माझ्या आजोबांना सुरक्षितता देणारे माझे उपकरण

  • 0:01 - 0:04
    आरोग्याबाबत अमेरिकेत वाटणारी भीती कोणती ?
  • 0:04 - 0:07
    कॅन्सर ,मधुमेह ,ह्र्दय रोग ?
  • 0:08 - 0:09
    नाही , यांतील कोणतीही नाही.
  • 0:09 - 0:11
    अमेरिकनांना भीती आहे अल्झायमरची
  • 0:11 - 0:13
    दर ६७ सेकंदात
  • 0:13 - 0:16
    एकास अल्झायमर आढळतो.
  • 0:17 - 0:20
    २०५० साली ही संख्या तिप्पट होइल.
  • 0:20 - 0:23
    या रोगाला बळी पडणाऱ्यांची काळजी घेणं
  • 0:23 - 0:26
    एक खडतर सामाजिक आव्हान आहे.
  • 0:27 - 0:28
    माझ्या कुटुंबाने हे भोगले आहे.
  • 0:28 - 0:31
    घरातील अल्झायमरच्या रुग्णाची काळजी घेतांना
  • 0:31 - 0:33
    माझे आजोबा तीन पिढ्या आमच्या सोबत होते.
  • 0:33 - 0:35
    मी त्यांना जवळचा होतो.
  • 0:35 - 0:37
    मी चार वर्षाचा असतांना,
  • 0:37 - 0:39
    आजोबांबरोबर बागेत फिरत असतांना
  • 0:39 - 0:40
    अचानक ते हरवले.
  • 0:40 - 0:44
    हा माझ्या आयुष्यातील
    सर्वात भीतीदायक अनुभव आहे.
  • 0:44 - 0:46
    या प्रसंगाने प्रथमच कळले,
  • 0:46 - 0:48
    माझ्या आजोबांना अलझायमर आहे
  • 0:49 - 0:52
    गत १२ वर्षे स्थिती अधिकाधिक वाईट होतेय.
  • 0:52 - 0:56
    त्यांच्या फिरण्याची आम्हा
    सर्वांना धास्ती वाटते.
  • 0:56 - 0:57
    माझी आत्या जी त्यांची काळजी घेई
  • 0:57 - 1:00
    लक्ष ठेवण्यासाठी रात्री जागायची.
  • 1:00 - 1:03
    बऱ्याचवेळा तिची नजर चुकवून ते बाहेर जायचे.
  • 1:03 - 1:06
    मला आत्याच्या प्रकृतीची काळजी वाटे.
  • 1:06 - 1:08
    तशीच आजोबांच्या सुरक्षिततेचीही.
  • 1:08 - 1:11
    या समस्येतून मार्ग निघाला नाही
  • 1:11 - 1:12
    खूप प्रयत्न करूनही.
  • 1:13 - 1:16
    दोन वर्षापूर्वी एका रात्री
  • 1:16 - 1:19
    मी आजोबांना पलंगावरून उतरताना पहिले.
  • 1:19 - 1:21
    त्यांचा पाय जमिनीवर पडला
  • 1:21 - 1:24
    आणि मला कल्पना सुचली
  • 1:24 - 1:27
    जेव्हा ते जमिनीवर पाय ठेवतात
  • 1:27 - 1:31
    त्यांच्या टाचेला दाबदर्शक
    संवेदक का बसवू नये? जो
  • 1:31 - 1:34
    पायाच्या वजनामुळे कार्यान्वित होऊन
    स्मार्ट फोनवर सूचना देईल
  • 1:34 - 1:36
    आणि त्यामुळे आत्याला
    काही काळ झोपता येईल
  • 1:36 - 1:39
    आजोबांच्या भ्रमणाची कमी काळजी करून.
  • 1:39 - 1:43
    मी या प्रणालीचे कामकाज दाखवू इच्छितो.
  • 1:45 - 1:48
    कृपया माझे उपकरण मंचावर ठेवा.
  • 1:49 - 1:51
    छान
  • 1:52 - 1:56
    जेव्हा रुग्ण जमिनीवर पाय ठेवतो
  • 1:56 - 1:58
    (घंटी वाजते)
  • 1:58 - 2:00
    तेव्हा हा संदेश काळजी घेणाऱ्याच्या
    स्मार्ट फोनवर वाजतो.
  • 2:05 - 2:06
    (टाळ्या)
  • 2:06 - 2:09
    आभारी आहे. या साधनाचा
  • 2:12 - 2:15
    पण हे माझे प्राथमिक साधन आहे
  • 2:16 - 2:18
    असे तंत्रज्ञान वृद्धिंगत करण्याचा
    माझा इरादा आहे
  • 2:18 - 2:22
    हे कदाचित या तंत्रज्ञांनाची
    मला असलेल्या ओढीमुळे.
  • 2:22 - 2:23
    मी सहा वर्षाचा असतांना
  • 2:23 - 2:26
    माझ्या कुटुंबाचा एक वयस्कर मित्र
    स्नानगृहात पडला.
  • 2:26 - 2:28
    तो खूप जायबंदी झाला.
  • 2:28 - 2:30
    या घटनेमुळे मला आजी आजोबांची काळजी वाटली.
  • 2:30 - 2:32
    स्नानगृहासाठी अशी सूचक प्रणाली
    शोधण्याचे ठरवले.
  • 2:32 - 2:36
    यासाठी स्नानगृहात फरशीवर
    गतीदर्शक संवेदके बसवता येतील.
  • 2:36 - 2:39
    स्नानगृहात कोणी पडल्यास कळावे यासाठी
  • 2:39 - 2:41
    त्यावेळी मी सहा वर्षाचा होतो.
  • 2:41 - 2:44
    बालर्गातून बाहेर ही पडलो नव्हतो.
  • 2:44 - 2:48
    माझी कल्पना अमलात आणण्यासाठी
    योग्य साधने नव्हती.
  • 2:48 - 2:51
    माझ्या शोधवृत्तीने अशी प्रणाली
    शोधण्यास मदत केली.
  • 2:51 - 2:55
    संवेदके वापरून वृद्धांना मदत करणारी
  • 2:55 - 3:00
    अशी यंत्रणा वृद्धांना सुराशित ठेवेल
  • 3:01 - 3:04
    कामाच्या सुरवातीस मला
    तीन आव्हाने पेलावी लागली
  • 3:04 - 3:06
    प्रथम असे संवेदक तयार करणे
  • 3:06 - 3:08
    त्यासाठी विद्युत परिपथ मांडणे
  • 3:08 - 3:10
    स्मार्ट फोनवर चालणारी प्रणाली करणे.
  • 3:10 - 3:13
    मला वाटत होते
  • 3:13 - 3:15
    त्यापेक्षा ही हे कठीण होते
  • 3:15 - 3:18
    प्रथम अंगावर घालता येईल असे पातळ लवचिक
    संवेदक बनविणे .
  • 3:18 - 3:21
    जे रुग्णाला त्याच्या
    पायात घालणे सोयीचे वाटेल
  • 3:21 - 3:25
    रबरा सारखे निरनिराळे पदार्थ वापरून
  • 3:25 - 3:28
    कळले हे पायात घालणे सोयीस्कर नाही.
  • 3:28 - 3:30
    मी ठरविले, संवेदक फिल्मवर छापावे
  • 3:30 - 3:33
    दाब दर्शक शाई विद्युतप्रवाह
    वाहून नेणारी असेल
  • 3:33 - 3:36
    ज्यामुळे त्यावर दाब पडल्यावर
    विद्युत प्रवाह कार्यरत होईल
  • 3:36 - 3:39
    त्या करिता दाब मोजणारा
    विद्युत परिपथ मला बनवावा लागेल
  • 3:39 - 3:41
    जो मला विद्युत रोध मोजून समजेल .
  • 3:41 - 3:44
    मला अंगावर घालता यईल असा
    बिनतारी परिपथ करावा लागेल
  • 3:44 - 3:47
    बिनतारी यंत्रणेस खूप उर्जा लागते
  • 3:47 - 3:49
    त्यासाठी मोठा विद्युतघट वापरावा लागेल
  • 3:51 - 3:53
    या तंत्राचा मी आभारी आहे
  • 3:53 - 3:56
    ही प्रणाली नाण्याच्या आकाराच्या सेल
    व कमी उर्जेवर चालते
  • 3:56 - 4:00
    सतत रात्रीही चालते
  • 4:00 - 4:03
    मी स्मार्ट फोनवर काम करणारे साधन केले जे
  • 4:03 - 4:06
    संदेश देई काळजी घेणाऱ्याच्या मोबाईल फोनवर
  • 4:06 - 4:09
    त्यासाठी मला जावा व कोडींग शिकावे लागले.
  • 4:09 - 4:13
    ब्लूटूथ कोडिंग चे ज्ञान मिळविले.
  • 4:13 - 4:16
    जे मी युटूब व पुस्तकातून शिकलो.
  • 4:17 - 4:21
    त्यातूनच मी दोन प्रारंभीची उपकरणे बनविली.
  • 4:21 - 4:23
    एकात पायाच्या मोजात हे उपकरण
    कायम बसविले होते
  • 4:23 - 4:26
    दुसरे काढून पुन्हा लावता येई
  • 4:26 - 4:28
    कोठे ही जे रुग्णाच्या संपर्कात असे
  • 4:28 - 4:30
    रुग्णाच्या पायाशी.
  • 4:30 - 4:33
    मी हे आजोबांसाठी वर्षभरापासून वापरतो.
  • 4:33 - 4:34
    हे शंभर टक्के यशस्वी आहे.
  • 4:36 - 4:38
    मी ९०० वेळा हे वापरले यशस्वीपणे
  • 4:39 - 4:41
    गेल्या उन्हाळ्यात मला
    संधी मिळाली परीक्षणाची
  • 4:41 - 4:44
    कालीफोर्नियातल्या वृद्धाश्रमात.
  • 4:44 - 4:46
    मी या सर्वांचा प्रतिसाद घेत आहे
  • 4:46 - 4:49
    ज्यायोगे सुधारित साधन बाजारात येईल
  • 4:49 - 4:51
    अनेक रुग्णांवर याचा वापर केल्यावर
  • 4:51 - 4:53
    मला कळले यात सुधारणा हवी अस अश्यांसाठी
  • 4:53 - 4:56
    रात्री ज्यांना मोजे घालून झोपायचे नसते
  • 4:57 - 5:00
    मला याचा प्रतिसाद सूचना मिळत आहे.
  • 5:00 - 5:02
    बाजारात सुधारित उत्पादन करण्यासाठी.
  • 5:02 - 5:05
    या आजारावर उपाय शोधत आहे
  • 5:05 - 5:07
    मी सध्या परीक्षण करीत आहे
  • 5:07 - 5:10
    रुग्णाच्या रात्र भ्रमण संख्येचा
  • 5:10 - 5:13
    व दिवस कार्य
    व आहाराचा काय संबंध आहे.
  • 5:14 - 5:17
    मी तो दिवस विसरणार नाही ज्यादिवशी
  • 5:17 - 5:19
    आजोबाना साधनाने प्रथम पकडले
  • 5:19 - 5:22
    प्रथमताच मला या तंत्राची शक्ती जाणवली
  • 5:22 - 5:24
    जीवन जगणे सुखकर कसे करता येईल
  • 5:24 - 5:26
    लोक आरोग्यदायी कसे जगू शकतील
  • 5:26 - 5:27
    अशा जगाचे मी स्वप्न पाहत आहे
  • 5:29 - 5:30
    मी खूप आभारी आहे (टाळ्या)
Title:
माझ्या आजोबांना सुरक्षितता देणारे माझे उपकरण
Speaker:
केनेथ शिनोझुका
Description:

साठ टक्के मेंदुविकाराने पिडीत रुग्ण बाहेर फिरतात. ते व त्यांची काळजी घेणारे यांना असलेला तणाव याबाबत रंजरीत्या बोलत आहेत केनेथ शिनोझुका लहानग्या केनेथने रात्री भ्रमण करणाऱ्या आपल्या आजोबाना आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आत्याला म त करण्याचा नवा प्रयोग केला.यातूनच अन्य अल्झ्याय्म्रच्या रुग्णांना मदत अरण्याची नवी आश कशी निर्माण झाली त्याची कथा

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
05:46
  • Nice job.

  • Language Coordinators, please review the summary of this talk. I submitted the translation but forgot to do the summary. Thank you.

Marathi subtitles

Revisions