Return to Video

फुलपाखरांचा स्व: औषधोपचार

  • 0:00 - 0:02
    संसर्गजन्य आजार
  • 0:02 - 0:04
    संसर्गजन्य आजार हे आज सुद्धा
  • 0:04 - 0:06
    जगभर मृत्यूचे मुख्य कारण आहेत
  • 0:06 - 0:11
    मलेरिया,क्षय ,एच. आय व्ही, सारख्या
    आजारांमुळे दर वर्षी लाखो मृत्यू होतात
  • 0:11 - 0:14
    जगभर आणि अमेरिकेत सुद्धा.
  • 0:14 - 0:17
    अमेरिकेत सुद्धा दर वर्षी हजारो नागरिकांचा
    तापामुळे मृत्यु होतो.
  • 0:17 - 0:19
    पण आपण माणसे कल्पक आहोत,
    बरोबर?
  • 0:19 - 0:23
    आपण ह्या रोगांपासून बचावाचे
    उपाय शोधून काढले आहेत.
  • 0:23 - 0:24
    आपल्यासाठी औषधे आणि लसी आहेत
  • 0:24 - 0:27
    आपण जागरूक आहोत.
    आपण अनुभवांवरुन शिकतो
  • 0:27 - 0:29
    आणि नवीन उपाय शोधून काढतो.
  • 0:29 - 0:32
    आपल्याला वाटायचे की असे आपण एकटेच आहोत.
    पण आता आपल्याला माहीत आहे की असे नाही
  • 0:32 - 0:35
    वैद्यक शास्त्राचा वापर करणारे
    केवळ आपणच नाही.
  • 0:35 - 0:37
    आता आपल्याला माहीत आहे की
    अनेक प्राणी सुद्धा हे करू शकतात.
  • 0:37 - 0:39
    सर्वांना माहित असलेले उदाहरण,
    चिंपाझी माकडे .
  • 0:39 - 0:41
    अगदी आपल्यासारखेच
  • 0:41 - 0:44
    ते सुद्धा पोटातील जंतांच्या उपचारासाठी
    झाडांचा वापर करतात .
  • 0:44 - 0:47
    पण गेल्या दशकांत असे आढळून आले आहे
    की इतर प्राणी सुद्धा हे करतात
  • 0:47 - 0:51
    हत्ती, साळींदर, शेळी , मेंढी
    असे अनेक प्राणी
  • 0:51 - 0:54
    आणि ह्या पेक्षाही विशेष म्हणजे
    नुकतेच लागलेले शोध
  • 0:54 - 1:00
    की कीटक आणि अनेक छोटे जीव सुद्धा
    औषधोपचार करू शकतात
  • 1:00 - 1:02
    संसर्गजन्य रोगांचे वैशिष्ट हे की
  • 1:02 - 1:04
    संसर्गजन्य जीवाणू सतत विकसित होत असतात
  • 1:04 - 1:06
    आणि आपण निर्माण केलेल्या अनेक औषधांचा
  • 1:06 - 1:08
    प्रभावीपणा कमी होत आहे.
  • 1:08 - 1:14
    ह्यामुळेच गरज आहे ह्या आजारांवर
    औषध शोधायच्या नव्या पद्धतीची
  • 1:14 - 1:20
    आपले आजार कसे बरे करावे हे आपण ह्या
    प्राण्यांकडून शिकायला हवे असे मला वाटते
  • 1:20 - 1:25
    एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मी मोनार्क
    फुलपाखरांचा दहा वर्ष अभ्यास करत आहे.
  • 1:25 - 1:31
    मोनार्क फुलपाखरे दरवर्षी अमेरिका
    आणि कॅनडा येथून लाखोंच्या संखेने मेक्सिको
  • 1:31 - 1:35
    येथील स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहेत पण
    मी त्यांचा अभ्यास करण्यामागे हे कारण नाही.
  • 1:35 - 1:38
    मी त्यांचा अभ्यास करतो
    कारण ते आजारी पडतात.
  • 1:38 - 1:41
    ते तुमच्या माझ्यासारखेच आजारी पडतात.
  • 1:41 - 1:45
    मला वाटते की त्यांच्यापासून आपण
    आपल्या औषधांबद्दल बरच काही शिकू शकतो
  • 1:45 - 1:52
    मोनार्क फुलपाखरांना ओफ्रिओसिस्टीस
    इलेक्ट्रोस्केरा हया परोपजीवीमुळे संसर्ग होतो
  • 1:52 - 1:55
    ते फुलपाखरांवर बाहेरून
    लाखो अतिसूक्ष्म बीजाणू पसरवतात
  • 1:55 - 1:59
    जे त्यांच्या पंखावर
    सूक्ष्म कणांमध्ये आढळतात
  • 1:59 - 2:01
    जे फुलपाखरांसाठी खूपच हानिकारक ठरते.
  • 2:01 - 2:03
    ह्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी होते,
  • 2:03 - 2:05
    त्यांना उडण्यात अडचणी निर्माण होतात,
  • 2:05 - 2:07
    आणि पूर्ण वाढ होण्याआधीच
    त्यांचा मृत्त्यू सुध्धा होऊ शकतो.
  • 2:07 - 2:10
    अतिशय हानिकारक परोपजीवी.
  • 2:10 - 2:14
    माझ्या कामासाठी झाडे वाढवण्याकरता
    मी हरितगृहांमध्ये खूप वेळ काम करतो
  • 2:14 - 2:17
    ह्याचे कारण कि मोनार्क फुलपाखरे
    खाण्याबाबत खूप निवडक असतात
  • 2:17 - 2:19
    अळी असताना ते फक्त मिल्कवीडच खातात.
  • 2:19 - 2:22
    चांगली गोष्ट अशी की
    मिल्कवीडचे अनेक प्रकार आहेत
  • 2:22 - 2:25
    आणि त्या सर्वात कार्डेनोलाईड असतात
  • 2:25 - 2:27
    जी विषारी रसायने आहेत
  • 2:27 - 2:29
    ही रसायने अनेक प्राण्यांना घातक आहेत
    पण मोनार्क फुलपाखरांना नाही.
  • 2:29 - 2:33
    उलट मोनार्क फुलपाखरे ही रसायने
    आपल्या शरीरात साठवतात
  • 2:33 - 2:36
    आणि ज्यामुळे ते त्यांच्या शिकारयांसाठी,
    उदाहरणार्थ पक्षी, विषारी बनतात
  • 2:36 - 2:38
    ते ह्या विषारीपणाची कल्पनाही देतात
  • 2:38 - 2:42
    आपल्या शरीरावरील नारिंगी, काळे आणि पांढरे
    अश्या सुंदर व इशारापूर्ण रंगसंगतीने
  • 2:43 - 2:47
    मी माझ्या कामानिमित्त हरितगृहामध्ये
    अनेक झाडे वाढवली,
  • 2:47 - 2:48
    मिल्कवीडच्या विविध प्रजाती
  • 2:48 - 2:51
    काही विषारी, जसे उष्ण प्रदेशीय मिल्कवीड
  • 2:51 - 2:54
    ज्यात कार्डेनोलाईडचे प्रमाण खूप जास्त असते
  • 2:54 - 2:56
    आणि काही बिनविषारी.
  • 2:56 - 2:58
    मी ही झाडे ममोनार्कांना खाऊ घातली.
  • 2:58 - 3:00
    काही मोनार्क फुलपाखरे निरोगी राहिली,
    एकही आजार नाही
  • 3:00 - 3:02
    पण काही फुलपाखरे आजारी होती.
  • 3:02 - 3:05
    मला असे आढळले की
    काही मिल्कवीड प्रजाती औषधी आहेत
  • 3:05 - 3:08
    म्हणजे त्यांनी मोनार्क फुलपाखारांमधली
    रोगाची लक्षणे कमी केली .
  • 3:08 - 3:11
    ह्याचा अर्थ असा कि ही फुलपाखरे
    जरी संसर्गीत असली तरी
  • 3:11 - 3:13
    ह्या औषधी झाडांच्या आहारामुळे
    जास्त दिवस जगू शकतात
  • 3:14 - 3:16
    हे जेव्हा समजले तेव्हा
    माझ्या मनात एक कल्पना आली,
  • 3:16 - 3:18
    अनेक लोकांनी सांगितले की
    हि एक अश्यक कल्पना आहे,
  • 3:18 - 3:21
    मी विचार केला कि जर मोनार्क फुलपाखरे
    ह्याचा उपयोग करू शकली तर ?
  • 3:21 - 3:24
    जर ते ह्या झाडांचा
    औषधी उपयोग करू शकले तर ?
  • 3:24 - 3:26
    जर ते स्व:ताचे वैद्य बनू शकले तर ?
  • 3:27 - 3:29
    मग मी आणि माझ्या सहकाऱयांनी
    प्रयोग सुरु केले.
  • 3:29 - 3:30
    सर्वप्रथम आम्ही
  • 3:30 - 3:33
    सुरवंटावर प्रयोग केले.
    आम्ही त्यांना दोन पर्याय दिले:
  • 3:33 - 3:36
    औषधी आणि बिन औषधी मिल्कवीड
  • 3:36 - 3:39
    आणि त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी दोन्ही प्रकारची
    किती झाडे खाल्ली ह्याचा आम्ही अभ्यास केला
  • 3:39 - 3:42
    आणि त्याचे निष्कर्ष विज्ञानातल्या इतर
    कोणत्याही प्रयोगाप्रमाणेच अतिशय साधे होते.
  • 3:42 - 3:46
    पन्नास टक्के औषधी
    पन्नास टक्के बिन औषधी.
  • 3:46 - 3:50
    ह्या सुरवंटानी स्वताच्या भल्यासाठी
    काहीच प्रयन्त केले नाहीत.
  • 3:51 - 3:53
    मग आम्ही पूर्ण वाढ झालेल्या
    फुलपाखरांकडे लक्ष वळवले.
  • 3:53 - 3:55
    आमचा प्रश्न होता कि
  • 3:55 - 3:58
    एक मादी फुलपाखरू आपल्या
    अपत्यांना औषधोपचार करू शकते का ?
  • 3:58 - 4:01
    एक मादी औषधी झाडावर अंडी घालेल का
  • 4:01 - 4:04
    ज्यामुळे तिची अपत्ये कमी आजारी पडतील .
  • 4:04 - 4:06
    आम्ही हे प्रयोग अनेक वर्ष केले आहेत
  • 4:06 - 4:08
    आणि नेहमी एकसारखेच निष्कर्ष मिळतात.
  • 4:08 - 4:10
    आम्ही एका मोठ्या पिंजऱ्यात एक मोनार्क ,
  • 4:10 - 4:14
    एका बाजूला औषधी झाड आणि
    दुसर्या बाजूला बिन औषधी झाड ठेवतो,
  • 4:14 - 4:18
    आणि त्यानंतर फुलपाखराने दोन्ही झाडांवर
    घातलेली अंड्याची संख्या मोजतो.
  • 4:18 - 4:21
    आणि आम्हाला दरवेळेस सारखेच निकाल मिळतात.
  • 4:21 - 4:25
    आम्ही पाहिले की मोनार्क फुलपाखरे
    मोठ्या प्रमाणावर औषधी मिल्कवीड निवडतात.
  • 4:25 - 4:27
    सरळ सांगायचे म्हटले तर
  • 4:27 - 4:30
    मादी मोनार्क ६८ टक्के अंडी
    औषधी झाडावर घालतात.
  • 4:30 - 4:36
    आश्चर्य म्हणजे, अंडी घालताना त्या
    परोपजीवीसुद्धा संक्रमित करतात .
  • 4:36 - 4:38
    ते हे टाळू शकत नाहीत.
  • 4:38 - 4:39
    ते स्व:तावर औषधोपचार सुद्धा
    करू शकत नाहीत.
  • 4:39 - 4:42
    पण हे प्रयोग हे दाखवतात की
  • 4:42 - 4:47
    ह्या मोनार्क माद्या त्यांची अंडी
    औषधी झाडांवर टाकू शकतात ज्यामुळे
  • 4:47 - 4:50
    त्यांच्या अपत्यांचे आजार कमी होतात.
  • 4:51 - 4:54
    हा एक महत्वपूर्ण शोध आहे,
  • 4:54 - 4:56
    केवळ ह्यामुळेच नाही कारण ह्यातन आपल्याला
    निसर्गा बद्दल अद्भुत माहिती मिळते
  • 4:56 - 5:00
    पण ह्यामुळे कि आपल्याला औषधे कशी
    शोधता येतील ह्याबद्दल नविन माहिती मिळते.
  • 5:00 - 5:02
    हे खूपच छोटे प्राणी आहेत.
  • 5:02 - 5:04
    आणि आपण त्यांचा अतिशय साधे असा विचार करतो.
  • 5:04 - 5:06
    त्यांचा मेंदू अतिशय सूक्ष्म असून सुद्धा
  • 5:06 - 5:08
    ते अतिशय प्रगत असे औषधोपचार करू शकतात.
  • 5:09 - 5:11
    आपल्याला माहित आहे,
    अगदी आजसुद्धा आपली अनेक औषधे
  • 5:11 - 5:14
    झाडांसकट इतर नैसर्गिक घटकांवर आधारीत आहेत.
  • 5:14 - 5:16
    अनेक स्थानिक संस्कृतींमध्ये
  • 5:16 - 5:19
    पारंपारिक वैद्य नव्या औषधांसाठी
    प्राण्यांचा अभ्यास करत असत.
  • 5:19 - 5:22
    ह्या पद्धतीने हत्तीं पासन आपण अपचनावर
    उपाय शिकलो अहोत.
  • 5:22 - 5:25
    तर साळींदरापासन जुलाबावर
    उपाय शिकलो अहोत.
  • 5:25 - 5:28
    माझ्या मते महत्वाचे हे आहे की
  • 5:28 - 5:32
    ह्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या पलीकडे जाउन
    या प्राण्यांना सुद्धा श्रेय दिले पाहिजे.
  • 5:32 - 5:35
    हे प्राणी , हे कीटक ज्यांचा आपण
  • 5:35 - 5:38
    अतिशय साधे आणि छोटा मेंदू असलेले
    असा विचार करतो.
  • 5:38 - 5:42
    हे प्राणी सुद्धा औषधोपचार करू शकतात
    ह्या शोधामुळे
  • 5:42 - 5:44
    अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
  • 5:44 - 5:49
    आणि मला असे वाटते की एके दिवशी आपण
    अश्या औषधांनी मनुष्यांवर उपचार करत असू
  • 5:49 - 5:52
    ज्यांचा शोध सर्व प्रथम
    फुलपाखरांनी लावला असेल.
  • 5:52 - 5:56
    आणि मला वाटते ही एक मोलाची संधी आहे.
  • 5:56 - 5:58
    धन्यवाद
  • 5:58 - 6:03
    (टाळ्या)
Title:
फुलपाखरांचा स्व: औषधोपचार
Speaker:
जाप दे रोडे
Description:

आम्हाला सारखेच , सम्राट फुलपाखरु कधी कधी एका ओंगळ परजीवामुळे आजारी पडतात.
पण जीवशास्त्रज्ञ जाप डी रोडे यांचा काही मनोरंजक काही बाबी लक्षात आल्या, आजारी मादी तीच्या संततीला अाजार टाळण्यासाठी एक विशिष्ट प्रकार वनस्पतीची मदत धेते. एका विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वर ती अंडी घालते. ती कसी या वनस्पती निवडते हे माहित आहे का? मानवी रोग उपचार नवीन औषधे शोधण्यासाठी आपाल्याला हे शिकवू शकते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
06:15

Marathi subtitles

Revisions