0:00:00.190,0:00:01.720 संसर्गजन्य आजार 0:00:01.720,0:00:03.870 संसर्गजन्य आजार हे आज सुद्धा 0:00:03.870,0:00:06.197 जगभर मृत्यूचे मुख्य कारण आहेत 0:00:06.197,0:00:11.367 मलेरिया,क्षय ,एच. आय व्ही, सारख्या [br]आजारांमुळे दर वर्षी लाखो मृत्यू होतात 0:00:11.367,0:00:13.713 जगभर आणि अमेरिकेत सुद्धा. 0:00:13.713,0:00:17.319 अमेरिकेत सुद्धा दर वर्षी हजारो नागरिकांचा[br]तापामुळे मृत्यु होतो. 0:00:17.319,0:00:19.474 पण आपण माणसे कल्पक आहोत,[br]बरोबर? 0:00:19.474,0:00:22.799 आपण ह्या रोगांपासून बचावाचे[br]उपाय शोधून काढले आहेत. 0:00:22.799,0:00:24.104 आपल्यासाठी औषधे आणि लसी आहेत 0:00:24.104,0:00:27.489 आपण जागरूक आहोत. [br]आपण अनुभवांवरुन शिकतो 0:00:27.489,0:00:29.416 आणि नवीन उपाय शोधून काढतो. 0:00:29.416,0:00:32.481 आपल्याला वाटायचे की असे आपण एकटेच आहोत. [br]पण आता आपल्याला माहीत आहे की असे नाही 0:00:32.481,0:00:34.620 वैद्यक शास्त्राचा वापर करणारे [br]केवळ आपणच नाही. 0:00:34.620,0:00:37.376 आता आपल्याला माहीत आहे की [br]अनेक प्राणी सुद्धा हे करू शकतात. 0:00:37.376,0:00:39.330 सर्वांना माहित असलेले उदाहरण, [br]चिंपाझी माकडे . 0:00:39.330,0:00:40.831 अगदी आपल्यासारखेच 0:00:40.831,0:00:43.696 ते सुद्धा पोटातील जंतांच्या उपचारासाठी[br]झाडांचा वापर करतात . 0:00:43.696,0:00:47.143 पण गेल्या दशकांत असे आढळून आले आहे[br]की इतर प्राणी सुद्धा हे करतात 0:00:47.143,0:00:50.522 हत्ती, साळींदर, शेळी , मेंढी [br]असे अनेक प्राणी 0:00:50.522,0:00:54.161 आणि ह्या पेक्षाही विशेष म्हणजे [br]नुकतेच लागलेले शोध 0:00:54.161,0:00:59.603 की कीटक आणि अनेक छोटे जीव सुद्धा [br]औषधोपचार करू शकतात 0:00:59.603,0:01:02.132 संसर्गजन्य रोगांचे वैशिष्ट हे की 0:01:02.132,0:01:04.081 संसर्गजन्य जीवाणू सतत विकसित होत असतात 0:01:04.081,0:01:06.317 आणि आपण निर्माण केलेल्या अनेक औषधांचा 0:01:06.317,0:01:07.976 प्रभावीपणा कमी होत आहे. 0:01:07.976,0:01:13.977 ह्यामुळेच गरज आहे ह्या आजारांवर [br]औषध शोधायच्या नव्या पद्धतीची 0:01:13.977,0:01:19.851 आपले आजार कसे बरे करावे हे आपण ह्या [br]प्राण्यांकडून शिकायला हवे असे मला वाटते 0:01:20.461,0:01:24.689 एक जीवशास्त्रज्ञ म्हणून मी मोनार्क [br]फुलपाखरांचा दहा वर्ष अभ्यास करत आहे. 0:01:24.689,0:01:31.069 मोनार्क फुलपाखरे दरवर्षी अमेरिका [br]आणि कॅनडा येथून लाखोंच्या संखेने मेक्सिको 0:01:31.069,0:01:35.101 येथील स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहेत पण [br]मी त्यांचा अभ्यास करण्यामागे हे कारण नाही. 0:01:35.451,0:01:37.943 मी त्यांचा अभ्यास करतो [br]कारण ते आजारी पडतात. 0:01:37.943,0:01:40.630 ते तुमच्या माझ्यासारखेच आजारी पडतात. 0:01:40.630,0:01:45.172 मला वाटते की त्यांच्यापासून आपण [br]आपल्या औषधांबद्दल बरच काही शिकू शकतो [br] 0:01:45.347,0:01:51.592 मोनार्क फुलपाखरांना ओफ्रिओसिस्टीस [br]इलेक्ट्रोस्केरा हया परोपजीवीमुळे संसर्ग होतो 0:01:51.692,0:01:55.424 ते फुलपाखरांवर बाहेरून [br]लाखो अतिसूक्ष्म बीजाणू पसरवतात 0:01:55.424,0:01:59.439 जे त्यांच्या पंखावर [br]सूक्ष्म कणांमध्ये आढळतात 0:01:59.439,0:02:01.417 जे फुलपाखरांसाठी खूपच हानिकारक ठरते. 0:02:01.417,0:02:03.062 ह्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी होते, 0:02:03.062,0:02:05.079 त्यांना उडण्यात अडचणी निर्माण होतात, 0:02:05.079,0:02:07.450 आणि पूर्ण वाढ होण्याआधीच [br]त्यांचा मृत्त्यू सुध्धा होऊ शकतो. 0:02:07.450,0:02:09.696 अतिशय हानिकारक परोपजीवी. 0:02:09.726,0:02:13.759 माझ्या कामासाठी झाडे वाढवण्याकरता [br]मी हरितगृहांमध्ये खूप वेळ काम करतो 0:02:13.759,0:02:17.264 ह्याचे कारण कि मोनार्क फुलपाखरे [br]खाण्याबाबत खूप निवडक असतात 0:02:17.264,0:02:19.419 अळी असताना ते फक्त मिल्कवीडच खातात. 0:02:19.419,0:02:22.415 चांगली गोष्ट अशी की [br]मिल्कवीडचे अनेक प्रकार आहेत 0:02:22.415,0:02:24.969 आणि त्या सर्वात कार्डेनोलाईड असतात 0:02:24.969,0:02:26.684 जी विषारी रसायने आहेत 0:02:26.684,0:02:29.456 ही रसायने अनेक प्राण्यांना घातक आहेत[br]पण मोनार्क फुलपाखरांना नाही. 0:02:29.456,0:02:32.644 उलट मोनार्क फुलपाखरे ही रसायने[br]आपल्या शरीरात साठवतात 0:02:32.644,0:02:36.003 आणि ज्यामुळे ते त्यांच्या शिकारयांसाठी, [br]उदाहरणार्थ पक्षी, विषारी बनतात 0:02:36.003,0:02:38.024 ते ह्या विषारीपणाची कल्पनाही देतात 0:02:38.028,0:02:42.156 आपल्या शरीरावरील नारिंगी, काळे आणि पांढरे [br]अश्या सुंदर व इशारापूर्ण रंगसंगतीने 0:02:42.608,0:02:47.394 मी माझ्या कामानिमित्त हरितगृहामध्ये[br]अनेक झाडे वाढवली, 0:02:47.394,0:02:48.288 मिल्कवीडच्या विविध प्रजाती 0:02:48.288,0:02:50.827 काही विषारी, जसे उष्ण प्रदेशीय मिल्कवीड 0:02:50.827,0:02:54.405 ज्यात कार्डेनोलाईडचे प्रमाण खूप जास्त असते 0:02:54.405,0:02:55.785 आणि काही बिनविषारी. 0:02:55.785,0:02:57.658 मी ही झाडे ममोनार्कांना खाऊ घातली. 0:02:57.668,0:03:00.003 काही मोनार्क फुलपाखरे निरोगी राहिली,[br]एकही आजार नाही 0:03:00.003,0:03:02.046 पण काही फुलपाखरे आजारी होती. 0:03:02.046,0:03:04.963 मला असे आढळले की [br]काही मिल्कवीड प्रजाती औषधी आहेत 0:03:04.963,0:03:08.090 म्हणजे त्यांनी मोनार्क फुलपाखारांमधली [br]रोगाची लक्षणे कमी केली . 0:03:08.090,0:03:11.041 ह्याचा अर्थ असा कि ही फुलपाखरे [br]जरी संसर्गीत असली तरी 0:03:11.041,0:03:13.322 ह्या औषधी झाडांच्या आहारामुळे [br]जास्त दिवस जगू शकतात 0:03:13.732,0:03:16.035 हे जेव्हा समजले तेव्हा [br]माझ्या मनात एक कल्पना आली, 0:03:16.035,0:03:18.343 अनेक लोकांनी सांगितले की [br]हि एक अश्यक कल्पना आहे, 0:03:18.343,0:03:20.817 मी विचार केला कि जर मोनार्क फुलपाखरे[br]ह्याचा उपयोग करू शकली तर ? 0:03:20.817,0:03:23.876 जर ते ह्या झाडांचा [br]औषधी उपयोग करू शकले तर ? 0:03:23.876,0:03:26.478 जर ते स्व:ताचे वैद्य बनू शकले तर ? 0:03:26.828,0:03:28.854 मग मी आणि माझ्या सहकाऱयांनी [br]प्रयोग सुरु केले. 0:03:28.854,0:03:30.315 सर्वप्रथम आम्ही 0:03:30.315,0:03:32.825 सुरवंटावर प्रयोग केले.[br]आम्ही त्यांना दोन पर्याय दिले: 0:03:32.825,0:03:35.566 औषधी आणि बिन औषधी मिल्कवीड 0:03:35.566,0:03:39.186 आणि त्यांच्या आयुष्यभरात त्यांनी दोन्ही प्रकारची [br]किती झाडे खाल्ली ह्याचा आम्ही अभ्यास केला 0:03:39.186,0:03:42.200 आणि त्याचे निष्कर्ष विज्ञानातल्या इतर [br]कोणत्याही प्रयोगाप्रमाणेच अतिशय साधे होते. 0:03:42.200,0:03:46.451 पन्नास टक्के औषधी [br]पन्नास टक्के बिन औषधी. 0:03:46.451,0:03:49.721 ह्या सुरवंटानी स्वताच्या भल्यासाठी [br]काहीच प्रयन्त केले नाहीत. 0:03:50.611,0:03:52.686 मग आम्ही पूर्ण वाढ झालेल्या [br]फुलपाखरांकडे लक्ष वळवले. [br] 0:03:52.686,0:03:54.577 आमचा प्रश्न होता कि 0:03:54.577,0:03:57.735 एक मादी फुलपाखरू आपल्या [br]अपत्यांना औषधोपचार करू शकते का ? 0:03:57.735,0:04:00.509 एक मादी औषधी झाडावर अंडी घालेल का 0:04:00.509,0:04:03.708 ज्यामुळे तिची अपत्ये कमी आजारी पडतील . 0:04:03.708,0:04:06.236 आम्ही हे प्रयोग अनेक वर्ष केले आहेत 0:04:06.236,0:04:08.024 आणि नेहमी एकसारखेच निष्कर्ष मिळतात. 0:04:08.024,0:04:10.186 आम्ही एका मोठ्या पिंजऱ्यात एक मोनार्क , 0:04:10.186,0:04:13.669 एका बाजूला औषधी झाड आणि [br]दुसर्या बाजूला बिन औषधी झाड ठेवतो, 0:04:13.669,0:04:18.245 आणि त्यानंतर फुलपाखराने दोन्ही झाडांवर[br]घातलेली अंड्याची संख्या मोजतो. 0:04:18.245,0:04:21.354 आणि आम्हाला दरवेळेस सारखेच निकाल मिळतात. [br] 0:04:21.354,0:04:24.947 आम्ही पाहिले की मोनार्क फुलपाखरे [br]मोठ्या प्रमाणावर औषधी मिल्कवीड निवडतात. 0:04:24.947,0:04:27.048 सरळ सांगायचे म्हटले तर 0:04:27.048,0:04:30.392 मादी मोनार्क ६८ टक्के अंडी [br]औषधी झाडावर घालतात. 0:04:30.392,0:04:36.102 आश्चर्य म्हणजे, अंडी घालताना त्या [br]परोपजीवीसुद्धा संक्रमित करतात . 0:04:36.102,0:04:37.512 ते हे टाळू शकत नाहीत. 0:04:37.512,0:04:39.443 ते स्व:तावर औषधोपचार सुद्धा [br]करू शकत नाहीत.[br] 0:04:39.443,0:04:41.680 पण हे प्रयोग हे दाखवतात की 0:04:41.680,0:04:46.509 ह्या मोनार्क माद्या त्यांची अंडी [br]औषधी झाडांवर टाकू शकतात ज्यामुळे 0:04:46.509,0:04:49.888 त्यांच्या अपत्यांचे आजार कमी होतात. 0:04:51.058,0:04:53.581 हा एक महत्वपूर्ण शोध आहे, 0:04:53.581,0:04:56.415 केवळ ह्यामुळेच नाही कारण ह्यातन आपल्याला [br]निसर्गा बद्दल अद्भुत माहिती मिळते 0:04:56.415,0:05:00.101 पण ह्यामुळे कि आपल्याला औषधे कशी [br]शोधता येतील ह्याबद्दल नविन माहिती मिळते. 0:05:00.101,0:05:02.101 हे खूपच छोटे प्राणी आहेत. 0:05:02.101,0:05:04.200 आणि आपण त्यांचा अतिशय साधे असा विचार करतो. 0:05:04.200,0:05:05.757 त्यांचा मेंदू अतिशय सूक्ष्म असून सुद्धा 0:05:05.757,0:05:08.181 ते अतिशय प्रगत असे औषधोपचार करू शकतात.[br] 0:05:08.811,0:05:11.389 आपल्याला माहित आहे,[br]अगदी आजसुद्धा आपली अनेक औषधे 0:05:11.389,0:05:14.148 झाडांसकट इतर नैसर्गिक घटकांवर आधारीत आहेत. 0:05:14.148,0:05:15.760 अनेक स्थानिक संस्कृतींमध्ये 0:05:15.760,0:05:18.595 पारंपारिक वैद्य नव्या औषधांसाठी [br]प्राण्यांचा अभ्यास करत असत. 0:05:18.595,0:05:22.002 ह्या पद्धतीने हत्तीं पासन आपण अपचनावर[br]उपाय शिकलो अहोत. 0:05:22.002,0:05:25.291 तर साळींदरापासन जुलाबावर [br]उपाय शिकलो अहोत. 0:05:25.291,0:05:27.946 माझ्या मते महत्वाचे हे आहे की 0:05:27.946,0:05:31.754 ह्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या पलीकडे जाउन[br]या प्राण्यांना सुद्धा श्रेय दिले पाहिजे. 0:05:31.754,0:05:34.656 हे प्राणी , हे कीटक ज्यांचा आपण 0:05:34.656,0:05:37.905 अतिशय साधे आणि छोटा मेंदू असलेले [br]असा विचार करतो. 0:05:37.905,0:05:41.876 हे प्राणी सुद्धा औषधोपचार करू शकतात[br]ह्या शोधामुळे 0:05:41.876,0:05:44.355 अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. 0:05:44.355,0:05:49.069 आणि मला असे वाटते की एके दिवशी आपण [br]अश्या औषधांनी मनुष्यांवर उपचार करत असू 0:05:49.069,0:05:52.178 ज्यांचा शोध सर्व प्रथम [br]फुलपाखरांनी लावला असेल. 0:05:52.178,0:05:56.153 आणि मला वाटते ही एक मोलाची संधी आहे. 0:05:56.153,0:05:57.526 धन्यवाद 0:05:57.526,0:06:02.821 (टाळ्या)