Return to Video

यशस्वी व्हा! एका अरब व्यावसायिक महिलेने दिलेले तीन धडे.

  • 0:01 - 0:03
    "आई, हे लोक कोण आहेत?"
  • 0:03 - 0:06
    अलियाने, माझ्या मुलीने,
    निरागसपणे प्रश्न विचारला होता.
  • 0:06 - 0:08
    ती तीन वर्षांची होती, तेव्हा.
  • 0:08 - 0:10
    आम्ही दोघी,
    माझ्या नवऱ्याबरोबर चाललो होतो.
  • 0:10 - 0:13
    अबू धाबीच्या मोठ्या, सुरेख मॉल्सपैकी
    एका मॉलमधून.
  • 0:13 - 0:17
    मॉलच्या मधोमध उभारलेल्या एका प्रचंड
    मोठ्या पोस्टरकडे अलिया निरखून पाहत होती.
  • 0:18 - 0:21
    त्यात संयुक्त अरब अमिरातींचे
    तीन राज्यकर्ते दाखवले होते.
  • 0:22 - 0:23
    ती माझ्या कुशीत शिरताच,
  • 0:23 - 0:26
    मी खाली वाकून तिला सांगितलं,
    ते तिघे अमिरातींचे राज्यकर्ते आहेत.
  • 0:26 - 0:29
    त्यांनी खूप कष्ट केले आहेत.
    राष्ट्र उभारण्यासाठी
  • 0:29 - 0:30
    आणि ऐक्य टिकवण्यासाठी.
  • 0:31 - 0:35
    तिने विचारलं, आई, असं का ग?
    इथे आपल्या शहरात,
  • 0:35 - 0:38
    आणि आजी आजोबांच्या लेबेनॉन मध्येदेखील,
  • 0:38 - 0:41
    भिंतीवर महत्त्वाच्या बायकांचे फोटो
    का दिसत नाहीत?
  • 0:41 - 0:43
    बायकांना महत्त्व नसतं, म्हणून का?
  • 0:44 - 0:48
    आईपद मिळाल्यानंतर मला विचारला गेलेला
    हा सगळ्यात कठीण प्रश्न होता.
  • 0:48 - 0:51
    खरं पाहिलं तर, माझ्या १६ वर्षांच्या
    व्यावसायिक कारकिर्दीतलाही.
  • 0:52 - 0:55
    माझं बालपण लेबेनॉनमधल्या एका गावात गेलं.
  • 0:55 - 0:59
    मी दोन बहिणींतली धाकटी.
    आमचे वडील, एक मेहनती वैमानिक.
  • 0:59 - 1:02
    ते लेबनीज एअरलाईन्सचे
    डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स होते.
  • 1:02 - 1:05
    आमचा भक्कम आधार.होता माझी गृहिणी आई
    आणि आजी.
  • 1:06 - 1:10
    माझ्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींना
    शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
  • 1:10 - 1:13
    खरं तर, त्याकाळी आमच्या संस्कृतीत
    ठसवलं जायचं, की मुलींनी नव्हे, तर
  • 1:13 - 1:17
    मुलांनी व्यावसायिक प्रेरणा बाळगावी.
    १८व्या वर्षी घर सोडून,
  • 1:19 - 1:21
    शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या,
  • 1:21 - 1:23
    माझ्या पिढीतल्या
    फार थोड्या मुलींपैकी मी एक होते.
  • 1:24 - 1:26
    माझ्या वडिलांना मुलगा नव्हता,
    म्हणून
  • 1:26 - 1:29
    एका अर्थाने मीच त्यांचा मुलगा झाले.
  • 1:31 - 1:35
    दोन दशकं पुढे जाऊन पाहिलं,
    तर मला वाटतं,
  • 1:35 - 1:37
    वडिलांना अभिमान वाटू देण्यात
    मी कमी पडले नाही.
  • 1:39 - 1:42
    इलेक्ट्रिकल इंजिनियरींग मध्ये
    बॅचलर्स आणि पीएचडी मिळवताना,
  • 1:42 - 1:45
    इंग्लंडमध्ये संशोधन आणि
    मध्यपूर्वेत कन्सल्टिंग करताना,
  • 1:45 - 1:48
    मी नेहमी
    पुरुषी वर्चस्वाच्या वातावरणात होते.
  • 1:49 - 1:53
    खरं सांगते, मला आदर्श वाटणारं
    असं कोणी सापडलंच नाही.
  • 1:54 - 1:57
    माझ्या आईच्या पिढीला
    व्यावसायिक नेतृत्व ठाऊक नव्हतं.
  • 1:58 - 2:00
    कधीतरी कोणी प्रोत्साहन देणारे पुरुष भेटले
  • 2:00 - 2:03
    पण मी किती ताण सहन करीत होते,
    हे त्यांपैकी कोणालाच ठाऊक नव्हतं.
  • 2:04 - 2:09
    मला दोन मुलं झाली, तेव्हा
    हे ताण जास्तच वाढले.
  • 2:10 - 2:14
    पाश्चात्य महिलांना, आम्हा गरीब आणि पीडित
    अरब महिलांना उपदेश करायला फार आवडत असलं,
  • 2:15 - 2:18
    तरी त्यांचं आयुष्य वेगळं आहे,
    त्यांच्या कक्षा वेगळ्या आहेत.
  • 2:19 - 2:23
    म्हणून, माझ्या पिढीतल्या अरब महिलांना,
    स्वतःच स्वतःचे आदर्श व्हावं लागलं.
  • 2:23 - 2:25
    आम्हाला अरब पुरुषांहून जास्त
    कसरत करावी लागली.
  • 2:26 - 2:29
    आणि पाश्चात्य महिलांपेक्षा जास्त
    कडव्या संस्कृतीचा सामना करावा लागला.
  • 2:30 - 2:34
    त्यामुळेच, मला म्हणावंसं वाटतं,
    की खरं तर आम्ही गरीब, पीडित महिला
  • 2:34 - 2:37
    जे निःसंशय खूप कष्टाने शिकलो,
    ते उपयुक्त धडे इतरांना देऊ शकतो.
  • 2:38 - 2:40
    आधुनिक जगात प्रगती करण्याची इच्छा असणाऱ्या
  • 2:40 - 2:43
    कोणालाही ते उपयुक्त ठरतील.
  • 2:43 - 2:45
    माझे हे तीन मुद्दे :
  • 2:45 - 2:47
    एक: त्यांच्या घाणीला आपलं इंधन बनवा.
  • 2:47 - 2:48
    (हशा)
  • 2:48 - 2:50
    (टाळ्या)
  • 2:54 - 2:59
    हा एक शब्द यशाची गुरुकिल्ली म्हणून
    सर्वत्र चमकत असतो:
  • 2:59 - 3:00
    लवचिकता.
  • 3:01 - 3:04
    तर, लवचिकता म्हणजे काय?
    ती कशी वाढवायची?
  • 3:05 - 3:10
    मला वाटतं, लवचिकता म्हणजे केवळ
    घाणीपासून इंधन बनवण्याची क्षमता.
  • 3:12 - 3:14
    माझ्या पूर्वीच्या नोकरीत,
    म्हणजे सध्याच्या फर्मच्या फार आधी,
  • 3:14 - 3:17
    मी एका माणसाबरोबर काम करत होते.
    समजा "जॉन".
  • 3:17 - 3:20
    मी आणि जॉन एक टीम होतो.
    मी खूप मेहनत करीत होते.
  • 3:20 - 3:22
    मला आशा होती, की
    त्याला माझं महत्त्व कळेल
  • 3:22 - 3:25
    आणि तो फर्ममध्ये भागीदार होण्याचा
    माझा प्रस्ताव उचलून धरेल.
  • 3:26 - 3:29
    माझे कन्सल्टिंग प्रोजेक्ट्स
    पूर्ण करीत असतानाच
  • 3:29 - 3:32
    मी महिलांच्या आर्थिक सबलीकरणाबद्दल
    आवेशाने लिहीत होते.
  • 3:34 - 3:38
    एके दिवशी मला एमबीए च्या विद्यार्थ्यांसमोर
    माझं संशोधन सादर करण्याची संधी मिळाली.
  • 3:39 - 3:40
    प्रेक्षकांत जॉन होता.
  • 3:40 - 3:43
    माझ्या संशोधनाचे तपशील प्रथमच ऐकत होता.
  • 3:44 - 3:46
    मी बोलत असताना,
  • 3:46 - 3:49
    नजरेच्या कडेला मला जॉन दिसत होता.
  • 3:49 - 3:52
    तो लाल गुलाबी झाला होता
  • 3:52 - 3:54
    आणि जणु शरमेने खुर्चीखाली दडला होता.
  • 3:56 - 3:58
    टाळ्यांच्या प्रतिसादात माझं भाषण संपलं,
  • 3:58 - 4:00
    आणि आम्ही लगेच बाहेर पडून गाडीत शिरलो.
  • 4:01 - 4:03
    गाडीत तो खवळला.
  • 4:04 - 4:06
    "तू तिथे जे केलंस ते मला पसंत नाही."
  • 4:06 - 4:08
    "तू एक कन्सल्टन्ट आहेस.
    समाजसुधारक नव्हेस!"
  • 4:10 - 4:12
    मी म्हटलं, "जॉन, मला हे समजत नाही."
  • 4:12 - 4:16
    मी फक्त स्त्रीपुरुषांतल्या साम्याबद्दल
    एक-दोन आकडेवाऱ्या मांडल्या.
  • 4:16 - 4:18
    आणि, अरब देशांबद्दल काही अनुमाने.
  • 4:18 - 4:21
    होय, आज आपण या आकडेवारीच्या तळाला आहोत,
  • 4:21 - 4:24
    पण माझ्या बोलण्यात
    वस्तुस्थितीला सोडून काय होतं?
  • 4:25 - 4:29
    यावर त्याने उत्तर दिलं,
    "तुझ्या अभ्यासाचा पायाच चुकीचा आहे.
  • 4:29 - 4:33
    तू जे करीत आहेस ते धोकादायक आहे.
    त्यामुळे आपल्या समाजाची रचना कोलमडू शकते.
  • 4:34 - 4:36
    तो थोडं थांबून पुढे म्हणाला,
  • 4:36 - 4:40
    बायकांना मुलं झाली,
    की घर हेच त्यांचं स्थान.
  • 4:41 - 4:44
    मला काळ थांबल्यासारखा वाटला.
  • 4:44 - 4:47
    माझ्या चक्रावलेल्या डोक्यात
    एकच विचार परत परत येत होता:
  • 4:47 - 4:50
    "लैला, ती भागीदारी विसर आता.
  • 4:50 - 4:51
    ते कधीच घडणार नाही."
  • 4:53 - 4:57
    ही घटना आणि तिचे परिणाम
    पूर्णपणे समजून घ्यायला मला दोन दिवस लागले.
  • 4:57 - 4:59
    पण एकदा ते समजल्यावर,
    मी तीन निष्कर्ष काढले.
  • 5:00 - 5:03
    एक, या सर्व त्याच्या समस्या होत्या,
  • 5:03 - 5:04
    तो भयगंडाने ग्रासला होता .
  • 5:04 - 5:06
    त्याच्यासारखे अनेक आपल्या समाजात असतील.
  • 5:06 - 5:09
    पण त्यांचा त्रास मी कधीच करून घेणार नाही.
  • 5:09 - 5:12
    दोन, मला दुसरा प्रायोजक मिळवला पाहिजे,
    तोही तातडीने.
  • 5:12 - 5:14
    (हशा)
  • 5:14 - 5:16
    तसा एक मिळालाही,
    आणि तोही किती चांगला!
  • 5:16 - 5:20
    तीन, मुलं झाल्यानंतर बायका काय करू शकतात,
    हे मी जॉनला दाखवून देईन.
  • 5:20 - 5:24
    हा धडा मी माझ्या
    वैयक्तिक आयुष्यातही वापरते.
  • 5:24 - 5:25
    जसजशी मी व्यवसायात प्रगती करीत गेले,
  • 5:26 - 5:28
    तसं माझं खूप कौतुकही झालं.
  • 5:28 - 5:32
    पण मला नेहमी असेही
    स्त्रिया, पुरुष आणि जोडपी भेटतात,
  • 5:32 - 5:35
    की ज्यांना, मी आणि माझ्या नवरा दोघांनीही
  • 5:35 - 5:38
    व्यवसाय करण्याचा मार्ग स्वीकारल्याचा
    त्रास होतो.
  • 5:39 - 5:41
    तर असं एखादं सद्हेतू बाळगणारं जोडपं,
  • 5:41 - 5:43
    नातेवाईक किंवा मित्र जमले असताना,
  • 5:43 - 5:44
    सरळच विचारतं,
  • 5:44 - 5:47
    तुला कळतंय का,
    की तू आई म्हणून महान नाहीस.
  • 5:47 - 5:49
    कारण व्यवसायात तू इतकी गुंतली आहेस, हो ना?
  • 5:51 - 5:53
    हे शब्द बोचत नाहीत असं म्हणणं खोटं ठरेल.
  • 5:53 - 5:56
    माझी मुलं ही माझ्यासाठी
    सर्वात मौल्यवान आहेत.
  • 5:56 - 6:00
    मी त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे
    कमी पडत असेन, हा विचारच असह्य आहे.
  • 6:00 - 6:02
    पण जॉनच्या बाबतीत केलं तसंच,
  • 6:02 - 6:06
    मी लगेच स्वतःला सांगितलं,
    की या त्यांच्या समस्या होत्या,
  • 6:06 - 6:07
    त्यांचे भयगंड होते.
  • 6:08 - 6:09
    मग त्यांना उत्तर देण्याऐवजी
  • 6:09 - 6:11
    मी माझं एक मोठठं हास्य त्यांच्याकडे फेकलं.
  • 6:11 - 6:13
    मला माझ्या मनःचक्षुंसमोर
  • 6:13 - 6:15
    एक मोठी झगमगणारी पाटी दिसली,
    "आनंदी रहा,
  • 6:15 - 6:17
    त्यामुळे लोकांवर वेड लागायची पाळी येते."
  • 6:17 - 6:20
    (टाळ्या)
  • 6:23 - 6:26
    तर, या परिस्थितीत, एखाद्या तरुण स्त्रीसमोर
    दोन पर्याय असतात,
  • 6:26 - 6:29
    एक, हे आपल्या दिशेने भिरकावले गेलेले
  • 6:29 - 6:31
    नकारार्थी संदेश मनात रुजू देणे,
  • 6:31 - 6:33
    आपण हरलो असं समजू लागणे,
  • 6:33 - 6:35
    आणि यश हे अशक्य कोटीतलं मानणे.
  • 6:35 - 6:39
    किंवा, इतरांची नकारात्मकता
    ही त्यांची समस्या मानणे
  • 6:39 - 6:42
    आणि तिचे रूपांतर आपल्या इंधनात करणे.
  • 6:43 - 6:46
    मी नेहमी दुसरा पर्याय स्वीकारायला
    शिकले आहे.
  • 6:46 - 6:49
    आणि त्यामुळे माझं सामर्थ्य वाढतच गेलं आहे.
  • 6:50 - 6:51
    म्हणतात ना,
  • 6:51 - 6:53
    यशस्वी होणं म्हणजेच सर्वात मोठा बदला घेणं.
  • 6:55 - 6:56
    मध्यपूर्वेतल्या काही
  • 6:56 - 7:00
    भाग्यवान बायकांना, त्यांच्या व्यवसायाला
    पाठिंबा देणारा पती मिळतो.
  • 7:00 - 7:02
    दुरुस्ती: हुशार बायकांना,
    असं म्हणायला हवं. कारण,
  • 7:02 - 7:05
    कोणाशी लग्न करावं हा निर्णय
    तुमचा स्वतःचा असतो.
  • 7:05 - 7:08
    आणि मोठा व्यवसाय करायचा बेत असेल,
    तर पाठिंबा देणारा पतीच निवडलेला बरा.
  • 7:09 - 7:14
    आजही, अरब पुरुष हा घरातलं काम
    बरोबरीने करीत नाही.
  • 7:14 - 7:16
    आमचा समाजच तशी अपेक्षा ठेवत नाही.
  • 7:16 - 7:18
    तसं करण्याला मर्दानीपणा समजत नाहीत.
  • 7:19 - 7:22
    अरब स्त्रीने मात्र, पतीचा आणि मुलांचा
    आनंद आणि प्रगती,
  • 7:22 - 7:26
    यातच आपला आनंद मानला पाहिजे,
    असं आमचा समाज समजतो.
  • 7:26 - 7:28
    असं आमचा समाज समजतो.
  • 7:28 - 7:30
    तिचं अस्तित्व केवळ
    आपल्या कुटुंबासाठीच असतं.
  • 7:31 - 7:34
    परिस्थिती बदलते आहे,
    पण त्याला वेळ लागेल.
  • 7:34 - 7:36
    पण सध्यातरी, व्यावसायिक अरब स्त्रीला
  • 7:36 - 7:40
    घर आदर्श प्रकारे सांभाळावं लागतं
  • 7:40 - 7:43
    मुलांच्या गरजांकडे लक्ष द्यावं लागतं,
    आणि
  • 7:43 - 7:45
    व्यावसायिक जबाबदाऱ्याही झेलाव्या लागतात.
  • 7:46 - 7:49
    मी टक्केटोणपे खाऊन शिकले,
    की हे साध्य करण्यासाठी,
  • 7:49 - 7:54
    कष्टाने कमावलेल्या व्यावसायिक कौशल्यांचा
    वापर वैयक्तिक आयुष्यात करायला हवा.
  • 7:54 - 7:55
    दोन: आयुष्य म्हणजे व्यवसायच.
  • 7:56 - 7:58
    मी स्वतः असं करते:
  • 8:01 - 8:03
    मध्यपूर्वेतली एक गोष्ट म्हणजे,
  • 8:03 - 8:06
    जवळपास प्रत्येक कुटुंबाला परवडेल असे
    घरगुती मदतनीस मिळू शकतात.
  • 8:07 - 8:10
    योग्य मदतनीस कसा मिळवावा,
    हाच प्रश्न ठरतो.
  • 8:11 - 8:14
    जसं मी माझ्या व्यवसायात करेन,
    तसंच घरातही,
  • 8:14 - 8:18
    मुलं सांभाळायला सर्वात चांगलं कोण,
    हे ठरवताना, मी लक्षात घेतली
  • 8:18 - 8:19
    एक जोरदार शिफारस.
  • 8:19 - 8:22
    क्रिस्टीनाने माझ्या बहिणीकडे
    चार वर्षं काम केलं होतं
  • 8:22 - 8:25
    आणि तिचं काम किती चांगलं आहे,
    हे सिद्ध केलं होतं.
  • 8:26 - 8:28
    ती आता आमच्या कुटुंबापैकीच एक झाली आहे.
  • 8:28 - 8:31
    अलिया सहा महिन्यांची असल्यापासून.
  • 8:31 - 8:35
    मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये असते,
    तेव्हा ती घर व्यवस्थित सांभाळते.
  • 8:35 - 8:37
    आणि तिचं आणि मुलांचं सुरळित चालावं
  • 8:37 - 8:40
    म्हणून मी तिला अधिकार दिले आहेत.
  • 8:40 - 8:43
    ऑफिसमधल्या चांगल्या कर्मचाऱ्यांना देते,
    तसेच.
  • 8:44 - 8:47
    मुलांची काळजी कोणीही घेत असेल,
    तरी हे लागू पडतं.
  • 8:47 - 8:50
    पूर्णवेळ किंवा अर्धवेळ येणारी बाई,
    नर्सरी, किंवा
  • 8:50 - 8:52
    दुसऱ्या कुटुंबातल्या मुलांबरोबर
    एकत्र सांभाळणारी.
  • 8:52 - 8:55
    काळजीपूर्वक निवडा, आणि अधिकार द्या.
  • 8:56 - 8:57
    तुम्ही माझं कॅलेंडर पाहिलंत
  • 8:57 - 8:59
    तर कामाच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी
  • 8:59 - 9:03
    संध्याकाळी ७ ते ८:३० हा दीड तास
  • 9:03 - 9:05
    कौटुंबिक वेळ म्हणून
    राखीव ठेवलेला दिसेल.
  • 9:06 - 9:07
    पवित्र वेळ.
  • 9:07 - 9:10
    अलिया अगदी छोटं बाळ असल्यापासून
    मी हे करीत आले आहे.
  • 9:11 - 9:13
    ही वेळ सांभाळण्यासाठी
    शक्य ते सगळं मी करते.
  • 9:13 - 9:17
    म्हणजे मी त्या वेळेपर्यंत घरी येऊन
    मुलांबरोबर सुखाने वेळ घालवू शकते.
  • 9:17 - 9:18
    दिवस कसा गेला ते विचारते.
  • 9:19 - 9:22
    त्यांचा गृहपाठ बघते,
    रात्री झोपण्याआधी गोष्ट सांगते.
  • 9:22 - 9:25
    त्यांना मिठीत घेते आणि
    त्यांचे खूप खूप मुके घेते.
  • 9:25 - 9:27
    मी प्रवासात असेन,
    त्या ठिकाणी कोणतीही वेळ असो,
  • 9:27 - 9:31
    कितीही मैलांचं अंतर असो,
    मी स्काईप वापरून मुलांशी संवाद साधते.
  • 9:32 - 9:34
    आमचा मुलगा बरहान पाच वर्षांचा आहे.
  • 9:34 - 9:37
    तो लिहिणं आणि अंकगणित शिकतो आहे.
  • 9:38 - 9:39
    आता आणखी एक कबुली देते.
  • 9:40 - 9:42
    मला असं आढळलं की, माझी मुलगी
    त्याला हे विषय
  • 9:42 - 9:44
    माझ्यापेक्षा जास्त चांगले शिकवते.
  • 9:44 - 9:46
    (हशा)
  • 9:47 - 9:51
    शाळा शाळा खेळताना अलिया धाकट्या भावाची
    टीचर बनली आणि तिला ते खूप आवडू लागलं.
  • 9:51 - 9:56
    मग माझ्या लक्षात आलं, की
    या खेळामुळे त्याची अक्षरओळख वाढतेय,
  • 9:56 - 9:58
    अलियाची जबाबदारीची जाणीव वाढतेय
  • 9:58 - 10:00
    आणि दोघांतली जवळीक घट्ट होतेय.
  • 10:00 - 10:02
    म्हणजे चोहीकडून विजय.
  • 10:04 - 10:06
    माझ्या माहितीतल्या यशस्वी अरब महिलांपैकी
  • 10:06 - 10:09
    प्रत्येकीने, घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये
    सिंहाचा वाटा उचलत असताना,
  • 10:09 - 10:10
    व्यावसायिक प्रगती साधण्याचा
  • 10:10 - 10:13
    आपला स्वतःचा एक निराळा मार्ग शोधला आहे,
    याचा अर्थ,
  • 10:13 - 10:16
    व्यावसायिक स्त्री आणि आई,
    या आयुष्यातल्या दोन्ही भूमिका
  • 10:16 - 10:17
    कशाबशा पार पाडणे, असा नव्हे.
  • 10:17 - 10:20
    याचा अर्थ, प्रत्येक क्षण सर्वस्वाने जगणे.
  • 10:21 - 10:23
    मी जेव्हा माझ्या मुलांबरोबर असते,
  • 10:23 - 10:25
    तेव्हा मी काम बाजूला ठेवण्याचा
    प्रयत्न करते.
  • 10:25 - 10:29
    रोज मला त्यांच्याबरोबर किती मिनिटं
    घालवता येतील, याची चिंता करण्याऐवजी
  • 10:29 - 10:33
    त्या मिनिटांच्या सुंदर आठवणी कशा बनतील,
    याकडे मी लक्ष देते.
  • 10:33 - 10:35
    मुलांना न्याहाळण्याचे,
    त्यांचे बोल ऐकण्याचे
  • 10:35 - 10:37
    आणि संवाद साधण्याचे क्षण.
  • 10:37 - 10:39
    तीन: एकत्र या, स्पर्धा करू नका.
  • 10:39 - 10:42
    माझ्या पिढीतल्या अरब स्त्रिया
  • 10:42 - 10:44
    सार्वजनिक जीवनात वावरताना दिसत नसत.
  • 10:44 - 10:46
    यावरून थोडा अंदाज येईल, की
  • 10:46 - 10:49
    अरब जगतात इतक्या कमी स्त्रिया
    राजकारणात का उतरतात.
  • 10:49 - 10:51
    पण यातला फायदा असा, की
  • 10:51 - 10:53
    आपण पडद्यामागे राहून,
  • 10:53 - 10:55
    एक सामाजिक कौशल्य कमावण्यात
    वेळ खर्ची घातला आहे.
  • 10:57 - 10:59
    कॉफी शॉप्स मध्ये, दिवाणखान्यांत,
  • 10:59 - 11:00
    फोन वर.
  • 11:00 - 11:03
    यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
    असं हे कौशल्य म्हणजे,
  • 11:03 - 11:05
    समाज जोडणे.
  • 11:05 - 11:06
    कोणतीही साधारण अरब स्त्री
  • 11:06 - 11:09
    पुष्कळ मैत्रिणी आणि ओळखीपाळखी जोडून असते.
  • 11:09 - 11:11
    त्या बहुतांशी स्त्रियाच असतात.
  • 11:12 - 11:16
    पाश्चिमात्य जगात, महत्वाकांक्षी स्त्रिया
    सतत इतर स्त्रियांशी तुलना करीत असतात
  • 11:16 - 11:20
    आणि आपण सर्वात यशस्वी ठरावं
    अशी आशा बाळगून असतात.
  • 11:20 - 11:23
    यातूनच, व्यावसायिक स्त्रियांची
    चढाओढ सुरु होते, ज्याबद्दल
  • 11:23 - 11:24
    नेहमी बोललं जातं.
  • 11:26 - 11:28
    यशाच्या शिखरावर जर
    एकाच स्त्रीपुरती जागा असेल
  • 11:28 - 11:31
    तर ती दुसरीला देता येत नाही.
    तिला तिथवर चढवताही येत नाही.
  • 11:32 - 11:33
    साधारणपणे अरब स्त्रिया,
  • 11:33 - 11:36
    या मानसिक सापळ्यात अडकत नाहीत.
  • 11:36 - 11:38
    पुरुषप्रधान संस्कृतीचा सामना करताना
  • 11:38 - 11:41
    त्या शिकल्या आहेत,
    की एकमेकींना सहाय्य करण्यात
  • 11:41 - 11:42
    सर्वांचं हित आहे.
  • 11:43 - 11:46
    माझ्या पूर्वीच्या नोकरीत,
    मध्यपूर्वेत मी सर्वात सीनियर स्त्री होते.
  • 11:46 - 11:50
    त्यामुळे कुणालाही असं वाटलं असतं की
    सहकारी स्त्रियांशी नेटवर्क करण्याचा
  • 11:50 - 11:52
    मला फायदा होणार नाही.
  • 11:52 - 11:54
    त्याऐवजी पुरुष सहकारी आणि सिनियर्सशी
  • 11:54 - 11:57
    नेटवर्क वाढवण्यात मी वेळ गुंतवायला हवा.
  • 11:58 - 12:01
    असं असूनही, स्त्रियांमुळेच मला
    दोन मोठ्या संधी मिळाल्या.
  • 12:02 - 12:05
    मार्केटिंगच्या अध्यक्षांनी प्रथम
  • 12:05 - 12:08
    वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या
    जागतिक नेतेपदासाठी माझी शिफारस केली.
  • 12:08 - 12:11
    त्या माझं लिखाण आणि
    प्रसिद्धीमाध्यमांबरोबरचे संबंध
  • 12:11 - 12:13
    जाणत होत्या.
    त्यांचं मत विचारलं असता,
  • 12:13 - 12:14
    त्यांनी माझं नाव सुचवलं.
  • 12:15 - 12:18
    तसंच एका कन्सल्टंट
    सौदी मैत्रिणीने मला सौदी अरेबियात
  • 12:18 - 12:21
    माझ्या पहिल्या प्रोजेक्टची
    विक्री करायला मदत केली.
  • 12:21 - 12:24
    एक स्त्री म्हणून त्या बाजारपेठेत शिरणं
    मला कठीण वाटत होतं.
  • 12:25 - 12:26
    तिने माझी ओळख करून दिली,
  • 12:26 - 12:30
    एका ग्राहकाशी. आणि त्यातूनच, सौदीतल्या
    अनेक प्रोजेक्ट्स पैकी पहिला सुरु झाला.
  • 12:31 - 12:33
    आज माझ्या टीममध्ये
    दोन सीनियर स्त्रिया आहेत.
  • 12:33 - 12:36
    आणि त्यांना यशस्वी करण्यात
    माझ्या यशाचं रहस्य आहे असं मी मानते.
  • 12:38 - 12:40
    स्त्रिया जगात पुढे येत आहेत.
  • 12:40 - 12:43
    वेग फार नसेल, पण आम्ही पुढे चाललो आहोत.
  • 12:43 - 12:47
    अरब जग देखील प्रगती करीत आहे.
    खीळ घालणाऱ्या घटना हल्लीच घडल्या असूनही.
  • 12:47 - 12:51
    या वर्षी संयुक्त अरब अमिरातींनी कॅबिनेट
    मध्ये पाच नवीन महिला मंत्री नेमल्या.
  • 12:51 - 12:54
    म्हणजे एकूण झाल्या आठ महिला मंत्री.
  • 12:54 - 12:57
    संपूर्ण कॅबिनेटच्या २८ टक्के.
  • 12:57 - 13:00
    अनेक प्रगत देशांतल्यापेक्षा जास्त.
  • 13:00 - 13:02
    हे चित्र आज अलियाचं आवडतं चित्र आहे.
  • 13:03 - 13:06
    हा निःसंशय चांगल्या नेतृत्वाचा
    परिणाम आहे.
  • 13:06 - 13:08
    तसाच तो समर्थ अरब स्त्रियांच्या
  • 13:09 - 13:11
    हार ना मानण्याचा
    आणि सतत कक्षा विस्तारण्याचाही आहे.
  • 13:12 - 13:16
    हा परिणाम आहे अरब स्त्रियांनी रोज
    माझ्यासारखाच निर्णय घेऊन
  • 13:16 - 13:17
    घाणीचं इंधन बनवण्याचा.
  • 13:17 - 13:20
    आयुष्य हा व्यवसाय मानण्याचा.
    काम घरी न आणण्याचा.
  • 13:20 - 13:22
    एकमेकींशी स्पर्धा न करता, समाज जोडण्याचा.
  • 13:23 - 13:24
    भविष्याकडे पाहताना,
  • 13:24 - 13:27
    मला आशा वाटते, की जेव्हा माझी मुलगी
    २०-३० वर्षांनी
  • 13:27 - 13:29
    याच व्यासपीठावर उभी राहील,
  • 13:29 - 13:32
    तेव्हा तिला वडिलांच्या अभिमानाबरोबरच
  • 13:32 - 13:33
    आईचाही अभिमान वाटेल.
  • 13:34 - 13:35
    माझ्या मुलासाठी मी आशा बाळगते,
  • 13:36 - 13:39
    की त्या वेळपर्यंत "आईसारखा मुलगा'
    किंवा "आईचा बेटा"
  • 13:39 - 13:42
    या उद्गारांना एक
    वेगळा अर्थ मिळालेला असेल.
  • 13:42 - 13:43
    धन्यवाद.
  • 13:43 - 13:49

    (टाळ्या)
Title:
यशस्वी व्हा! एका अरब व्यावसायिक महिलेने दिलेले तीन धडे.
Speaker:
लैला होटीईट
Description:

व्यावसायिक अरब महिलांना, त्यांच्या तोडीच्या पुरुषांपेक्षा, जास्त जबाबदाऱ्या पेलण्याची कसरत करावी लागते. आणि त्यांना पाश्चिमात्य महिलांपेक्षा जास्त कडव्या संस्कृतीचा सामना करावा लागतो. त्यांचं यश आपल्याला जिद्द, स्पर्धा, आयुष्यातल्या प्राधान्य देण्याच्या गोष्टी आणि प्रगती याबद्दल काय शिकवू शकेल? अबु धाबीतील एक इंजिनीयर, वकील आणि आई म्हणून आपल्या करियरचा मागोवा घेत, लैला होटीईट आधुनिक जगात प्रगती करण्याचे तीन धडे देताहेत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
14:02

Marathi subtitles

Revisions