Return to Video

परसात वनराई कशी फुलवावी

  • 0:01 - 0:03
    ही मनुष्यनिर्मित वनराई आहे.
  • 0:04 - 0:07
    ती अनेक एकर क्षेत्रावर पसरु शकते,
  • 0:07 - 0:10
    किंवा एका छोटया जागेत सामावू शकते -
  • 0:10 - 0:13
    अगदी तुमच्या घरातल्या बागेएवढया.
  • 0:15 - 0:19
    ही प्रत्येक वनराई
    केवळ २ वर्षं जुनी आहे.
  • 0:19 - 0:22
    माझ्या स्वतःच्या घराच्या परसात
    वनराई आहे.
  • 0:23 - 0:25
    ती जैवविविधतेने नटलेली आहे.
  • 0:26 - 0:30
    (पक्ष्याचा आवाज)
  • 0:30 - 0:32
    मला हे ऐकून रोज
    सकाळी जाग येते,
  • 0:32 - 0:33
    डिस्नेकथांतल्या राजकुमारीसारखी.
  • 0:33 - 0:35
    (हशा)
  • 0:35 - 0:36
    मी असा उद्योजक आहे कि जो
  • 0:36 - 0:40
    व्यावसायिक तत्वावर अशी वनराई
    निर्माण करतो.
  • 0:41 - 0:43
    आम्ही कारखान्यांना,
  • 0:43 - 0:44
    शेतांना,
  • 0:44 - 0:45
    शाळांना,
  • 0:46 - 0:47
    घरांना,
  • 0:48 - 0:49
    रिसॉर्टसना,
  • 0:50 - 0:52
    इमारतींना
  • 0:53 - 0:54
    सार्वजनिक उद्यानांना
  • 0:55 - 0:56
    आणि प्राणिसंग्रहालयालासुद्धा
  • 0:56 - 0:58
    अशी वनराई फुलवण्यास
    मदत केली आहे.
  • 0:59 - 1:03
    वनराई म्हणजे जिथे प्राणी एकत्र
    राहतात अशी वेगळी जागा नव्हे.
  • 1:04 - 1:10
    वनराई आपल्या शहरी आयुष्याचाच
    एक भाग असू शकते.
  • 1:10 - 1:12
    माझ्या मते वनराई म्हणजे,
  • 1:12 - 1:15
    घनदाट झाडी जिच्यामधून तुम्ही
    चालूही शकणार नाही.
  • 1:16 - 1:18
    ती झाडं किती मोठी किंवा छोटी
    आहेत हि गोष्ट अलहिदा.
  • 1:19 - 1:22
    आज आपण ज्या जगात राहतो
    त्याच्या बहुतांशी भागात वनराई होती
  • 1:22 - 1:24
    असं मानवी हस्तक्षेपाच्या आधी होतं.
  • 1:25 - 1:27
    त्या वनराईच्या जागी मग आपण
    आपली शहरं वसवली,
  • 1:27 - 1:29
    साओ पावलो सारखी,
  • 1:29 - 1:31
    हे विसरून कि आपण निसर्गाचा तेवढाच
    भाग आहोत,
  • 1:31 - 1:35
    जेवढया या ग्रहावरच्या इतर ८४ लाख
    प्रजातीसुद्धा त्याचा भाग आहेत.
  • 1:36 - 1:40
    आपला आवास आपला नैसर्गिक
    आवास राहिला नाही.
  • 1:40 - 1:42
    पण आपल्यातल्या काही
    जणांसाठी आता तसं नाही.
  • 1:43 - 1:46
    मी आणि आणखी काही जण अशी
    वनराई व्यावसायिक तत्वावर निर्माण करतो -
  • 1:46 - 1:48
    कुठेही आणि सगळीकडे.
  • 1:49 - 1:51
    मी एक औद्योगिक अभियंता आहे
  • 1:51 - 1:53
    गाडयांच्या उत्पादनात मी निष्णात आहे.
  • 1:54 - 1:56
    मी टोयोटा कंपनीत कामाला असताना,
  • 1:56 - 2:00
    नैसर्गिक स्रोतांपासून उत्पादन कसं
    करायचं हे मी शिकलो.
  • 2:01 - 2:02
    उदाहरण द्यायचं झाला तर,
  • 2:02 - 2:05
    रबराच्या झाडाचा आपण चीक काढतो,
  • 2:05 - 2:07
    त्याचं कच्च्या रबरात रूपांतर करतो.
  • 2:07 - 2:09
    आणि त्यापासून टायर
    - एक उत्पादन - बनवतो
  • 2:09 - 2:13
    पण ही उत्पादनं पुन्हा नैसर्गिक
    स्रोतांमध्ये रूपांतरित होवू शकत नाहीत
  • 2:13 - 2:16
    आपण निसर्गातील घटकांना वेगळं करतो
  • 2:16 - 2:20
    आणि ते मूलावस्थेत जाऊ शकणार नाहीत अशी
    प्रक्रिया करतो.
  • 2:20 - 2:21
    असं औद्योगिक उत्पादन असतं.
  • 2:22 - 2:25
    याउलट नैसर्गिक प्रक्रिया हि अगदी
    विरुद्ध दिशेने होते.
  • 2:26 - 2:30
    नैसर्गिक उत्पादन हे मूलकणांच्या
    एकत्रीकरणाने होते,
  • 2:30 - 2:31
    अगदी प्रत्येक कणाच्या.
  • 2:32 - 2:37
    सगळी नैसर्गिक उत्पादनं पुन्हा
    नैसर्गिक स्रोत बनतात.
  • 2:38 - 2:41
    हे मी तेव्हा शिकलो जेव्हा मी
  • 2:41 - 2:44
    माझ्या घराच्या परसात वनराई फुलवली
  • 2:44 - 2:48
    निसर्गाच्या सोबतीने काम करायची हि
    माझी पहिलीच वेळ होती,
  • 2:48 - 2:49
    त्याच्या विरुद्ध नव्हे.
  • 2:50 - 2:51
    तेव्हापासून,
  • 2:51 - 2:56
    जगभरातल्या २५ शहरांमधे आम्ही
    अशा ७५ वनराई फुलवल्या.
  • 2:58 - 3:00
    दरवेळी जेव्हा आम्ही नवीन जागी काम करतो,
  • 3:00 - 3:05
    आम्हांला असं आढळतं कि वनराई तयार
    करण्यासाठी लागणारा प्रत्येक घटक
  • 3:05 - 3:07
    आमच्या आसपासच असतो.
  • 3:07 - 3:09
    आम्हांला फक्त हे सगळे घटक एकत्र
    आणायचे असतात
  • 3:09 - 3:11
    आणि निसर्गाला त्याचं काम
    करू द्यायचं असतं.
  • 3:13 - 3:16
    वनराई फुलवण्यासाठी आम्ही जमिनीपासून
    सुरुवात करतो.
  • 3:16 - 3:19
    आम्ही तिचा पोत बघतो
  • 3:19 - 3:21
    आणि तिच्यात कोणते गुणधर्म नाहीत हे ठरवतो.
  • 3:22 - 3:25
    मातीचे कण जर छोटे असतील तर ती घट्ट होते -
  • 3:25 - 3:27
    इतकी घट्ट की तिच्यात पाणी जिरू शकत नाही.
  • 3:28 - 3:33
    आम्ही तिथे उपलब्ध असलेलं बायोमास मिसळतो,
  • 3:33 - 3:35
    त्यामुळे माती अधिक सच्छिद्र होते.
  • 3:37 - 3:39
    आता पाणी जिरू शकतं.
  • 3:39 - 3:44
    जर मातीत पाणी जिरू शकत नसेल,
  • 3:44 - 3:46
    आम्ही अजून थोडं बायोमास मिसळतो --
  • 3:46 - 3:49
    कुजलेल्या वनस्पती किंवा ऊसाची चिपाडं
    यासारखं पाणी शोषणारं साहित्य,
  • 3:49 - 3:53
    जेणेकरून मातीत पाणी जिरून
    तिच्यात ओल राहु शकते.
  • 3:54 - 3:58
    वाढीसाठी झाडांना पाणी, सूर्यप्रकाश आणि
    पोषण लागतं.
  • 3:59 - 4:02
    जमीन जर सकस नसेल तर काय?
  • 4:02 - 4:05
    आम्ही जमिनीत पोषक पदार्थ थेट
    मिसळत नाही.
  • 4:05 - 4:06
    ती औद्योगिक पद्धत झाली.
  • 4:06 - 4:08
    ती निसर्गानियमाविरुद्ध आहे.
  • 4:08 - 4:11
    त्याऐवजी मग आम्ही जमिनीत
    सूक्ष्मजीव मिसळतो.
  • 4:11 - 4:14
    ते मातीत नैसर्गिकरित्या पोषक
    घटकांची निर्मिती करतात.
  • 4:15 - 4:17
    आम्ही मिसळलेल्या बायोमासवर ते जगतात,
  • 4:17 - 4:20
    त्यांना फक्त खायचं आणि
    वृद्धिंगत व्हायचं असतं.
  • 4:20 - 4:22
    आणि जशी त्यांची संख्या वाढते,
  • 4:22 - 4:24
    तशी मातीत जान येते.
  • 4:24 - 4:25
    ती जिवंत होते.
  • 4:26 - 4:29
    आम्ही तिथल्या झाडांच्या
    मूळ प्रजातींचे सर्वेक्षण करतो
  • 4:29 - 4:31
    त्या मूळ प्रजाती आहेत कि
    नाहीत हे आम्ही कसं ठरवतो
  • 4:31 - 4:36
    मानवी हस्तक्षेपाआधी जे काही होतं ते
    तद्देशीयच होतं.
  • 4:36 - 4:37
    हा अगदी साधा निकष आहे.
  • 4:38 - 4:42
    आम्ही एका राष्ट्रीय उद्यानाचं
    सर्वेक्षण करतो
  • 4:42 - 4:45
    नैसर्गिक वनराईचे अवशेष शोधण्यासाठी.
  • 4:47 - 4:50
    आम्ही तपोवनांचं सर्वेक्षण करतो,
  • 4:50 - 4:53
    किंवा जुन्या मंदिरांभोवती असलेल्या
    उपवनांचं सर्वेक्षण करतो.
  • 4:53 - 4:55
    आणि जर काहीच हाती नाही लागलं तर
  • 4:55 - 4:57
    आम्ही संग्रहालयांमध्ये जातो प्राचीन काळापासून
  • 4:57 - 5:02
    अस्तित्वात असलेल्या तिथल्या वृक्षांचे
    बीज आणि लाकूड पाहण्यासाठी
  • 5:03 - 5:08
    तिथल्या स्थानिक चित्रांचं, कवितांचं आणि
    साहित्याचं संशोधन करतो,
  • 5:08 - 5:11
    तिथल्या वृक्षांच्या प्रजाती ओळखू
    येण्यासाठी.
  • 5:11 - 5:13
    एकदा कुठली झाडं आहेत हे कळलं
  • 5:13 - 5:15
    कि त्यांची चार स्तरांमध्ये विभागणी
    करतो:
  • 5:15 - 5:18
    झुडुपं, झाडं, वृक्ष आणि वृक्षमंडप.
  • 5:18 - 5:21
    प्रत्येक स्तराचे प्रमाण आम्ही ठरवतो,
  • 5:21 - 5:26
    आणि मग गटातल्या प्रत्येक झाडाच्या
    प्रजातीची टक्केवारी ठरवतो.
  • 5:27 - 5:28
    जर आम्ही फळांची वनराई फुलवत असू,
  • 5:28 - 5:31
    तर आम्ही फळं येणाऱ्या झाडांचे
    प्रमाण वाढवतो.
  • 5:31 - 5:34
    ती फुलणारी वनराई असू शकते,
  • 5:34 - 5:38
    जी अनेक पक्ष्यांना आणि माश्यांना
    आकर्षित करते,
  • 5:38 - 5:42
    किंवा ते एक स्थानिक प्रजातींच्या झाडांचं
    सदाहरित रान असू शकतं.
  • 5:44 - 5:47
    आम्ही बीज गोळा करतो आणि त्यांतून
    रोपं तयार करतो.
  • 5:47 - 5:50
    एकाच स्तरातील झाडांची लागवड
  • 5:50 - 5:52
    शेजारी होणार नाही याची काळजी घेतो
  • 5:52 - 5:55
    नाहीतर जेव्हा ते उंच वाढतील तेव्हा
    जागेसाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु होईल
  • 5:56 - 5:58
    आम्ही रोपांची लागवड
    एकमेकांच्या जवळ करतो
  • 5:59 - 6:02
    आम्ही जमिनीवर अर्धवट कुजलेला
    पालापाचोळा पसरतो,
  • 6:02 - 6:04
    त्यामुळे बाहेर उष्णता असताना
    जमीन ओली राहते
  • 6:05 - 6:06
    जेव्हा थंडी असते,
  • 6:06 - 6:10
    कुजलेल्या पालापाचोळ्यावरच दव गोठते,
  • 6:10 - 6:13
    त्यामुळे बाहेर अतिथंडी असली तरी
    जमिनीत हवा खेळती राहते.
  • 6:13 - 6:17
    माती खूपच मऊ असते --
  • 6:17 - 6:20
    इतकी मऊ कि मुळ तिच्यात
    सहज शिरु शकतात,
  • 6:20 - 6:21
    वेगाने.
  • 6:22 - 6:25
    सुरुवातीला वनराई वाढत
    नाहीये असं वाटतं,
  • 6:25 - 6:26
    पण तिची वाढ जमिनीखाली चालू असते.
  • 6:27 - 6:28
    पहिल्या तीन महिन्यांत,
  • 6:28 - 6:30
    मूळ एक मीटर खोलीपर्यंत जातात.
  • 6:31 - 6:33
    ही मूळ एक जाळी तयार करतात,
  • 6:33 - 6:34
    जमिनीला घट्ट धरून ठेवतात.
  • 6:34 - 6:38
    सूक्ष्म जीव आणि बुरशी या जाळीत असतात.
  • 6:39 - 6:42
    जर झाडाच्या आसपास पोषण उपलब्ध नसेल,
  • 6:42 - 6:45
    हे सूक्ष्म जीव झाडापर्यंत
    ते पोषण पोहोचवतात.
  • 6:46 - 6:47
    जेव्हा पाऊस पडतो,
  • 6:48 - 6:49
    जादू झाल्यासारखी,
  • 6:49 - 6:51
    रात्रीतून भुईछत्र्या येतात.
  • 6:51 - 6:54
    म्हणजेच जमिनीखाली पोषक
    अश्या बुरशीची जाळी आहे.
  • 6:55 - 6:57
    एकदा हि मुळ रुजली कि,
  • 6:57 - 6:59
    जमिनीच्या वर वनराई
    फुलायला सुरुवात होते.
  • 7:00 - 7:04
    जसजशी वनराईची वाढ होते
    आम्ही तिला पाणी देत राहतो--
  • 7:04 - 7:08
    पुढच्या दोन ते तीन वर्षांपर्यंत
    आम्ही पाणी देतो.
  • 7:09 - 7:14
    आम्हांला पाणी आणि जमिनीचं पोषण
    फक्त आमच्या झाडांसाठी ठेवायचं आहे,
  • 7:14 - 7:17
    म्हणून जमिनीवरील तण आम्ही काढून टाकतो.
  • 7:17 - 7:20
    हि वनराई जशी वाढते ती
    सूर्यप्रकाशाला प्रतिबंध करते.
  • 7:21 - 7:23
    अखेरीस, वनराई इतकी घनदाट होते
  • 7:23 - 7:26
    कि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही.
  • 7:26 - 7:29
    आता तण वाढू शकत नाही कारण
    त्यांनासुद्धा सूर्यप्रकाशाची गरज असते.
  • 7:30 - 7:31
    अशा अवस्थेत,
  • 7:31 - 7:35
    वनराईत पडणारा पाण्याचा
  • 7:35 - 7:37
    प्रत्येक थेंबाचे बाष्पीभवन होत नाही.
  • 7:37 - 7:40
    हि घनदाट वनराई आर्द्र हवेला द्रवीभूत करते
  • 7:40 - 7:42
    आणि तिची ओल कायम ठेवते.
  • 7:43 - 7:47
    आम्ही वनराईला पाणी देणं हळुहळू कमी करतो
    आणि अखेरीस ते देणं बंद करतो.
  • 7:47 - 7:49
    आणि पाणी न देताही,
  • 7:49 - 7:53
    वनराईची जमीन ओलसर राहते
    आणि कधीकधी गडददेखील.
  • 7:54 - 7:57
    आता, जेव्हा एखादं पान या
    वनराईच्या जमिनीवर पडतं,
  • 7:57 - 8:00
    ते लगेच कुजायला लागतं.
  • 8:00 - 8:04
    या कुजलेल्या पानाची बुरशी होते,
  • 8:04 - 8:05
    जी या वनराईचे खाद्य असते.
  • 8:06 - 8:07
    जशी वनराई वाढते,
  • 8:07 - 8:09
    अधिक पानं जमिनीवर गळून पडतात --
  • 8:09 - 8:11
    म्हणजे अजून जास्त बुरशी तयार होते,
  • 8:11 - 8:14
    म्हणजे आणखी खाद्य म्हणून वनराई
    अजून वाढू शकते.
  • 8:14 - 8:17
    आणि या वनराईची भरमसाट वाढ होत राहते.
  • 8:18 - 8:19
    एकदा रुजल्या कि,
  • 8:19 - 8:24
    ह्या वनराई स्वतःचेच पुनर्निर्माण
    वारंवार करणार आहेत --
  • 8:24 - 8:25
    कदाचित कायमचेच.
  • 8:26 - 8:29
    यासारख्या नैसर्गिक वनराईत,
  • 8:29 - 8:31
    कुठलेही व्यवस्थापन न करणे हेच उत्तम.
  • 8:32 - 8:34
    हे एक छोटंसं वनसंमेलन आहे.
  • 8:34 - 8:36
    (हशा)
  • 8:37 - 8:39
    या वनराईची वाढ सामूहिक असते.
  • 8:40 - 8:41
    जर हीच झाडं --
  • 8:41 - 8:42
    याच प्रजाती --
  • 8:42 - 8:45
    स्वतंत्रपणे लावल्या असत्या,
  • 8:45 - 8:46
    त्यांची वाढ एवढ्या जोमाने झाली नसती.
  • 8:47 - 8:51
    आणि अशाप्रकारे आम्ही १०० वर्षांची
    वाटणारी वनराई निर्माण करतो
  • 8:51 - 8:52
    केवळ १० वर्षांत.
  • 8:52 - 8:53
    आपले खूप आभार.
  • 8:53 - 8:59
    (टाळ्या)
Title:
परसात वनराई कशी फुलवावी
Speaker:
शुभेंदु शर्मा
Description:

वनराई म्हणजे मानवी जीवनापासून दूर असलेला नैसर्गिक संपत्तीचा साठा नसावा. आपण जिथे आहोत - अगदी शहरांतसुद्धा - तिथेच ती वाढवू शकतो. पर्यावरणप्रेमी उद्योजक आणि TED चे सहकारी असलेले शुभेंदु शर्मा शहरांमधे घनदाट, जैवविविधतेने नटलेली आणि मूळ प्रजाती असलेली वनराई माती, जीवाणू आणि बायोमासवर प्रक्रिया करून नैसर्गिक वाढीची सुरुवात होण्यासाठी फुलवतात. १०० वर्षं जुनी वाटावी अशी वनराई केवळ १० वर्षांत कशी फुलवावी आणि तुम्हीही या वनसंमेलनात कसे सहभागी होऊ शकता हे त्यांच्या या वर्णनातून जाणून घ्या.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
09:11

Marathi subtitles

Revisions