0:00:00.872,0:00:03.125 ही मनुष्यनिर्मित वनराई आहे. 0:00:03.904,0:00:07.121 ती अनेक एकर क्षेत्रावर पसरु शकते, 0:00:07.121,0:00:09.613 किंवा एका छोटया जागेत सामावू शकते - 0:00:10.387,0:00:13.125 अगदी तुमच्या घरातल्या बागेएवढया. 0:00:15.327,0:00:18.546 ही प्रत्येक वनराई [br]केवळ २ वर्षं जुनी आहे. 0:00:19.298,0:00:22.413 माझ्या स्वतःच्या घराच्या परसात [br]वनराई आहे. 0:00:23.036,0:00:24.985 ती जैवविविधतेने नटलेली आहे. 0:00:25.582,0:00:29.558 (पक्ष्याचा आवाज) 0:00:30.229,0:00:31.774 मला हे ऐकून रोज [br]सकाळी जाग येते, 0:00:31.798,0:00:33.297 डिस्नेकथांतल्या राजकुमारीसारखी. 0:00:33.321,0:00:34.718 (हशा) 0:00:35.164,0:00:36.370 मी असा उद्योजक आहे कि जो 0:00:36.394,0:00:40.364 व्यावसायिक तत्वावर अशी वनराई [br]निर्माण करतो. 0:00:40.798,0:00:42.722 आम्ही कारखान्यांना, 0:00:42.746,0:00:43.903 शेतांना, 0:00:43.927,0:00:45.085 शाळांना, 0:00:46.287,0:00:47.442 घरांना, 0:00:48.306,0:00:49.482 रिसॉर्टसना, 0:00:50.273,0:00:51.629 इमारतींना 0:00:52.591,0:00:54.131 सार्वजनिक उद्यानांना 0:00:54.854,0:00:56.197 आणि प्राणिसंग्रहालयालासुद्धा 0:00:56.491,0:00:58.290 अशी वनराई फुलवण्यास [br]मदत केली आहे. 0:00:59.120,0:01:03.009 वनराई म्हणजे जिथे प्राणी एकत्र [br]राहतात अशी वेगळी जागा नव्हे. 0:01:04.035,0:01:09.575 वनराई आपल्या शहरी आयुष्याचाच [br]एक भाग असू शकते. 0:01:10.212,0:01:11.546 माझ्या मते वनराई म्हणजे, 0:01:11.570,0:01:15.067 घनदाट झाडी जिच्यामधून तुम्ही [br]चालूही शकणार नाही. 0:01:15.540,0:01:18.037 ती झाडं किती मोठी किंवा छोटी [br]आहेत हि गोष्ट अलहिदा. 0:01:19.046,0:01:22.429 आज आपण ज्या जगात राहतो [br]त्याच्या बहुतांशी भागात वनराई होती 0:01:22.453,0:01:24.486 असं मानवी हस्तक्षेपाच्या आधी होतं. 0:01:24.865,0:01:27.153 त्या वनराईच्या जागी मग आपण [br]आपली शहरं वसवली, 0:01:27.177,0:01:28.677 साओ पावलो सारखी, 0:01:28.701,0:01:31.470 हे विसरून कि आपण निसर्गाचा तेवढाच [br]भाग आहोत, 0:01:31.494,0:01:35.244 जेवढया या ग्रहावरच्या इतर ८४ लाख [br]प्रजातीसुद्धा त्याचा भाग आहेत. 0:01:36.215,0:01:39.643 आपला आवास आपला नैसर्गिक [br]आवास राहिला नाही. 0:01:40.190,0:01:42.192 पण आपल्यातल्या काही [br]जणांसाठी आता तसं नाही. 0:01:42.647,0:01:46.242 मी आणि आणखी काही जण अशी [br]वनराई व्यावसायिक तत्वावर निर्माण करतो - 0:01:46.266,0:01:48.073 कुठेही आणि सगळीकडे. 0:01:49.368,0:01:51.234 मी एक औद्योगिक अभियंता आहे 0:01:51.258,0:01:53.430 गाडयांच्या उत्पादनात मी निष्णात आहे. 0:01:54.078,0:01:56.254 मी टोयोटा कंपनीत कामाला असताना, 0:01:56.278,0:02:00.346 नैसर्गिक स्रोतांपासून उत्पादन कसं [br]करायचं हे मी शिकलो. 0:02:01.125,0:02:02.307 उदाहरण द्यायचं झाला तर, 0:02:02.331,0:02:04.982 रबराच्या झाडाचा आपण चीक काढतो, 0:02:05.006,0:02:06.665 त्याचं कच्च्या रबरात रूपांतर करतो. 0:02:06.689,0:02:09.394 आणि त्यापासून टायर [br]- एक उत्पादन - बनवतो 0:02:09.418,0:02:12.792 पण ही उत्पादनं पुन्हा नैसर्गिक [br]स्रोतांमध्ये रूपांतरित होवू शकत नाहीत 0:02:13.272,0:02:16.245 आपण निसर्गातील घटकांना वेगळं करतो 0:02:16.269,0:02:19.505 आणि ते मूलावस्थेत जाऊ शकणार नाहीत अशी [br]प्रक्रिया करतो. 0:02:19.529,0:02:21.246 असं औद्योगिक उत्पादन असतं. 0:02:22.025,0:02:25.487 याउलट नैसर्गिक प्रक्रिया हि अगदी [br]विरुद्ध दिशेने होते. 0:02:25.910,0:02:29.895 नैसर्गिक उत्पादन हे मूलकणांच्या [br]एकत्रीकरणाने होते, 0:02:29.919,0:02:31.274 अगदी प्रत्येक कणाच्या. 0:02:32.336,0:02:37.051 सगळी नैसर्गिक उत्पादनं पुन्हा [br]नैसर्गिक स्रोत बनतात. 0:02:38.343,0:02:41.285 हे मी तेव्हा शिकलो जेव्हा मी 0:02:41.309,0:02:44.347 माझ्या घराच्या परसात वनराई फुलवली 0:02:44.371,0:02:47.647 निसर्गाच्या सोबतीने काम करायची हि [br]माझी पहिलीच वेळ होती, 0:02:47.671,0:02:49.137 त्याच्या विरुद्ध नव्हे. 0:02:49.894,0:02:51.070 तेव्हापासून, 0:02:51.094,0:02:56.143 जगभरातल्या २५ शहरांमधे आम्ही [br]अशा ७५ वनराई फुलवल्या. 0:02:57.678,0:02:59.800 दरवेळी जेव्हा आम्ही नवीन जागी काम करतो, 0:02:59.824,0:03:04.568 आम्हांला असं आढळतं कि वनराई तयार [br]करण्यासाठी लागणारा प्रत्येक घटक 0:03:04.592,0:03:06.642 आमच्या आसपासच असतो. 0:03:06.666,0:03:09.347 आम्हांला फक्त हे सगळे घटक एकत्र [br]आणायचे असतात 0:03:09.371,0:03:11.332 आणि निसर्गाला त्याचं काम [br]करू द्यायचं असतं. 0:03:13.100,0:03:16.101 वनराई फुलवण्यासाठी आम्ही जमिनीपासून [br]सुरुवात करतो. 0:03:16.125,0:03:18.565 आम्ही तिचा पोत बघतो 0:03:18.589,0:03:21.057 आणि तिच्यात कोणते गुणधर्म नाहीत हे ठरवतो. 0:03:21.680,0:03:24.722 मातीचे कण जर छोटे असतील तर ती घट्ट होते - 0:03:24.746,0:03:27.149 इतकी घट्ट की तिच्यात पाणी जिरू शकत नाही. 0:03:28.188,0:03:32.636 आम्ही तिथे उपलब्ध असलेलं बायोमास मिसळतो, 0:03:32.660,0:03:35.187 त्यामुळे माती अधिक सच्छिद्र होते. 0:03:37.040,0:03:39.016 आता पाणी जिरू शकतं. 0:03:39.359,0:03:43.858 जर मातीत पाणी जिरू शकत नसेल, 0:03:43.882,0:03:45.557 आम्ही अजून थोडं बायोमास मिसळतो -- 0:03:45.581,0:03:48.855 कुजलेल्या वनस्पती किंवा ऊसाची चिपाडं [br]यासारखं पाणी शोषणारं साहित्य, 0:03:48.879,0:03:52.727 जेणेकरून मातीत पाणी जिरून [br]तिच्यात ओल राहु शकते. 0:03:53.680,0:03:58.298 वाढीसाठी झाडांना पाणी, सूर्यप्रकाश आणि [br]पोषण लागतं. 0:03:59.047,0:04:01.783 जमीन जर सकस नसेल तर काय? 0:04:02.383,0:04:04.709 आम्ही जमिनीत पोषक पदार्थ थेट [br]मिसळत नाही. 0:04:04.733,0:04:06.345 ती औद्योगिक पद्धत झाली. 0:04:06.369,0:04:07.795 ती निसर्गानियमाविरुद्ध आहे. 0:04:07.819,0:04:10.903 त्याऐवजी मग आम्ही जमिनीत [br]सूक्ष्मजीव मिसळतो. 0:04:10.927,0:04:14.236 ते मातीत नैसर्गिकरित्या पोषक [br]घटकांची निर्मिती करतात. 0:04:14.886,0:04:17.475 आम्ही मिसळलेल्या बायोमासवर ते जगतात, 0:04:17.499,0:04:20.198 त्यांना फक्त खायचं आणि [br]वृद्धिंगत व्हायचं असतं. 0:04:20.222,0:04:22.173 आणि जशी त्यांची संख्या वाढते, 0:04:22.197,0:04:23.745 तशी मातीत जान येते. 0:04:23.769,0:04:25.162 ती जिवंत होते. 0:04:26.215,0:04:28.842 आम्ही तिथल्या झाडांच्या [br]मूळ प्रजातींचे सर्वेक्षण करतो 0:04:28.866,0:04:30.947 त्या मूळ प्रजाती आहेत कि [br]नाहीत हे आम्ही कसं ठरवतो 0:04:31.473,0:04:35.931 मानवी हस्तक्षेपाआधी जे काही होतं ते [br]तद्देशीयच होतं. 0:04:35.955,0:04:37.344 हा अगदी साधा निकष आहे. 0:04:37.949,0:04:41.794 आम्ही एका राष्ट्रीय उद्यानाचं [br]सर्वेक्षण करतो 0:04:42.470,0:04:45.024 नैसर्गिक वनराईचे अवशेष शोधण्यासाठी. 0:04:46.689,0:04:49.690 आम्ही तपोवनांचं सर्वेक्षण करतो, 0:04:49.714,0:04:52.605 किंवा जुन्या मंदिरांभोवती असलेल्या [br]उपवनांचं सर्वेक्षण करतो. 0:04:52.973,0:04:55.252 आणि जर काहीच हाती नाही लागलं तर 0:04:55.276,0:04:56.800 आम्ही संग्रहालयांमध्ये जातो प्राचीन काळापासून 0:04:56.824,0:05:02.047 अस्तित्वात असलेल्या तिथल्या वृक्षांचे [br]बीज आणि लाकूड पाहण्यासाठी 0:05:02.547,0:05:08.044 तिथल्या स्थानिक चित्रांचं, कवितांचं आणि [br]साहित्याचं संशोधन करतो, 0:05:08.068,0:05:10.601 तिथल्या वृक्षांच्या प्रजाती ओळखू [br]येण्यासाठी. 0:05:11.217,0:05:12.563 एकदा कुठली झाडं आहेत हे कळलं 0:05:12.587,0:05:14.505 कि त्यांची चार स्तरांमध्ये विभागणी [br]करतो: 0:05:14.529,0:05:17.936 झुडुपं, झाडं, वृक्ष आणि वृक्षमंडप. 0:05:18.475,0:05:20.992 प्रत्येक स्तराचे प्रमाण आम्ही ठरवतो, 0:05:21.016,0:05:25.720 आणि मग गटातल्या प्रत्येक झाडाच्या [br]प्रजातीची टक्केवारी ठरवतो. 0:05:26.506,0:05:28.339 जर आम्ही फळांची वनराई फुलवत असू, 0:05:28.363,0:05:31.422 तर आम्ही फळं येणाऱ्या झाडांचे [br]प्रमाण वाढवतो. 0:05:31.446,0:05:33.612 ती फुलणारी वनराई असू शकते, 0:05:34.145,0:05:37.572 जी अनेक पक्ष्यांना आणि माश्यांना [br]आकर्षित करते, 0:05:38.026,0:05:42.085 किंवा ते एक स्थानिक प्रजातींच्या झाडांचं [br]सदाहरित रान असू शकतं. 0:05:43.560,0:05:46.529 आम्ही बीज गोळा करतो आणि त्यांतून [br]रोपं तयार करतो. 0:05:47.011,0:05:49.975 एकाच स्तरातील झाडांची लागवड 0:05:49.999,0:05:51.849 शेजारी होणार नाही याची काळजी घेतो 0:05:51.873,0:05:55.380 नाहीतर जेव्हा ते उंच वाढतील तेव्हा [br]जागेसाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु होईल 0:05:55.630,0:05:57.784 आम्ही रोपांची लागवड [br]एकमेकांच्या जवळ करतो 0:05:58.548,0:06:01.613 आम्ही जमिनीवर अर्धवट कुजलेला [br]पालापाचोळा पसरतो, 0:06:01.637,0:06:04.205 त्यामुळे बाहेर उष्णता असताना [br]जमीन ओली राहते 0:06:04.605,0:06:06.317 जेव्हा थंडी असते, 0:06:06.341,0:06:09.558 कुजलेल्या पालापाचोळ्यावरच दव गोठते, 0:06:09.582,0:06:12.991 त्यामुळे बाहेर अतिथंडी असली तरी [br]जमिनीत हवा खेळती राहते. 0:06:13.497,0:06:16.666 माती खूपच मऊ असते -- 0:06:16.690,0:06:20.184 इतकी मऊ कि मुळ तिच्यात [br]सहज शिरु शकतात, 0:06:20.208,0:06:21.358 वेगाने. 0:06:22.064,0:06:24.549 सुरुवातीला वनराई वाढत [br]नाहीये असं वाटतं, 0:06:24.573,0:06:26.391 पण तिची वाढ जमिनीखाली चालू असते. 0:06:26.746,0:06:28.207 पहिल्या तीन महिन्यांत, 0:06:28.231,0:06:30.158 मूळ एक मीटर खोलीपर्यंत जातात. 0:06:30.736,0:06:32.620 ही मूळ एक जाळी तयार करतात, 0:06:32.644,0:06:34.373 जमिनीला घट्ट धरून ठेवतात. 0:06:34.397,0:06:37.993 सूक्ष्म जीव आणि बुरशी या जाळीत असतात. 0:06:38.706,0:06:42.293 जर झाडाच्या आसपास पोषण उपलब्ध नसेल, 0:06:42.317,0:06:45.177 हे सूक्ष्म जीव झाडापर्यंत [br]ते पोषण पोहोचवतात. 0:06:45.754,0:06:47.478 जेव्हा पाऊस पडतो, 0:06:47.502,0:06:48.662 जादू झाल्यासारखी, 0:06:48.686,0:06:50.549 रात्रीतून भुईछत्र्या येतात. 0:06:50.573,0:06:53.778 म्हणजेच जमिनीखाली पोषक [br]अश्या बुरशीची जाळी आहे. 0:06:54.663,0:06:56.930 एकदा हि मुळ रुजली कि, 0:06:56.954,0:06:59.119 जमिनीच्या वर वनराई [br]फुलायला सुरुवात होते. 0:06:59.835,0:07:04.202 जसजशी वनराईची वाढ होते [br]आम्ही तिला पाणी देत राहतो-- 0:07:04.226,0:07:08.017 पुढच्या दोन ते तीन वर्षांपर्यंत [br]आम्ही पाणी देतो. 0:07:08.752,0:07:13.808 आम्हांला पाणी आणि जमिनीचं पोषण [br]फक्त आमच्या झाडांसाठी ठेवायचं आहे, 0:07:13.832,0:07:16.516 म्हणून जमिनीवरील तण आम्ही काढून टाकतो. 0:07:16.971,0:07:20.289 हि वनराई जशी वाढते ती [br]सूर्यप्रकाशाला प्रतिबंध करते. 0:07:20.801,0:07:23.247 अखेरीस, वनराई इतकी घनदाट होते 0:07:23.271,0:07:25.505 कि सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही. 0:07:25.902,0:07:29.364 आता तण वाढू शकत नाही कारण [br]त्यांनासुद्धा सूर्यप्रकाशाची गरज असते. 0:07:30.044,0:07:31.323 अशा अवस्थेत, 0:07:31.347,0:07:34.544 वनराईत पडणारा पाण्याचा 0:07:34.568,0:07:36.925 प्रत्येक थेंबाचे बाष्पीभवन होत नाही. 0:07:37.327,0:07:40.415 हि घनदाट वनराई आर्द्र हवेला द्रवीभूत करते 0:07:40.439,0:07:42.210 आणि तिची ओल कायम ठेवते. 0:07:42.712,0:07:46.865 आम्ही वनराईला पाणी देणं हळुहळू कमी करतो [br]आणि अखेरीस ते देणं बंद करतो. 0:07:47.340,0:07:48.858 आणि पाणी न देताही, 0:07:48.882,0:07:52.928 वनराईची जमीन ओलसर राहते [br]आणि कधीकधी गडददेखील. 0:07:53.970,0:07:57.370 आता, जेव्हा एखादं पान या [br]वनराईच्या जमिनीवर पडतं, 0:07:57.394,0:07:59.545 ते लगेच कुजायला लागतं. 0:08:00.317,0:08:03.503 या कुजलेल्या पानाची बुरशी होते, 0:08:03.527,0:08:05.029 जी या वनराईचे खाद्य असते. 0:08:05.530,0:08:07.209 जशी वनराई वाढते, 0:08:07.233,0:08:08.903 अधिक पानं जमिनीवर गळून पडतात -- 0:08:08.927,0:08:10.959 म्हणजे अजून जास्त बुरशी तयार होते, 0:08:10.983,0:08:14.221 म्हणजे आणखी खाद्य म्हणून वनराई [br]अजून वाढू शकते. 0:08:14.245,0:08:16.978 आणि या वनराईची भरमसाट वाढ होत राहते. 0:08:18.053,0:08:19.469 एकदा रुजल्या कि, 0:08:19.493,0:08:23.683 ह्या वनराई स्वतःचेच पुनर्निर्माण [br]वारंवार करणार आहेत -- 0:08:23.707,0:08:25.281 कदाचित कायमचेच. 0:08:26.209,0:08:28.655 यासारख्या नैसर्गिक वनराईत, 0:08:28.679,0:08:31.350 कुठलेही व्यवस्थापन न करणे हेच उत्तम. 0:08:32.493,0:08:34.284 हे एक छोटंसं वनसंमेलन आहे. 0:08:34.308,0:08:35.523 (हशा) 0:08:36.663,0:08:39.206 या वनराईची वाढ सामूहिक असते. 0:08:39.627,0:08:40.945 जर हीच झाडं -- 0:08:40.969,0:08:42.246 याच प्रजाती -- 0:08:42.270,0:08:44.508 स्वतंत्रपणे लावल्या असत्या, 0:08:44.532,0:08:46.479 त्यांची वाढ एवढ्या जोमाने झाली नसती. 0:08:46.503,0:08:50.687 आणि अशाप्रकारे आम्ही १०० वर्षांची [br]वाटणारी वनराई निर्माण करतो 0:08:50.711,0:08:52.020 केवळ १० वर्षांत. 0:08:52.044,0:08:53.198 आपले खूप आभार. 0:08:53.222,0:08:58.796 (टाळ्या)