Return to Video

आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग

  • 0:01 - 0:03
    माणसं आपली स्वप्नं कशी साकार करतात,
  • 0:03 - 0:05
    हे शिकण्यात मी गेली दोन वर्षं घालवलीत .
  • 0:05 - 0:07
    आपली स्वप्ने आणि आपण या जगावर
  • 0:07 - 0:10
    उमटवू इच्छित असणाऱ्या पाऊलखुणा
  • 0:10 - 0:14
    तसेच अपूर्ण राहिलेले प्रकल्प
  • 0:14 - 0:17
    त्या स्वप्नांचा किती मोठा भाग व्यापतात
    हे पाहणं चित्तवेधक ठरेल.
  • 0:17 - 0:19
    (हशा )
  • 0:19 - 0:21
    तर आज मी तुम्हाला सांगणार आहे,
  • 0:21 - 0:25
    स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग.
  • 0:25 - 0:29
    एका रातोरात यश मिळते यावर विश्वास ठेवा.
  • 0:29 - 0:31
    ती गोष्ट ठाऊक आहे ना तुम्हाला?
  • 0:31 - 0:36
    त्या तंत्रज्ञाने मोबाईल ऐप बनवले
    आणि अगदी जलद ते विकून खूप पैसे कमवले.
  • 0:37 - 0:40
    गोष्ट खरी वाटेल, पण मी पैजेवर सांगेन
    की ती अपूर्ण आहे.
  • 0:40 - 0:43
    जास्त तपास करता असं आढळेल, की
  • 0:43 - 0:45
    त्याने याआधी ३० ऐप केली आहेत.
  • 0:45 - 0:48
    आणि त्याने या विषयात
    मास्टर्स आणि पीएचडी केली आहे.
  • 0:48 - 0:51
    तो गेली २० वर्षं या विषयावर काम करीत आहे.
  • 0:51 - 0:53
    हे खरोखरच मजेशीर आहे.
  • 0:53 - 0:59
    ब्राझीलमध्ये माझ्या स्वतःच्याच कहाणीला,
    एका रात्रीत मिळालेलं यश समजलं जातं.
  • 0:59 - 1:01
    मी एका साध्या कुटुंबातून आले.
  • 1:01 - 1:05
    एम आय टी मध्ये प्रवेशाच्या अंतिम तारखेला
    दोन आठवडे उरले असताना
  • 1:05 - 1:07
    मी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली.
  • 1:07 - 1:10
    आणि काय चमत्कार! मला प्रवेश मिळाला.
  • 1:10 - 1:13
    लोकांना हे रातोरात मिळालेलं यश वाटत असावं.
  • 1:13 - 1:17
    पण ते घडून आलं, कारण त्यापूर्वीची १७ वर्षं
  • 1:17 - 1:19
    मी आयुष्य आणि शिक्षण
    गांभीर्याने घेतले होते.
  • 1:19 - 1:23
    एका रात्रीत मिळालेलं यश हा नेहमीच
  • 1:23 - 1:27
    आपण आयुष्यात त्या क्षणापर्यंत केलेल्या
    प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो.
  • 1:27 - 1:30
    दोन: आपल्या प्रश्नांची उत्तरं
    इतरांजवळ आहेत, असा विश्वास बाळगा.
  • 1:30 - 1:32
    लोक सतत मदत करू पाहतात, बरोबर?
  • 1:32 - 1:36
    सगळेच लोक: आपलं कुटुंब, आपले मित्र,
    व्यवसायातले भागीदार.
  • 1:36 - 1:39
    आपण कुठल्या मार्गाने जावं याबद्दल
    सगळेच मतं देत असतात.
  • 1:39 - 1:42
    "मी सांगतो ना, या नळीतून जा"
  • 1:42 - 1:46
    पण आत शिरल्यावर अनेक मार्ग दिसतात.
  • 1:46 - 1:50
    आणि ते निर्णय स्वतःच घ्यावे लागतात.
  • 1:50 - 1:53
    आपल्या आयुष्याची अचूक उत्तरं
    इतरांजवळ नसतात.
  • 1:53 - 1:56
    आपल्याला सतत हे निर्णय
    घेत राहावं लागतं, बरोबर?
  • 1:56 - 1:59
    अशा असंख्य नळ्या असणार आणि
    त्यावर आपलं डोकं आदळणारच.
  • 1:59 - 2:02
    हा त्या प्रक्रियेचाच भाग आहे.
  • 2:02 - 2:06
    तीन: अगदी सूक्ष्म पण फार महत्त्वाचं.
  • 2:06 - 2:09
    प्रगतीची खात्री वाटू लागली तरी
    तिथेच स्थिरावणे.
  • 2:09 - 2:11
    जेव्हा आयुष्य अगदी मस्त चाललेलं असतं,
  • 2:11 - 2:13
    अगदी उत्तम टीम जमलेली असते,
  • 2:13 - 2:17
    प्राप्ति वाढत असते, जम बसलेला असतो..
  • 2:17 - 2:18
    तीच स्थिरावण्याची वेळ.
  • 2:18 - 2:20
    मी पहिलं पुस्तक लिहिलं, तेव्हा
  • 2:20 - 2:23
    ते ब्राझीलमध्ये सर्वत्र पोहोचावं म्हणून
    अतोनात श्रम केले.
  • 2:23 - 2:25
    त्यामुळे, तीन दशलक्षावर लोकांनी
    ते डाउनलोड केले.
  • 2:25 - 2:28
    ५०,००० वर लोकांनी
    छापील प्रती विकत घेतल्या.
  • 2:28 - 2:33
    जेव्हा मी त्याचा पुढचा भाग लिहिला,
    तेव्हा याचा जोरदार परिणाम झालाच असता.
  • 2:33 - 2:36
    मी थोडेसेच प्रयत्न केले असते,
    तरीही बऱ्यापैकी खप झाला असता.
  • 2:36 - 2:38
    पण बऱ्यापैकी हे काही बरं नव्हे.
  • 2:38 - 2:41
    एका शिखरापर्यंत पोहोचत असताना,
  • 2:41 - 2:45
    पूर्वीपेक्षाही खडतर मेहनत करावी लागते,
    पुढचं शिखर शोधण्यासाठी.
  • 2:45 - 2:48
    मी थोडी मेहनत केली असती, तर कदाचित
    मला दोन लाख वाचक मिळाले असते.
  • 2:48 - 2:51
    आणि तेही मोठंच आहे.
  • 2:51 - 2:52
    पण मी पूर्वीपेक्षा जास्त कष्ट केले,
  • 2:52 - 2:56
    तर हा आकडा काही दशलक्षांपर्यंत नेऊ शकेन.
  • 2:56 - 2:59
    म्हणूनच मी ठरवलं, की माझं नवं पुस्तक
    ब्राझीलच्या प्रत्येक राज्यात पोहोचवायचं.
  • 2:59 - 3:01
    आणि आताच माझं शिखर उंचावलं आहे.
  • 3:01 - 3:03
    स्थिरावयाला वेळच नाही.
  • 3:03 - 3:07
    चौथी सूचना: ही खरोखर महत्त्वाची आहे.
  • 3:07 - 3:10
    इतरांना दोषी ठरवा.
  • 3:10 - 3:12
    मी सतत पाहते, लोक म्हणत असतात,
  • 3:12 - 3:16
    " माझ्यापाशी ही महान कल्पना होती, पण
    एकाही गुंतवणुकदाराजवळ दूरदृष्टी नव्हती."
  • 3:16 - 3:18
    "अरे !, मी हे उत्तम उत्पादन तयार केलं,
  • 3:18 - 3:22
    पण व्यापार मंदीत असल्याने
    फार विक्रीच झाली नाही."
  • 3:22 - 3:27
    किंवा, "मला गुणी माणसंच सापडत नाहीत.
    टीमचा दर्जा अपेक्षेहून फार कमी आहे."
  • 3:27 - 3:28
    तुमच्यापाशी स्वप्नं असतील,
  • 3:28 - 3:31
    तर ती प्रत्यक्षात आणणं
    ही जबाबदारी तुमची आहे.
  • 3:32 - 3:34
    होय, गुणी माणसं सापडणं कठीण असेल.
  • 3:34 - 3:37
    होय, व्यापार मंदीत असेल.
  • 3:37 - 3:39
    पण जर कोणीच गुंतवणूक करत नसेल,
  • 3:39 - 3:41
    जर तुमचा माल कोणीच विकत घेत नसेल,
  • 3:41 - 3:44
    तर नक्कीच, समजा तुमचा काहीतरी दोष आहे.
  • 3:44 - 3:46
    (हशा )
  • 3:46 - 3:47
    नक्कीच.
  • 3:47 - 3:50
    तुम्हालाच तुमची स्वप्नं ठरवावी लागतील,
    आणि घडवावी लागतील.
  • 3:50 - 3:53
    कोणीच एकट्याने आपलं ध्येय गाठू शकत नाही.
  • 3:53 - 3:58
    पण तुमची स्वप्नं साकार झाली नाहीत,
    तर दोष मात्र तुमचाच, इतरांचा नव्हे.
  • 3:58 - 4:00
    आपल्या स्वप्नांची जबाबदारी घ्या.
  • 4:01 - 4:05
    शेवटची सूचना:
    ही देखील फार महत्त्वाची आहे.
  • 4:06 - 4:11
    स्वप्न ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे
    असं समजा.
  • 4:11 - 4:14
    एकदा मी एक जाहिरात पाहिली,
    त्यात काही मित्र होते.
  • 4:14 - 4:17
    ते एक डोंगर चढत होते.
    डोंगर खूप उंच होता.
  • 4:17 - 4:18
    खूपच कष्टाचं काम होतं.
  • 4:18 - 4:22
    ते घामाघूम झालेले दिसत होते.
    कठीण अवस्था होती.
  • 4:22 - 4:25
    आणि ते वर चढत होते.
    शेवटी, ते शिखरावर पोहोचले.
  • 4:25 - 4:27
    आता नक्कीच हा क्षण ते साजरा करणार, बरोबर?
  • 4:27 - 4:28
    चला, साजरा करू या,
  • 4:28 - 4:31
    "वा! आपण पोहोचलो. आपण शिखरावर आहोत."
  • 4:31 - 4:34
    दोन सेकंदांनी त्यांनी एकमेकांकडे पाहिलं,
    आणि म्हणाला,
  • 4:34 - 4:36
    "ठीक आहे, चला, खाली उतरू"
  • 4:36 - 4:37
    (हशा )
  • 4:37 - 4:39
    आयुष्य म्हणजे नुसती ध्येयं नसतात.
  • 4:39 - 4:42
    त्या ध्येयांपर्यंतचा प्रवास
    महत्त्वाचा असतो.
  • 4:42 - 4:44
    होय, ध्येयांची मजा घ्यायलाच हवी.
  • 4:44 - 4:47
    पण लोकांना वाटतं की आपल्याजवळ स्वप्नं आहेत.,
  • 4:47 - 4:50
    आणि जेव्हा एखादं स्वप्न साकार होईल,
  • 4:50 - 4:54
    तेव्हा काहीतरी जादू होऊन
    सर्वत्र आनंदीआनंद होईल.
  • 4:54 - 4:57
    पण स्वप्नपूर्ती ही एक क्षणिक भावना आहे.
  • 4:57 - 4:59
    आयुष्य तसं नाही.
  • 4:59 - 5:03
    आपली सगळी स्वप्नं साकार करण्याचा
    एकच मार्ग म्हणजे,
  • 5:03 - 5:06
    त्या प्रवासातल्या प्रत्येक पावलाची
    मजा घेणे.
  • 5:06 - 5:08
    हा सर्वोत्तम मार्ग होय.
  • 5:08 - 5:10
    आणि प्रवास सोपा असतो.
    तो पावलांनी बनलेला असतो.
  • 5:10 - 5:12
    कधी पावलं अचूक पडतील.
  • 5:12 - 5:14
    कधी ती धडपडतील.
  • 5:14 - 5:19
    ती अचूक असतील, तर ते साजरं करा.
    कारण, काही लोक पटकन साजरं करीत नाहीत.
  • 5:19 - 5:22
    आणि धडपडला असाल, तर त्याला शिक्षण समजा.
  • 5:22 - 5:28
    जर प्रत्येक पाऊल म्हणजे एक समारंभ
    किंवा एक शिक्षण ठरलं,
  • 5:28 - 5:30
    तर नक्कीच तुमचा प्रवास आनंददायक होईल.
  • 5:30 - 5:32
    तर, पाच गोष्टी:
  • 5:32 - 5:34
    रातोरात यश मिळते यावर विश्वास ठेवा.
  • 5:34 - 5:37
    आपल्या प्रश्नांची उत्तरं
    इतरांजवळ आहेत, असं समजा.
  • 5:37 - 5:40
    जेव्हा प्रगतीची खात्री वाटेल,
    तीच स्थिरावण्याची वेळ, असं समजा.
  • 5:40 - 5:42
    इतरांना दोषी ठरवा.
  • 5:42 - 5:46
    स्वप्न ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे
    असं समजा.
  • 5:46 - 5:49
    माझं ऐका, हे केल्यावर नक्कीच
    तुमची स्वप्नं नष्ट होतील.
  • 5:49 - 5:50
    (हशा )
  • 5:50 - 5:51
    (टाळ्या )
  • 5:51 - 5:53
    धन्यवाद.
Title:
आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग
Speaker:
बेल पेस
Description:

आपली सर्वांचीच इच्छा असते, एखादा जग बदलून टाकणारा शोध लावावा. एखादी यशस्वी कंपनी सुरू करावी. एखादं सर्वाधिक खपणारं पुस्तक लिहावं. पण प्रत्यक्षात फारच कमी लोक हे करतात. ब्राझिलियन उद्योजक बेल पेस विश्लेषण करताहेत, सहज विश्वास ठेवण्याजोग्या पाच दंतकथांचं, ज्या तुमची स्वप्नं साकार होऊ देत नाहीत.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
06:11
Abhinav Garule edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Abhinav Garule approved Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Abhinav Garule edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Abhinav Garule edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Abhinav Garule edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Arvind Patil accepted Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Arvind Patil edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Arvind Patil edited Marathi subtitles for 5 ways to kill your dreams
Show all
  • Hello, If you are reviewing or approving this, please change the title to आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग
    Thank you, Smita

Marathi subtitles

Revisions Compare revisions