Return to Video

आभार मानायचे लक्षात ठेवा

  • 0:00 - 0:04
    नमस्ते. मी इथे आपल्याशी स्तुती,
    प्रशंसा आणि आभार यांचे महत्व
  • 0:04 - 0:07
    यासंबंधी बोलण्यासाठी आणि ते
    नेमके आणि अस्सल असावेत
  • 0:07 - 0:09
    याबाबत बोलण्यासाठी आली आहे.
  • 0:09 - 0:11
    आणि मी या गोष्टीत रस घेतला कारण,
  • 0:11 - 0:14
    मला स्वतःला जाणवलं,
    जेव्हा मी मोठी होत होते,
  • 0:14 - 0:15
    आणि अगदी काही
  • 0:15 - 0:17
    वर्षंपूर्वीपर्यंत, मला कुणाचे
    आभार मानायचे
  • 0:17 - 0:18
    असायचे, स्तुती करायची
  • 0:18 - 0:20
    असायची, त्यांनी केलेली माझी स्तुती
  • 0:20 - 0:22
    स्वीकारायची असायची, मी थांबायचे.
  • 0:22 - 0:25
    आणि मी स्वतःला विचारलं, का?
  • 0:25 - 0:27
    मला बुजल्यासारखं झालं,
    मी गोरीमोरी झाले.
  • 0:27 - 0:29
    आणि मग मला प्रश्न पडला,
  • 0:29 - 0:31
    असं वागणारी मी एकटीच आहे का?
  • 0:31 - 0:32
    याचा छडा लावायचा
    ठरवलं
  • 0:32 - 0:35
    मी सुदैवी आहे कि मी एका पुनर्वसन
    केंद्रात काम करते, त्यामुळे
  • 0:35 - 0:38
    व्यसनाधीन होऊन जीवन आणि
    मृत्युशी सामना करणारे लोक मी बघते.
  • 0:38 - 0:42
    आणि कधीकधी कारण इतकं साधं
    असतं कि त्यांचे वडील त्यांना त्यांचा
  • 0:42 - 0:47
    अभिमान आहे हे न सांगताच निवर्तले.
    पण मग, त्यांना इतर कुटुंबीय आणि
  • 0:47 - 0:49
    मित्रांकडून कळतं कि वडलांनी
    इतर प्रत्येकाला
  • 0:49 - 0:52
    त्याचा त्यांना अभिमान आहे हे संगितले
    होते पण त्यांनी मुलाला
  • 0:52 - 0:53
    कधी संगितले नव्हते.
  • 0:53 - 0:56
    कारण त्यांना ठाऊकच नव्हतं
    कि त्यांच्या मुलाला ते हवं आहे.
  • 0:56 - 1:00
    मग माझा असा सवाल आहे, आपल्याला ज्या
    गोष्टी हव्या आहेत त्या आपण मागत का नाही?
  • 1:00 - 1:02
    २५ वर्षं संसारात असलेले
    एक सद्गृहस्थ मला
  • 1:02 - 1:04
    माहिती आहेत ज्यांना पत्नीने
    म्हणावसं वाटतं,
  • 1:04 - 1:07
    "तुम्ही कमावता त्याबद्दल आभार,
    मी मुलांसोबत घरी राहू शकते."
  • 1:07 - 1:08
    पण ते विचारणार नाहीत.
  • 1:08 - 1:10
    मला एक महिला माहिती आहे
    जिला हे चांगले जमते
  • 1:10 - 1:12
    आठवड्यातून एकदा ती नवर्याला
    भेटून सांगते,
  • 1:12 - 1:16
    "मी घर आणि मुलं सांभाळते म्हणून
    तू माझे आभार मानलेले मला आवडेल."
  • 1:16 - 1:19
    आणि तो म्हणतो, "वा, हे छान आहे,
    उत्तम आहे."
  • 1:19 - 1:21
    आणि स्तुती हि सच्ची असावी,
  • 1:21 - 1:23
    पण त्या बदल्यात ती जबाबदारी घेते.
  • 1:23 - 1:26
    आणि बालवाडीपासून असलेली
    माझी मैत्रीण, एप्रिल, तिच्या मुलांनी
  • 1:26 - 1:29
    केलेल्या त्यांच्या कामांबद्दल त्यांचे
    आभार मानते. आणि ती म्हणते
  • 1:29 - 1:31
    "ती त्यांचीच कामं असली तरी
    आभार का मानू नये?"
  • 1:31 - 1:33
    मग प्रश्न हा आहे कि, मी ते रोखत का होते?
  • 1:33 - 1:34
    इतर लोक ते का रोखत
  • 1:34 - 1:37
    होते? मी का म्हणू शकते,
    "माझं स्टीक मला माध्यम हवं,
  • 1:37 - 1:40
    मला सहा नंबरचे शूज लागतात," पण
    मी कधी म्हणणार नाही,
  • 1:40 - 1:42
    "तुम्ही माझी अशी स्तुती कराल का?"
  • 1:42 - 1:46
    आणि याचं कारण म्हणजे मी तुम्हाला
    माझी महत्वाची माहिती देत आहे.
  • 1:46 - 1:48
    मला वाटणार्या असुरक्षिततेबद्दल मी
    सांगते.
  • 1:48 - 1:50
    मला तुमची कशात मदत हवी आहे
    ते सांगत आहे.
  • 1:50 - 1:53
    आणि मी तुम्हाला, माझ्या जवळच्यांना
  • 1:53 - 1:55
    शत्रूसारखी वागणूक देते आहे.
  • 1:55 - 1:57
    कारण त्या महितीचं तुम्ही काय करू
    शकता?
  • 1:57 - 1:59
    तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकता.
  • 1:59 - 2:00
    तुम्ही तिचा गैरवापर
  • 2:00 - 2:02
    करू शकता. किंवा तुम्ही माझी गरज
    भागवूही
  • 2:02 - 2:04
    शकता. आणि मी माझी दुचाकी दुकानात
    घेऊन गेले-
  • 2:04 - 2:07
    मला हे आवडतं - तीच दुचाकी आणि ते
    चाकांचं समतोलन का काय ते करतात.
  • 2:07 - 2:09
    तो माणूस म्हणाला, "तुला माहिती आहे,
    जेव्हा
  • 2:09 - 2:10
    चाकं समतोल असतात
  • 2:10 - 2:12
    तेव्हा दुचाकी खूप छान चालते."
    मला तीच
  • 2:12 - 2:15
    दुचाकी परत मिळते, त्याच चाकांचे बाक काढून
    जे गेल्या अडीच
  • 2:15 - 2:18
    वर्षांपासून होते, आणि माझी दुचाकी अगदी
    नवी असल्यासारखी झाली.
  • 2:18 - 2:20
    म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करते.
  • 2:20 - 2:22
    तुम्ही तुमची चाकं समतोल करावीत
    असं मला
  • 2:22 - 2:25
    वाटतं: तुम्हाला ऐकाव्याश्या वाटणार्या
    स्तुतीबाबत प्रामाणिक रहा
  • 2:25 - 2:27
    तुम्हाला काय ऐकावासं वाटतं?
    घरी पत्नीकडे जा
  • 2:27 - 2:29
    तिला विचारा, तिला काय हवं आहे?
  • 2:29 - 2:31
    पतीला विचारा -- त्याला काय हवं आहे?
  • 2:31 - 2:34
    घरी जाऊन ते प्रश्न विचारा व
    तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा
  • 2:34 - 2:35
    आणि ते सोपं आहे.
  • 2:35 - 2:37
    आणि आपण याची दखल का घ्यावी?
  • 2:37 - 2:38
    आपण जगाच्या
  • 2:38 - 2:41
    शांतीबद्दल बोलतो. विविध संस्कृती, विविध
    भाषा असताना जगात शांतता
  • 2:41 - 2:45
    काशी असू शकते? मला वाटतं एकाच छताखाली
    वावरणार्या कुटुंबापासून तिची सुरुवात होते
  • 2:45 - 2:47
    मग, आपल्या परसात आधी तिला नांदवू या.
  • 2:47 - 2:49
    आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे मला आभार
  • 2:49 - 2:51
    मानायचे आहेत, उत्तम पती, उत्तम माता,
    मित्र,
  • 2:51 - 2:53
    मुली, मुलं असल्याबद्दल.
  • 2:53 - 2:54
    आणि कदाचित तुम्हाला
  • 2:54 - 2:56
    कुणीच कधी म्हणलं नसेल, पण तुम्ही
    तुमच्या
  • 2:56 - 2:59
    जागी खरच उत्तम आहात, आणि इथे
    असल्याबद्दल, उपस्थितीबद्दल आणि
  • 2:59 - 3:02
    तुमच्या कल्पनांनी जग बदलण्याबद्दल
    आभारी आहे.
  • 3:02 - 3:04
    धन्यवाद.
  • 3:04 - 3:11
    (टाळ्या)
Title:
आभार मानायचे लक्षात ठेवा
Speaker:
लॉरा ट्राईस
Description:

मैत्री घट्ट करण्यासाठी, बंध सुधारण्यासाठी, समोरच्या व्यक्तीला तिचं तुमच्यालेखी काय महत्व आहे हे कळावं यासाठी - डों. लॉरा ट्राईस या ३ मिनिटांच्या साध्या वर्णनयुक्त व्याख्यानात "आभारी आहे" या जादुई शब्दांच्या ताकदीचे चिंतन करतात. प्रयत्न करून बघा.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
03:11
Abhinav Garule approved Marathi subtitles for Remember to say thank you
Abhinav Garule edited Marathi subtitles for Remember to say thank you
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Remember to say thank you
Abhinav Garule edited Marathi subtitles for Remember to say thank you
Amol Terkar edited Marathi subtitles for Remember to say thank you
Amol Terkar edited Marathi subtitles for Remember to say thank you
Amol Terkar edited Marathi subtitles for Remember to say thank you

Marathi subtitles

Revisions