0:00:00.000,0:00:04.000 नमस्ते. मी इथे आपल्याशी स्तुती, [br]प्रशंसा आणि आभार यांचे महत्व 0:00:04.000,0:00:07.000 यासंबंधी बोलण्यासाठी आणि ते[br]नेमके आणि अस्सल असावेत 0:00:07.000,0:00:09.000 याबाबत बोलण्यासाठी आली आहे. 0:00:09.000,0:00:11.000 आणि मी या गोष्टीत रस घेतला कारण, 0:00:11.000,0:00:14.000 मला स्वतःला जाणवलं,[br]जेव्हा मी मोठी होत होते, 0:00:14.000,0:00:15.000 आणि अगदी काही 0:00:15.000,0:00:17.000 वर्षंपूर्वीपर्यंत, मला कुणाचे[br]आभार मानायचे 0:00:17.000,0:00:18.000 असायचे, स्तुती करायची 0:00:18.000,0:00:20.000 असायची, त्यांनी केलेली माझी स्तुती 0:00:20.000,0:00:22.000 स्वीकारायची असायची, मी थांबायचे. 0:00:22.000,0:00:25.000 आणि मी स्वतःला विचारलं, का? 0:00:25.000,0:00:27.000 मला बुजल्यासारखं झालं,[br]मी गोरीमोरी झाले. 0:00:27.000,0:00:29.000 आणि मग मला प्रश्न पडला, 0:00:29.000,0:00:31.000 असं वागणारी मी एकटीच आहे का? 0:00:31.000,0:00:32.000 याचा छडा लावायचा[br]ठरवलं 0:00:32.000,0:00:35.000 मी सुदैवी आहे कि मी एका पुनर्वसन[br]केंद्रात काम करते, त्यामुळे 0:00:35.000,0:00:38.000 व्यसनाधीन होऊन जीवन आणि [br]मृत्युशी सामना करणारे लोक मी बघते. 0:00:38.000,0:00:42.000 आणि कधीकधी कारण इतकं साधं[br]असतं कि त्यांचे वडील त्यांना त्यांचा 0:00:42.000,0:00:47.000 अभिमान आहे हे न सांगताच निवर्तले.[br]पण मग, त्यांना इतर कुटुंबीय आणि 0:00:47.000,0:00:49.000 मित्रांकडून कळतं कि वडलांनी[br]इतर प्रत्येकाला 0:00:49.000,0:00:52.000 त्याचा त्यांना अभिमान आहे हे संगितले[br]होते पण त्यांनी मुलाला 0:00:52.000,0:00:53.000 कधी संगितले नव्हते. 0:00:53.000,0:00:56.000 कारण त्यांना ठाऊकच नव्हतं [br]कि त्यांच्या मुलाला ते हवं आहे. 0:00:56.000,0:01:00.000 मग माझा असा सवाल आहे, आपल्याला ज्या[br]गोष्टी हव्या आहेत त्या आपण मागत का नाही? 0:01:00.000,0:01:02.000 २५ वर्षं संसारात असलेले[br]एक सद्गृहस्थ मला 0:01:02.000,0:01:04.000 माहिती आहेत ज्यांना पत्नीने[br]म्हणावसं वाटतं, 0:01:04.000,0:01:07.000 "तुम्ही कमावता त्याबद्दल आभार,[br]मी मुलांसोबत घरी राहू शकते." 0:01:07.000,0:01:08.000 पण ते विचारणार नाहीत. 0:01:08.000,0:01:10.000 मला एक महिला माहिती आहे[br]जिला हे चांगले जमते 0:01:10.000,0:01:12.000 आठवड्यातून एकदा ती नवर्याला[br]भेटून सांगते, 0:01:12.000,0:01:16.000 "मी घर आणि मुलं सांभाळते म्हणून[br]तू माझे आभार मानलेले मला आवडेल." 0:01:16.000,0:01:19.000 आणि तो म्हणतो, "वा, हे छान आहे,[br]उत्तम आहे." 0:01:19.000,0:01:21.000 आणि स्तुती हि सच्ची असावी, 0:01:21.000,0:01:23.000 पण त्या बदल्यात ती जबाबदारी घेते. 0:01:23.000,0:01:26.000 आणि बालवाडीपासून असलेली [br]माझी मैत्रीण, एप्रिल, तिच्या मुलांनी 0:01:26.000,0:01:29.040 केलेल्या त्यांच्या कामांबद्दल त्यांचे [br]आभार मानते. आणि ती म्हणते 0:01:29.040,0:01:31.070 "ती त्यांचीच कामं असली तरी[br]आभार का मानू नये?" 0:01:31.070,0:01:33.000 मग प्रश्न हा आहे कि, मी ते रोखत का होते? 0:01:33.000,0:01:34.000 इतर लोक ते का रोखत 0:01:34.000,0:01:37.000 होते? मी का म्हणू शकते,[br]"माझं स्टीक मला माध्यम हवं, 0:01:37.000,0:01:40.000 मला सहा नंबरचे शूज लागतात," पण[br]मी कधी म्हणणार नाही, 0:01:40.000,0:01:42.000 "तुम्ही माझी अशी स्तुती कराल का?" 0:01:42.000,0:01:46.000 आणि याचं कारण म्हणजे मी तुम्हाला[br]माझी महत्वाची माहिती देत आहे. 0:01:46.000,0:01:48.000 मला वाटणार्या असुरक्षिततेबद्दल मी[br]सांगते. 0:01:48.000,0:01:50.000 मला तुमची कशात मदत हवी आहे[br]ते सांगत आहे. 0:01:50.000,0:01:53.000 आणि मी तुम्हाला, माझ्या जवळच्यांना 0:01:53.000,0:01:55.000 शत्रूसारखी वागणूक देते आहे. 0:01:55.000,0:01:57.000 कारण त्या महितीचं तुम्ही काय करू[br]शकता? 0:01:57.000,0:01:59.000 तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकता. 0:01:59.000,0:02:00.000 तुम्ही तिचा गैरवापर[br] 0:02:00.000,0:02:02.000 करू शकता. किंवा तुम्ही माझी गरज[br]भागवूही 0:02:02.000,0:02:04.000 शकता. आणि मी माझी दुचाकी दुकानात[br]घेऊन गेले- 0:02:04.000,0:02:07.000 मला हे आवडतं - तीच दुचाकी आणि ते[br]चाकांचं समतोलन का काय ते करतात. 0:02:07.000,0:02:09.000 तो माणूस म्हणाला, "तुला माहिती आहे,[br]जेव्हा 0:02:09.000,0:02:10.000 चाकं समतोल असतात 0:02:10.000,0:02:12.000 तेव्हा दुचाकी खूप छान चालते."[br]मला तीच 0:02:12.000,0:02:15.000 दुचाकी परत मिळते, त्याच चाकांचे बाक काढून[br]जे गेल्या अडीच 0:02:15.000,0:02:18.000 वर्षांपासून होते, आणि माझी दुचाकी अगदी[br]नवी असल्यासारखी झाली. 0:02:18.000,0:02:20.000 म्हणून मी आपणा सर्वांना आवाहन करते. 0:02:20.000,0:02:22.000 तुम्ही तुमची चाकं समतोल करावीत[br]असं मला 0:02:22.000,0:02:25.000 वाटतं: तुम्हाला ऐकाव्याश्या वाटणार्या[br]स्तुतीबाबत प्रामाणिक रहा 0:02:25.000,0:02:27.000 तुम्हाला काय ऐकावासं वाटतं?[br]घरी पत्नीकडे जा 0:02:27.000,0:02:29.000 तिला विचारा, तिला काय हवं आहे? 0:02:29.000,0:02:31.000 पतीला विचारा -- त्याला काय हवं आहे? 0:02:31.000,0:02:34.000 घरी जाऊन ते प्रश्न विचारा व[br]तुमच्या आजूबाजूच्या लोकांना मदत करा 0:02:34.000,0:02:35.000 आणि ते सोपं आहे. 0:02:35.000,0:02:37.000 आणि आपण याची दखल का घ्यावी? 0:02:37.000,0:02:38.000 आपण जगाच्या 0:02:38.000,0:02:41.000 शांतीबद्दल बोलतो. विविध संस्कृती, विविध[br]भाषा असताना जगात शांतता 0:02:41.000,0:02:45.000 काशी असू शकते? मला वाटतं एकाच छताखाली[br]वावरणार्या कुटुंबापासून तिची सुरुवात होते 0:02:45.000,0:02:47.000 मग, आपल्या परसात आधी तिला नांदवू या. 0:02:47.000,0:02:49.000 आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे मला आभार 0:02:49.000,0:02:51.000 मानायचे आहेत, उत्तम पती, उत्तम माता,[br]मित्र, 0:02:51.000,0:02:53.000 मुली, मुलं असल्याबद्दल. 0:02:53.000,0:02:54.000 आणि कदाचित तुम्हाला 0:02:54.000,0:02:56.000 कुणीच कधी म्हणलं नसेल, पण तुम्ही[br]तुमच्या 0:02:56.000,0:02:59.000 जागी खरच उत्तम आहात, आणि इथे[br]असल्याबद्दल, उपस्थितीबद्दल आणि 0:02:59.000,0:03:02.000 तुमच्या कल्पनांनी जग बदलण्याबद्दल[br]आभारी आहे. 0:03:02.000,0:03:04.000 धन्यवाद. 0:03:04.000,0:03:11.000 (टाळ्या)