Return to Video

चीनी राशीचक्र समजून घेताना

  • 0:01 - 0:04
    तुमच्या चिनी मित्राने
    कधी तुम्हाला विचारले,
  • 0:04 - 0:05
    "तुमची रास कोणती?"
  • 0:06 - 0:08
    असं समजू नका कि ते हे सहज विचारताहेत
  • 0:08 - 0:10
    तुम्ही जर म्हणालात "माझी रास माकड आहे."
  • 0:10 - 0:12
    तर त्यांना लगेच कळतं
  • 0:12 - 0:15
    तुमचं वय २४, ३६, ४८ किंवा ६० वर्षं आहे
  • 0:15 - 0:16
    (हशा)
  • 0:16 - 0:20
    रास विचारणं म्हणजे विनम्रपणे वय विचारणे
  • 0:21 - 0:25
    राशीनुसार तुमचं मूल्यांकन केलं जातं
  • 0:25 - 0:29
    तुमच्या सुदैव आणि दुर्दैवाबद्दल,
  • 0:29 - 0:31
    तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल,
    कारकिर्दीबद्दल
  • 0:31 - 0:33
    ते वर्ष कसे जाईल
    अंदाज सांगतात
  • 0:33 - 0:36
    तुमच्या आणि तुमच्या साथीदाराच्या राशीवरून
  • 0:36 - 0:40
    ते तुमच्या वैयक्तिक आयुष्याचे
    चित्र मनात रंगवू शकतात.
  • 0:41 - 0:43
    कदाचित चिनी राशीचक्रावर
    तुमचा विश्वास नसेल
  • 0:43 - 0:47
    जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या
    ज्याने प्रभावित आहे
  • 0:47 - 0:50
    त्यावर विश्वास ठेवणं सयुक्तिक ठरेल.
  • 0:50 - 0:53
    चिनी राशीचक्र नक्की आहे तरी काय?
  • 0:54 - 0:57
    बहुतांश पाश्चिमात्य लोक
    ग्रीक रोमन राशीचक्र मानतात
  • 0:57 - 0:59
    ज्याच्यात राशीचिन्हं १२ महिन्यांत
    विभागलेली आहेत.
  • 1:00 - 1:02
    चिनी राशीचक्र वेगळं आहे.
  • 1:02 - 1:05
    यात १२ वर्षांच्या चक्राला
    प्राण्यांची नावं दिलेली असतात
  • 1:05 - 1:08
    ज्याची सुरुवात उंदीर
    आणि शेवट डुक्कर या चिन्हाने होतो
  • 1:08 - 1:11
    आणि ग्रह तारकांशी याचा काही संबंध नसतो
  • 1:12 - 1:17
    उदाहरणार्थ तुमचा जन्म जर १९७५ चा असेल
    तर तुमचं राशीचिन्ह ससा असेल
  • 1:17 - 1:19
    तुम्हाला तुमचं राशीचिन्ह तिथे दिसतंय का?
  • 1:20 - 1:25
    आमच्या चिनी पूर्वजांनी अत्यंत जटिल
    सैद्धांतिक संरचना उभी केली आहे.
  • 1:25 - 1:30
    जिचे मूळ सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती,
    पाच मूलतत्व आणि १२प्राणी राशीत आहे
  • 1:30 - 1:32
    हजारो वर्षांपासून,
  • 1:32 - 1:37
    या प्रचलित संस्कृतीचा परिणाम लोकांच्या
    महत्वाच्या निर्णयांवर झालेला आहे
  • 1:37 - 1:42
    बारसं, लग्न, मूल जन्माला घालणं इतरांशी
    वागणूक यांसारखे निर्णय घेतले जातात.
  • 1:42 - 1:45
    आणि याचे काही परिणाम
    अत्यंत आश्चर्यकारक आहेत.
  • 1:46 - 1:51
    काही प्राणी इतर प्राण्यांपेक्षा सरस असतात
    असं चिनी लोक मानतात.
  • 1:51 - 1:56
    म्हणून मग पालक ठराविक
    वर्षीच मुलं जन्माला घालतात,
  • 1:56 - 2:01
    त्यांचा विश्वास असतो योग्य संयोजनाच्या
    प्राण्यांच्या सांघिक प्रयत्नांनीच
  • 2:01 - 2:03
    कुटुंबांची भरभराट होऊ शकते.
  • 2:04 - 2:08
    प्रेम करण्यासाठी आम्ही राशीचक्र पाहतो.
    माझं राशीचिन्ह डुक्कर आहे
  • 2:09 - 2:14
    माझं प्रेम वाघ, बकरी ,ससा
    हे राशीचिन्हांच्या लोकांशी जुळु शकतं
  • 2:15 - 2:19
    काही प्राणी नैसर्गिक शत्रू असतात असं
    चिनी लोक मानतात.डुक्कर राशीचिन्हामुळे
  • 2:20 - 2:23
    मला साप चिन्हाच्या लोकांपासून
    जपलं पाहिजे
  • 2:23 - 2:25
    ज्यांचं चिन्ह साप आहे
    त्यांनी कृपया हात वर करा
  • 2:26 - 2:27
    आपण नंतर बोलू या.
  • 2:27 - 2:29
    (हशा)
  • 2:29 - 2:32
    काही प्राणी इतरांपेक्षा अधिक नशीबवान
  • 2:32 - 2:34
    असतात असं आम्ही मानतो उदा. ड्रॅगन.
  • 2:34 - 2:36
    पाश्चिमात्य परंपरेच्या विरुद्ध
  • 2:36 - 2:40
    चिनी ड्रॅगन हे सामर्थ्य, ताकद
    आणि संपत्तीचं प्रतिक असतं.
  • 2:40 - 2:43
    ड्रॅगन चिन्ह असलेलं मूल असावं
    असं प्रत्येकाचं स्वप्न असतं.
  • 2:43 - 2:46
    जॅक माच्या पालकांना नक्कीच अभिमान असणार
  • 2:46 - 2:48
    आणि तसं वाटणारे ते एकमेव नाहीत
  • 2:48 - 2:51
    २०१२ साली, ड्रॅगन चिन्हाच्या वर्षी
  • 2:51 - 2:53
    चीन, हाँग काँग आणि तैवानचा जन्मदर
  • 2:53 - 2:55
    पाच टक्क्यांनी वाढला.
  • 2:56 - 2:59
    म्हणजे आणखी १० लाख बाळं.
  • 3:00 - 3:03
    मुलगा होण्याला प्राधान्य असल्याने
  • 3:03 - 3:08
    त्यावर्षी मुलगा - मुलगी
    हे प्रमाण १२०:१०० इतके होते
  • 3:08 - 3:10
    जेव्हा ड्रॅगन चिन्ह असलेली
    ती मुलं मोठी होतील,
  • 3:10 - 3:15
    तेव्हा प्रेमाच्या व नोकरीच्या बाजारात
    प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
  • 3:16 - 3:20
    BBC आणि चीन सरकारच्या वृत्तानुसार
  • 3:20 - 3:25
    जानेवारी २०१५ मध्ये सर्वात जास्त
    सिझेरिअन ऑपरेशन्स झाली
  • 3:25 - 3:26
    का?
  • 3:27 - 3:30
    कारण घोडा हे चिन्ह असलेल्या
    वर्षाचा तो शेवटचा महिना होता
  • 3:30 - 3:33
    त्यांना घोडा चिन्ह प्रिय आहे
    म्हणून नव्हे तर
  • 3:33 - 3:36
    केवळ बकरी हे कमनशिबी चिन्ह
    असलेली मुलं होऊ नयेत म्हणून.
  • 3:36 - 3:37
    (हशा)
  • 3:37 - 3:40
    तुमचं चिन्ह बकरी असेल तर
    कृपया वाईट वाटून घेऊ नका.
  • 3:40 - 3:42
    बकरी हे चिन्ह असलेली ती मुलं आहेत.
  • 3:42 - 3:44
    ती मला पराभूत झालेली भासत नाहीत.
  • 3:44 - 3:45
    (हशा)
  • 3:45 - 3:48
    वाघ हा आणखी एक नको असलेला प्राणी आहे
  • 3:48 - 3:50
    कारण त्याचा स्वभाव अस्थिर असतो
  • 3:50 - 3:54
    या काही वर्षी अनेक चिनी प्रांतांत जन्मदर
  • 3:54 - 3:55
    अचानक घटलेला आढळला
  • 3:56 - 4:00
    कदाचित राशीचक्र जर उलट्या क्रमाने मानलं
  • 4:00 - 4:04
    वाघ आणि बकरी हे हि चिन्हं असलेल्या
    मुलांना कमी स्पर्धेला तोंड द्यावं लागेल.
  • 4:04 - 4:06
    कदाचित ते नशीबवान आहेत.
  • 4:08 - 4:13
    फोर्ब्सची जगातल्या पहिल्या ३००
    अतिश्रीमंत लोकांची मी यादी बघितली
  • 4:13 - 4:15
    आणि गंमत अशी कि
  • 4:15 - 4:18
    अत्यंत नावडती दोन चिन्हं, बकरी आणि वाघ,
  • 4:18 - 4:20
    यादीच्या अग्रक्रमी आहेत,
  • 4:21 - 4:22
    अगदी ड्रॅगनच्याही वर.
  • 4:22 - 4:24
    म्हणून आपण याचा विचार करायला हवा,
  • 4:24 - 4:28
    कदाचित कमी स्पर्धा असणं अधिक चांगलं ठरेल.
  • 4:28 - 4:30
    एक शेवटचा पण मजेशीर मुद्दा:
  • 4:30 - 4:33
    अनेक चिनी लोकं
    त्यांच्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय
  • 4:33 - 4:36
    राशिचक्राच्या निर्देशांकावरून करतात.
  • 4:37 - 4:40
    जरी राशीचिन्हांवर विश्वास
    आणि वापरण्याची पद्धती
  • 4:40 - 4:42
    हजारो वर्षांपासून असली
  • 4:43 - 4:46
    तरी ते वापरून महत्वाचे निर्णय घेण्याकडे कल
  • 4:46 - 4:50
    गेल्या काही दशकांपासूनचाच आहे.
  • 4:50 - 4:54
    आमचे पूर्वज गरिबी, दुष्काळ, दंगे ,
    रोगराई आणि नागरी युद्धाच्या
  • 4:54 - 4:58
    परिस्थितीशी झुंजण्यात मग्न होते.
  • 4:58 - 5:04
    आणि आता चिनी लोकांकडे वेळ,
    संपत्ती आणि तंत्रज्ञान आहे
  • 5:04 - 5:07
    जे वापरून ते नेहमी हवं असलेलं एक आदर्श
    जीवन निर्माण करू शकतात
  • 5:08 - 5:11
    १३० कोटी लोकांच्या एकत्रित निर्णयाने
  • 5:11 - 5:16
    आर्थिक उलाढाल झाली आणि
    प्रत्येक गोष्टीची मागणी वाढली,
  • 5:16 - 5:20
    आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून ते मालमत्ता
    आणि रोजच्या वापरातल्या वस्तूंपर्यंत.
  • 5:21 - 5:26
    जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकारणातल्या
    चीनच्या महत्वाच्या भूमिकेमुळे
  • 5:26 - 5:30
    राशीचक्र आणि चिनी संस्कृतीच्या
    आधारे घेतलेले निर्णय
  • 5:30 - 5:34
    जगातल्या प्रत्येकावर परिणाम करतात.
  • 5:35 - 5:37
    इथे कोणी माकड चिन्ह
    असलेलं आहे का?
  • 5:38 - 5:41
    २०१६ हे वर्ष माकड या चिन्हाचं आहे.
  • 5:41 - 5:47
    माकडं हि हुशार, उत्सुक, सर्जनशील
    आणि खट्याळ असतात.
  • 5:47 - 5:48
    धन्यवाद.
  • 5:48 - 5:51
    (टाळ्या)
Title:
चीनी राशीचक्र समजून घेताना
Speaker:
शाओलॅन स्यूह
Description:

जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या चिनी राशीचक्राला मानते. शाओलॅन स्यूह या तंत्रज्ञ आणि उद्योजिकेच्या म्हणण्यानुसार जरी तुमचा त्यावर विश्वास नसला तरी ते कसं असतं हे जाणून घेण्यात तुम्हाला आनंद वाटेल. या मजेशीर आणि माहितगार भाषणात शाओलॅन ही पौराणिक संस्कृती समजून घेण्याच्या काही गोष्टी सांगते आहे आणि याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर, कारकिर्दीवर, लग्न जुळण्यावर आणि एखादं वर्ष कसं जाईल या गोष्टींवर कसा होतो याचं वर्णन करते आहे. तुमचं राशीचिन्ह तुमच्याबद्दल काय सांगतं?

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
06:04

Marathi subtitles

Revisions