Return to Video

ISISसारख्या संघटनांचे प्रभुत्व मिळवायचे विचित्र मार्ग

  • 0:01 - 0:02
    मी मागील दशकापासून,
  • 0:02 - 0:05
    गैर राजकीय शस्त्रधारी संघटनांचा
    अभ्यास करत आली आहे.
  • 0:05 - 0:09
    सशस्त्र संघटना जसे आतंकवादी,
    विद्रोही किंवा नागरिक सेना
  • 0:10 - 0:13
    मी माहिती तयार करते या संघटना
    गोळीबारी सोडून काय करतात याची.
  • 0:13 - 0:16
    माझा उद्देश ह्या हिंसक गटाला
    चांगल्या प्रकारे समजावून घेणे आहे.
  • 0:16 - 0:20
    आणि हिंसक संग्रामांना अहिंसात्मक
    विरोधात परिवर्तन करण्याचा.
  • 0:20 - 0:22
    मार्ग शोधायचा आहे.
  • 0:22 - 0:25
    मी काम करीत होती , नीती निर्धारण
    आणि ग्रंथालय यात .
  • 0:26 - 0:31
    गैर राजकीय संघटनांना समजावून घेणे
    हा संघर्ष कमी करण्याचा खरा मार्ग आहे.
  • 0:31 - 0:32
    परंतु लढाई बदलली आहे.
  • 0:32 - 0:35
    हे राष्ट्रामधील प्रतियोगिता होत असे.
  • 0:36 - 0:37
    आता नाही.
  • 0:37 - 0:41
    आता हे राष्ट्र आणि गैर राजकीय कर्त्यांच्या
    मधल्या असहमती मुळे आहे.
  • 0:41 - 0:45
    उदाहरणा्र्थ सन १९७५ ते २०११ पर्यंत
  • 0:45 - 0:48
    ज्या २१६ शांती समझोत्यांवर
    स्वाक्षऱ्या झाल्या.
  • 0:48 - 0:54
    त्यात १९६ एक राष्ट्र आणि गैर राजकीय
    कर्त्यांच्या मधील होत्या.
  • 0:54 - 0:57
    तर आपण या संघटनांना समजून घेतले पाहिजे;
    कुठल्याही सफल शांती संधीसाठी,
  • 0:57 - 1:02
    आपल्याला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल
    किंवा त्यांना हरवावे लागेल.
  • 1:02 - 1:03
    पण आपण हे कसे करू शकतो?
  • 1:04 - 1:07
    हे समजून घ्यावे लागेल
    या संघटना इतक्या लोकप्रिय का आहेत?.
  • 1:07 - 1:10
    आपणास खूप जाणतो ते का लढतात
    कोणत्या कारणासाठी लढतात ..
  • 1:10 - 1:13
    पण हे नाही बघत कि ते जेंव्हा
    लढाई करत नाहीत तेंव्हा काय करतात.
  • 1:13 - 1:17
    तरी पण , सशस्त्र संघर्ष आणि
    निःशस्त्र राजनीती जोडलेली आहे.
  • 1:17 - 1:19
    हे सगळे एकाच संघटनेचे अंग आहेत.
  • 1:19 - 1:22
    ह्या संघटनांना हरवायचे तर दूरच,
    यांना समजून पण नाही घेऊ शकत.
  • 1:22 - 1:24
    जोपर्यंत आपल्याकडे पूर्ण माहिती नाही
  • 1:25 - 1:28
    आजवरच्या सशस्त्र संघटना
    खूप गुंतागुंतीच्या आहेत.
  • 1:28 - 1:30
    लेबनानच्या हिजबुल्लाचे उदाहरणच बघा,
  • 1:30 - 1:33
    जे इस्राईल विरुद्ध हिंसक
    झड्पांसाठी कुप्रसिद्ध आहेत
  • 1:33 - 1:36
    पण सन १९८० मध्ये आपल्या संघटने बरोबर
  • 1:36 - 1:38
    हिजबुल्लानी आपल्या राजनीतिक
    दलाचे पण संघटना बनवली
  • 1:38 - 1:42
    एक समाजसेवी प्रणाली आणि
    एक सामरिक यंत्र.
  • 1:42 - 1:44
    अशाच प्रकारे,पैलेस्टीनी हमास,
  • 1:44 - 1:47
    जे इस्राईल विरुद्ध आत्मघाती हमल्यासाठी
    ओळखले जातात.
  • 1:47 - 1:50
    ते २००७ पासून गाझापट्टी वर शासन करतात.
  • 1:50 - 1:53
    या संघटना गोळ्रीबारी शिवाय
    बरेच काही करतात.
  • 1:53 - 1:55
    ते बरेच कार्य करतात.
  • 1:55 - 1:58
    ते जटिल संचार यंत्रणा स्थापन करतात.
  • 1:58 - 2:00
    जसे कि रेडियो, टीवी चैनेल,
  • 2:00 - 2:03
    इंटरनेट आणि सोशल मिडिया रणनीती.
  • 2:03 - 2:06
    आणि इथे आहे ISIS मासिक
  • 2:06 - 2:09
    इंग्रजी मध्ये छापलेली आणि
    भरतीसाठी प्रकाशित केलेली
  • 2:09 - 2:12
    सशस्त्र संघटना धन साठवण्यात पण निवेश करतात
  • 2:12 - 2:16
    लुटमारीनी नाही, तर लाभदायक व्यवसायातून
  • 2:16 - 2:18
    जसे कि कंस्ट्रक्शन कंपनी
  • 2:18 - 2:20
    आता, ह्या महत्वाच्या घडामोडी आहेत.
  • 2:20 - 2:23
    ते संघटनांना त्यांचे बळ
    वाढवण्यात मदत करतात
  • 2:23 - 2:24
    पैसा जमा करतात.
  • 2:24 - 2:27
    चांगल्या सैनिकी भरतीसाठी
    आणि दर्जा बनविण्यासाठी .
  • 2:28 - 2:29
    सशस्त्र संघटनापण काही वेगळे करते:
  • 2:29 - 2:32
    त्यांच्या लोकां बरोबर ते
    घनिष्ठ संबंध तयार करतात
  • 2:32 - 2:34
    समाजसेवेत निवेशाचा हातभार लावून.
  • 2:34 - 2:37
    ते शाळा बांधतात, दवाखाने चालवतात,
  • 2:37 - 2:41
    ते व्होकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम चालवतात
    किंवा मायक्रो लोन प्रोग्राम,
  • 2:41 - 2:45
    हिजबुल्ला ह्या सगळ्या सेवा सुविधा
    आणि अधिक काही पुरवतात.
  • 2:45 - 2:48
    सशस्त्र संघटना पण लोकांची मने जिंकतात
  • 2:48 - 2:52
    त्यांना जे राज्य देऊ शकत नाही ते देऊन:
  • 2:52 - 2:54
    सुरक्षा आणि सलामती.
  • 2:54 - 2:58
    युद्ध ग्रस्त अफगाणिस्तानात तालिबानच्या
    प्रारंभिक उत्कर्षात
  • 2:58 - 3:01
    किंवा ISIS च्या उद्याच्या सुरुवातीस
  • 3:01 - 3:04
    समजून घेऊ शकतो ह्या संघटनांचा प्रवास बघून
  • 3:04 - 3:06
    जो कि सुरक्षा देण्यासाठी होता.
  • 3:06 - 3:09
    पण दुर्भाग्यानी ह्या क्षेत्रांमध्ये
  • 3:09 - 3:12
    जनतेच्या सुरक्षिततेच्या नावाखाली
  • 3:12 - 3:13
    खूप मोठी किमत मोजावी लागते.
  • 3:13 - 3:18
    सामान्यतः जन सेवेसाठी सरकार कडून
    सोडली गेलेली रिक्त जागा भरते
  • 3:18 - 3:20
    कामकाजाची त्रुटी सरकार कडून सोडली जाते,
  • 3:20 - 3:22
    आणि ह्या संघटनांना त्यांचे सामर्थ्य-शक्ती
  • 3:23 - 3:24
    वाढवण्यास खत-पाणी मिळते.
  • 3:24 - 3:28
    उदाहरणार्थ , २००६ मधील
    पैलेस्टीनी हमास यांचा विजय
  • 3:28 - 3:32
    त्यांचे सामाजिक कार्य दुर्लक्षित केल असता
    समजून घेता आला नसता.
  • 3:33 - 3:35
    आता, हे खरच कठीण चित्र आहे,
  • 3:35 - 3:38
    होय पश्चिमेस,
    जेंव्हा आपण सशस्त्र संघटनांकडे बघतो,
  • 3:38 - 3:40
    आपण फक्त हिंसक बाजूचाच विचार करतो.
  • 3:40 - 3:43
    परंतु ह्या संघटनांना समजण्यासाठी सामर्थ्य
  • 3:43 - 3:45
    रणनीती, दूरदर्शीपणा पुरेसे नाही
  • 3:45 - 3:47
    ह्या संघटना बहु आयामी आहेत.
  • 3:47 - 3:50
    ते वाढतात कारण सरकारकडून
    सुटलेल्या त्रुटी ते भरून काढतात.
  • 3:50 - 3:54
    आणि ते सशस्त्र व राजनैतिक
    रुपात उदयास येतात
  • 3:54 - 3:57
    हिंसक संघर्ष करतात आणि शासन करतात.
  • 3:57 - 4:01
    ह्या संघटना जितक्या पेचीच्या
    आणि परिष्कृत होत जातील
  • 4:01 - 4:05
    आपल्यासाठी तेवढेच अवघड असेल
    त्यांना विरोधी राष्ट्र समजायला.
  • 4:05 - 4:07
    आता आपण हिजबुल्ला सारख्या संघटनांना
    काय म्हणताल?
  • 4:07 - 4:10
    ते एका राज्यक्षेत्राचे शासन करतात,
    सर्व प्रशासनिक कार्य करतात.
  • 4:10 - 4:14
    ते कचरा उचलतात,
    मलप्रवाह पद्धती चालवतात.
  • 4:14 - 4:16
    काय हेच सरकार आहे?
    का विद्रोही संघटना आहे?
  • 4:17 - 4:20
    का काही आजू नच काहीतरी,
    काही भिन्न आणि नवीन?
  • 4:20 - 4:22
    आणि ISIS बद्दल काय म्हणता येईल ?
  • 4:22 - 4:23
    यांच्यातील अंतर गोंधळ आहे.
  • 4:23 - 4:27
    आपण ज्या जगात राहतो ते राष्ट्र,
    गैर राजकीय कर्त्यांच्या मधोमध आहे,
  • 4:27 - 4:30
    आणि राष्ट्र जितके दुर्बल असतील,
    जसे कि मध्य पूर्वीय राष्ट्रांमध्ये आजकाल
  • 4:30 - 4:34
    तेवढेच गैर राजकीय संघटना त्या कमी
    पूर्ण करण्यासाठी उभेला राहतील.
  • 4:34 - 4:37
    हे सरकारसाठी महत्वपूर्ण आहे,
    कारण ह्या संघटनांशी लढायला
  • 4:37 - 4:40
    त्यांना गैर सैनिकी यंत्रांमध्ये
    गुंतवणूक करावी लागेल.
  • 4:41 - 4:43
    शासनाच्या त्रुटीमध्ये सुधारणा
  • 4:43 - 4:46
    कोणत्यापण दीर्घकालीन रणनीतीचा
    केंद्रबिंदू असायला पाहिजे.
  • 4:46 - 4:50
    हे अत्यंत महत्वपूर्ण आहे, शांती संधी
    आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी.
  • 4:50 - 4:52
    आपण जितके सशस्त्र संघटनांना बळकट समजू
  • 4:52 - 4:54
    तेवढेच चांगल्या प्रकारे त्यांना
  • 4:54 - 4:58
    हिंसाकडून अहिन्सेकडे कसे आणू शकतो यासाठी
    प्रोत्साहित करता येईल.
  • 4:58 - 5:02
    तर राष्ट्रीय आणि गैर राजकीय संघटनांमध्ये
    ह्या नवीन लढाई मध्ये
  • 5:02 - 5:05
    सैनिकी क्षमतेमुळे काही युद्धे जिंकता येतील
  • 5:05 - 5:08
    पण ते आपणास शांती आणि
    स्थिरता नाही देऊ शकणार
  • 5:08 - 5:10
    हे लक्ष गाठण्यासाठी
  • 5:10 - 5:15
    आपणास दीर्घकालीन गुंतवणूक करावी लागेल
    सुरक्षेतील कमजोरी भरावी लागेल,
  • 5:15 - 5:17
    शासनाच्या त्रुटी भरण्यासाठी
  • 5:17 - 5:20
    ज्यामुळे ह्या संघटनांना
    उभा राहायची संधी मिळाली.
  • 5:20 - 5:21
    धन्यवाद.
  • 5:21 - 5:25
    (टाळ्या)
Title:
ISISसारख्या संघटनांचे प्रभुत्व मिळवायचे विचित्र मार्ग
Speaker:
बेनेदेत्ता बर्टी
Description:

ISIS, हिजबुल्ला, हमास हे तीन विविध गट आपल्या हिंसाचारासाठी ओळखले जातात. राजनीतिक विश्लेषक बेनेदेत्ता बर्टी के अनुसार "पण हा फक्त एक अंशच भाग आहे कि ते जे करतात. ते आपल्या समाज सेवेतून जनमत जिंकण्याचा पण प्रयास करतात. शाळा, दवाखान्यांची स्थापना करून, सुरक्षा आणि सलामती प्रदान करतात आणि सरकारद्वारा सुटलेल्या त्रुटी पूर्ण करतात. ह्या संघटनांची समस्त कार्य समजून घेऊन हिंसाचार बंद करण्यासाठी नवीन रणनीतीचा प्रस्ताव मांडते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
05:38

Marathi subtitles

Revisions