Return to Video

चांगल्या कामाचं सुखी गुपीत

  • 0:00 - 0:04
    मी जेव्हा सात वर्षांचा होतो आणि
    माझी बहिण केवळ पाच वर्षांची होती,
  • 0:04 - 0:06
    तेव्हा आम्ही एका दुहेरी
    पलंगावर खेळत होतो.
  • 0:06 - 0:09
    त्यावेळेस मी माझ्या बहिणीपेक्षा
    दोन वर्षांनी मोठा होतो --
  • 0:09 - 0:11
    म्हणजे मी आताही
    दोन वर्षांनी मोठा आहे --
  • 0:11 - 0:15
    पण त्यावेळेस म्हणजे मी जे सांगेन
    ते करणं तिला भाग होतं,
  • 0:15 - 0:16
    आणि मला युद्ध खेळायचं होतं.
  • 0:16 - 0:18
    आम्ही पलंगांवरील वरच्या भागात होतो.
  • 0:18 - 0:20
    पलंगाच्या एका बाजूला,
  • 0:20 - 0:23
    मी माझे सगळे लुटुपुटू सैनिक
    आणि शस्त्र ठेवले होते.
  • 0:23 - 0:26
    आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीचे
    सगळे ल्हक़्न्गे घोडे होते
  • 0:26 - 0:27
    आक्रमणाच्या तयारीत होते ..
  • 0:27 - 0:31
    त्या दुपारी काय घडलं याबद्दल
    वेगवेगळ्या कथा आहेत.
  • 0:31 - 0:33
    पण माझी बहीण आज येथे नसल्याने,
  • 0:33 - 0:35
    मी तुम्हाला खरं काय ते सांगतो --
  • 0:35 - 0:36
    (हशा)
  • 0:36 - 0:38
    जे माझ्या बहिणीबद्दल आहे
    आणि थोड गंमतशीर आहे.
  • 0:38 - 0:41
    कसंतरी, तिच्या मोठ्या भावाच्या
    मदतीविना आणि धक्क्याविना,
  • 0:42 - 0:44
    एमी बंक पलंगावरून गायब झाली
  • 0:44 - 0:46
    आणि जमिनीवर कोसळली.
  • 0:46 - 0:48
    मी चिंतेने पलंगाच्या बाजुवरून पाहिलं
  • 0:48 - 0:50
    खाली पडलेल्या माझ्या बहिणीचं काय झालं ते
  • 0:50 - 0:53
    आणि असं दिसलं कि ती तिच्या हात व
    गुडघ्यांवर जोरात आपटली होती
  • 0:53 - 0:54
    चतुष्पादासारखी.
  • 0:54 - 0:57
    मी बावरलो कारण माझ्या
    पालकांनी जबाबदारी दिली होती.
  • 0:57 - 0:59
    खातरजमा करण्याची कि माझी बहिण आणि मी
  • 0:59 - 1:01
    शक्य तितक्या शांतपणे आणि सुरक्षितपणे खेळू.
  • 1:01 - 1:05
    आणि मी एमीचा हात अपघाताने कसा
    मोडला होता हे पाहता
  • 1:05 - 1:06
    एक आठवड्यापूर्वीच --
  • 1:06 - 1:08
    (हशा)
  • 1:10 - 1:11
    (हशा संपला)
  • 1:11 - 1:16
    शूरवीरासारखं एका काल्पनिक बंदुकीच्या
    गोळीच्या मार्गातून तिला बाजूला सारत,
  • 1:16 - 1:18
    (हशा)
  • 1:18 - 1:22
    ज्यासाठी माझे आभार अजून मानायचे आहेत,
    मी शक्य तितके प्रयत्न करत होतो --
  • 1:22 - 1:24
    तिला ती येताना दिसलीदेखील नव्हती
  • 1:24 - 1:26
    मी खूप प्रयत्न करत होतो चांगलं वागण्याचा.
  • 1:26 - 1:27
    आणि मला
    बहिणीचा चेहरा दिसला,
  • 1:27 - 1:30
    वेदना आणि यातना आणि आश्चर्याचा आकांत
  • 1:30 - 1:32
    तिच्या तोंडून उसळणार होता आणि
    माझ्या पालकांना उठवणार होता
  • 1:32 - 1:35
    ते घेत असलेल्या थंडीतल्या
    निवांत वामकुक्षीतून.
  • 1:35 - 1:36
    मग मी एकच गोष्ट
    केली जिचा
  • 1:36 - 1:40
    विचार माझा सात वर्षीय घाबरलेला
    मेंदू करू शकत होता दुर्घटना टाळण्यासाठी.
  • 1:40 - 1:42
    तुमच्याकडे मुलं असतील तर
    तुम्ही हे शेकडो वेळा पाहिलं असेल.
  • 1:42 - 1:45
    मी म्हणालो "एमी, थांब. रडू नकोस.
    बघितलंस तु कशी पडलीयेस?
  • 1:45 - 1:47
    कुठलाही मानव असा चतुष्पादासारखा पडत नाही.
  • 1:49 - 1:51
    एमी, मला वाटतं याचा अर्थ
    तु युनिकॉर्न आहेस."
  • 1:51 - 1:54
    (हशा)
  • 1:54 - 1:56
    आता, ती फसवणूक होती,
  • 1:56 - 1:58
    कारण तिला अजून काहीही नको होतं
  • 1:58 - 2:00
    एमी एक पाच वर्षाची दुखावलेली
    छोटी बहीण नव्हे तर
  • 2:00 - 2:02
    एमी एक विशेष युनिकॉर्न.
  • 2:02 - 2:04
    अर्थात हा विकल्प तिच्या मेंदूसाठी
  • 2:04 - 2:05
    पूर्वी कधी उपलब्ध
    नव्हता.
  • 2:05 - 2:08
    हे दिसत होतं कि कशी माझी भोळी
    फसलेली बहीण मतभेदाला सामोरं जात होती
  • 2:08 - 2:11
    तिचा छोटासा मेंदू विचारमंथन करत होता
  • 2:11 - 2:14
    वेदना व यातनांचं आणि तिने नुकतंच
    अनुभवलेल्या आश्चर्याचं
  • 2:14 - 2:17
    किंवा स्वतःची युनिकॉर्न अशा नवीन
    ओळखीचं चिंतन करत होता
  • 2:17 - 2:18
    आणि दुसरी गोष्ट जिंकली.
  • 2:18 - 2:20
    रडण्याऐवजी किंवा खेळ थांबवण्याऐवजी,
  • 2:20 - 2:21
    आईवडिलांना उठवण्याऐवजी,
  • 2:21 - 2:23
    ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले असते
  • 2:23 - 2:25
    तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं
  • 2:25 - 2:27
    आणि ती पलंगावर पुन्हा चढून बसली
  • 2:27 - 2:29
    मारक्या बैलाच्या तोऱ्यात
  • 2:29 - 2:32
    (हशा)
  • 2:32 - 2:33
    एक मोडलेला पाय घेऊन
  • 2:33 - 2:35
    आम्ही जे धडपडलो
  • 2:35 - 2:37
    वयवर्षं पाच आणि सात या कोवळ्या वयात --
  • 2:37 - 2:38
    त्याची आम्हाला कल्पना नव्हती --
  • 2:38 - 2:42
    कि ती गोष्ट एका शास्त्रीय
    उत्क्रांतीची प्रणेती ठरेल
  • 2:42 - 2:45
    जी आपल्या मानवी मेंदूकडे बघण्याच्या
    दृष्टिकोनाबाबत दोन दशकांनंतर घडेल
  • 2:45 - 2:48
    आम्ही धडपडलेल्या गोष्टीला सकारात्मक
    मानसशास्त्र म्हणतात
  • 2:48 - 2:50
    त्यामुळेच मी आज इथे आहे
  • 2:50 - 2:52
    आणि रोज सकाळी मला जाग
    येण्याचं ते कारण आहे.
  • 2:52 - 2:54
    जेव्हा या संशोधनाबद्दल मी बोलू लागलो
  • 2:54 - 2:56
    शैक्षणिक संस्थांबाहेर, कंपन्या
    आणि शाळांसोबत
  • 2:56 - 2:59
    पहिली कधीच न करण्याची गोष्ट त्यांनी
    सांगितली ती आलेखाने सुरुवात
  • 2:59 - 3:02
    पहिली गोष्ट जी मला करायची असते
    ती आलेखाने सुरुवात
  • 3:02 - 3:03
    हा आलेख कंटाळवाणा दिसतो,
  • 3:03 - 3:06
    पण मी उत्साहित होऊन रोज सकाळी
    उठण्याला तोच कारणीभूत आहे
  • 3:06 - 3:09
    आणि हा आलेख खरंतर अर्थशून्य आहे;
    ती खोटी माहिती आहे
  • 3:09 - 3:10
    आम्हाला हे आढळलं --
  • 3:10 - 3:13
    (हशा)
  • 3:13 - 3:16
    जर तुम्ही हि माहिती अभ्यासू लागलात
    तर मी उत्तेजीत होईन
  • 3:16 - 3:18
    कारण त्याचा एक कल आहे,
  • 3:18 - 3:20
    आणि त्याचाच अर्थ मी तो प्रकाशीत करू शकतो
  • 3:20 - 3:22
    त्यालाच तर खरा अर्थ आहे.
  • 3:22 - 3:24
    वक्ररेषेच्या वर एक विचित्र
    लाल ठिपका आहे
  • 3:24 - 3:27
    सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे --
  • 3:27 - 3:30
    मला माहितीये तु कोण आहेस,
    मी आधी तुला पाहिलं आहे --
  • 3:30 - 3:31
    तो प्रश्न नाही.
  • 3:31 - 3:35
    तुमच्यातील बऱ्याचजणांना माहितीये तो प्रश्न
    नाही कारण मी तो ठिपका पुसून टाकू शकतो
  • 3:35 - 3:38
    मी तो ठिपका पुसून टाकू शकतो कारण
    ती मोजमापातील चूक आहे
  • 3:38 - 3:41
    आणि आपण जाणतो ती मोजमापातील चूक
    आहे कारण माझी माहिती त्यामुळे चुकतीये
  • 3:42 - 3:43
    (हशा)
  • 3:43 - 3:45
    म्हणून सर्वप्रथम आम्ही लोकांना हे शिकवतो
  • 3:45 - 3:48
    अर्थशास्त्रात, संख्याशास्त्रात, व्यवसायात
    आणि मानसशास्त्रात
  • 3:48 - 3:51
    कसं संख्याशास्त्रीय योग्य मार्गाने
    विचित्र गोष्टी बाजूला सारायच्या.
  • 3:51 - 3:54
    अयोग्य गोष्टी आपण कशा दूर करू
    शकतो ज्यामुळे सुयोग्य त्या मिळतील
  • 3:54 - 3:56
    हे खूप छान आहे जर मी
    शोधायचा प्रयत्न करत असेन
  • 3:56 - 3:59
    सरासरी एका व्यक्तीने Advil
    किती गोळ्या घ्याव्यात -- दोन
  • 3:59 - 4:02
    पण मला जर तुमची क्षमता जाणून घ्यायची असेल
  • 4:02 - 4:05
    किंवा आनंदासाठी, उत्पादनक्षमतेसाठी
    वा ऊर्जेसाठी वा सर्जनशीलतेसाठी
  • 4:05 - 4:08
    आपण शास्त्राच्या मदतीने सरासरीची
    पद्धत तयार करतो आहोत
  • 4:08 - 4:09
    मी जर असा प्रश्न विचारला
  • 4:09 - 4:12
    "वर्गात वाचायचं कसं हे एखादं मूल
    किती लवकर शिकू शकतं?"
  • 4:12 - 4:13
    शास्त्रज्ञ उत्तर असं बदलतात
  • 4:13 - 4:17
    "वर्गात वाचायचं कसं हे साधारण मूल
    किती लवकर शिकू शकतं?"
  • 4:17 - 4:19
    मग आपण पूर्ण वर्गाला सर्वसामान्यत्वाकडे
    झुकवतो
  • 4:19 - 4:20
    जर तुम्ही सरासरीपेक्षा कमी असाल
  • 4:20 - 4:22
    तर मानसशास्त्रज्ञ उत्तेजीत होतात
  • 4:22 - 4:25
    कारण त्याचा अर्थ तुम्ही निराश आहात
    किंवा आजारी आहात
  • 4:25 - 4:26
    किंवा बहुदा दोन्हीही
  • 4:26 - 4:28
    आम्ही दोन्हीची आशा करतो कारण
    आमचा व्यवसाय असा आहे
  • 4:28 - 4:31
    जर उपचार सत्रात तुम्ही एक समस्या
    घेऊन आलात तर जाताना
  • 4:31 - 4:33
    दहा समस्यांची जाणीव
    झाल्याची खात्री आम्ही करतो
  • 4:34 - 4:35
    जेणेकरून तुम्ही
    येत राहता
  • 4:35 - 4:37
    गरज पडल्यास आम्ही तुमच्या बालपणात डोकावू
  • 4:37 - 4:39
    पण अखेरीस आम्हाला तुम्हाला बरं करायचंय
  • 4:39 - 4:41
    पण बरं म्हणजे सर्वसाधारण असणं.
  • 4:41 - 4:44
    आणि सकारात्मक मानसशास्त्र मानतं कि
    आपण सामान्याचा अभ्यास केला
  • 4:44 - 4:46
    तर आपण सामान्यच राहू.
  • 4:46 - 4:49
    मग सकारात्मक अयोग्य गोष्टींना
    वगळायच्या ऐवजी
  • 4:49 - 4:52
    मी मुद्दाम अशासारख्या समूहात येतो
  • 4:52 - 4:53
    आणि विचारतो, का?
  • 4:53 - 4:55
    तुमच्यातील काही जण वरचढ का आहात
  • 4:55 - 4:57
    बुद्धीने, शारीरिक क्षमतेने, संगीतक्षेत्रात
  • 4:57 - 4:59
    सर्जनशीलतेत, ऊर्जास्तरात
  • 4:59 - 5:01
    आव्हानांना सामोरं जाण्यात, विनोद्बुद्धीत?
  • 5:01 - 5:05
    ते काहीही असो, तुम्हाला वगळण्याऐवजी,
    मला तुम्हाला समजून घ्यायचंय
  • 5:05 - 5:07
    कारण कदाचित आम्ही माहिती गोळा करू शकतो
  • 5:07 - 5:09
    केवळ लोकांना सरासरीपाशी कसं
    आणायचं याचीच नव्हे
  • 5:09 - 5:12
    तर जगभरातील कंपन्या आणि शाळांतील
    सरासरीची पातळीच कशी उंचावता येईल याचीही
  • 5:12 - 5:14
    हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा
    असण्याचं कारण
  • 5:14 - 5:17
    म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी
    माहिती सकारात्मक नसते
  • 5:17 - 5:18
    ती नकारात्मक असते
  • 5:18 - 5:22
    बहुतांशी ती खून, भ्रष्टाचार, रोगराई,
    नैसर्गिक आपत्तीबद्दल असते.
  • 5:22 - 5:24
    आणि तत्परतेने माझा मेंदू विचार
    करायला लागतो
  • 5:24 - 5:27
    जगातल्या नकारात्मकतेचं साकारात्मकतेशी
    असलेलं योग्य गुणोत्तर आहे
  • 5:27 - 5:29
    यामुळे "वैद्यकीय महाविद्यालयाचा आजार" होतो
  • 5:29 - 5:32
    वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात
  • 5:32 - 5:35
    जशी तुम्ही लक्षणं आणि आजारांची यादी वाचता
  • 5:35 - 5:37
    अचानक तुम्हाला जाणवतं कि
    तुम्हाला ते सगळं आहे.
  • 5:37 - 5:38
    (हशा)
  • 5:38 - 5:41
    माझा बोबो नावाचा मेहुणा आहे,
    जी एक वेगळीच कथा आहे
  • 5:41 - 5:43
    बोबोने युनिकॉर्न एमीशी
    लग्न केलं.
  • 5:43 - 5:45
    बोबोने मला फोन केला --
  • 5:45 - 5:47
    (हशा)
  • 5:47 - 5:49
    येल वैद्यकीय महाविद्यालयातून,
  • 5:49 - 5:51
    आणि बोबो म्हणाला "शॉन, मला कुष्ठरोग झालाय"
  • 5:51 - 5:53
    (हशा)
  • 5:53 - 5:56
    जे येलमध्येसुद्धा खूपच विरळ आहे
  • 5:56 - 5:58
    मला कळत नव्हतं बिचाऱ्या
    बोबोचं सांत्वन कसं करावं
  • 5:58 - 6:01
    कारण तो नुकताच आठवडाभराच्या
    रजोनिवृत्तीतून उठला होता
  • 6:01 - 6:02
    (हशा)
  • 6:02 - 6:05
    आम्हाला असं जाणवतंय कि वास्तविकता
    आपल्याला घडवते हे जरुरी नाही
  • 6:05 - 6:09
    पण ज्या भिंगातून तुमचा मेंदू जगाकडे
    पाहतो त्यातून वास्तविकता घडते
  • 6:09 - 6:12
    आणि जर आम्हाला भिंग बदलता आलं, आम्ही
    केवळ आपले सुखच बदलू शकत नाही
  • 6:12 - 6:16
    तर त्याचवेळी प्रत्येक शैक्षणिक आणि
    व्यावसायिक उपलब्धी बदलू शकतो
  • 6:16 - 6:17
    मी धाडसाने हार्वर्डचा अर्ज भरला
  • 6:17 - 6:20
    मला प्रवेशाची खात्री नव्हती आणि
    कुटुंबाकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते
  • 6:20 - 6:24
    दोन आठवडयांनी जेव्हा मिलिटरी शिष्यवृत्ती
    मिळाली त्यांनी मला जाऊ दिलं
  • 6:24 - 6:26
    ज्या गोष्टीची तिळमात्र
    शक्यता नव्हती ती वस्तुस्थिती झाली
  • 6:26 - 6:29
    मला वाटलं तिथे असलेल्या
    प्रत्येकाला ते अहोभाग्य
  • 6:30 - 6:31
    वाटत असेल,
    ते तिथे उत्तेजीत असतील
  • 6:31 - 6:34
    तुमच्यापेक्षा हुशार असलेल्या
    लोकांच्या वर्गातसुद्धा
  • 6:34 - 6:36
    मला वाटलं तुम्ही खुश असाल
    केवळ त्या वर्गात असल्याने
  • 6:36 - 6:39
    मला असं आढळलं, जरी काही
    लोकांचा तो अनुभव असला,
  • 6:39 - 6:41
    चार वर्षांनी मी जेव्हा पदवीधारक झालो
  • 6:41 - 6:44
    आणि पुढची आठ वर्ष विद्यार्थ्यांसोबत
    वसतीगृहात राहिलो -- हार्वर्डच्या
  • 6:44 - 6:46
    सांगण्यावरून; तरी
    मी त्यांपैकी नव्हतो
  • 6:46 - 6:48
    (हशा)
  • 6:48 - 6:51
    विद्यार्थ्यांच्या क्लिष्ट चार वर्षांत
    समुपदेशन करणारा मी अधिकारी होतो
  • 6:51 - 6:53
    आणि माझ्या संशोधन आणि शिकवण्यात,
  • 6:53 - 6:56
    असं आढळलं कि हे विद्यार्थी
    कितीही आनंदी असले
  • 6:56 - 6:59
    विद्यालयात मिळालेल्या प्रवेशाच्या
    त्यांच्या मूळ यशाने
  • 6:59 - 7:02
    दोन आठवडयांनी त्यांचे मेंदू त्या
    अहोभाग्यचा विचार करत नव्हते
  • 7:02 - 7:04
    तत्त्वज्ञान किंवा भौतिकशास्त्राचा
  • 7:04 - 7:06
    नव्हते तर स्पर्धा आणि कामाचा व्याप
  • 7:06 - 7:08
    अडथळे, ताण, तक्रारी यांचा करत होते.
  • 7:08 - 7:11
    मी प्रथम जेव्हा तिथे गेलो मी
    नवोदितांच्या भोजनगृहात गेलो
  • 7:11 - 7:14
    जिथे माझे वॅको, टेक्सासचे, जिथे
    मी मोठा झालो, मित्र -- मला माहितीये
  • 7:14 - 7:16
    तुमच्यापैकी
    काहींना हे माहीत आहे
  • 7:16 - 7:18
    जेव्हा ते येत, तेव्हा सगळीकडे पाहात असत
  • 7:18 - 7:21
    आणि म्हणत "हे भोजनगृह हॉग्वार्टमधे
    असल्यासारखं आहे"
  • 7:21 - 7:23
    ते होतं कारण ते हॉग्वार्ट होतं आणि
    हार्वर्ड असंच आहे
  • 7:24 - 7:25
    आणि ते जेव्हा हे पाहायचे
  • 7:25 - 7:28
    ते म्हणायचे "तुम्ही सुखाच्या अभ्यासासाठी
    हार्वर्डमध्ये वेळ का दवडता?
  • 7:28 - 7:31
    हार्वर्डचा विद्यार्थी कशाबद्दल
    नाराज असू शकतो?"
  • 7:31 - 7:33
    या प्रश्नातच दडलेली आहे ती
  • 7:33 - 7:35
    सुखाचे शास्त्र समजून घेण्याची किल्ली.
  • 7:35 - 7:37
    कारण तो प्रश्न असं गृहीत धरतो कि
  • 7:37 - 7:40
    आपलं बाह्यविश्व आपल्या सुखाच्या
    पातळीचं सूचक असतं
  • 7:40 - 7:43
    वास्तविकता, जर मला तुमच्या बाह्यविश्वाची
    पूर्ण माहिती असेल
  • 7:43 - 7:46
    मी तुमच्या दूरदर्शी सुखाचा
    १०% च अंदाज बांधू शकतो
  • 7:46 - 7:49
    तुमच्या दूरदर्शी सुखाचा ९०% अंदाज हा
    बाह्यविश्वावरुन लावता येत नाही
  • 7:49 - 7:52
    तर तुमचा मेंदू जगाचा कसा विचार
    करतो यावरून.
  • 7:52 - 7:53
    आणि जर आपण तो बदलला,
  • 7:53 - 7:55
    जर आपण आपल्या सुखाचं आणि यशाचं सूत्र बदललं
  • 7:55 - 7:58
    आपण मार्ग असा बदलू शकतो कि
    ज्याने वस्तुस्थितीवर परिणाम होईल
  • 7:58 - 8:02
    आम्हाला असं आढळलं बुद्ध्यांकाने केवळ २५%
    लोकांच्या नोकरीतील यशाचं भाकित करता येतं.
  • 8:02 - 8:04
    नोकरीतील ७५% यशाचं
  • 8:04 - 8:07
    भाकित हे तुमचा आशावाद, समाजाचा आधार
    आणि तणावाकडे
  • 8:07 - 8:10
    धोका म्हणून न पाहता आव्हान
    म्हणून पाहायची तुमची क्षमता यावर ठरतं
  • 8:10 - 8:14
    मी न्यू इंग्लंडमधील एका बोर्डिंग शाळेशी
    बोललो, बहुदा सर्वांत प्रतिष्ठित अशी
  • 8:14 - 8:16
    आणि ते म्हणाले "आम्हाला ते ठाऊक आहे.
  • 8:16 - 8:19
    म्हणून दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांसाठी
    नुसतंच न शिकवता आरोग्य सप्ताह असतो.
  • 8:20 - 8:23
    आणि आम्ही खूप उत्साहित आहोत.
    सोमवारी रात्री जागतिक किर्तीचा तज्ज्ञ
  • 8:23 - 8:25
    किशोरवयीन नैराश्याबद्दल बोलेल.
  • 8:25 - 8:27
    मंगळवारी रात्री शाळेतील
    हिंसा आणि छळवणूकीबद्दल.
  • 8:27 - 8:29
    बुधवारी रात्री खाण्याच्या सवयींबद्दल
  • 8:29 - 8:30
    गुरुवारी ड्रग्सचा बेकायदेशीर वापर.
  • 8:30 - 8:34
    शुक्रवारसाठी आम्ही असुरक्षित संभोग
    व सुख यांपैकी ठरवण्याचा प्रयत्न करतोय.
  • 8:34 - 8:35
    (हशा)
  • 8:35 - 8:38
    मी म्हणलं "तसं बहुतांशी
    लोकांच्या शुक्रवार रात्रीबद्दल असतं."
  • 8:38 - 8:40
    (हशा)
  • 8:40 - 8:43
    (टाळ्या)
  • 8:43 - 8:46
    मला आनंद आहे तुम्हाला हे आवडलं
    पण त्यांना ते मुळीच आवडलं नाही
  • 8:46 - 8:47
    फोनवर शांतता.
  • 8:47 - 8:50
    आणि त्यातच मी म्हणलं "मला तुमच्या
    शाळेत बोलायला आवडेल,
  • 8:50 - 8:53
    पण तो आरोग्य सप्ताह नव्हे,
    तो अनारोग्य सप्ताह आहे.
  • 8:53 - 8:56
    तुम्ही घडू शकणाऱ्या सर्व नकारात्मक
    गोष्टींचं वर्णन केलंत
  • 8:56 - 8:57
    सकारात्मक गोष्टीबद्दल बोलला नाहीत."
  • 8:57 - 8:59
    आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे.
  • 8:59 - 9:01
    आम्ही आरोग्याकडे असं पाहतो:
  • 9:01 - 9:03
    सुख आणि यशाचं सूत्र आपल्याला
    उलटं करायला हवं.
  • 9:03 - 9:06
    गेल्या तीन वर्षांत मी ४५ देश फिरलो आहे,
  • 9:06 - 9:10
    आर्थिक घसरणीच्या मध्यात शाळा आणि
    कंपन्यांसोबत काम करतोय
  • 9:10 - 9:12
    आणि मला असं दिसलं
    बऱ्याचशा कंपन्या आणि शाळा
  • 9:12 - 9:14
    यशाच्या एका सूत्राचं अनुकरण
    करतात जे हे आहे
  • 9:14 - 9:16
    जर मी अधिक काम केलं तर मी अधिक
    यशस्वी होईन.
  • 9:16 - 9:18
    आणि जर मी अधिक यशस्वी असेन तर मी
    अधिक आनंदी असेन.
  • 9:18 - 9:21
    यामुळे आपल्या बऱ्याचशा पालकत्वाच्या
    आणि व्यवस्थापकीय पद्धती
  • 9:21 - 9:23
    वर्तन प्रोत्साहनाचा मार्ग घट्ट रोवलेत.
  • 9:23 - 9:27
    आणि समस्या हि आहे कि ते शास्त्रानुसार दोन
    कारणांनी भंगलेलं आणि प्रतिगामी आहे
  • 9:27 - 9:28
    जेव्हा तुमच् मेंदूला यश मिळतं
  • 9:28 - 9:31
    तुम्ही यशाच्या रूपाचा ध्येयस्तंभ बदलता.
    तुम्हाला चांगले
  • 9:31 - 9:34
    मार्क्स मिळाले आता
    अधिक चांगले मार्क्स मिळायला हवेत,
  • 9:34 - 9:37
    तुम्ही चांगल्या शाळेत गेलात, मग अजून
    चांगल्या शाळेत जायला हवं
  • 9:37 - 9:39
    चांगली नोकरी मिळाली,
    अजून चांगली नोकरी मिळायला हवी
  • 9:39 - 9:42
    तुम्ही विक्रीचं ध्येय पूर्ण केलं,
    आम्ही मग ते बदलणार
  • 9:42 - 9:46
    आणि आनंद जर यशाच्या विरुद्ध दिशेला असेल
    तर तुमचा मेंदू तिथे कधीच पोचत नाही.
  • 9:46 - 9:49
    एक समाज म्हणून आपण सुखाला
    अनाकलनीय करून टाकलं आहे.
  • 9:49 - 9:52
    आणि याचं कारण आपल्याला वाटतं
    आपण यशस्वी व्हायलाच हवं
  • 9:52 - 9:53
    तरच आपण आनंदी होऊ.
  • 9:53 - 9:55
    पण आपले मेंदू उलट विचार करतात.
  • 9:55 - 9:58
    वर्तमानात जर तुम्ही कुणाच्या
    सकारात्मकतेची पातळी उंचावू शकलात
  • 9:58 - 10:01
    तर त्यांचा मेंदू आपण ज्याला सुखप्राप्ती
    म्हणतो ते अनुभवतो
  • 10:01 - 10:04
    म्हणजेच तुमचा सकारात्मक मेंदू
    अधिक चांगलं काम करतो नकारात्मक
  • 10:04 - 10:06
    तटस्थ किंवा तणावाखाली असल्यापेक्षा.
  • 10:06 - 10:09
    तुमची बुद्धिमत्ता वाढते, सर्जनशीलता
    वाढते, ऊर्जेची पातळी वाढते.
  • 10:09 - 10:13
    वस्तुस्थितीत आम्हाला आढळलं
    व्यवसायातील प्रत्येक निष्पत्ती सुधारते
  • 10:13 - 10:15
    तुमचा सकारात्मक मेंदू ३१% अधिक
    उत्पादक असतो
  • 10:15 - 10:17
    नकारात्मक, तटस्थ वा
    तणावाखाली असण्याच्या तुलनेत
  • 10:17 - 10:18
    तुम्ही विक्रीत ३७% अधिक
  • 10:18 - 10:21
    चांगले असता.
    डॉक्टर्स १९% अधिक वेगाने
  • 10:21 - 10:23
    व अचूकतेने योग्य निदान करतात जेव्हा तटस्थ,
  • 10:23 - 10:25
    नकारात्मक, किंवा तणावाखाली
    असण्याऐवजी सकारात्मक असतात
  • 10:25 - 10:27
    याचाच अर्थ आपण सूत्र उलटं करू शकतो.
  • 10:27 - 10:30
    वर्तमानात सकारात्मक राहण्याचा
    जर आपण मार्ग शोधला,
  • 10:30 - 10:32
    तर आपले मेंदू अधिक यशस्वीरित्या काम करतात
  • 10:32 - 10:35
    कारण आपण अधिक वेगाने,
    बुद्धीने काम करू शकतो.
  • 10:35 - 10:37
    हे सूत्र उलटं करायला जमणं गरजेचं आहे
  • 10:37 - 10:40
    जेणेकरून आपल्याला आपल्या मेंदूची
    खरी क्षमता कळू शकेल.
  • 10:40 - 10:43
    कारण डोपामाईनची, जे तुम्ही
    सकारात्मक असताना शरीरात वाहतं,
  • 10:43 - 10:44
    दोन कार्य आहेत.
  • 10:44 - 10:46
    ते केवळ तुम्हाला आनंदी करत नाही तर,
  • 10:46 - 10:49
    तुमच्या मेंदूतील सर्व आकलन
    केंद्र खुली करतं
  • 10:49 - 10:52
    ज्यायोगे तुम्ही जगाशी एका वेगळ्या
    मार्गाने जोडले जाता.
  • 10:52 - 10:54
    आम्हाला आढळलं तुम्ही तुमच्या मेंदूला
    शिकवण्याचे मार्ग
  • 10:54 - 10:56
    आहेत अधिक सकारात्मक होण्यासाठी.
  • 10:56 - 10:59
    केवळ दोन मिनीटे सलग २१ दिवस करून आम्ही,
  • 10:59 - 11:01
    तुमच्या मेंदूची प्रणाली बदलू शकतो
  • 11:01 - 11:05
    तुमच्या मेंदूला खरंच आशावादी आणि
    यशस्वीरीत्या काम करण्याची अनुमती देऊन
  • 11:05 - 11:06
    आम्ही या गोष्टी संशोधनात केल्या आहेत
  • 11:06 - 11:08
    आता मी काम केलेल्या प्रत्येक कंपनीसोबत,
  • 11:08 - 11:12
    ते कृतज्ञ असलेल्या तीन नवीन गोष्टी
    त्यांना लिहायला लावून
  • 11:12 - 11:14
    सलग २१ दिवस तीन नवीन गोष्टी दररोज.
  • 11:14 - 11:15
    आणि त्याच्या शेवटाला,
  • 11:15 - 11:17
    त्यांचा मेंदू तोच नमुना कायम ठेवतो
  • 11:17 - 11:21
    जगातल्या नकारात्मक नव्हे तर
    सकारात्मक गोष्टी शोधण्याचा
  • 11:21 - 11:24
    गेल्या २४ तासांत आलेला एक
    सकारात्मक अनुभव लिहिण्याने
  • 11:24 - 11:26
    तुमचा मेंदू तो पुन्हा जगतो.
  • 11:26 - 11:29
    सराव तुमच्या मेंदूला तुमचं वर्तन
    महत्वाचं आहे हि शिकवतो
  • 11:29 - 11:31
    आम्हाला आढळलं ध्यानामुळे
    तुमच्या मेंदूला
  • 11:31 - 11:33
    अनुमती मिळते ADHD आजाराला काबूत
    ठेवण्याची जो आपण तयार
  • 11:33 - 11:35
    करतो आहोत अनेक कामं एकाचवेळी करून
  • 11:35 - 11:38
    आणि आपल्या मेंदूला हातातल्या
    कामावर लक्ष केंद्रित
  • 11:38 - 11:41
    करता येतं. शेवटी सहज घडणारी
    दयाळूपणाची कृत्य जाणिवेने केलेली असतात.
  • 11:41 - 11:43
    लोक जेव्हा त्यांचा Inbox उघडतात
    आम्ही सांगतो
  • 11:43 - 11:44
    एक सकारात्मक ई-मेल लिहायला
  • 11:44 - 11:47
    त्यांच्या ओळखीतल्या कुणाचं कौतुक
    करणारा वा आभार मानणारा
  • 11:47 - 11:49
    आणि असं करण्याने
  • 11:49 - 11:51
    जसं आपण शरीराला शिकवतो
    त्याप्रमाणे मेंदूला शिकवल्याने
  • 11:51 - 11:55
    आम्हाला असं आढळलं कि आपण यशाचं
    व आनंदाचं सूत्र उलटं करू शकतो
  • 11:55 - 11:58
    आणि ते करताना केवळ साकारात्मकतेचे
    तरंग निर्माण करत नाही तर
  • 11:58 - 11:59
    एक अमूलाग्र बदल घडवतो.
  • 11:59 - 11:59
    धन्यवाद.
  • 11:59 - 12:01
    (टाळ्या)
Title:
चांगल्या कामाचं सुखी गुपीत
Speaker:
शॉन एकोर
Description:

आपण असं मानतो कि आनंदी राहण्यासाठी आपण काम केलं पाहिजे, पण हे उलटं असू शकतं का? TEDx ब्लूमिंग्टन मधील या वेगवान आणि करमणूकप्रधान व्याख्यानात मानसशास्त्रज्ञ शॉन एकोर म्हणतात कि खरंतर आनंदानेच उत्पादकता प्रेरित होते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
12:00

Marathi subtitles

Revisions