Return to Video

Margaret Heffernan: Dare to disagree

  • 0:00 - 0:02
    १९५० साली ऑक्सफोर्ड मध्ये
  • 0:02 - 0:06
    अॅलिस स्टुवर्ट नावाची निराळी
  • 0:08 - 0:08
    आणि अद्वितीय डॉक्टर होती.
  • 0:08 - 0:11
    आणि अॅलिस वेगळी असायचं एक कारण
  • 0:11 - 0:15
    म्हणजे अर्थात ती एक स्त्री होती आणि १९५० मध्ये हे खूप दुर्मिळ होतं.
  • 0:15 - 0:17
    ती अत्यंत हुशार,आणि त्या काळातली
  • 0:17 - 0:22
    रॉयल सोसायटी ऑफ फिसिक्स ने निवडलेली सर्वात तरुण फेलो होती.
  • 0:22 - 0:25
    अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर सुद्धा तिने काम चालू ठेवलं,
  • 0:25 - 0:27
    मुलं झाल्यावर,
  • 0:27 - 0:30
    आणि घटस्फोट झाल्यवर सुद्धा एकटीने मुलं वाढवत असताना
  • 0:30 - 0:33
    तिने आपलं वैद्यकीय काम चालू ठेवलं.
  • 0:33 - 0:37
    आणि ती वेगळी होती कारण तिला
  • 0:37 - 0:40
    रोगपरिस्थितिविज्ञान, रोगांमधील नमुन्यांचा अभ्यास
  • 0:40 - 0:43
    या नवीन विज्ञानक्षेत्रामध्ये रस होता.
  • 0:43 - 0:45
    पण प्रत्येक वैज्ञानिकाप्रमाने ती हे जाणून होती
  • 0:45 - 0:47
    की स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी,
  • 0:47 - 0:52
    आपल्याला एक कठीण प्रश्न शोधून तो सोडवावा लागेल.
  • 0:52 - 0:54
    बालकांमध्ये वाढणाऱ्या कर्क रोगाचा
  • 0:54 - 0:58
    कठीण प्रश्न अॅलिसने निवडला.
  • 0:58 - 1:00
    बहुतेक रोगांचा गरिबीशी संबंध असतो,
  • 1:00 - 1:02
    पण बालपणीच कर्क रोग झालेली मुलं
  • 1:02 - 1:05
    जी काळाच्या पडद्याआड जात होती,
  • 1:05 - 1:07
    ही बहुतांश श्रीमंत घरातून येणारी होती.
  • 1:07 - 1:09
    तर ह्या विसंगतीचं कारण काय
  • 1:09 - 1:12
    हे तिला जाणून घ्यायचं होतं.
  • 1:12 - 1:15
    आता अॅलिसला आपल्या संशोधनासाठी आर्थिक निधी गोळा करणे अवघड गेलं.
  • 1:15 - 1:17
    शेवटी तिला लेडी टाटा मेमोरियल तर्फे
  • 1:17 - 1:19
    फक्त १००० पाउंड मिळाले.
  • 1:19 - 1:22
    आणि ह्याचा अर्थ ती जाणून होती की
  • 1:22 - 1:24
    संशोधनासाठी माहिती गोळा करण्याची तिच्याकडे एकच संधी होती.
  • 1:24 - 1:26
    कशाचा शोध घ्यायचा हे तिला खरंच माहिती नव्हतं.
  • 1:26 - 1:29
    हे खरंच गवताच्या गन्जीम्ध्ये सुई शोधण्यासारख होतं,
  • 1:29 - 1:32
    आणि म्हणून तिनी सुचतील ते सगळे प्रश्न विचारले.
  • 1:32 - 1:34
    मुलांनी काय काय गोड खाल्लं होतं ?
  • 1:34 - 1:36
    त्यांनी रंगीत पेय प्यायली का ?
  • 1:36 - 1:38
    त्यांनी मासे खाल्ले का ?
  • 1:38 - 1:40
    त्यांच्या घरातले नळ घराच्या आत होते का बाहेर ?
  • 1:40 - 1:43
    किती वयाचे असताना ते शाळेत जाऊ लागले?
  • 1:43 - 1:46
    आणि जेव्हा तिने बनवलेल्या प्रश्नावलीच्या प्रती परत येऊ लागल्या,
  • 1:46 - 1:49
    एक गोष्ट आणि एकच गोष्ट प्रकर्षाने उठून दिसली,
  • 1:49 - 1:52
    इतकी स्पष्टपणे की
  • 1:52 - 1:55
    ज्याचं प्रत्येक वैज्ञानिक फक्त स्वप्नच बघू शकतो.
  • 1:55 - 1:57
    जी मुले मरण पावली,
  • 1:57 - 1:59
    त्यांच्या आईने गरोदर असताना एक्स-रे घेतल्याचे
  • 1:59 - 2:05
    प्रमाण दोनास एक इतके होते.
  • 2:05 - 2:09
    आता हा निष्कर्ष पारंपारिक युक्तिवादाच्या विरोधात जाणारा होता.
  • 2:09 - 2:11
    पारंपारिक समजूत अशी होती की,
  • 2:11 - 2:15
    कुठली ही गोष्ट एका ठरावीक हद्दीपर्यंत सुरक्षितपणे चालू शकते.
  • 2:15 - 2:17
    पारंपारिक समजूतीच्या आणि
  • 2:17 - 2:19
    या नवीन तंत्रज्ञानाबद्दलच्या ,
  • 2:21 - 2:25
    जे कि क्ष किरण होते, त्याबद्दल असलेल्या उत्साहाच्या विरोधात जाणारा हा निष्कर्ष होता.
  • 2:25 - 2:29
    आणि हा डॉक्टरांच्या स्वतःबद्दलच्या संकल्पनेला
  • 2:29 - 2:33
    जी ते रुग्णांना मदत करतात,
  • 2:33 - 2:36
    तिला छेद देणारा होता.
  • 2:36 - 2:39
    तरी पण अॅलिस स्टुवर्ट ने आपले प्राथमिक निष्कर्ष
  • 2:39 - 2:43
    तात्काळ “लांसेट” मध्ये १९५६ साली प्रसिद्ध केले.
  • 2:43 - 2:47
    लोकांमध्ये या विषयी खूप उस्त्सुक्ता निर्माण झाली, आणि नोबेल परीतोशिकाबद्दल देखील चर्चा झाली
  • 2:47 - 2:49
    आणि अॅलिस बालपणी झालेल्या कर्करोगाच्या
  • 2:49 - 2:53
    सगळ्या घटनांचा, त्या नाहीश्या होण्याआधी
  • 2:53 - 2:55
    अभ्यास कराण्याचा प्रयत्न करत होती.
  • 2:55 - 2:59
    वस्तुस्तिथी पाहता तिने घाई करण्याची काहीच गरज नव्हती.
  • 2:59 - 3:03
    कारण तो काळ म्हणजे ब्रिटीश आणि अमेरिकन वैद्यकीय संस्थांनी
  • 3:03 - 3:06
    गरोदर बायकांसाठी एक्स-रे वर्ज्य करण्याच्या
  • 3:06 - 3:12
    २५ वर्षांपूर्वीचा काळ होता.
  • 3:12 - 3:18
    सगळी माहिती उपलब्ध होती, सर्वांना मिळेल, मोफत मिळेल अशी होती,
  • 3:18 - 3:22
    पण कोणालाच जाणून घेण्याची इच्छा नव्हती.
  • 3:22 - 3:25
    दर आठवड्याला एका मुलाचा मृत्यू होता होता,
  • 3:25 - 3:28
    पण तरी काही बदलले नाही.
  • 3:28 - 3:34
    फक्त माहितीची उपलब्धता बदल घडवून आणू शकत नाही.
  • 3:34 - 3:39
    तर तब्बल २५ वर्ष अॅलिस स्टुवर्ट एक मोठा लढा देत होती.
  • 3:39 - 3:43
    मग तिला कसं माहिती होतं की तिची बाजू बरोबर होती ?
  • 3:43 - 3:46
    तिची विचार करण्याची पद्धत अतिशय अफलातून होती.
  • 3:46 - 3:49
    ती जॉर्ज नील नावाच्या एका संख्याशास्त्राज्ञाबरोबर काम करायची
  • 3:49 - 3:51
    आणि जॉर्ज मध्ये ते सगळं होतं जे अॅलिस मध्ये नव्हतं.
  • 3:51 - 3:54
    अॅलिस अतिशय मनमोकळी,
  • 3:54 - 3:56
    तर जॉर्ज एकलकोंडा होता.
  • 3:56 - 4:00
    अॅलिस अतिशय मनमिळाऊ आणि समजूतदार पद्धतीन आपल्या रुग्णांशी वागत असे.
  • 4:00 - 4:05
    आणि खरं सांगायचं तर जॉर्ज लोकांपेक्षा गणितात रमत असे.
  • 4:05 - 4:09
    पण त्यांच्या कामाच्या पद्धातीविषयी त्यांनी एक विलक्षणीय विधान केले.
  • 4:09 - 4:15
    तो म्हणाला "डॉ. स्टुवर्ट यांना चूक सिध्द करणे हे माझं काम आहे."
  • 4:15 - 4:18
    तो आतुर्तॆनॆ अनियमिततेच्या मागे असे.
  • 4:18 - 4:21
    तिने तयार केलेल्या विविध गणितीय विश्लेशाणांचा, त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याचा,
  • 4:21 - 4:24
    तिच्या संख्याशास्त्राचा आणि आकडेमोडीचा चिकित्सक पद्धतीने विचार करून
  • 4:24 - 4:27
    तिला चूक ठरविण्याच्या प्रयत्नात असे .
  • 4:27 - 4:33
    आपले काम म्हणजे तिच्या सिद्धांतान्भोव्ती विरोध उभा करणे, असे तो मानत असे.
  • 4:33 - 4:36
    कारण तिची चूक नाही आही
  • 4:36 - 4:38
    हे दाखवण्यात अपयश आले तरच जॉर्ज तिला
  • 4:40 - 4:42
    ती बरोबर असल्याचा
  • 4:42 - 4:44
    आत्मविश्वास देऊ शकणार होता.
  • 4:44 - 4:49
    सहयोगाचा हा एक उत्तम नमुना आहे -
  • 4:49 - 4:54
    विचार करणारे सहकारी जे नुसती री ओढण्याच काम करत नाहीत.
  • 4:54 - 4:56
    मी नेहमी विचार करते की आपल्यापैकी किती जणांचे असे सहकारी आहेत
  • 4:56 - 5:03
    किंवा किती जणांमेध्ये असे सहकारी असावेत असा विचार करण्याची हिम्मत आहे.
  • 5:03 - 5:07
    अॅलिस आणि जॉर्ज मतभेदबहाद्दर होते.
  • 5:07 - 5:10
    मतभेद दर्शवणे आणि विचार करणे, ह्यात त्यांना कधी अंतरच वाटले नाही.
  • 5:10 - 5:14
    तर काय असतात अश्या विधायक मतभेदांचे घटक?
  • 5:14 - 5:18
    पहिले तर अशी लोकं शोधावी लागतात
  • 5:18 - 5:20
    जी तुमच्यापेक्षा वेगळी आहेत.
  • 5:20 - 5:25
    ह्याचा अर्थ असा की आपल्याला स्वतःच्या मानसिकतेचा विरोध करावा लागतो,
  • 5:25 - 5:29
    कारण आपण नेहमीच स्वतःसारख्या लोकांना प्राधान्य देतो,
  • 5:29 - 5:31
    आणि ह्याचाच अर्थ असा की आपण अशी लोकं शोधली पाहिजेत
  • 5:31 - 5:34
    जी वेगळी पार्श्वभूमीची आहेत, वेगळ्या शाखेतली,
  • 5:34 - 5:38
    वेगळ्या विचारसरणीची, आणि विविध अनुभवसमृद्ध
  • 5:38 - 5:42
    आणि त्यांच्याशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
  • 5:42 - 5:47
    हे करण्यासाठी प्रचंड संयम आणि उत्साह पाहिजे.
  • 5:47 - 5:48
    आणि ह्या गोष्टीचा मी जितका जास्ती विचार करते
  • 5:48 - 5:54
    तितकं मला असं वाटतं की हे एक प्रकारचं प्रेम आहे.
  • 5:54 - 5:57
    कारण तुम्ही तेवढा वेळ आणि तेवढी मेहनत नाही खर्च करू शकत
  • 5:57 - 6:01
    जर तुम्हाला त्याने फरक पडत नसेल .
  • 6:01 - 6:06
    आणि त्याचाच अर्थ आपण आपली मतं बदलण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे.
  • 6:06 - 6:08
    अॅलिसची मुलगी मला म्हणाली की
  • 6:08 - 6:11
    दर वेळेस जेव्हा अॅलिस शास्त्रज्ञांशी बोलत असे,
  • 6:11 - 6:15
    तेव्हा ते तिला विचार करण्यास आणि मग फेरविचार करण्यास भाग पाडत असत .
  • 6:15 - 6:19
    “माझ्या आईला” ती म्हणाली, “माझ्या आईला वाद घालायला कधीच आवडायचं नाही,
  • 6:19 - 6:25
    पण तिला ते खूप चांगलं जमायचं”.(हशा)
  • 6:25 - 6:29
    एकमेकांमधील संबंधांमध्ये असं नातं असणं मी समजू शकते.
  • 6:29 - 6:32
    पण मला हे नेहमी जाणवतं की आपल्या सगळ्या मोठ्या समस्या,
  • 6:32 - 6:35
    आपण सामोरी गेलेले मोठे अनर्थ हे
  • 6:35 - 6:37
    एका व्यक्तीमुळे नसून
  • 6:37 - 6:39
    संघटनांमुळे जन्माला येतात,
  • 6:39 - 6:41
    ज्या कधी कधी राष्ट्रांपेक्षा मोठ्या असतात,
  • 6:41 - 6:43
    आणि ज्यांचे अनेक हजार
  • 6:43 - 6:47
    आणि कधी कधी लाखो लोकांवर प्रभाव पाडण्याचे सामर्थ्य असते .
  • 6:47 - 6:51
    अश्या संघटना कसा विचार करत असतील?
  • 6:51 - 6:56
    अनेकदा ह्या संघटना विचारच करत नाहीत.
  • 6:56 - 6:59
    त्यांना विचार करायचा नसतो म्हणून नाही
  • 6:59 - 7:01
    तर त्या खरंच विचार करू शकत नाहीत म्हणून.
  • 7:01 - 7:04
    आणि त्यांना विचार करता येत नाही कारण
  • 7:04 - 7:08
    त्यांचे सदस्य मतभेदांना घाबरतात.
  • 7:08 - 7:11
    युरोप आणि अमेरिकेतील उच्च पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये,
  • 7:11 - 7:14
    ८५% लोकांनी हे कबूल केले की
  • 7:14 - 7:18
    त्यांना आपल्या कामात काही अडचणी आहेत
  • 7:18 - 7:21
    ज्या मांडण्याची त्यांना भीती वाटते.
  • 7:21 - 7:25
    उद्भवणाऱ्या मतभेदाची भीती,
  • 7:25 - 7:27
    ज्यावर आपला ताबा नसेल
  • 7:27 - 7:29
    अश्या वादात गुंतण्याची भीती
  • 7:29 - 7:34
    आणि शेवटी आपला पराभव होईल असे वाटणे.
  • 7:34 - 7:40
    ८५ टक्के हा खरोखरच मोठा आकडा आहे.
  • 7:40 - 7:43
    ह्याचा अर्थ असा की जॉर्ज आणि अॅलिस ने जे यशस्वीपणे करून दाखवलं
  • 7:43 - 7:45
    ते मोठ्या संघटना बहुतांशी करू शकत नाहीत .
  • 7:45 - 7:49
    ते एकत्र विचार करू शकत नाहीत.
  • 7:49 - 7:52
    म्हणजेच आपल्यासारखी लोकं,
  • 7:52 - 7:54
    जे संघटना चालवतात,
  • 7:54 - 7:57
    आणि उत्तम लोकांचा त्यात समावेश व्हावा असा प्रयत्न करतात,
  • 7:57 - 8:04
    ते त्यांच्यातलं सर्वोत्तम मिळवण्यात अपयशी ठरतात.
  • 8:04 - 8:07
    तर आपल्याला हवी असणारी कौशल्य आपण कशी वृद्धिंगत करू शकतो?
  • 8:07 - 8:11
    कारण कौशल्य आणि कष्ट दोन्ही गरजेचे आहेत.
  • 8:11 - 8:14
    आपण जर मतभेदांना घाबरणार नसलो तर
  • 8:14 - 8:17
    आपण त्यांना विचारांचा एक भाग मानलं पाहिजे,
  • 8:17 - 8:21
    आणि असा विचार आपण सहजपणे केला पाहिजे.
  • 8:21 - 8:25
    अलीकडेच, मी जो नावाच्या एका मोठ्या अधिकाऱ्याबरोबर काम केले,
  • 8:25 - 8:29
    आणि जो एका वैद्यकीय उपकरण बनवणाऱ्या कंपनी साठी काम करायचा.
  • 8:29 - 8:32
    आपण काम करत असलेल्या एका उपकरणाबद्दल त्याला खूप चिंता वाटत होती.
  • 8:32 - 8:35
    त्याला वाटत होतं की ते खूप किचकट होतं
  • 8:35 - 8:37
    आणि पर्यायाने होणार्या दोष परिणामांमुळे
  • 8:37 - 8:41
    लोकांच्या तब्येतीवर दुष्परिणाम होऊ शकेल.
  • 8:41 - 8:45
    ज्या रुग्णांना तो मदत करू इच्छित होता त्यांना इजा होण्याची त्याला भीती वाटत होती.
  • 8:45 - 8:47
    पण आजूबाजूला एक नजर टाकल्यावर
  • 8:47 - 8:52
    त्याच्या लक्षात आले की, कुणालाच इतकी काळजी नव्हती.
  • 8:52 - 8:54
    त्यामुळे तो कुणाला फार काही बोलला नाही.
  • 8:54 - 8:56
    कदाचित त्यांना अश्या काही गोष्टी माहिती होत्या ज्याचे ज्ञान त्याला नव्हते.
  • 8:56 - 8:59
    कदाचित तो मूर्ख दिसला असता.
  • 8:59 - 9:01
    पण तो फक्त काळजी करत राहिला
  • 9:01 - 9:04
    आणि इतकी,
  • 9:04 - 9:06
    की त्याला असे वाटू लागले की
  • 9:06 - 9:11
    आपल्याला आवडणारी नोकरी सोडणे हा एकाच मार्ग आहे.
  • 9:11 - 9:15
    शेवटी मी आणि जो ने मिळून त्याची काळजी उपस्थित करण्याचा
  • 9:15 - 9:16
    एक मार्ग शोधून काढला.
  • 9:16 - 9:19
    आणि मग जे घडलं
  • 9:19 - 9:21
    ते नेहमीच अश्या वेळी घडतं.
  • 9:21 - 9:24
    असं लक्षात आलं की सगळ्यांनाच
  • 9:24 - 9:26
    ते प्रश्न आणि त्या शंका होत्या.
  • 9:26 - 9:30
    त्यामुळे जो ला आता सहयोगीमिळाले होते. त्यांना एकत्र विचार करता येणार होता.
  • 9:30 - 9:33
    आणि हो, ह्यामुळे अनेक वाद, विवाद आणि मतभेद झाले,
  • 9:33 - 9:37
    पण त्यामुळे सगळ्यांना
  • 9:37 - 9:42
    सर्जनशील होण्याची संधी मिळाली, तो प्रश्न सोडवण्यासाठी आणि
  • 9:42 - 9:46
    ते उपकरण बदलण्यासाठी.
  • 9:46 - 9:49
    अनेक लोकांच्या मते जो अशी व्यक्ती होती
  • 9:49 - 9:51
    जी चुकीच्या गोष्टी उघडकीस आणते.
  • 9:51 - 9:54
    फक्त अशा बहुतांशी इतर लोकांप्रमाणे
  • 9:54 - 9:57
    तो विस्क्शिप्त नक्कीच नव्हता,
  • 9:57 - 10:00
    तो आपल्या संघटनेशी आणि
  • 10:00 - 10:03
    तिच्या उद्दिष्टांशी एकनिष्ठ होता.
  • 10:03 - 10:07
    पण त्याने मतभेदाची इतकी भीती बाळगली होती,
  • 10:07 - 10:12
    की शेवटी त्याला शांत राहण्याची भीती वाटू लागली.
  • 10:12 - 10:14
    आणि जेव्हा त्यानी बोलायचं धाडस केलं
  • 10:14 - 10:18
    तेव्हा त्याला स्वतःबद्दल अनेक गोष्टींचा शोध लागला आणि आपण कल्पना केली नव्हती
  • 10:18 - 10:23
    इतकं आपल्याकडे इतरांना देण्यासारखं काही आहे, हे त्याच्या लक्षात आलं.
  • 10:23 - 10:26
    आणि त्याचे सहयोगी त्याच्याकडे एक विक्षिप्त व्यक्ती म्हणून पहात नाहीत.
  • 10:26 - 10:31
    ते त्याच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून बघतात.
  • 10:31 - 10:36
    तर अशी संभाषणं सहज आणि वारंवार होण्यासाठी
  • 10:36 - 10:38
    आपण काय केलं पाहिजे ?
  • 10:38 - 10:40
    डेलफ्ट विद्यापीठाच्या पीएचडी विद्यार्थ्यांना
  • 10:40 - 10:42
    अश्या पाच विधानांचा प्रस्ताव मांडावा लागतो
  • 10:42 - 10:46
    ज्याचं ते समर्थन करू शकतील.
  • 10:46 - 10:49
    ती विधानं कश्याबद्दल आहेत हे गौण असते,
  • 10:49 - 10:53
    तो विद्यार्थी स्वतःला त्याबद्दल तज्ञ असल्याचे सिद्ध करू शकतो
  • 10:53 - 10:56
    ह्याला महत्त्व आहे.
  • 10:56 - 10:58
    मला असं वाटतं की एक अफलातून पद्धत आहे.
  • 10:58 - 11:01
    पण ही इतकी उशीरा आणि फक्त पीएचडी विद्यार्थ्यासाठी नसली पाहिजे
  • 11:01 - 11:05
    जी मोजक्याच वर्गाशी सीमित राहते.
  • 11:05 - 11:08
    मला असं वाटतं की आपण लहान मुलांना आणि मोठ्यांना
  • 11:08 - 11:12
    आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर हे शिकवलं पाहिजे,
  • 11:12 - 11:15
    जर आपल्याला विचारी संघटना
  • 11:15 - 11:18
    आणि विचारी समाज हवा असेल तर.
  • 11:18 - 11:24
    वस्तुस्तिथी अशी आहे की आपण पाहिलेली मोठी संकटं ही
  • 11:24 - 11:30
    क्वचितच दडवून ठेवलेल्या माहितीमुळे उद्भवली आहेत.
  • 11:30 - 11:35
    ती येतात अश्या माहितीपासून जी सगळ्यांना मुक्तपणे उपलब्ध आहे,
  • 11:35 - 11:37
    पण ज्याकडे आपण पाठ फिरवून बसलो आहोत,
  • 11:37 - 11:40
    कारण आपण त्याचा उपयोग करू शकत नाही, किंवा आपल्याला त्याचा उपयोग करू इच्छित नाही,
  • 11:40 - 11:44
    आणि त्यामुळे होणाऱ्या वादाला सामोरे जाऊ इच्छित नाही
  • 11:44 - 11:47
    पण जेव्हा आपण बोलण्याचे धाडस करतो,
  • 11:47 - 11:50
    किंवा डोळसपणे बघण्याचं धाडस करतो,
  • 11:50 - 11:52
    तेव्हा मतभेद होतात
  • 11:52 - 11:55
    आणि आपण स्वतःला आणि आजूबाजूच्या सगळ्यांना
  • 11:55 - 11:59
    उत्तम विचार करण्यास सक्षम बनवतो.
  • 11:59 - 12:03
    मुक्तपणे माहिती उपलब्ध असणे हा विल्क्ष्णीय प्रकार आहे,
  • 12:03 - 12:06
    मुक्त संघटना देखील महत्वाच्या आहेत.
  • 12:06 - 12:08
    परंतु सत्य आपल्याला मुक्त करू शकत नाही
  • 12:08 - 12:11
    जोवर त्याचा वापर करण्याचे कसब आणि सवय आणि बुद्धिमत्ता
  • 12:11 - 12:16
    आणि धैर्य आपण आत्मसात करत नाही .
  • 12:16 - 12:19
    पारदर्शकपणा म्हणजे शेवट नाही.
  • 12:19 - 12:22
    ती सुरुवात आहे.
  • 12:22 - 12:33
    (टाळ्या)
Title:
Margaret Heffernan: Dare to disagree
Speaker:
मार्गारेट हेफरनन
Description:

संघर्ष टाळणे ही बहुतांश लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते, पण मार्गारेट हेफरनन आपल्याला सांगतात की चांगले मतभेद हे प्रगतीचा केंद्रबिंदू असतात. त्या दाखवतात की (काही वेळेस अंतर्ज्ञानाच्या विरोधात जाऊन) उत्तम सहकारी नुसती री ओढण्याच काम करत नाहीत - आणि उत्तम संशोधक संघ, नाती आणि उद्योग हे लोकांमधल्या गहन संघर्षाला अनुमत करतात.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
12:56
Dimitra Papageorgiou approved Marathi subtitles for Dare to disagree
Purnendu Saptarshi accepted Marathi subtitles for Dare to disagree
Purnendu Saptarshi edited Marathi subtitles for Dare to disagree
Purnendu Saptarshi edited Marathi subtitles for Dare to disagree
Purnendu Saptarshi edited Marathi subtitles for Dare to disagree
Chaitanya Shivade edited Marathi subtitles for Dare to disagree
Chaitanya Shivade edited Marathi subtitles for Dare to disagree
Chaitanya Shivade edited Marathi subtitles for Dare to disagree
Show all

Marathi subtitles

Revisions