Return to Video

जगात शांतता कशी आणायची? संतापून.

  • 0:01 - 0:06
    आज मी संताप या विषयावर बोलणार आहे.
  • 0:09 - 0:11
    मी अकरा वर्षांचा असताना
  • 0:11 - 0:14
    माझ्या काही मित्रांना
    शिक्षण सोडताना पाहिलं.
  • 0:14 - 0:19
    त्यांच्या पालकांना पुस्तकांचा खर्च
    परवडत नसे, म्हणून.
  • 0:19 - 0:21
    ते पाहून मला संताप आला.
  • 0:23 - 0:26
    २७ व्या वर्षी, मी
  • 0:26 - 0:31
    एका गुलामीत जगणाऱ्या
    अगतिक पित्याची अवस्था ऐकली.
  • 0:31 - 0:36
    त्याच्या कन्येला एका वेश्यागृहाला
    विकलं जात होतं
  • 0:36 - 0:39
    हे ऐकून मला संताप आला.
  • 0:40 - 0:43
    पन्नासाव्या वर्षी,
  • 0:43 - 0:48
    मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलो
  • 0:48 - 0:51
    माझ्या मुलासमवेत.
  • 0:51 - 0:53
    याचा मला संताप आला.
  • 0:55 - 1:00
    प्रिय मित्रांनो, संताप हा वाईट असतो
    असं आपल्याला शतकानुशतकं शिकवलं गेलं.
  • 1:01 - 1:03
    आपले पालक, गुरुजन आणि धर्मगुरू -
  • 1:03 - 1:09
    सर्वानीच आपल्याला, संतापावर ताबा ठेवून
    तो दडपून कसा टाकावा, हे शिकवलं
  • 1:12 - 1:14
    पण मी विचारतो, "का?"
  • 1:16 - 1:21
    आपण आपल्या संतापाचं रुपांतर
    समाजाच्या भल्यात का करू शकत नाही?
  • 1:21 - 1:22
    आपण आपला संताप,
  • 1:22 - 1:26
    जगातल्या वाईट गोष्टींशी सामना करून,
    त्या बदलण्यासाठी का वापरू शकत नाही?
  • 1:30 - 1:32
    हे करण्याचा मी प्रयत्न केला.
  • 1:34 - 1:36
    मित्रांनो,
  • 1:37 - 1:43
    माझ्या बऱ्याचशा तेजस्वी कल्पनांचा जन्म
    संतापापोटीच झाला.
  • 1:44 - 1:54
    उदाहरणार्थ, जेव्हा मी ३५ व्या वर्षी,
    एका छोट्या कारागृहात बंदी होतो,
  • 1:55 - 1:57
    ती संपूर्ण रात्र मी संतापात काढली.
  • 1:58 - 2:01
    पण त्यातून एका नवीन कल्पनेचा जन्म झाला.
  • 2:01 - 2:04
    पण त्याबद्दल मी नंतर बोलेन.
  • 2:04 - 2:11
    प्रथम, मी स्वतःचं नाव कसं ठेवलं,
    त्या गोष्टीपासून सुरुवात करू.
  • 2:13 - 2:18
    माझ्या बालपणापासून मी महात्मा गांधींचा
    जोरदार चाहता आहे.
  • 2:19 - 2:24
    गांधीजी स्वतंत्र भारत चळवळीचे नेते होते.
  • 2:25 - 2:27
    पण त्याहून महत्त्वाचं,
  • 2:27 - 2:34
    त्यांनी शिकवलं, ते
    समाजाच्या सर्वात दुर्बल घटकांना
  • 2:34 - 2:38
    आणि सर्वाधिक वंचित लोकांना
    मानाची आणि आदराची वागणूक देणं.
  • 2:40 - 2:45
    आणि म्हणूनच, १९६९ साली,
  • 2:45 - 2:48
    जेव्हा भारतभर महात्मा गांधींची
    जन्मशताब्दी साजरी केली जात होती,
  • 2:48 - 2:50
    - त्यावेळी मी १५ वर्षांचा होतो-
  • 2:50 - 2:52
    तेव्हा मला एक कल्पना सुचली.
  • 2:54 - 2:57
    आपण ती वेगळ्या रीतीने का साजरी करून नये?
  • 2:57 - 3:03
    मला ठाऊक होतं,
    आणि कदाचित तुम्हीही जाणत असाल,
  • 3:03 - 3:11
    की भारतात पुष्कळ लोक
    निम्नतम जातींमध्ये जन्मतात.
  • 3:12 - 3:15
    आणि त्यांना अस्पृश्य म्हणून वागवलं जातं.
  • 3:15 - 3:17
    तर या लोकांना,
  • 3:17 - 3:21
    देवळात जाण्याची परवानगी मिळणं
    तर सोडाच,
  • 3:21 - 3:28
    त्यांना उच्च जातीच्या लोकांच्या घरी
    किंवा दुकानांत देखील जाता येत नाही.
  • 3:28 - 3:34
    तर, माझ्या गावच्या नेत्यांचा
    माझ्यावर प्रभाव पडला.
  • 3:34 - 3:38
    ते जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचा
    जोरदार विरोध करीत असत.
  • 3:38 - 3:40
    आणि गांधीवादी आदर्शांबद्दल बोलत असत.
  • 3:42 - 3:45
    तर ती प्रेरणा घेऊन मी ठरवलं,
    आपण लोकांसमोर एक आदर्श ठेवू.
  • 3:45 - 3:51
    अस्पृश्य समाजाने रांधून वाढलेलं अन्न
  • 3:51 - 3:55
    ग्रहण करण्याचं या नेत्यांना आमंत्रण देऊ.
  • 3:55 - 4:00
    मी काही निम्न जातीच्या,
    तथाकथित अस्पृश्य, लोकांकडे गेलो.
  • 4:01 - 4:06
    त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.
    पण हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं.
  • 4:06 - 4:10
    ते म्हणाले, " छे छे. हे अशक्य आहे.
    असं आजपर्यंत कधीच घडलं नाही."
  • 4:11 - 4:13
    मी म्हणालो, " हे नेते पहा,"
  • 4:13 - 4:15
    हे महान आहेत.
    यांचा अस्पृश्यतेला विरोध आहे.
  • 4:15 - 4:18
    ते येतील. कुणीच आलं नाही,
    तर आपण एक उदाहरण घालून देऊ.
  • 4:21 - 4:27
    त्या लोकांना मी अगदी भोळसट वाटलो.
  • 4:28 - 4:31
    शेवटी एकदाचे ते तयार झाले.
  • 4:31 - 4:36
    मी आणि माझे मित्र सायकली घेऊन गेलो.
    त्या राजकीय नेत्यांना आमंत्रण देऊन आलो.
  • 4:38 - 4:41
    त्यातल्या प्रत्येकाने
    आमंत्रण स्वीकारल्याचं पाहून
  • 4:41 - 4:46
    मी उत्तेजित झालो, नव्हे,
    माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं.
  • 4:47 - 4:50
    मला वाटलं, "किती महान कल्पना.
    आपण एक आदर्श समाजासमोर ठेवू.
  • 4:50 - 4:54
    आपण समाजात परिवर्तन घडवून आणू."
  • 4:55 - 4:57
    तो दिवस उगवला.
  • 4:58 - 5:03
    हे सारे अस्पृश्य,
    तीन स्त्रिया आणि दोन पुरुष,
  • 5:03 - 5:07
    यायला कबूल झाले.
  • 5:07 - 5:13
    त्यांनी आपल्याजवळचे सर्वोत्तम कपडे
    घातले होते, असं मला स्मरतं.
  • 5:14 - 5:17
    त्यांनी नवीन भांडी आणली होती.
  • 5:18 - 5:20
    त्यांनी शेकडो वेळा आंघोळी केल्या होत्या.
  • 5:20 - 5:23
    कारण असं काही करणं
    हे त्यांच्या आकलनाबाहेरचं होतं.
  • 5:23 - 5:26
    परिवर्तनाचा क्षण आला होता.
  • 5:27 - 5:30
    ते एकत्र जमले आणि त्यांनी स्वयंपाक केला.
  • 5:30 - 5:33
    सात वाजले.
  • 5:33 - 5:36
    आठ वाजेपर्यंत आम्ही वाट बघत राहिलो.
  • 5:36 - 5:41
    कारण नेते उशीरा येणं हे तर नेहमीचंच आहे.
  • 5:41 - 5:43
    म्हणजे एखादा तास उशीरा येणं.
  • 5:43 - 5:50
    तर, आठ वाजल्यानंतर आम्ही सायकली काढल्या
    आणि त्या नेत्यांच्या घरी गेलो.
  • 5:50 - 5:52
    फक्त त्यांना आठवण करून देण्यासाठी.
  • 5:54 - 5:59
    त्यांच्यापैकी एका नेत्याच्या पत्नीने
    मला सांगितलं,
  • 5:59 - 6:04
    "माफ करा, त्यांचं डोकं दुखतं आहे.
    बहुतेक ते येऊ शकणार नाहीत."
  • 6:04 - 6:06
    मी दुसऱ्या नेत्याकडे गेलो.
  • 6:06 - 6:10
    आणि त्यांची पत्नी म्हणाली,
    "बरं. तुम्ही जा. ते नक्की येतील."
  • 6:11 - 6:15
    म्हणून मला वाटलं,
    हा जेवणाचा कार्यक्रम नक्की पार पडणार.
  • 6:15 - 6:20
    तितक्याशा मोठ्या प्रमाणावर का नसेना.
    मी आमच्या ठिकाणी परत गेलो.
  • 6:21 - 6:27
    हे ठिकाण म्हणजे
    नवीनच बांधलेलं महात्मा गांधी उद्यान.
  • 6:29 - 6:30
    दहा वाजले.
  • 6:31 - 6:35
    एकही नेता आला नाही.
  • 6:36 - 6:39
    या गोष्टीचा मला संताप आला.
  • 6:40 - 6:47
    मी महात्मा गांधींच्या पुतळ्याला
    टेकून उभा होतो.
  • 6:50 - 6:54
    मी मनातून थकलो होतो. पार गळून गेलो होतो.
  • 6:57 - 7:02
    जिथे जेवण ठेवलं होतं, तिथे मी बसलो.
  • 7:06 - 7:08
    मी माझ्या भावना काबूत ठेवल्या होत्या.
  • 7:08 - 7:12
    पण पहिला घास घेताक्षणी
  • 7:12 - 7:15
    मला रडू कोसळलं.
  • 7:15 - 7:20
    आणि अचानक मला खांद्यावर
    एका हाताचा स्पर्श जाणवला.
  • 7:20 - 7:26
    तो होता जखमा भरणारा मातेचा स्पर्श.
    एका अस्पृश्य स्त्रीचा स्पर्श.
  • 7:26 - 7:30
    आणि ती म्हणाली,
    "कैलाश, कशासाठी रडतो आहेस तू?"
  • 7:32 - 7:34
    तू तुझं काम केलंस.
  • 7:34 - 7:37
    तू अस्पृश्यांच्या हातचं जेवलास.
  • 7:37 - 7:40
    आमच्या आठवणीत असं कधीच घडलं नव्हतं.
  • 7:41 - 7:46
    ती म्हणाली, "आज तू जिंकलास."
  • 7:46 - 7:51
    आणि माझ्या मित्रांनो,
    तिचं म्हणणं बरोबर होतं.
  • 7:52 - 7:56
    मध्यरात्रीनंतर मी घरी परतलो.
  • 7:56 - 8:00
    अंगणात बसलेले अनेक उच्चवर्णीय
    वयोवृद्ध लोक पाहून
  • 8:00 - 8:03
    मला धक्काच बसला.
  • 8:03 - 8:06
    माझी आई आणि
    घरातल्या इतर वयस्कर स्त्रिया रडत होत्या
  • 8:06 - 8:10
    आणि त्या वयोवृद्ध लोकांच्या
    विनवण्या करीत होत्या.
  • 8:10 - 8:13
    कारण त्यांनी आमच्या घराण्याला
    वाळीत टाकण्याची धमकी दिली होती.
  • 8:14 - 8:19
    आणि घराणं वाळीत टाकणं
    ही सामाजिक शिक्षा,
  • 8:19 - 8:23
    कल्पनेतल्या कुठल्याही शिक्षेहून मोठी आहे.
  • 8:24 - 8:29
    मला एकट्याला शिक्षा द्यायला
    ते कसेबसे राजी झाले.
  • 8:29 - 8:33
    ही शिक्षा म्हणजे शुद्धीकरण.
    म्हणजे मी गावापासून ६०० मैलावर जायचं.
  • 8:33 - 8:37
    गंगा नदीत बुडी मारून पवित्र व्हायचं.
  • 8:37 - 8:42
    आणि त्यानंतर १०१ पुरोहितांना
    भोजन द्यायचं.
  • 8:42 - 8:45
    त्यांचे पाय धुवून, ते चरणतीर्थ प्यायचं.
  • 8:47 - 8:50
    हा शुद्ध मूर्खपणा होता.
  • 8:50 - 8:52
    मी ही शिक्षा नाकारली.
  • 8:53 - 8:55
    मग त्यांनी मला कोणती शिक्षा केली?
  • 8:55 - 9:01
    त्यांनी मला माझ्याच स्वयंपाकघरात
    आणि भोजनघरात जायला बंदी केली.
  • 9:01 - 9:04
    माझी भांडीकुंडी वेगळी ठेवण्यात आली.
  • 9:04 - 9:09
    पण ज्या रात्री मला संताप आला होता,
    तेव्हा त्यांना मला वाळीत टाकायचं होतं.
  • 9:11 - 9:15
    पण मी संपूर्ण जातीव्यवस्थेलाच
    वाळीत टाकण्याचं ठरवलं.
  • 9:16 - 9:20
    (टाळ्या)
  • 9:21 - 9:26
    आणि ते शक्य होतं, कारण त्याची सुरुवात
  • 9:26 - 9:28
    स्वतःचं आडनाव बदलून करता आली असती.
  • 9:28 - 9:32
    कारण भारतात,
    बरीचशी आडनावं ही जातींची नावं असतात.
  • 9:32 - 9:34
    म्हणून मी स्वतःचं आडनाव गाळून टाकलं.
  • 9:34 - 9:41
    आणि त्यानंतर मी स्वतःला
    एक नवीन आडनाव दिलं : सत्यार्थी.
  • 9:41 - 9:44
    त्याचा अर्थ, सत्याचा शोध घेणारा.
  • 9:45 - 9:49
    (टाळ्या)
  • 9:49 - 9:53
    संतापातून परिवर्तन घडवण्याची सुरुवात
    ही अशी झाली.
  • 9:54 - 9:57
    मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी ओळखेल का,
  • 9:57 - 10:02
    बाल अधिकार कार्यकर्ता होण्यापूर्वी
    मी काय करीत होतो?
  • 10:02 - 10:04
    कोणाला ठाऊक आहे का?
  • 10:05 - 10:06
    नाही.
  • 10:06 - 10:13
    मी एक इंजिनीयर होतो.
    इलेक्ट्रिकल इंजिनीयर.
  • 10:13 - 10:18
    आणि त्यावेळी मी शिकलो, की ऊर्जा
  • 10:18 - 10:22
    कोळसा जाळून निर्माण होणारी,
  • 10:22 - 10:26
    अणुभट्टीतल्या स्फोटांतून निर्माण होणारी,
  • 10:26 - 10:29
    रोरावणाऱ्या नदीच्या प्रवाहातली,
  • 10:29 - 10:33
    सोसाट्याच्या वाऱ्यामधली,
  • 10:33 - 10:38
    तिचं परिवर्तन केल्यावर,
    लक्षावधी लोकांची आयुष्यं उजळू शकते.
  • 10:39 - 10:43
    मी हे ही शिकलो की,
    अत्यंत दुर्दम्य रूपातली ऊर्जा कशा प्रकारे
  • 10:43 - 10:48
    समाजाच्या हितासाठी
    चांगल्या कामी जुंपता येते.
  • 10:53 - 11:00
    तर आता, मी तुरुंगात कसा गेलो,
    त्या गोष्टीकडे वळतो.
  • 11:00 - 11:04
    मी डझनभर मुलांना
    गुलामगिरीतून सोडवल्याच्या आनंदात होतो.
  • 11:04 - 11:07
    त्यांना त्यांच्या पालकांच्या हातात
    सोपवलं होतं.
  • 11:07 - 11:10
    एखाद्या मुलाला मुक्त केल्यावर
    मला अवर्णनीय आनंद होतो.
  • 11:11 - 11:12
    मी खूप आनंदात होतो.
  • 11:13 - 11:19
    पण दिल्लीत परतण्यासाठी
    आगगाडीची वाट पाहत असताना,
  • 11:19 - 11:22
    मला डझनावारी मुलं येताना दिसली.
  • 11:22 - 11:26
    कोणीतरी त्यांचा अपव्यापार करीत होतं.
  • 11:26 - 11:28
    त्या लोकांना मी थांबवलं.
  • 11:28 - 11:31
    पोलिसांजवळ त्यांची तक्रार केली.
  • 11:31 - 11:35
    पण त्या पोलिसांनी मला मदत करण्याऐवजी
  • 11:35 - 11:41
    मला या छोट्या कोठडीत टाकलं,
    एखाद्या जनावरासारखं.
  • 11:42 - 11:43
    आणि त्याच संतापभरल्या रात्रीतून
  • 11:43 - 11:47
    एका अत्यंत तेजस्वी आणि
    महान कल्पनेचा जन्म झाला.
  • 11:48 - 11:53
    मला वाटलं, मी १० मुलांना मुक्त करीत असेन,
    पण आणखी ५० मुलं त्यात ओढली जात असतील,
  • 11:53 - 11:55
    तर त्यात काही अर्थ नाही.
  • 11:55 - 11:57
    ग्राहकांच्या ताकदीवर माझा विश्वास आहे.
  • 11:57 - 12:01
    आणि तुम्हाला सांगतो, एक गोष्ट
  • 12:01 - 12:06
    माझ्या हातूनच नव्हे,
    तर जगभरात प्रथमच घडली.
  • 12:06 - 12:10
    ग्राहकांना माहिती देऊन, जागरूक करून,
  • 12:10 - 12:15
    बालमजूर न वापरता बनवलेल्या गालिच्यांची
    मागणी करण्यासाठी चळवळ उभारली गेली.
  • 12:16 - 12:19
    युरोप आणि अमेरिकेत
    आम्हाला यश मिळालं आहे.
  • 12:19 - 12:24
    आणि दक्षिण आशियाई देशांत
  • 12:24 - 12:27
    बालमजुरीत ८० टक्के घट झाली आहे.
  • 12:27 - 12:30
    (टाळ्या)
  • 12:33 - 12:39
    इतकंच नव्हे, तर हा नव्याने जन्मलेला
    ग्राहकाचा संताप, किंवा ही ग्राहक चळवळ
  • 12:39 - 12:44
    इतर देशांत आणि इतर उद्योगांमध्ये
    पसरली आहे.
  • 12:44 - 12:49
    चॉकोलेट असो, कपडे असोत, पादत्राणे असोत,
    त्याहूनही पलिकडे पोहोचली आहे.
  • 12:51 - 12:53
    वयाच्या ११व्या वर्षी मी संतापलो.
  • 12:53 - 12:58
    जेव्हा मला कळलं की प्रत्येक मुलासाठी
    शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे,
  • 12:58 - 13:06
    वापरलेली पुस्तकं जमा करून, गरीब मुलांना
    मदत करण्याची कल्पना मला सुचली.
  • 13:06 - 13:09
    वयाच्या ११व्या वर्षी मी
    पुस्तक-पेढी स्थापन केली.
  • 13:11 - 13:12
    मी इतकं करून थांबलो नाही.
  • 13:12 - 13:14
    कालांतराने, मी सहसंस्थापक झालो,
  • 13:14 - 13:19
    नागरी समाजातल्या एकमेव आणि सर्वात मोठ्या
    शैक्षणिक मोहिमेचा.
  • 13:19 - 13:22
    ही मोहीम म्हणजे ग्लोबल कँपेन फॉर एज्युकेशन
  • 13:22 - 13:27
    या मोहिमेने शिक्षणाबद्दलची पूर्ण विचारसरणी
    बदलून टाकली आहे.
  • 13:27 - 13:29
    शिक्षण हा दानधर्म नसून,
    एक मानवी अधिकार ठरला आहे.
  • 13:29 - 13:34
    आणि त्यामुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांची
    संख्या कमी होण्यात ठोस मदत झाली आहे.
  • 13:34 - 13:38
    गेल्या १५ वर्षांत ही संख्या
    अर्धी झाली आहे.
  • 13:38 - 13:42
    (टाळ्या)
  • 13:44 - 13:47
    २७ व्या वर्षी मला आलेल्या संतापामुळे
  • 13:47 - 13:52
    एक मुलगी
    वेश्यागृहात विकली जाण्यापासून वाचली.
  • 13:52 - 13:57
    आणि त्यामुळे मला एक नवीन कल्पना सुचली.
  • 13:57 - 14:01
    धाड घालून सुटका करण्याचं एक नवीन तंत्र.
  • 14:01 - 14:04
    मुलांना गुलामगिरीतून सोडवण्यासाठी.
  • 14:05 - 14:11
    आणि मला सांगायला अभिमान वाटतो,
    की सुदैवाने एक नव्हे, दहा-वीस नव्हे, तर
  • 14:11 - 14:17
    ८३, ००० बालमजुरांना
    मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी मुक्त केलं आहे.
  • 14:17 - 14:20
    आणि त्यांना त्यांच्या कुटुंबांकडे,
    मातांकडे सुपूर्द केलं आहे.
  • 14:20 - 14:23
    (टाळ्या)
  • 14:26 - 14:28
    याबद्दल जागतिक धोरणं हवीत,
    हे मला ठाऊक होतं.
  • 14:28 - 14:31
    आम्ही जगभर बालमजुरीच्या विरोधात
    पदयात्रा आयोजित केल्या.
  • 14:31 - 14:37
    यातून एक नवा आंतरराष्ट्रीय ठराव
    निर्माण झाला.
  • 14:37 - 14:41
    अत्यंत वाईट परिस्थितीतल्या मुलांचं
    संरक्षण करणारा.
  • 14:42 - 14:46
    याचा ठोस परिणाम म्हणजे
    जगभरातल्या बालमजुरांची संख्या
  • 14:46 - 14:52
    गेल्या १५ वर्षांत १/३ ने कमी झाली आहे.
  • 14:52 - 14:56
    (टाळ्या)
  • 14:56 - 15:00
    तर, प्रत्येक वेळी,
  • 15:00 - 15:04
    संतापाने सुरुवात झाली.
  • 15:04 - 15:06
    त्याचं कल्पनेत रुपांतर झालं.
  • 15:06 - 15:10
    मग, कृती.
  • 15:10 - 15:12
    तर, संताप, पुढे काय?
  • 15:12 - 15:15
    कल्पना, आणि..
  • 15:15 - 15:16
    श्रोते: कृती
  • 15:16 - 15:21
    कै. स.: संताप, कल्पना, कृती.
    जे करण्याचा मी प्रयत्न केला.
  • 15:22 - 15:25
    संताप ही एक शक्ती आहे,
    संताप ही एक ऊर्जा आहे.
  • 15:25 - 15:28
    आणि निसर्ग नियमानुसार,
  • 15:28 - 15:33
    ऊर्जा निर्माण करता येत नाही,
    किंवा नष्टही करता येत नाही.
  • 15:33 - 15:40
    तर मग, संतापाच्या ऊर्जेचं परिवर्तन करून,
    तिला कामाला का जुंपू नये?
  • 15:40 - 15:44
    एक जास्त चांगलं, सुंदर, निःपक्ष
    आणि न्यायपूर्ण जग निर्माण करण्यासाठी.
  • 15:45 - 15:47
    आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात
    संताप असतोच.
  • 15:47 - 15:53
    आणि आता थोडक्यात एक गुपित सांगतो.
  • 15:53 - 16:01
    आपण अहंकाराच्या अरुंद कवचात
    बंदिस्त राहिलो,
  • 16:01 - 16:05
    स्वार्थाच्या वर्तुळात फिरत राहिलो,
  • 16:05 - 16:13
    तर संतापाचं रुपांतर
    तिरस्कार, हिंसा, सूड, नाश यात होईल.
  • 16:14 - 16:17
    पण आपण ही वर्तुळं भेदू शकलो,
  • 16:17 - 16:22
    तर त्याच संतापाचं रूपांतर
    एका महान शक्तीमध्ये होईल.
  • 16:22 - 16:27
    आपण आपल्या अंगभूत करुणेद्वारे
    ही वर्तुळं भेदू शकतो.
  • 16:27 - 16:31
    आणि जगाशी करुणेतून संबंध जोडू शकतो.
    जग जास्त चांगलं बनवू शकतो.
  • 16:31 - 16:34
    तोच संताप करुणेत रूपांतरित करता येऊ शकतो.
  • 16:34 - 16:39
    तर प्रिय मित्रांनो, बंधुंनो आणि भगिनींनो,
    नोबेल विजेता या नात्याने, पुन्हा एकदा
  • 16:40 - 16:43
    मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा
  • 16:44 - 16:47
    मी तुम्हाला विनवतो, संतापी व्हा.
  • 16:48 - 16:52
    आपल्यापैकी सर्वात जास्त संतापी तो,
  • 16:52 - 17:00
    जो आपल्या संतापाचं रुपांतर
    कल्पना आणि कृतीमध्ये करेल.
  • 17:00 - 17:02
    अनेक धन्यवाद.
  • 17:02 - 17:06
    (टाळ्या)
  • 17:15 - 17:19
    ख्रिस एण्डर्सन: गेली अनेक वर्षे
    आपण अनेकांचं प्रेरणास्थान आहात.
  • 17:19 - 17:22
    तुम्हाला प्रेरणा कोणापासून किंवा
    कशापासून मिळते? आणि का?
  • 17:23 - 17:24
    कै.स. : प्रश्न चांगला आहे.
  • 17:24 - 17:28
    ख्रिस, तुम्हाला मी सत्य सांगतो,
  • 17:28 - 17:33
    दरवेळी जेव्हा मी एखाद्या मुलाला
    मुक्त करतो,
  • 17:33 - 17:37
    तेव्हा आपल्या मातेला पुन्हा भेटण्याची आशा
    सोडून दिलेल्या त्या मुलाचं,
  • 17:37 - 17:41
    मुक्त झाल्यावरचं हास्य,
  • 17:41 - 17:44
    आणि आपलं मूल
  • 17:44 - 17:51
    परत येऊन आपल्या मांडीवर बसेल
    ही आशा पूर्णपणे गमावलेल्या मातेच्या
  • 17:51 - 17:53
    गालावर ओघळणारा तो आनंदाचा पहिला अश्रु.
  • 17:53 - 17:58
    त्यांच्या अनावर झालेल्या भावना.
  • 17:58 - 18:01
    त्यात मला देवाची झलक दिसते.
    तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा.
  • 18:01 - 18:06
    आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे,
    एकदा नव्हे, तर हजारो वेळा
  • 18:06 - 18:10
    मला माझा हा देव पाहण्याचं
    भाग्य लाभलं आहे.
  • 18:10 - 18:12
    आणि तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा.
  • 18:12 - 18:14
    धन्यवाद.
  • 18:14 - 18:16
    (टाळ्या)
Title:
जगात शांतता कशी आणायची? संतापून.
Speaker:
कैलाश सत्यार्थी
Description:

भारतात, एका उच्च जातीत जन्मलेल्या तरुणाने ८३, ००० मुलांना गुलामगिरीतून कसं वाचवलं? जगात चांगला बदल घडवू इच्छिणाऱ्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी एक आश्चर्यकारक सल्ला देताहेत: अन्यायाविरुद्ध संतापून उठा. या ताकदवान भाषणात ते दाखवून देताहेत, एका संतापभरल्या आयुष्यातून एक शांतताजनक आयुष्य कसं निर्माण झालं.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
18:29
Abhinav Garule approved Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Abhinav Garule edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Retired user edited Marathi subtitles for How to make peace? Get angry
Show all

Marathi subtitles

Revisions