Return to Video

समीपच्या विजयाला अंगीकारा

  • 0:01 - 0:04
    मी स्वतःला खूप सुदैवी समजते की
    माझी पहिली नोकरी
  • 0:04 - 0:06
    आधुनिक कला संग्रह्यालायामध्ये होती,
  • 0:06 - 0:10
    चित्रकार एलिझाबेथ मूरी यांच्या कलाकृतींवर
    सिंहावलोकनात्मक काम ही.
  • 0:10 - 0:12
    मी त्यांच्या पासून खूप काही शिकले.
  • 0:12 - 0:14
    संग्रहालय प्रमुख रॉबर्ट स्टॉर ह्यांनी
  • 0:14 - 0:16
    एलिझाबेथ ह्यांच्या जीवनभरातील कलासाधानेतून
  • 0:16 - 0:18
    सर्व निवडक चित्रांचा संच बनविल्यावर,
  • 0:18 - 0:22
    मला १९७० सुमारासची चित्रे पाहणे खूप आवडले.
  • 0:22 - 0:24
    त्या चित्रांमध्ये काही नमुने आणि घटक होते
  • 0:24 - 0:28
    जे त्यांच्या आयुष्यात पुन्हा येणार होते.
  • 0:28 - 0:29
    मला लक्षात आहे मी त्यांना विचारले होते
  • 0:29 - 0:32
    त्यांच्या सुरवातीच्या कामबद्दल
    त्यांचा काय विचार आहे.
  • 0:32 - 0:34
    जर माहिती नसेल की हे काम त्यांचे आहे,
  • 0:34 - 0:36
    तर तुम्ही खचितच ते ओळखू शकाल.
  • 0:36 - 0:39
    त्या मला म्हणाल्या की काही चित्रांचा दर्जा
  • 0:39 - 0:42
    त्यांना जसा हवा होता तसा मुळीच झाला नाही.
  • 0:42 - 0:43
    त्यांची एक कलाकृती,
  • 0:43 - 0:45
    त्यांच्या दृष्टीने इतकी निकृष्ट बनली होती
  • 0:45 - 0:48
    की त्यांनी ती त्यांच्या कार्यालयातील
    कचरा पेटीत टाकून दिली,
  • 0:48 - 0:50
    परंतु त्यांच्या शेजाऱ्यांनी ती घेतली,
  • 0:50 - 0:53
    कारण तिने त्याचे मूल्य जाणले.
  • 0:53 - 0:56
    ह्या क्षणाला, माझा यश आणि सृजनशीलता
  • 0:56 - 0:58
    ह्या बाबतचा दृष्टीकोन बदलला.
  • 0:58 - 1:01
    मी जाणले की, यश हा एक क्षण आहे
  • 1:01 - 1:03
    पण आपण नेहमी जे साजरे करतो
  • 1:03 - 1:07
    ते म्हणजे सृजनशीलता आणि नैपुण्य.
  • 1:07 - 1:11
    अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्या यशाला
  • 1:11 - 1:13
    नैपुण्यामध्ये रुपांतरीत करते?
  • 1:13 - 1:16
    हा प्रश्न मी स्वतःला अनेकदा विचारला.
  • 1:16 - 1:18
    मला वाटते, नैपुण्य प्राप्त होते जेंव्हा
  • 1:18 - 1:22
    आपण समीप यशाच्या भेटीचे
    महत्त्व समजावून घेतो.
  • 1:22 - 1:24
    मला हे महत्त्व उमगले जेव्हा मी
  • 1:24 - 1:26
    मे महिन्यातील एका थंड दिवशी
  • 1:26 - 1:29
    विद्यालयीन तिरंदाजांचा चमू पाहायला गेले.
  • 1:29 - 1:31
    जणू काही प्राक्तनच
    म्हणून त्या सर्व स्त्रिया
  • 1:31 - 1:33
    मॅनहॅटनच्या उत्तर टोकावर वसलेल्या
  • 1:33 - 1:36
    कोलंबियाच्या बेकर व्यायाम संकुलात
    जमल्या होत्या.
  • 1:36 - 1:40
    मला तिरंदाजांचा विरोधाभास काय असतो
    हे पहायचे होते.
  • 1:40 - 1:43
    अशी कल्पना ज्यात तुम्हाला
    लक्ष्य प्राप्त करण्यासाठी,
  • 1:43 - 1:47
    निशाणा खऱ्या लक्ष्य पासून
    थोडा तिरपा लावावा लागतो.
  • 1:47 - 1:49
    मी बाजूला उभी राहून पाहत होते जसे
  • 1:49 - 1:52
    प्रशिक्षक ह्या स्त्रियानां करड्या
    गाडीतून नेत होते.
  • 1:52 - 1:55
    त्या ऊत्साही होत्या एक आरामशीर
    निशाणा साधण्यासाठी.
  • 1:55 - 1:58
    एकीने एका हातात अर्धवट
    खाल्लेल्या आइस्क्रीमचा कोन
  • 1:58 - 2:01
    आणि डाव्यामध्ये पिवळी
    वातकुक्कूट असलेले बाण होते.
  • 2:01 - 2:03
    त्या माझ्या समोरून हसत गेल्या.
  • 2:03 - 2:05
    पण त्यांनी माझे लक्ष वेधले,
  • 2:05 - 2:07
    कारण जशा त्या गवतावरून चालू लागल्या
  • 2:07 - 2:09
    आणि एकमेकींन सोबत शब्दांनी नव्हे
  • 2:09 - 2:11
    तर आकड्या आणि अंशांमध्ये बोलू लागल्या.
  • 2:11 - 2:13
    मला वाटले त्या लक्ष्य कसे भेदायचे
  • 2:13 - 2:15
    ह्याची योजना बनवत आहेत.
  • 2:15 - 2:17
    मी एका तिरांदाजाच्या पाठीमागे उभी राहिले.
  • 2:17 - 2:20
    त्यांचे प्रशिक्षक आमच्यामध्ये
    उभे राहून बहुधा
  • 2:20 - 2:22
    कोणाला मदतीची गरज आहे हे पाहत होते.
  • 2:22 - 2:24
    कोणी त्या दहा वर्तुळात देखील कसे मारू शकते
  • 2:24 - 2:27
    हे माझ्या आकलनाच्या पलीकडचे होते.
  • 2:27 - 2:29
    ती दहा वर्तुळे ठरवलेल्या
    ७५ यार्डच्या अंतरावरून
  • 2:29 - 2:32
    आगकाडीचे टोक हातभार लांब
    धरल्यावर जितके छोटे दिसेल
  • 2:32 - 2:34
    तितकी लहान भासत होती.
  • 2:34 - 2:38
    आणि हे सर्व ५० पौंडचे वजन पेलून,
  • 2:38 - 2:39
    प्रत्येक निशाणा साधताना.
  • 2:39 - 2:42
    तिने प्रथम सातव्या वर्तुळात
    निशाणा साधला व मग नवव्या,
  • 2:42 - 2:45
    नंतरचे दोन दहाव्या व पुढचा बाण
    तर लक्ष्याला लागला सुद्धा नाही
  • 2:45 - 2:47
    मी पहिले की ह्यांने तिला
  • 2:47 - 2:50
    अजूनच चिकाटी भेटली आणि तिने वारंवार
  • 2:50 - 2:53
    लक्ष्य साधण्याचा प्रयत्न केला.
  • 2:53 - 2:56
    तीन तासांसाठी असाच प्रकार सुरु होता.
  • 2:56 - 2:58
    सरावाच्या शेवटी एक तिरंदाज इतकी थकली होती
  • 2:58 - 3:02
    की ती जमिनीवर तारा
    माशांना सारखी पडून राहिले.
  • 3:02 - 3:05
    आभाळाकडे पाहत ती जणू काही शोधायचा
    प्रयत्न करत होती.
  • 3:05 - 3:08
    टी. एस. इलियट त्याला फिरत्या जगातील
  • 3:08 - 3:11
    स्थिर बिंदू शोधणे असे खचितच म्हणतील.
  • 3:11 - 3:13
    असे अमेरीकेच्या संस्कृतीमध्ये
    खूप दुर्मिळपण आढळते.
  • 3:13 - 3:16
    आता इथे पेशासंबंधित काही असे वाटत नाही.
  • 3:16 - 3:18
    हेकेखोरपण इतक्या उच्चकोटीच्या
  • 3:18 - 3:21
    तंतोतंतपनासोबत कसा भासतो.
  • 3:21 - 3:24
    शरीराला एकाच पवित्र्यामध्ये तीन तासांसाठी
  • 3:24 - 3:27
    लक्ष्य साधण्यासाठी ठेवणे,
    हे असे वाटे जसे की
  • 3:27 - 3:31
    अस्पष्टतेत उत्कृष्टता
    शोधण्याचा प्रयत्न आहे.
  • 3:31 - 3:33
    तरी मी तिथे थांबले कारण मला जाणवले
  • 3:33 - 3:35
    की यश आणि नैपुण्य ह्यामध्ये काय फरक आहे
  • 3:35 - 3:38
    ह्याचे दुर्मिळ असे ओझरते दर्शन
    मला मिळत आहे.
  • 3:38 - 3:41
    जर यश हे दहा वर्तुळात लक्ष्य साधने आहे
  • 3:41 - 3:44
    तर नैपुण्य हे जाण्यात आहे की
    हे यश निरर्थक आहे
  • 3:44 - 3:47
    जर ते वारंवार मिळवू शकलो नाही तर.
  • 3:47 - 3:49
    नैपुण्य म्हणजे उत्कृष्टता नव्हे.
  • 3:49 - 3:52
    नैपुण्य हे यशासारखे ही नाही,
  • 3:52 - 3:54
    यश मला एखाद्या घटनेप्रमाणे वाटतो,
  • 3:54 - 3:57
    जसे की काळातील एक क्षण
  • 3:57 - 4:00
    आणि एक शिक्का जे जग तुम्हाला चिटकवते.
  • 4:00 - 4:03
    नैपुण्य हे लक्ष्य साधने नव्हे
  • 4:03 - 4:06
    तर एक निरंतर साधना आहे.
  • 4:06 - 4:08
    असे करायला काय सहायभूत ठरते?
  • 4:08 - 4:11
    अधिक जिद्दीने पुढे जायचे असेल तर
  • 4:11 - 4:14
    समीपच्या यशाचे महत्त्व जाणले पाहीजे.
  • 4:14 - 4:17
    कित्येकदा आपण ज्याला श्रेष्ठ दर्जाचा,
  • 4:17 - 4:19
    उत्कृष्ठ नमुना असे गौरवान्वित करतो
  • 4:19 - 4:21
    परंतु त्यांच्या निर्मात्याच्या दृष्टीने
  • 4:21 - 4:24
    ते बरेच अपूर्ण, अडचणी
    आणि चुकांचा गुंता झालेल असते.
  • 4:24 - 4:27
    दुसऱ्या शब्दात सांगायचे तर,
    ते एक सामीपचे यश असते?
  • 4:27 - 4:30
    एलिझाबेथ मूरी ह्यांनी
    आपल्या सुरवातीच्या चित्रांबद्दल
  • 4:30 - 4:33
    दिलेल्या कबुलीने
    मला आश्चर्यचकित करून सोडले.
  • 4:33 - 4:36
    चित्रकार पॉल सेझान ह्यांना अनेकदा वाटे
  • 4:36 - 4:38
    की त्यांची चित्रे अपूर्ण राहिलीत.
  • 4:38 - 4:40
    अशी चित्रे ते मुद्दामहून पुन्हा
  • 4:40 - 4:41
    काम करायचे म्हणून बाजूला काढून ठेवीत.
  • 4:41 - 4:43
    पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटी,
  • 4:43 - 4:45
    ह्याचा परिणाम असा झाला की ते केवळ
  • 4:45 - 4:48
    १० टक्केच चित्रे स्वाक्षरीकृत करू शकले.
  • 4:48 - 4:50
    त्यांची आवडती कादंबरी हानोर डी बाल्झाक
  • 4:50 - 4:54
    ह्यांची "द [अनफिनीशड] मास्टरपीस" होती व त्यांना
  • 4:54 - 4:57
    स्वतः मुख्य पात्रातील चित्रकार
    असल्यासारखे वाटे.
  • 4:57 - 5:00
    फ्रान्झ क्फॅका अपूर्णता
    पाहत जिथे इतरांन फक्त
  • 5:00 - 5:03
    प्रशंसनीय काम जाणवे,
    ते ही इतके की त्यांना त्यांची
  • 5:03 - 5:07
    रोजनिशी, हस्तलिखित,
    पत्रे व रेखाकृतीही त्यांच्या मृत्यूनंतर
  • 5:07 - 5:10
    जाळून टाकलेल्या हव्या होत्या.
  • 5:10 - 5:12
    त्यांच्या मित्राने ह्या विनंतीला नाकारले
  • 5:12 - 5:15
    आणि म्हणूनच आता आपल्याकडे क्फॅका ह्यांचे
  • 5:15 - 5:19
    सर्व काम आहे : "अमेरिका",
    "द ट्रायल" व "द केॅसल"
  • 5:19 - 5:22
    इतके अपूर्ण काम ज्यात
    वाक्यही अर्धवट संपतात.
  • 5:23 - 5:29
    नैपुण्याची साधना ही
    सदोदीत पुढेच जाणारी असते.
  • 5:29 - 5:32
    "प्रभु, मी प्राप्त करू शकतो त्याहून अधिकची
  • 5:32 - 5:34
    अपेक्षा करायचे मला वरदान दे."
  • 5:34 - 5:36
    मायकेलइंजलो विनवणी करतोय जसे की
  • 5:36 - 5:39
    जुन्या करारातील सिस्टीन चॅपलवरील देवाला
  • 5:39 - 5:41
    विनवणी करणारा अॅडम तो स्वतः होता
  • 5:41 - 5:43
    ज्याचे बोट बाहेर ताणलेले आहे
  • 5:43 - 5:46
    पण देवाच्या हाताला तरीही
    स्पर्श करू शकत नाही.
  • 5:47 - 5:52
    नैपुण्य हे पोचण्यात आहे, आगमनात नाही.
  • 5:52 - 5:54
    तो एक निरंतर ध्यास आहे
  • 5:54 - 5:57
    जो तुम्ही जेथे आहात तेथून
    जेथे पोचायचे आहे ह्यातील
  • 5:57 - 6:00
    अंतर मिटवण्यासाठी उद्युक्त करतो.
  • 6:00 - 6:02
    नैपुण्य हे कौशल्य मिळवण्यासाठी
    बलिदान करण्याबाबत आहे,
  • 6:02 - 6:07
    कारकीर्द घडविण्यासाठी नाही.
  • 6:07 - 6:09
    असे किती संशोधक आणि उदयोजक असतील
  • 6:09 - 6:12
    जे अशा अपूर्व कल्पक्तेने जगले.
  • 6:12 - 6:14
    आपण हे दुर्दम्य अशा आर्क्टिकची
  • 6:14 - 6:17
    मुशाफिरी करणाऱ्या बेन सँडर्स
    ह्यांच्या आयुष्यात ही पाहू शकतो.
  • 6:17 - 6:20
    मला ते सांगतेय की त्यांचे विजय हे केवळ
  • 6:20 - 6:22
    उत्तुंग अशी कामगिरी बजावल्याच परिपाक नसून
  • 6:22 - 6:26
    समीप यशाच्या मालिकेतून
    मिळणाऱ्या प्रेरणेमुळे आहेत.
  • 6:27 - 6:30
    जेंव्हा आपण आपल्या अग्रगण्य
    बाबीत टिकाव धरून राहतो
  • 6:30 - 6:32
    तेंव्हाच आपली भरभराट होते.
  • 6:32 - 6:34
    डयूक एलींगटन ह्यांना हे शहाणपण उमगले होते.
  • 6:34 - 6:38
    ते म्हणत, त्यांचा सर्व गाण्यंपैकी
    नेहमी पुढील गाणे, जे अद्याप
  • 6:38 - 6:40
    त्यांना रचायचे आहे ते त्यांचे
    सर्वात आवडते गाणे असेल.
  • 6:43 - 6:45
    समीपचे यश हे नैपुण्यचा मूलभूत घटक
  • 6:45 - 6:47
    असण्याचे एक कारण म्हणजे
  • 6:47 - 6:49
    जितके अधिक आपण एक विषयावर प्राविण्य मिळवतो
  • 6:49 - 6:51
    तितक्याच स्पष्टपणे आपणास दिसून येते की
  • 6:51 - 6:54
    आपल्याला त्या विषय संबधित
    बरेच काही माहित नाही
  • 6:54 - 6:56
    जे पूर्वी माहित आहे असेच वाटत होते.
  • 6:56 - 6:58
    ह्या परिणामाला डनींग-कृगर असे ओळखले जाते.
  • 6:58 - 7:01
    द पॅरिस रिव्यूने जेम्स बॉल्डविनकडून
    हे वदवून घेतले.
  • 7:01 - 7:02
    जेंव्हा त्यांना विचारले गेले,
  • 7:02 - 7:05
    "ज्ञानासोबत काय वृद्धिंगत होते
    असे तुम्हांला वाटते ?"
  • 7:05 - 7:08
    जेम्स उत्तरले, "तुम्हाला आपण
    किती कमी जाणतो हे कळते."
  • 7:08 - 7:10
    यश प्रेरणा देते परंतु समीपच्या विजयने
  • 7:10 - 7:13
    आपल्या नैपुण्याच्या निरंतर
    शोधाला अजून बळ मिळेत.
  • 7:13 - 7:15
    ह्याचे एक ठळक उदाहरण निदर्शनास येते
  • 7:15 - 7:18
    जेंव्हा आपण ऑलंपिक्सच्या रजत पदक विजेत्या
  • 7:18 - 7:20
    आणि कांस्य पदक विजेत्यातील फरकाचे
  • 7:20 - 7:22
    स्पर्धा झाल्यानंतर अवलोकन करतो.
  • 7:22 - 7:25
    थॉमस गिलोवीच
    व त्यांच्या कॉर्नेल मधील संघाने
  • 7:25 - 7:27
    ह्या फरकाचा अभ्यास केला.
    त्यांना असे आढळून आले -
  • 7:27 - 7:30
    कांस्य विजेते, हे रजत विजेत्याच्या तुलनेत
  • 7:30 - 7:32
    जरा आनंदी असतात कारण जर त्यांना चौथे स्थान
  • 7:32 - 7:34
    प्राप्त झाले असते तर पदका पासून वंचित
  • 7:34 - 7:35
    राहावे लागले असते.
  • 7:35 - 7:37
    पण रजत विजेत्यांच्या मनातील विफलता
  • 7:37 - 7:39
    त्याना पुढील स्पर्धेवर लक्षकेंद्रित
  • 7:39 - 7:40
    करण्यासाठी सहायभूत होते.
  • 7:40 - 7:44
    आपण हे जुगारी उद्योगात पण पाहू शकतो,
  • 7:44 - 7:47
    ज्यांनी समीपच्या यशाचा
    मंत्र अंगिकारला होता.
  • 7:47 - 7:49
    त्यांनी स्क्रॅच-ऑफ तिकीट बनविली ज्यात
  • 7:49 - 7:52
    समीपच्या विजयाची शक्यता सरासरीहून अधिक होती.
  • 7:52 - 7:55
    त्यामुळे लोक तिकीट घेण्याकडे
    इतके आकर्षित झाले
  • 7:55 - 7:58
    की त्यांना स्पंदने-रोखणारे असे नावाजले गेले ते ही
  • 7:58 - 8:00
    ब्रिटनमध्ये १९७०च्या काळात,
  • 8:00 - 8:02
    जेंव्हा जुगारी उद्योगाला केवळ
    दूषणे लावली जात असत.
  • 8:02 - 8:04
    समीपचा विजय प्रेरक असतो कारण,
  • 8:04 - 8:07
    तो आपला सभोवार
    परिस्थितीबद्दलचा दृष्टीकोन बदलतो
  • 8:07 - 8:10
    आणि आपली ध्येय - जी आपण दूरवर ठेवत असतो
  • 8:10 - 8:12
    त्यांना आपण आहोत त्याच्या अवतीभवती
  • 8:12 - 8:15
    आणून ठेवण्यास मदत करतो.
  • 8:15 - 8:17
    जर मी तुम्हाला विचारले की
  • 8:17 - 8:20
    पुढच्या आठवड्यातील एका उत्तम
    दिवसाची कल्पना करा
  • 8:20 - 8:23
    तर तुम्ही त्याचे वर्णन
    ढोबळमानानेच करू शकाल.
  • 8:23 - 8:25
    पण जर मी तुम्हाला TED मधील उद्याच्या उत्तम
  • 8:25 - 8:27
    दिवसाचे वर्णन करायला सांगितले तर
  • 8:27 - 8:30
    तुम्ही ते व्यवहार्य सुस्पष्टतेने
    बारकाव्यांसकट सांगू शकाल
  • 8:30 - 8:32
    हेच तर समीपच्या यशाचे सार आहे.
  • 8:32 - 8:35
    ते आपले लक्ष केंद्रित करते
    आत्ता काय करायला पहिजे
  • 8:35 - 8:38
    तो दृष्टीक्षेपातला पर्वत ओलांडायचा असेल तर.
  • 8:38 - 8:40
    १९८४ मध्ये जॅकी जॉयनर-कर्सी
  • 8:40 - 8:43
    हेप्टीलॉन क्रीडा प्रकारात स्वर्णाला मुकली,
  • 8:43 - 8:45
    ते ही केवळ एकत्रितीयांश सेकंदाने.
  • 8:45 - 8:48
    तिच्या पतीने अनुमान केले की हे अपयश तिला
  • 8:48 - 8:51
    पुढील स्पर्धेत जिंकण्यासाठी
    आवश्यक प्रबळ निर्धार देईल.
  • 8:51 - 8:53
    १९८८ मध्ये तिने
    हेप्टीलॉनमध्ये स्वर्ण पटकावले,
  • 8:53 - 8:57
    आणि ७,२९१ गुणांचा कीर्तिमान प्रस्थापित केला.
  • 8:57 - 9:00
    असा कीर्तिमान ज्याच्या जवळपास
    कोणताही व्यायामपटू
  • 9:00 - 9:03
    अजूनही पोचू शकला नाही.
  • 9:03 - 9:06
    आपण जेव्हा सगळे झाले
    तेंव्हा भरभराट पावत नाही
  • 9:06 - 9:10
    तर अजूनही आपल्याला काही
    करायचे शिल्लक असते तेंव्हा.
  • 9:10 - 9:13
    मी ह्या खोलीत विचार करत,
    अचंबित होऊन उभी आहे..
  • 9:13 - 9:15
    किती विभिन्न प्रकारे
  • 9:15 - 9:17
    आपणसुद्धा एक समीप विजय उत्पन्न करू शकतो.
  • 9:17 - 9:20
    आपल्या आयुष्यात हे आपोआप घडून येत असेल
  • 9:20 - 9:22
    कारण अंतरंगात आपल्याला ते माहिती आहे.
  • 9:22 - 9:25
    आपण जाणतो की जेंव्हा आपण अग्रगण्य बाबीत
  • 9:25 - 9:27
    टिकुन राहतो तेंव्हाच आपली भरभराट होते.
  • 9:27 - 9:30
    म्हणूनच की काय,
    एक जाणीवपूर्वक अपूर्णता ठेवणे
  • 9:30 - 9:33
    निर्मिती मान्यतेतला अंगीभूत घटक बनली आहे.
  • 9:33 - 9:36
    नॅवाहो संस्कृतीमध्ये,
    काही कुशल कारागीर स्त्री, पुरुष
  • 9:36 - 9:38
    त्यांनी बनवलेल्या कापडामध्ये आणि भांड्यात
  • 9:38 - 9:41
    जाणीवपूर्वक एखादा दोष ठेवत.
  • 9:41 - 9:43
    ह्याला "चैतन्य रेषा" असे संबोधत,
  • 9:43 - 9:45
    आकृतीबंधातील एक जाणीवपूर्वक दोष,
  • 9:45 - 9:48
    विणणाऱ्याला किंवा घडवणाऱ्याला
    केवळ चुकीसाठी पळवाटच नाही
  • 9:48 - 9:51
    तर सातत्याने काम करण्यास
    उद्युक्त करणारा देखील.
  • 9:51 - 9:53
    प्रवीण असलेल लोक तज्ञ ह्यामुळे नसतात
  • 9:53 - 9:56
    कारण ते विषयाला त्याच्या
    संकल्पनात्मक शेवटापर्यंत नेतात.
  • 9:56 - 9:59
    तर ते प्रवीण असतात कारण त्यांना
  • 9:59 - 10:01
    कळलेले असते की असा
    काही शेवटच अस्तित्वात नाहीये.
  • 10:01 - 10:04
    मी ह्या बाबत विचार करताना उमगले की,
  • 10:04 - 10:06
    ते तिरंदाज प्रशिक्षक सराव सत्राच्या
  • 10:06 - 10:09
    शेवटी तिरंदाजांच्या
    अपरोक्ष मला का म्हणाले की,
  • 10:09 - 10:11
    त्यांना व त्याच्या सहकार्यांना ते संघासाठी
  • 10:11 - 10:13
    कधीच पुरेसं करतात असे वाटत नाही.
  • 10:13 - 10:15
    त्यांना कधीच वाटत नाही
    की त्यांच्याकडे पुरेशा
  • 10:15 - 10:18
    कल्पना सहायक पध्दती
    व पवित्रा दृढीकरण आसने आहेत
  • 10:18 - 10:22
    जी तिरांदाजांना सततच्या समीपच्या
    यशापुढे जाण्यास मदत करतील.
  • 10:22 - 10:24
    हे अगदी तक्रारी सारखे नाही वाटले
    पण त्यांचा हा एक
  • 10:24 - 10:27
    प्रयास होता त्यांच्या भावना मला कळवण्याचा.
  • 10:27 - 10:29
    ती एक प्रकारची मूक संमती होती.
  • 10:29 - 10:31
    मला पुन्हा जाणीव करून द्यायला
  • 10:31 - 10:34
    की ते स्वतःला एका आसक्त आणि अपूर्ण
  • 10:34 - 10:36
    मार्गक्रमणासाठी झोकून देत आहेत
  • 10:36 - 10:38
    ज्यात कितीही केले तरी कमीच असते.
  • 10:38 - 10:42
    आपण एका अपूर्ण कल्पनेतून घडत असतो
  • 10:42 - 10:45
    जरी ती कल्पना भूतकाळातील आपण स्वतःच असतो.
  • 10:45 - 10:48
    हे नैपुण्यतेचे प्रेरणास्थान आहे.
  • 10:48 - 10:51
    तुम्हाला हवे होते असा
    ज्याबाबत तुम्ही विचार करता
  • 10:51 - 10:53
    त्याचा निकट पोचणे तुम्हाला
    सहाय्यक ठरू शकते
  • 10:53 - 10:55
    बरंच काही साध्या करायला,
  • 10:55 - 10:58
    ज्याचा तुम्ही स्वप्नांतही विचार केला नाही.
  • 10:58 - 11:00
    मी अशी कल्पना करते की
    हाच विचार एलिझाबेथ मूरीही
  • 11:00 - 11:03
    प्रदर्शनात मांडलेल्या आपल्या
    सुरवातीच्या चित्रांकडे
  • 11:03 - 11:06
    पाहून हसताना करत असतील.
  • 11:06 - 11:09
    जरी आपण आदर्श परिस्थिती निर्माण केली,
  • 11:09 - 11:12
    तरीही माझ्या मते आपण अपूर्णतेतच असू.
  • 11:12 - 11:14
    पूर्णत्व हे एक ध्येय आहे, पण आपण आशा करू
  • 11:14 - 11:18
    की तो शेवट बनणार नाही.
  • 11:18 - 11:19
    धन्यवाद.
  • 11:19 - 11:24
    (टाळ्या)
Title:
समीपच्या विजयाला अंगीकारा
Speaker:
साराह लुईस
Description:

कला इतिहासकार साराह लुईस ह्यांनी आपल्या संग्रहालयातील पहिल्या नौकरीत त्या अभ्यास करत असलेल्या कलाकाराबद्दल एक महत्वपूर्ण गोष्ट जाणली - सर्वच कलाकृती ह्या सर्वतोपरी उत्कृष्ट नसतात. त्या आपल्याला आयुष्यातील अगदी पराभव, समीपचा विजय ह्यांचे महत्व जाणायला सांगतात. आपल्या यश आणि नैपुण्य गाठण्याच्या निरंतर वाटचालीमध्ये, समीपचे विजय खरंच प्रेरणादायी ठरते काय?

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
11:41
Abhinav Garule edited Marathi subtitles for Embrace the near win
Abhinav Garule edited Marathi subtitles for Embrace the near win
Abhinav Garule edited Marathi subtitles for Embrace the near win
Abhinav Garule approved Marathi subtitles for Embrace the near win
Arvind Patil commented on Marathi subtitles for Embrace the near win
Rahul Date edited Marathi subtitles for Embrace the near win
Rahul Date edited Marathi subtitles for Embrace the near win
Rahul Date accepted Marathi subtitles for Embrace the near win
Show all

Marathi subtitles

Revisions