Return to Video

सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?

  • 0:01 - 0:04
    मी एक पर्यटन उद्योजक आहे
    आणि मी शांतीदूतही आहे.
  • 0:04 - 0:07
    पण मी काही अशी सुरुवात केली नव्हती.
  • 0:07 - 0:10
    सात वर्षांचा असताना, मी टीव्ही पाहायचो.
  • 0:10 - 0:12
    तेव्हा लोक दगडफेक करताना पाहिल्याचं
    मला आठवतंय.
  • 0:12 - 0:16
    आणि, हे काहीतरी मजेशीर आहे,
    असं वाटल्याचं आठवतंय.
  • 0:16 - 0:18
    म्हणून मग मी रस्त्यावर जाऊन
    दगड फेकले होते.
  • 0:18 - 0:23
    पण दगड इस्त्रायली वाहनांवर फेकायचे होते,
    हे काही मला ठाऊक नव्हतं.
  • 0:23 - 0:27
    त्याऐवजी माझे दगड माझ्या शेजाऱ्यांच्याच
    वाहनांवर पडले होते.
  • 0:27 - 0:31
    माझ्या देशभक्तीत त्यांना रस नव्हता.
  • 0:31 - 0:33
    हे छायाचित्र आहे माझ्या भावाबरोबरचं.
  • 0:33 - 0:36
    यातला धाकटा म्हणजे मी.
    तुम्हाला काय वाटतंय, मला ठाऊक आहे:
  • 0:36 - 0:39
    किती गोड होतास तू!
    आणि आता असं काय रे झालं तुझं?
  • 0:39 - 0:41
    पण माझा भाऊ, माझ्यापेक्षा मोठा आहे तो,
  • 0:41 - 0:43
    वयाच्या अठराव्या वर्षी पकडला गेला.
  • 0:43 - 0:46
    दगडफेकीच्या आरोपावरून तो तुरुंगात गेला.
  • 0:46 - 0:50
    दगडफेकीची कबुली दिली नाही म्हणून
    त्याला मारहाण करण्यात आली.
  • 0:50 - 0:52
    त्यामुळे त्याला आंतरिक जखमा झाल्या.
  • 0:52 - 0:57
    आणि त्यामुळे, सुटकेनंतर लवकरच
    त्याचा अंत झाला.
  • 0:57 - 1:00
    मी चिडलो होतो. कडवा बनलो होतो.
  • 1:00 - 1:04
    मला फक्त सूड घ्यायचा होता.
  • 1:04 - 1:07
    पण १८ वर्षांचा झालो, तेव्हा हे बदललं.
  • 1:07 - 1:10
    नोकरी मिळवण्यासाठी हिब्रू भाषा यायला हवी,
    असं मला वाटलं.
  • 1:10 - 1:13
    आणि हिब्रू शिकायला त्या वर्गात गेल्यावर
  • 1:13 - 1:18
    प्रथमच मला सैनिक नसलेले ज्यू लोक भेटले.
  • 1:18 - 1:23
    आणि अगदी छोट्या गोष्टींमुळे मैत्री जुळली.
    उदाहरणार्थ, माझी कंट्री मुझिक ची आवड.
  • 1:23 - 1:27
    जी पेलेस्टिनी लोकांत सापडणं अजबच.
  • 1:27 - 1:31
    पण त्याचवेळी माझ्या लक्षात आलं, की
    रागाची, द्वेषाची आणि अज्ञानाची एक भिंत
  • 1:31 - 1:37
    आमच्यामध्ये आहे,
    जी आम्हाला दूर ठेवते आहे.
  • 1:37 - 1:41
    मी ठरवलं, की आपल्याला कशाचा सामना
    करावा लागतो, याला महत्त्व नाही.
  • 1:41 - 1:44
    महत्त्वाचं आहे,
    मी त्याचा सामना कसा करतो, ते.
  • 1:44 - 1:47
    आणि म्हणून, मी ठरवलं, की
    लोकांना दूर ठेवणाऱ्या भिंती पाडण्यासाठी
  • 1:47 - 1:52
    आपलं आयुष्य समर्पित करायचं.
  • 1:52 - 1:54
    मी हे अनेक मार्गांनी करतो.
  • 1:54 - 1:57
    पर्यटन हा त्यातला एक.
    तसंच, प्रसारमाध्यमं आणि शिक्षण.
  • 1:57 - 2:01
    तुम्हाला वाटत असेल, खरंच?
    पर्यटनामुळे गोष्टी बदलतात?
  • 2:01 - 2:02
    ते भिंती पाडू शकतं? हो.
  • 2:02 - 2:07
    त्या भिंती पाडण्याचा,
    पर्यटन हा सर्वात जास्त टिकणारा मार्ग आहे.
  • 2:07 - 2:11
    तसंच, मैत्री जुळवण्याचाही
  • 2:11 - 2:14
    सर्वात जास्त टिकणारा मार्ग.
  • 2:14 - 2:18
    २००९ मध्ये, मी मेजदी टूर्स ची
    सहस्थापना केली.
  • 2:18 - 2:21
    लोकांना जोडणारा एक सामाजिक उपक्रम,
  • 2:21 - 2:24
    दोन ज्यू मित्रांसमवेत स्थापला.
  • 2:24 - 2:26
    तर आम्ही काय करतो त्याचा नमुना:
  • 2:26 - 2:30
    उदाहरणार्थ, जेरुसलेम मध्ये आम्ही
    दोन सहल मार्गदर्शक घेतो.
  • 2:30 - 2:33
    एक इस्त्रायली आणि एक पेलेस्टीनी,
    सहलीला एकत्र मार्गदर्शन करतात.
  • 2:33 - 2:36
    इतिहास, दंतकथा, पुरातत्त्वशास्त्र
    आणि संघर्ष
  • 2:36 - 2:39
    पूर्णपणे वेगवेगळ्या
    दृष्टीकोनांतून सांगतात.
  • 2:39 - 2:43
    मला, मी आणि कोबी नावाच्या माझ्या मित्राने
    नेलेली एक सहल आठवतेय.
  • 2:43 - 2:46
    शिकागोतलं ज्यू लोकांचं एक मंडळ--
    जेरुसलेमच्या सहलीला आलं होतं.
  • 2:46 - 2:49
    आम्ही त्यांना पेलेस्टीनी निर्वासितांच्या
    छावणीत नेलं.
  • 2:49 - 2:51
    आणि तिथे आम्ही हा अनोखा पदार्थ चाखला.
  • 2:51 - 2:54
    बरं का, ही माझी आई. एकदम सही आहे ती!
  • 2:54 - 2:56
    आणि हा तो पेलेस्टिनी पदार्थ, मकलुबे.
  • 2:56 - 2:58
    म्हणजे "उलटा"
  • 2:58 - 3:01
    तांदूळ आणि चिकन वापरून तो शिजवतात,
    आणि मग हलकेच उडवून उलटा करतात.
  • 3:01 - 3:02
    अगदी अप्रतिम पदार्थ आहे हा.
  • 3:02 - 3:04
    आम्ही एकत्र जेवलो.
  • 3:04 - 3:07
    मग इस्त्रायली आणि पेलेस्टीनी संगीतकारांची
    एकत्र मैफल केली
  • 3:07 - 3:08
    मग बेली-डान्स केला
  • 3:08 - 3:12
    तुम्हाला ठाऊक नसेल,
    तर नंतर शिकवेन मी.
  • 3:12 - 3:15
    पण जेव्हा आम्ही जायला निघालो,
    तेव्हा दोन्हीकडचे लोक
  • 3:15 - 3:17
    रडत होते,
    इथून जायचं नाही म्हणून.
  • 3:17 - 3:21
    तीन वर्षं झाली, तरी ही नाती
    अजून टिकली आहेत.
  • 3:21 - 3:24
    कल्पना करा, एक अब्ज लोक,
  • 3:24 - 3:28
    जे दरवर्षी परदेशात पर्यटन करतात,
    त्यांनी जर अशा सहली केल्या,
  • 3:28 - 3:31
    केवळ बसमधून
    एका ठिकाणाहून दुसरीकडे न जाता,
  • 3:31 - 3:33
    एका हॉटेलमधून दुसऱ्यात न जाता,
  • 3:33 - 3:37
    बसच्या खिडक्यांमधून लोकांची
    आणि संस्कृतीची छायाचित्रं न काढता,
  • 3:37 - 3:40
    त्याऐवजी लोकांशी मैत्री जुळवत.
  • 3:40 - 3:44
    इंग्लंडहून आलेला एक मुस्लिम गट
    मला आठवतोय.
  • 3:44 - 3:47
    एका सनातन ज्यू कुटुंबात जाऊन
  • 3:47 - 3:51
    प्रथमच त्यांचं पहिल्या शुक्रवारचं
    सब्बाथचं जेवण जेवणारा.
  • 3:51 - 3:55
    त्यांच्याबरोबर "हमीन"
    -ज्यू पद्धतीचा स्ट्यू -चा आस्वाद घेणारा.
  • 3:55 - 3:58
    नंतर त्यांच्या लक्षात आलं, की
  • 3:58 - 4:01
    शेकडो वर्षांपूर्वी दोन्ही वंश
    उत्तर आफ्रिकेत,
  • 4:01 - 4:04
    एकाच ठिकाणी उगम पावले होते.
  • 4:04 - 4:07
    हा फेसबुक प्रोफाईलवरचा फोटो नव्हे.
  • 4:07 - 4:09
    हे संकटग्रस्त भागातले पर्यटन नव्हे.
  • 4:09 - 4:11
    हा आहे पर्यटनाचा भविष्यकाळ.
  • 4:11 - 4:14
    चला, माझ्यासोबत या,
    आणि तुमचं पर्यटन बदलून टाका.
  • 4:14 - 4:16
    आता आम्ही हे जगभर सर्वत्र करीत आहोत.
  • 4:16 - 4:19
    आयर्लंड पासून, इराण आणि टर्कीपर्यंत
  • 4:19 - 4:21
    पर्यटनाद्वारे आम्ही
    जगात बदल घडवून आणतो आहोत.
  • 4:21 - 4:23
    धन्यवाद.
  • 4:23 - 4:25
    (टाळ्या)
Title:
सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?
Speaker:
अझिझ अबु सारा
Description:

अझिझ अबु सारा एक पेलेस्टिनी कार्यकर्ते आहेत. जगात शांतता राखण्याविषयी त्यांचा एक आगळा दृष्टीकोन आहे: पर्यटक व्हा. या TED Fellow ने दाखवून दिलं आहे, की वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या लोकांच्या एकमेकांशी आलेल्या साध्या संपर्कामुळे कैक दशकांचा द्वेष ओसरू शकतो. ते सुरुवात करतात, पेलेस्टिनी लोकांना इस्त्रायलीं लोकांशी भेटवून. आणि मग त्याहूनही पुढे जातात…

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
04:37

Marathi subtitles

Revisions