Return to Video

मुलांचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता?

  • 0:01 - 0:02
    हाय.
  • 0:02 - 0:05
    मला प्रेक्षकांना एक प्रश्न विचारायचा आहे.
  • 0:05 - 0:07
    लहानपणी तुम्ही कधी खोटं बोललात?
  • 0:07 - 0:10
    तास असेल तर कृपया हात वर कराल?
  • 0:11 - 0:15
    वा ! आजवर भेटलेल्या लोकांपैकी ही
    सर्वात प्रामाणिक लोकं आहेत.
  • 0:15 - 0:17
    (हशा)
  • 0:17 - 0:18
    गेल्या २० वर्षांपासून,
  • 0:18 - 0:22
    लहान मुलं खोटं बोलायला कसं
    शिकतात त्याचा मी अभ्यास करतो आहे
  • 0:22 - 0:24
    आणि आज आम्ही केलेले काही शोध
  • 0:24 - 0:26
    मी तुमच्यासमोर मांडणार आहे.
  • 0:27 - 0:32
    सुरुवातीला मी तुम्हाला श्री. रिचर्ड मेसिना
    यांची गोष्ट सांगणार आहे,
  • 0:32 - 0:35
    रिचर्ड हे माझे मित्र आणि एका प्राथमिक
    शाळेत मुखाध्यापक आहेत.
  • 0:35 - 0:37
    एक दिवस त्यांना एक फोन आला.
  • 0:39 - 0:40
    पलीकडून आवाज आला:
  • 0:40 - 0:44
    श्री. मेसिना, माझा मुलगा जॉनी
    आज शाळेत येणार नाही.
  • 0:44 - 0:46
    कारण तो आजारी आहे.
  • 0:46 - 0:48
    श्री. मेसिनांनी विचारले,
  • 0:48 - 0:50
    "कोण बोलत आहे?"
  • 0:51 - 0:52
    पलीकडून आवाज आला:
  • 0:52 - 0:54
    "मी माझे बाबा बोलतोय."
  • 0:54 - 0:57
    (हशा)
  • 0:58 - 1:00
    तर या गोष्टीवरून ---
  • 1:00 - 1:01
    (हशा)
  • 1:01 - 1:06
    लहान मुले आणि खोटं बोलणं यावद्दल
  • 1:06 - 1:08
    सामान्यतः आपले तीन समज याबाबत असतात.
  • 1:08 - 1:13
    एक, लहान मुलं फक्त प्राथमिक
    शाळेत गेल्यानंतरच
  • 1:13 - 1:15
    खोटं बोलायला सुरु करतात.
  • 1:16 - 1:18
    दोन, मुलांना सफाईदारपणे खोटं
    बोलता येत नाही.
  • 1:18 - 1:21
    आपण मोठी माणसं त्यांचं खोटं बोलणं
    सहज पकडू शकतो.
  • 1:21 - 1:25
    आणि तीन, जर मुलं लहानपणीच
    खोटं बोलत असतील,
  • 1:25 - 1:28
    तर त्यांच्या चारित्र्यात काहीतरी खोट आहे,
  • 1:28 - 1:32
    आणि पुढे जाऊन ते आयुष्यभरासाठी
    अट्टल खोटारडे होणार आहेत.
  • 1:33 - 1:35
    पण खरं तर होतं असं,
  • 1:35 - 1:37
    की हे सर्व समज चुकीचे ठरतात.
  • 1:39 - 1:41
    आपण या लहान मुलांसोबत
  • 1:41 - 1:43
    केवळ अंदाज बांधण्याचे खेळ खेळत असतो.
  • 1:43 - 1:45
    एक उदाहरण देतो.
  • 1:45 - 1:49
    या खेळामध्ये आम्ही मुलांना कार्डवरची
    संख्या अंदाजे ओळखायला सांगितली.
  • 1:50 - 1:53
    आणि जर संख्या ओळखुन ते जिंकले,
  • 1:53 - 1:55
    तर त्यांना मोठं बक्षीस मिळणार होतं.
  • 1:56 - 1:57
    खेळाच्या मध्येच एकदा
  • 1:57 - 2:00
    आम्ही कारण काढून खोलीच्या बाहेर आलो.
  • 2:02 - 2:04
    आणि खोलीतून बाहेर येण्यापूर्वी
  • 2:04 - 2:07
    'कार्ड बघू नका' असं मुलांना सांगून आलो.
  • 2:08 - 2:09
    अर्थातच,
  • 2:09 - 2:11
    आम्ही खोलीमधील प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी
  • 2:11 - 2:13
    आत छुपे कॅमेरे बसवले होते.
  • 2:14 - 2:18
    मुलांची जिंकण्याची इच्छा इतकी तीव्र होती,
  • 2:18 - 2:21
    की ९०% पेक्षा जास्त मुलांनी
  • 2:21 - 2:23
    आम्ही बाहेर जाताच
    कार्डमध्ये डोकावून पाहिले.
  • 2:23 - 2:25
    (हशा)
  • 2:25 - 2:27
    इथे कळीचा प्रश्न हा आहे:
  • 2:27 - 2:30
    जेव्हा आम्ही परत आत आल्यावर
  • 2:30 - 2:32
    मुलांना विचारू कि,
    तुम्ही डोकावून पाहिले आहे का?
  • 2:32 - 2:35
    तेव्हा मुलं कबूल करतील,
  • 2:35 - 2:38
    की केलेल्या नियम तोडल्याबद्दल
    खोटं बोलतील?
  • 2:40 - 2:44
    आम्हाला असं आढळलं की
    देश, धर्म, लिंग कुठलेही असो,
  • 2:45 - 2:47
    दोन वर्षे वयाची
  • 2:47 - 2:49
    ३०% मुलं खोटं बोलली,
  • 2:49 - 2:53
    तर ७०% मुलांनी खरं बोलून त्यांच्या
    चुकीची कबुली दिली.
  • 2:53 - 2:55
    तीन वर्षे वयाच्या मुलांपैकी
  • 2:55 - 2:59
    ५०% मुले खोटं बोलली तर
    ५०% मुलांनी खरं सांगीतले.
  • 2:59 - 3:01
    चार वर्षे वयाच्या मुलांपैकी
  • 3:01 - 3:03
    ८०% पेक्षा जास्त मुलं खोटं बोलली.
  • 3:04 - 3:07
    आणि चार वर्षांपेक्षा जास्त वयाची
  • 3:07 - 3:08
    सर्वाधिक मुलं खोटं बोलली.
  • 3:09 - 3:11
    तर तुम्ही बघू शकता,
  • 3:11 - 3:14
    खोटं बोलणं हे खरचं मोठं होण्याच्या
    प्रक्रियेतलाच एक भाग आहे.
  • 3:14 - 3:17
    आणि काही मुलं वयाच्या दुसऱ्या वर्षीच
  • 3:17 - 3:19
    खोटं बोलायला सुरुवात करतात.
  • 3:20 - 3:24
    आता जरा या लहान मुलांकडे
    बारकाईने लक्ष देऊ.
  • 3:25 - 3:29
    सगळ्याजणांपैकी फक्त काही जणच
    का खोटं बोलतात?
  • 3:30 - 3:34
    स्वयंपाक करताना तुम्हाला
    चांगले पदार्थ बनवण्यासाठी
  • 3:34 - 3:35
    चांगले साहित्य जरूरीचे असते.
  • 3:36 - 3:40
    आणि खोटं बोलण्यासाठी
    दोन प्रकारचे साहित्य लागते.
  • 3:41 - 3:45
    पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे
    मनाचा सिद्धांत,
  • 3:45 - 3:47
    किंवा मनातलं वाचण्याची क्षमता.
  • 3:48 - 3:50
    मनातलं वाचणे,
    म्हणजेच हे समजून घेणे
  • 3:50 - 3:54
    की निरनिराळ्या लोकांचं निरनिराळ्या
    परिस्थितीबद्दलचं ज्ञान वेगळं असतं.
  • 3:55 - 3:58
    हाच 'मला काय माहित आहे'
    'आणि तुला काय माहित आहे' यातला
  • 3:58 - 4:00
    फरक ओळखण्याची क्षमता!
  • 4:00 - 4:02
    मनातलं ओळखणे हे खोटं बोलण्यासाठी
    महत्त्वाचं आहे
  • 4:02 - 4:06
    कारण खोटं बोलण्याचा हाच आधार असतो
  • 4:06 - 4:07
    कि "तुम्हाला माहित नाहीए,
  • 4:07 - 4:08
    जे मला माहित आहे!"
  • 4:08 - 4:10
    म्हणूनच मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो!
  • 4:11 - 4:16
    नीट खोटं बोलण्यासाठी लागणारा
    दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्वयंनियंत्रण
  • 4:16 - 4:20
    हे म्हणजे स्वतःचे बोलणे, हावभाव
    आणि देहबोली
  • 4:20 - 4:22
    नियंत्रित करण्याची क्षमता,
  • 4:22 - 4:24
    ज्यामुळे तुम्ही खात्रीणे खोटं बोलू शकता!
  • 4:25 - 4:29
    आणि आम्हाला आढळून आलं,
    की ती लहान मुलं
  • 4:29 - 4:34
    ज्यांच्याकडे मन वाचण्याची आणि
    स्वयंनियंत्रणाची प्रगत क्षमता असते,
  • 4:34 - 4:36
    ते आधी खोटं बोलू लागतात.
  • 4:36 - 4:38
    आणि ते अधिक साळसूदपणे खोटं बोलू शकतात.
  • 4:40 - 4:46
    हे उघड आहे की समाजात नीट
    राहण्यासाठी या दोन्ही क्षमता
  • 4:46 - 4:48
    आपल्यासाठी सुद्धा आवश्यक आहेत.
  • 4:49 - 4:53
    वास्तविक मनातलं वाचण्यात आणि
    आत्मनियंत्रणामध्ये कमतरता
  • 4:53 - 4:57
    या गोष्टी वाढीमधील गंभीर
    समस्यांशी संबंधित आहे.
  • 4:57 - 5:00
    उदा. एडीएचडी आणि ऑटीझम
  • 5:02 - 5:07
    म्हणून जर तुम्हाला दोन वर्षे वयाचं कुणी
    पह्लियांदा खोटं बोलताना आढळलं,
  • 5:07 - 5:09
    तर काळजी करण्याऐवजी
  • 5:09 - 5:11
    तुम्ही ते साजरं करायला हवं--
  • 5:11 - 5:12
    (हशा)
  • 5:12 - 5:17
    कारण त्याचा अर्थ होतो की
    तुमचं मुल वाढीच्या
  • 5:17 - 5:20
    नवीन टप्प्यावर येउन पोहोचलं आहे!
  • 5:21 - 5:24
    आता, मुलं खोटं बोलण्यात कच्ची असतात का?
  • 5:25 - 5:28
    त्यांचं खोटं तुम्ही लगेच ओळखू शकाल का?
  • 5:29 - 5:31
    तुम्हाला एक प्रयत्न करून बघायला आवडेल का?
  • 5:31 - 5:32
    हो? ठीक आहे.
  • 5:32 - 5:35
    मग मी तुम्हाला दोन चित्रफिती दाखवतो.
  • 5:35 - 5:36
    या चित्रफितीत ,
  • 5:36 - 5:39
    मुलं संशोधकांच्या प्रश्नाला
    उत्तरे देणार आहेत.
  • 5:39 - 5:41
    "तू चोरून पाहिलस ? का?"
  • 5:41 - 5:42
    तुम्ही मला संगायचा प्रयत्न करा
  • 5:42 - 5:44
    कोणचं मूल खोटं बोलतयं
  • 5:44 - 5:46
    आणि कोण खरं सांगतयं.
  • 5:46 - 5:48
    इथे आहे मूल क्रमांक एक.
  • 5:49 - 5:50
    तुम्ही तयार आहात ना?
  • 5:51 - 5:53
    प्रौढ: तू चोरून पाहिलसं का?
    मूल: नाही.
  • 5:54 - 5:56
    कांग ली: आणि आता दुसरे मूल.
  • 5:58 - 6:00
    प्रौढ: तू चोरून पाहिलसं का?
    मूल: नाही.
  • 6:01 - 6:05
    कांग ली: जर तुम्हाला वाटत असेल की
    पहिले मूल खोटे बोलत आहे,
  • 6:05 - 6:07
    तर कृपया हात वर करा.
  • 6:08 - 6:12
    आणि जर तुम्हाला वाटत असेल की
    दुसरे मूल खोटे बोलत आहे, तर हात वर करा.
  • 6:14 - 6:16
    ठीक आहे, आता वास्तविक पहाता,
  • 6:16 - 6:19
    पहिले मूल खरे बोलत आहे,
  • 6:19 - 6:21
    आणि दुसरे खोटं.
  • 6:22 - 6:25
    बहुदा तुमच्यापैकी बरेच लहान मुलांचा
    खोटेपणा पकडण्यात खूप कच्चे आहात.
  • 6:25 - 6:28
    (हशा)
  • 6:28 - 6:31
    आम्ही अशाच प्रकारचे अनेक खेळ खेळले आहेत.
  • 6:31 - 6:36
    अनेक आणि अनेकविध प्रकारच्या लोकांसोबत!
  • 6:37 - 6:39
    आणि आम्ही त्यांना चित्रफिती दाखवतो.
  • 6:39 - 6:42
    अर्ध्या चित्रफीतींमध्ये मुलं
    खोटं बोललेली असतात.
  • 6:42 - 6:45
    उरलेल्या अर्ध्या चित्रफितींमध्ये मुलं
    खरं बोललेली असतात.
  • 6:47 - 6:49
    आता बघूया प्रौढ लोकं कशी वागली आहेत.
  • 6:50 - 6:54
    इथे बरेच खरं बोलणारे आणि
    खोटं बोलणारे असल्याने
  • 6:54 - 6:57
    जरी तुम्ही ढोबळ अंदाज बांधलेत,
  • 6:57 - 7:01
    तरी ते बरोबर निघण्याची ५०% संधी आहे.
  • 7:01 - 7:04
    त्यामुळे जर तुमची अचूकता
    ५०% च्या आसपास असेल,
  • 7:04 - 7:08
    तर त्याचा अर्थ तुम्ही खोटेपणा पकडण्यात
    खूपच कच्चे आहात!
  • 7:08 - 7:13
    चला, महाविद्यालयीन आणि
    विधी-विद्यार्थ्यांपासून सुरुवात करूया!
  • 7:13 - 7:17
    ज्यांचा विशेषतः मुलांसोबतचा
    अनुभव कमी असतो.
  • 7:18 - 7:20
    नाही! ते मुलांचा खोटेपणा ओळखू शकत नाहीत.
  • 7:20 - 7:22
    ते केवळ अंदाजच बांधतात.
  • 7:22 - 7:27
    आता, समाजसेवक आणि बालकल्याण
    वकिलांबदद्ल काय वाटतं?
  • 7:28 - 7:30
    ते तर रोजच मुलांसोबत काम करत असतात.
  • 7:30 - 7:32
    त्यांना मुलांचं खोटं बोलणं ओळखता येईल?
  • 7:34 - 7:35
    नाही. त्यांना नाही येत!
  • 7:35 - 7:36
    (हशा)
  • 7:36 - 7:37
    आणि न्यायाधिशांबद्दल काय?
  • 7:37 - 7:39
    कस्टम अधिकारी?
  • 7:39 - 7:41
    आणि पोलिस अधिकारी?
  • 7:41 - 7:44
    जे नेहमी खोटं बोलणाऱ्या
    लोकांसोबत राहात असतात?
  • 7:44 - 7:46
    ते लहान मुलांमधला खोटेपणा ओळखू शकतील?
  • 7:47 - 7:48
    नाही. ते नाही ओळखू शकत.
  • 7:48 - 7:50
    पालकांबद्दल काय?
  • 7:50 - 7:53
    पालक दुसऱ्या मुलांचं खोटं पकडू शकतील?
  • 7:54 - 7:55
    नाही. ते नाही ओळखू शकत.
  • 7:56 - 7:59
    आणि आता बघुया, पालक त्यांच्या
    स्वतःच्या मुलांचं खोटं ओळखू शकतील?
  • 8:01 - 8:02
    नाही. ते नाही ओळखू शकत.
  • 8:02 - 8:06
    (हशा) (टाळ्या)
  • 8:06 - 8:07
    मग आता तुम्ही विचाराल
  • 8:09 - 8:12
    की मुलांचं खोटं पकडायला इतकं कठीण का आहे?
  • 8:13 - 8:16
    माझ्या मुलांचं- नेथनचं उदाहरण घेऊया.
  • 8:16 - 8:18
    जेव्हा तो खोटं बोलतो,
  • 8:18 - 8:20
    तेव्हा त्याचे हावभाव असे होतात.
  • 8:20 - 8:22
    (हशा)
  • 8:22 - 8:23
    तर जेव्हा मुलं खोटं बोलतात,
  • 8:23 - 8:27
    त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव
    स्पष्टपणे निर्विकार असतात.
  • 8:27 - 8:31
    पण या निर्विकार चेहेऱ्यामागे,
  • 8:31 - 8:34
    ते मूल खूप मिश्र भावना अनुभवत असतं.
  • 8:34 - 8:38
    उदाहरणार्थ भीती, लाज, अपराधीपणा
  • 8:38 - 8:41
    आणि कदाचित खोटेपणातून मिळणारा
    किंचित आनंदसुद्धा!
  • 8:41 - 8:44
    (हशा)
  • 8:44 - 8:49
    दुर्दैवाने या भावना एकतर क्षणभंगुर असतात
    किंवा लपलेल्या तरी!
  • 8:49 - 8:52
    म्हणुन बहुतेक करून त्या दिसत नाहीत.
  • 8:52 - 8:53
    तर गेल्या पाच वर्षात,
  • 8:53 - 8:57
    या छुप्या भावनांना ओळखण्याचा प्रयत्न केला.
  • 8:57 - 8:58
    आणि आम्हाला शोध लागला.
  • 8:59 - 9:02
    आपल्याला माहित आहे की
    आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेखाली
  • 9:02 - 9:06
    रक्तवाहिनांचे दाट जाळे असते.
  • 9:06 - 9:08
    जेव्हा आपण एखादी भावना अनुभवतो,
  • 9:08 - 9:11
    तेव्हा वाहिन्यांमधील रक्तप्रवाह
    अचानक बदलतो.
  • 9:12 - 9:16
    आणि हे बदल स्वायत्त मज्जा संस्था
    नियंत्रित करत असते.
  • 9:16 - 9:18
    जे आपल्याला ठरवून नियंत्रित
    करता येत नाहीत.
  • 9:18 - 9:22
    चेहेऱ्यावरील बदलणाऱ्या
    रक्तप्रवाहाकडे पाहून
  • 9:22 - 9:25
    आपण लोकांच्या लपलेल्या भावना उघड करू शकतो.
  • 9:25 - 9:30
    दुर्दैवाने भावनांशी संबंधित
    रक्तप्रवाहातील बदल
  • 9:30 - 9:33
    साध्या नजरेला दिसणे सहज शक्य नाही.
  • 9:34 - 9:37
    लोकांचे हावभाव उघड करण्यासाठी
  • 9:37 - 9:40
    आम्ही नवीन प्रतिमा-तंत्रज्ञान
    विकसित केले आहे.
  • 9:40 - 9:44
    आम्ही त्याला म्हणतो
    "ट्रान्सडर्मल ऑप्टिकल इमेजिंग".
  • 9:45 - 9:49
    यासाठी जेव्हा लोक छुप्या भावना
    अनुभवत असतात,
  • 9:49 - 9:52
    तेव्हा आम्ही साधारण कॅमेरा वापरून
    लोकांचं शूटींग करतो.
  • 9:52 - 9:56
    आणि मग आमचे तंत्रज्ञान वापरून
  • 9:57 - 10:02
    आम्ही रक्तप्रवाहाच्या प्रतिमा बघू शकतो.
  • 10:04 - 10:09
    ट्रान्सडर्मल चित्रफितीद्वारे
  • 10:09 - 10:11
    चेहेऱ्यामागील रक्तप्रवाहासंबंधित
  • 10:12 - 10:17
    छुपे बदल आपण आता सहज बघू शकतो.
  • 10:18 - 10:20
    आणि हे तंत्रज्ञान वापरून
  • 10:20 - 10:24
    खोटं बोलण्यासंबंधीच्या भावना
    ओळखू शकतो,
  • 10:24 - 10:27
    आणि अर्थातच खोटं बोलणंसुद्धा पकडू शकतो.
  • 10:27 - 10:30
    आणि आपण हे व्यक्तीपासून दूर राहून,
  • 10:30 - 10:32
    त्रास न देता, कमी खर्चात करू शकतो.
  • 10:32 - 10:36
    ते सुद्धा जवळपास ८५% अचूकतेने!
  • 10:36 - 10:38
    हे कुठल्याही अंदाजापेक्षा
    जास्त चांगले आहे.
  • 10:39 - 10:43
    आम्ही आणखिन एक शोध लावला:
    "पिनोक्यो इफेक्ट"
  • 10:44 - 10:46
    नाही, हा पिनोक्यो इफेक्ट नाही.
  • 10:46 - 10:47
    (हशा)
  • 10:47 - 10:50
    हा खराखुरा पिनोक्यो इफेक्ट आहे.
  • 10:50 - 10:51
    जेव्हा लोक खोटं बोलतात,
  • 10:51 - 10:55
    तेव्हा गालांमधिल रक्तपुरवठा कमी होतो,
  • 10:55 - 10:58
    आणि नाकामध्ये रक्तपुरवठा वाढतो.
  • 10:59 - 11:03
    अर्थातच, फक्त खोटं बोलतानाच छुप्या भावना
  • 11:03 - 11:06
    उठून येतात असं नाही.
  • 11:06 - 11:08
    मग आम्ही विचार केला,
  • 11:08 - 11:10
    खोटेपणा शोधण्यासोबतच,
  • 11:10 - 11:12
    हे तंत्रज्ञान कुठे वापरता येईल?
  • 11:13 - 11:17
    एक तर शिक्षण क्षेत्रात उपयोग होऊ शकतो.
  • 11:17 - 11:21
    उदाहरणार्थ, हे तंत्रज्ञान वापरून
    गणिताचे शिक्षक
  • 11:21 - 11:24
    शिकवत असलेल्या प्रकरणात
  • 11:24 - 11:29
    विद्यार्थ्यांची चिंता समजून घेऊन
  • 11:29 - 11:30
    त्यांना मदत करू शकतात.
  • 11:31 - 11:34
    आपण हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही
    वापरु शकतो.
  • 11:34 - 11:37
    उदाहरणार्थ, मी रोज माझ्या आईवडिलांशी
    स्काईप वर बोलतो.
  • 11:37 - 11:40
    जे हजारो मैल दूर राहतात.
  • 11:40 - 11:42
    हे तंत्रज्ञान वापरून,
  • 11:42 - 11:46
    त्यांच्या आयुष्यात काय चाललयं
    हे तर मी ओळखू शकेनच,
  • 11:46 - 11:52
    पण सोबतच त्यांचा ह्रदय धडकण्याचा दर,
    तणावाची पातळी,
  • 11:52 - 11:55
    त्यांचा मूड आणि दुखणी हे सगळं पाहू शकतो.
  • 11:56 - 11:58
    आणि भविष्यात कदाचित,
  • 11:58 - 12:01
    उच्चरक्तदाब आणि ह्रदयाचा झटक्याचा
    धोकासुद्धा ओळखू शकू!
  • 12:02 - 12:03
    आणि तुम्ही विचाराल:
  • 12:03 - 12:09
    आपण राजकारण्यांच्या भावनापण
    उघड करू शकू का?
  • 12:09 - 12:11
    (हशा)
  • 12:11 - 12:12
    उदाहरणार्थ, एखाद्या वादविवादामध्ये!
  • 12:13 - 12:15
    तर उत्तर आहे - हो.
  • 12:15 - 12:17
    टीव्हीवरील चित्रफीत वापरून
  • 12:17 - 12:21
    आपण राजकारण्यांच्या हृदय धडधड दर ,
  • 12:21 - 12:23
    मूड आणि तणाव ओळखू शकू,
  • 12:23 - 12:27
    आणि कदाचित भविष्यात ते
    खोटं बोलत आहेत का हे सुद्धा!
  • 12:27 - 12:30
    आपण हे तंत्रज्ञान विपणन संशोधनात
    वापरु शकू.
  • 12:31 - 12:32
    उदाहरणार्थ, काही ठराविक उत्पादने
  • 12:32 - 12:37
    उपभोक्त्यांना आवडतात किंवा नाही,
    हे शोधून काढायला!
  • 12:37 - 12:39
    आपण हे डेटिंग मध्ये सुद्धा वापरू शकू.
  • 12:40 - 12:41
    उदाहरणार्थ,
  • 12:41 - 12:44
    जर तुमची जोडीदारीण तुमच्याकडे
    सस्मित पहात असेल,
  • 12:44 - 12:46
    तर या तंत्रज्ञानामुळे तुम्ही ठरवू शकाल
  • 12:47 - 12:49
    की तिला तुम्ही खरचं आवडले आहात,
  • 12:49 - 12:51
    की ती फक्त चांगलं वागण्याचा
    प्रयत्न करते आहे!
  • 12:52 - 12:53
    आणि त्या परिस्थितीत,
  • 12:53 - 12:55
    ती फक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे!
  • 12:55 - 12:58
    (हशा)
  • 12:59 - 13:03
    तर हे ट्रान्सडर्मल ऑप्टिकल
    इमेजिंग तंत्रज्ञान
  • 13:03 - 13:06
    हे अजून विकसित होणाच्या
    सुरुवातीच्या टप्प्यावर आहे.
  • 13:06 - 13:10
    आज माहित नसणारे कित्येक उपयोग
    पुढे जाऊन समजतील.
  • 13:10 - 13:13
    तरीही, एक गोष्ट मला पक्की माहिती आहे
  • 13:13 - 13:17
    ती म्हणजे खोटं बोलणं
    पुर्वीसारखं राहणार नाही हे नक्की!
  • 13:17 - 13:18
    धन्यवाद!
  • 13:18 - 13:19
    गुडबाय!
  • 13:19 - 13:23
    (टाळ्या)
Title:
मुलांचं खोटं बोलणं तुम्ही ओळखू शकता?
Speaker:
कांग ली
Description:

मुलं खोटं बोलण्यात कच्ची असतात का? तुम्हाला वाटतं का, की तुम्ही त्यांचं खोटं बोलणं सहज पकडू शकता? लहान मुलं खोटं बोलतात तेव्हा कोणचे शारिरिक बदल होतात याचा अभ्यास विकसन संशोधक कांग ली करतात. दोन वर्षांची मुलं सुद्धा खोटं बोलतात; आणि ते सुद्धा प्रभावीपणे! मुलांचं खोटं बोलणं आपण साजरं का करायला हवं हे सांगतानाच ली नवीन खोटेपणा पकडण्याचे असे तंत्रज्ञान विशद करतात, जे पुढे जाऊन आपल्या छुप्या भावना उघड करेल!

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
13:36

Marathi subtitles

Revisions