Return to Video

अलाना शेख: स्मृतिभ्रंशाला सामोरे जाताना.

  • 0:01 - 0:02
    मी माझ्या वडिलांविषयी बोलणार आहे.
  • 0:02 - 0:05
    त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास आहे.
  • 0:05 - 0:09
    बारा वर्षांपूर्वी याचे संकेत मिळाले
  • 0:09 - 0:12
    अधिकृत निदान २००५ मध्ये झाले.
  • 0:12 - 0:16
    सध्या तेअसहाय्य आहेत.
    त्यांना खायला,कपडे बदलायला मदत लागते.
  • 0:16 - 0:20
    त्यांना कळत नाही आपण कुठे आहोत.
    काय करतोय.
  • 0:20 - 0:24
    सगळेच एकूण अवघड होऊन बसलय.
  • 0:24 - 0:28
    माझे बाबा माझ्यासाठी नेहमीच
    माझे आदर्श, माझे गुरू होते,
  • 0:28 - 0:31
    आणि गेली दहा वर्ष मी त्यांना
    कुठेतरी हरवून जाताना बघतीए.
  • 0:31 - 0:39
    ते एकटे नाहीत.त्यांच्यासारखी
    जगात अजून ३५ दशलक्ष लोक आहेत
  • 0:39 - 0:44
    अंदाज आहे की 2030 पर्यंत
    त्यांची संख्या दुपटीने वाढणार आहे...
  • 0:44 - 0:46
    ७० दशलक्ष लोक म्हणजे कमी लोक नाहीत.
  • 0:46 - 0:53
    स्मृतिभ्रंश आपल्याला भयभीत करतो
    ते हरवून गेलेले चेहरे ,थरथरणारे हात,
  • 0:53 - 0:57
    हा आजार असलेल्यांची दिवसेंदिवस
    वाढणारी संख्या आपल्याला भयभीत करते
  • 0:57 - 1:00
    ह्या भीतीपायी आपण
    पुढील दोन पैकी एक गोष्ट करतो:
  • 1:00 - 1:06
    आपण हे नाकारतो: माझा त्याच्याशी
    काहीच संबंध नाही, मला हे कधीच होणार नाही
  • 1:06 - 1:09
    किंवा आपण असं ठरवतो की
    आपण स्मृतिभ्रंशाला रोखू,
  • 1:09 - 1:14
    आपल्याला वाटते हे असं कधीच होणार नाही
    कारण आपण सर्व ती योग्य काळजी घेऊ.
  • 1:14 - 1:20
    पण मी एक तिसरा पर्याय शोधला आहे
    मी स्वतःला ह्या आजारासाठी तयार करते आहे.
  • 1:20 - 1:26
    रोगपूर्व काळजी घेणे केव्हाही चांगले मी पण
    हा आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेत्ये
  • 1:26 - 1:31
    मी आहार नीट घेते, व्यवस्थित व्यायाम करते,
    मनही कार्यक्षम ठेवायचा प्रयत्न करते,
  • 1:31 - 1:34
    ह्या वरील सगळे संशोधनही हेच उपाय सुचवते.
  • 1:34 - 1:38
    पण हेच संशोधन असेही सांगते
    की ह्यावर १००% खात्रीशीर उपाय नाही.
  • 1:38 - 1:42
    जर ह्या दुष्टाने तुम्हाला गाठायचे
    ठरवले तर तो तुम्हाला नक्की गाठणार.
  • 1:42 - 1:44
    आणि माझ्या वडिलांबाबत नेमके हेच घडले.
  • 1:44 - 1:50
    ते दोन भाषेचे प्राध्यापक होते बुद्धिबळ,
    ब्रिज ,वृत्तपत्र लेखन करणे आवडायचे.
  • 1:50 - 1:54
    (हशा)
  • 1:54 - 1:56
    पण तरीही त्यांना स्मृतिभ्रंश झालाच.
  • 1:56 - 1:59
    त्याने ठरवले तर तो तुम्हाला नक्की गाठणार.
  • 1:59 - 2:04
    आणि विशेषतः जर तुम्ही माझ्या जागी असाल
    तर नक्की, कारण हा आजार अनुवांशिक आहे.
  • 2:04 - 2:08
    त्यामुळे मी स्वतःला ह्या आजाराला सामोरे
    जाण्यासाठी तयार करत आहे.
  • 2:08 - 2:10
    बाबांची काळजी घेताना,
  • 2:10 - 2:15
    स्मृतिभ्रंशाच्या जीवनावर संशोधन करताना
    मी प्रामुख्याने तीन गोष्टींवर भर देतिये:
  • 2:15 - 2:21
    मी मौज सोडली मी बदलली शारीरिक
    क्षमता प्राप्तिसाठी प्रयत्नशील झाले.
  • 2:21 - 2:28
    हे सगळ्यात अवघड आहे, मी एक
    चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करित आहे
  • 2:28 - 2:34
    स्मृतिभ्रंशामुळे छंदापासून मिळणाऱ्या
    साध्या गोष्टींचा आनंद घेणे कठीण होते
  • 2:34 - 2:38
    तुम्ही मित्रांबरोबर बसून गप्पा मारू
    शकत नाही कारण त्यांची ओळख पटत नाही.
  • 2:38 - 2:42
    साधा टी. व्ही. बघणे गोन्धळात टाकणारे
    होऊन जाते; आणि बऱ्याचदा भीतीदायक सुद्धा.
  • 2:42 - 2:45
    आणि वाचन तर केवळ अशक्य.
  • 2:45 - 2:48
    स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्तीची काळजी
    घेणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते,
  • 2:48 - 2:54
    तेव्हा तुम्हाला त्यांना सोप्या, नेहमीच्या
    गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायला शिकवतात.
  • 2:54 - 2:58
    उदाहरणार्थ माझ्या बाबांना आम्ही
    वेगवेगळे फॉर्म्स भरायला देत असू.
  • 2:58 - 3:04
    ते शाळेत शिक्षक होते, त्यामुळे त्यांना
    कागदोपत्री व्यवहाराची चांगलीच माहिती होती.
  • 3:04 - 3:08
    ते प्रत्येक ओळीवर आपली स्वाक्षरी करायचे
    प्रत्येक रकाना कसा भरला आहे तपासून बघायचे,
  • 3:08 - 3:11
    त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी
    ते आकडे लिहायचे.
  • 3:11 - 3:15
    मी विचार करू लागले की माझी काळजी
    घेणारी व्यक्ती मला काय करायला लावेल?
  • 3:15 - 3:20
    मी त्यांचीच लेक. मला लिहायला, वाचायला
    आवडते. मी सामाजिक आरोग्याबद्दल खूप जाणते
  • 3:20 - 3:25
    मला ते वैचारिक मासिके वाचायला देतील
    की ज्यांच्या समासामध्ये मी लिहु शकीन ?
  • 3:25 - 3:28
    मला ते विविध ग्राफ्स (आलेख)
    आणि तक्ते रंगवायला देतील?
  • 3:28 - 3:32
    मी सध्या हाताने करता येण्यासारख्या
    सोप्या गोष्टी करायचा प्रयत्न करतीए.
  • 3:32 - 3:37
    मला चित्रकला येत नाही तरीही मी ते करते
  • 3:37 - 3:43
    सध्या मी ओरिगामी शिकत्येय
    मला आता एक छोटा बॉक्स बनवता येतो!
  • 3:43 - 3:45
    (हशा)
  • 3:45 - 3:52
    मी विणकाम सुद्धा शिकतीए की जेणेकरून
    मी एक छोटासा तुकडा तरी विणू शकीन!
  • 3:52 - 3:57
    किती चांगले होणार हे महत्वाचे नसून
    हातांना त्याची सवय लागणे महत्वाचे आहे.
  • 3:57 - 4:00
    जेवढ्या गोष्टी मला माहित होतील तितक्यांचा
    मी सराव करू शकेन.
  • 4:00 - 4:05
    जास्त गोष्टीमुळे मी स्वतःला गुंतवून
    ठेवीन आणि आनंदी राहीन.
  • 4:05 - 4:10
    म्हटले जाते लोक कुठल्या ना कुठल्या
    कामात गुंतलेले लोक नेहमी आनंदी असतात,
  • 4:10 - 4:15
    त्यांची काळजी घेणे जास्त सोपे असते
    आणि ते हळुहळू आजारावर मातही करतात.
  • 4:15 - 4:17
    हा तर मला विजयच वाटतो.
  • 4:17 - 4:20
    जितका वेळ आनंदी राहणे शक्य
    हे तितका वेळ मी आनंदी ठेवीन स्वतःला
  • 4:20 - 4:25
    बऱ्याच लोकांना माहीत नसते
    की स्म्रुतिभ्रंशाची शारीरिक
  • 4:25 - 4:29
    तसेच बौद्धिक लक्षणेही असतात,
    शरीराचा तोल जातो,
  • 4:29 - 4:35
    स्नायून्मध्ये कंप सुटतो चालणे जमत नाही..
  • 4:35 - 4:37
    त्यांना चाला-फिरायची भीती वाटू लागते.
  • 4:37 - 4:41
    त्यामुळे मी अश्या गोष्टींचा सराव करतिये
    की ज्यामुळे माझे संतुलन राहील.
  • 4:41 - 4:45
    यासाठी योगासने आणि ताई-ची शिकातिये
    की जेणेकरून जेव्हा स्मृतिभ्रंश मला गाठेल,
  • 4:45 - 4:47
    तेव्हाही मी चालती-फिरती राहू शकेन.
  • 4:47 - 4:51
    मी वजन उचलण्याचे व्यायाम करून
    माझ्या स्नायूना बळकट करतिये
  • 4:51 - 4:55
    त्यामुळे जेव्हा वेळ येइल तेव्हा
    मी हालचाल करू शकेन.
  • 4:55 - 5:01
    सर्वांत शेवटी मी चांगली व्यक्ति
    बनण्याचा प्रयत्न करत्येय
  • 5:01 - 5:06
    स्मृतिभ्रंश होण्याआधी माझे बाबा प्रेमळ
    आणि दयाळू होते, आणि आताही ते तसेच आहेत.
  • 5:06 - 5:11
    मी त्यांना त्यांची हुशारी,
    विनोदबुद्धी, भाषा हरवताना पाहिलय,
  • 5:11 - 5:15
    पण त्याच बाबांना मी माझ्यावर,
    माझ्या मुलांवर,
  • 5:15 - 5:19
    माझ्या भावावर, माझ्या आईवर, त्यांच्या
    सेवकावर प्रेम करताना सुद्धा पाहिले आहे.
  • 5:19 - 5:23
    आणि ह्याच मुळे आम्हांला
    सतत त्यांच्या बरोबर असावेसे वाटते,
  • 5:23 - 5:25
    ते कितीही अवघड असले तरीही.
  • 5:25 - 5:28
    ह्या आजाराने त्यांची
    स्मरणशक्ती हिरावून घेतली असली तरीही,
  • 5:28 - 5:30
    त्यांचे प्रेमळ ह्रदय तसेच राहील.
  • 5:30 - 5:34
    मी माझ्या बाबांएवढी प्रेमळ
    किंवा सहृदय कधीच नव्हते.
  • 5:34 - 5:37
    पण मला आता तसे वागायला शिकले पाहिजे.
  • 5:37 - 5:43
    माझे मन इतके निर्मळ पाहिजे की अगदी
    स्मृतिभ्रंश त्यावर ओरखाडे मारू शकणार नाही.
  • 5:43 - 5:45
    मला नकोय स्मृतिभ्रंश.
  • 5:45 - 5:49
    मला ह्यावर लवकरात लवकर उपाय हवाय.
  • 5:49 - 5:53
    पण जर त्याने मला गाठायचे ठरवलेच
    तर मी त्याचा सामना करायला सज्ज आहे.
  • 5:53 - 5:54
    धन्यवाद.
  • 5:54 - 6:03
    (टाळ्या)
Title:
अलाना शेख: स्मृतिभ्रंशाला सामोरे जाताना.
Speaker:
अलाना शेख
Description:

स्मृतिभ्रंशाशी लढण्याऱ्या आई-वडिलांकडे पाहून अनेकदा आपण आपल्यालाही असे काही होऊ शकते ह्याची शक्यता नाकारतो किंवा हा आजार टाळण्यासाठी अतिरेकी उपाय अवलंबवतो. पण टेड व्याख्याती अलाना शेख ह्याकड़े एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. त्या आपल्याला त्यांनी अवलंबवलेल्या तीन प्रमुख उपायांबद्दल सांगतात - की ज्यांच्या आधाराने त्या वेळ पडल्यास स्मृतिभ्रंशाला सामोऱ्या जाऊ शकतील.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
06:26

Marathi subtitles

Revisions