1 00:00:00,000 --> 00:00:02,000 तर सुरक्षितता म्हणजे दोन भिन्न गोष्टी आहेत: 2 00:00:02,000 --> 00:00:04,000 ती एक भावना आहे आणि ते एक वास्तव आहे. 3 00:00:04,000 --> 00:00:06,000 आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 4 00:00:06,000 --> 00:00:08,000 तुम्ही सुरक्षित नसला तरी 5 00:00:08,000 --> 00:00:10,000 तुम्हाला सुरक्षित वाटू शकते. 6 00:00:10,000 --> 00:00:12,000 आणि तुम्हाला सुरक्षित वाटले नाही तरी 7 00:00:12,000 --> 00:00:14,000 तुम्ही सुरक्षित असू शकता. 8 00:00:14,000 --> 00:00:16,000 खरोखर, त्या दोन वेगवेगळ्या संकल्पना 9 00:00:16,000 --> 00:00:18,000 एकाच शब्दाशी संबंधित आहेत. 10 00:00:18,000 --> 00:00:20,000 आणि या भाषणाद्वारे मला 11 00:00:20,000 --> 00:00:22,000 त्या दोन्ही तोडायच्या आहेत -- 12 00:00:22,000 --> 00:00:24,000 त्या कधी दूर जातात 13 00:00:24,000 --> 00:00:26,000 आणि त्या कधी एकत्र येतात हे समजून घेऊन. 14 00:00:26,000 --> 00:00:28,000 आणि भाषा हा यातील एक खराखुरा अडथळा आहे. 15 00:00:28,000 --> 00:00:30,000 आपण ज्या संकल्पनांबद्दल बोलणार आहोत 16 00:00:30,000 --> 00:00:33,000 त्यांसाठी फारसे योग्य शब्द नाही आहेत. 17 00:00:33,000 --> 00:00:35,000 म्हणून जर तुम्ही सुरक्षिततेकडे 18 00:00:35,000 --> 00:00:37,000 अर्थशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर, 19 00:00:37,000 --> 00:00:39,000 ती एक जमा खर्चाचे गणित आहे. 20 00:00:39,000 --> 00:00:41,000 प्रत्येकवेळी तुम्हाला सुरक्षितता मिळत असते 21 00:00:41,000 --> 00:00:43,000 त्यावेळी तुम्ही दुसरे काहीतरी खर्च करत असता. 22 00:00:43,000 --> 00:00:45,000 हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असेल -- 23 00:00:45,000 --> 00:00:47,000 तुम्ही घरी सुरक्षा-गजर लावणार का नाही याबद्दलचा -- 24 00:00:47,000 --> 00:00:50,000 किंवा राष्ट्रीय निर्णय असेल -- तुम्ही दुसर्या देशावर आक्रमण करण्यासाठीचा-- 25 00:00:50,000 --> 00:00:52,000 तुम्ही कशावर तरी पाणी सोडताय, 26 00:00:52,000 --> 00:00:55,000 पैसा किंवा वेळ, सुविधा, क्षमता, 27 00:00:55,000 --> 00:00:58,000 किंवा मूलभूत स्वातंत्र्यांवर 28 00:00:58,000 --> 00:01:01,000 आणि कोणत्याही सुरक्षेकडे पाहताना विचारायचा प्रश्न 29 00:01:01,000 --> 00:01:04,000 हा नाही की त्यामुळे आपण सुरक्षित होत आहोत की नाही, 30 00:01:04,000 --> 00:01:07,000 पण त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर आहे की नाही हा आहे. 31 00:01:07,000 --> 00:01:09,000 तुम्ही गेली काही वर्षे ऐकताय, 32 00:01:09,000 --> 00:01:11,000 सद्दाम हुसेन सत्तेवर नाही त्यामुळे जग जास्त सुरक्षित आहे. 33 00:01:11,000 --> 00:01:14,000 ते खरे असेलही, पण ते जास्त महत्त्वाचे नाही आहे. 34 00:01:14,000 --> 00:01:17,000 प्रश्न आहे की त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर होती की नव्हती. 35 00:01:17,000 --> 00:01:20,000 आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या, 36 00:01:20,000 --> 00:01:22,000 आणि तुम्ही ठरवाल की त्यांच्यावर केलेले आक्रमण बरोबर होते की नाही. 37 00:01:22,000 --> 00:01:24,000 असा तुम्ही सुरक्षिततेबद्दल विचार करायचा असतो -- 38 00:01:24,000 --> 00:01:26,000 जमा-खर्चाच्या गणिताद्वारे. 39 00:01:26,000 --> 00:01:29,000 आता यात अनेकवेळा चूक किंवा बरोबर असे काहीच नसते. 40 00:01:29,000 --> 00:01:31,000 आपल्यातील काही लोकांच्या घरात सुरक्षागजर प्रणाली असते, 41 00:01:31,000 --> 00:01:33,000 आणि काहींच्यात नसते. 42 00:01:33,000 --> 00:01:35,000 आणि हे सर्व अवलंबून आहे आपण कुठे राहतो, 43 00:01:35,000 --> 00:01:37,000 आपण एकटे राहतो की कुटूंबासोबत, 44 00:01:37,000 --> 00:01:39,000 आपल्याकडे किती मुल्यवान माल आहे, 45 00:01:39,000 --> 00:01:41,000 आणि चोरीच्या धोक्याचा स्विकार 46 00:01:41,000 --> 00:01:43,000 आपण किती करू शकतो यांवर. 47 00:01:43,000 --> 00:01:45,000 राजकारणातही, 48 00:01:45,000 --> 00:01:47,000 बरेच वेगवेगळे पर्याय असतात. 49 00:01:47,000 --> 00:01:49,000 आणि बर्याच वेळेला, हे जमा-खर्च, 50 00:01:49,000 --> 00:01:51,000 फक्त सुरक्षिततेशिवाय इतर गोष्टींबद्दल असतात, 51 00:01:51,000 --> 00:01:53,000 आणि मला वाटते ते खरोखर महत्त्वाचे आहे. 52 00:01:53,000 --> 00:01:55,000 आता लोकांना या जमाखर्चाबद्दल 53 00:01:55,000 --> 00:01:57,000 नैसर्गिक अंतर्ज्ञान असते. 54 00:01:57,000 --> 00:01:59,000 आपण ते दररोज करत असतो -- 55 00:01:59,000 --> 00:02:01,000 काल रात्री माझ्या हॉटेलच्या खोलीत, 56 00:02:01,000 --> 00:02:03,000 जेव्हा मी दाराला दोन कुलुपे लावायचे ठरवले त्यावेळी, 57 00:02:03,000 --> 00:02:05,000 किंवा तुम्ही इथे गाडी चालवत आला त्यावेळी 58 00:02:05,000 --> 00:02:07,000 जेव्हा आपण जेवायला जातो त्यावेळी 59 00:02:07,000 --> 00:02:10,000 आपण ठरवतो की जेवण विषारी नाही आहे आणि आपण ते खातो. 60 00:02:10,000 --> 00:02:12,000 आपण हे जमा-खर्चाचे गणित परत परत 61 00:02:12,000 --> 00:02:14,000 दररोज अनेक वेळा करतो. 62 00:02:14,000 --> 00:02:16,000 बहुतांशी आपल्या ध्यानातही ते येत नाहीत. 63 00:02:16,000 --> 00:02:18,000 आपल्या जिवंत असण्याचाच ते एक भाग आहेत; आपण सगळेच ते करतो. 64 00:02:18,000 --> 00:02:21,000 प्रत्येक प्रजाती तसे करते. 65 00:02:21,000 --> 00:02:23,000 समजा शेतात एक ससा गवत खातो आहे, 66 00:02:23,000 --> 00:02:26,000 आणि सश्याला कोल्हा दिसणार आहे. 67 00:02:26,000 --> 00:02:28,000 ससा सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करणार आहे: 68 00:02:28,000 --> 00:02:30,000 "मी थांबू की मी पळून जाऊ?" 69 00:02:30,000 --> 00:02:32,000 आणि तुम्ही त्याबाबत विचार केला, 70 00:02:32,000 --> 00:02:35,000 तर जे ससे ते गणित करण्यात चांगले आहेत 71 00:02:35,000 --> 00:02:37,000 ते जगतील आणि प्रजनन करतील 72 00:02:37,000 --> 00:02:39,000 आणि जे ससे ते करण्यात वाईट असतील 73 00:02:39,000 --> 00:02:41,000 ते भक्ष्य बनतील किंवा उपाशी राहतील. 74 00:02:41,000 --> 00:02:43,000 आणि तुम्हा विचार करता की 75 00:02:43,000 --> 00:02:46,000 आपण, या ग्रहावरील सर्वात यशस्वी प्रजाती -- 76 00:02:46,000 --> 00:02:48,000 तुम्ही, मी, सर्वजण -- 77 00:02:48,000 --> 00:02:51,000 हे जमा-खर्चाचे गणित करण्यात एकदम पारंगत असू. 78 00:02:51,000 --> 00:02:53,000 तरी परत परत असे दिसून येते 79 00:02:53,000 --> 00:02:56,000 की आपण त्याबाबत अतिशय वाईट आहोत. 80 00:02:56,000 --> 00:02:59,000 आणि मला वाटते की हा मूलतः रोचक प्रश्न आहे. 81 00:02:59,000 --> 00:03:01,000 मी तुम्हाला थोडक्यात उत्तर देईन. 82 00:03:01,000 --> 00:03:03,000 उत्तर आहे की आपण सुरक्षिततेच्या भावनेनुसार वागतो 83 00:03:03,000 --> 00:03:06,000 आणि वास्तवानुसार नाही. 84 00:03:06,000 --> 00:03:09,000 आणि बहुतेक वेळा ते चालते. 85 00:03:10,000 --> 00:03:12,000 बर्याचदा, 86 00:03:12,000 --> 00:03:15,000 भावना आणि वास्तव एकच असतात. 87 00:03:15,000 --> 00:03:17,000 आणि जवळजवळ संपूर्ण मानवी प्रागैतिहासात 88 00:03:17,000 --> 00:03:20,000 ते नक्कीच खरे होते. 89 00:03:20,000 --> 00:03:23,000 आपण ही क्षमता विकसित केली आहे 90 00:03:23,000 --> 00:03:25,000 कारण ती उत्क्रांतीच्या दृष्टीने योग्य होती. 91 00:03:25,000 --> 00:03:27,000 याबद्दल असा विचार करता येईल 92 00:03:27,000 --> 00:03:29,000 की आपण इसपूर्व १,००,००० मध्ये 93 00:03:29,000 --> 00:03:31,000 पूर्व आफ्रिकेतील पर्वतीय प्रदेशात छोट्या कुटूंबातील गटात 94 00:03:31,000 --> 00:03:34,000 राहात असताना नेहमी घ्याव्या लागलेल्या धोक्यांबद्दलच्या 95 00:03:34,000 --> 00:03:37,000 निर्णयांबाबत अतिशय तल्लख आहोत. 96 00:03:37,000 --> 00:03:40,000 २०१० मधल्या न्यूयॉर्कसाठी, फारसे नाही. 97 00:03:41,000 --> 00:03:44,000 धोका समजण्याच्या बाबतीत अनेक चुका होत असतात. 98 00:03:44,000 --> 00:03:46,000 यातील बरेच चांगले प्रयोग केले गेले आहेत. 99 00:03:46,000 --> 00:03:49,000 आणि तुम्हाला काही चुका पुन्हापन्हा होताना दिसू शकतील. 100 00:03:49,000 --> 00:03:51,000 मी त्यातील चार सांगतो. 101 00:03:51,000 --> 00:03:54,000 आपण भव्य-दिव्य आणि असामान्य अशा धोक्यांना अतिरंजित करतो 102 00:03:54,000 --> 00:03:56,000 आणि नेहमीच्या धोक्यांना कमी किंमत देतो -- 103 00:03:56,000 --> 00:03:59,000 जसे (विमानातून) उडणे विरूद्ध (गाडी) चालवणे. 104 00:03:59,000 --> 00:04:01,000 अज्ञात गोष्टींना ज्ञात गोष्टींपेक्षा 105 00:04:01,000 --> 00:04:04,000 जास्त धोकादायक समजले जाते. 106 00:04:05,000 --> 00:04:07,000 त्याचे एक उदाहारण असेल, 107 00:04:07,000 --> 00:04:10,000 लोकांना परके लोक अपहरण करतील अशी भीती वाटते, 108 00:04:10,000 --> 00:04:13,000 तर याबाबतीतील माहिती नातेवाईकांनी केलेली अपहरणे जास्त असतात याला आधार देते. 109 00:04:13,000 --> 00:04:15,000 हे आहे मुलांबाबात. 110 00:04:15,000 --> 00:04:18,000 तिसरी, एखाद्या व्यक्तीशी निगडीत अशा धोक्यांना 111 00:04:18,000 --> 00:04:21,000 अनामिक धोक्यांपेक्षा जास्त मोठे समजले जाते. 112 00:04:21,000 --> 00:04:24,000 जसं बिन लादेन जास्त भीतीदायक आहे कारण त्याला नाव आहे. 113 00:04:24,000 --> 00:04:26,000 आणि चौथी.. 114 00:04:26,000 --> 00:04:28,000 की लोक त्यांचे नियंत्रण असलेल्या परिस्थितीतील 115 00:04:28,000 --> 00:04:30,000 धोक्यांना प्रमाणापेक्षा कमी महत्त्व देतात 116 00:04:30,000 --> 00:04:34,000 आणि ज्या परिस्थितीवर त्यांचे नियत्रण नाही त्यातील धोक्यांना जास्त महत्त्व देतात. 117 00:04:34,000 --> 00:04:37,000 तर एकदा तुम्ही स्कायडायविंग किंवा धुम्रपान करण्यास सुरूवात केली, 118 00:04:37,000 --> 00:04:39,000 की तुम्ही त्यातील धोक्यांने कमी लेखता. 119 00:04:39,000 --> 00:04:42,000 जर धोका तुमच्यावर लादला गेला असेल तर -- दहशतवाद हे चांगले उदाहरण होते -- 120 00:04:42,000 --> 00:04:45,000 तुम्ही त्याला जास्त किंमत देता, कारण तुम्हाला ते तुमच्या नियंत्रणाखाली आहे असे वाटत नाही. 121 00:04:47,000 --> 00:04:50,000 अशा आणखीही बर्याच चुका आहेत, आकलनातील चुका, 122 00:04:50,000 --> 00:04:53,000 ज्या आपल्या धोक्यांविषयीच्या निर्णयांवर परिणाम करतात. 123 00:04:53,000 --> 00:04:55,000 त्यातील एक उपलब्धता अनुमान, 124 00:04:55,000 --> 00:04:57,000 ज्याचा अर्थ मूलतः असा आहे की 125 00:04:57,000 --> 00:05:00,000 आपण एखाद्या गोष्टीची शक्यता त्या गोष्टीबद्दलच्या 126 00:05:00,000 --> 00:05:04,000 घटना किती लगेच मनात आणू शकतो यावरून ठरवतो. 127 00:05:04,000 --> 00:05:06,000 तुम्ही विचार करू शकाल ते कसे होते. 128 00:05:06,000 --> 00:05:09,000 तुम्ही जर वाघांच्या हल्ल्यांबाबात बरेच ऐकले असेल तर, आजूबाजूला भरपूर वाघ असणारच. 129 00:05:09,000 --> 00:05:12,000 सिंहाचे हल्ले तुमच्या ऐकिवात नाहीत म्हणजे अजूबाजूला जास्त सिंह नाही आहेत. 130 00:05:12,000 --> 00:05:15,000 हे ठीक आहे जोपर्यंत तुम्ही वर्तमानपत्रांचा शोध लावत नाही. 131 00:05:15,000 --> 00:05:17,000 कारण वर्तमानपत्रे काय करतात की 132 00:05:17,000 --> 00:05:19,000 ती कधीतरी उद्भवणार्या धोक्यांची 133 00:05:19,000 --> 00:05:21,000 वारंवार पुनरूक्ती करतात 134 00:05:21,000 --> 00:05:23,000 मी लोकांना सांगतो, जर एखादी गोष्ट वर्तमानपत्रात असेल तर त्याबद्दल काळजी करू नका. 135 00:05:23,000 --> 00:05:25,000 कारण व्याख्येनुसारच, 136 00:05:25,000 --> 00:05:28,000 बातमी म्हणजे एखादी गोष्ट जी जवळजवळ कधीच घडत नाही. 137 00:05:28,000 --> 00:05:30,000 (हशा) 138 00:05:30,000 --> 00:05:33,000 एखादी गोष्ट सारखीच घडत असेल, तर ती बातमी होऊ शकत नाही -- 139 00:05:33,000 --> 00:05:35,000 गाड्यांचे अपघात, घरगुती मारहाण -- 140 00:05:35,000 --> 00:05:38,000 त्यागोष्टींबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे. 141 00:05:38,000 --> 00:05:40,000 आणि आपण एक गोष्टी सागणार्यांची जमात पण आहोत. 142 00:05:40,000 --> 00:05:43,000 आपण माहितीपेक्षा गोष्टींना जास्त महत्त्व देतो. 143 00:05:43,000 --> 00:05:45,000 आणि त्यात थोडा पायाभूत निरंकपणा (अंकांबद्दलचे अज्ञान) आहे. 144 00:05:45,000 --> 00:05:48,000 म्हणजे तो "एक दोन तीन, अनेक" चा विनोद काहीसा बरोबरच आहे. 145 00:05:48,000 --> 00:05:51,000 आपन लहान संख्यांच्या बाबतीत एकदम चांगले आहोत. 146 00:05:51,000 --> 00:05:53,000 एक आंबा, दोन आंबे, तीन आंबे, 147 00:05:53,000 --> 00:05:55,000 १०,००० आंबे, १,००,००० आंबे -- 148 00:05:55,000 --> 00:05:58,000 अजुनही नासून जाण्याआधी खाता येतील त्यापेक्षा ते जास्त आंबे आहेत. 149 00:05:58,000 --> 00:06:01,000 तर अर्धा, पाव, एक पंचमांश -- याबाबत आपण चांगले आहोत. 150 00:06:01,000 --> 00:06:03,000 दहा लाखात एक, शंभर कोटीत एक -- 151 00:06:03,000 --> 00:06:06,000 ते म्हणजे जवळ जवळ नसल्यासारखेच आहेत. 152 00:06:06,000 --> 00:06:08,000 म्हणूनच आपल्याला सामान्य नसलेले धोके 153 00:06:08,000 --> 00:06:10,000 समजण्यास त्रास होतो. 154 00:06:10,000 --> 00:06:12,000 आणि या आकलनशक्तीतील चुका 155 00:06:12,000 --> 00:06:15,000 आपल्या आणि वास्तवामधील चाळणी बनतात. 156 00:06:15,000 --> 00:06:17,000 आणि त्याचा परिणाम 157 00:06:17,000 --> 00:06:19,000 असा होतो की भावना आणि वास्तव यात काहीच समान राहत नाही, 158 00:06:19,000 --> 00:06:22,000 ते भिन्न बनतात. 159 00:06:22,000 --> 00:06:25,000 आता तुमची एकतर अशी भावना असते की -- तुम्हाला तुम्ही असता त्यापेक्षा जास्त सुरक्षित वाटते. 160 00:06:25,000 --> 00:06:27,000 हीच आहे सुरक्षेची चुकीची समजूत. 161 00:06:27,000 --> 00:06:29,000 किंवा उलट, 162 00:06:29,000 --> 00:06:31,000 आपण असुरक्षित असल्याची चुकीची भावना. 163 00:06:31,000 --> 00:06:34,000 मी "सुरक्षिततेच्या नाटकासंबंधी" बरेच लिहीतो, 164 00:06:34,000 --> 00:06:37,000 ज्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना सुरक्षित वाटते, 165 00:06:37,000 --> 00:06:39,000 पण वास्तवात त्यांचा काहीही उपयोग होत नाही. 166 00:06:39,000 --> 00:06:41,000 अशा गोष्टींसाठी कुठलाच शब्द नाही आहे ज्या आपल्याला सुरक्षित करतात, 167 00:06:41,000 --> 00:06:43,000 पण आपल्याला सुरक्षित वाटू देत नाहीत. 168 00:06:43,000 --> 00:06:46,000 बहुतेक ते काम आपल्यासाठी सीआयए करते. 169 00:06:48,000 --> 00:06:50,000 परतूया अर्थशास्त्राकडे. 170 00:06:50,000 --> 00:06:54,000 जर अर्थशास्त्र, किंवा बाजारपेठेच्या पद्धतीने सुरक्षितता चालली तर, 171 00:06:54,000 --> 00:06:56,000 आणि जर लोकांनी जम-खर्चाचे गणित 172 00:06:56,000 --> 00:06:59,000 सुरक्षिततेच्या भावनेवरून केले तर, 173 00:06:59,000 --> 00:07:01,000 पैसा मिळविण्यासाठी कंपन्यांसाठी हुशारीची गोष्ट 174 00:07:01,000 --> 00:07:03,000 म्हणजे लोकांच्यात सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठौ 175 00:07:03,000 --> 00:07:06,000 जे काही करावे लागते ते करायचे. 176 00:07:06,000 --> 00:07:09,000 आणि हे दोन रीतीने करता येते. 177 00:07:09,000 --> 00:07:11,000 पहिली, तुम्ही लोकांना खरोखर सुरक्षित करू शकता 178 00:07:11,000 --> 00:07:13,000 आणि ते त्याची नोंद घेतील अशी आशा राखता. 179 00:07:13,000 --> 00:07:16,000 किंवा दुसरी, तुम्ही लोकांना फक्त ते सुरक्षित आहेत असे भासवू शकता 180 00:07:16,000 --> 00:07:19,000 आणि त्यांना ते कळणार नाही अशी आशा राखता. 181 00:07:20,000 --> 00:07:23,000 आणि असे काय आहे की लोकांना नोंद घ्यायला लावते? 182 00:07:23,000 --> 00:07:25,000 त्या आहेत दोन गोष्टी: 183 00:07:25,000 --> 00:07:27,000 सुरक्षितता, धोके, जोखिमी, 184 00:07:27,000 --> 00:07:29,000 त्यांवरचे उपाय, आणि ते कसे काम करतात 185 00:07:29,000 --> 00:07:32,000 याबद्दलची समज. 186 00:07:32,000 --> 00:07:34,000 पण तुम्हाला गोष्टी माहिती असतील, 187 00:07:34,000 --> 00:07:37,000 तर तुमच्या भावना वास्तवाच्या जवळ असण्याची शक्यता जास्त आहे. 188 00:07:37,000 --> 00:07:40,000 पुरेशी व्यवहारातील उदाहारणे मदत करतील. 189 00:07:40,000 --> 00:07:43,000 आता आपल्याला आपल्या आजूबाजूच्या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण माहिती आहे, 190 00:07:43,000 --> 00:07:46,000 कारण आपण तेथे राहतो, आणि त्याबद्दलची आपली भावना 191 00:07:46,000 --> 00:07:49,000 मूलतः वास्तवाशी एकरूप असते. 192 00:07:49,000 --> 00:07:52,000 सुरक्षिततेचे नाटक तेव्हा उघडे पडते 193 00:07:52,000 --> 00:07:55,000 जेव्हा ते काम करत नाही हे स्पष्ट होते. 194 00:07:55,000 --> 00:07:59,000 ठीक आहे, तर कोणती गोष्ट लोकांना नोंद घ्यावयाला लावते? 195 00:07:59,000 --> 00:08:01,000 ती म्हणजे कमी समज. 196 00:08:01,000 --> 00:08:04,000 जर तुम्हाला धोकयांची समज नसेल तर तुम्हाला त्याच्या किंमतीची समज नसते, 197 00:08:04,000 --> 00:08:06,000 आणि जमखर्चाचे तुमचे गणित चुकीचे होण्याची शक्यता वाढते, 198 00:08:06,000 --> 00:08:09,000 आणि तुमची भावना वास्तवाशी एकरूप नसते. 199 00:08:09,000 --> 00:08:11,000 जास्त उदाहरणे नाही आहेत. 200 00:08:11,000 --> 00:08:13,000 कमी वारंवारतेच्या घटनांबाबत 201 00:08:13,000 --> 00:08:15,000 एक अंतर्भूत प्रश्न असतो. 202 00:08:15,000 --> 00:08:17,000 उदाहरणार्थ, जर 203 00:08:17,000 --> 00:08:19,000 दहशतवाद जवळजवळ होतच नसला तर, 204 00:08:19,000 --> 00:08:21,000 तर दहशतवादविरोधी-उपायांच्या प्रभावांबद्दल 205 00:08:21,000 --> 00:08:24,000 कोणताही निर्णय घेणे अवघड आहे. 206 00:08:25,000 --> 00:08:28,000 अशा कारणांसाठीच तुम्ही कुमारिकांचे बलिदान देत राहता, 207 00:08:28,000 --> 00:08:31,000 आणि तुमचे जादूई घोड्याचे संरक्षण एकदम छान काम करते. 208 00:08:31,000 --> 00:08:34,000 असफलतेची पुरेशी उदाहरणे नाही आहेत. 209 00:08:35,000 --> 00:08:38,000 आणि, भावना ज्या या गोष्टीला धुरकट बनवतायत -- 210 00:08:38,000 --> 00:08:40,000 आकलनशक्तीतील चुका, ज्याबद्दल मी आधी बोललो, 211 00:08:40,000 --> 00:08:43,000 भीती, सामजिक श्रद्धा, 212 00:08:43,000 --> 00:08:46,000 किंवा मूलतः वास्तवाचे अपुरे प्रतिरूप. 213 00:08:47,000 --> 00:08:50,000 तर मला गोष्टी अजुनही क्लिष्ट करू द्या. 214 00:08:50,000 --> 00:08:52,000 माझ्याकडे भावना आणि वास्तव आहे. 215 00:08:52,000 --> 00:08:55,000 मला तिसरे मूलतत्त्व त्यात वाढवायचे आहे, मला प्रतिरूप वाढवायचे आहे. 216 00:08:55,000 --> 00:08:57,000 भावना आणि प्रतिरूप आपल्या डोक्यात, 217 00:08:57,000 --> 00:08:59,000 आणि वास्तव बाहेरील जगात असते. 218 00:08:59,000 --> 00:09:02,000 ते बदलत नाही; ते खरे आहे. 219 00:09:02,000 --> 00:09:04,000 तर भावना आपल्या अंतर्ज्ञानावर अवलंबून असते. 220 00:09:04,000 --> 00:09:06,000 प्रतिरूप विचारशक्तीवर अवलंबून असते. 221 00:09:06,000 --> 00:09:09,000 मूलतः तोच फरक आहे. 222 00:09:09,000 --> 00:09:11,000 एका सुलभ आणि प्राचीन जगात, 223 00:09:11,000 --> 00:09:14,000 प्रतिरूप असण्यावे कारणच नाही. 224 00:09:14,000 --> 00:09:17,000 कारण भावना ही वास्तवाशी जवळ आहे. 225 00:09:17,000 --> 00:09:19,000 तुम्हाला प्रतिरूपाची गरजच नाही आहे. 226 00:09:19,000 --> 00:09:21,000 पण आधुनिक व क्लिष्ट जगात, 227 00:09:21,000 --> 00:09:23,000 आपल्याला सामोऱ्या जावे लागलेल्या धोक्यांबाबत 228 00:09:23,000 --> 00:09:26,000 समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रतिरूपांची गरज असते. 229 00:09:27,000 --> 00:09:29,000 जंतूंविषयी काही भावना नसते. 230 00:09:29,000 --> 00:09:32,000 त्यांना समजण्यासाठी प्रतिरूपाचीच गरज असते. 231 00:09:32,000 --> 00:09:34,000 म्हणजेच हे प्रतिरूप 232 00:09:34,000 --> 00:09:37,000 वास्तवाचे एक हुशारीने केलेले वर्णन असते. 233 00:09:37,000 --> 00:09:40,000 आणि नक्कीच ते विज्ञान आणि तंत्रज्ञानानुसार, 234 00:09:40,000 --> 00:09:42,000 सीमितच असते. 235 00:09:42,000 --> 00:09:45,000 जोपर्यंत सुक्ष्मदर्शीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत 236 00:09:45,000 --> 00:09:48,000 जंतूजन्य रोगांच्या सिद्धांताबद्दल आपल्याला कळणे शक्यच नव्हते. 237 00:09:49,000 --> 00:09:52,000 आणि ते आपल्या आकलनशक्तीतील तृटींमुळेही सीमित असते. 238 00:09:52,000 --> 00:09:54,000 पण त्यात आपल्या भावनेला उलथण्याची 239 00:09:54,000 --> 00:09:56,000 क्षमता असते. 240 00:09:56,000 --> 00:09:59,000 आणि ही प्रतिरूपे आपल्याला कोठून मिळतात? दुसऱ्या लोकांकडून. 241 00:09:59,000 --> 00:10:02,000 धर्मातून, संस्कृतीतून, 242 00:10:02,000 --> 00:10:04,000 शिक्षकांकडून, वयस्क लोकांकडून. 243 00:10:04,000 --> 00:10:06,000 दोन वर्षांपूर्वी, 244 00:10:06,000 --> 00:10:08,000 मी दक्षिण आफ्रिकेत सफारीसाठी गेलो होतो. 245 00:10:08,000 --> 00:10:11,000 तिथे माझ्याबरोबर असलेला मार्गदर्शक क्रुगर राष्ट्रीय उद्यानात वाढला होता. 246 00:10:11,000 --> 00:10:14,000 कसे टिकून रहायचे याबद्दलची त्याची बरीच क्लिष्ट प्रतिरूपे होती. 247 00:10:14,000 --> 00:10:16,000 आणि ते सर्व तुमच्यावर सिंह किंवा चित्ता किंवा रानगेंडा किंवा हत्ती 248 00:10:16,000 --> 00:10:18,000 यांपैकी कोणी हल्ला केला यावर आणि तुम्हाला कधी पळून जायला लागते, 249 00:10:18,000 --> 00:10:21,000 आणि तुम्हाला झाडावर कधी चढावे लागते -- 250 00:10:21,000 --> 00:10:23,000 आणि कधी झाडावर आजिबात चढून चालणार नव्हते यावर अवलंबून होते 251 00:10:23,000 --> 00:10:26,000 मी एका दिवसातच मेलो असतो, 252 00:10:26,000 --> 00:10:28,000 पण तो तिथे जन्मला होता, 253 00:10:28,000 --> 00:10:30,000 आणि कसे टिकून राहायाचे याची त्याला समज होती. 254 00:10:30,000 --> 00:10:32,000 मी न्युयॉर्क शहरात जन्मलो होतो. 255 00:10:32,000 --> 00:10:35,000 मी त्याला न्युयॉर्कला घेऊन गेलो असतो, आणि तो एका दिवासात मेला असता. 256 00:10:35,000 --> 00:10:37,000 (हशा) 257 00:10:37,000 --> 00:10:39,000 कारण आमच्या वेगवेगळ्या अनुभवांनुसार 258 00:10:39,000 --> 00:10:42,000 आमच्याकडील प्रतिरूपे भिन्नभिन्न होती. 259 00:10:43,000 --> 00:10:45,000 प्रतिरूपे माध्यमांकडून येऊ शकतात, 260 00:10:45,000 --> 00:10:48,000 आपल्या निर्वाचित अधिकाऱ्यांकडूनही. 261 00:10:48,000 --> 00:10:51,000 दहशतवादाच्या, बाल अपहरणाच्या, 262 00:10:51,000 --> 00:10:54,000 विमान सुरक्षेच्या, गाडीच्या सुरक्षेच्या 263 00:10:54,000 --> 00:10:56,000 प्रतिरूपांचा विचार करा, 264 00:10:56,000 --> 00:10:59,000 प्रतिरूपे उद्योगांकडून येऊ शकतात. 265 00:10:59,000 --> 00:11:01,000 मी अभ्यास करतो अशी दोन अवेक्षण कॅमेरा आणि 266 00:11:01,000 --> 00:11:03,000 ओळखपत्रांची, 267 00:11:03,000 --> 00:11:06,000 संगणक सुरक्षिततेची बरीच प्रतिरूपे तिकडूनच येतात. 268 00:11:06,000 --> 00:11:09,000 बरीच प्रतिरूपे विज्ञानाकडून येतात. 269 00:11:09,000 --> 00:11:11,000 आरोग्यासंबंधीची प्रतिरूपे चांगली उदाहरणे आहेत. 270 00:11:11,000 --> 00:11:14,000 कर्करोग, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, सार्सचा विचार करा. 271 00:11:14,000 --> 00:11:17,000 या रोगासंबंधीच्या सुरक्षिततेच्या 272 00:11:17,000 --> 00:11:19,000 आपल्या सर्व भावना 273 00:11:19,000 --> 00:11:21,000 खरेतर विज्ञानाने दिलेल्या आणि माध्यमातून गाळून आलेल्या 274 00:11:21,000 --> 00:11:24,000 प्रतिरूपांवरून येतात. 275 00:11:25,000 --> 00:11:28,000 तर प्रतिरूपे बदलू शकतात. 276 00:11:28,000 --> 00:11:30,000 प्रतिरूपे स्थिर नसतात. 277 00:11:30,000 --> 00:11:33,000 जसे आपण आपल्या पर्यावरणात जसे जास्त रूळत जातो, 278 00:11:33,000 --> 00:11:37,000 आपली प्रतिरूपे आपल्या भावनेच्या जवळ जाऊ शकतात. 279 00:11:38,000 --> 00:11:40,000 तर एक उदाहरण कदाचित, 280 00:11:40,000 --> 00:11:42,000 जर तुम्ही १०० वर्षापुर्वी पाहिले, 281 00:11:42,000 --> 00:11:45,000 जेव्हा वीज पाहिल्यांदा रोजच्या व्यवहारात येत होती, 282 00:11:45,000 --> 00:11:47,000 तिच्या संबंधी भरपूर भीती होती. 283 00:11:47,000 --> 00:11:49,000 मला म्हणायचे आहे की, असे लोक होते जे दरवाजावरील घंटेची कळ दाबायला घाबरत होते, 284 00:11:49,000 --> 00:11:52,000 कारण त्यात वीज होती आणि ती धोकादायक होती. 285 00:11:52,000 --> 00:11:55,000 आपल्यासाठी, आपण वीजेबरोबर अगदीच सहजतेने राहतो. 286 00:11:55,000 --> 00:11:57,000 आपण विद्य़ुत दिवे बदलतो 287 00:11:57,000 --> 00:11:59,000 त्याबद्दल अगदी काहीही विचार न करता. 288 00:11:59,000 --> 00:12:03,000 वीजेच्या सुरक्षिततेचे आपले प्रतिरूप 289 00:12:03,000 --> 00:12:06,000 आपण जन्मलो तेव्हापासूनचे आहे. 290 00:12:06,000 --> 00:12:09,000 आपण वाढत असताना ते बदललेले नाही. 291 00:12:09,000 --> 00:12:12,000 आणि आपण त्यात चांगले आहोत. 292 00:12:12,000 --> 00:12:14,000 किंवा विचार करा 293 00:12:14,000 --> 00:12:16,000 विविध पिढ्यांमधील इंटरनेटवरील धोक्यांचा 294 00:12:16,000 --> 00:12:18,000 तुमच्या पालकांचा इंटरनेट सुरक्षिततेबद्दल काय दृष्टिकोन आहे, 295 00:12:18,000 --> 00:12:20,000 विरूद्ध तुमचा काय आहे, 296 00:12:20,000 --> 00:12:23,000 विरूद्ध आपल्या मुलांचा काय असेल. 297 00:12:23,000 --> 00:12:26,000 प्रतिरूपे सरतेशेवटी पृष्ठभूमीत विरून जातात. 298 00:12:27,000 --> 00:12:30,000 अंतर्ज्ञान हा फक्त परिचित साठीचा दुसरा शब्द आहे. 299 00:12:30,000 --> 00:12:32,000 तर जसे जसे तुमचे प्रतिरूप वास्तवाच्या जवळ जाते, 300 00:12:32,000 --> 00:12:34,000 आणि तुमच्या भावनेत मिसळत जाते, 301 00:12:34,000 --> 00:12:37,000 तुम्हाला त्याचे अस्तित्वच कळत नाही. 302 00:12:37,000 --> 00:12:39,000 याचे एक सुरेख उदाहरण मागच्या वर्षी 303 00:12:39,000 --> 00:12:42,000 स्वाईन फ्लू संबंधीचे आहे. 304 00:12:42,000 --> 00:12:44,000 जेव्हा स्वाईन फ्लू पाहिल्यांदा उद्भवला, 305 00:12:44,000 --> 00:12:48,000 सुरूवातीच्या बातमीमुळे प्रमाणपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या. 306 00:12:48,000 --> 00:12:50,000 आता याला नाव होते, 307 00:12:50,000 --> 00:12:52,000 त्यामुळे नेहेमीच्या तापापेक्षा तो जास्त भीतीदायक झाला, 308 00:12:52,000 --> 00:12:54,000 जरी साधा फ्लू त्यापेक्षा जास्त प्राणघातक होता. 309 00:12:54,000 --> 00:12:58,000 आणि लोकांना वाटत होते की डॉक्टरांना त्याच्याशी सामना करता आला पाहिजे. 310 00:12:58,000 --> 00:13:00,000 त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याची भावना निर्माण झाली. 311 00:13:00,000 --> 00:13:02,000 आणि त्या दोन गोष्टींनी 312 00:13:02,000 --> 00:13:04,000 धोक्याला वास्तवापेक्षा जास्त बनविले. 313 00:13:04,000 --> 00:13:07,000 जसे नाविन्य कमी होऊ लागले, महिने सरले, 314 00:13:07,000 --> 00:13:09,000 थोडी सहनशिलता तयार झाली, 315 00:13:09,000 --> 00:13:11,000 लोकांना त्याची सवय झाली. 316 00:13:11,000 --> 00:13:14,000 नवीन माहिती काहीच नव्हती पण भीती कमी झाली. 317 00:13:14,000 --> 00:13:16,000 शरद ऋतूपर्यंत, 318 00:13:16,000 --> 00:13:18,000 लोकांना वाटू लागले 319 00:13:18,000 --> 00:13:20,000 डॉक्टरांनी यावर तोडगा शोधून काढला असावा. 320 00:13:20,000 --> 00:13:22,000 आणि लोकांना एक प्रकराचे -- 321 00:13:22,000 --> 00:13:24,000 विभाजन निवडायचे होते 322 00:13:24,000 --> 00:13:28,000 भिती आणि स्विकृतीमध्ये -- 323 00:13:28,000 --> 00:13:30,000 खरेतर भिती आणि उदासिनतेमध्ये -- 324 00:13:30,000 --> 00:13:33,000 आणि त्यांनी एक प्रकारचा संशय निवडला. 325 00:13:33,000 --> 00:13:36,000 आणि मागच्या हिवाळ्यात ज्यावेळी लस निघाली, 326 00:13:36,000 --> 00:13:39,000 असे बरेच लोक होते -- आश्चर्यकारकरित्या जास्त -- 327 00:13:39,000 --> 00:13:42,000 ज्यांनी लस घेण्यास नकार दिला -- 328 00:13:43,000 --> 00:13:45,000 हे चांगले उदाहरण आहे 329 00:13:45,000 --> 00:13:48,000 लोकांच्या सुरक्षिततेविषयीच्या भावना कशा बदलतात, त्यांचे प्रतिरूप कसे बदलते, 330 00:13:48,000 --> 00:13:50,000 एकदम मोठ्या प्रमाणात 331 00:13:50,000 --> 00:13:52,000 कोणत्याही नवीन माहितीशिवाय 332 00:13:52,000 --> 00:13:54,000 कोणत्याही नवीन गोष्टीशिवाय. 333 00:13:54,000 --> 00:13:57,000 आणि हे काहीसे बऱ्याच वेळा घडते. 334 00:13:57,000 --> 00:14:00,000 मी आणखी एक गुंत्याबद्दल बोलणार आहे. 335 00:14:00,000 --> 00:14:03,000 आपल्याकडे भावना, प्रतिरूप आणि वास्तव आहे. 336 00:14:03,000 --> 00:14:05,000 माझी सुरक्षिततेविषयी दृष्टी सापेक्षतावादी आहे. 337 00:14:05,000 --> 00:14:08,000 मला वाटते ती बघणाऱ्यावर अवलंबून असते. 338 00:14:08,000 --> 00:14:10,000 आणि बरेच सुरक्षिततेबसद्दलचे निर्णय घेताना 339 00:14:10,000 --> 00:14:14,000 विविध लोक सामील होतात. 340 00:14:14,000 --> 00:14:16,000 आणि ज्या लोकांचा थेट नफा-तोटा 341 00:14:16,000 --> 00:14:19,000 होणार असतो 342 00:14:19,000 --> 00:14:21,000 ते निर्णयावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात. 343 00:14:21,000 --> 00:14:23,000 आणि मी त्याला त्यांची कार्ययोजना मानतो. 344 00:14:23,000 --> 00:14:25,000 आणि तुम्हाला माहिती आहे कार्ययोजाना -- 345 00:14:25,000 --> 00:14:28,000 म्हणजे असते विपणन, ते राजकारण असते -- 346 00:14:28,000 --> 00:14:31,000 तुम्हाला एका प्रतिरूपापासून दुसऱ्याकडे नेण्यासाठी 347 00:14:31,000 --> 00:14:33,000 तुमचे प्रतिरूप सोडून तुमच्या भावनांवर 348 00:14:33,000 --> 00:14:36,000 विश्वास ठेवायला परावृत्त करण्यासाठी, 349 00:14:36,000 --> 00:14:39,000 तुम्हाला आवडत नसलेले प्रतिरूप मानणाऱ्या लोकांना एकटे पाडण्यासाठी. 350 00:14:39,000 --> 00:14:42,000 हे काही असाधारण नाही आहे. 351 00:14:42,000 --> 00:14:45,000 एक उदाहरण, मोठे उदाहरण, धुम्रपानाच्या धोक्याबद्दल आहे. 352 00:14:46,000 --> 00:14:49,000 गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात, प्रतिरूप कशी बदलतात हे 353 00:14:49,000 --> 00:14:51,000 धुम्रपानाचा धोका दाखवतो, 354 00:14:51,000 --> 00:14:54,000 आणि तो हेही दाखवतो की उद्योग कसे लढतात 355 00:14:54,000 --> 00:14:56,000 त्यांच्या नावडत्या प्रतिरूपांविरूद्ध. 356 00:14:56,000 --> 00:14:59,000 ह्याची तुलना करा दुसऱ्याच्या -धुम्रपानामुळे होणाऱ्या धोक्याच्या चर्चेबद्दल -- 357 00:14:59,000 --> 00:15:02,000 जी अजुनही २० वर्षे मागे आहे. 358 00:15:02,000 --> 00:15:04,000 खुर्चीच्या सुरक्षापट्ट्यांचा विचार करा. 359 00:15:04,000 --> 00:15:06,000 मी ज्यावेळी लहान होतो, कोणीच खुर्चीचे सुरक्षापट्टे वापरत नव्हते. 360 00:15:06,000 --> 00:15:08,000 हल्ली, तुम्ही सुरक्षापट्टा बांधला नाही तर 361 00:15:08,000 --> 00:15:10,000 कोणीही मुले तुम्हाला चालवू देणार नाहीत. 362 00:15:11,000 --> 00:15:13,000 त्याची तुलना करा एअरबॅगच्या चर्चेशी -- 363 00:15:13,000 --> 00:15:16,000 बहुतेक ती ३० वर्षे मागे आहे. 364 00:15:16,000 --> 00:15:19,000 प्रतिरूपांची सर्व उदाहरणे बदलत आहेत. 365 00:15:21,000 --> 00:15:24,000 आपण शिकतोय की प्रतिरूपे बदलणे कठीण आहे. 366 00:15:24,000 --> 00:15:26,000 प्रतिरूपांना हटवणे कठीण आहे. 367 00:15:26,000 --> 00:15:28,000 आणि ती तुमच्या भावनेशी एकरूप असतील तर, 368 00:15:28,000 --> 00:15:31,000 तुम्हाला माहितीही नसते की ते एक प्रतिरूप आहे. 369 00:15:31,000 --> 00:15:33,000 आणि आकलनक्षमतेत आणखीही एक चूक आहे. 370 00:15:33,000 --> 00:15:35,000 मी तिला म्हणेन पुष्टीकरण चूक, 371 00:15:35,000 --> 00:15:38,000 ज्यात आपण आपल्या विश्वासांचे 372 00:15:38,000 --> 00:15:40,000 पुष्टीकरण करणारी माहिती लगेच स्विकारतो 373 00:15:40,000 --> 00:15:43,000 आणि त्यांचे खंडन करणारी माहिती धुडकावून लावतो. 374 00:15:44,000 --> 00:15:46,000 म्हणून आपल्या प्रतिरूपाविरुद्धचा पुरावा, 375 00:15:46,000 --> 00:15:49,000 जरी ठोस असला तरी आपण तो उपेक्षित करण्याची शक्यता असते. 376 00:15:49,000 --> 00:15:52,000 आपले लक्ष्य वेधण्यासाठी तो अतिशय ठोस असायला हवा. 377 00:15:53,000 --> 00:15:55,000 लांब कालांतरावर पसरलेली नवी प्रतिरूपे कठीण असतात. 378 00:15:55,000 --> 00:15:57,000 वैश्विक तापमानवाढ हे मोठे उदाहरण आहे. 379 00:15:57,000 --> 00:15:59,000 ८० वर्षांपेक्षा जास्त काळात पसरलेले 380 00:15:59,000 --> 00:16:01,000 प्रतिरूप समजण्याबाबत आपण अती वाईट आहोत. 381 00:16:01,000 --> 00:16:03,000 आपण पुढचे पीक काढू शकतो. 382 00:16:03,000 --> 00:16:06,000 आपण मुले वाढेपर्यंतच्या काळापर्यंत विचार करू शकतो. 383 00:16:06,000 --> 00:16:09,000 पण ८० वर्षाच्या काळासाठी आपण जराही चांगले नाही. 384 00:16:09,000 --> 00:16:12,000 म्हणून ते स्विकार करण्यासाठी कठीण प्रतिरूप आहे. 385 00:16:12,000 --> 00:16:16,000 एकाचवेळी आपल्या डोक्यात दोन प्रतिरूपे असू शकतात, 386 00:16:16,000 --> 00:16:19,000 किंवा अशा पद्धतीची जटीलता ज्यात 387 00:16:19,000 --> 00:16:22,000 आपण एकाच वेळी दोन गोष्टींवर विश्वास ठेवतो, 388 00:16:22,000 --> 00:16:24,000 किंवा आकलनक्षमतेतील विसंवाद. 389 00:16:24,000 --> 00:16:26,000 सरतेशेवटी, 390 00:16:26,000 --> 00:16:29,000 नवे प्रतिरूप जुन्या प्रतिरूपाची जागा घेईल. 391 00:16:29,000 --> 00:16:32,000 ठोस विश्वास प्रतिरूप तयार करू शकते. 392 00:16:32,000 --> 00:16:35,000 ११ सप्टेंबर मुळे बऱ्यच लोकांच्या डोक्यात 393 00:16:35,000 --> 00:16:37,000 सुरक्षिततेचे एक नवे प्रतिरूप तयार झाले. 394 00:16:37,000 --> 00:16:40,000 परत, आपराधाचा स्वतःला आलेला अनुभव तसे करू शकतो, 395 00:16:40,000 --> 00:16:42,000 स्वतःच्या आरोग्याबद्दलचे प्रश्न, 396 00:16:42,000 --> 00:16:44,000 बातमीत असलेले रोग. 397 00:16:44,000 --> 00:16:46,000 तुम्ही पाहाल की मनोरोगतज्ञ या घटनांना 398 00:16:46,000 --> 00:16:48,000 चमकदार दिव्यांच्या घटना म्हणतात. 399 00:16:48,000 --> 00:16:51,000 त्या एका क्षणात नवे प्रतिरूप तयार करू शकतात, 400 00:16:51,000 --> 00:16:54,000 कारण त्या लोकांना भावनाकूल बनवतात. 401 00:16:54,000 --> 00:16:56,000 तर तांत्रिक जगात, 402 00:16:56,000 --> 00:16:58,000 प्रतिरुपांबाबत निर्णय घेण्याचा 403 00:16:58,000 --> 00:17:00,000 आपल्याला अनुभव नाही. 404 00:17:00,000 --> 00:17:02,000 आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, आपण मध्यस्थांवर अवलंबून असतो. 405 00:17:02,000 --> 00:17:06,000 मला म्हणायचे आहे की हे दुसरे लोक बरोबर असेपर्यंतच चालू शकते. 406 00:17:06,000 --> 00:17:08,000 कोणती औषधे सुरक्षित आहेत हे ठरवण्यासाठी 407 00:17:08,000 --> 00:17:13,000 आपण सरकारी यंत्रणेवर अवलंबून असतो. 408 00:17:13,000 --> 00:17:15,000 मी येथे काल उडून आलो. 409 00:17:15,000 --> 00:17:17,000 मी स्वतः विमानाची पाहणी केली नाही. 410 00:17:17,000 --> 00:17:19,000 माझे विमान सुरक्षित आहे की नाही ठरवण्यासाठी 411 00:17:19,000 --> 00:17:22,000 मी दुसऱ्या गटावर विश्वास ठेवला. 412 00:17:22,000 --> 00:17:25,000 आपण येथे आहोत, आणि हे छप्पर आपल्यावर कोसळेल याची कोणालाच भिती वाटत नाही, 413 00:17:25,000 --> 00:17:28,000 आपण स्वतः चाचपणी केली म्हणून नाही, 414 00:17:28,000 --> 00:17:30,000 पण आपल्याला माहिती आहे की बांधकामाचे इथले नियम 415 00:17:30,000 --> 00:17:33,000 चांगले आहेत म्हणून 416 00:17:33,000 --> 00:17:35,000 हे एक असे प्रतिरूप आहे जे आपण 417 00:17:35,000 --> 00:17:37,000 फक्त श्रद्धेने स्विकारले आहे. 418 00:17:37,000 --> 00:17:40,000 आणि ते ठीकही आहे. 419 00:17:42,000 --> 00:17:44,000 आता, आपल्याला गरज आहे ती 420 00:17:44,000 --> 00:17:46,000 लोकांनी चांगल्या प्रतिरूपांबद्दल 421 00:17:46,000 --> 00:17:48,000 पुरेशी माहिती समजून घेण्याची -- 422 00:17:48,000 --> 00:17:50,000 आणि ती त्यांच्या भावनेत प्रतिबिंबित करण्याची -- 423 00:17:50,000 --> 00:17:54,000 ज्यातून त्याने सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करता येईल. 424 00:17:54,000 --> 00:17:56,000 जर भावना आणि प्रतिरूप परस्परविरोधी असले, 425 00:17:56,000 --> 00:17:58,000 तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 426 00:17:58,000 --> 00:18:00,000 एक तुम्ही लोकांच्या भावना सुधारू शकता, 427 00:18:00,000 --> 00:18:02,000 थेट त्यांच्या भावनेला हात घालून. 428 00:18:02,000 --> 00:18:05,000 ती एकप्रकारची फसवणूक आहे, पण ती काम करेल. 429 00:18:05,000 --> 00:18:07,000 दुसरी जास्त प्रामाणिक पद्धत आहे 430 00:18:07,000 --> 00:18:10,000 प्रतिरूप दुरूस्त करण्याची. 431 00:18:11,000 --> 00:18:13,000 बदल हळूहळू घडतो. 432 00:18:13,000 --> 00:18:16,000 धुम्रपानाबद्दलची चर्चा ४० वर्षे व्हावी लागली, 433 00:18:16,000 --> 00:18:19,000 आणि तो प्रश्न सोपा होता. 434 00:18:19,000 --> 00:18:21,000 यातील काही गोष्टी कठीण आहेत. 435 00:18:21,000 --> 00:18:23,000 पण मला असे वाटते की खरोखर 436 00:18:23,000 --> 00:18:25,000 माहिती हीच आपली सर्वात चांगली आशा आहे. 437 00:18:25,000 --> 00:18:27,000 आणि मी खोटे बोललो. 438 00:18:27,000 --> 00:18:29,000 लक्षात आहे का जेव्हा मी भावना, प्रतिरूप, वास्तव यांबद्दल बोललो. 439 00:18:29,000 --> 00:18:32,000 मी म्हणालो वास्तव बदलत नाही. ते खरेतर बदलते. 440 00:18:32,000 --> 00:18:34,000 आपण तांत्रिक जगात राहतो; 441 00:18:34,000 --> 00:18:37,000 वास्तव सारखेच बदलत असते. 442 00:18:37,000 --> 00:18:40,000 आपल्या प्रजातीसाठी पहिल्यांदा असे होतेय की 443 00:18:40,000 --> 00:18:43,000 भावना प्रतिरूपांच्या मागे आहेत, प्रतिरूपे वास्तवाच्या मागे आहे आणि वास्तव बदलत आहे -- 444 00:18:43,000 --> 00:18:46,000 आणी ते कधीच मिळणार नाहीत. 445 00:18:47,000 --> 00:18:49,000 आपल्याला माहिती नाही. 446 00:18:49,000 --> 00:18:51,000 पण मोठ्या कालखंडात, 447 00:18:51,000 --> 00:18:54,000 दोन्ही भावना आणि वास्तव महत्त्वाचे आहेत. 448 00:18:54,000 --> 00:18:57,000 आणि हे समजविण्यासाठी दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. 449 00:18:57,000 --> 00:18:59,000 १९८२ -- माहिती नाही लोकांच्या लक्ष्यात आहे की नाही -- 450 00:18:59,000 --> 00:19:02,000 त्यावेळी संयुक्त संस्थानात एक छोटीशी साथ पसरली होती 451 00:19:02,000 --> 00:19:04,000 टायलेनॉलतू होणाऱ्या विषबाधेची. 452 00:19:04,000 --> 00:19:07,000 ती एक भयानक गोष्ट आहे. कोणीतरी टायलेनॉलची बाटली घेतली, 453 00:19:07,000 --> 00:19:10,000 त्यात विष टाकले, बंद केली आणि परत जागेवर ठेवली. 454 00:19:10,000 --> 00:19:12,000 कोणीतरी दुसऱ्याने ती विकत घेतली आणि मृत्यमूखी पडले. 455 00:19:12,000 --> 00:19:14,000 याने लोक प्रचंड घाबरले. 456 00:19:14,000 --> 00:19:16,000 अशाच प्रकारचे एकदोन आणखीही हल्ले झाले. 457 00:19:16,000 --> 00:19:19,000 यातून खरा धोका काहीच नव्हता, पण लोक घाबरले होते. 458 00:19:19,000 --> 00:19:21,000 आणि यातूनच 459 00:19:21,000 --> 00:19:23,000 ढवळाढवळ-रोधक औषधोद्योगांची सुरुवात झाली. 460 00:19:23,000 --> 00:19:25,000 ती ढवळाढवळ-रोधक टोपणे, यातूनच आली. 461 00:19:25,000 --> 00:19:27,000 ते संपूर्णपणे एक सुरक्षिततेचे नाटक आहे. 462 00:19:27,000 --> 00:19:29,000 गृहपाठ म्हणून त्यावर मात करण्याचे १० मार्ग शोधा. 463 00:19:29,000 --> 00:19:32,000 मी तुम्हाला एक देतो, औषधी सुई 464 00:19:32,000 --> 00:19:35,000 पण यातून लोकांना चांगले वाटले. 465 00:19:35,000 --> 00:19:37,000 त्यामुळे त्यांची सुरक्षीततेची भावना 466 00:19:37,000 --> 00:19:39,000 वास्तवाच्या जवळ येण्यास मदत झाली. 467 00:19:39,000 --> 00:19:42,000 शेवटची गोष्ट, काही वर्षांपूर्वी, माझ्या मैत्रिणीने जन्म दिला. 468 00:19:42,000 --> 00:19:44,000 मी तिला दवाखान्यात भेटायला गेलो. 469 00:19:44,000 --> 00:19:46,000 हल्ली जेव्हा बाळ जन्माला येते, 470 00:19:46,000 --> 00:19:48,000 ते बाळाच्या हातार रेडियो-बांगडी घालतात ओळखण्यासाठी, 471 00:19:48,000 --> 00:19:50,000 आणि तशीच एक आईच्या हातात घालतात, 472 00:19:50,000 --> 00:19:52,000 म्हणजे जर आईशिवाय कोणी मुलाला प्रसुतीगृहातून बाहेर नेले, 473 00:19:52,000 --> 00:19:54,000 तर गजर वाजतो. 474 00:19:54,000 --> 00:19:56,000 मी म्हणालो, "वा, एकदम छान आहे हे. 475 00:19:56,000 --> 00:19:58,000 पण आपल्याकडे दवाखान्यातून मुलांना पळविण्याचे 476 00:19:58,000 --> 00:20:00,000 प्रमाण किती आहे." 477 00:20:00,000 --> 00:20:02,000 मी घरी गेलो आणि पाहिले. 478 00:20:02,000 --> 00:20:04,000 मूलतः ते कधीच होत नाही. 479 00:20:04,000 --> 00:20:06,000 पण जर त्याबद्दल तुम्ही विचार केला तर, 480 00:20:06,000 --> 00:20:08,000 जर तुम्ही दवाखाना असाल, 481 00:20:08,000 --> 00:20:10,000 आणि जर तुम्हाला बाळाला काही चाचण्या करण्यासाठी 482 00:20:10,000 --> 00:20:12,000 आईपासून दूर घेऊन जायचे आहे, 483 00:20:12,000 --> 00:20:14,000 तर तुमच्याकडे एक चांगले "सुरक्षिततेचे नाटक" असणे गरजेचे आहे. 484 00:20:14,000 --> 00:20:16,000 नाहीतर आई तुमचा हात तोडून टाकेल. 485 00:20:16,000 --> 00:20:18,000 (हशा) 486 00:20:18,000 --> 00:20:20,000 म्हणून ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, 487 00:20:20,000 --> 00:20:22,000 आपल्यातील जे सुरक्षिततेची संरचना करतात त्यांच्यासाठी, 488 00:20:22,000 --> 00:20:25,000 जे सुरक्षा नीती पाहतात त्यांच्यासाठी, 489 00:20:25,000 --> 00:20:27,000 किंवा सुरक्षेवर परिणाम करणारी 490 00:20:27,000 --> 00:20:29,000 सार्वजनिक नीती ठरवतात त्यांच्यासाठी. 491 00:20:29,000 --> 00:20:32,000 सुरक्षितता फक्त वास्तवच नाही तर भावना आणि वास्तव आहे. 492 00:20:32,000 --> 00:20:34,000 आणि महत्त्वाचे हे आहे की 493 00:20:34,000 --> 00:20:36,000 ते दोन्ही जवळजवळ एकसारखेच असावेत. 494 00:20:36,000 --> 00:20:38,000 महत्त्वाचे आहे की, आपल्या भावना वास्तवाशी एकरूप असाव्यात. 495 00:20:38,000 --> 00:20:40,000 आपण सुरक्षेच्या जमा-खर्चाचे गणित व्यवस्थित करावे. 496 00:20:40,000 --> 00:20:42,000 धन्यवाद. 497 00:20:42,000 --> 00:20:44,000 (टाळ्या)