0:00:00.000,0:00:02.000 तर सुरक्षितता म्हणजे दोन भिन्न गोष्टी आहेत: 0:00:02.000,0:00:04.000 ती एक भावना आहे आणि ते एक वास्तव आहे. 0:00:04.000,0:00:06.000 आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. 0:00:06.000,0:00:08.000 तुम्ही सुरक्षित नसला तरी 0:00:08.000,0:00:10.000 तुम्हाला सुरक्षित वाटू शकते. 0:00:10.000,0:00:12.000 आणि तुम्हाला सुरक्षित वाटले नाही तरी 0:00:12.000,0:00:14.000 तुम्ही सुरक्षित असू शकता. 0:00:14.000,0:00:16.000 खरोखर, त्या दोन वेगवेगळ्या संकल्पना 0:00:16.000,0:00:18.000 एकाच शब्दाशी संबंधित आहेत. 0:00:18.000,0:00:20.000 आणि या भाषणाद्वारे मला 0:00:20.000,0:00:22.000 त्या दोन्ही तोडायच्या आहेत -- 0:00:22.000,0:00:24.000 त्या कधी दूर जातात 0:00:24.000,0:00:26.000 आणि त्या कधी एकत्र येतात हे समजून घेऊन. 0:00:26.000,0:00:28.000 आणि भाषा हा यातील एक खराखुरा अडथळा आहे. 0:00:28.000,0:00:30.000 आपण ज्या संकल्पनांबद्दल बोलणार आहोत 0:00:30.000,0:00:33.000 त्यांसाठी फारसे योग्य शब्द नाही आहेत. 0:00:33.000,0:00:35.000 म्हणून जर तुम्ही सुरक्षिततेकडे 0:00:35.000,0:00:37.000 अर्थशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर, 0:00:37.000,0:00:39.000 ती एक जमा खर्चाचे गणित आहे. 0:00:39.000,0:00:41.000 प्रत्येकवेळी तुम्हाला सुरक्षितता मिळत असते 0:00:41.000,0:00:43.000 त्यावेळी तुम्ही दुसरे काहीतरी खर्च करत असता. 0:00:43.000,0:00:45.000 हा तुमचा व्यक्तिगत निर्णय असेल -- 0:00:45.000,0:00:47.000 तुम्ही घरी सुरक्षा-गजर लावणार का नाही याबद्दलचा -- 0:00:47.000,0:00:50.000 किंवा राष्ट्रीय निर्णय असेल -- तुम्ही दुसर्या देशावर आक्रमण करण्यासाठीचा-- 0:00:50.000,0:00:52.000 तुम्ही कशावर तरी पाणी सोडताय, 0:00:52.000,0:00:55.000 पैसा किंवा वेळ, सुविधा, क्षमता, 0:00:55.000,0:00:58.000 किंवा मूलभूत स्वातंत्र्यांवर 0:00:58.000,0:01:01.000 आणि कोणत्याही सुरक्षेकडे पाहताना विचारायचा प्रश्न 0:01:01.000,0:01:04.000 हा नाही की त्यामुळे आपण सुरक्षित होत आहोत की नाही, 0:01:04.000,0:01:07.000 पण त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर आहे की नाही हा आहे. 0:01:07.000,0:01:09.000 तुम्ही गेली काही वर्षे ऐकताय, 0:01:09.000,0:01:11.000 सद्दाम हुसेन सत्तेवर नाही त्यामुळे जग जास्त सुरक्षित आहे. 0:01:11.000,0:01:14.000 ते खरे असेलही, पण ते जास्त महत्त्वाचे नाही आहे. 0:01:14.000,0:01:17.000 प्रश्न आहे की त्यासाठी मोजलेली किंमत बरोबर होती की नव्हती. 0:01:17.000,0:01:20.000 आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या, 0:01:20.000,0:01:22.000 आणि तुम्ही ठरवाल की त्यांच्यावर केलेले आक्रमण बरोबर होते की नाही. 0:01:22.000,0:01:24.000 असा तुम्ही सुरक्षिततेबद्दल विचार करायचा असतो -- 0:01:24.000,0:01:26.000 जमा-खर्चाच्या गणिताद्वारे. 0:01:26.000,0:01:29.000 आता यात अनेकवेळा चूक किंवा बरोबर असे काहीच नसते. 0:01:29.000,0:01:31.000 आपल्यातील काही लोकांच्या घरात सुरक्षागजर प्रणाली असते, 0:01:31.000,0:01:33.000 आणि काहींच्यात नसते. 0:01:33.000,0:01:35.000 आणि हे सर्व अवलंबून आहे आपण कुठे राहतो, 0:01:35.000,0:01:37.000 आपण एकटे राहतो की कुटूंबासोबत, 0:01:37.000,0:01:39.000 आपल्याकडे किती मुल्यवान माल आहे, 0:01:39.000,0:01:41.000 आणि चोरीच्या धोक्याचा स्विकार 0:01:41.000,0:01:43.000 आपण किती करू शकतो यांवर. 0:01:43.000,0:01:45.000 राजकारणातही, 0:01:45.000,0:01:47.000 बरेच वेगवेगळे पर्याय असतात. 0:01:47.000,0:01:49.000 आणि बर्याच वेळेला, हे जमा-खर्च, 0:01:49.000,0:01:51.000 फक्त सुरक्षिततेशिवाय इतर गोष्टींबद्दल असतात, 0:01:51.000,0:01:53.000 आणि मला वाटते ते खरोखर महत्त्वाचे आहे. 0:01:53.000,0:01:55.000 आता लोकांना या जमाखर्चाबद्दल 0:01:55.000,0:01:57.000 नैसर्गिक अंतर्ज्ञान असते. 0:01:57.000,0:01:59.000 आपण ते दररोज करत असतो -- 0:01:59.000,0:02:01.000 काल रात्री माझ्या हॉटेलच्या खोलीत, 0:02:01.000,0:02:03.000 जेव्हा मी दाराला दोन कुलुपे लावायचे ठरवले त्यावेळी, 0:02:03.000,0:02:05.000 किंवा तुम्ही इथे गाडी चालवत आला त्यावेळी 0:02:05.000,0:02:07.000 जेव्हा आपण जेवायला जातो त्यावेळी 0:02:07.000,0:02:10.000 आपण ठरवतो की जेवण विषारी नाही आहे आणि आपण ते खातो. 0:02:10.000,0:02:12.000 आपण हे जमा-खर्चाचे गणित परत परत 0:02:12.000,0:02:14.000 दररोज अनेक वेळा करतो. 0:02:14.000,0:02:16.000 बहुतांशी आपल्या ध्यानातही ते येत नाहीत. 0:02:16.000,0:02:18.000 आपल्या जिवंत असण्याचाच ते एक भाग आहेत; आपण सगळेच ते करतो. 0:02:18.000,0:02:21.000 प्रत्येक प्रजाती तसे करते. 0:02:21.000,0:02:23.000 समजा शेतात एक ससा गवत खातो आहे, 0:02:23.000,0:02:26.000 आणि सश्याला कोल्हा दिसणार आहे. 0:02:26.000,0:02:28.000 ससा सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करणार आहे: 0:02:28.000,0:02:30.000 "मी थांबू की मी पळून जाऊ?" 0:02:30.000,0:02:32.000 आणि तुम्ही त्याबाबत विचार केला, 0:02:32.000,0:02:35.000 तर जे ससे ते गणित करण्यात चांगले आहेत 0:02:35.000,0:02:37.000 ते जगतील आणि प्रजनन करतील 0:02:37.000,0:02:39.000 आणि जे ससे ते करण्यात वाईट असतील 0:02:39.000,0:02:41.000 ते भक्ष्य बनतील किंवा उपाशी राहतील. 0:02:41.000,0:02:43.000 आणि तुम्हा विचार करता की 0:02:43.000,0:02:46.000 आपण, या ग्रहावरील सर्वात यशस्वी प्रजाती -- 0:02:46.000,0:02:48.000 तुम्ही, मी, सर्वजण -- 0:02:48.000,0:02:51.000 हे जमा-खर्चाचे गणित करण्यात एकदम पारंगत असू. 0:02:51.000,0:02:53.000 तरी परत परत असे दिसून येते 0:02:53.000,0:02:56.000 की आपण त्याबाबत अतिशय वाईट आहोत. 0:02:56.000,0:02:59.000 आणि मला वाटते की हा मूलतः रोचक प्रश्न आहे. 0:02:59.000,0:03:01.000 मी तुम्हाला थोडक्यात उत्तर देईन. 0:03:01.000,0:03:03.000 उत्तर आहे की आपण सुरक्षिततेच्या भावनेनुसार वागतो 0:03:03.000,0:03:06.000 आणि वास्तवानुसार नाही. 0:03:06.000,0:03:09.000 आणि बहुतेक वेळा ते चालते. 0:03:10.000,0:03:12.000 बर्याचदा, 0:03:12.000,0:03:15.000 भावना आणि वास्तव एकच असतात. 0:03:15.000,0:03:17.000 आणि जवळजवळ संपूर्ण मानवी प्रागैतिहासात 0:03:17.000,0:03:20.000 ते नक्कीच खरे होते. 0:03:20.000,0:03:23.000 आपण ही क्षमता विकसित केली आहे 0:03:23.000,0:03:25.000 कारण ती उत्क्रांतीच्या दृष्टीने योग्य होती. 0:03:25.000,0:03:27.000 याबद्दल असा विचार करता येईल 0:03:27.000,0:03:29.000 की आपण इसपूर्व १,००,००० मध्ये 0:03:29.000,0:03:31.000 पूर्व आफ्रिकेतील पर्वतीय प्रदेशात छोट्या कुटूंबातील गटात 0:03:31.000,0:03:34.000 राहात असताना नेहमी घ्याव्या लागलेल्या धोक्यांबद्दलच्या 0:03:34.000,0:03:37.000 निर्णयांबाबत अतिशय तल्लख आहोत. 0:03:37.000,0:03:40.000 २०१० मधल्या न्यूयॉर्कसाठी, फारसे नाही. 0:03:41.000,0:03:44.000 धोका समजण्याच्या बाबतीत अनेक चुका होत असतात. 0:03:44.000,0:03:46.000 यातील बरेच चांगले प्रयोग केले गेले आहेत. 0:03:46.000,0:03:49.000 आणि तुम्हाला काही चुका पुन्हापन्हा होताना दिसू शकतील. 0:03:49.000,0:03:51.000 मी त्यातील चार सांगतो. 0:03:51.000,0:03:54.000 आपण भव्य-दिव्य आणि असामान्य अशा धोक्यांना अतिरंजित करतो 0:03:54.000,0:03:56.000 आणि नेहमीच्या धोक्यांना कमी किंमत देतो -- 0:03:56.000,0:03:59.000 जसे (विमानातून) उडणे विरूद्ध (गाडी) चालवणे. 0:03:59.000,0:04:01.000 अज्ञात गोष्टींना ज्ञात गोष्टींपेक्षा 0:04:01.000,0:04:04.000 जास्त धोकादायक समजले जाते. 0:04:05.000,0:04:07.000 त्याचे एक उदाहारण असेल, 0:04:07.000,0:04:10.000 लोकांना परके लोक अपहरण करतील अशी भीती वाटते, 0:04:10.000,0:04:13.000 तर याबाबतीतील माहिती नातेवाईकांनी केलेली अपहरणे जास्त असतात याला आधार देते. 0:04:13.000,0:04:15.000 हे आहे मुलांबाबात. 0:04:15.000,0:04:18.000 तिसरी, एखाद्या व्यक्तीशी निगडीत अशा धोक्यांना 0:04:18.000,0:04:21.000 अनामिक धोक्यांपेक्षा जास्त मोठे समजले जाते. 0:04:21.000,0:04:24.000 जसं बिन लादेन जास्त भीतीदायक आहे कारण त्याला नाव आहे. 0:04:24.000,0:04:26.000 आणि चौथी.. 0:04:26.000,0:04:28.000 की लोक त्यांचे नियंत्रण असलेल्या परिस्थितीतील 0:04:28.000,0:04:30.000 धोक्यांना प्रमाणापेक्षा कमी महत्त्व देतात 0:04:30.000,0:04:34.000 आणि ज्या परिस्थितीवर त्यांचे नियत्रण नाही त्यातील धोक्यांना जास्त महत्त्व देतात. 0:04:34.000,0:04:37.000 तर एकदा तुम्ही स्कायडायविंग किंवा धुम्रपान करण्यास सुरूवात केली, 0:04:37.000,0:04:39.000 की तुम्ही त्यातील धोक्यांने कमी लेखता. 0:04:39.000,0:04:42.000 जर धोका तुमच्यावर लादला गेला असेल तर -- दहशतवाद हे चांगले उदाहरण होते -- 0:04:42.000,0:04:45.000 तुम्ही त्याला जास्त किंमत देता, कारण तुम्हाला ते तुमच्या नियंत्रणाखाली आहे असे वाटत नाही. 0:04:47.000,0:04:50.000 अशा आणखीही बर्याच चुका आहेत, आकलनातील चुका, 0:04:50.000,0:04:53.000 ज्या आपल्या धोक्यांविषयीच्या निर्णयांवर परिणाम करतात. 0:04:53.000,0:04:55.000 त्यातील एक उपलब्धता अनुमान, 0:04:55.000,0:04:57.000 ज्याचा अर्थ मूलतः असा आहे की 0:04:57.000,0:05:00.000 आपण एखाद्या गोष्टीची शक्यता त्या गोष्टीबद्दलच्या 0:05:00.000,0:05:04.000 घटना किती लगेच मनात आणू शकतो यावरून ठरवतो. 0:05:04.000,0:05:06.000 तुम्ही विचार करू शकाल ते कसे होते. 0:05:06.000,0:05:09.000 तुम्ही जर वाघांच्या हल्ल्यांबाबात बरेच ऐकले असेल तर, आजूबाजूला भरपूर वाघ असणारच. 0:05:09.000,0:05:12.000 सिंहाचे हल्ले तुमच्या ऐकिवात नाहीत म्हणजे अजूबाजूला जास्त सिंह नाही आहेत. 0:05:12.000,0:05:15.000 हे ठीक आहे जोपर्यंत तुम्ही वर्तमानपत्रांचा शोध लावत नाही. 0:05:15.000,0:05:17.000 कारण वर्तमानपत्रे काय करतात की 0:05:17.000,0:05:19.000 ती कधीतरी उद्भवणार्या धोक्यांची 0:05:19.000,0:05:21.000 वारंवार पुनरूक्ती करतात 0:05:21.000,0:05:23.000 मी लोकांना सांगतो, जर एखादी गोष्ट वर्तमानपत्रात असेल तर त्याबद्दल काळजी करू नका. 0:05:23.000,0:05:25.000 कारण व्याख्येनुसारच, 0:05:25.000,0:05:28.000 बातमी म्हणजे एखादी गोष्ट जी जवळजवळ कधीच घडत नाही. 0:05:28.000,0:05:30.000 (हशा) 0:05:30.000,0:05:33.000 एखादी गोष्ट सारखीच घडत असेल, तर ती बातमी होऊ शकत नाही -- 0:05:33.000,0:05:35.000 गाड्यांचे अपघात, घरगुती मारहाण -- 0:05:35.000,0:05:38.000 त्यागोष्टींबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे. 0:05:38.000,0:05:40.000 आणि आपण एक गोष्टी सागणार्यांची जमात पण आहोत. 0:05:40.000,0:05:43.000 आपण माहितीपेक्षा गोष्टींना जास्त महत्त्व देतो. 0:05:43.000,0:05:45.000 आणि त्यात थोडा पायाभूत निरंकपणा (अंकांबद्दलचे अज्ञान) आहे. 0:05:45.000,0:05:48.000 म्हणजे तो "एक दोन तीन, अनेक" चा विनोद काहीसा बरोबरच आहे. 0:05:48.000,0:05:51.000 आपन लहान संख्यांच्या बाबतीत एकदम चांगले आहोत. 0:05:51.000,0:05:53.000 एक आंबा, दोन आंबे, तीन आंबे, 0:05:53.000,0:05:55.000 १०,००० आंबे, १,००,००० आंबे -- 0:05:55.000,0:05:58.000 अजुनही नासून जाण्याआधी खाता येतील त्यापेक्षा ते जास्त आंबे आहेत. 0:05:58.000,0:06:01.000 तर अर्धा, पाव, एक पंचमांश -- याबाबत आपण चांगले आहोत. 0:06:01.000,0:06:03.000 दहा लाखात एक, शंभर कोटीत एक -- 0:06:03.000,0:06:06.000 ते म्हणजे जवळ जवळ नसल्यासारखेच आहेत. 0:06:06.000,0:06:08.000 म्हणूनच आपल्याला सामान्य नसलेले धोके 0:06:08.000,0:06:10.000 समजण्यास त्रास होतो. 0:06:10.000,0:06:12.000 आणि या आकलनशक्तीतील चुका 0:06:12.000,0:06:15.000 आपल्या आणि वास्तवामधील चाळणी बनतात. 0:06:15.000,0:06:17.000 आणि त्याचा परिणाम 0:06:17.000,0:06:19.000 असा होतो की भावना आणि वास्तव यात काहीच समान राहत नाही, 0:06:19.000,0:06:22.000 ते भिन्न बनतात. 0:06:22.000,0:06:25.000 आता तुमची एकतर अशी भावना असते की -- तुम्हाला तुम्ही असता त्यापेक्षा जास्त सुरक्षित वाटते. 0:06:25.000,0:06:27.000 हीच आहे सुरक्षेची चुकीची समजूत. 0:06:27.000,0:06:29.000 किंवा उलट, 0:06:29.000,0:06:31.000 आपण असुरक्षित असल्याची चुकीची भावना. 0:06:31.000,0:06:34.000 मी "सुरक्षिततेच्या नाटकासंबंधी" बरेच लिहीतो, 0:06:34.000,0:06:37.000 ज्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे लोकांना सुरक्षित वाटते, 0:06:37.000,0:06:39.000 पण वास्तवात त्यांचा काहीही उपयोग होत नाही. 0:06:39.000,0:06:41.000 अशा गोष्टींसाठी कुठलाच शब्द नाही आहे ज्या आपल्याला सुरक्षित करतात, 0:06:41.000,0:06:43.000 पण आपल्याला सुरक्षित वाटू देत नाहीत. 0:06:43.000,0:06:46.000 बहुतेक ते काम आपल्यासाठी सीआयए करते. 0:06:48.000,0:06:50.000 परतूया अर्थशास्त्राकडे. 0:06:50.000,0:06:54.000 जर अर्थशास्त्र, किंवा बाजारपेठेच्या पद्धतीने सुरक्षितता चालली तर, 0:06:54.000,0:06:56.000 आणि जर लोकांनी जम-खर्चाचे गणित 0:06:56.000,0:06:59.000 सुरक्षिततेच्या भावनेवरून केले तर, 0:06:59.000,0:07:01.000 पैसा मिळविण्यासाठी कंपन्यांसाठी हुशारीची गोष्ट 0:07:01.000,0:07:03.000 म्हणजे लोकांच्यात सुरक्षिततेची भावना वाढवण्यासाठौ 0:07:03.000,0:07:06.000 जे काही करावे लागते ते करायचे. 0:07:06.000,0:07:09.000 आणि हे दोन रीतीने करता येते. 0:07:09.000,0:07:11.000 पहिली, तुम्ही लोकांना खरोखर सुरक्षित करू शकता 0:07:11.000,0:07:13.000 आणि ते त्याची नोंद घेतील अशी आशा राखता. 0:07:13.000,0:07:16.000 किंवा दुसरी, तुम्ही लोकांना फक्त ते सुरक्षित आहेत असे भासवू शकता 0:07:16.000,0:07:19.000 आणि त्यांना ते कळणार नाही अशी आशा राखता. 0:07:20.000,0:07:23.000 आणि असे काय आहे की लोकांना नोंद घ्यायला लावते? 0:07:23.000,0:07:25.000 त्या आहेत दोन गोष्टी: 0:07:25.000,0:07:27.000 सुरक्षितता, धोके, जोखिमी, 0:07:27.000,0:07:29.000 त्यांवरचे उपाय, आणि ते कसे काम करतात 0:07:29.000,0:07:32.000 याबद्दलची समज. 0:07:32.000,0:07:34.000 पण तुम्हाला गोष्टी माहिती असतील, 0:07:34.000,0:07:37.000 तर तुमच्या भावना वास्तवाच्या जवळ असण्याची शक्यता जास्त आहे. 0:07:37.000,0:07:40.000 पुरेशी व्यवहारातील उदाहारणे मदत करतील. 0:07:40.000,0:07:43.000 आता आपल्याला आपल्या आजूबाजूच्या भागातील गुन्ह्यांचे प्रमाण माहिती आहे, 0:07:43.000,0:07:46.000 कारण आपण तेथे राहतो, आणि त्याबद्दलची आपली भावना 0:07:46.000,0:07:49.000 मूलतः वास्तवाशी एकरूप असते. 0:07:49.000,0:07:52.000 सुरक्षिततेचे नाटक तेव्हा उघडे पडते 0:07:52.000,0:07:55.000 जेव्हा ते काम करत नाही हे स्पष्ट होते. 0:07:55.000,0:07:59.000 ठीक आहे, तर कोणती गोष्ट लोकांना नोंद घ्यावयाला लावते? 0:07:59.000,0:08:01.000 ती म्हणजे कमी समज. 0:08:01.000,0:08:04.000 जर तुम्हाला धोकयांची समज नसेल तर तुम्हाला त्याच्या किंमतीची समज नसते, 0:08:04.000,0:08:06.000 आणि जमखर्चाचे तुमचे गणित चुकीचे होण्याची शक्यता वाढते, 0:08:06.000,0:08:09.000 आणि तुमची भावना वास्तवाशी एकरूप नसते. 0:08:09.000,0:08:11.000 जास्त उदाहरणे नाही आहेत. 0:08:11.000,0:08:13.000 कमी वारंवारतेच्या घटनांबाबत 0:08:13.000,0:08:15.000 एक अंतर्भूत प्रश्न असतो. 0:08:15.000,0:08:17.000 उदाहरणार्थ, जर 0:08:17.000,0:08:19.000 दहशतवाद जवळजवळ होतच नसला तर, 0:08:19.000,0:08:21.000 तर दहशतवादविरोधी-उपायांच्या प्रभावांबद्दल 0:08:21.000,0:08:24.000 कोणताही निर्णय घेणे अवघड आहे. 0:08:25.000,0:08:28.000 अशा कारणांसाठीच तुम्ही कुमारिकांचे बलिदान देत राहता, 0:08:28.000,0:08:31.000 आणि तुमचे जादूई घोड्याचे संरक्षण एकदम छान काम करते. 0:08:31.000,0:08:34.000 असफलतेची पुरेशी उदाहरणे नाही आहेत. 0:08:35.000,0:08:38.000 आणि, भावना ज्या या गोष्टीला धुरकट बनवतायत -- 0:08:38.000,0:08:40.000 आकलनशक्तीतील चुका, ज्याबद्दल मी आधी बोललो, 0:08:40.000,0:08:43.000 भीती, सामजिक श्रद्धा, 0:08:43.000,0:08:46.000 किंवा मूलतः वास्तवाचे अपुरे प्रतिरूप. 0:08:47.000,0:08:50.000 तर मला गोष्टी अजुनही क्लिष्ट करू द्या. 0:08:50.000,0:08:52.000 माझ्याकडे भावना आणि वास्तव आहे. 0:08:52.000,0:08:55.000 मला तिसरे मूलतत्त्व त्यात वाढवायचे आहे, मला प्रतिरूप वाढवायचे आहे. 0:08:55.000,0:08:57.000 भावना आणि प्रतिरूप आपल्या डोक्यात, 0:08:57.000,0:08:59.000 आणि वास्तव बाहेरील जगात असते. 0:08:59.000,0:09:02.000 ते बदलत नाही; ते खरे आहे. 0:09:02.000,0:09:04.000 तर भावना आपल्या अंतर्ज्ञानावर अवलंबून असते. 0:09:04.000,0:09:06.000 प्रतिरूप विचारशक्तीवर अवलंबून असते. 0:09:06.000,0:09:09.000 मूलतः तोच फरक आहे. 0:09:09.000,0:09:11.000 एका सुलभ आणि प्राचीन जगात, 0:09:11.000,0:09:14.000 प्रतिरूप असण्यावे कारणच नाही. 0:09:14.000,0:09:17.000 कारण भावना ही वास्तवाशी जवळ आहे. 0:09:17.000,0:09:19.000 तुम्हाला प्रतिरूपाची गरजच नाही आहे. 0:09:19.000,0:09:21.000 पण आधुनिक व क्लिष्ट जगात, 0:09:21.000,0:09:23.000 आपल्याला सामोऱ्या जावे लागलेल्या धोक्यांबाबत 0:09:23.000,0:09:26.000 समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रतिरूपांची गरज असते. 0:09:27.000,0:09:29.000 जंतूंविषयी काही भावना नसते. 0:09:29.000,0:09:32.000 त्यांना समजण्यासाठी प्रतिरूपाचीच गरज असते. 0:09:32.000,0:09:34.000 म्हणजेच हे प्रतिरूप 0:09:34.000,0:09:37.000 वास्तवाचे एक हुशारीने केलेले वर्णन असते. 0:09:37.000,0:09:40.000 आणि नक्कीच ते विज्ञान आणि तंत्रज्ञानानुसार, 0:09:40.000,0:09:42.000 सीमितच असते. 0:09:42.000,0:09:45.000 जोपर्यंत सुक्ष्मदर्शीचा शोध लागला नव्हता तोपर्यंत 0:09:45.000,0:09:48.000 जंतूजन्य रोगांच्या सिद्धांताबद्दल आपल्याला कळणे शक्यच नव्हते. 0:09:49.000,0:09:52.000 आणि ते आपल्या आकलनशक्तीतील तृटींमुळेही सीमित असते. 0:09:52.000,0:09:54.000 पण त्यात आपल्या भावनेला उलथण्याची 0:09:54.000,0:09:56.000 क्षमता असते. 0:09:56.000,0:09:59.000 आणि ही प्रतिरूपे आपल्याला कोठून मिळतात? दुसऱ्या लोकांकडून. 0:09:59.000,0:10:02.000 धर्मातून, संस्कृतीतून, 0:10:02.000,0:10:04.000 शिक्षकांकडून, वयस्क लोकांकडून. 0:10:04.000,0:10:06.000 दोन वर्षांपूर्वी, 0:10:06.000,0:10:08.000 मी दक्षिण आफ्रिकेत सफारीसाठी गेलो होतो. 0:10:08.000,0:10:11.000 तिथे माझ्याबरोबर असलेला मार्गदर्शक क्रुगर राष्ट्रीय उद्यानात वाढला होता. 0:10:11.000,0:10:14.000 कसे टिकून रहायचे याबद्दलची त्याची बरीच क्लिष्ट प्रतिरूपे होती. 0:10:14.000,0:10:16.000 आणि ते सर्व तुमच्यावर सिंह किंवा चित्ता किंवा रानगेंडा किंवा हत्ती 0:10:16.000,0:10:18.000 यांपैकी कोणी हल्ला केला यावर आणि तुम्हाला कधी पळून जायला लागते, 0:10:18.000,0:10:21.000 आणि तुम्हाला झाडावर कधी चढावे लागते -- 0:10:21.000,0:10:23.000 आणि कधी झाडावर आजिबात चढून चालणार नव्हते यावर अवलंबून होते 0:10:23.000,0:10:26.000 मी एका दिवसातच मेलो असतो, 0:10:26.000,0:10:28.000 पण तो तिथे जन्मला होता, 0:10:28.000,0:10:30.000 आणि कसे टिकून राहायाचे याची त्याला समज होती. 0:10:30.000,0:10:32.000 मी न्युयॉर्क शहरात जन्मलो होतो. 0:10:32.000,0:10:35.000 मी त्याला न्युयॉर्कला घेऊन गेलो असतो, आणि तो एका दिवासात मेला असता. 0:10:35.000,0:10:37.000 (हशा) 0:10:37.000,0:10:39.000 कारण आमच्या वेगवेगळ्या अनुभवांनुसार 0:10:39.000,0:10:42.000 आमच्याकडील प्रतिरूपे भिन्नभिन्न होती. 0:10:43.000,0:10:45.000 प्रतिरूपे माध्यमांकडून येऊ शकतात, 0:10:45.000,0:10:48.000 आपल्या निर्वाचित अधिकाऱ्यांकडूनही. 0:10:48.000,0:10:51.000 दहशतवादाच्या, बाल अपहरणाच्या, 0:10:51.000,0:10:54.000 विमान सुरक्षेच्या, गाडीच्या सुरक्षेच्या 0:10:54.000,0:10:56.000 प्रतिरूपांचा विचार करा, 0:10:56.000,0:10:59.000 प्रतिरूपे उद्योगांकडून येऊ शकतात. 0:10:59.000,0:11:01.000 मी अभ्यास करतो अशी दोन अवेक्षण कॅमेरा आणि 0:11:01.000,0:11:03.000 ओळखपत्रांची, 0:11:03.000,0:11:06.000 संगणक सुरक्षिततेची बरीच प्रतिरूपे तिकडूनच येतात. 0:11:06.000,0:11:09.000 बरीच प्रतिरूपे विज्ञानाकडून येतात. 0:11:09.000,0:11:11.000 आरोग्यासंबंधीची प्रतिरूपे चांगली उदाहरणे आहेत. 0:11:11.000,0:11:14.000 कर्करोग, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, सार्सचा विचार करा. 0:11:14.000,0:11:17.000 या रोगासंबंधीच्या सुरक्षिततेच्या 0:11:17.000,0:11:19.000 आपल्या सर्व भावना 0:11:19.000,0:11:21.000 खरेतर विज्ञानाने दिलेल्या आणि माध्यमातून गाळून आलेल्या 0:11:21.000,0:11:24.000 प्रतिरूपांवरून येतात. 0:11:25.000,0:11:28.000 तर प्रतिरूपे बदलू शकतात. 0:11:28.000,0:11:30.000 प्रतिरूपे स्थिर नसतात. 0:11:30.000,0:11:33.000 जसे आपण आपल्या पर्यावरणात जसे जास्त रूळत जातो, 0:11:33.000,0:11:37.000 आपली प्रतिरूपे आपल्या भावनेच्या जवळ जाऊ शकतात. 0:11:38.000,0:11:40.000 तर एक उदाहरण कदाचित, 0:11:40.000,0:11:42.000 जर तुम्ही १०० वर्षापुर्वी पाहिले, 0:11:42.000,0:11:45.000 जेव्हा वीज पाहिल्यांदा रोजच्या व्यवहारात येत होती, 0:11:45.000,0:11:47.000 तिच्या संबंधी भरपूर भीती होती. 0:11:47.000,0:11:49.000 मला म्हणायचे आहे की, असे लोक होते जे दरवाजावरील घंटेची कळ दाबायला घाबरत होते, 0:11:49.000,0:11:52.000 कारण त्यात वीज होती आणि ती धोकादायक होती. 0:11:52.000,0:11:55.000 आपल्यासाठी, आपण वीजेबरोबर अगदीच सहजतेने राहतो. 0:11:55.000,0:11:57.000 आपण विद्य़ुत दिवे बदलतो 0:11:57.000,0:11:59.000 त्याबद्दल अगदी काहीही विचार न करता. 0:11:59.000,0:12:03.000 वीजेच्या सुरक्षिततेचे आपले प्रतिरूप 0:12:03.000,0:12:06.000 आपण जन्मलो तेव्हापासूनचे आहे. 0:12:06.000,0:12:09.000 आपण वाढत असताना ते बदललेले नाही. 0:12:09.000,0:12:12.000 आणि आपण त्यात चांगले आहोत. 0:12:12.000,0:12:14.000 किंवा विचार करा 0:12:14.000,0:12:16.000 विविध पिढ्यांमधील इंटरनेटवरील धोक्यांचा 0:12:16.000,0:12:18.000 तुमच्या पालकांचा इंटरनेट सुरक्षिततेबद्दल काय दृष्टिकोन आहे, 0:12:18.000,0:12:20.000 विरूद्ध तुमचा काय आहे, 0:12:20.000,0:12:23.000 विरूद्ध आपल्या मुलांचा काय असेल. 0:12:23.000,0:12:26.000 प्रतिरूपे सरतेशेवटी पृष्ठभूमीत विरून जातात. 0:12:27.000,0:12:30.000 अंतर्ज्ञान हा फक्त परिचित साठीचा दुसरा शब्द आहे. 0:12:30.000,0:12:32.000 तर जसे जसे तुमचे प्रतिरूप वास्तवाच्या जवळ जाते, 0:12:32.000,0:12:34.000 आणि तुमच्या भावनेत मिसळत जाते, 0:12:34.000,0:12:37.000 तुम्हाला त्याचे अस्तित्वच कळत नाही. 0:12:37.000,0:12:39.000 याचे एक सुरेख उदाहरण मागच्या वर्षी 0:12:39.000,0:12:42.000 स्वाईन फ्लू संबंधीचे आहे. 0:12:42.000,0:12:44.000 जेव्हा स्वाईन फ्लू पाहिल्यांदा उद्भवला, 0:12:44.000,0:12:48.000 सुरूवातीच्या बातमीमुळे प्रमाणपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या. 0:12:48.000,0:12:50.000 आता याला नाव होते, 0:12:50.000,0:12:52.000 त्यामुळे नेहेमीच्या तापापेक्षा तो जास्त भीतीदायक झाला, 0:12:52.000,0:12:54.000 जरी साधा फ्लू त्यापेक्षा जास्त प्राणघातक होता. 0:12:54.000,0:12:58.000 आणि लोकांना वाटत होते की डॉक्टरांना त्याच्याशी सामना करता आला पाहिजे. 0:12:58.000,0:13:00.000 त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली नसल्याची भावना निर्माण झाली. 0:13:00.000,0:13:02.000 आणि त्या दोन गोष्टींनी 0:13:02.000,0:13:04.000 धोक्याला वास्तवापेक्षा जास्त बनविले. 0:13:04.000,0:13:07.000 जसे नाविन्य कमी होऊ लागले, महिने सरले, 0:13:07.000,0:13:09.000 थोडी सहनशिलता तयार झाली, 0:13:09.000,0:13:11.000 लोकांना त्याची सवय झाली. 0:13:11.000,0:13:14.000 नवीन माहिती काहीच नव्हती पण भीती कमी झाली. 0:13:14.000,0:13:16.000 शरद ऋतूपर्यंत, 0:13:16.000,0:13:18.000 लोकांना वाटू लागले 0:13:18.000,0:13:20.000 डॉक्टरांनी यावर तोडगा शोधून काढला असावा. 0:13:20.000,0:13:22.000 आणि लोकांना एक प्रकराचे -- 0:13:22.000,0:13:24.000 विभाजन निवडायचे होते 0:13:24.000,0:13:28.000 भिती आणि स्विकृतीमध्ये -- 0:13:28.000,0:13:30.000 खरेतर भिती आणि उदासिनतेमध्ये -- 0:13:30.000,0:13:33.000 आणि त्यांनी एक प्रकारचा संशय निवडला. 0:13:33.000,0:13:36.000 आणि मागच्या हिवाळ्यात ज्यावेळी लस निघाली, 0:13:36.000,0:13:39.000 असे बरेच लोक होते -- आश्चर्यकारकरित्या जास्त -- 0:13:39.000,0:13:42.000 ज्यांनी लस घेण्यास नकार दिला -- 0:13:43.000,0:13:45.000 हे चांगले उदाहरण आहे 0:13:45.000,0:13:48.000 लोकांच्या सुरक्षिततेविषयीच्या भावना कशा बदलतात, त्यांचे प्रतिरूप कसे बदलते, 0:13:48.000,0:13:50.000 एकदम मोठ्या प्रमाणात 0:13:50.000,0:13:52.000 कोणत्याही नवीन माहितीशिवाय 0:13:52.000,0:13:54.000 कोणत्याही नवीन गोष्टीशिवाय. 0:13:54.000,0:13:57.000 आणि हे काहीसे बऱ्याच वेळा घडते. 0:13:57.000,0:14:00.000 मी आणखी एक गुंत्याबद्दल बोलणार आहे. 0:14:00.000,0:14:03.000 आपल्याकडे भावना, प्रतिरूप आणि वास्तव आहे. 0:14:03.000,0:14:05.000 माझी सुरक्षिततेविषयी दृष्टी सापेक्षतावादी आहे. 0:14:05.000,0:14:08.000 मला वाटते ती बघणाऱ्यावर अवलंबून असते. 0:14:08.000,0:14:10.000 आणि बरेच सुरक्षिततेबसद्दलचे निर्णय घेताना 0:14:10.000,0:14:14.000 विविध लोक सामील होतात. 0:14:14.000,0:14:16.000 आणि ज्या लोकांचा थेट नफा-तोटा 0:14:16.000,0:14:19.000 होणार असतो 0:14:19.000,0:14:21.000 ते निर्णयावर दबाव टाकायचा प्रयत्न करतात. 0:14:21.000,0:14:23.000 आणि मी त्याला त्यांची कार्ययोजना मानतो. 0:14:23.000,0:14:25.000 आणि तुम्हाला माहिती आहे कार्ययोजाना -- 0:14:25.000,0:14:28.000 म्हणजे असते विपणन, ते राजकारण असते -- 0:14:28.000,0:14:31.000 तुम्हाला एका प्रतिरूपापासून दुसऱ्याकडे नेण्यासाठी 0:14:31.000,0:14:33.000 तुमचे प्रतिरूप सोडून तुमच्या भावनांवर 0:14:33.000,0:14:36.000 विश्वास ठेवायला परावृत्त करण्यासाठी, 0:14:36.000,0:14:39.000 तुम्हाला आवडत नसलेले प्रतिरूप मानणाऱ्या लोकांना एकटे पाडण्यासाठी. 0:14:39.000,0:14:42.000 हे काही असाधारण नाही आहे. 0:14:42.000,0:14:45.000 एक उदाहरण, मोठे उदाहरण, धुम्रपानाच्या धोक्याबद्दल आहे. 0:14:46.000,0:14:49.000 गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात, प्रतिरूप कशी बदलतात हे 0:14:49.000,0:14:51.000 धुम्रपानाचा धोका दाखवतो, 0:14:51.000,0:14:54.000 आणि तो हेही दाखवतो की उद्योग कसे लढतात 0:14:54.000,0:14:56.000 त्यांच्या नावडत्या प्रतिरूपांविरूद्ध. 0:14:56.000,0:14:59.000 ह्याची तुलना करा दुसऱ्याच्या -धुम्रपानामुळे होणाऱ्या धोक्याच्या चर्चेबद्दल -- 0:14:59.000,0:15:02.000 जी अजुनही २० वर्षे मागे आहे. 0:15:02.000,0:15:04.000 खुर्चीच्या सुरक्षापट्ट्यांचा विचार करा. 0:15:04.000,0:15:06.000 मी ज्यावेळी लहान होतो, कोणीच खुर्चीचे सुरक्षापट्टे वापरत नव्हते. 0:15:06.000,0:15:08.000 हल्ली, तुम्ही सुरक्षापट्टा बांधला नाही तर 0:15:08.000,0:15:10.000 कोणीही मुले तुम्हाला चालवू देणार नाहीत. 0:15:11.000,0:15:13.000 त्याची तुलना करा एअरबॅगच्या चर्चेशी -- 0:15:13.000,0:15:16.000 बहुतेक ती ३० वर्षे मागे आहे. 0:15:16.000,0:15:19.000 प्रतिरूपांची सर्व उदाहरणे बदलत आहेत. 0:15:21.000,0:15:24.000 आपण शिकतोय की प्रतिरूपे बदलणे कठीण आहे. 0:15:24.000,0:15:26.000 प्रतिरूपांना हटवणे कठीण आहे. 0:15:26.000,0:15:28.000 आणि ती तुमच्या भावनेशी एकरूप असतील तर, 0:15:28.000,0:15:31.000 तुम्हाला माहितीही नसते की ते एक प्रतिरूप आहे. 0:15:31.000,0:15:33.000 आणि आकलनक्षमतेत आणखीही एक चूक आहे. 0:15:33.000,0:15:35.000 मी तिला म्हणेन पुष्टीकरण चूक, 0:15:35.000,0:15:38.000 ज्यात आपण आपल्या विश्वासांचे 0:15:38.000,0:15:40.000 पुष्टीकरण करणारी माहिती लगेच स्विकारतो 0:15:40.000,0:15:43.000 आणि त्यांचे खंडन करणारी माहिती धुडकावून लावतो. 0:15:44.000,0:15:46.000 म्हणून आपल्या प्रतिरूपाविरुद्धचा पुरावा, 0:15:46.000,0:15:49.000 जरी ठोस असला तरी आपण तो उपेक्षित करण्याची शक्यता असते. 0:15:49.000,0:15:52.000 आपले लक्ष्य वेधण्यासाठी तो अतिशय ठोस असायला हवा. 0:15:53.000,0:15:55.000 लांब कालांतरावर पसरलेली नवी प्रतिरूपे कठीण असतात. 0:15:55.000,0:15:57.000 वैश्विक तापमानवाढ हे मोठे उदाहरण आहे. 0:15:57.000,0:15:59.000 ८० वर्षांपेक्षा जास्त काळात पसरलेले 0:15:59.000,0:16:01.000 प्रतिरूप समजण्याबाबत आपण अती वाईट आहोत. 0:16:01.000,0:16:03.000 आपण पुढचे पीक काढू शकतो. 0:16:03.000,0:16:06.000 आपण मुले वाढेपर्यंतच्या काळापर्यंत विचार करू शकतो. 0:16:06.000,0:16:09.000 पण ८० वर्षाच्या काळासाठी आपण जराही चांगले नाही. 0:16:09.000,0:16:12.000 म्हणून ते स्विकार करण्यासाठी कठीण प्रतिरूप आहे. 0:16:12.000,0:16:16.000 एकाचवेळी आपल्या डोक्यात दोन प्रतिरूपे असू शकतात, 0:16:16.000,0:16:19.000 किंवा अशा पद्धतीची जटीलता ज्यात 0:16:19.000,0:16:22.000 आपण एकाच वेळी दोन गोष्टींवर विश्वास ठेवतो, 0:16:22.000,0:16:24.000 किंवा आकलनक्षमतेतील विसंवाद. 0:16:24.000,0:16:26.000 सरतेशेवटी, 0:16:26.000,0:16:29.000 नवे प्रतिरूप जुन्या प्रतिरूपाची जागा घेईल. 0:16:29.000,0:16:32.000 ठोस विश्वास प्रतिरूप तयार करू शकते. 0:16:32.000,0:16:35.000 ११ सप्टेंबर मुळे बऱ्यच लोकांच्या डोक्यात 0:16:35.000,0:16:37.000 सुरक्षिततेचे एक नवे प्रतिरूप तयार झाले. 0:16:37.000,0:16:40.000 परत, आपराधाचा स्वतःला आलेला अनुभव तसे करू शकतो, 0:16:40.000,0:16:42.000 स्वतःच्या आरोग्याबद्दलचे प्रश्न, 0:16:42.000,0:16:44.000 बातमीत असलेले रोग. 0:16:44.000,0:16:46.000 तुम्ही पाहाल की मनोरोगतज्ञ या घटनांना 0:16:46.000,0:16:48.000 चमकदार दिव्यांच्या घटना म्हणतात. 0:16:48.000,0:16:51.000 त्या एका क्षणात नवे प्रतिरूप तयार करू शकतात, 0:16:51.000,0:16:54.000 कारण त्या लोकांना भावनाकूल बनवतात. 0:16:54.000,0:16:56.000 तर तांत्रिक जगात, 0:16:56.000,0:16:58.000 प्रतिरुपांबाबत निर्णय घेण्याचा 0:16:58.000,0:17:00.000 आपल्याला अनुभव नाही. 0:17:00.000,0:17:02.000 आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो, आपण मध्यस्थांवर अवलंबून असतो. 0:17:02.000,0:17:06.000 मला म्हणायचे आहे की हे दुसरे लोक बरोबर असेपर्यंतच चालू शकते. 0:17:06.000,0:17:08.000 कोणती औषधे सुरक्षित आहेत हे ठरवण्यासाठी 0:17:08.000,0:17:13.000 आपण सरकारी यंत्रणेवर अवलंबून असतो. 0:17:13.000,0:17:15.000 मी येथे काल उडून आलो. 0:17:15.000,0:17:17.000 मी स्वतः विमानाची पाहणी केली नाही. 0:17:17.000,0:17:19.000 माझे विमान सुरक्षित आहे की नाही ठरवण्यासाठी 0:17:19.000,0:17:22.000 मी दुसऱ्या गटावर विश्वास ठेवला. 0:17:22.000,0:17:25.000 आपण येथे आहोत, आणि हे छप्पर आपल्यावर कोसळेल याची कोणालाच भिती वाटत नाही, 0:17:25.000,0:17:28.000 आपण स्वतः चाचपणी केली म्हणून नाही, 0:17:28.000,0:17:30.000 पण आपल्याला माहिती आहे की बांधकामाचे इथले नियम 0:17:30.000,0:17:33.000 चांगले आहेत म्हणून 0:17:33.000,0:17:35.000 हे एक असे प्रतिरूप आहे जे आपण 0:17:35.000,0:17:37.000 फक्त श्रद्धेने स्विकारले आहे. 0:17:37.000,0:17:40.000 आणि ते ठीकही आहे. 0:17:42.000,0:17:44.000 आता, आपल्याला गरज आहे ती 0:17:44.000,0:17:46.000 लोकांनी चांगल्या प्रतिरूपांबद्दल 0:17:46.000,0:17:48.000 पुरेशी माहिती समजून घेण्याची -- 0:17:48.000,0:17:50.000 आणि ती त्यांच्या भावनेत प्रतिबिंबित करण्याची -- 0:17:50.000,0:17:54.000 ज्यातून त्याने सुरक्षिततेच्या जमा-खर्चाचे गणित करता येईल. 0:17:54.000,0:17:56.000 जर भावना आणि प्रतिरूप परस्परविरोधी असले, 0:17:56.000,0:17:58.000 तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. 0:17:58.000,0:18:00.000 एक तुम्ही लोकांच्या भावना सुधारू शकता, 0:18:00.000,0:18:02.000 थेट त्यांच्या भावनेला हात घालून. 0:18:02.000,0:18:05.000 ती एकप्रकारची फसवणूक आहे, पण ती काम करेल. 0:18:05.000,0:18:07.000 दुसरी जास्त प्रामाणिक पद्धत आहे 0:18:07.000,0:18:10.000 प्रतिरूप दुरूस्त करण्याची. 0:18:11.000,0:18:13.000 बदल हळूहळू घडतो. 0:18:13.000,0:18:16.000 धुम्रपानाबद्दलची चर्चा ४० वर्षे व्हावी लागली, 0:18:16.000,0:18:19.000 आणि तो प्रश्न सोपा होता. 0:18:19.000,0:18:21.000 यातील काही गोष्टी कठीण आहेत. 0:18:21.000,0:18:23.000 पण मला असे वाटते की खरोखर 0:18:23.000,0:18:25.000 माहिती हीच आपली सर्वात चांगली आशा आहे. 0:18:25.000,0:18:27.000 आणि मी खोटे बोललो. 0:18:27.000,0:18:29.000 लक्षात आहे का जेव्हा मी भावना, प्रतिरूप, वास्तव यांबद्दल बोललो. 0:18:29.000,0:18:32.000 मी म्हणालो वास्तव बदलत नाही. ते खरेतर बदलते. 0:18:32.000,0:18:34.000 आपण तांत्रिक जगात राहतो; 0:18:34.000,0:18:37.000 वास्तव सारखेच बदलत असते. 0:18:37.000,0:18:40.000 आपल्या प्रजातीसाठी पहिल्यांदा असे होतेय की 0:18:40.000,0:18:43.000 भावना प्रतिरूपांच्या मागे आहेत, प्रतिरूपे वास्तवाच्या मागे आहे आणि वास्तव बदलत आहे -- 0:18:43.000,0:18:46.000 आणी ते कधीच मिळणार नाहीत. 0:18:47.000,0:18:49.000 आपल्याला माहिती नाही. 0:18:49.000,0:18:51.000 पण मोठ्या कालखंडात, 0:18:51.000,0:18:54.000 दोन्ही भावना आणि वास्तव महत्त्वाचे आहेत. 0:18:54.000,0:18:57.000 आणि हे समजविण्यासाठी दोन गोष्टी सांगून मी थांबणार आहे. 0:18:57.000,0:18:59.000 १९८२ -- माहिती नाही लोकांच्या लक्ष्यात आहे की नाही -- 0:18:59.000,0:19:02.000 त्यावेळी संयुक्त संस्थानात एक छोटीशी साथ पसरली होती 0:19:02.000,0:19:04.000 टायलेनॉलतू होणाऱ्या विषबाधेची. 0:19:04.000,0:19:07.000 ती एक भयानक गोष्ट आहे. कोणीतरी टायलेनॉलची बाटली घेतली, 0:19:07.000,0:19:10.000 त्यात विष टाकले, बंद केली आणि परत जागेवर ठेवली. 0:19:10.000,0:19:12.000 कोणीतरी दुसऱ्याने ती विकत घेतली आणि मृत्यमूखी पडले. 0:19:12.000,0:19:14.000 याने लोक प्रचंड घाबरले. 0:19:14.000,0:19:16.000 अशाच प्रकारचे एकदोन आणखीही हल्ले झाले. 0:19:16.000,0:19:19.000 यातून खरा धोका काहीच नव्हता, पण लोक घाबरले होते. 0:19:19.000,0:19:21.000 आणि यातूनच 0:19:21.000,0:19:23.000 ढवळाढवळ-रोधक औषधोद्योगांची सुरुवात झाली. 0:19:23.000,0:19:25.000 ती ढवळाढवळ-रोधक टोपणे, यातूनच आली. 0:19:25.000,0:19:27.000 ते संपूर्णपणे एक सुरक्षिततेचे नाटक आहे. 0:19:27.000,0:19:29.000 गृहपाठ म्हणून त्यावर मात करण्याचे १० मार्ग शोधा. 0:19:29.000,0:19:32.000 मी तुम्हाला एक देतो, औषधी सुई 0:19:32.000,0:19:35.000 पण यातून लोकांना चांगले वाटले. 0:19:35.000,0:19:37.000 त्यामुळे त्यांची सुरक्षीततेची भावना 0:19:37.000,0:19:39.000 वास्तवाच्या जवळ येण्यास मदत झाली. 0:19:39.000,0:19:42.000 शेवटची गोष्ट, काही वर्षांपूर्वी, माझ्या मैत्रिणीने जन्म दिला. 0:19:42.000,0:19:44.000 मी तिला दवाखान्यात भेटायला गेलो. 0:19:44.000,0:19:46.000 हल्ली जेव्हा बाळ जन्माला येते, 0:19:46.000,0:19:48.000 ते बाळाच्या हातार रेडियो-बांगडी घालतात ओळखण्यासाठी, 0:19:48.000,0:19:50.000 आणि तशीच एक आईच्या हातात घालतात, 0:19:50.000,0:19:52.000 म्हणजे जर आईशिवाय कोणी मुलाला प्रसुतीगृहातून बाहेर नेले, 0:19:52.000,0:19:54.000 तर गजर वाजतो. 0:19:54.000,0:19:56.000 मी म्हणालो, "वा, एकदम छान आहे हे. 0:19:56.000,0:19:58.000 पण आपल्याकडे दवाखान्यातून मुलांना पळविण्याचे 0:19:58.000,0:20:00.000 प्रमाण किती आहे." 0:20:00.000,0:20:02.000 मी घरी गेलो आणि पाहिले. 0:20:02.000,0:20:04.000 मूलतः ते कधीच होत नाही. 0:20:04.000,0:20:06.000 पण जर त्याबद्दल तुम्ही विचार केला तर, 0:20:06.000,0:20:08.000 जर तुम्ही दवाखाना असाल, 0:20:08.000,0:20:10.000 आणि जर तुम्हाला बाळाला काही चाचण्या करण्यासाठी 0:20:10.000,0:20:12.000 आईपासून दूर घेऊन जायचे आहे, 0:20:12.000,0:20:14.000 तर तुमच्याकडे एक चांगले "सुरक्षिततेचे नाटक" असणे गरजेचे आहे. 0:20:14.000,0:20:16.000 नाहीतर आई तुमचा हात तोडून टाकेल. 0:20:16.000,0:20:18.000 (हशा) 0:20:18.000,0:20:20.000 म्हणून ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, 0:20:20.000,0:20:22.000 आपल्यातील जे सुरक्षिततेची संरचना करतात त्यांच्यासाठी, 0:20:22.000,0:20:25.000 जे सुरक्षा नीती पाहतात त्यांच्यासाठी, 0:20:25.000,0:20:27.000 किंवा सुरक्षेवर परिणाम करणारी 0:20:27.000,0:20:29.000 सार्वजनिक नीती ठरवतात त्यांच्यासाठी. 0:20:29.000,0:20:32.000 सुरक्षितता फक्त वास्तवच नाही तर भावना आणि वास्तव आहे. 0:20:32.000,0:20:34.000 आणि महत्त्वाचे हे आहे की 0:20:34.000,0:20:36.000 ते दोन्ही जवळजवळ एकसारखेच असावेत. 0:20:36.000,0:20:38.000 महत्त्वाचे आहे की, आपल्या भावना वास्तवाशी एकरूप असाव्यात. 0:20:38.000,0:20:40.000 आपण सुरक्षेच्या जमा-खर्चाचे गणित व्यवस्थित करावे. 0:20:40.000,0:20:42.000 धन्यवाद. 0:20:42.000,0:20:44.000 (टाळ्या)