बहुतेक लोक औषधी गोळ्या घेतात . इंजेक्शन घेतात . जीवनात कधीतरी कोणते न कोणते औषध घेतात , पण बहुतेकांना माहित नसते औषध कसे कार्य करते . या विविध संयुगाचे परिणाम कसे आपल्या शरीराला जाणवतात . आपले विचार . आपली वर्तणूक यावर परिणाम करतात . हे औषध मेंदू व पेशी यांच्या संदेश वहनावर कसा परिणाम करतात यावर ते अवलंबून असते . हे अनेक मार्गाने घडते . कोणतेही औषध मेंदूत जाण्यापूर्वी रक्त प्रवाहात मिसळले पाहिजे . त्यासाठी ते एक सेकंद ते काही तास काळ घेते . ते शरीरात कसे दिले जाते यावर अवलंबून असते . तोंडाद्वारे औषध घेणे ही सावकाश होणारी क्रिया आहे . कारण त्याचे अगोदर पचन संस्थेत शोषण झाले पाहिजे . ते कार्य करण्यापूर्वी हुंगल्यास औषध रक्तात जलद पसरते . इंजेक्शन द्वारा नसेत दिलेले औषधही रक्तात जलद कार्य करते . कारण ते सरळ रक्तात मिसळते . एकदा ते आपल्या गंतव्य स्थानी म्हणजे मेंदूच्या दाराशी जाते. तेव्हा त्यांना मेंदूतील रक्तातील एका घटकाचा अडथळा होतो . जी एक भिंत असते चेता संस्था व रक्त यात. अपायकारक पदार्थ मिसळू नये यासाठी सर्व औषधाना विशिष्ट असा रासायनिक गुणधर्म असावा लागतो . ज्या मुळे या भिंतीचा अडथळा म्हणजे हे कुलूप उघडता येईल औषध मेंदूच्या कार्याला बाधित करू लागते न्युरोन्सच्या जाळ्याचे व सायनॅप्सचे लक्ष्य ठेऊन. न्यूक्लियस,डेनड्रॉईट्स,अक्झोन हे न्युरोन्स (मेंदूतील चेता पेशी)चे भाग असतात. डेनड्रॉईट्स किंवा अक्झोन भोवती सैनाप्सेस असतात जे विद्युत रासायनिक संदेश याचे आदान प्रदान करतात . हे संदेश न्युरोट्रान्समीटरचे काम करतात . प्रत्येक न्युरोट्रान्समीटर आपल्या विविध वर्तनास कारणीभूत असतो . भावना संवेदना न्युरोट्रान्समीटर दोन पैकी एका मार्गाने काम करते . ते प्राप्त झालेल्या न्यूरोनला एकतर आवर घालतात त्याच्या कार्यास, किंवा त्याला प्रेरित करतात . त्यासाठी नवीन विद्युत रासायनिक संदेश तयार करतात व न्युरोनच्या जाळ्यात पसरवितात . उरलेला न्यूरोट्रान्समीटर विघटन पावतो किवा प्रेषित न्युरोन्स मध्ये शोषला जातो. सायनॅप्टिक संदेशवहनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर औषध जितका परिणाम करेल, त्याप्रमाणे शरीरात पसरणाऱ्या न्यूरोट्रान्समीटरचे प्रमाण कमी जास्त होते. यावरून औषध किती परिणामकारक आहे हे ठरते. SSRls सारखे काही नैराश्यरोधक सेरॉटोनीन या न्युरोट्रान्समीटर शोषणाचे काम थांबवितात. ज्यामुळे आपली मनोअवस्था ठरते. आपल्या न्युरोनच्या जाळ्यात हे न शोषलेले न्युरोन्स फेकले जातात. मॉर्फिनसारखे वेदनाशामक सेरॉटोनीन व नॉरअद्रेनालीन यांची पातळी वाढविते जे नियंत्रण करतात आपली ऊर्जा तसेच जागे होणे , दक्ष रहाणे , आणि आनन्द. हेच न्युरोट्रान्समीटर इंडोरफिन ग्राहकावर ( receptors,) वर परिणाम करतात त्यामुळे वेदना कमी होतात . तणाव कमी करणारी औषधे केंद्रीय चेतासस्थेतील GABA वाढवितात. जे न्युरोनवर नियंत्रण करते. त्यामुळे व्यक्ती चिंतामुक्त होते. पण बेकायदेशीर व मादक द्रव्याबाबत काय ? ज्याचा मेंदूवर मोठा परिणाम होतो व ज्याची बरीचशी माहिती मिळायची आहे. क्रिस्टल मेथ नावाचे एक अँफेटामाईन दीर्घ काळ डोपामाइन स्त्रावते . ज्याने आनंद जाणवतो. ही द्रव्ये नॉरआड्रेनालीन ग्राहकांना चालना देतात. ज्यायोगे हृदयाचे ठोके वाढतात. डोळ्याच्या बाहुल्या विस्तारतात. संकटकाळी "लढा किंवा पळ काढा", यासाठी शरीर सज्ज होते. कोकेन, डोपामाईन व सेरॉटोनीन यांचे शोषण थांबवून ते अधिक प्रमाणात न्युरोन्सच्या जाळ्यात फेकतो त्यामुळे उर्जा वाढते . महान असण्याची भावना बळावतो . पण त्यामुळे भूक मंदावते . काही भ्रम निर्माण करणारी द्रव्ये गूढ परिणाम निर्माण करतात. जसे LSD -- लायसार्जीक आम्ल. मास्कालीन DMT पावडर , ही मादक द्रव्ये सेरॉटोनीन संप्रेरकास अटकाव करतात. जो मनोस्थिती व चालना नियंत्रित करतो . त्यांचा न्युरोनच्या जाळ्यावर परिणाम होत असतो . संवेदना, अध्ययन आणि वर्तणूक नियंत्रण याशी हे संप्रेरक संबंधित असते . यानेच कळते की ही द्रव्ये किती प्रभावी परिणाम करतात. जरी यांचा काही परिणाम उत्साहवर्धक असला तरी काही कारणे आहेत ज्यामुळे ही बेकायदेशीर मानली जातात व त्यावर कायद्याने बंदी आहे . ही द्रव्ये प्रभावीपणे मेंदूची रासायनिक घटना बदलतात , त्याचा सतत उपयोग कायम स्वरूपी न्युरोनच्या जाळ्यात फेरफार करतो. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर , निर्णय क्षमतेवर , अध्ययनात , स्मृतीवर या द्रव्याबाबत अजूनही बरीचशी माहिती नाही . चांगली वा हानिकारक . पण आपण यातील काही जाणतो ज्यांचा अभ्यास केला आहे . आणि जे प्रभावी औषध म्हणून नावाजले . जसजसे आपले मेंदू व या द्रव्याबद्दलचे ज्ञान वाढत जाईल , तसतशी शक्यता वाढेल अनेक गूढ वैद्यकीय समस्या सोडविण्याची