जर मी म्हणालो ४ अधिक ३, तर याचा अर्थ काय? बरोबर किती? आपण नाश्त्यासाठी ४ लिंब घेतली. म्हणजे १,२,३,४ लिंब आहेत. आणि समजा माझ्याकडे आणखी ३ लिंब आहेत जेवणासाठी. १,२,३ माझ्याकडे आता एकूण किती लिंब आहेत? मी ३ लिंब आधीच्या ४ मध्ये मिळवतो. एकूण किती आहेत? १,२,३,४,५,६,७. म्हणजे माझ्याकडे आता ७ लिंब आहेत. समजा हि आपली अंकारेषा आहे. ०,१,२,३,४,५,६,७. आपण आता अंकारेशेवर आहोत. आपण ४ वरून सुरुवात करू. म्हणजे हा अंक ४. आणि आपण त्या मध्ये ३ मिळवू. आता आपल्याला माहित आहे कि ४ वजा ३ बरोबर १. ४ वजा १ म्हणजे किती?