नमस्कार मी आहे कॅथलीन केनेडी आणि मी स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स ची निर्माती आहे. आज आपण आमच्या एका स्टार बरोबर काम करणार आहात. bb-8 bb 8 हा गोलाकार ड्रॉईड आहे. तो जे काही करतो आणि जी काही हालचाल तो करतो ती कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केली जाते. कॉम्प्युटर सायन्स सर्व उद्योगावर प्रभाव टाकते. मार्केटिंग पासून हेल्थ केअर ते फिल्म. खरेतर शेकडो कॉम्प्युटर इंजिनियर एकत्र काम करतात एक फोर्स अवेकन्स सारखी एक फिल्म तयार करण्यासाठी. नमस्कार मी आहे रॅचल रोझ, मी वरिष्ठ आर अँड डी इंजिनियर आहे आयएलएममध्ये आणि मी अॅनीमेशन आणि क्रिचर विकसन गटाचे नेतृत्व करते. फोर्स अवेकन्स मध्ये मी जबाबदार आहे आर्टिस्टना असे ब्रिग्स बनविण्यात मदत करते जे त्यांच्या कॅरॅक्टरचे हलणारे भाग आहेत. जे कॅरॅक्टरला खूप लांब असेलल्या आकाशगंगेतील असल्याचे दाखवतात पुढच्या एक तासामध्ये आपण आपला स्वतःचा स्टार वॉर्स गेम बनविणार आहोत जो तुम्हाला प्रोग्रामिंग च्या मूलभूत संकल्पना शिकवेल. सामान्यतः प्रोग्रामिंग पूर्ण टेक्स्ट असते पण आपण इथे ब्लॉकस वापरणार आहोत म्हणजे आपण प्रोग्राम लिहिण्यासाठी त्याला ड्रॅग ड्रॉप करू शकू पण त्याखाली तुम्ही अजूनही कोड बनवत आहात. एकदा आपण ब्लॉक सोबत बेसिक बघितले की आम्ही तुम्हाला जावा स्क्रिप्टवर नेऊ. जी वेब वरील एक सर्वात लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे. सुरुवात करण्यासाठी आपण रे सोबत काम करणार आहोत bb-8 ला सर्व स्क्रॅप भाग गोळा करण्यासाठी प्रोग्राम करण्यासाठी आपला स्क्रीन तीन भागात विभागला आहे डाव्या बाजूला स्टार वॉर्स गेम जागा आहे जिथे कोड रन होईल. प्रत्येक लेव्हलच्या सूचना गेम जागेच्या खाली लिहिल्या आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यापैकी प्रत्येक ब्लॉक म्हणजे bb-8 ला कळणारी सूचना आहे. उजव्या बाजूच्या पांढऱ्या जागेला वर्क स्पेस म्हणतात, इथे आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. जर मी मुव्ह लेफ्ट ब्लॉक आपल्या वर्क स्पेस मध्ये ड्रॅग केला आणि रन केला तर काय होईल? bb-8 ग्रिड वर एक ब्लॉक डाव्या बाजूला चालेल. आणि जर मला मुव्ह लेफ्ट ब्लॉक नंतर काही करायला सांगायचे असेल तर मी आपल्या प्रोग्राममध्ये दूसरा ब्लॉक अॅड करू शकते. मी मुव्ह अप ब्लॉक निवडणार आहे, आणि मी त्याला ड्रॅग करेन माझ्या मुव्ह लेफ्ट ब्लॉकच्या खाली जोपर्यंत हायलाईट दिसते आणि मी ड्रॉप करेन आणि दोन्ही ब्लॉक एकत्र जोडले जातील. जेव्हा मी परत रन दाबेन, bb-8 एकत्र असलेल्या सूचना प्रमाणे वागेल. आपल्या वर्क स्पेस वर पासून खाली पर्यंत. जर तुम्हाला कधीही ब्लॉक डिलिट करायचा असेल तर फक्त त्याला स्टॅक मधून काढा आणि परत टूल बॉक्स मध्ये ड्रॅग करा. आपण रन दाबल्या नंतर, bb-8 ला परत स्टार्ट वर घेण्यासाठी कधीही रिसेट बटण दाबू शकता. चला आता सुरुवात करूया.