WEBVTT 00:00:06.042 --> 00:00:09.740 ही बालवाडी आहे, आम्ही २००७ साली बांधलेली. 00:00:10.111 --> 00:00:14.036 आम्ही ही बालवाडी एका वर्तुळाच्या आकारात बांधली आहे. 00:00:14.036 --> 00:00:17.178 म्हणजे छपरावर हा एक प्रकारचा अखंड मार्ग आहे. 00:00:17.179 --> 00:00:19.699 तुम्ही जर पालक असाल, 00:00:19.699 --> 00:00:23.663 तर तुम्हाला ठाऊक असेलच,की मुलांना गोल गोल फिरायला खूप आवडतं. 00:00:24.793 --> 00:00:27.600 हे पहा, छप्पर वरून असं दिसतं. NOTE Paragraph 00:00:27.600 --> 00:00:29.858 तर, आम्ही हे असं का बांधलं? 00:00:29.858 --> 00:00:32.675 या बालवाडीचे मुख्याध्यापक म्हणाले, 00:00:32.675 --> 00:00:35.254 " नाही. मला इथे कठडा नको." 00:00:35.254 --> 00:00:37.483 मी म्हणालो, "ते शक्य नाही." 00:00:37.483 --> 00:00:43.777 पण त्यांनी आग्रह सोडला नाही. छपराच्या कडेने एक जाळी सोडली तर? 00:00:43.777 --> 00:00:45.986 पडणारी मुलं त्यात पकडता येतील. 00:00:45.986 --> 00:00:47.433 (हशा ) 00:00:47.433 --> 00:00:49.509 मी म्हणालो, "ते शक्य नाही." NOTE Paragraph 00:00:49.970 --> 00:00:52.889 अर्थात, सरकारी अधिकारी म्हणाले, 00:00:52.889 --> 00:00:56.154 "कठडा तर हवाच." 00:00:58.324 --> 00:01:01.843 पण ही कल्पना झाडांभोवती ठेवता येईल. 00:01:01.843 --> 00:01:05.120 इथे छपरामधून डोकं वर काढणारी तीन झाडं आहेत. 00:01:05.120 --> 00:01:10.745 या दोरालाच कठडा म्हणायची आम्हाला परवानगी मिळाली. 00:01:10.745 --> 00:01:14.017 पण अर्थातच, त्या दोराशी मुलांचा काही संबंध नाही. 00:01:14.017 --> 00:01:16.503 ती आपली सरळ त्या जाळीत पडतात. 00:01:17.304 --> 00:01:20.355 आणखी मुलं. 00:01:20.355 --> 00:01:23.292 आणखी जास्त. 00:01:23.292 --> 00:01:24.502 आणखी. 00:01:24.502 --> 00:01:25.653 (हशा ) 00:01:25.653 --> 00:01:29.203 कधीकधी एका झाडाभोवती चाळीस मुलं असतात. 00:01:31.733 --> 00:01:32.981 त्या फांदीवरच्या मुलाला 00:01:32.981 --> 00:01:35.464 ते झाड इतकं आवडतंय, की तो ते चाखतो आहे. 00:01:35.464 --> 00:01:37.964 (हशा ) NOTE Paragraph 00:01:38.984 --> 00:01:40.785 काही कार्यक्रम असेल, 00:01:40.785 --> 00:01:43.051 तेव्हा मुलं छपराच्या कडेवर बसतात. 00:01:44.191 --> 00:01:46.563 खालून पाहताना ते किती छान दिसतं. 00:01:46.563 --> 00:01:48.652 प्राणीसंग्रहालयातली माकडं. 00:01:48.652 --> 00:01:52.552 (हशा ) 00:01:52.552 --> 00:01:54.318 जेवायची वेळ. 00:01:54.318 --> 00:01:58.949 (हशा आणि टाळ्या) NOTE Paragraph 00:02:00.784 --> 00:02:03.313 आम्ही या छपराची उंची कमीत कमी ठेवली. 00:02:03.313 --> 00:02:07.757 कारण आम्हाला छपरावरची मुलं बघायची होती. 00:02:07.757 --> 00:02:10.438 फक्त छपराखालचीच नव्हेत. 00:02:10.438 --> 00:02:14.299 जर छप्पर खूप उंच केलं असतं, तर फक्त आतलं छत दिसलं असतं. NOTE Paragraph 00:02:15.699 --> 00:02:20.215 आणि ही पाय धुवायची जागा. पाण्याचे नळ अनेक प्रकारचे असतात. 00:02:20.656 --> 00:02:22.434 या लवचिक नळ्या वापरून 00:02:22.434 --> 00:02:25.329 मित्रांवर पाणी उडवता येतं. 00:02:25.329 --> 00:02:27.044 आणि हा शॉवर. 00:02:27.044 --> 00:02:29.541 हा साधाच आहे. 00:02:29.541 --> 00:02:31.087 पण हे पाहिलंत का, 00:02:31.087 --> 00:02:32.917 हा मुलगा आपले बूट धुवत नसून, 00:02:32.917 --> 00:02:34.591 त्या बुटात पाणी भरतो आहे. 00:02:34.591 --> 00:02:36.531 (हशा ) NOTE Paragraph 00:02:41.423 --> 00:02:46.499 वर्षभर ही बालवाडी अशी पूर्णपणे खुली असते. 00:02:47.699 --> 00:02:51.339 आत आणि बाहेर यामध्ये सीमारेषाच नसते. 00:02:51.339 --> 00:02:55.978 तर याचा अर्थ असा की, ही इमारत म्हणजे केवळ एक छप्पर आहे. 00:02:55.978 --> 00:02:59.267 आणि दोन वर्गांमध्येही भिंती नाहीत. 00:02:59.267 --> 00:03:02.861 म्हणजेच, आवाजाला अटकाव नाही. 00:03:03.590 --> 00:03:09.415 पुष्कळ मुलांना जर एखाद्या शांत खोलीत बसवलं, 00:03:09.415 --> 00:03:12.733 तर त्यातली काही मुलं अतिशय अस्वस्थ होतील. 00:03:12.733 --> 00:03:14.985 पण या बालवाडीत 00:03:14.985 --> 00:03:18.415 त्यांना अस्वस्थ वाटायचं काहीच कारण नाही. 00:03:18.415 --> 00:03:21.225 कारण इथे भिंतीच नाहीत. NOTE Paragraph 00:03:21.225 --> 00:03:23.422 आणि मुख्याध्यापक म्हणतात, 00:03:23.422 --> 00:03:27.425 जर त्या कोपऱ्यातल्या मुलाला वर्गात बसावसं वाटत नसेल, 00:03:27.425 --> 00:03:29.120 आम्ही त्याला बाहेर जाऊ देतो. 00:03:29.120 --> 00:03:32.279 तो अखेरीस परत येईल. कारण हे वर्तुळ आहे. ते परत येणारच. 00:03:32.279 --> 00:03:34.241 (हशा ) NOTE Paragraph 00:03:36.561 --> 00:03:39.556 पण मुद्दा असा आहे, की अशा परिस्थितीत 00:03:39.556 --> 00:03:42.407 मुलं कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतात. 00:03:42.407 --> 00:03:46.986 पण इथे मात्र, ती जातात आणि परत येतात. 00:03:46.986 --> 00:03:48.836 स्वाभाविकच आहे ते. NOTE Paragraph 00:03:48.836 --> 00:03:53.859 दुसरं, आम्हाला गडबड गोंधळ खूप महत्त्वाचा वाटतो. 00:03:55.711 --> 00:04:02.142 मुलं गोंधळातच शांत झोपतात. 00:04:02.142 --> 00:04:05.986 शांत जागी त्यांना झोप लागत नाही. 00:04:05.986 --> 00:04:08.236 आणि या बालवाडीमध्ये, 00:04:08.236 --> 00:04:13.483 मुलं वर्गात कमालीची एकाग्रता दाखवतात. 00:04:15.193 --> 00:04:21.660 आपल्यासारखे प्राणी जंगलात, गोंधळातच वाढतात. 00:04:21.660 --> 00:04:23.663 गोंधळ हा त्यांना गरजेचा असतो. 00:04:23.663 --> 00:04:27.967 एखाद्या बारमध्ये गलका असला, तरीही तिथे आपण मित्रांशी बोलू शकतो. 00:04:27.967 --> 00:04:31.928 गप्प बसून राहणं हा आपला स्वभावच नव्हे. NOTE Paragraph 00:04:31.928 --> 00:04:34.095 आजकाल 00:04:34.095 --> 00:04:38.569 आपण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहतो. 00:04:40.219 --> 00:04:42.021 ही शाळा पूर्णपणे खुली आहे. 00:04:42.021 --> 00:04:45.033 तुम्हाला ठाऊक असेलच, की 00:04:45.033 --> 00:04:50.818 हिवाळ्यात उणे २० डिग्री तापमान असताना स्कीईंग करता येतं. 00:04:50.818 --> 00:04:53.922 उन्हाळ्यात आपण जेव्हा पोहायला जातो, 00:04:53.922 --> 00:04:55.766 तेव्हा वाळूचं तापमान असतं ५० डिग्री. 00:04:56.636 --> 00:05:00.029 तसंच तुम्हाला ठाऊक असायला हवं, की आपण जलरोधक असतो. 00:05:00.029 --> 00:05:03.181 आपण पावसात विरघळत नाही. 00:05:03.181 --> 00:05:07.050 तर, मुलांनी बाहेरच राहायचं असतं. 00:05:07.050 --> 00:05:10.251 आणि आपण त्यांना तसंच राहू दिलं पाहिजे. NOTE Paragraph 00:05:10.251 --> 00:05:12.923 तर ही मुलं वर्गाची अशी विभागणी करताहेत. 00:05:12.923 --> 00:05:15.426 त्यांनी शिक्षकांना मदत करायला हवी. 00:05:15.426 --> 00:05:17.731 पण ते कुठे मदत करताहेत? 00:05:17.731 --> 00:05:19.346 (हशा ) 00:05:23.226 --> 00:05:25.382 मी नाही त्याला आत घातलं! 00:05:27.522 --> 00:05:29.706 हा वर्ग. 00:05:30.196 --> 00:05:32.105 हे बेसिन. 00:05:32.655 --> 00:05:35.932 पाणवठ्याभोवती मुलं एकमेकांशी गप्पा मारतात. 00:05:37.082 --> 00:05:40.819 आणि वर्गात नेहमीच झाडं असतात. 00:05:43.969 --> 00:05:47.377 एका माकडाला वर ओढून घेणारा दुसरा माकड. 00:05:47.377 --> 00:05:49.225 (हशा ) 00:05:49.225 --> 00:05:50.829 माकडं. 00:05:50.829 --> 00:05:52.283 (हशा ) 00:05:52.283 --> 00:05:56.698 प्रत्येक वर्गात एकतरी झरोका असतोच. 00:05:57.468 --> 00:06:01.465 आणि ख्रिसमसला, सेंटाक्लॉस इथून खाली उतरतो. NOTE Paragraph 00:06:07.255 --> 00:06:09.682 आणि ही शाळेला जोडलेली इमारत. 00:06:09.682 --> 00:06:14.151 त्या गोल बालवाडीच्या शेजारची. 00:06:14.151 --> 00:06:19.810 ही सातमजली इमारत फक्त पाच मीटर उंच आहे. 00:06:19.810 --> 00:06:21.971 आणि अर्थातच, छताची उंची अगदी कमी आहे. 00:06:21.971 --> 00:06:26.036 त्यामुळे ती इमारत सुरक्षित हवी. 00:06:26.036 --> 00:06:30.417 तर, आम्ही आमच्या मुलांना तिथे सोडलं. एक मुलगा आणि एक मुलगी. 00:06:31.707 --> 00:06:34.241 त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. 00:06:35.731 --> 00:06:38.353 त्याचं डोकं आपटलं. 00:06:39.343 --> 00:06:43.312 तो ठीक आहे. त्याचं डोकं चांगलं मजबूत आहे. 00:06:43.312 --> 00:06:46.400 तो लवचिक आहे. माझा मुलगा आहे तो. 00:06:46.400 --> 00:06:48.068 (हशा ) 00:06:49.038 --> 00:06:51.898 इथून उडी मारण्यात धोका तर नाही ना, हे तो पाहतो आहे. 00:06:53.038 --> 00:06:55.705 मग आम्ही इतर मुलांना तिथे जाऊ दिलं. NOTE Paragraph 00:07:00.835 --> 00:07:03.376 तोक्योतला ट्रैफ़िक जैम भयंकर असतो. 00:07:03.376 --> 00:07:04.528 (हशा ) 00:07:04.528 --> 00:07:09.379 त्या पुढच्या ड्रायव्हरने ड्रायव्हिंग शिकायला हवंय. 00:07:09.379 --> 00:07:11.910 आजकालच्या दिवसांत, 00:07:11.910 --> 00:07:16.530 मुलांना धोक्याची लहानशी गुटी मिळायला हवी. 00:07:18.970 --> 00:07:21.375 आणि अशा परिस्थितीत, 00:07:21.375 --> 00:07:25.300 ते एकमेकांना मदत करायला शिकतात. 00:07:25.300 --> 00:07:29.735 यालाच समाज म्हणातात. हल्ली अशा संधी आपण गमावत चाललो आहोत. NOTE Paragraph 00:07:36.065 --> 00:07:42.976 आता या चित्रात एका मुलाची हालचाल दाखवली आहे. 00:07:42.976 --> 00:07:49.300 ९:१० ते ९:३० या वेळेतली. 00:07:49.300 --> 00:07:55.501 आणि या इमारतीचा परीघ १८३ मीटर आहे. 00:07:55.501 --> 00:07:59.353 म्हणजे हे अंतर अगदी छोटं आहे असं म्हणता येणार नाही. 00:07:59.353 --> 00:08:03.959 या मुलाने सकाळी ६००० मीटर अंतर पार केलं. 00:08:03.959 --> 00:08:07.551 पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. 00:08:07.551 --> 00:08:14.248 या बालवाडीतली मुलं सरासरी ४००० मीटर अंतर पार करतात. 00:08:15.455 --> 00:08:22.435 आणि या मुलांची शारीरिक क्षमता 00:08:22.435 --> 00:08:25.590 इतर मुलांपेक्षा जास्त आहे. 00:08:31.390 --> 00:08:33.016 मुख्याध्यापक म्हणतात, 00:08:33.016 --> 00:08:38.743 आम्ही त्यांना प्रशिक्षण देत नाही. फक्त छपरावर सोडतो. 00:08:39.353 --> 00:08:40.972 मेंढरांसारखं. 00:08:40.972 --> 00:08:42.401 (हशा ) 00:08:42.401 --> 00:08:44.230 ती धावत राहतात. 00:08:44.230 --> 00:08:46.259 (हशा ) NOTE Paragraph 00:08:46.779 --> 00:08:51.838 माझं मत असं, की त्यांना नियंत्रणात ठेवू नका. 00:08:51.838 --> 00:08:55.060 त्यांना फार जपू नका. 00:08:55.060 --> 00:08:58.687 त्यांनी थोडं धडपडायला हवं. 00:08:58.687 --> 00:09:02.473 त्यांना थोडी दुखापत व्हायला हवी. 00:09:02.473 --> 00:09:05.892 त्यातूनच ती शिकतात, 00:09:05.892 --> 00:09:09.028 या जगात कसं जगायचं. 00:09:11.848 --> 00:09:19.057 मला वाटतं, स्थापत्यशास्त्र जग बदलू शकतं. 00:09:19.057 --> 00:09:20.899 आणि लोकांचं आयुष्यही. 00:09:21.909 --> 00:09:27.991 आणि हा एक प्रयत्न आहे, मुलांचं आयुष्य बदलण्याचा. NOTE Paragraph 00:09:28.481 --> 00:09:30.133 अनेक धन्यवाद. NOTE Paragraph 00:09:30.158 --> 00:09:32.152 (टाळ्या )