1 00:00:06,042 --> 00:00:09,740 ही बालवाडी आहे, आम्ही २००७ साली बांधलेली. 2 00:00:10,111 --> 00:00:14,036 आम्ही ही बालवाडी एका वर्तुळाच्या आकारात बांधली आहे. 3 00:00:14,036 --> 00:00:17,178 म्हणजे छपरावर हा एक प्रकारचा अखंड मार्ग आहे. 4 00:00:17,179 --> 00:00:19,699 तुम्ही जर पालक असाल, 5 00:00:19,699 --> 00:00:23,663 तर तुम्हाला ठाऊक असेलच,की मुलांना गोल गोल फिरायला खूप आवडतं. 6 00:00:24,793 --> 00:00:27,600 हे पहा, छप्पर वरून असं दिसतं. 7 00:00:27,600 --> 00:00:29,858 तर, आम्ही हे असं का बांधलं? 8 00:00:29,858 --> 00:00:32,675 या बालवाडीचे मुख्याध्यापक म्हणाले, 9 00:00:32,675 --> 00:00:35,254 " नाही. मला इथे कठडा नको." 10 00:00:35,254 --> 00:00:37,483 मी म्हणालो, "ते शक्य नाही." 11 00:00:37,483 --> 00:00:43,777 पण त्यांनी आग्रह सोडला नाही. छपराच्या कडेने एक जाळी सोडली तर? 12 00:00:43,777 --> 00:00:45,986 पडणारी मुलं त्यात पकडता येतील. 13 00:00:45,986 --> 00:00:47,433 (हशा ) 14 00:00:47,433 --> 00:00:49,509 मी म्हणालो, "ते शक्य नाही." 15 00:00:49,970 --> 00:00:52,889 अर्थात, सरकारी अधिकारी म्हणाले, 16 00:00:52,889 --> 00:00:56,154 "कठडा तर हवाच." 17 00:00:58,324 --> 00:01:01,843 पण ही कल्पना झाडांभोवती ठेवता येईल. 18 00:01:01,843 --> 00:01:05,120 इथे छपरामधून डोकं वर काढणारी तीन झाडं आहेत. 19 00:01:05,120 --> 00:01:10,745 या दोरालाच कठडा म्हणायची आम्हाला परवानगी मिळाली. 20 00:01:10,745 --> 00:01:14,017 पण अर्थातच, त्या दोराशी मुलांचा काही संबंध नाही. 21 00:01:14,017 --> 00:01:16,503 ती आपली सरळ त्या जाळीत पडतात. 22 00:01:17,304 --> 00:01:20,355 आणखी मुलं. 23 00:01:20,355 --> 00:01:23,292 आणखी जास्त. 24 00:01:23,292 --> 00:01:24,502 आणखी. 25 00:01:24,502 --> 00:01:25,653 (हशा ) 26 00:01:25,653 --> 00:01:29,203 कधीकधी एका झाडाभोवती चाळीस मुलं असतात. 27 00:01:31,733 --> 00:01:32,981 त्या फांदीवरच्या मुलाला 28 00:01:32,981 --> 00:01:35,464 ते झाड इतकं आवडतंय, की तो ते चाखतो आहे. 29 00:01:35,464 --> 00:01:37,964 (हशा ) 30 00:01:38,984 --> 00:01:40,785 काही कार्यक्रम असेल, 31 00:01:40,785 --> 00:01:43,051 तेव्हा मुलं छपराच्या कडेवर बसतात. 32 00:01:44,191 --> 00:01:46,563 खालून पाहताना ते किती छान दिसतं. 33 00:01:46,563 --> 00:01:48,652 प्राणीसंग्रहालयातली माकडं. 34 00:01:48,652 --> 00:01:52,552 (हशा ) 35 00:01:52,552 --> 00:01:54,318 जेवायची वेळ. 36 00:01:54,318 --> 00:01:58,949 (हशा आणि टाळ्या) 37 00:02:00,784 --> 00:02:03,313 आम्ही या छपराची उंची कमीत कमी ठेवली. 38 00:02:03,313 --> 00:02:07,757 कारण आम्हाला छपरावरची मुलं बघायची होती. 39 00:02:07,757 --> 00:02:10,438 फक्त छपराखालचीच नव्हेत. 40 00:02:10,438 --> 00:02:14,299 जर छप्पर खूप उंच केलं असतं, तर फक्त आतलं छत दिसलं असतं. 41 00:02:15,699 --> 00:02:20,215 आणि ही पाय धुवायची जागा. पाण्याचे नळ अनेक प्रकारचे असतात. 42 00:02:20,656 --> 00:02:22,434 या लवचिक नळ्या वापरून 43 00:02:22,434 --> 00:02:25,329 मित्रांवर पाणी उडवता येतं. 44 00:02:25,329 --> 00:02:27,044 आणि हा शॉवर. 45 00:02:27,044 --> 00:02:29,541 हा साधाच आहे. 46 00:02:29,541 --> 00:02:31,087 पण हे पाहिलंत का, 47 00:02:31,087 --> 00:02:32,917 हा मुलगा आपले बूट धुवत नसून, 48 00:02:32,917 --> 00:02:34,591 त्या बुटात पाणी भरतो आहे. 49 00:02:34,591 --> 00:02:36,531 (हशा ) 50 00:02:41,423 --> 00:02:46,499 वर्षभर ही बालवाडी अशी पूर्णपणे खुली असते. 51 00:02:47,699 --> 00:02:51,339 आत आणि बाहेर यामध्ये सीमारेषाच नसते. 52 00:02:51,339 --> 00:02:55,978 तर याचा अर्थ असा की, ही इमारत म्हणजे केवळ एक छप्पर आहे. 53 00:02:55,978 --> 00:02:59,267 आणि दोन वर्गांमध्येही भिंती नाहीत. 54 00:02:59,267 --> 00:03:02,861 म्हणजेच, आवाजाला अटकाव नाही. 55 00:03:03,590 --> 00:03:09,415 पुष्कळ मुलांना जर एखाद्या शांत खोलीत बसवलं, 56 00:03:09,415 --> 00:03:12,733 तर त्यातली काही मुलं अतिशय अस्वस्थ होतील. 57 00:03:12,733 --> 00:03:14,985 पण या बालवाडीत 58 00:03:14,985 --> 00:03:18,415 त्यांना अस्वस्थ वाटायचं काहीच कारण नाही. 59 00:03:18,415 --> 00:03:21,225 कारण इथे भिंतीच नाहीत. 60 00:03:21,225 --> 00:03:23,422 आणि मुख्याध्यापक म्हणतात, 61 00:03:23,422 --> 00:03:27,425 जर त्या कोपऱ्यातल्या मुलाला वर्गात बसावसं वाटत नसेल, 62 00:03:27,425 --> 00:03:29,120 आम्ही त्याला बाहेर जाऊ देतो. 63 00:03:29,120 --> 00:03:32,279 तो अखेरीस परत येईल. कारण हे वर्तुळ आहे. ते परत येणारच. 64 00:03:32,279 --> 00:03:34,241 (हशा ) 65 00:03:36,561 --> 00:03:39,556 पण मुद्दा असा आहे, की अशा परिस्थितीत 66 00:03:39,556 --> 00:03:42,407 मुलं कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतात. 67 00:03:42,407 --> 00:03:46,986 पण इथे मात्र, ती जातात आणि परत येतात. 68 00:03:46,986 --> 00:03:48,836 स्वाभाविकच आहे ते. 69 00:03:48,836 --> 00:03:53,859 दुसरं, आम्हाला गडबड गोंधळ खूप महत्त्वाचा वाटतो. 70 00:03:55,711 --> 00:04:02,142 मुलं गोंधळातच शांत झोपतात. 71 00:04:02,142 --> 00:04:05,986 शांत जागी त्यांना झोप लागत नाही. 72 00:04:05,986 --> 00:04:08,236 आणि या बालवाडीमध्ये, 73 00:04:08,236 --> 00:04:13,483 मुलं वर्गात कमालीची एकाग्रता दाखवतात. 74 00:04:15,193 --> 00:04:21,660 आपल्यासारखे प्राणी जंगलात, गोंधळातच वाढतात. 75 00:04:21,660 --> 00:04:23,663 गोंधळ हा त्यांना गरजेचा असतो. 76 00:04:23,663 --> 00:04:27,967 एखाद्या बारमध्ये गलका असला, तरीही तिथे आपण मित्रांशी बोलू शकतो. 77 00:04:27,967 --> 00:04:31,928 गप्प बसून राहणं हा आपला स्वभावच नव्हे. 78 00:04:31,928 --> 00:04:34,095 आजकाल 79 00:04:34,095 --> 00:04:38,569 आपण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहतो. 80 00:04:40,219 --> 00:04:42,021 ही शाळा पूर्णपणे खुली आहे. 81 00:04:42,021 --> 00:04:45,033 तुम्हाला ठाऊक असेलच, की 82 00:04:45,033 --> 00:04:50,818 हिवाळ्यात उणे २० डिग्री तापमान असताना स्कीईंग करता येतं. 83 00:04:50,818 --> 00:04:53,922 उन्हाळ्यात आपण जेव्हा पोहायला जातो, 84 00:04:53,922 --> 00:04:55,766 तेव्हा वाळूचं तापमान असतं ५० डिग्री. 85 00:04:56,636 --> 00:05:00,029 तसंच तुम्हाला ठाऊक असायला हवं, की आपण जलरोधक असतो. 86 00:05:00,029 --> 00:05:03,181 आपण पावसात विरघळत नाही. 87 00:05:03,181 --> 00:05:07,050 तर, मुलांनी बाहेरच राहायचं असतं. 88 00:05:07,050 --> 00:05:10,251 आणि आपण त्यांना तसंच राहू दिलं पाहिजे. 89 00:05:10,251 --> 00:05:12,923 तर ही मुलं वर्गाची अशी विभागणी करताहेत. 90 00:05:12,923 --> 00:05:15,426 त्यांनी शिक्षकांना मदत करायला हवी. 91 00:05:15,426 --> 00:05:17,731 पण ते कुठे मदत करताहेत? 92 00:05:17,731 --> 00:05:19,346 (हशा ) 93 00:05:23,226 --> 00:05:25,382 मी नाही त्याला आत घातलं! 94 00:05:27,522 --> 00:05:29,706 हा वर्ग. 95 00:05:30,196 --> 00:05:32,105 हे बेसिन. 96 00:05:32,655 --> 00:05:35,932 पाणवठ्याभोवती मुलं एकमेकांशी गप्पा मारतात. 97 00:05:37,082 --> 00:05:40,819 आणि वर्गात नेहमीच झाडं असतात. 98 00:05:43,969 --> 00:05:47,377 एका माकडाला वर ओढून घेणारा दुसरा माकड. 99 00:05:47,377 --> 00:05:49,225 (हशा ) 100 00:05:49,225 --> 00:05:50,829 माकडं. 101 00:05:50,829 --> 00:05:52,283 (हशा ) 102 00:05:52,283 --> 00:05:56,698 प्रत्येक वर्गात एकतरी झरोका असतोच. 103 00:05:57,468 --> 00:06:01,465 आणि ख्रिसमसला, सेंटाक्लॉस इथून खाली उतरतो. 104 00:06:07,255 --> 00:06:09,682 आणि ही शाळेला जोडलेली इमारत. 105 00:06:09,682 --> 00:06:14,151 त्या गोल बालवाडीच्या शेजारची. 106 00:06:14,151 --> 00:06:19,810 ही सातमजली इमारत फक्त पाच मीटर उंच आहे. 107 00:06:19,810 --> 00:06:21,971 आणि अर्थातच, छताची उंची अगदी कमी आहे. 108 00:06:21,971 --> 00:06:26,036 त्यामुळे ती इमारत सुरक्षित हवी. 109 00:06:26,036 --> 00:06:30,417 तर, आम्ही आमच्या मुलांना तिथे सोडलं. एक मुलगा आणि एक मुलगी. 110 00:06:31,707 --> 00:06:34,241 त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. 111 00:06:35,731 --> 00:06:38,353 त्याचं डोकं आपटलं. 112 00:06:39,343 --> 00:06:43,312 तो ठीक आहे. त्याचं डोकं चांगलं मजबूत आहे. 113 00:06:43,312 --> 00:06:46,400 तो लवचिक आहे. माझा मुलगा आहे तो. 114 00:06:46,400 --> 00:06:48,068 (हशा ) 115 00:06:49,038 --> 00:06:51,898 इथून उडी मारण्यात धोका तर नाही ना, हे तो पाहतो आहे. 116 00:06:53,038 --> 00:06:55,705 मग आम्ही इतर मुलांना तिथे जाऊ दिलं. 117 00:07:00,835 --> 00:07:03,376 तोक्योतला ट्रैफ़िक जैम भयंकर असतो. 118 00:07:03,376 --> 00:07:04,528 (हशा ) 119 00:07:04,528 --> 00:07:09,379 त्या पुढच्या ड्रायव्हरने ड्रायव्हिंग शिकायला हवंय. 120 00:07:09,379 --> 00:07:11,910 आजकालच्या दिवसांत, 121 00:07:11,910 --> 00:07:16,530 मुलांना धोक्याची लहानशी गुटी मिळायला हवी. 122 00:07:18,970 --> 00:07:21,375 आणि अशा परिस्थितीत, 123 00:07:21,375 --> 00:07:25,300 ते एकमेकांना मदत करायला शिकतात. 124 00:07:25,300 --> 00:07:29,735 यालाच समाज म्हणातात. हल्ली अशा संधी आपण गमावत चाललो आहोत. 125 00:07:36,065 --> 00:07:42,976 आता या चित्रात एका मुलाची हालचाल दाखवली आहे. 126 00:07:42,976 --> 00:07:49,300 ९:१० ते ९:३० या वेळेतली. 127 00:07:49,300 --> 00:07:55,501 आणि या इमारतीचा परीघ १८३ मीटर आहे. 128 00:07:55,501 --> 00:07:59,353 म्हणजे हे अंतर अगदी छोटं आहे असं म्हणता येणार नाही. 129 00:07:59,353 --> 00:08:03,959 या मुलाने सकाळी ६००० मीटर अंतर पार केलं. 130 00:08:03,959 --> 00:08:07,551 पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. 131 00:08:07,551 --> 00:08:14,248 या बालवाडीतली मुलं सरासरी ४००० मीटर अंतर पार करतात. 132 00:08:15,455 --> 00:08:22,435 आणि या मुलांची शारीरिक क्षमता 133 00:08:22,435 --> 00:08:25,590 इतर मुलांपेक्षा जास्त आहे. 134 00:08:31,390 --> 00:08:33,016 मुख्याध्यापक म्हणतात, 135 00:08:33,016 --> 00:08:38,743 आम्ही त्यांना प्रशिक्षण देत नाही. फक्त छपरावर सोडतो. 136 00:08:39,353 --> 00:08:40,972 मेंढरांसारखं. 137 00:08:40,972 --> 00:08:42,401 (हशा ) 138 00:08:42,401 --> 00:08:44,230 ती धावत राहतात. 139 00:08:44,230 --> 00:08:46,259 (हशा ) 140 00:08:46,779 --> 00:08:51,838 माझं मत असं, की त्यांना नियंत्रणात ठेवू नका. 141 00:08:51,838 --> 00:08:55,060 त्यांना फार जपू नका. 142 00:08:55,060 --> 00:08:58,687 त्यांनी थोडं धडपडायला हवं. 143 00:08:58,687 --> 00:09:02,473 त्यांना थोडी दुखापत व्हायला हवी. 144 00:09:02,473 --> 00:09:05,892 त्यातूनच ती शिकतात, 145 00:09:05,892 --> 00:09:09,028 या जगात कसं जगायचं. 146 00:09:11,848 --> 00:09:19,057 मला वाटतं, स्थापत्यशास्त्र जग बदलू शकतं. 147 00:09:19,057 --> 00:09:20,899 आणि लोकांचं आयुष्यही. 148 00:09:21,909 --> 00:09:27,991 आणि हा एक प्रयत्न आहे, मुलांचं आयुष्य बदलण्याचा. 149 00:09:28,481 --> 00:09:30,133 अनेक धन्यवाद. 150 00:09:30,158 --> 00:09:32,152 (टाळ्या )