0:00:06.042,0:00:09.740 ही बालवाडी आहे, आम्ही २००७ साली बांधलेली. 0:00:10.111,0:00:14.036 आम्ही ही बालवाडी एका [br]वर्तुळाच्या आकारात बांधली आहे. 0:00:14.036,0:00:17.178 म्हणजे छपरावर हा एक प्रकारचा [br]अखंड मार्ग आहे. 0:00:17.179,0:00:19.699 तुम्ही जर पालक असाल, 0:00:19.699,0:00:23.663 तर तुम्हाला ठाऊक असेलच,की [br]मुलांना गोल गोल फिरायला खूप आवडतं. 0:00:24.793,0:00:27.600 हे पहा, छप्पर वरून असं दिसतं. 0:00:27.600,0:00:29.858 तर, आम्ही हे असं का बांधलं? 0:00:29.858,0:00:32.675 या बालवाडीचे मुख्याध्यापक म्हणाले, 0:00:32.675,0:00:35.254 " नाही. मला इथे कठडा नको." 0:00:35.254,0:00:37.483 मी म्हणालो, "ते शक्य नाही." 0:00:37.483,0:00:43.777 पण त्यांनी आग्रह सोडला नाही.[br]छपराच्या कडेने एक जाळी सोडली तर? 0:00:43.777,0:00:45.986 पडणारी मुलं त्यात पकडता येतील. 0:00:45.986,0:00:47.433 (हशा ) 0:00:47.433,0:00:49.509 मी म्हणालो, "ते शक्य नाही." 0:00:49.970,0:00:52.889 अर्थात, सरकारी अधिकारी म्हणाले, [br] 0:00:52.889,0:00:56.154 "कठडा तर हवाच." 0:00:58.324,0:01:01.843 पण ही कल्पना झाडांभोवती ठेवता येईल. 0:01:01.843,0:01:05.120 इथे छपरामधून डोकं वर काढणारी [br]तीन झाडं आहेत. 0:01:05.120,0:01:10.745 या दोरालाच कठडा म्हणायची [br]आम्हाला परवानगी मिळाली. 0:01:10.745,0:01:14.017 पण अर्थातच, त्या दोराशी [br]मुलांचा काही संबंध नाही. 0:01:14.017,0:01:16.503 ती आपली सरळ त्या जाळीत पडतात. 0:01:17.304,0:01:20.355 आणखी मुलं. 0:01:20.355,0:01:23.292 आणखी जास्त. 0:01:23.292,0:01:24.502 आणखी. 0:01:24.502,0:01:25.653 (हशा ) 0:01:25.653,0:01:29.203 कधीकधी एका झाडाभोवती चाळीस मुलं असतात. 0:01:31.733,0:01:32.981 त्या फांदीवरच्या मुलाला 0:01:32.981,0:01:35.464 ते झाड इतकं आवडतंय, की [br]तो ते चाखतो आहे. 0:01:35.464,0:01:37.964 (हशा ) 0:01:38.984,0:01:40.785 काही कार्यक्रम असेल, [br] 0:01:40.785,0:01:43.051 तेव्हा मुलं छपराच्या कडेवर बसतात. 0:01:44.191,0:01:46.563 खालून पाहताना ते किती छान दिसतं. 0:01:46.563,0:01:48.652 प्राणीसंग्रहालयातली माकडं. 0:01:48.652,0:01:52.552 (हशा ) 0:01:52.552,0:01:54.318 जेवायची वेळ. 0:01:54.318,0:01:58.949 (हशा आणि टाळ्या) 0:02:00.784,0:02:03.313 आम्ही या छपराची उंची कमीत कमी ठेवली. 0:02:03.313,0:02:07.757 कारण आम्हाला छपरावरची मुलं बघायची होती. 0:02:07.757,0:02:10.438 फक्त छपराखालचीच नव्हेत. 0:02:10.438,0:02:14.299 जर छप्पर खूप उंच केलं असतं, तर [br]फक्त आतलं छत दिसलं असतं. 0:02:15.699,0:02:20.215 आणि ही पाय धुवायची जागा. [br]पाण्याचे नळ अनेक प्रकारचे असतात. 0:02:20.656,0:02:22.434 या लवचिक नळ्या वापरून 0:02:22.434,0:02:25.329 मित्रांवर पाणी उडवता येतं. 0:02:25.329,0:02:27.044 आणि हा शॉवर. 0:02:27.044,0:02:29.541 हा साधाच आहे. 0:02:29.541,0:02:31.087 पण हे पाहिलंत का, 0:02:31.087,0:02:32.917 हा मुलगा आपले बूट धुवत नसून, 0:02:32.917,0:02:34.591 त्या बुटात पाणी भरतो आहे. 0:02:34.591,0:02:36.531 (हशा ) 0:02:41.423,0:02:46.499 वर्षभर ही बालवाडी अशी पूर्णपणे खुली असते. 0:02:47.699,0:02:51.339 आत आणि बाहेर यामध्ये सीमारेषाच नसते. 0:02:51.339,0:02:55.978 तर याचा अर्थ असा की, ही इमारत म्हणजे [br]केवळ एक छप्पर आहे. 0:02:55.978,0:02:59.267 आणि दोन वर्गांमध्येही भिंती नाहीत. 0:02:59.267,0:03:02.861 म्हणजेच, आवाजाला अटकाव नाही. 0:03:03.590,0:03:09.415 पुष्कळ मुलांना जर [br]एखाद्या शांत खोलीत बसवलं, 0:03:09.415,0:03:12.733 तर त्यातली काही मुलं अतिशय अस्वस्थ होतील. 0:03:12.733,0:03:14.985 पण या बालवाडीत 0:03:14.985,0:03:18.415 त्यांना अस्वस्थ वाटायचं काहीच कारण नाही. 0:03:18.415,0:03:21.225 कारण इथे भिंतीच नाहीत. 0:03:21.225,0:03:23.422 आणि मुख्याध्यापक म्हणतात, 0:03:23.422,0:03:27.425 जर त्या कोपऱ्यातल्या मुलाला [br]वर्गात बसावसं वाटत नसेल, 0:03:27.425,0:03:29.120 आम्ही त्याला बाहेर जाऊ देतो. 0:03:29.120,0:03:32.279 तो अखेरीस परत येईल. कारण हे वर्तुळ आहे. [br]ते परत येणारच. 0:03:32.279,0:03:34.241 (हशा ) 0:03:36.561,0:03:39.556 पण मुद्दा असा आहे, की अशा परिस्थितीत 0:03:39.556,0:03:42.407 मुलं कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतात. 0:03:42.407,0:03:46.986 पण इथे मात्र, ती जातात आणि परत येतात. [br] 0:03:46.986,0:03:48.836 स्वाभाविकच आहे ते. 0:03:48.836,0:03:53.859 दुसरं, आम्हाला गडबड गोंधळ [br]खूप महत्त्वाचा वाटतो. 0:03:55.711,0:04:02.142 मुलं गोंधळातच शांत झोपतात. 0:04:02.142,0:04:05.986 शांत जागी त्यांना झोप लागत नाही. 0:04:05.986,0:04:08.236 आणि या बालवाडीमध्ये, 0:04:08.236,0:04:13.483 मुलं वर्गात कमालीची एकाग्रता दाखवतात. 0:04:15.193,0:04:21.660 आपल्यासारखे प्राणी जंगलात, [br]गोंधळातच वाढतात. 0:04:21.660,0:04:23.663 गोंधळ हा त्यांना गरजेचा असतो. 0:04:23.663,0:04:27.967 एखाद्या बारमध्ये गलका असला,[br]तरीही तिथे आपण मित्रांशी बोलू शकतो. 0:04:27.967,0:04:31.928 गप्प बसून राहणं हा आपला स्वभावच नव्हे. 0:04:31.928,0:04:34.095 आजकाल 0:04:34.095,0:04:38.569 आपण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू पाहतो. 0:04:40.219,0:04:42.021 ही शाळा पूर्णपणे खुली आहे. 0:04:42.021,0:04:45.033 तुम्हाला ठाऊक असेलच, की 0:04:45.033,0:04:50.818 हिवाळ्यात उणे २० डिग्री तापमान असताना [br]स्कीईंग करता येतं. 0:04:50.818,0:04:53.922 उन्हाळ्यात आपण जेव्हा पोहायला जातो, 0:04:53.922,0:04:55.766 तेव्हा वाळूचं तापमान असतं ५० डिग्री. 0:04:56.636,0:05:00.029 तसंच तुम्हाला ठाऊक असायला हवं, [br]की आपण जलरोधक असतो. 0:05:00.029,0:05:03.181 आपण पावसात विरघळत नाही. 0:05:03.181,0:05:07.050 तर, मुलांनी बाहेरच राहायचं असतं. 0:05:07.050,0:05:10.251 आणि आपण त्यांना तसंच राहू दिलं पाहिजे. 0:05:10.251,0:05:12.923 तर ही मुलं वर्गाची अशी विभागणी करताहेत. 0:05:12.923,0:05:15.426 त्यांनी शिक्षकांना मदत करायला हवी. 0:05:15.426,0:05:17.731 पण ते कुठे मदत करताहेत? 0:05:17.731,0:05:19.346 (हशा ) 0:05:23.226,0:05:25.382 मी नाही त्याला आत घातलं! 0:05:27.522,0:05:29.706 हा वर्ग. 0:05:30.196,0:05:32.105 हे बेसिन. 0:05:32.655,0:05:35.932 पाणवठ्याभोवती मुलं एकमेकांशी गप्पा मारतात. 0:05:37.082,0:05:40.819 आणि वर्गात नेहमीच झाडं असतात. 0:05:43.969,0:05:47.377 एका माकडाला वर ओढून घेणारा दुसरा माकड. 0:05:47.377,0:05:49.225 (हशा ) 0:05:49.225,0:05:50.829 माकडं. 0:05:50.829,0:05:52.283 (हशा ) 0:05:52.283,0:05:56.698 प्रत्येक वर्गात एकतरी झरोका असतोच. 0:05:57.468,0:06:01.465 आणि ख्रिसमसला, [br]सेंटाक्लॉस इथून खाली उतरतो. 0:06:07.255,0:06:09.682 आणि ही शाळेला जोडलेली इमारत. 0:06:09.682,0:06:14.151 त्या गोल बालवाडीच्या शेजारची. 0:06:14.151,0:06:19.810 ही सातमजली इमारत फक्त पाच मीटर उंच आहे. 0:06:19.810,0:06:21.971 आणि अर्थातच, छताची उंची अगदी कमी आहे. 0:06:21.971,0:06:26.036 त्यामुळे ती इमारत सुरक्षित हवी. 0:06:26.036,0:06:30.417 तर, आम्ही आमच्या मुलांना तिथे सोडलं. [br]एक मुलगा आणि एक मुलगी. 0:06:31.707,0:06:34.241 त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. 0:06:35.731,0:06:38.353 त्याचं डोकं आपटलं. 0:06:39.343,0:06:43.312 तो ठीक आहे. त्याचं डोकं चांगलं मजबूत आहे. 0:06:43.312,0:06:46.400 तो लवचिक आहे. माझा मुलगा आहे तो. 0:06:46.400,0:06:48.068 (हशा ) 0:06:49.038,0:06:51.898 इथून उडी मारण्यात धोका तर नाही ना, [br]हे तो पाहतो आहे. 0:06:53.038,0:06:55.705 मग आम्ही इतर मुलांना तिथे जाऊ दिलं. 0:07:00.835,0:07:03.376 तोक्योतला ट्रैफ़िक जैम भयंकर असतो. 0:07:03.376,0:07:04.528 (हशा ) 0:07:04.528,0:07:09.379 त्या पुढच्या ड्रायव्हरने [br]ड्रायव्हिंग शिकायला हवंय. 0:07:09.379,0:07:11.910 आजकालच्या दिवसांत, 0:07:11.910,0:07:16.530 मुलांना धोक्याची लहानशी गुटी मिळायला हवी. 0:07:18.970,0:07:21.375 आणि अशा परिस्थितीत, 0:07:21.375,0:07:25.300 ते एकमेकांना मदत करायला शिकतात. 0:07:25.300,0:07:29.735 यालाच समाज म्हणातात. [br]हल्ली अशा संधी आपण गमावत चाललो आहोत. 0:07:36.065,0:07:42.976 आता या चित्रात [br]एका मुलाची हालचाल दाखवली आहे. 0:07:42.976,0:07:49.300 ९:१० ते ९:३० या वेळेतली. 0:07:49.300,0:07:55.501 आणि या इमारतीचा परीघ १८३ मीटर आहे. 0:07:55.501,0:07:59.353 म्हणजे हे अंतर अगदी छोटं आहे [br]असं म्हणता येणार नाही. 0:07:59.353,0:08:03.959 या मुलाने सकाळी ६००० मीटर अंतर पार केलं. 0:08:03.959,0:08:07.551 पण खरं आश्चर्य तर पुढेच आहे. 0:08:07.551,0:08:14.248 या बालवाडीतली मुलं सरासरी [br]४००० मीटर अंतर पार करतात. 0:08:15.455,0:08:22.435 आणि या मुलांची शारीरिक क्षमता 0:08:22.435,0:08:25.590 इतर मुलांपेक्षा जास्त आहे. 0:08:31.390,0:08:33.016 मुख्याध्यापक म्हणतात, 0:08:33.016,0:08:38.743 आम्ही त्यांना प्रशिक्षण देत नाही. [br]फक्त छपरावर सोडतो. 0:08:39.353,0:08:40.972 मेंढरांसारखं. 0:08:40.972,0:08:42.401 (हशा ) 0:08:42.401,0:08:44.230 ती धावत राहतात. 0:08:44.230,0:08:46.259 (हशा ) 0:08:46.779,0:08:51.838 माझं मत असं, की [br]त्यांना नियंत्रणात ठेवू नका. 0:08:51.838,0:08:55.060 त्यांना फार जपू नका. 0:08:55.060,0:08:58.687 त्यांनी थोडं धडपडायला हवं. 0:08:58.687,0:09:02.473 त्यांना थोडी दुखापत व्हायला हवी. 0:09:02.473,0:09:05.892 त्यातूनच ती शिकतात, 0:09:05.892,0:09:09.028 या जगात कसं जगायचं. 0:09:11.848,0:09:19.057 मला वाटतं, स्थापत्यशास्त्र जग बदलू शकतं. 0:09:19.057,0:09:20.899 आणि लोकांचं आयुष्यही. 0:09:21.909,0:09:27.991 आणि हा एक प्रयत्न आहे, [br]मुलांचं आयुष्य बदलण्याचा. 0:09:28.481,0:09:30.133 अनेक धन्यवाद. 0:09:30.158,0:09:32.152 (टाळ्या )