0:00:00.976,0:00:04.120 १९९९ मधला हा माझा एक आनंदी फोटो. 0:00:04.144,0:00:06.234 मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. 0:00:06.258,0:00:08.190 आमची डान्स प्रॅक्टिस नुकतीच संपली होती. 0:00:08.214,0:00:09.732 मी खूप खूप आनंदात होतो. 0:00:10.328,0:00:14.214 त्यानंतर एका आठवड्याने मी कुठे होतो, [br]ते पक्कं आठवतंय मला. 0:00:14.238,0:00:17.457 मी कॅम्पसच्या पार्किंग लॉटमध्ये [br]माझ्या सेकंडहँड मिनीव्हॅनच्या 0:00:17.481,0:00:19.244 मागच्या भागात बसलो होतो. 0:00:19.268,0:00:20.419 त्यावेळी तिथे बसून मी 0:00:20.443,0:00:22.222 आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. 0:00:23.976,0:00:28.013 निर्णय घेतल्यानंतर लगेचच [br]मी सविस्तर बेतसुद्धा आखला. 0:00:28.568,0:00:31.563 पूर्वी कधीच आलो नसेन, 0:00:31.587,0:00:33.224 इतका कड्याच्या पार टोकाशी आलो. 0:00:33.709,0:00:36.661 केवळ नशीबानेच काही योगायोग घडले, 0:00:36.685,0:00:39.108 आणि त्यांनी मला चाप ओढण्यापासून रोखलं. 0:00:39.679,0:00:41.370 त्या घटनेनंतर, 0:00:41.394,0:00:44.516 काय घडू शकलं असतं या जाणिवेनेच मी हादरलो. 0:00:45.242,0:00:48.434 मग मी मनाला वाटणारी उभारी [br]आणि खंत हाताळण्याचे 0:00:48.458,0:00:50.588 निरनिराळे मार्ग पद्धतशीरपणे अजमावून पहिले. 0:00:50.612,0:00:54.481 हा उद्योग फायदेशीर ठरला. 0:00:54.481,0:00:58.657 अनेक सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात [br]खोल नैराश्याचे कालखंड 0:00:58.681,0:01:00.208 ६ ते १० वेळा येऊ शकतात. 0:01:00.232,0:01:02.558 मला आनुवांशिक द्विध्रुवी नैराश्यविकार आहे. 0:01:02.582,0:01:05.607 आजवर माझ्या आयुष्यात असे [br]कालखंड पन्नासेक वेळा आले आहेत. 0:01:05.631,0:01:07.152 मी त्यातून खूप काही शिकलो आहे. 0:01:07.895,0:01:09.748 नैराश्याच्या अंधाराशी 0:01:09.772,0:01:12.113 मी अनेकदा लढलो आहे, 0:01:12.137,0:01:13.597 आणि अनुभव नोंदून ठेवले आहेत. 0:01:13.961,0:01:17.296 म्हणूनच मी ठरवलं, की यशाची गुरुकिल्ली [br]किंवा माझ्या विजयाची क्षणचित्रे, 0:01:17.320,0:01:18.473 असं काही सांगण्याऐवजी, 0:01:18.497,0:01:22.336 स्वतःचा नाश होऊ नये म्हणून, [br]किंवा हतबलता येऊ नये म्हणून 0:01:23.241,0:01:25.238 मी काय केलं, ते सांगायचं. 0:01:26.429,0:01:30.215 माझ्या बिझिनेसविषयी [br]सर्वोत्तम निर्णय घेताना 0:01:30.239,0:01:31.675 मदतीला येणारं सुरक्षा तंत्रच 0:01:32.683,0:01:34.252 मानसिक पतनातून सावरण्यासाठीही 0:01:34.276,0:01:36.877 हमखास उपयोगी पडतं, असं मला आढळलं. 0:01:36.901,0:01:38.221 पण ते महत्त्वाचं नाही. 0:01:38.733,0:01:41.850 स्थितप्रज्ञता. 0:01:41.874,0:01:43.398 हा शब्दच कंटाळवाणा आहे. 0:01:43.422,0:01:44.485 (हशा) 0:01:44.509,0:01:46.125 स्पॉकची आठवण आली ना? 0:01:46.149,0:01:48.664 कसा दिसेल तो? 0:01:48.688,0:01:50.164 (हशा) 0:01:50.188,0:01:52.165 पावसात उभ्या राहिलेल्या गायीसारखा. 0:01:52.620,0:01:55.510 दुःखी नव्हे. फार आनंदीही नव्हे. 0:01:55.534,0:01:59.334 वाट्याला आलेलं आयुष्य [br]भावनाशून्य मनाने जगणारा प्राणी. 0:01:59.853,0:02:04.295 कदाचित तुम्हाला बिल बेलिचेक आठवला नसेल.[br]अतिशय स्पर्धात्मक वृत्तीचा 0:02:04.319,0:02:06.575 न्यू इंग्लंड पेट्रियटसचा प्रमुख प्रशिक्षक. 0:02:06.599,0:02:09.648 एनएफएल सुपरबॉल मधल्या विजयांचा विक्रम [br]त्याच्या नावावर आहे. 0:02:09.672,0:02:15.027 गेल्या काही वर्षांत एनएफएलच्या [br]सर्वोत्कृष्ठ टीम्समध्ये मानसिक कणखरपणासाठी 0:02:15.051,0:02:18.208 स्थितप्रज्ञता शिकवणं प्रचलित झालं आहे. 0:02:18.859,0:02:22.441 तुम्हाला कदाचित तीन राष्ट्रपुरुष [br]आठवले नसतील - 0:02:22.465,0:02:25.603 थॉमस जेफरसन, जॉन ऍडम्स, जॉर्ज वाॅशिंग्टन 0:02:25.627,0:02:28.419 स्थितप्रज्ञ वृत्तीचे अभ्यासक. 0:02:28.443,0:02:32.541 जॉर्ज वाॅशिंग्टनने व्हॅली फोर्जमधल्या 0:02:32.565,0:02:34.548 आपल्या सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी[br] 0:02:34.572,0:02:37.759 एका स्थितप्रज्ञाबद्दलचं[br]"कीटो..एक शोकांतिका" हे नाटक दाखवलं होतं. 0:02:38.346,0:02:42.426 असे कर्तबगार लोक स्थितप्रज्ञतेचं[br]प्राचीन तत्त्वज्ञान का कवटाळत असतील? 0:02:42.450,0:02:44.136 यात शिकण्यासारखं बरंच काही आहे. 0:02:44.795,0:02:48.208 मी तर म्हणेन, धकाधकीच्या आयुष्यात[br]टिकून राहण्यासाठी 0:02:48.232,0:02:49.232 योग्य निर्णय घेताना 0:02:51.519,0:02:53.001 स्थितप्रज्ञताच कामी येते. 0:02:53.639,0:02:56.149 तर हा विचार [br] 0:02:56.173,0:02:57.336 काहीसा इथे सुरु झाला, 0:02:57.360,0:02:58.806 या पोर्च वर. 0:02:58.830,0:03:02.087 ख्रिस्तपूर्व ३०० साली 0:03:02.111,0:03:04.984 अथेन्स शहरी, झिनो नामक व्यक्ती[br]पोर्चभोवती व्याख्याने देत असे. 0:03:05.008,0:03:07.760 त्या रंगीत पोर्चला म्हणत, स्टोआ. 0:03:07.784,0:03:09.516 त्यावरून, स्टोईसिझ्म (स्थितप्रज्ञता) 0:03:10.401,0:03:12.797 ग्रीक - रोमन समाजाने 0:03:12.821,0:03:15.583 ही संकल्पना 0:03:15.607,0:03:17.017 अनेक गोष्टींसाठी वापरली. 0:03:17.540,0:03:21.729 त्यापैकी आपल्या उपयोगाची गोष्ट म्हणजे, [br]स्व-प्रशिक्षण. 0:03:21.753,0:03:25.200 आपल्या नियंत्रणातल्या आणि [br]नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी ओळखणे, 0:03:25.224,0:03:28.282 आणि पहिल्या प्रकारच्या गोष्टींवर[br]लक्ष केंद्रित करण्याचा 0:03:28.306,0:03:29.457 सराव करणे. 0:03:29.481,0:03:31.859 यामुळे भावनेच्या आहारी जाणे कमी होते. 0:03:31.883,0:03:33.431 ही एक मोठीच शक्ती आहे. 0:03:34.163,0:03:37.024 याविरुद्ध उदाहरण:[br]फुटबॉलच्या खेळात एखादी खेळी चुकल्यामुळे 0:03:37.048,0:03:39.240 खेळाडू जर स्वतःवरच चिडला,[br]तर उरलेला सामना 0:03:39.264,0:03:40.770 पराभवाच्या छायेत जाऊ शकतो. 0:03:41.278,0:03:45.188 एखाद्या निष्णात कर्मचाऱ्याच्या [br]बारीकशा चुकीमुळे जर कंपनीचा सी ई ओ 0:03:45.212,0:03:46.712 त्याच्यावर उखडला, 0:03:46.736,0:03:48.747 तर कंपनीला तो कर्मचारी गमवावा लागू शकतो. 0:03:49.581,0:03:54.279 अधोगतीला लागलेला एखादा कॉलेजकुमार, 0:03:54.938,0:03:57.093 निराशा आणि हतबलतेच्या [br]फेऱ्यात सापडल्यामुळे 0:03:57.117,0:03:59.094 प्राण गमावू शकतो. 0:03:59.118,0:04:01.377 इथे महत्त्वाच्या गोष्टी [br]पणाला लागलेल्या असतात. 0:04:02.258,0:04:05.395 त्या साध्य करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. 0:04:05.419,0:04:09.256 २००४ साली माझं आयुष्य पूर्णपणे [br]बदलून टाकणाऱ्या मार्गाबद्दल आता सांगतो. 0:04:09.988,0:04:12.619 त्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या: 0:04:12.643,0:04:18.008 माझा एक अत्यंत जवळचा मित्र अनपेक्षितपणे [br]स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे मरण पावला. 0:04:18.032,0:04:21.860 त्यानंतर, मी जिच्याशी लग्न करणार होतो, [br]ती माझी मैत्रीण मला दुरावली. 0:04:21.884,0:04:25.929 ती वैतागली होती. तिने मला [br]"डियर जॉन" लिहिलेलं पत्र दिलं नाही, तर 0:04:25.953,0:04:28.304 त्याऐवजी दिला, 0:04:28.328,0:04:29.640 "डियर जॉन" लिहिलेला फलक. 0:04:29.664,0:04:30.712 (हशा) 0:04:30.736,0:04:32.521 खरंच सांगतोय. अजून आहे तो माझ्याजवळ. 0:04:32.545,0:04:35.182 "कामाची वेळ पाच वाजता संपते." 0:04:35.206,0:04:37.972 तो टेबलावर ठेवावा, म्हणून[br]दिला होता. माझ्या आरोग्यासाठी. 0:04:37.996,0:04:41.265 कारण त्यावेळी मी माझ्या पहिल्या बिझिनेसचं[br]काम करीत होतो. चाचपडत होतो. 0:04:41.289,0:04:44.408 दिवसाला चौदा तासांहून [br]जास्त काम करीत होतो. 0:04:44.432,0:04:45.865 आठवड्याचे सातही दिवस. 0:04:46.298,0:04:48.592 उत्साह टिकवण्यासाठी [br]उत्तेजक औषधं घेत होतो. 0:04:48.616,0:04:51.197 तशीच झोपेसाठीही औषधं घेत होतो. 0:04:51.221,0:04:52.412 परिस्थिती कठीण होती. 0:04:52.436,0:04:53.940 मी पूर्णपणे अडकून पडलो होतो. 0:04:54.645,0:04:58.712 या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मी [br]सुलभता या विषयावरचं एक पुस्तक आणलं. 0:04:58.736,0:05:02.565 आणि आयुष्यात मोठाच बदल घडवणारा [br]एक विचार मला त्यात सापडला. 0:05:02.589,0:05:07.736 "वास्तवापेक्षा कल्पनेतच [br]आपण जास्त त्रास भोगतो." 0:05:07.760,0:05:09.544 लेखक, "सेनेका द यंगर".[br] 0:05:09.568,0:05:11.191 प्रसिद्ध स्थितप्रज्ञ लेखक. 0:05:11.215,0:05:13.031 मग मी, त्यांनी लिहिलेली पत्रं वाचली. 0:05:13.055,0:05:15.508 त्यातून सापडला एक अभ्यास प्रकार. 0:05:15.532,0:05:18.035 "प्रीमेडिटाटिओ मलोरम" 0:05:18.059,0:05:20.355 म्हणजे, वाईट गोष्टींचं पूर्वचिंतन. 0:05:20.379,0:05:21.535 सोप्या शब्दांत, 0:05:21.559,0:05:26.678 अत्यंत वाईट गोष्टीं घडण्याच्या भीतीमुळे [br]आपण काही करू धजत नाही, अशावेळी 0:05:26.702,0:05:28.419 त्याच गोष्टी सविस्तर रूपात पाहणे. 0:05:28.443,0:05:31.183 यामुळे आपण त्या हतबलतेवर मात करण्यासाठी[br]काहीतरी करू शकतो. 0:05:31.207,0:05:35.096 मला सतावत होतं माझं माकडरुपी मन.[br]मोठमोठ्याने अखंड बडबडणारं. 0:05:35.120,0:05:37.709 या प्रश्नांचा केवळ मनात [br]विचार करून भागत नाही. 0:05:37.733,0:05:39.758 ते कागदावर उतरवावे लागतात. 0:05:39.782,0:05:41.749 मग मी स्वतःसाठी एक लेखी साचा तयार केला. 0:05:41.773,0:05:44.155 त्याला नाव दिलं, भीती-निश्चिती. 0:05:44.179,0:05:45.348 ध्येय-निश्चिती सारखंच. 0:05:45.372,0:05:47.471 यात तीन पानं आहेत. 0:05:47.908,0:05:49.169 अगदी सोपं आहे. 0:05:49.587,0:05:51.797 हे पहिलं पान: [br] 0:05:51.821,0:05:53.997 "मी जर ... ?" 0:05:54.021,0:05:55.578 इथे लिहायची तुमची भीती. 0:05:55.602,0:05:57.685 तुम्हाला चिंतातुर करणारी कोणतीही गोष्ट. 0:05:57.709,0:05:59.070 सतत टाळलेली गोष्ट. 0:05:59.094,0:06:00.581 कुणाला डेटसाठी विचारणं असेल, 0:06:00.605,0:06:02.229 किंवा कुणाशी संबंध तोडणं. 0:06:02.253,0:06:05.291 नोकरीत पगारवाढ मागणं, नोकरी सोडणं, [br]व्यवसाय सुरु करणं, 0:06:05.315,0:06:06.472 काहीही. 0:06:06.496,0:06:09.528 माझ्या बाबतीत ही गोष्ट होती, [br]चार वर्षांत प्रथमच 0:06:09.552,0:06:12.559 एका महिन्याची सुट्टी घेणं. [br]व्यवसायापासून लांब लंडनला जाऊन 0:06:12.583,0:06:15.627 एका मित्राच्या घरी विनाखर्च राहणं. [br] 0:06:15.651,0:06:18.357 व्यवसायातून स्वतः बाजूला होणं, 0:06:18.381,0:06:19.626 किंवा व्यवसाय बंद करणं. 0:06:20.525,0:06:22.483 पहिला कॉलम, व्याख्या. 0:06:22.507,0:06:26.011 एखादं पाऊल उचलल्यामुळे होऊ शकणाऱ्या [br]सर्व वाईट गोष्टींबद्दलच्या 0:06:26.035,0:06:27.586 तुमच्या कल्पना इथे लिहा. 0:06:27.610,0:06:29.172 १० ते २० तरी हव्यातच. 0:06:29.196,0:06:32.216 दोन उदाहरणं देतो. 0:06:32.240,0:06:35.956 एक, मी लंडनला जाईन. तिथे पावसाळी हवा असेल.[br]मला नैराश्य येईल. 0:06:35.980,0:06:38.203 सगळा वेळ वाया जाईल. 0:06:38.227,0:06:41.031 दोन, मी लंडनला असताना इथे [br]इन्कम टॅक्सची नोटीस आलेली असेल. 0:06:41.055,0:06:42.570 मग ऑडिट होईल.[br]किंवा माझ्यावर 0:06:42.594,0:06:45.132 छापा टाकतील किंवा [br]टाळं लावतील वगैरे काहीतरी. 0:06:45.585,0:06:47.559 मग पुढचा कॉलम "प्रतिबंध" 0:06:47.583,0:06:49.733 यात पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा: 0:06:49.757,0:06:52.852 या गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी [br]काय करावं? 0:06:52.876,0:06:56.350 किंवा, निदान त्या गोष्टी घडण्याची शक्यता [br]थोडीशी कमी कशी करावी? 0:06:56.829,0:06:59.224 तर, लंडनमध्ये उदास वाटू नये[br]म्हणून मी माझ्याबरोबर 0:06:59.248,0:07:01.262 एक निळा दिवा घेऊन जाऊ शकतो. 0:07:01.286,0:07:03.281 आणि तो रोज सकाळी १५ मिनिटं वापरू शकतो. 0:07:03.305,0:07:05.960 त्यामुळे नैराश्य येण्याचं प्रमाण कमी होतं. 0:07:05.984,0:07:09.855 इन्कम टॅक्स ऑफिसला [br]मी माझ्या अकौंटंन्टचा पत्ता देऊ शकतो. 0:07:09.879,0:07:11.946 म्हणजे ती नोटीस माझ्या पत्त्याऐवजी 0:07:11.970,0:07:13.923 त्याच्या हाती पडेल. 0:07:13.947,0:07:15.396 किती सोपं आहे! 0:07:15.420,0:07:17.462 पुढचा कॉलम, दुरुस्ती 0:07:18.238,0:07:20.708 म्हणजे, त्या अतिशय वाईट गोष्टी घडल्याच, 0:07:20.732,0:07:23.698 तर त्यांची, निदान थोडीशी तरी,[br]दुरुस्ती कशी करावी? 0:07:23.722,0:07:25.488 कोणाकडे मदत मागावी? 0:07:26.431,0:07:27.920 तर, लंडनच्या बाबतीत, 0:07:27.944,0:07:31.619 मी थोडा खर्च करून विमानाने [br]स्पेनला जाईन, सूर्यप्रकाश पाहीन. 0:07:31.643,0:07:34.290 नैराश्य दुरुस्त करून उत्साही होईन. 0:07:34.314,0:07:36.723 इन्कम टॅक्सच्या बाबतीत, 0:07:36.747,0:07:39.188 मी माझ्या वकील मित्राला 0:07:39.212,0:07:41.706 किंवा लॉ प्रोफेसर मित्राला फोन करीन. 0:07:42.777,0:07:44.078 त्यांचा सल्ला घेईन. [br] 0:07:44.102,0:07:47.298 त्यांना विचारीन,[br]अशा वेळी लोक काय करतात? 0:07:47.322,0:07:51.359 हे पहिलं पान लिहिताना [br]एक प्रश्न लक्षात ठेवायला हवा. 0:07:51.383,0:07:53.540 आजपर्यंतच्या इतिहासात [br]आपल्याहून कमी चातुर्य 0:07:53.564,0:07:55.671 आणि प्रेरणा असणाऱ्या एखाद्या माणसाने 0:07:55.695,0:07:56.919 हा प्रश्न सोडवला आहे का? 0:07:57.383,0:07:59.679 उत्तर होकारार्थी येण्याची दाट शक्यता आहे. 0:07:59.703,0:08:00.705 (हशा) 0:08:00.729,0:08:03.806 दुसरं पान सोपं आहे. 0:08:04.253,0:08:07.674 प्रयत्न करण्याचे किंवा थोडंसंच यश [br]मिळण्याचे फायदे काय असू शकतील? 0:08:07.698,0:08:09.509 आपण इथे भीतीला झुकतं माप देतो आहोत 0:08:09.533,0:08:12.415 आणि सकारात्मक गोष्टींकडे [br]जरा बेतानेच बघतो आहोत. 0:08:12.924,0:08:15.290 आपण आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले, [br] 0:08:15.314,0:08:17.498 तर आत्मविश्वास वाढू शकेल का?[br] 0:08:17.522,0:08:20.304 भावनिक, आर्थिक किंवा इतर विकास होईल का? 0:08:20.328,0:08:23.067 आणि ठोकलाच षटकार, तर काय फायदे होतील? 0:08:23.091,0:08:25.158 या पानावर १० ते १५ मिनिटं वेळ द्या. 0:08:25.182,0:08:26.728 पान तीन. 0:08:26.752,0:08:29.164 हे सर्वात महत्त्वाचं आहे, गाळू नका. 0:08:29.188,0:08:30.738 "निष्क्रियतेमुळे होणारं नुकसान" 0:08:30.762,0:08:33.670 कोणतीही नवीन गोष्ट करताना [br]काय चुका होऊ शकतील 0:08:33.694,0:08:37.083 हे शोधण्यात आपण पटाईत असतो. [br]उदा. पगारवाढ मागणे. 0:08:37.107,0:08:42.705 पण निष्क्रियतेमुळे होणारं गंभीर नुकसान 0:08:42.729,0:08:44.163 आपण लक्षात घेत नाही. 0:08:44.959,0:08:46.810 आपण स्वतःलाच विचारू, 0:08:46.834,0:08:50.034 मी ही कृती करणं किंवा [br]हा निर्णय घेणं टाळलं, 0:08:51.042,0:08:53.565 किंवा, अशाच अनेक कृती किंवा निर्णय टाळले, 0:08:53.589,0:08:58.346 आणखी सहा महिने, बारा महिने, [br]तीन वर्षांनंतर, माझं आयुष्य कसं असेल? 0:08:58.370,0:09:00.858 त्याहीपुढचं आयुष्य कसं असेल, [br]कल्पनाही करवत नाही. 0:09:00.882,0:09:04.729 आणखी सविस्तर कल्पना करा: भावनिक, आर्थिक, 0:09:04.753,0:09:05.951 शारीरिक परिणाम, वगैरे. 0:09:06.571,0:09:09.274 मी हे केलं, [br]आणि एक भयानक चित्र दिसू लागलं. 0:09:09.298,0:09:10.834 मी स्वतःवरच विषप्रयोग करीत होतो. 0:09:11.417,0:09:15.178 मी माझ्या बिझिनेसमधून बाजूला झालो नसतो,[br]तर तो केव्हाही 0:09:15.202,0:09:16.367 कोसळू शकला असता. 0:09:16.391,0:09:18.924 मला कोणाची साथ मिळत नव्हती. 0:09:18.948,0:09:23.049 त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की [br]आता मला निष्क्रिय राहणं शक्य नव्हतं. 0:09:24.131,0:09:26.922 तर अशी ही तीन पानं. इतकीच. [br]हीच भीती-निश्चिती. 0:09:26.946,0:09:30.537 जर शून्य म्हणजे अत्यंत कमी परिणाम 0:09:30.561,0:09:34.128 आणि १० म्हणजे सर्वात जास्त परिणाम [br]असं प्रमाण ठरवलं, तर- 0:09:34.152,0:09:35.794 माझ्या लंडन प्रवासातला धोका 0:09:35.818,0:09:39.152 म्हणजे १ ते ३ पातळीचं तात्पुरतं, [br]दूर करता येणारं दुःख होतं. 0:09:39.176,0:09:43.187 त्याबदल्यात मला ८ ते १० पातळीचा[br]सकारात्मक, आणि जवळजवळ 0:09:43.211,0:09:44.813 कायमस्वरूपी फायदा झाला असता. 0:09:45.389,0:09:47.163 म्हणून मी तो प्रवास केला. 0:09:47.187,0:09:48.962 वरीलपैकी कोणतीच संकटं फिरकली नाहीत. 0:09:48.986,0:09:50.481 थोडे अडथळे नक्कीच आले. 0:09:50.505,0:09:53.047 मी स्वतःला बिझिनेसमधून बाहेर काढू शकलो. 0:09:53.071,0:09:56.929 तो प्रवास वाढवत मी दीड वर्षं जगभर फिरलो. 0:09:56.953,0:09:59.159 त्याच आधारावर मी [br]माझं पहिलं पुस्तक लिहिलं. 0:09:59.183,0:10:00.660 त्यामुळेच आज मी इथे आलो आहे. 0:10:00.684,0:10:04.016 वर्षातून निदान चार वेळा 0:10:04.040,0:10:06.943 भीती निश्चिती केल्यामुळेच 0:10:06.967,0:10:08.849 मी यशस्वी होत गेलो 0:10:08.873,0:10:10.444 आणि अनेक संकटं टाळू शकलो. 0:10:11.240,0:10:12.409 हा रामबाण उपाय नाही. 0:10:12.433,0:10:15.323 काही वेळा भीतीमागे खरंच काही कारण असतं.[br] 0:10:15.347,0:10:16.402 (हशा) 0:10:16.426,0:10:18.077 पण असा निष्कर्ष काढण्याआधी 0:10:18.101,0:10:20.648 ती भीती सूक्ष्मपणे तपासली पाहिजे. 0:10:21.324,0:10:24.533 आणि तरीही यामुळे [br]सगळेच प्रश्न सुटणार नाहीत. 0:10:24.557,0:10:26.508 पण निदान बरेचसे प्रश्न सोपे होतील. 0:10:27.185,0:10:31.574 शेवटी, आजच्या काळातल्या माझ्या एका [br]आवडत्या स्थितप्रज्ञाचं उदाहरण देतो. 0:10:32.141,0:10:34.063 हे आहेत जरझी ग्रेगोरेक 0:10:34.802,0:10:38.231 ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत [br]चार वेळा जागतिक विजेते. 0:10:38.255,0:10:39.629 राजकीय कारणामुळे निर्वासित. 0:10:39.653,0:10:40.934 प्रसिद्ध कवी. 0:10:41.546,0:10:42.935 वय वर्षे ६२. 0:10:42.959,0:10:46.429 आजही ते मला आणि आपल्यापैकी अनेकांना [br]वरचढ ठरतील. 0:10:47.437,0:10:48.639 प्रभावी व्यक्तिमत्व. 0:10:48.663,0:10:50.927 मी त्यांच्या "स्टोआ"वर[br]पोर्च वर बराच काळ घालवला. 0:10:50.951,0:10:52.955 आयुष्य, प्रशिक्षण याबद्दल प्रश्न विचारले. 0:10:54.168,0:10:57.352 "सॉलिडॅरिटी इन पोलंड" शी ते संलग्न होते. 0:10:57.376,0:11:00.042 ही अहिंसात्मक चळवळ सामाजिक बदलासाठी [br]सक्रिय होती. 0:11:00.066,0:11:02.843 सरकारने हिंसेच्या बळाने ती दडपून टाकली. 0:11:02.867,0:11:04.913 अग्निशामक दलातली त्यांची नोकरी गेली. 0:11:04.937,0:11:08.058 त्यांच्या मार्गदर्शकाचं अपहरण, [br]छळ आणि हत्या करून 0:11:08.082,0:11:09.716 नदीत फेकून देण्यात आलं. 0:11:09.740,0:11:10.954 ग्रेगोरेकनाही धमकी मिळाली 0:11:10.978,0:11:14.136 त्यांना पोलंड सोडून पत्नीसहित [br]देशोदेशी भटकावं लागलं. 0:11:14.160,0:11:16.614 शेवटी ते अमेरिकेत पोहोचले.[br]जवळ काहीच सामान नव्हतं. 0:11:16.638,0:11:18.031 ते फरशीवर झोपत. 0:11:18.675,0:11:22.462 आता ते वुडसाईड, कॅलिफोर्निया येथे [br]एका सुरेख घरात राहतात. 0:11:22.486,0:11:25.111 आजवर मला जगात दहा हजारावर लोक भेटले असतील. 0:11:25.135,0:11:27.419 त्या सर्वांत, यश आणि आनंद या बाबतीत 0:11:27.443,0:11:29.637 मी यांचा क्रमांक पहिल्या दहात लावेन. 0:11:30.571,0:11:32.898 आता नीट ऐका, महत्त्वाची गोष्ट पुढेच आहे. 0:11:32.922,0:11:34.785 काही दिवसांपूर्वी मी त्यांना विचारलं, 0:11:34.809,0:11:37.604 स्थितप्रज्ञतेबद्दल आपण काही [br]वाचलं आहे काय? 0:11:37.628,0:11:40.026 त्यावर त्यांनी दोन पानी उत्तर पाठवलं. 0:11:40.050,0:11:42.295 हे काही निराळंच होतं. [br]कारण ते मितभाषी आहेत. 0:11:42.319,0:11:43.811 (हशा) 0:11:43.835,0:11:46.896 त्यांना स्थितप्रज्ञता ठाऊक होती, [br]इतकंच नव्हे, तर 0:11:46.920,0:11:50.314 दरवेळी महत्त्वाचे निर्णय घेताना, 0:11:50.338,0:11:51.845 किंवा काही निराळं करताना, 0:11:51.869,0:11:55.455 आपल्या तत्त्वांचा आणि नीतिनियमांचा [br]पाठपुरावा करताना त्यांनी 0:11:56.142,0:11:59.244 स्थितप्रज्ञता आणि भीती निश्चिती सारखीच [br]एक पद्धत वापरल्याचं 0:11:59.268,0:12:00.430 पाहून मी चकित झालो. 0:12:00.454,0:12:02.101 शेवटच्या दोन गोष्टी: 0:12:02.125,0:12:05.852 एक: त्यांच्या कल्पनेत सर्वात सुंदर [br]आयुष्य आहे 0:12:05.876,0:12:07.335 स्थितप्रज्ञाचं. 0:12:08.813,0:12:11.741 आणि शेवटी, त्यांचा मंत्र, [br]जो ते प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात. 0:12:11.765,0:12:13.889 तुम्हीही तो प्रत्येक गोष्टीसाठी [br]वापरू शकता: 0:12:15.404,0:12:17.413 "सोपे पर्याय, कठीण आयुष्य" 0:12:18.057,0:12:20.566 "कठीण पर्याय, सोपं आयुष्य" 0:12:22.272,0:12:24.249 कठीण पर्याय : 0:12:24.273,0:12:28.082 जे बोलायची, विचारायची, करायची [br]आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते, ते. 0:12:29.021,0:12:32.571 बरेचदा, आपण करायलाच हव्यात [br]अशा या गोष्टी असतात. 0:12:33.968,0:12:36.457 मोठाली आव्हानं किंवा समस्या 0:12:36.481,0:12:39.576 कधीच आरामशीर संवादाने सुटत नाहीत. 0:12:39.600,0:12:42.306 मग ते संवाद स्वतःशी असोत [br]की इतरांबरोबरचे असोत. 0:12:43.364,0:12:45.169 म्हणून म्हणतो, स्वतःलाच विचारा: 0:12:45.193,0:12:47.108 तुम्हांला कोणत्या बाबतीत 0:12:47.132,0:12:51.926 ध्येयनिश्चिती पेक्षा भीती-निश्चिती [br]जास्त महत्त्वाची वाटते? 0:12:52.966,0:12:56.171 सेनेका यांचे शब्द सतत ध्यानी ठेवा: 0:12:56.195,0:13:00.144 "वास्तवापेक्षा कल्पनेतच [br]आपण जास्त त्रास भोगतो." 0:13:00.168,0:13:01.340 आभारी आहे. 0:13:01.364,0:13:08.222 (टाळ्या)