आपल्याला माहिती आहे, मी काही पालकत्वाची तज्ञ होणार नव्हते. खरंतर, मला पालकत्व या विषयात फारसा रसही नाही. आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत आहे जी मुलांचा गोधळ उडवत आहे, त्यांची स्वतःच्या वाढीत अडथळा बनत आहे. आजकाल पालकत्वाची एक ठराविक प्रकारची पद्धत मार्गात येत आहे. मला वाटतं मी असं म्हणते आहे आपण खूप वेळ घालवतो अशा पालकांची काळजी करण्यात जे त्यांच्या मुलांच्या आयुष्यात आणि त्यांच्या शिक्षणात किंवा त्यांना वाढवण्यात फारसे गुंतलेले नसतात, आणि ते योग्यही आहे. पण वर्णपटाच्या दुसर्या बाजूला, तिथेही बरीच हानी चालू आहे, जिथे पालकांना वाटतं कि मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत जोवर पालक त्यांचे रक्षण आणि प्रत्येक वळणावर रक्षण करत नाही आणि प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवत नाही आणि प्रत्येक क्षणात लक्ष घालत नाही आणि त्यांच्या पाल्याला महाविद्यालये आणि कारकिरदींच्या एका छोट्या संचाकडे ढकलत नाही जेव्हा आपण मुलांना असं वाढवतो, आणि मी म्हणेन आपण, कारण देव जाणतो, माझ्या दोन किशोरवयीन मुलांना वाढवताना, माझाही कल तोच होता, आमची मुलांचं बालपणही साचेबद्ध असंच गेलं. आणि साचेबद्ध बालपण हे असं असतं. आपण त्यांना सुरक्षित आणि निकोप ठेवतो आणि खाऊ पिऊ घालतो, आणि मग आपण याची खात्री करतो कि ते योग्य शाळांत जातील, योग्य शाळांतील योग्य वर्गांत जातील, आणि योग्य शाळांतील योग्य वर्गांत त्यांना योग्य श्रेणी मिळेल. पण फक्त श्रेणीच नव्हे तर गुण, आणि फक्त श्रेणी आणि गुणच नव्हे तर प्रशंसा आणि परितोषिकं आणि खेळ, उपक्रम, नेतृत्व. आपण आपल्या मुलांना सांगतो, केवळ समूहाचा भाग होऊ नका समूह स्थापन करा कारण महाविद्यालयांना ते हवं असतं. आणि समाज सेवेसाठी टिक मार्क करा. म्हणजे, महाविद्यालयांना दाखवा तुम्हाला इतरांची काळजी आहे. (हशा) आणि कुठल्याशा आशा बाळगलेल्या परिपूर्णतेसाठी हे सगळं केलं जातं. आपल्या पाल्यांनी एका परिपूर्णतेच्या पातळीने कामगिरी करावी अशी आपण अपेक्षा करतो जी आपल्यालासुद्धा लागू नव्हती आणि म्हणून एवढं सगळं हवं असल्याने आपल्याला वाटतं, मग अर्थात, आपण पालकांनी प्रत्येक शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी आणि प्रशिक्षकाशी आणि पंचाशी वाद घातला पाहिजे आणि पाल्याच्या रक्षकासारखे आणि वैयक्तिक संचलकासारखे आणि सचिवासारखे वागले पाहिजे. आणि आपल्या पाल्यांसोबत, आपल्या बहुमूल्य पाल्यांसोबत आपण बराच वेळ घालवतो प्रसंगानुरूप कोपरखळी मारण्यात, लाडीगोडीत, सूचना देण्यात, मदतीत, तडजोडीत, उणीदुणी काढण्यात याची खात्री करण्यासाठी कि ते काही घोळ तर घालत नाही आहेत, कुठली दारं तर बंद करत नाही आहेत, त्यांचं भविष्य तर बिघडवत नाहीत, कुठल्याशा हातावर मोजता येतील अशा महाविद्यालयांत जी जवळजवळ प्रत्येक अर्जदाराला नाकारतात ईप्सित प्रवेश मिळेल. आणि ते साचेबद्ध बालपण जगणारं मूल असणं म्हणजे हे असं असतं. सर्वप्रथम, मुक्तपणे खेळण्यासाठी वेळ नसतो. दुपारी मोकळीक नसते कारण आपल्याला वाटतं प्रत्येक गोष्ट ही समृद्ध करणारी असावी. म्हणजे जणू काही प्रत्येक गृहपाठ, प्रत्येक प्रश्नमंजुषा, प्रत्येक कृती हा अटीतटीचा क्षण आहे या आपण कल्पिलेल्या त्यांच्या भविष्यातील आणि आपण त्यांना घरकामात मदत करण्यापासून मुक्त करतो, आणि आपण त्यांना पुरेशी झोपही घेऊ देत नाही जोवर ते त्यांच्या सूचीतील घटक पूर्ण करत नाहीत. आणि सूचीयुक्त बालपणात आपण म्हणतो आपल्याला ते खुश असायला हवेत, पण ते शाळेतून जेव्हा घरी येतात, आपण सगळं सोडून प्रथम काय विचारतो तर त्यांचा गृहपाठ आणि त्यांना मिळालेली श्रेणी. आणि ते आपल्या चेहर्यावर पाहतात आपली संमती, आपलं प्रेम, त्यांचं मूल्य अ श्रेणीतच असतं. आणि मग आपण त्यांच्या बाजूने चालतो आणि वेस्टमिंस्टर डॉग शो च्या प्रशिक्षकसारखी पकपक करतो. (हशा) थोडी अजून उंच उडी मारण्यासाठी आणि थोडी अजून भरारी घेण्यासाठी चुचकारतो, दिवसांमगून दिवस. आणि जेव्हा ते विद्यालयात जातात, ते विचारत नाहीत, "मला काय शिकण्यात किंवा करण्यात रस असेल?" ते समुपदेशकांकडे जातात आणि विचारतात "योग्य महाविद्यालयात प्रवेशासाठी मला काय करणं गरजेचं आहे?" आणि मग, जेव्हा विद्यालयातून श्रेणी कळतात, आणि त्यांना काही ब मिळतात, किंवा देव न करो काही क मिळतात ते वेडेपिसे होऊन त्यांच्या मित्रांना संदेश पाठवतात, "या श्रेणी मिळवून कुणाला योग्य त्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे? आणि आपली मुलं, शाळा संपताना कुठेही असतील तरी धापा टाकत असतात. ती नाजूक असतात. ते थोडेसे थकलेले असतात. ते त्यांच्या वेळेआधीच मोठे झालेले असतात ही इच्छा बाळगत की त्यांच्या आयुष्यातील मोठी माणसं म्हणतील, "तू जे केलं आहेस ते पुरेसं आहे, बालपणात तू केलेले हे प्रयत्न पुरेसे आहेत." आणि आता चिंता आणि नैराश्याच्या अतिप्रमाणामुळे ते कोमेजून जात आहेत आणि त्यातील काही विचार करताहेत हे आयुष्य कधी मौल्यवान असू शकेल का? आपण पालक, आपण पालकांना पूर्ण खात्री आहे कि ते मौल्यवान आहे. आपण असं वागतो कि -- आपल्याला जणूकाही वाटतं कि त्यांना भविष्यच नसेल जर त्यांनी आपण त्यांच्यासाठी कल्पिलेल्या महाविद्यालयं आणि कारकिर्दींच्या छोट्या समूहात प्रवेश नाही मिळवला तर. किंवा कदाचित, कदाचित आपल्याला ही भीती असते आपण आपल्या मित्रांसमोर फुशारकी मारू शकू असे आणि आपल्या गाड्यांच्यामागे स्टीकर्स लावू शकू असे त्यांचे भविष्य नसेल. हो. (टाळ्या) पण आपण काय केलं आहे हे जर तुम्ही पहिलं तर जर ते पाहण्याचे धैर्य खरच तुमच्याकडे असेल तर, तुम्हाला दिसेल कि आपली मुलं केवळ हाच विचार करत नाहीत कि त्यांचं मूल्य श्रेणी आणि मार्कांवर ठरतं तर जेव्हा आपण त्यांच्या वाढणार्या मनांत सतत वास करत असतो "बीईंग जॉन माल्कोवीच" या सिनेमाच्या आपल्या स्वरुपात आपण आपल्या मुलांना संदेश पाठवत असतो: "बाळा, माझ्याशिवाय तुला यापैकी काही जमेल असं मला वाटत नाही." आणि मग आपल्या अती मदतीने, आपल्या अती संरक्षणाने आणि अती दिग्दर्शनाने आणि आधाराने आपण आपल्या मुलांना स्वसामर्थ्य निर्माण करण्याच्या संधीपासून वंचित ठेवतो, जे मानवी मनाचे खरं तर मूलभूत तत्व असते आपण केलेल्या कौतुकाने जागृत होणार्या स्वाभिमानपेक्षा कितीतरी महत्वाचे असते. जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न दिसू लागते तेव्हा स्वसामर्थ्य उभारून येते, ना कि -- हो बरोबर. (टाळ्या) एखाद्याच्या पालकांनी त्याच्या वतीने केलेल्या कृतींतून नव्हे, तर जेव्हा स्वतःच्या कृतींतून निष्पन्न होते तेव्हा. म्हणजे सोप्या भाषेत, जर आपल्या मुलांमध्ये स्वसामर्थ्य हवं असेल, आणि त्यांच्यात ते हवंच, तर त्यांनी भरपूर स्वतःहून भरपूर विचार, नियोजन, निर्णय, कृती, आशावाद, साधक वर्तन, प्रयत्न व चुका, स्वप्नरंजन आणि आयुष्य उपभोगलं पाहिजे. आता मी असं म्हणते आहे का कि प्रत्येक मूल हे कष्टाळू आणि प्रेरित असते आणि त्याला त्याच्या आयुष्यात पालकांच्या सहभागाची गरज नसते आणि आपण मागे राहून तसंच जाऊ द्यायचं? अजिबात नाही. (हशा) माझं तसं म्हणणं नाही. माझं असं म्हणणं आहे कि, जेव्हा आपण श्रेणी, गुण, परितोषिकं आणि बक्षिसं हीच बालपणाची उद्दीष्ट ठरवतो, केवळ काही मोजक्या महाविद्यालयांत ईप्सित प्रवेशाच्या उत्कर्षासाठी किंवा मोजक्या कारकिर्दींच्या प्रवेशासाठी, ती आपल्या मुलांच्या यशाची खूपच संकुचित संज्ञा असते. आणि जरी आपण त्यांना नजीकच्या पल्ल्यातील यश मिळवण्यास मदत केली अती मदत करून -- जसं आपण जर त्यांना गृहपाठात मदत केली तर त्यांना चांगली श्रेणी मिळते, जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा त्यांचे बालपण लांबू शकते -- माझं असं म्हणणं आहे कि या सर्वाची एक दीर्घकालीन किंमत मोजावी लागते त्यांच्यात स्वत्वाची भावना जागृत होण्यासाठी. माझं असं म्हणणं आहे कि आपण कमी चिंतीत असावं त्यांनी ठराविक संचातील महाविद्यालयांत अर्ज करण्याबाबत किंवा प्रवेश मिळण्याबाबत आणि अधिक चिंतीत असावं ते याबाबतीत कि ते जिथे कुठे जातील तिथे यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडे सवयी, मनस्थिती, कौशल्ये, आरोग्य असेल. माझं असं म्हणणं आहे कि, आपल्या मुलांना आपण श्रेणी आणि गुणांच्या बाबतीत कमी झपाटलेले हवे आहोत आणि अशा बालपणात अधिक अभिरुचि असलेले हवे आहोत ज्यात त्यांच्या यशाचा पाया हा प्रेम आणि दैनंदिन कामासारख्या गोष्टींवर उभारलेला असेल. (हशा) (टाळ्या) मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? मी आत्ता दैनंदिन कामं म्हणले का? मी खरंच म्हणले. पण खरंच. का ते सांगते. आतापर्यंत झालेला मानवाचा सखोल प्रदीर्घ अभ्यास म्हणजे हार्वर्ड ग्रँट स्टडी. त्यात असं आढळलं कि जीवनातील व्यावसायिक यश, जे आपल्याला आपल्या मुलांसाठी हवं असतं, ते व्यावसायिक यश आयुष्यात लहानपणी केलेल्या दैनंदिन कामांतून येतं, आणि शुभस्य शीघ्रम, बाह्या सरसावून कामाला लागण्याची मनोवृत्ती, अशी मनोवृत्ती कि जी सांगते, एक नावडतं काम आहे, कुणीतरी ते करायला हवं, कदाचित ती व्यक्ती मीच, अशी मनोवृत्ती जी सांगते, मी सर्वांगीण विकासासाठी माझ्या प्रयत्नांचे योगदान देईन, आणि यामुळेच तुम्ही कार्यक्षेत्रात प्रगती करू शकता. आता हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. (टाळ्या) आपण सगळे जण हे जाणतो, आणि तरीही, सूचीबद्ध बालपणात, आपण मुलांना दैनंदिन घरकामं करू देत नाही, आणि मग कामाच्या जागी ते असे तरुण बनतात ज्यांना, सूचीची प्रतिक्षा असते पण ती अस्तित्वात नसते, आणि अधिक महत्वाचे म्हणजे त्या आवेगची, सहजप्रवृत्तीची कमतरता असते जिच्याने बाह्या सरसावून काम करता येते आणि बावरून ते विचार करत बसतात, मी माझ्या सहकार्यांच्या कसं उपयोगी पडू शकतो? माझ्या साहेबांना काय लागू शकतं याचा अंदाज मी आधीच कसा लावू शकतो? हार्वर्ड ग्रँट स्टडीचा दुसरा महत्वाचा शोध सांगतो कि आयुष्यातील आनंद प्रेमातून मिळतो, कामाप्रतीचे प्रेम नव्हे. मानवांप्रतीचे प्रेम: आपला सहचारी, आपला सहकारी, आपले मित्र, आपले कुटुंबीय. म्हणून प्रेम कसे करावे हे बालपणाने आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे, आणि ते इतरांवर प्रेम करू शकणार नाहीत जर त्यांनी आधी स्वतःवर प्रेम नाही केले तर व ते स्वतःवर प्रेम करणार नाहीत जर आपण बिनशर्त प्रेम दिले नाही तर. (टाळ्या) बरोबर. आणि म्हणून, श्रेणी आणि गुणांनी झपाटून न जाता जेव्हा आपले बहुमूल्य पाल्य शाळेतून घरी येते किंवा आपण कामावरून घरी येतो, आपण आपले तंत्रज्ञान बंद केले पाहिजे, फोन्स बाजूला ठेवले पाहिजेत व त्यांच्या डोळ्यात पहिले पाहिजे आणि त्यांना आपला आनंदाने खुललेला चेहरा पहायला दिला पाहिजे जेव्हा आपण आपल्या बाळाला काही तासांनंतर प्रथमच पाहतो. आणि मग आपण विचारलं पाहिजे, "तुझा दिवस कसा होता? आजच्या दिवसातलं तुला काय आवडलं?" आणि तुमची किशोरवयीन मुलगी म्हणते, "दुपारचं जेवण," जशी माझी मुलगी म्हणाली, आणि मला गणिताच्या परिक्षेबद्दल ऐकायचे असते जेवणाबद्दल नव्हे, तुम्हाला तरीही त्या जेवणात रस घ्यावा लागतो तुम्हाला विचारावे लागते, "आजच्या जेवणात काय विशेष होतं?" त्यांना हे कळणं जरूरी आहे कि एक माणूस या नात्याने ते महत्वाचे आहेत त्यांच्या श्रेणीमुळे नव्हे. ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल, दैनंदिन कामं व प्रेम, हे सगळं ऐकायला चांगलं आहे पण वास्तवात ते नसतं. महाविद्यालयांना उच्च गुण आणि श्रेणी लागतात आणि परितोषिकं आणि बक्षिसं हवी असतात आणि मी तुम्हाला सांगणार आहे. मोठं नाव असलेली विद्यालयं आपल्या तरूणांकडे विचारणा करतात पण आता एक सुवार्ता ऐका. विद्यालयांत श्रेणी ठरवणारं जाळं ज्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लावते त्याविरुद्ध (टाळ्या) तुम्हाला मोठं नाव असलेल्या शाळांत जयची गरज नसते आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आनंदी आणि यशस्वी लोक सरकारी शाळेत गेले, कुणीही न ऐकलेल्या महाविद्यालयात शिकले, समाज विद्यालयात गेले, या महाविद्यालयात गेले आणि अयशस्वी ठरले. (टाळ्या) पुरावा या सभागृहात आहे, आपल्या समाजात आहे, हे सत्य असल्याचा. आणि आपण जर आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढू शकलो आणि इतर काही महाविद्यालयांकडे बघू शकलो कदाचित समीकरणातून आपला अहं दूर करू शकलो आपण या सत्याला स्वीकारून कवेत घेऊ शकतो आणि कळू शकते हा काही जगाचा अंत नाही जर आपली मुलं या मोठं नाव असलेल्या शाळांत गेली नाहीत तर. आणि त्याहून महत्वाचे, जर त्यांचे बालपण एखाद्या छळवादी सूचीनुसार गेलेले नसेल तर जेव्हा ते महाविद्यालयात जातील, ते कुठलेही असो, ते त्यांच्या स्वतःच्या इप्सेने गेलेले असतील त्यांच्या स्वेच्छेने, होणार्या उत्कर्षासाठी सक्षम आणि तयार असतील. मला आपल्याला एक कबुली द्यायची आहे. मी म्हणल्याप्रमाणे मला दोन मुलं आहेत, सॉयर आणि अवेरी. ते किशोरवयीन आहेत. आणि एके काळी, मला वाटतं मी माझ्या सॉयर आणि अवेरीला छोट्या बोन्साय झाडांसारखं वागवत होते (हशा) मी त्यांची काळजीपूर्वक काटछाट करणार होते आणि त्यांना एखाद्या परिपूर्ण मानवाचा आकार देणार होते ज्यामुळे कदाचित त्यांना प्रवेश मिळाला असता एखाद्या निवडक महाविद्यालयात. पण इतर हजारो लोकांच्या मुलांसोबत वावरल्यावर माझ्या लक्षात आले -- (हशा) आणि माझ्या मुलांचे संगोपन करताना, माझी मुलं बोन्साय झाडं नाहीत. ती रानफुलं आहेत एखाद्या अनभिज्ञ प्रजातीची -- (हशा) आणि त्यांना पोषक वातावरण देणे हे माझे काम आहे, दैनंदिन कामांतून त्यांना सशक्त बनवणे आणि त्यांच्यावर प्रेम करणे जेणेकरून ते इतरांवर प्रेम करतील आणि प्रेम मिळवतील आणि महाविद्यालय, पदवी, कारकीर्द ते त्यांच्यावरच अवलंबून आहे. माझं काम त्यांना मला जे वाटतं ते बनवणं नाही तर त्यांच्या गौरवशाली स्वत्वाची जाणीव करून देण्यास आधार देणे आहे. धन्यवाद. (टाळ्या)