मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर मिळाला. माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश आणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. मी सहावीत होतो. मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले. कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत कॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला. मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं मी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा. मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि स्क्रीनवर लाल चौरस आला. पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते, असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच भारी होतं. प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे किंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट करायची होती. माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक गंमतीशीर गोष्ट करायची होती. मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी भर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर. हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा एखादा खेळ खेळण्यासारखं असतं. सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं. कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि मला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न घाबरवणारं? बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक पारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे. बेरीज, वजाबाकी, एवढंच. तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का? जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ झालेली आहे. तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत. तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत. 2013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. संवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही. जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो: मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची. सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत. सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो. आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत खाणं मोफत आहे नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. मोफत लॉन्ड्री स्नॅक्स अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि स्कूटर्स. ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात. संगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं. कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता. एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं, आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे. तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा वापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे. उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल. हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.