1 00:00:09,213 --> 00:00:13,926 मी तेरा वर्षांचा असताना मला पहिल्यांदा कॉम्प्युटर मिळाला. 2 00:00:13,926 --> 00:00:18,348 माझ्या पालकांनी मला 1984 मध्ये एक मॅकीनटॉश आणून दिला होता, मी 8 वर्षांचा असताना. 3 00:00:18,348 --> 00:00:19,975 मी सहावीत होतो. 4 00:00:19,975 --> 00:00:21,433 मी कॉलेजमध्ये असताना कोडींग शिकले. 5 00:00:21,433 --> 00:00:25,689 कॉलेजच्या पहिल्या वर्षात, पहिल्या सहामाहीत कॉम्प्युटर सायन्सची ओळख झाली 6 00:00:25,689 --> 00:00:28,774 मी टिक-टॅक-टो खेळण्यासाठी प्रोग्रॅम लिहीला. 7 00:00:28,774 --> 00:00:34,669 मला वाटतं, फारच साधी सुरुवात होती. मला वाटतं मी लिहीलेला पहिला प्रोग्रॅम तुम्हाला तुमचा 8 00:00:34,669 --> 00:00:36,490 आवडता रंग, किंवा तुम्ही किती वर्षांचे आहात, ते विचारायचा. 9 00:00:36,490 --> 00:00:40,536 मी आधी हिरवं वर्तुळ कसं काढायचं ते शिकले आणि स्क्रीनवर लाल चौरस आला. 10 00:00:40,536 --> 00:00:43,955 पहिल्यांदा मी एक गोष्ट येते आणि "हॅलो वर्ल्ड" म्हणते, 11 00:00:43,955 --> 00:00:47,482 असं मी कॉम्प्युटरला करायला लावलं, हे फारच भारी होतं. 12 00:00:47,482 --> 00:00:52,589 प्रोग्रॅमिंग करायला शिकणं हे कॉम्प्युटर सायन्स शिकण्याच्या इच्छेतून आलेलं नव्हतं 13 00:00:52,589 --> 00:00:55,342 किंवा या विषयात फार कौशल्य मिळवायचं आहे किंवा अशा कोणत्याही कारणांनी नव्हतं. 14 00:00:55,342 --> 00:00:58,397 त्याची सुरुवात झाली कारण मला ही एक सोपी गोष्ट करायची होती. 15 00:00:58,397 --> 00:01:01,232 माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी मला एक गंमतीशीर गोष्ट करायची होती. 16 00:01:01,232 --> 00:01:05,602 मी हा छोटासा प्रोग्रॅम लिहीला आणि मग त्यात थोडी भर घातली. आणि मग मला काहीतरी नवीन 17 00:01:05,602 --> 00:01:10,314 शिकायचं होतं, तेव्हा मी ते शोधलं. पुस्तकात किंवा इंटरनेटवर. 18 00:01:10,314 --> 00:01:17,456 हे एक प्रकारे एखादं वाद्य वाजवण्यासारखं किंवा एखादा खेळ खेळण्यासारखं असतं. 19 00:01:17,740 --> 00:01:21,494 सुरुवातीला खूप भीती वाटते पण हळूहळू तुम्हाला जमायला लागतं. 20 00:01:21,494 --> 00:01:26,396 कोडींग ही एक अशी गोष्ट आहे जी शिकता येते आणि मला माहिती आहे की याची भीती वाटू शकते, आणि 21 00:01:26,396 --> 00:01:30,712 खूप गोष्टी घाबरवणाऱ्या असतात, पण काय असतं न घाबरवणारं? 22 00:01:30,712 --> 00:01:36,175 बरेच लोक करत असलेला भरपूर कोड हा खरंतर बराचसा साधा असतो. यात एखाद्या समस्येचं विभाजन 23 00:01:36,175 --> 00:01:45,063 करण्याची प्रक्रिया महत्त्वाची असते. आणि नंतर लोक पारंपारिक पद्धतीनं विचार करतात, तसा विचार करून गुंतागुंतीचे अल्गोरिदम लिहायचे असतात. 24 00:01:45,063 --> 00:01:48,604 कोडींग शिकण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज नाही, तुम्ही निश्चयी असणं गरजेचं आहे. 25 00:01:48,604 --> 00:01:52,398 बेरीज, वजाबाकी, एवढंच. 26 00:01:52,398 --> 00:01:55,153 तुम्हाला पाढे माहीत असणं आवश्यक आहे. 27 00:01:55,153 --> 00:01:57,861 तुम्हाला कोडींग शिकण्यासाठी जिनियस असणं गरजेचं नाही, वाचण्यासाठी तुम्ही जिनियस असण्याची गरज असते का? 28 00:01:57,861 --> 00:02:05,121 जरी तुम्हाला रेस कार ड्रायव्हर व्हायचं असेल किंवा बेसबॉल खेळायचा असेल किंवा घर बांधायचं असेल 29 00:02:05,121 --> 00:02:07,955 तरी या सगळ्या गोष्टींमध्ये सॉफ्टवेअरमुळं उलथापालथ झालेली आहे. 30 00:02:07,955 --> 00:02:12,336 तुम्हाला माहिती असेलच, कॉम्प्युटर्स सगळीकडं आहेत. तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं आहे का? तुम्हाला 31 00:02:12,336 --> 00:02:16,566 करमणूक उद्योगात काम करायचं आहे का? तुम्हाला उत्पादनात काम करायचं आहे का? कॉम्प्युटर सगळीकडं आहेत. 32 00:02:22,365 --> 00:02:37,738 2013 मध्ये आता सगळं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. संवाद साधण्यासाठी, बँकिंग करण्यासाठी, माहितीसाठी. 33 00:02:37,738 --> 00:02:45,694 आणि आपल्यापैकी कोणालाच कोड वाचता आणि लिहिता येत नाही. 34 00:02:45,694 --> 00:02:49,447 जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी शाळेनंतर चालणाऱ्या "विझ किड्स" ग्रुपमध्ये होतो. आणि जेव्हा लोकांना 35 00:02:49,447 --> 00:02:52,933 कळलं तेव्हा ते मला हसले. आणि मी म्हणायचो: 36 00:02:52,933 --> 00:02:56,125 मी नाही फिकीर करत. मला हे आवडतं आणि मी खूप शिकतो आहे आणि माझ्या काही मित्रांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. 37 00:03:03,411 --> 00:03:07,505 आमचं धोरण म्हणजे खरोखर सापडतील तितक्या प्रज्ञावंत इंजिनीअर्सना नोकरी द्यायची. 38 00:03:07,505 --> 00:03:11,601 सगळ्या व्यवस्थेमध्ये एकच मर्यादा आहे, ती म्हणजे प्रशिक्षित आणि कौशल्ये असलेले 39 00:03:11,601 --> 00:03:13,933 लोक आज पुरेशा प्रमाणात नाहीत. 40 00:03:13,933 --> 00:03:18,614 सगळ्यात चांगले लोक मिळवण्यासाठी आम्ही ऑफिस शक्य तितकं मस्त करण्याचा प्रयत्न करतो. 41 00:03:39,707 --> 00:03:41,332 आमच्याकडे अतिशय चांगले आचारी आहेत 42 00:03:41,332 --> 00:03:42,876 खाणं मोफत आहे 43 00:03:42,876 --> 00:03:44,517 नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. 44 00:03:44,517 --> 00:03:46,212 मोफत लॉन्ड्री 45 00:03:46,212 --> 00:03:47,882 स्नॅक्स 46 00:03:47,882 --> 00:03:51,552 अगदी खेळायला, व्हिडीओ गेम्ससाठी जागा आणि स्कूटर्स. 47 00:03:51,552 --> 00:03:57,852 ऑफिसमध्ये सगळ्या प्रकारच्या मनोरंजक गोष्टी आहेत, जिथं लोक खेळू शकतात, किंवा आराम करू 48 00:03:57,852 --> 00:04:02,980 शकतात किंवा तिथं जाऊन विचार करू शकतात. संगीत वाजवू शकतात किंवा कल्पक होऊ शकतात. 49 00:04:02,980 --> 00:04:05,935 तुम्ही खूप पैसे मिळवायचा प्रयत्न करत असाल किंवा जग बदलायचा, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग 50 00:04:05,935 --> 00:04:08,942 हे शिकण्यासाठी एक अतिशय ताकदवान कौशल्य आहे 51 00:04:08,942 --> 00:04:17,578 मला वाटतं की कोणीतरी मला सांगितलं असतं की सॉफ्टवेअर म्हणजे मानवता, लोकांना मदत करणं. 52 00:04:17,578 --> 00:04:22,040 कॉम्प्युटर तंत्रज्ञान वापरून लोकांना मदत करणं, तर माझा दृष्टीकोन खूपच आधी बदलला असता. 53 00:04:22,040 --> 00:04:28,922 एखादी कल्पना सुचणं आणि ती तुमच्या हातात येणं आणि बटण दाबता येणं, 54 00:04:28,922 --> 00:04:35,135 आणि ती लक्षावधी लोकांच्या हातात पोचणं. मला वाटतं, जगात या प्रकारचा अनुभव घेणारी आमची ही पहिलीच पिढी आहे. 55 00:04:35,135 --> 00:04:41,311 तुम्ही कॉलेजच्या हॉस्टेलमधून काहीतरी सुरू करता आणि 56 00:04:41,311 --> 00:04:44,984 यापूर्वी एखादी मोठी कंपनी न उभारलेले लोक तुमच्या बरोबर येतात आणि अशी एक गोष्ट बनवतात 57 00:04:44,984 --> 00:04:49,777 की लक्षावधी लोक त्यांच्या रोजच्या आयुष्यात याचा वापर करतात, याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. 58 00:04:49,777 --> 00:04:52,445 हा खूप नम्र करणारा आणि अद्भुत अनुभव आहे. 59 00:04:52,445 --> 00:04:56,782 उद्याचे प्रोग्रॅमर्स भविष्यातील जादूगार असतात, बाकीच्यांशी तुलना केली तर तुमच्याकडं 60 00:04:56,782 --> 00:04:58,953 काही जादुई शक्ती आहे असे तुम्हाला वाटेल. 61 00:04:58,953 --> 00:05:02,456 हे खूप अद्भुत आहे, मला वाटतं आपल्याकडे असणारी सुपर पॉवरच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे. 62 00:05:02,456 --> 00:05:08,101 महान कोडर्स आजचे रॉक स्टार्स आहेत. हेच खरं.