WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:07.000 सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का? 00:00:07.000 --> 00:00:11.000 मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे. 00:00:11.000 --> 00:00:15.000 खरं तर, मी निघालोय. (हशा) 00:00:15.000 --> 00:00:19.000 तीन विषय आहेत, नाही का, 00:00:19.000 --> 00:00:23.000 या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत 00:00:23.000 --> 00:00:25.000 मला जे सांगायचं आहे त्याच्याशी. 00:00:25.000 --> 00:00:29.000 एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा 00:00:29.000 --> 00:00:32.000 जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो 00:00:32.000 --> 00:00:35.000 आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे 00:00:35.000 --> 00:00:38.000 आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे 00:00:38.000 --> 00:00:41.000 आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही, 00:00:41.000 --> 00:00:43.000 भविष्याबाबत. काही कल्पना नाही 00:00:43.000 --> 00:00:45.000 यातून काय घडेल. NOTE Paragraph 00:00:45.000 --> 00:00:48.000 मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - 00:00:48.000 --> 00:00:51.000 खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो. 00:00:51.000 --> 00:00:53.000 नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं. 00:00:53.000 --> 00:00:56.000 तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत 00:00:56.000 --> 00:00:59.000 की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - 00:00:59.000 --> 00:01:06.000 खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल 00:01:06.000 --> 00:01:09.000 (हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही. 00:01:09.000 --> 00:01:14.000 आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे. 00:01:14.000 --> 00:01:16.000 पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात, 00:01:16.000 --> 00:01:18.000 म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?” 00:01:18.000 --> 00:01:20.000 आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता, 00:01:20.000 --> 00:01:24.000 तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही 00:01:24.000 --> 00:01:30.000 बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा) 00:01:30.000 --> 00:01:32.000 पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल, 00:01:32.000 --> 00:01:34.000 ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे 00:01:34.000 --> 00:01:37.000 ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना? 00:01:37.000 --> 00:01:40.000 धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं. 00:01:40.000 --> 00:01:44.000 मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे. 00:01:44.000 --> 00:01:46.000 त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, 00:01:46.000 --> 00:01:49.000 काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे 00:01:49.000 --> 00:01:52.000 जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे. 00:01:52.000 --> 00:01:55.000 तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं 00:01:55.000 --> 00:02:01.000 २०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही - 00:02:01.000 --> 00:02:04.000 गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - 00:02:04.000 --> 00:02:06.000 की हे जग कसं असेल 00:02:06.000 --> 00:02:08.000 पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे 00:02:08.000 --> 00:02:11.000 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते, 00:02:11.000 --> 00:02:13.000 विलक्षण आहे. NOTE Paragraph 00:02:13.000 --> 00:02:15.000 आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की 00:02:15.000 --> 00:02:20.000 आपण सर्वांनी मान्य केली आहे, 00:02:20.000 --> 00:02:23.000 मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - 00:02:23.000 --> 00:02:25.000 त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली, 00:02:25.000 --> 00:02:28.000 नाही का? काय काय करु शकली ती. 00:02:28.000 --> 00:02:33.000 आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच, 00:02:33.000 --> 00:02:36.000 की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे. 00:02:36.000 --> 00:02:39.000 तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती 00:02:39.000 --> 00:02:41.000 जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की, 00:02:41.000 --> 00:02:43.000 सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात. 00:02:43.000 --> 00:02:45.000 आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो. 00:02:45.000 --> 00:02:48.000 म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि 00:02:48.000 --> 00:02:51.000 मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की 00:02:51.000 --> 00:02:54.000 आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये, 00:02:54.000 --> 00:02:58.000 आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे. 00:02:58.000 --> 00:03:06.000 (टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं. 00:03:06.000 --> 00:03:10.000 खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून. 00:03:10.000 --> 00:03:17.000 तर, माझा जन्म झाला... नको. (हशा) NOTE Paragraph 00:03:17.000 --> 00:03:21.000 नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - 00:03:21.000 --> 00:03:25.000 एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती 00:03:25.000 --> 00:03:27.000 मागे, चित्र काढत बसली होती, 00:03:27.000 --> 00:03:29.000 आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही 00:03:29.000 --> 00:03:33.000 लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं. 00:03:33.000 --> 00:03:35.000 त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली 00:03:35.000 --> 00:03:38.000 आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?” 00:03:38.000 --> 00:03:41.000 आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.” 00:03:41.000 --> 00:03:44.000 ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.” 00:03:44.000 --> 00:03:51.000 "मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली. 00:03:51.000 --> 00:03:52.000 (हशा) NOTE Paragraph 00:03:52.000 --> 00:03:57.000 जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - 00:03:57.000 --> 00:04:00.000 खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा) 00:04:00.000 --> 00:04:06.000 अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता. 00:04:06.000 --> 00:04:08.000 त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता. 00:04:08.000 --> 00:04:11.000 तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती. 00:04:11.000 --> 00:04:14.000 एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता. 00:04:14.000 --> 00:04:19.000 तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती, 00:04:19.000 --> 00:04:22.000 ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. 00:04:22.000 --> 00:04:24.000 हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती. 00:04:24.000 --> 00:04:26.000 टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः 00:04:26.000 --> 00:04:29.000 जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा) 00:04:29.000 --> 00:04:31.000 त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश 00:04:31.000 --> 00:04:34.000 जिथं ते तीन राजे येतात. 00:04:34.000 --> 00:04:36.000 आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह. 00:04:36.000 --> 00:04:38.000 हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो 00:04:38.000 --> 00:04:40.000 आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला, 00:04:40.000 --> 00:04:42.000 कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो, 00:04:42.000 --> 00:04:44.000 "तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का? 00:04:44.000 --> 00:04:46.000 ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.” 00:04:46.000 --> 00:04:47.000 असो, तर ती तीन मुलं आली - 00:04:47.000 --> 00:04:49.000 चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - 00:04:49.000 --> 00:04:52.000 आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली, 00:04:52.000 --> 00:04:54.000 आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.” 00:04:54.000 --> 00:04:57.000 आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.” 00:04:57.000 --> 00:05:11.000 आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा) NOTE Paragraph 00:05:11.000 --> 00:05:13.000 या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात. 00:05:13.000 --> 00:05:16.000 त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील. 00:05:16.000 --> 00:05:19.000 बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही. 00:05:19.000 --> 00:05:24.000 आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे. 00:05:24.000 --> 00:05:25.000 आपल्याला हे माहितच आहे की, 00:05:25.000 --> 00:05:28.000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर 00:05:28.000 --> 00:05:31.000 तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही. 00:05:31.000 --> 00:05:34.000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत 00:05:34.000 --> 00:05:36.000 बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात. 00:05:36.000 --> 00:05:39.000 त्यांना चुकण्याची दहशत बसते. 00:05:39.000 --> 00:05:41.000 आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो. 00:05:41.000 --> 00:05:44.000 आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो 00:05:44.000 --> 00:05:47.000 राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं 00:05:47.000 --> 00:05:50.000 चुका करणं सर्वात खराब समजलं जातं. 00:05:50.000 --> 00:05:53.000 आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय 00:05:53.000 --> 00:05:56.000 त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला. 00:05:56.000 --> 00:05:59.000 तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात. 00:05:59.000 --> 00:06:03.000 समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे, 00:06:03.000 --> 00:06:05.000 की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही, 00:06:05.000 --> 00:06:08.000 आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो. 00:06:08.000 --> 00:06:10.000 तर हे असं का आहे? NOTE Paragraph 00:06:10.000 --> 00:06:14.000 सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो. 00:06:14.000 --> 00:06:16.000 खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो. 00:06:16.000 --> 00:06:20.000 यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते. 00:06:20.000 --> 00:06:22.000 (हशा) खरं तर, 00:06:22.000 --> 00:06:24.000 आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो. 00:06:24.000 --> 00:06:26.000 स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं 00:06:26.000 --> 00:06:31.000 शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं. 00:06:31.000 --> 00:06:33.000 शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना? 00:06:33.000 --> 00:06:35.000 बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती 00:06:35.000 --> 00:06:37.000 की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना? 00:06:37.000 --> 00:06:40.000 सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल 00:06:40.000 --> 00:06:42.000 कधीतरी सात वर्षांचा. तो असणार 00:06:42.000 --> 00:06:51.000 कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते? 00:06:51.000 --> 00:07:05.000 (हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील, 00:07:05.000 --> 00:07:08.000 शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,” 00:07:08.000 --> 00:07:10.000 विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे. 00:07:10.000 --> 00:07:18.000 आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.” 00:07:18.000 --> 00:07:23.000 (हशा) NOTE Paragraph 00:07:23.000 --> 00:07:26.000 असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो, 00:07:26.000 --> 00:07:30.000 आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे. 00:07:30.000 --> 00:07:33.000 माझ्या मुलाला यायचं नव्हतं. 00:07:33.000 --> 00:07:36.000 मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची. 00:07:36.000 --> 00:07:38.000 त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं, 00:07:38.000 --> 00:07:43.000 पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा. 00:07:43.000 --> 00:07:45.000 तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता. 00:07:45.000 --> 00:07:48.000 लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती, 00:07:48.000 --> 00:07:52.000 कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं. 00:07:52.000 --> 00:07:54.000 असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता, 00:07:54.000 --> 00:07:56.000 आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.” 00:07:56.000 --> 00:07:58.000 आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता, 00:07:58.000 --> 00:08:10.000 कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं. 00:08:10.000 --> 00:08:13.000 (हशा) NOTE Paragraph 00:08:13.000 --> 00:08:16.000 पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर 00:08:16.000 --> 00:08:18.000 आणि जगभर प्रवास केल्यावरः 00:08:18.000 --> 00:08:22.000 जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे. 00:08:22.000 --> 00:08:24.000 प्रत्येक. कुठेही गेलात तरी. 00:08:24.000 --> 00:08:26.000 तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही. 00:08:26.000 --> 00:08:29.000 एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय, 00:08:29.000 --> 00:08:31.000 मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय. 00:08:31.000 --> 00:08:33.000 जगात सर्वत्र. 00:08:33.000 --> 00:08:36.000 आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे, 00:08:36.000 --> 00:08:38.000 कला विषयांमधील श्रेणीरचना. 00:08:38.000 --> 00:08:40.000 कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून 00:08:40.000 --> 00:08:43.000 नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही 00:08:43.000 --> 00:08:45.000 जी दररोज मुलांना नृत्य शिकवते 00:08:45.000 --> 00:08:48.000 जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का? 00:08:48.000 --> 00:08:50.000 का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे. 00:08:50.000 --> 00:08:53.000 माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील. 00:08:53.000 --> 00:08:56.000 मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील. 00:08:56.000 --> 00:08:59.000 आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का? 00:08:59.000 --> 00:09:03.000 (हशा) खरंच, काय होतं तर, 00:09:03.000 --> 00:09:05.000 मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो 00:09:05.000 --> 00:09:08.000 कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो. 00:09:08.000 --> 00:09:10.000 आणि थोडंसं एका बाजूला. NOTE Paragraph 00:09:10.000 --> 00:09:14.000 जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत 00:09:14.000 --> 00:09:17.000 आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?” 00:09:17.000 --> 00:09:19.000 माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता, 00:09:19.000 --> 00:09:21.000 यातून नक्की कोणाला यश मिळतं, 00:09:21.000 --> 00:09:23.000 प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं, 00:09:23.000 --> 00:09:26.000 कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं - 00:09:26.000 --> 00:09:29.000 मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश 00:09:29.000 --> 00:09:30.000 जगभरातून 00:09:30.000 --> 00:09:34.000 आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का? 00:09:34.000 --> 00:09:36.000 हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे. 00:09:37.000 --> 00:09:40.000 आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा) 00:09:40.000 --> 00:09:44.000 आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का, 00:09:44.000 --> 00:09:48.000 आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे. 00:09:48.000 --> 00:09:50.000 तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, 00:09:50.000 --> 00:09:52.000 इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात, 00:09:52.000 --> 00:09:54.000 आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय. 00:09:54.000 --> 00:09:57.000 माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं - 00:09:57.000 --> 00:10:00.000 सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो. 00:10:00.000 --> 00:10:02.000 ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला. 00:10:02.000 --> 00:10:06.000 आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात. 00:10:06.000 --> 00:10:08.000 ते आपल्या शरीराला समजतात 00:10:08.000 --> 00:10:17.000 आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का? 00:10:17.000 --> 00:10:24.000 (हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं. 00:10:24.000 --> 00:10:27.000 तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल, 00:10:27.000 --> 00:10:30.000 तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा 00:10:30.000 --> 00:10:32.000 ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या, 00:10:32.000 --> 00:10:35.000 आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा. 00:10:35.000 --> 00:10:39.000 (हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया 00:10:39.000 --> 00:10:43.000 विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे, 00:10:43.000 --> 00:10:47.000 हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील. NOTE Paragraph 00:10:47.000 --> 00:10:53.000 आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर. 00:10:53.000 --> 00:10:56.000 आणि त्याला एक कारण आहे. 00:10:56.000 --> 00:10:58.000 ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही 00:10:58.000 --> 00:11:00.000 १९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच. 00:11:00.000 --> 00:11:03.000 त्या सर्व बनवल्या गेल्या 00:11:03.000 --> 00:11:04.000 औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी. 00:11:04.000 --> 00:11:07.000 तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर. 00:11:07.000 --> 00:11:11.000 पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय 00:11:11.000 --> 00:11:13.000 असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल 00:11:13.000 --> 00:11:15.000 तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून, 00:11:15.000 --> 00:11:17.000 या सबबीवर की तुम्हाला 00:11:17.000 --> 00:11:20.000 या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना? 00:11:20.000 --> 00:11:22.000 संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस; 00:11:22.000 --> 00:11:24.000 कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस. 00:11:25.000 --> 00:11:29.000 हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग 00:11:29.000 --> 00:11:30.000 एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे. 00:11:30.000 --> 00:11:33.000 आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय 00:11:33.000 --> 00:11:34.000 आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला, 00:11:34.000 --> 00:11:37.000 कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून. 00:11:37.000 --> 00:11:39.000 जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था 00:11:39.000 --> 00:11:41.000 जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया 00:11:41.000 --> 00:11:43.000 विद्यापीठीय प्रवेशाची. 00:11:43.000 --> 00:11:46.000 आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान, 00:11:46.000 --> 00:11:48.000 तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही, 00:11:48.000 --> 00:11:50.000 कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते 00:11:50.000 --> 00:11:54.000 त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या. 00:11:54.000 --> 00:11:56.000 आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. NOTE Paragraph 00:11:56.000 --> 00:11:58.000 येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, 00:11:58.000 --> 00:12:01.000 जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील 00:12:01.000 --> 00:12:03.000 शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा. 00:12:03.000 --> 00:12:05.000 जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल 00:12:05.000 --> 00:12:07.000 आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं - 00:12:07.000 --> 00:12:10.000 तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र 00:12:10.000 --> 00:12:12.000 आणि लोकसंख्येचा विस्फोट. 00:12:12.000 --> 00:12:15.000 एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का? 00:12:15.000 --> 00:12:19.000 माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची. 00:12:19.000 --> 00:12:22.000 तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल. 00:12:22.000 --> 00:12:25.000 आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा) 00:12:25.000 --> 00:12:30.000 पण आता पदवीधर मुलं सहसा 00:12:30.000 --> 00:12:31.000 घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी, 00:12:31.000 --> 00:12:34.000 कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात, 00:12:34.000 --> 00:12:37.000 आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते. 00:12:37.000 --> 00:12:39.000 ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे. 00:12:39.000 --> 00:12:41.000 आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा 00:12:41.000 --> 00:12:43.000 आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल 00:12:43.000 --> 00:12:44.000 आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात. NOTE Paragraph 00:12:44.000 --> 00:12:46.000 आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत. 00:12:46.000 --> 00:12:49.000 पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी 00:12:49.000 --> 00:12:51.000 आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो, 00:12:51.000 --> 00:12:54.000 आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो. 00:12:54.000 --> 00:12:57.000 आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो. 00:12:57.000 --> 00:12:59.000 दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते. 00:12:59.000 --> 00:13:02.000 जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं 00:13:02.000 --> 00:13:05.000 कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून, 00:13:05.000 --> 00:13:07.000 बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे. 00:13:07.000 --> 00:13:10.000 मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत. 00:13:10.000 --> 00:13:13.000 प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया 00:13:13.000 --> 00:13:15.000 नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची - 00:13:15.000 --> 00:13:18.000 बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून 00:13:18.000 --> 00:13:21.000 गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून. NOTE Paragraph 00:13:21.000 --> 00:13:23.000 हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो, 00:13:23.000 --> 00:13:26.000 मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो 00:13:26.000 --> 00:13:28.000 कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो. 00:13:28.000 --> 00:13:30.000 कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं 00:13:30.000 --> 00:13:34.000 बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात. 00:13:34.000 --> 00:13:36.000 कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का? 00:13:36.000 --> 00:13:39.000 कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं. 00:13:39.000 --> 00:13:41.000 माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर - 00:13:41.000 --> 00:13:45.000 सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा) 00:13:45.000 --> 00:13:48.000 पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते - 00:13:48.000 --> 00:13:50.000 तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा, 00:13:50.000 --> 00:13:52.000 ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते, 00:13:52.000 --> 00:13:55.000 ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते, 00:13:55.000 --> 00:13:58.000 ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते. 00:13:58.000 --> 00:14:01.000 जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात, 00:14:01.000 --> 00:14:04.000 फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो. 00:14:04.000 --> 00:14:17.000 मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा) 00:14:17.000 --> 00:14:19.000 वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का, 00:14:19.000 --> 00:14:22.000 जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं, 00:14:22.000 --> 00:14:25.000 तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद? 00:14:25.000 --> 00:14:28.000 मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला 00:14:28.000 --> 00:14:31.000 दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही, 00:14:31.000 --> 00:14:40.000 तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा) NOTE Paragraph 00:14:40.000 --> 00:14:42.000 आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे, 00:14:43.000 --> 00:14:45.000 ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय 00:14:45.000 --> 00:14:47.000 एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही 00:14:47.000 --> 00:14:49.000 लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला 00:14:49.000 --> 00:14:51.000 त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो. 00:14:51.000 --> 00:14:54.000 खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून 00:14:54.000 --> 00:14:56.000 एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी 00:14:56.000 --> 00:14:58.000 कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन, 00:14:58.000 --> 00:15:00.000 तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे 00:15:00.000 --> 00:15:02.000 आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे. 00:15:02.000 --> 00:15:04.000 तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.' 00:15:04.000 --> 00:15:08.000 ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो, 00:15:08.000 --> 00:15:10.000 तुम्ही पहातच आहात कसा. 00:15:10.000 --> 00:15:12.000 असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो, 00:15:12.000 --> 00:15:14.000 "जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली 00:15:14.000 --> 00:15:16.000 मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना, 00:15:16.000 --> 00:15:19.000 खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील, 00:15:19.000 --> 00:15:21.000 तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं 00:15:21.000 --> 00:15:23.000 जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती, 00:15:23.000 --> 00:15:25.000 ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील 00:15:25.000 --> 00:15:29.000 तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं, 00:15:29.000 --> 00:15:32.000 आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता. 00:15:32.000 --> 00:15:35.000 तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा) 00:15:35.000 --> 00:15:39.000 असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती. NOTE Paragraph 00:15:39.000 --> 00:15:43.000 असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये, 00:15:43.000 --> 00:15:46.000 आपल्या आईबरोबर ती गेली, 00:15:46.000 --> 00:15:49.000 आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं, 00:15:49.000 --> 00:15:51.000 आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा 00:15:51.000 --> 00:15:53.000 हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व 00:15:53.000 --> 00:15:57.000 समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी - 00:15:57.000 --> 00:15:59.000 तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं, 00:15:59.000 --> 00:16:01.000 तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही, 00:16:01.000 --> 00:16:04.000 आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले 00:16:04.000 --> 00:16:06.000 जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन, 00:16:06.000 --> 00:16:08.000 मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं 00:16:08.000 --> 00:16:10.000 मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.” 00:16:10.000 --> 00:16:13.000 ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.” 00:16:13.000 --> 00:16:15.000 आणि ते तिला सोडून गेले. 00:16:15.000 --> 00:16:17.000 पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला 00:16:17.000 --> 00:16:19.000 त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते 00:16:19.000 --> 00:16:21.000 खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले, 00:16:21.000 --> 00:16:24.000 फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी 00:16:24.000 --> 00:16:28.000 ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली. 00:16:28.000 --> 00:16:30.000 आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं 00:16:30.000 --> 00:16:33.000 आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले, 00:16:33.000 --> 00:16:37.000 "मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे. 00:16:37.000 --> 00:16:39.000 तिला डान्सक्लासला घेऊन जा." NOTE Paragraph 00:16:39.000 --> 00:16:41.000 मी म्हणालो, “मग काय झालं?” 00:16:41.000 --> 00:16:44.000 ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं. 00:16:44.000 --> 00:16:46.000 आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती 00:16:46.000 --> 00:16:49.000 माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक. 00:16:49.000 --> 00:16:52.000 असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.” 00:16:52.000 --> 00:16:54.000 ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते, 00:16:54.000 --> 00:16:56.000 ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते. 00:16:56.000 --> 00:16:59.000 पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली, 00:16:59.000 --> 00:17:01.000 ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली 00:17:01.000 --> 00:17:03.000 रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली 00:17:03.000 --> 00:17:05.000 रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि 00:17:05.000 --> 00:17:08.000 स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी - 00:17:08.000 --> 00:17:11.000 एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे 00:17:11.000 --> 00:17:13.000 काही सर्वात यशस्वी संगीत नाटक 00:17:13.000 --> 00:17:18.000 निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे, 00:17:18.000 --> 00:17:21.000 आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी 00:17:21.000 --> 00:17:25.000 तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं 00:17:25.000 --> 00:17:27.000 शांत रहायला. NOTE Paragraph 00:17:27.000 --> 00:17:30.000 आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः 00:17:30.000 --> 00:17:32.000 परवा अल् गोअर बोलले 00:17:32.000 --> 00:17:35.000 पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल. 00:17:35.000 --> 00:17:39.000 माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा 00:17:39.000 --> 00:17:42.000 म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं, 00:17:42.000 --> 00:17:46.000 जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या 00:17:46.000 --> 00:17:48.000 मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत. 00:17:48.000 --> 00:17:52.000 आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी 00:17:52.000 --> 00:17:54.000 आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी. 00:17:54.000 --> 00:17:57.000 आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही. 00:17:57.000 --> 00:18:00.000 आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा 00:18:00.000 --> 00:18:02.000 ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत. 00:18:02.000 --> 00:18:06.000 जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक 00:18:06.000 --> 00:18:09.000 पृथ्वीवरुन नाहीसे झाले, 00:18:09.000 --> 00:18:12.000 तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. 00:18:12.000 --> 00:18:15.000 जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली, 00:18:15.000 --> 00:18:19.000 तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.” 00:18:19.000 --> 00:18:21.000 आणि त्याचं बरोबरच आहे. NOTE Paragraph 00:18:21.000 --> 00:18:24.000 टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान. 00:18:24.000 --> 00:18:28.000 आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान 00:18:28.000 --> 00:18:31.000 सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु 00:18:31.000 --> 00:18:34.000 अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग 00:18:35.000 --> 00:18:38.000 ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून 00:18:38.000 --> 00:18:40.000 तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून 00:18:40.000 --> 00:18:43.000 आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट 00:18:43.000 --> 00:18:46.000 आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. 00:18:46.000 --> 00:18:49.000 तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही, 00:18:49.000 --> 00:18:52.000 पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं 00:18:52.000 --> 00:18:54.000 त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.