[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:07.00,Default,,0000,0000,0000,,सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का? Dialogue: 0,0:00:07.00,0:00:11.00,Default,,0000,0000,0000,,मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे. Dialogue: 0,0:00:11.00,0:00:15.00,Default,,0000,0000,0000,,खरं तर, मी निघालोय. (हशा) Dialogue: 0,0:00:15.00,0:00:19.00,Default,,0000,0000,0000,,तीन विषय आहेत, नाही का, Dialogue: 0,0:00:19.00,0:00:23.00,Default,,0000,0000,0000,,या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत Dialogue: 0,0:00:23.00,0:00:25.00,Default,,0000,0000,0000,,मला जे सांगायचं आहे त्याच्याशी. Dialogue: 0,0:00:25.00,0:00:29.00,Default,,0000,0000,0000,,एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा Dialogue: 0,0:00:29.00,0:00:32.00,Default,,0000,0000,0000,,जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो Dialogue: 0,0:00:32.00,0:00:35.00,Default,,0000,0000,0000,,आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे Dialogue: 0,0:00:35.00,0:00:38.00,Default,,0000,0000,0000,,आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे Dialogue: 0,0:00:38.00,0:00:41.00,Default,,0000,0000,0000,,आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही, Dialogue: 0,0:00:41.00,0:00:43.00,Default,,0000,0000,0000,,भविष्याबाबत. काही कल्पना नाही Dialogue: 0,0:00:43.00,0:00:45.00,Default,,0000,0000,0000,,यातून काय घडेल. Dialogue: 0,0:00:45.00,0:00:48.00,Default,,0000,0000,0000,,मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - Dialogue: 0,0:00:48.00,0:00:51.00,Default,,0000,0000,0000,,खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो. Dialogue: 0,0:00:51.00,0:00:53.00,Default,,0000,0000,0000,,नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं. Dialogue: 0,0:00:53.00,0:00:56.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत Dialogue: 0,0:00:56.00,0:00:59.00,Default,,0000,0000,0000,,की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - Dialogue: 0,0:00:59.00,0:01:06.00,Default,,0000,0000,0000,,खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल Dialogue: 0,0:01:06.00,0:01:09.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही. Dialogue: 0,0:01:09.00,0:01:14.00,Default,,0000,0000,0000,,आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे. Dialogue: 0,0:01:14.00,0:01:16.00,Default,,0000,0000,0000,,पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात, Dialogue: 0,0:01:16.00,0:01:18.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?” Dialogue: 0,0:01:18.00,0:01:20.00,Default,,0000,0000,0000,,आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता, Dialogue: 0,0:01:20.00,0:01:24.00,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही Dialogue: 0,0:01:24.00,0:01:30.00,Default,,0000,0000,0000,,बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा) Dialogue: 0,0:01:30.00,0:01:32.00,Default,,0000,0000,0000,,पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल, Dialogue: 0,0:01:32.00,0:01:34.00,Default,,0000,0000,0000,,ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे Dialogue: 0,0:01:34.00,0:01:37.00,Default,,0000,0000,0000,,ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना? Dialogue: 0,0:01:37.00,0:01:40.00,Default,,0000,0000,0000,,धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं. Dialogue: 0,0:01:40.00,0:01:44.00,Default,,0000,0000,0000,,मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे. Dialogue: 0,0:01:44.00,0:01:46.00,Default,,0000,0000,0000,,त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, Dialogue: 0,0:01:46.00,0:01:49.00,Default,,0000,0000,0000,,काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे Dialogue: 0,0:01:49.00,0:01:52.00,Default,,0000,0000,0000,,जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे. Dialogue: 0,0:01:52.00,0:01:55.00,Default,,0000,0000,0000,,तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं Dialogue: 0,0:01:55.00,0:02:01.00,Default,,0000,0000,0000,,२०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही - Dialogue: 0,0:02:01.00,0:02:04.00,Default,,0000,0000,0000,,गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - Dialogue: 0,0:02:04.00,0:02:06.00,Default,,0000,0000,0000,,की हे जग कसं असेल Dialogue: 0,0:02:06.00,0:02:08.00,Default,,0000,0000,0000,,पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे Dialogue: 0,0:02:08.00,0:02:11.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते, Dialogue: 0,0:02:11.00,0:02:13.00,Default,,0000,0000,0000,,विलक्षण आहे. Dialogue: 0,0:02:13.00,0:02:15.00,Default,,0000,0000,0000,,आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की Dialogue: 0,0:02:15.00,0:02:20.00,Default,,0000,0000,0000,,आपण सर्वांनी मान्य केली आहे, Dialogue: 0,0:02:20.00,0:02:23.00,Default,,0000,0000,0000,,मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - Dialogue: 0,0:02:23.00,0:02:25.00,Default,,0000,0000,0000,,त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली, Dialogue: 0,0:02:25.00,0:02:28.00,Default,,0000,0000,0000,,नाही का? काय काय करु शकली ती. Dialogue: 0,0:02:28.00,0:02:33.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच, Dialogue: 0,0:02:33.00,0:02:36.00,Default,,0000,0000,0000,,की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे. Dialogue: 0,0:02:36.00,0:02:39.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती Dialogue: 0,0:02:39.00,0:02:41.00,Default,,0000,0000,0000,,जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की, Dialogue: 0,0:02:41.00,0:02:43.00,Default,,0000,0000,0000,,सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात. Dialogue: 0,0:02:43.00,0:02:45.00,Default,,0000,0000,0000,,आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो. Dialogue: 0,0:02:45.00,0:02:48.00,Default,,0000,0000,0000,,म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि Dialogue: 0,0:02:48.00,0:02:51.00,Default,,0000,0000,0000,,मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की Dialogue: 0,0:02:51.00,0:02:54.00,Default,,0000,0000,0000,,आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये, Dialogue: 0,0:02:54.00,0:02:58.00,Default,,0000,0000,0000,,आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे. Dialogue: 0,0:02:58.00,0:03:06.00,Default,,0000,0000,0000,,(टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं. Dialogue: 0,0:03:06.00,0:03:10.00,Default,,0000,0000,0000,,खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून. Dialogue: 0,0:03:10.00,0:03:17.00,Default,,0000,0000,0000,,तर, माझा जन्म झाला... नको. (हशा) Dialogue: 0,0:03:17.00,0:03:21.00,Default,,0000,0000,0000,,नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - Dialogue: 0,0:03:21.00,0:03:25.00,Default,,0000,0000,0000,,एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती Dialogue: 0,0:03:25.00,0:03:27.00,Default,,0000,0000,0000,,मागे, चित्र काढत बसली होती, Dialogue: 0,0:03:27.00,0:03:29.00,Default,,0000,0000,0000,,आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही Dialogue: 0,0:03:29.00,0:03:33.00,Default,,0000,0000,0000,,लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं. Dialogue: 0,0:03:33.00,0:03:35.00,Default,,0000,0000,0000,,त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली Dialogue: 0,0:03:35.00,0:03:38.00,Default,,0000,0000,0000,,आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?” Dialogue: 0,0:03:38.00,0:03:41.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.” Dialogue: 0,0:03:41.00,0:03:44.00,Default,,0000,0000,0000,,ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.” Dialogue: 0,0:03:44.00,0:03:51.00,Default,,0000,0000,0000,,"मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली. Dialogue: 0,0:03:51.00,0:03:52.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:03:52.00,0:03:57.00,Default,,0000,0000,0000,,जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - Dialogue: 0,0:03:57.00,0:04:00.00,Default,,0000,0000,0000,,खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा) Dialogue: 0,0:04:00.00,0:04:06.00,Default,,0000,0000,0000,,अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता. Dialogue: 0,0:04:06.00,0:04:08.00,Default,,0000,0000,0000,,त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता. Dialogue: 0,0:04:08.00,0:04:11.00,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती. Dialogue: 0,0:04:11.00,0:04:14.00,Default,,0000,0000,0000,,एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता. Dialogue: 0,0:04:14.00,0:04:19.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती, Dialogue: 0,0:04:19.00,0:04:22.00,Default,,0000,0000,0000,,ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. Dialogue: 0,0:04:22.00,0:04:24.00,Default,,0000,0000,0000,,हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती. Dialogue: 0,0:04:24.00,0:04:26.00,Default,,0000,0000,0000,,टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः Dialogue: 0,0:04:26.00,0:04:29.00,Default,,0000,0000,0000,,जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा) Dialogue: 0,0:04:29.00,0:04:31.00,Default,,0000,0000,0000,,त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश Dialogue: 0,0:04:31.00,0:04:34.00,Default,,0000,0000,0000,,जिथं ते तीन राजे येतात. Dialogue: 0,0:04:34.00,0:04:36.00,Default,,0000,0000,0000,,आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह. Dialogue: 0,0:04:36.00,0:04:38.00,Default,,0000,0000,0000,,हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो Dialogue: 0,0:04:38.00,0:04:40.00,Default,,0000,0000,0000,,आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला, Dialogue: 0,0:04:40.00,0:04:42.00,Default,,0000,0000,0000,,कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो, Dialogue: 0,0:04:42.00,0:04:44.00,Default,,0000,0000,0000,,"तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का? Dialogue: 0,0:04:44.00,0:04:46.00,Default,,0000,0000,0000,,ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.” Dialogue: 0,0:04:46.00,0:04:47.00,Default,,0000,0000,0000,,असो, तर ती तीन मुलं आली - Dialogue: 0,0:04:47.00,0:04:49.00,Default,,0000,0000,0000,,चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - Dialogue: 0,0:04:49.00,0:04:52.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली, Dialogue: 0,0:04:52.00,0:04:54.00,Default,,0000,0000,0000,,आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.” Dialogue: 0,0:04:54.00,0:04:57.00,Default,,0000,0000,0000,,आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.” Dialogue: 0,0:04:57.00,0:05:11.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा) Dialogue: 0,0:05:11.00,0:05:13.00,Default,,0000,0000,0000,,या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात. Dialogue: 0,0:05:13.00,0:05:16.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील. Dialogue: 0,0:05:16.00,0:05:19.00,Default,,0000,0000,0000,,बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही. Dialogue: 0,0:05:19.00,0:05:24.00,Default,,0000,0000,0000,,आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे. Dialogue: 0,0:05:24.00,0:05:25.00,Default,,0000,0000,0000,,आपल्याला हे माहितच आहे की, Dialogue: 0,0:05:25.00,0:05:28.00,Default,,0000,0000,0000,,तुमची चुकायची तयारी नसेल, तर Dialogue: 0,0:05:28.00,0:05:31.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही. Dialogue: 0,0:05:31.00,0:05:34.00,Default,,0000,0000,0000,,तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत Dialogue: 0,0:05:34.00,0:05:36.00,Default,,0000,0000,0000,,बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात. Dialogue: 0,0:05:36.00,0:05:39.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना चुकण्याची दहशत बसते. Dialogue: 0,0:05:39.00,0:05:41.00,Default,,0000,0000,0000,,आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो. Dialogue: 0,0:05:41.00,0:05:44.00,Default,,0000,0000,0000,,आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो Dialogue: 0,0:05:44.00,0:05:47.00,Default,,0000,0000,0000,,राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं Dialogue: 0,0:05:47.00,0:05:50.00,Default,,0000,0000,0000,,चुका करणं सर्वात खराब समजलं जातं. Dialogue: 0,0:05:50.00,0:05:53.00,Default,,0000,0000,0000,,आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय Dialogue: 0,0:05:53.00,0:05:56.00,Default,,0000,0000,0000,,त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला. Dialogue: 0,0:05:56.00,0:05:59.00,Default,,0000,0000,0000,,तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात. Dialogue: 0,0:05:59.00,0:06:03.00,Default,,0000,0000,0000,,समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे, Dialogue: 0,0:06:03.00,0:06:05.00,Default,,0000,0000,0000,,की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही, Dialogue: 0,0:06:05.00,0:06:08.00,Default,,0000,0000,0000,,आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो. Dialogue: 0,0:06:08.00,0:06:10.00,Default,,0000,0000,0000,,तर हे असं का आहे? Dialogue: 0,0:06:10.00,0:06:14.00,Default,,0000,0000,0000,,सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो. Dialogue: 0,0:06:14.00,0:06:16.00,Default,,0000,0000,0000,,खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो. Dialogue: 0,0:06:16.00,0:06:20.00,Default,,0000,0000,0000,,यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते. Dialogue: 0,0:06:20.00,0:06:22.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) खरं तर, Dialogue: 0,0:06:22.00,0:06:24.00,Default,,0000,0000,0000,,आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो. Dialogue: 0,0:06:24.00,0:06:26.00,Default,,0000,0000,0000,,स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं Dialogue: 0,0:06:26.00,0:06:31.00,Default,,0000,0000,0000,,शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं. Dialogue: 0,0:06:31.00,0:06:33.00,Default,,0000,0000,0000,,शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना? Dialogue: 0,0:06:33.00,0:06:35.00,Default,,0000,0000,0000,,बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती Dialogue: 0,0:06:35.00,0:06:37.00,Default,,0000,0000,0000,,की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना? Dialogue: 0,0:06:37.00,0:06:40.00,Default,,0000,0000,0000,,सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल Dialogue: 0,0:06:40.00,0:06:42.00,Default,,0000,0000,0000,,कधीतरी सात वर्षांचा. तो असणार Dialogue: 0,0:06:42.00,0:06:51.00,Default,,0000,0000,0000,,कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते? Dialogue: 0,0:06:51.00,0:07:05.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील, Dialogue: 0,0:07:05.00,0:07:08.00,Default,,0000,0000,0000,,शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,” Dialogue: 0,0:07:08.00,0:07:10.00,Default,,0000,0000,0000,,विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे. Dialogue: 0,0:07:10.00,0:07:18.00,Default,,0000,0000,0000,,आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.” Dialogue: 0,0:07:18.00,0:07:23.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:07:23.00,0:07:26.00,Default,,0000,0000,0000,,असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो, Dialogue: 0,0:07:26.00,0:07:30.00,Default,,0000,0000,0000,,आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे. Dialogue: 0,0:07:30.00,0:07:33.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या मुलाला यायचं नव्हतं. Dialogue: 0,0:07:33.00,0:07:36.00,Default,,0000,0000,0000,,मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची. Dialogue: 0,0:07:36.00,0:07:38.00,Default,,0000,0000,0000,,त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं, Dialogue: 0,0:07:38.00,0:07:43.00,Default,,0000,0000,0000,,पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा. Dialogue: 0,0:07:43.00,0:07:45.00,Default,,0000,0000,0000,,तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता. Dialogue: 0,0:07:45.00,0:07:48.00,Default,,0000,0000,0000,,लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती, Dialogue: 0,0:07:48.00,0:07:52.00,Default,,0000,0000,0000,,कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं. Dialogue: 0,0:07:52.00,0:07:54.00,Default,,0000,0000,0000,,असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता, Dialogue: 0,0:07:54.00,0:07:56.00,Default,,0000,0000,0000,,आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.” Dialogue: 0,0:07:56.00,0:07:58.00,Default,,0000,0000,0000,,आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता, Dialogue: 0,0:07:58.00,0:08:10.00,Default,,0000,0000,0000,,कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं. Dialogue: 0,0:08:10.00,0:08:13.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) Dialogue: 0,0:08:13.00,0:08:16.00,Default,,0000,0000,0000,,पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर Dialogue: 0,0:08:16.00,0:08:18.00,Default,,0000,0000,0000,,आणि जगभर प्रवास केल्यावरः Dialogue: 0,0:08:18.00,0:08:22.00,Default,,0000,0000,0000,,जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे. Dialogue: 0,0:08:22.00,0:08:24.00,Default,,0000,0000,0000,,प्रत्येक. कुठेही गेलात तरी. Dialogue: 0,0:08:24.00,0:08:26.00,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही. Dialogue: 0,0:08:26.00,0:08:29.00,Default,,0000,0000,0000,,एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय, Dialogue: 0,0:08:29.00,0:08:31.00,Default,,0000,0000,0000,,मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय. Dialogue: 0,0:08:31.00,0:08:33.00,Default,,0000,0000,0000,,जगात सर्वत्र. Dialogue: 0,0:08:33.00,0:08:36.00,Default,,0000,0000,0000,,आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे, Dialogue: 0,0:08:36.00,0:08:38.00,Default,,0000,0000,0000,,कला विषयांमधील श्रेणीरचना. Dialogue: 0,0:08:38.00,0:08:40.00,Default,,0000,0000,0000,,कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून Dialogue: 0,0:08:40.00,0:08:43.00,Default,,0000,0000,0000,,नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही Dialogue: 0,0:08:43.00,0:08:45.00,Default,,0000,0000,0000,,जी दररोज मुलांना नृत्य शिकवते Dialogue: 0,0:08:45.00,0:08:48.00,Default,,0000,0000,0000,,जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का? Dialogue: 0,0:08:48.00,0:08:50.00,Default,,0000,0000,0000,,का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे. Dialogue: 0,0:08:50.00,0:08:53.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील. Dialogue: 0,0:08:53.00,0:08:56.00,Default,,0000,0000,0000,,मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील. Dialogue: 0,0:08:56.00,0:08:59.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का? Dialogue: 0,0:08:59.00,0:09:03.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) खरंच, काय होतं तर, Dialogue: 0,0:09:03.00,0:09:05.00,Default,,0000,0000,0000,,मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो Dialogue: 0,0:09:05.00,0:09:08.00,Default,,0000,0000,0000,,कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो. Dialogue: 0,0:09:08.00,0:09:10.00,Default,,0000,0000,0000,,आणि थोडंसं एका बाजूला. Dialogue: 0,0:09:10.00,0:09:14.00,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत Dialogue: 0,0:09:14.00,0:09:17.00,Default,,0000,0000,0000,,आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?” Dialogue: 0,0:09:17.00,0:09:19.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता, Dialogue: 0,0:09:19.00,0:09:21.00,Default,,0000,0000,0000,,यातून नक्की कोणाला यश मिळतं, Dialogue: 0,0:09:21.00,0:09:23.00,Default,,0000,0000,0000,,प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं, Dialogue: 0,0:09:23.00,0:09:26.00,Default,,0000,0000,0000,,कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं - Dialogue: 0,0:09:26.00,0:09:29.00,Default,,0000,0000,0000,,मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश Dialogue: 0,0:09:29.00,0:09:30.00,Default,,0000,0000,0000,,जगभरातून Dialogue: 0,0:09:30.00,0:09:34.00,Default,,0000,0000,0000,,आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का? Dialogue: 0,0:09:34.00,0:09:36.00,Default,,0000,0000,0000,,हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे. Dialogue: 0,0:09:37.00,0:09:40.00,Default,,0000,0000,0000,,आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा) Dialogue: 0,0:09:40.00,0:09:44.00,Default,,0000,0000,0000,,आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का, Dialogue: 0,0:09:44.00,0:09:48.00,Default,,0000,0000,0000,,आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे. Dialogue: 0,0:09:48.00,0:09:50.00,Default,,0000,0000,0000,,तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, Dialogue: 0,0:09:50.00,0:09:52.00,Default,,0000,0000,0000,,इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात, Dialogue: 0,0:09:52.00,0:09:54.00,Default,,0000,0000,0000,,आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय. Dialogue: 0,0:09:54.00,0:09:57.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं - Dialogue: 0,0:09:57.00,0:10:00.00,Default,,0000,0000,0000,,सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो. Dialogue: 0,0:10:00.00,0:10:02.00,Default,,0000,0000,0000,,ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला. Dialogue: 0,0:10:02.00,0:10:06.00,Default,,0000,0000,0000,,आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात. Dialogue: 0,0:10:06.00,0:10:08.00,Default,,0000,0000,0000,,ते आपल्या शरीराला समजतात Dialogue: 0,0:10:08.00,0:10:17.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का? Dialogue: 0,0:10:17.00,0:10:24.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं. Dialogue: 0,0:10:24.00,0:10:27.00,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल, Dialogue: 0,0:10:27.00,0:10:30.00,Default,,0000,0000,0000,,तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा Dialogue: 0,0:10:30.00,0:10:32.00,Default,,0000,0000,0000,,ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या, Dialogue: 0,0:10:32.00,0:10:35.00,Default,,0000,0000,0000,,आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा. Dialogue: 0,0:10:35.00,0:10:39.00,Default,,0000,0000,0000,,(हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया Dialogue: 0,0:10:39.00,0:10:43.00,Default,,0000,0000,0000,,विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे, Dialogue: 0,0:10:43.00,0:10:47.00,Default,,0000,0000,0000,,हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील. Dialogue: 0,0:10:47.00,0:10:53.00,Default,,0000,0000,0000,,आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर. Dialogue: 0,0:10:53.00,0:10:56.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्याला एक कारण आहे. Dialogue: 0,0:10:56.00,0:10:58.00,Default,,0000,0000,0000,,ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही Dialogue: 0,0:10:58.00,0:11:00.00,Default,,0000,0000,0000,,१९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच. Dialogue: 0,0:11:00.00,0:11:03.00,Default,,0000,0000,0000,,त्या सर्व बनवल्या गेल्या Dialogue: 0,0:11:03.00,0:11:04.00,Default,,0000,0000,0000,,औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी. Dialogue: 0,0:11:04.00,0:11:07.00,Default,,0000,0000,0000,,तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर. Dialogue: 0,0:11:07.00,0:11:11.00,Default,,0000,0000,0000,,पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय Dialogue: 0,0:11:11.00,0:11:13.00,Default,,0000,0000,0000,,असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल Dialogue: 0,0:11:13.00,0:11:15.00,Default,,0000,0000,0000,,तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून, Dialogue: 0,0:11:15.00,0:11:17.00,Default,,0000,0000,0000,,या सबबीवर की तुम्हाला Dialogue: 0,0:11:17.00,0:11:20.00,Default,,0000,0000,0000,,या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना? Dialogue: 0,0:11:20.00,0:11:22.00,Default,,0000,0000,0000,,संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस; Dialogue: 0,0:11:22.00,0:11:24.00,Default,,0000,0000,0000,,कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस. Dialogue: 0,0:11:25.00,0:11:29.00,Default,,0000,0000,0000,,हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग Dialogue: 0,0:11:29.00,0:11:30.00,Default,,0000,0000,0000,,एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे. Dialogue: 0,0:11:30.00,0:11:33.00,Default,,0000,0000,0000,,आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय Dialogue: 0,0:11:33.00,0:11:34.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला, Dialogue: 0,0:11:34.00,0:11:37.00,Default,,0000,0000,0000,,कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून. Dialogue: 0,0:11:37.00,0:11:39.00,Default,,0000,0000,0000,,जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था Dialogue: 0,0:11:39.00,0:11:41.00,Default,,0000,0000,0000,,जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया Dialogue: 0,0:11:41.00,0:11:43.00,Default,,0000,0000,0000,,विद्यापीठीय प्रवेशाची. Dialogue: 0,0:11:43.00,0:11:46.00,Default,,0000,0000,0000,,आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान, Dialogue: 0,0:11:46.00,0:11:48.00,Default,,0000,0000,0000,,तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही, Dialogue: 0,0:11:48.00,0:11:50.00,Default,,0000,0000,0000,,कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते Dialogue: 0,0:11:50.00,0:11:54.00,Default,,0000,0000,0000,,त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या. Dialogue: 0,0:11:54.00,0:11:56.00,Default,,0000,0000,0000,,आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. Dialogue: 0,0:11:56.00,0:11:58.00,Default,,0000,0000,0000,,येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, Dialogue: 0,0:11:58.00,0:12:01.00,Default,,0000,0000,0000,,जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील Dialogue: 0,0:12:01.00,0:12:03.00,Default,,0000,0000,0000,,शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा. Dialogue: 0,0:12:03.00,0:12:05.00,Default,,0000,0000,0000,,जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल Dialogue: 0,0:12:05.00,0:12:07.00,Default,,0000,0000,0000,,आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं - Dialogue: 0,0:12:07.00,0:12:10.00,Default,,0000,0000,0000,,तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र Dialogue: 0,0:12:10.00,0:12:12.00,Default,,0000,0000,0000,,आणि लोकसंख्येचा विस्फोट. Dialogue: 0,0:12:12.00,0:12:15.00,Default,,0000,0000,0000,,एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का? Dialogue: 0,0:12:15.00,0:12:19.00,Default,,0000,0000,0000,,माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची. Dialogue: 0,0:12:19.00,0:12:22.00,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल. Dialogue: 0,0:12:22.00,0:12:25.00,Default,,0000,0000,0000,,आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा) Dialogue: 0,0:12:25.00,0:12:30.00,Default,,0000,0000,0000,,पण आता पदवीधर मुलं सहसा Dialogue: 0,0:12:30.00,0:12:31.00,Default,,0000,0000,0000,,घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी, Dialogue: 0,0:12:31.00,0:12:34.00,Default,,0000,0000,0000,,कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात, Dialogue: 0,0:12:34.00,0:12:37.00,Default,,0000,0000,0000,,आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते. Dialogue: 0,0:12:37.00,0:12:39.00,Default,,0000,0000,0000,,ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे. Dialogue: 0,0:12:39.00,0:12:41.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा Dialogue: 0,0:12:41.00,0:12:43.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल Dialogue: 0,0:12:43.00,0:12:44.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात. Dialogue: 0,0:12:44.00,0:12:46.00,Default,,0000,0000,0000,,आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत. Dialogue: 0,0:12:46.00,0:12:49.00,Default,,0000,0000,0000,,पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी Dialogue: 0,0:12:49.00,0:12:51.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो, Dialogue: 0,0:12:51.00,0:12:54.00,Default,,0000,0000,0000,,आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो. Dialogue: 0,0:12:54.00,0:12:57.00,Default,,0000,0000,0000,,आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो. Dialogue: 0,0:12:57.00,0:12:59.00,Default,,0000,0000,0000,,दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते. Dialogue: 0,0:12:59.00,0:13:02.00,Default,,0000,0000,0000,,जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं Dialogue: 0,0:13:02.00,0:13:05.00,Default,,0000,0000,0000,,कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून, Dialogue: 0,0:13:05.00,0:13:07.00,Default,,0000,0000,0000,,बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे. Dialogue: 0,0:13:07.00,0:13:10.00,Default,,0000,0000,0000,,मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत. Dialogue: 0,0:13:10.00,0:13:13.00,Default,,0000,0000,0000,,प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया Dialogue: 0,0:13:13.00,0:13:15.00,Default,,0000,0000,0000,,नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची - Dialogue: 0,0:13:15.00,0:13:18.00,Default,,0000,0000,0000,,बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून Dialogue: 0,0:13:18.00,0:13:21.00,Default,,0000,0000,0000,,गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून. Dialogue: 0,0:13:21.00,0:13:23.00,Default,,0000,0000,0000,,हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो, Dialogue: 0,0:13:23.00,0:13:26.00,Default,,0000,0000,0000,,मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो Dialogue: 0,0:13:26.00,0:13:28.00,Default,,0000,0000,0000,,कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो. Dialogue: 0,0:13:28.00,0:13:30.00,Default,,0000,0000,0000,,कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं Dialogue: 0,0:13:30.00,0:13:34.00,Default,,0000,0000,0000,,बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात. Dialogue: 0,0:13:34.00,0:13:36.00,Default,,0000,0000,0000,,कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का? Dialogue: 0,0:13:36.00,0:13:39.00,Default,,0000,0000,0000,,कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं. Dialogue: 0,0:13:39.00,0:13:41.00,Default,,0000,0000,0000,,माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर - Dialogue: 0,0:13:41.00,0:13:45.00,Default,,0000,0000,0000,,सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा) Dialogue: 0,0:13:45.00,0:13:48.00,Default,,0000,0000,0000,,पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते - Dialogue: 0,0:13:48.00,0:13:50.00,Default,,0000,0000,0000,,तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा, Dialogue: 0,0:13:50.00,0:13:52.00,Default,,0000,0000,0000,,ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते, Dialogue: 0,0:13:52.00,0:13:55.00,Default,,0000,0000,0000,,ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते, Dialogue: 0,0:13:55.00,0:13:58.00,Default,,0000,0000,0000,,ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते. Dialogue: 0,0:13:58.00,0:14:01.00,Default,,0000,0000,0000,,जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात, Dialogue: 0,0:14:01.00,0:14:04.00,Default,,0000,0000,0000,,फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो. Dialogue: 0,0:14:04.00,0:14:17.00,Default,,0000,0000,0000,,मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा) Dialogue: 0,0:14:17.00,0:14:19.00,Default,,0000,0000,0000,,वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का, Dialogue: 0,0:14:19.00,0:14:22.00,Default,,0000,0000,0000,,जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं, Dialogue: 0,0:14:22.00,0:14:25.00,Default,,0000,0000,0000,,तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद? Dialogue: 0,0:14:25.00,0:14:28.00,Default,,0000,0000,0000,,मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला Dialogue: 0,0:14:28.00,0:14:31.00,Default,,0000,0000,0000,,दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही, Dialogue: 0,0:14:31.00,0:14:40.00,Default,,0000,0000,0000,,तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा) Dialogue: 0,0:14:40.00,0:14:42.00,Default,,0000,0000,0000,,आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे, Dialogue: 0,0:14:43.00,0:14:45.00,Default,,0000,0000,0000,,ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय Dialogue: 0,0:14:45.00,0:14:47.00,Default,,0000,0000,0000,,एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही Dialogue: 0,0:14:47.00,0:14:49.00,Default,,0000,0000,0000,,लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला Dialogue: 0,0:14:49.00,0:14:51.00,Default,,0000,0000,0000,,त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो. Dialogue: 0,0:14:51.00,0:14:54.00,Default,,0000,0000,0000,,खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून Dialogue: 0,0:14:54.00,0:14:56.00,Default,,0000,0000,0000,,एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी Dialogue: 0,0:14:56.00,0:14:58.00,Default,,0000,0000,0000,,कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन, Dialogue: 0,0:14:58.00,0:15:00.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे Dialogue: 0,0:15:00.00,0:15:02.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे. Dialogue: 0,0:15:02.00,0:15:04.00,Default,,0000,0000,0000,,तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.' Dialogue: 0,0:15:04.00,0:15:08.00,Default,,0000,0000,0000,,ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो, Dialogue: 0,0:15:08.00,0:15:10.00,Default,,0000,0000,0000,,तुम्ही पहातच आहात कसा. Dialogue: 0,0:15:10.00,0:15:12.00,Default,,0000,0000,0000,,असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो, Dialogue: 0,0:15:12.00,0:15:14.00,Default,,0000,0000,0000,,"जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली Dialogue: 0,0:15:14.00,0:15:16.00,Default,,0000,0000,0000,,मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना, Dialogue: 0,0:15:16.00,0:15:19.00,Default,,0000,0000,0000,,खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील, Dialogue: 0,0:15:19.00,0:15:21.00,Default,,0000,0000,0000,,तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं Dialogue: 0,0:15:21.00,0:15:23.00,Default,,0000,0000,0000,,जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती, Dialogue: 0,0:15:23.00,0:15:25.00,Default,,0000,0000,0000,,ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील Dialogue: 0,0:15:25.00,0:15:29.00,Default,,0000,0000,0000,,तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं, Dialogue: 0,0:15:29.00,0:15:32.00,Default,,0000,0000,0000,,आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता. Dialogue: 0,0:15:32.00,0:15:35.00,Default,,0000,0000,0000,,तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा) Dialogue: 0,0:15:35.00,0:15:39.00,Default,,0000,0000,0000,,असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती. Dialogue: 0,0:15:39.00,0:15:43.00,Default,,0000,0000,0000,,असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये, Dialogue: 0,0:15:43.00,0:15:46.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या आईबरोबर ती गेली, Dialogue: 0,0:15:46.00,0:15:49.00,Default,,0000,0000,0000,,आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं, Dialogue: 0,0:15:49.00,0:15:51.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा Dialogue: 0,0:15:51.00,0:15:53.00,Default,,0000,0000,0000,,हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व Dialogue: 0,0:15:53.00,0:15:57.00,Default,,0000,0000,0000,,समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी - Dialogue: 0,0:15:57.00,0:15:59.00,Default,,0000,0000,0000,,तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं, Dialogue: 0,0:15:59.00,0:16:01.00,Default,,0000,0000,0000,,तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही, Dialogue: 0,0:16:01.00,0:16:04.00,Default,,0000,0000,0000,,आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले Dialogue: 0,0:16:04.00,0:16:06.00,Default,,0000,0000,0000,,जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन, Dialogue: 0,0:16:06.00,0:16:08.00,Default,,0000,0000,0000,,मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं Dialogue: 0,0:16:08.00,0:16:10.00,Default,,0000,0000,0000,,मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.” Dialogue: 0,0:16:10.00,0:16:13.00,Default,,0000,0000,0000,,ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.” Dialogue: 0,0:16:13.00,0:16:15.00,Default,,0000,0000,0000,,आणि ते तिला सोडून गेले. Dialogue: 0,0:16:15.00,0:16:17.00,Default,,0000,0000,0000,,पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला Dialogue: 0,0:16:17.00,0:16:19.00,Default,,0000,0000,0000,,त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते Dialogue: 0,0:16:19.00,0:16:21.00,Default,,0000,0000,0000,,खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले, Dialogue: 0,0:16:21.00,0:16:24.00,Default,,0000,0000,0000,,फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी Dialogue: 0,0:16:24.00,0:16:28.00,Default,,0000,0000,0000,,ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली. Dialogue: 0,0:16:28.00,0:16:30.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं Dialogue: 0,0:16:30.00,0:16:33.00,Default,,0000,0000,0000,,आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले, Dialogue: 0,0:16:33.00,0:16:37.00,Default,,0000,0000,0000,,"मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे. Dialogue: 0,0:16:37.00,0:16:39.00,Default,,0000,0000,0000,,तिला डान्सक्लासला घेऊन जा." Dialogue: 0,0:16:39.00,0:16:41.00,Default,,0000,0000,0000,,मी म्हणालो, “मग काय झालं?” Dialogue: 0,0:16:41.00,0:16:44.00,Default,,0000,0000,0000,,ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं. Dialogue: 0,0:16:44.00,0:16:46.00,Default,,0000,0000,0000,,आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती Dialogue: 0,0:16:46.00,0:16:49.00,Default,,0000,0000,0000,,माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक. Dialogue: 0,0:16:49.00,0:16:52.00,Default,,0000,0000,0000,,असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.” Dialogue: 0,0:16:52.00,0:16:54.00,Default,,0000,0000,0000,,ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते, Dialogue: 0,0:16:54.00,0:16:56.00,Default,,0000,0000,0000,,ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते. Dialogue: 0,0:16:56.00,0:16:59.00,Default,,0000,0000,0000,,पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली, Dialogue: 0,0:16:59.00,0:17:01.00,Default,,0000,0000,0000,,ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली Dialogue: 0,0:17:01.00,0:17:03.00,Default,,0000,0000,0000,,रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली Dialogue: 0,0:17:03.00,0:17:05.00,Default,,0000,0000,0000,,रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि Dialogue: 0,0:17:05.00,0:17:08.00,Default,,0000,0000,0000,,स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी - Dialogue: 0,0:17:08.00,0:17:11.00,Default,,0000,0000,0000,,एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे Dialogue: 0,0:17:11.00,0:17:13.00,Default,,0000,0000,0000,,काही सर्वात यशस्वी संगीत नाटक Dialogue: 0,0:17:13.00,0:17:18.00,Default,,0000,0000,0000,,निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे, Dialogue: 0,0:17:18.00,0:17:21.00,Default,,0000,0000,0000,,आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी Dialogue: 0,0:17:21.00,0:17:25.00,Default,,0000,0000,0000,,तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं Dialogue: 0,0:17:25.00,0:17:27.00,Default,,0000,0000,0000,,शांत रहायला. Dialogue: 0,0:17:27.00,0:17:30.00,Default,,0000,0000,0000,,आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः Dialogue: 0,0:17:30.00,0:17:32.00,Default,,0000,0000,0000,,परवा अल् गोअर बोलले Dialogue: 0,0:17:32.00,0:17:35.00,Default,,0000,0000,0000,,पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल. Dialogue: 0,0:17:35.00,0:17:39.00,Default,,0000,0000,0000,,माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा Dialogue: 0,0:17:39.00,0:17:42.00,Default,,0000,0000,0000,,म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं, Dialogue: 0,0:17:42.00,0:17:46.00,Default,,0000,0000,0000,,जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या Dialogue: 0,0:17:46.00,0:17:48.00,Default,,0000,0000,0000,,मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत. Dialogue: 0,0:17:48.00,0:17:52.00,Default,,0000,0000,0000,,आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी Dialogue: 0,0:17:52.00,0:17:54.00,Default,,0000,0000,0000,,आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी. Dialogue: 0,0:17:54.00,0:17:57.00,Default,,0000,0000,0000,,आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही. Dialogue: 0,0:17:57.00,0:18:00.00,Default,,0000,0000,0000,,आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा Dialogue: 0,0:18:00.00,0:18:02.00,Default,,0000,0000,0000,,ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत. Dialogue: 0,0:18:02.00,0:18:06.00,Default,,0000,0000,0000,,जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक Dialogue: 0,0:18:06.00,0:18:09.00,Default,,0000,0000,0000,,पृथ्वीवरुन नाहीसे झाले, Dialogue: 0,0:18:09.00,0:18:12.00,Default,,0000,0000,0000,,तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. Dialogue: 0,0:18:12.00,0:18:15.00,Default,,0000,0000,0000,,जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली, Dialogue: 0,0:18:15.00,0:18:19.00,Default,,0000,0000,0000,,तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.” Dialogue: 0,0:18:19.00,0:18:21.00,Default,,0000,0000,0000,,आणि त्याचं बरोबरच आहे. Dialogue: 0,0:18:21.00,0:18:24.00,Default,,0000,0000,0000,,टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान. Dialogue: 0,0:18:24.00,0:18:28.00,Default,,0000,0000,0000,,आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान Dialogue: 0,0:18:28.00,0:18:31.00,Default,,0000,0000,0000,,सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु Dialogue: 0,0:18:31.00,0:18:34.00,Default,,0000,0000,0000,,अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग Dialogue: 0,0:18:35.00,0:18:38.00,Default,,0000,0000,0000,,ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून Dialogue: 0,0:18:38.00,0:18:40.00,Default,,0000,0000,0000,,तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून Dialogue: 0,0:18:40.00,0:18:43.00,Default,,0000,0000,0000,,आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट Dialogue: 0,0:18:43.00,0:18:46.00,Default,,0000,0000,0000,,आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. Dialogue: 0,0:18:46.00,0:18:49.00,Default,,0000,0000,0000,,तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही, Dialogue: 0,0:18:49.00,0:18:52.00,Default,,0000,0000,0000,,पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं Dialogue: 0,0:18:52.00,0:18:54.00,Default,,0000,0000,0000,,त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.