1 00:00:00,000 --> 00:00:07,000 सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का? 2 00:00:07,000 --> 00:00:11,000 मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे. 3 00:00:11,000 --> 00:00:15,000 खरं तर, मी निघालोय. (हशा) 4 00:00:15,000 --> 00:00:19,000 तीन विषय आहेत, नाही का, 5 00:00:19,000 --> 00:00:23,000 या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत 6 00:00:23,000 --> 00:00:25,000 मला जे सांगायचं आहे त्याच्याशी. 7 00:00:25,000 --> 00:00:29,000 एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा 8 00:00:29,000 --> 00:00:32,000 जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो 9 00:00:32,000 --> 00:00:35,000 आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे 10 00:00:35,000 --> 00:00:38,000 आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे 11 00:00:38,000 --> 00:00:41,000 आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही, 12 00:00:41,000 --> 00:00:43,000 भविष्याबाबत. काही कल्पना नाही 13 00:00:43,000 --> 00:00:45,000 यातून काय घडेल. 14 00:00:45,000 --> 00:00:48,000 मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - 15 00:00:48,000 --> 00:00:51,000 खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो. 16 00:00:51,000 --> 00:00:53,000 नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं. 17 00:00:53,000 --> 00:00:56,000 तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत 18 00:00:56,000 --> 00:00:59,000 की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - 19 00:00:59,000 --> 00:01:06,000 खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल 20 00:01:06,000 --> 00:01:09,000 (हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही. 21 00:01:09,000 --> 00:01:14,000 आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे. 22 00:01:14,000 --> 00:01:16,000 पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात, 23 00:01:16,000 --> 00:01:18,000 म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?” 24 00:01:18,000 --> 00:01:20,000 आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता, 25 00:01:20,000 --> 00:01:24,000 तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही 26 00:01:24,000 --> 00:01:30,000 बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा) 27 00:01:30,000 --> 00:01:32,000 पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल, 28 00:01:32,000 --> 00:01:34,000 ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे 29 00:01:34,000 --> 00:01:37,000 ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना? 30 00:01:37,000 --> 00:01:40,000 धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं. 31 00:01:40,000 --> 00:01:44,000 मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे. 32 00:01:44,000 --> 00:01:46,000 त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, 33 00:01:46,000 --> 00:01:49,000 काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे 34 00:01:49,000 --> 00:01:52,000 जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे. 35 00:01:52,000 --> 00:01:55,000 तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं 36 00:01:55,000 --> 00:02:01,000 २०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही - 37 00:02:01,000 --> 00:02:04,000 गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - 38 00:02:04,000 --> 00:02:06,000 की हे जग कसं असेल 39 00:02:06,000 --> 00:02:08,000 पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे 40 00:02:08,000 --> 00:02:11,000 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते, 41 00:02:11,000 --> 00:02:13,000 विलक्षण आहे. 42 00:02:13,000 --> 00:02:15,000 आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की 43 00:02:15,000 --> 00:02:20,000 आपण सर्वांनी मान्य केली आहे, 44 00:02:20,000 --> 00:02:23,000 मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - 45 00:02:23,000 --> 00:02:25,000 त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली, 46 00:02:25,000 --> 00:02:28,000 नाही का? काय काय करु शकली ती. 47 00:02:28,000 --> 00:02:33,000 आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच, 48 00:02:33,000 --> 00:02:36,000 की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे. 49 00:02:36,000 --> 00:02:39,000 तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती 50 00:02:39,000 --> 00:02:41,000 जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की, 51 00:02:41,000 --> 00:02:43,000 सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात. 52 00:02:43,000 --> 00:02:45,000 आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो. 53 00:02:45,000 --> 00:02:48,000 म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि 54 00:02:48,000 --> 00:02:51,000 मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की 55 00:02:51,000 --> 00:02:54,000 आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये, 56 00:02:54,000 --> 00:02:58,000 आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे. 57 00:02:58,000 --> 00:03:06,000 (टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं. 58 00:03:06,000 --> 00:03:10,000 खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून. 59 00:03:10,000 --> 00:03:17,000 तर, माझा जन्म झाला... नको. (हशा) 60 00:03:17,000 --> 00:03:21,000 नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - 61 00:03:21,000 --> 00:03:25,000 एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती 62 00:03:25,000 --> 00:03:27,000 मागे, चित्र काढत बसली होती, 63 00:03:27,000 --> 00:03:29,000 आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही 64 00:03:29,000 --> 00:03:33,000 लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं. 65 00:03:33,000 --> 00:03:35,000 त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली 66 00:03:35,000 --> 00:03:38,000 आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?” 67 00:03:38,000 --> 00:03:41,000 आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.” 68 00:03:41,000 --> 00:03:44,000 ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.” 69 00:03:44,000 --> 00:03:51,000 "मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली. 70 00:03:51,000 --> 00:03:52,000 (हशा) 71 00:03:52,000 --> 00:03:57,000 जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - 72 00:03:57,000 --> 00:04:00,000 खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा) 73 00:04:00,000 --> 00:04:06,000 अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता. 74 00:04:06,000 --> 00:04:08,000 त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता. 75 00:04:08,000 --> 00:04:11,000 तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती. 76 00:04:11,000 --> 00:04:14,000 एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता. 77 00:04:14,000 --> 00:04:19,000 तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती, 78 00:04:19,000 --> 00:04:22,000 ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. 79 00:04:22,000 --> 00:04:24,000 हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती. 80 00:04:24,000 --> 00:04:26,000 टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः 81 00:04:26,000 --> 00:04:29,000 जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा) 82 00:04:29,000 --> 00:04:31,000 त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश 83 00:04:31,000 --> 00:04:34,000 जिथं ते तीन राजे येतात. 84 00:04:34,000 --> 00:04:36,000 आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह. 85 00:04:36,000 --> 00:04:38,000 हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो 86 00:04:38,000 --> 00:04:40,000 आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला, 87 00:04:40,000 --> 00:04:42,000 कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो, 88 00:04:42,000 --> 00:04:44,000 "तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का? 89 00:04:44,000 --> 00:04:46,000 ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.” 90 00:04:46,000 --> 00:04:47,000 असो, तर ती तीन मुलं आली - 91 00:04:47,000 --> 00:04:49,000 चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - 92 00:04:49,000 --> 00:04:52,000 आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली, 93 00:04:52,000 --> 00:04:54,000 आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.” 94 00:04:54,000 --> 00:04:57,000 आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.” 95 00:04:57,000 --> 00:05:11,000 आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा) 96 00:05:11,000 --> 00:05:13,000 या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात. 97 00:05:13,000 --> 00:05:16,000 त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील. 98 00:05:16,000 --> 00:05:19,000 बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही. 99 00:05:19,000 --> 00:05:24,000 आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे. 100 00:05:24,000 --> 00:05:25,000 आपल्याला हे माहितच आहे की, 101 00:05:25,000 --> 00:05:28,000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर 102 00:05:28,000 --> 00:05:31,000 तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही. 103 00:05:31,000 --> 00:05:34,000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत 104 00:05:34,000 --> 00:05:36,000 बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात. 105 00:05:36,000 --> 00:05:39,000 त्यांना चुकण्याची दहशत बसते. 106 00:05:39,000 --> 00:05:41,000 आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो. 107 00:05:41,000 --> 00:05:44,000 आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो 108 00:05:44,000 --> 00:05:47,000 राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं 109 00:05:47,000 --> 00:05:50,000 चुका करणं सर्वात खराब समजलं जातं. 110 00:05:50,000 --> 00:05:53,000 आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय 111 00:05:53,000 --> 00:05:56,000 त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला. 112 00:05:56,000 --> 00:05:59,000 तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात. 113 00:05:59,000 --> 00:06:03,000 समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे, 114 00:06:03,000 --> 00:06:05,000 की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही, 115 00:06:05,000 --> 00:06:08,000 आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो. 116 00:06:08,000 --> 00:06:10,000 तर हे असं का आहे? 117 00:06:10,000 --> 00:06:14,000 सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो. 118 00:06:14,000 --> 00:06:16,000 खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो. 119 00:06:16,000 --> 00:06:20,000 यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते. 120 00:06:20,000 --> 00:06:22,000 (हशा) खरं तर, 121 00:06:22,000 --> 00:06:24,000 आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो. 122 00:06:24,000 --> 00:06:26,000 स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं 123 00:06:26,000 --> 00:06:31,000 शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं. 124 00:06:31,000 --> 00:06:33,000 शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना? 125 00:06:33,000 --> 00:06:35,000 बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती 126 00:06:35,000 --> 00:06:37,000 की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना? 127 00:06:37,000 --> 00:06:40,000 सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल 128 00:06:40,000 --> 00:06:42,000 कधीतरी सात वर्षांचा. तो असणार 129 00:06:42,000 --> 00:06:51,000 कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते? 130 00:06:51,000 --> 00:07:05,000 (हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील, 131 00:07:05,000 --> 00:07:08,000 शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,” 132 00:07:08,000 --> 00:07:10,000 विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे. 133 00:07:10,000 --> 00:07:18,000 आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.” 134 00:07:18,000 --> 00:07:23,000 (हशा) 135 00:07:23,000 --> 00:07:26,000 असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो, 136 00:07:26,000 --> 00:07:30,000 आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे. 137 00:07:30,000 --> 00:07:33,000 माझ्या मुलाला यायचं नव्हतं. 138 00:07:33,000 --> 00:07:36,000 मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची. 139 00:07:36,000 --> 00:07:38,000 त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं, 140 00:07:38,000 --> 00:07:43,000 पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा. 141 00:07:43,000 --> 00:07:45,000 तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता. 142 00:07:45,000 --> 00:07:48,000 लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती, 143 00:07:48,000 --> 00:07:52,000 कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं. 144 00:07:52,000 --> 00:07:54,000 असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता, 145 00:07:54,000 --> 00:07:56,000 आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.” 146 00:07:56,000 --> 00:07:58,000 आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता, 147 00:07:58,000 --> 00:08:10,000 कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं. 148 00:08:10,000 --> 00:08:13,000 (हशा) 149 00:08:13,000 --> 00:08:16,000 पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर 150 00:08:16,000 --> 00:08:18,000 आणि जगभर प्रवास केल्यावरः 151 00:08:18,000 --> 00:08:22,000 जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे. 152 00:08:22,000 --> 00:08:24,000 प्रत्येक. कुठेही गेलात तरी. 153 00:08:24,000 --> 00:08:26,000 तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही. 154 00:08:26,000 --> 00:08:29,000 एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय, 155 00:08:29,000 --> 00:08:31,000 मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय. 156 00:08:31,000 --> 00:08:33,000 जगात सर्वत्र. 157 00:08:33,000 --> 00:08:36,000 आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे, 158 00:08:36,000 --> 00:08:38,000 कला विषयांमधील श्रेणीरचना. 159 00:08:38,000 --> 00:08:40,000 कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून 160 00:08:40,000 --> 00:08:43,000 नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही 161 00:08:43,000 --> 00:08:45,000 जी दररोज मुलांना नृत्य शिकवते 162 00:08:45,000 --> 00:08:48,000 जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का? 163 00:08:48,000 --> 00:08:50,000 का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे. 164 00:08:50,000 --> 00:08:53,000 माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील. 165 00:08:53,000 --> 00:08:56,000 मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील. 166 00:08:56,000 --> 00:08:59,000 आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का? 167 00:08:59,000 --> 00:09:03,000 (हशा) खरंच, काय होतं तर, 168 00:09:03,000 --> 00:09:05,000 मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो 169 00:09:05,000 --> 00:09:08,000 कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो. 170 00:09:08,000 --> 00:09:10,000 आणि थोडंसं एका बाजूला. 171 00:09:10,000 --> 00:09:14,000 जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत 172 00:09:14,000 --> 00:09:17,000 आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?” 173 00:09:17,000 --> 00:09:19,000 माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता, 174 00:09:19,000 --> 00:09:21,000 यातून नक्की कोणाला यश मिळतं, 175 00:09:21,000 --> 00:09:23,000 प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं, 176 00:09:23,000 --> 00:09:26,000 कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं - 177 00:09:26,000 --> 00:09:29,000 मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश 178 00:09:29,000 --> 00:09:30,000 जगभरातून 179 00:09:30,000 --> 00:09:34,000 आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का? 180 00:09:34,000 --> 00:09:36,000 हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे. 181 00:09:37,000 --> 00:09:40,000 आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा) 182 00:09:40,000 --> 00:09:44,000 आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का, 183 00:09:44,000 --> 00:09:48,000 आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे. 184 00:09:48,000 --> 00:09:50,000 तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, 185 00:09:50,000 --> 00:09:52,000 इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात, 186 00:09:52,000 --> 00:09:54,000 आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय. 187 00:09:54,000 --> 00:09:57,000 माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं - 188 00:09:57,000 --> 00:10:00,000 सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो. 189 00:10:00,000 --> 00:10:02,000 ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला. 190 00:10:02,000 --> 00:10:06,000 आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात. 191 00:10:06,000 --> 00:10:08,000 ते आपल्या शरीराला समजतात 192 00:10:08,000 --> 00:10:17,000 आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का? 193 00:10:17,000 --> 00:10:24,000 (हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं. 194 00:10:24,000 --> 00:10:27,000 तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल, 195 00:10:27,000 --> 00:10:30,000 तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा 196 00:10:30,000 --> 00:10:32,000 ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या, 197 00:10:32,000 --> 00:10:35,000 आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा. 198 00:10:35,000 --> 00:10:39,000 (हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया 199 00:10:39,000 --> 00:10:43,000 विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे, 200 00:10:43,000 --> 00:10:47,000 हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील. 201 00:10:47,000 --> 00:10:53,000 आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर. 202 00:10:53,000 --> 00:10:56,000 आणि त्याला एक कारण आहे. 203 00:10:56,000 --> 00:10:58,000 ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही 204 00:10:58,000 --> 00:11:00,000 १९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच. 205 00:11:00,000 --> 00:11:03,000 त्या सर्व बनवल्या गेल्या 206 00:11:03,000 --> 00:11:04,000 औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी. 207 00:11:04,000 --> 00:11:07,000 तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर. 208 00:11:07,000 --> 00:11:11,000 पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय 209 00:11:11,000 --> 00:11:13,000 असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल 210 00:11:13,000 --> 00:11:15,000 तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून, 211 00:11:15,000 --> 00:11:17,000 या सबबीवर की तुम्हाला 212 00:11:17,000 --> 00:11:20,000 या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना? 213 00:11:20,000 --> 00:11:22,000 संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस; 214 00:11:22,000 --> 00:11:24,000 कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस. 215 00:11:25,000 --> 00:11:29,000 हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग 216 00:11:29,000 --> 00:11:30,000 एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे. 217 00:11:30,000 --> 00:11:33,000 आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय 218 00:11:33,000 --> 00:11:34,000 आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला, 219 00:11:34,000 --> 00:11:37,000 कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून. 220 00:11:37,000 --> 00:11:39,000 जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था 221 00:11:39,000 --> 00:11:41,000 जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया 222 00:11:41,000 --> 00:11:43,000 विद्यापीठीय प्रवेशाची. 223 00:11:43,000 --> 00:11:46,000 आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान, 224 00:11:46,000 --> 00:11:48,000 तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही, 225 00:11:48,000 --> 00:11:50,000 कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते 226 00:11:50,000 --> 00:11:54,000 त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या. 227 00:11:54,000 --> 00:11:56,000 आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. 228 00:11:56,000 --> 00:11:58,000 येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, 229 00:11:58,000 --> 00:12:01,000 जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील 230 00:12:01,000 --> 00:12:03,000 शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा. 231 00:12:03,000 --> 00:12:05,000 जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल 232 00:12:05,000 --> 00:12:07,000 आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं - 233 00:12:07,000 --> 00:12:10,000 तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र 234 00:12:10,000 --> 00:12:12,000 आणि लोकसंख्येचा विस्फोट. 235 00:12:12,000 --> 00:12:15,000 एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का? 236 00:12:15,000 --> 00:12:19,000 माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची. 237 00:12:19,000 --> 00:12:22,000 तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल. 238 00:12:22,000 --> 00:12:25,000 आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा) 239 00:12:25,000 --> 00:12:30,000 पण आता पदवीधर मुलं सहसा 240 00:12:30,000 --> 00:12:31,000 घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी, 241 00:12:31,000 --> 00:12:34,000 कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात, 242 00:12:34,000 --> 00:12:37,000 आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते. 243 00:12:37,000 --> 00:12:39,000 ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे. 244 00:12:39,000 --> 00:12:41,000 आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा 245 00:12:41,000 --> 00:12:43,000 आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल 246 00:12:43,000 --> 00:12:44,000 आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात. 247 00:12:44,000 --> 00:12:46,000 आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत. 248 00:12:46,000 --> 00:12:49,000 पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी 249 00:12:49,000 --> 00:12:51,000 आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो, 250 00:12:51,000 --> 00:12:54,000 आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो. 251 00:12:54,000 --> 00:12:57,000 आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो. 252 00:12:57,000 --> 00:12:59,000 दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते. 253 00:12:59,000 --> 00:13:02,000 जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं 254 00:13:02,000 --> 00:13:05,000 कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून, 255 00:13:05,000 --> 00:13:07,000 बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे. 256 00:13:07,000 --> 00:13:10,000 मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत. 257 00:13:10,000 --> 00:13:13,000 प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया 258 00:13:13,000 --> 00:13:15,000 नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची - 259 00:13:15,000 --> 00:13:18,000 बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून 260 00:13:18,000 --> 00:13:21,000 गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून. 261 00:13:21,000 --> 00:13:23,000 हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो, 262 00:13:23,000 --> 00:13:26,000 मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो 263 00:13:26,000 --> 00:13:28,000 कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो. 264 00:13:28,000 --> 00:13:30,000 कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं 265 00:13:30,000 --> 00:13:34,000 बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात. 266 00:13:34,000 --> 00:13:36,000 कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का? 267 00:13:36,000 --> 00:13:39,000 कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं. 268 00:13:39,000 --> 00:13:41,000 माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर - 269 00:13:41,000 --> 00:13:45,000 सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा) 270 00:13:45,000 --> 00:13:48,000 पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते - 271 00:13:48,000 --> 00:13:50,000 तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा, 272 00:13:50,000 --> 00:13:52,000 ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते, 273 00:13:52,000 --> 00:13:55,000 ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते, 274 00:13:55,000 --> 00:13:58,000 ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते. 275 00:13:58,000 --> 00:14:01,000 जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात, 276 00:14:01,000 --> 00:14:04,000 फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो. 277 00:14:04,000 --> 00:14:17,000 मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा) 278 00:14:17,000 --> 00:14:19,000 वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का, 279 00:14:19,000 --> 00:14:22,000 जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं, 280 00:14:22,000 --> 00:14:25,000 तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद? 281 00:14:25,000 --> 00:14:28,000 मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला 282 00:14:28,000 --> 00:14:31,000 दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही, 283 00:14:31,000 --> 00:14:40,000 तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा) 284 00:14:40,000 --> 00:14:42,000 आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे, 285 00:14:43,000 --> 00:14:45,000 ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय 286 00:14:45,000 --> 00:14:47,000 एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही 287 00:14:47,000 --> 00:14:49,000 लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला 288 00:14:49,000 --> 00:14:51,000 त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो. 289 00:14:51,000 --> 00:14:54,000 खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून 290 00:14:54,000 --> 00:14:56,000 एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी 291 00:14:56,000 --> 00:14:58,000 कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन, 292 00:14:58,000 --> 00:15:00,000 तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे 293 00:15:00,000 --> 00:15:02,000 आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे. 294 00:15:02,000 --> 00:15:04,000 तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.' 295 00:15:04,000 --> 00:15:08,000 ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो, 296 00:15:08,000 --> 00:15:10,000 तुम्ही पहातच आहात कसा. 297 00:15:10,000 --> 00:15:12,000 असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो, 298 00:15:12,000 --> 00:15:14,000 "जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली 299 00:15:14,000 --> 00:15:16,000 मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना, 300 00:15:16,000 --> 00:15:19,000 खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील, 301 00:15:19,000 --> 00:15:21,000 तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं 302 00:15:21,000 --> 00:15:23,000 जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती, 303 00:15:23,000 --> 00:15:25,000 ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील 304 00:15:25,000 --> 00:15:29,000 तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं, 305 00:15:29,000 --> 00:15:32,000 आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता. 306 00:15:32,000 --> 00:15:35,000 तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा) 307 00:15:35,000 --> 00:15:39,000 असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती. 308 00:15:39,000 --> 00:15:43,000 असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये, 309 00:15:43,000 --> 00:15:46,000 आपल्या आईबरोबर ती गेली, 310 00:15:46,000 --> 00:15:49,000 आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं, 311 00:15:49,000 --> 00:15:51,000 आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा 312 00:15:51,000 --> 00:15:53,000 हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व 313 00:15:53,000 --> 00:15:57,000 समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी - 314 00:15:57,000 --> 00:15:59,000 तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं, 315 00:15:59,000 --> 00:16:01,000 तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही, 316 00:16:01,000 --> 00:16:04,000 आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले 317 00:16:04,000 --> 00:16:06,000 जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन, 318 00:16:06,000 --> 00:16:08,000 मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं 319 00:16:08,000 --> 00:16:10,000 मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.” 320 00:16:10,000 --> 00:16:13,000 ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.” 321 00:16:13,000 --> 00:16:15,000 आणि ते तिला सोडून गेले. 322 00:16:15,000 --> 00:16:17,000 पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला 323 00:16:17,000 --> 00:16:19,000 त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते 324 00:16:19,000 --> 00:16:21,000 खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले, 325 00:16:21,000 --> 00:16:24,000 फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी 326 00:16:24,000 --> 00:16:28,000 ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली. 327 00:16:28,000 --> 00:16:30,000 आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं 328 00:16:30,000 --> 00:16:33,000 आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले, 329 00:16:33,000 --> 00:16:37,000 "मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे. 330 00:16:37,000 --> 00:16:39,000 तिला डान्सक्लासला घेऊन जा." 331 00:16:39,000 --> 00:16:41,000 मी म्हणालो, “मग काय झालं?” 332 00:16:41,000 --> 00:16:44,000 ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं. 333 00:16:44,000 --> 00:16:46,000 आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती 334 00:16:46,000 --> 00:16:49,000 माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक. 335 00:16:49,000 --> 00:16:52,000 असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.” 336 00:16:52,000 --> 00:16:54,000 ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते, 337 00:16:54,000 --> 00:16:56,000 ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते. 338 00:16:56,000 --> 00:16:59,000 पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली, 339 00:16:59,000 --> 00:17:01,000 ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली 340 00:17:01,000 --> 00:17:03,000 रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली 341 00:17:03,000 --> 00:17:05,000 रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि 342 00:17:05,000 --> 00:17:08,000 स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी - 343 00:17:08,000 --> 00:17:11,000 एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे 344 00:17:11,000 --> 00:17:13,000 काही सर्वात यशस्वी संगीत नाटक 345 00:17:13,000 --> 00:17:18,000 निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे, 346 00:17:18,000 --> 00:17:21,000 आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी 347 00:17:21,000 --> 00:17:25,000 तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं 348 00:17:25,000 --> 00:17:27,000 शांत रहायला. 349 00:17:27,000 --> 00:17:30,000 आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः 350 00:17:30,000 --> 00:17:32,000 परवा अल् गोअर बोलले 351 00:17:32,000 --> 00:17:35,000 पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल. 352 00:17:35,000 --> 00:17:39,000 माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा 353 00:17:39,000 --> 00:17:42,000 म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं, 354 00:17:42,000 --> 00:17:46,000 जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या 355 00:17:46,000 --> 00:17:48,000 मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत. 356 00:17:48,000 --> 00:17:52,000 आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी 357 00:17:52,000 --> 00:17:54,000 आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी. 358 00:17:54,000 --> 00:17:57,000 आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही. 359 00:17:57,000 --> 00:18:00,000 आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा 360 00:18:00,000 --> 00:18:02,000 ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत. 361 00:18:02,000 --> 00:18:06,000 जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक 362 00:18:06,000 --> 00:18:09,000 पृथ्वीवरुन नाहीसे झाले, 363 00:18:09,000 --> 00:18:12,000 तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. 364 00:18:12,000 --> 00:18:15,000 जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली, 365 00:18:15,000 --> 00:18:19,000 तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.” 366 00:18:19,000 --> 00:18:21,000 आणि त्याचं बरोबरच आहे. 367 00:18:21,000 --> 00:18:24,000 टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान. 368 00:18:24,000 --> 00:18:28,000 आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान 369 00:18:28,000 --> 00:18:31,000 सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु 370 00:18:31,000 --> 00:18:34,000 अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग 371 00:18:35,000 --> 00:18:38,000 ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून 372 00:18:38,000 --> 00:18:40,000 तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून 373 00:18:40,000 --> 00:18:43,000 आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट 374 00:18:43,000 --> 00:18:46,000 आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. 375 00:18:46,000 --> 00:18:49,000 तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही, 376 00:18:49,000 --> 00:18:52,000 पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं 377 00:18:52,000 --> 00:18:54,000 त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.