0:00:00.000,0:00:07.000 सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का? 0:00:07.000,0:00:11.000 मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे. 0:00:11.000,0:00:15.000 खरं तर, मी निघालोय. (हशा) 0:00:15.000,0:00:19.000 तीन विषय आहेत, नाही का, 0:00:19.000,0:00:23.000 या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत 0:00:23.000,0:00:25.000 मला जे सांगायचं आहे त्याच्याशी. 0:00:25.000,0:00:29.000 एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा 0:00:29.000,0:00:32.000 जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो 0:00:32.000,0:00:35.000 आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे 0:00:35.000,0:00:38.000 आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे 0:00:38.000,0:00:41.000 आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही, 0:00:41.000,0:00:43.000 भविष्याबाबत. काही कल्पना नाही 0:00:43.000,0:00:45.000 यातून काय घडेल. 0:00:45.000,0:00:48.000 मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे - 0:00:48.000,0:00:51.000 खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो. 0:00:51.000,0:00:53.000 नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं. 0:00:53.000,0:00:56.000 तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत 0:00:56.000,0:00:59.000 की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता - 0:00:59.000,0:01:06.000 खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल 0:01:06.000,0:01:09.000 (हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही. 0:01:09.000,0:01:14.000 आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे. 0:01:14.000,0:01:16.000 पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात, 0:01:16.000,0:01:18.000 म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?” 0:01:18.000,0:01:20.000 आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता, 0:01:20.000,0:01:24.000 तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही 0:01:24.000,0:01:30.000 बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा) 0:01:30.000,0:01:32.000 पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल, 0:01:32.000,0:01:34.000 ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे 0:01:34.000,0:01:37.000 ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना? 0:01:37.000,0:01:40.000 धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं. 0:01:40.000,0:01:44.000 मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे. 0:01:44.000,0:01:46.000 त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत, 0:01:46.000,0:01:49.000 काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे 0:01:49.000,0:01:52.000 जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे. 0:01:52.000,0:01:55.000 तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं 0:01:55.000,0:02:01.000 २०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही - 0:02:01.000,0:02:04.000 गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी - 0:02:04.000,0:02:06.000 की हे जग कसं असेल 0:02:06.000,0:02:08.000 पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे 0:02:08.000,0:02:11.000 त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते, 0:02:11.000,0:02:13.000 विलक्षण आहे. 0:02:13.000,0:02:15.000 आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की 0:02:15.000,0:02:20.000 आपण सर्वांनी मान्य केली आहे, 0:02:20.000,0:02:23.000 मुलांची खरोखर विलक्षण क्षमता - 0:02:23.000,0:02:25.000 त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली, 0:02:25.000,0:02:28.000 नाही का? काय काय करु शकली ती. 0:02:28.000,0:02:33.000 आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच, 0:02:33.000,0:02:36.000 की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे. 0:02:36.000,0:02:39.000 तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती 0:02:39.000,0:02:41.000 जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की, 0:02:41.000,0:02:43.000 सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात. 0:02:43.000,0:02:45.000 आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो. 0:02:45.000,0:02:48.000 म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि 0:02:48.000,0:02:51.000 मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की 0:02:51.000,0:02:54.000 आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये, 0:02:54.000,0:02:58.000 आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे. 0:02:58.000,0:03:06.000 (टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं. 0:03:06.000,0:03:10.000 खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून. 0:03:10.000,0:03:17.000 तर, माझा जन्म झाला... नको. (हशा) 0:03:17.000,0:03:21.000 नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो - 0:03:21.000,0:03:25.000 एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती 0:03:25.000,0:03:27.000 मागे, चित्र काढत बसली होती, 0:03:27.000,0:03:29.000 आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही 0:03:29.000,0:03:33.000 लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं. 0:03:33.000,0:03:35.000 त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली 0:03:35.000,0:03:38.000 आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?” 0:03:38.000,0:03:41.000 आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.” 0:03:41.000,0:03:44.000 ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.” 0:03:44.000,0:03:51.000 "मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली. 0:03:51.000,0:03:52.000 (हशा) 0:03:52.000,0:03:57.000 जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता - 0:03:57.000,0:04:00.000 खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा) 0:04:00.000,0:04:06.000 अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता. 0:04:06.000,0:04:08.000 त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता. 0:04:08.000,0:04:11.000 तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती. 0:04:11.000,0:04:14.000 एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता. 0:04:14.000,0:04:19.000 तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती, 0:04:19.000,0:04:22.000 ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. 0:04:22.000,0:04:24.000 हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती. 0:04:24.000,0:04:26.000 टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः 0:04:26.000,0:04:29.000 जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा) 0:04:29.000,0:04:31.000 त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश 0:04:31.000,0:04:34.000 जिथं ते तीन राजे येतात. 0:04:34.000,0:04:36.000 आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह. 0:04:36.000,0:04:38.000 हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो 0:04:38.000,0:04:40.000 आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला, 0:04:40.000,0:04:42.000 कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो, 0:04:42.000,0:04:44.000 "तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का? 0:04:44.000,0:04:46.000 ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.” 0:04:46.000,0:04:47.000 असो, तर ती तीन मुलं आली - 0:04:47.000,0:04:49.000 चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून - 0:04:49.000,0:04:52.000 आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली, 0:04:52.000,0:04:54.000 आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.” 0:04:54.000,0:04:57.000 आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.” 0:04:57.000,0:05:11.000 आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा) 0:05:11.000,0:05:13.000 या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात. 0:05:13.000,0:05:16.000 त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील. 0:05:16.000,0:05:19.000 बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही. 0:05:19.000,0:05:24.000 आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे. 0:05:24.000,0:05:25.000 आपल्याला हे माहितच आहे की, 0:05:25.000,0:05:28.000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर 0:05:28.000,0:05:31.000 तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही. 0:05:31.000,0:05:34.000 तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत 0:05:34.000,0:05:36.000 बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात. 0:05:36.000,0:05:39.000 त्यांना चुकण्याची दहशत बसते. 0:05:39.000,0:05:41.000 आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो. 0:05:41.000,0:05:44.000 आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो 0:05:44.000,0:05:47.000 राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं 0:05:47.000,0:05:50.000 चुका करणं सर्वात खराब समजलं जातं. 0:05:50.000,0:05:53.000 आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय 0:05:53.000,0:05:56.000 त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला. 0:05:56.000,0:05:59.000 तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात. 0:05:59.000,0:06:03.000 समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे, 0:06:03.000,0:06:05.000 की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही, 0:06:05.000,0:06:08.000 आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो. 0:06:08.000,0:06:10.000 तर हे असं का आहे? 0:06:10.000,0:06:14.000 सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो. 0:06:14.000,0:06:16.000 खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो. 0:06:16.000,0:06:20.000 यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते. 0:06:20.000,0:06:22.000 (हशा) खरं तर, 0:06:22.000,0:06:24.000 आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो. 0:06:24.000,0:06:26.000 स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं 0:06:26.000,0:06:31.000 शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं. 0:06:31.000,0:06:33.000 शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना? 0:06:33.000,0:06:35.000 बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती 0:06:35.000,0:06:37.000 की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना? 0:06:37.000,0:06:40.000 सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल 0:06:40.000,0:06:42.000 कधीतरी सात वर्षांचा. तो असणार 0:06:42.000,0:06:51.000 कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते? 0:06:51.000,0:07:05.000 (हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील, 0:07:05.000,0:07:08.000 शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,” 0:07:08.000,0:07:10.000 विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे. 0:07:10.000,0:07:18.000 आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.” 0:07:18.000,0:07:23.000 (हशा) 0:07:23.000,0:07:26.000 असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो, 0:07:26.000,0:07:30.000 आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे. 0:07:30.000,0:07:33.000 माझ्या मुलाला यायचं नव्हतं. 0:07:33.000,0:07:36.000 मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची. 0:07:36.000,0:07:38.000 त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं, 0:07:38.000,0:07:43.000 पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा. 0:07:43.000,0:07:45.000 तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता. 0:07:45.000,0:07:48.000 लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती, 0:07:48.000,0:07:52.000 कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं. 0:07:52.000,0:07:54.000 असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता, 0:07:54.000,0:07:56.000 आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.” 0:07:56.000,0:07:58.000 आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता, 0:07:58.000,0:08:10.000 कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं. 0:08:10.000,0:08:13.000 (हशा) 0:08:13.000,0:08:16.000 पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर 0:08:16.000,0:08:18.000 आणि जगभर प्रवास केल्यावरः 0:08:18.000,0:08:22.000 जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे. 0:08:22.000,0:08:24.000 प्रत्येक. कुठेही गेलात तरी. 0:08:24.000,0:08:26.000 तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही. 0:08:26.000,0:08:29.000 एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय, 0:08:29.000,0:08:31.000 मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय. 0:08:31.000,0:08:33.000 जगात सर्वत्र. 0:08:33.000,0:08:36.000 आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे, 0:08:36.000,0:08:38.000 कला विषयांमधील श्रेणीरचना. 0:08:38.000,0:08:40.000 कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून 0:08:40.000,0:08:43.000 नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही 0:08:43.000,0:08:45.000 जी दररोज मुलांना नृत्य शिकवते 0:08:45.000,0:08:48.000 जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का? 0:08:48.000,0:08:50.000 का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे. 0:08:50.000,0:08:53.000 माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील. 0:08:53.000,0:08:56.000 मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील. 0:08:56.000,0:08:59.000 आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का? 0:08:59.000,0:09:03.000 (हशा) खरंच, काय होतं तर, 0:09:03.000,0:09:05.000 मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो 0:09:05.000,0:09:08.000 कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो. 0:09:08.000,0:09:10.000 आणि थोडंसं एका बाजूला. 0:09:10.000,0:09:14.000 जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत 0:09:14.000,0:09:17.000 आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?” 0:09:17.000,0:09:19.000 माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता, 0:09:19.000,0:09:21.000 यातून नक्की कोणाला यश मिळतं, 0:09:21.000,0:09:23.000 प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं, 0:09:23.000,0:09:26.000 कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं - 0:09:26.000,0:09:29.000 मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश 0:09:29.000,0:09:30.000 जगभरातून 0:09:30.000,0:09:34.000 आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का? 0:09:34.000,0:09:36.000 हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे. 0:09:37.000,0:09:40.000 आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा) 0:09:40.000,0:09:44.000 आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का, 0:09:44.000,0:09:48.000 आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे. 0:09:48.000,0:09:50.000 तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे, 0:09:50.000,0:09:52.000 इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात, 0:09:52.000,0:09:54.000 आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय. 0:09:54.000,0:09:57.000 माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं - 0:09:57.000,0:10:00.000 सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो. 0:10:00.000,0:10:02.000 ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला. 0:10:02.000,0:10:06.000 आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात. 0:10:06.000,0:10:08.000 ते आपल्या शरीराला समजतात 0:10:08.000,0:10:17.000 आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का? 0:10:17.000,0:10:24.000 (हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं. 0:10:24.000,0:10:27.000 तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल, 0:10:27.000,0:10:30.000 तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा 0:10:30.000,0:10:32.000 ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या, 0:10:32.000,0:10:35.000 आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा. 0:10:35.000,0:10:39.000 (हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया 0:10:39.000,0:10:43.000 विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे, 0:10:43.000,0:10:47.000 हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील. 0:10:47.000,0:10:53.000 आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर. 0:10:53.000,0:10:56.000 आणि त्याला एक कारण आहे. 0:10:56.000,0:10:58.000 ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही 0:10:58.000,0:11:00.000 १९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच. 0:11:00.000,0:11:03.000 त्या सर्व बनवल्या गेल्या 0:11:03.000,0:11:04.000 औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी. 0:11:04.000,0:11:07.000 तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर. 0:11:07.000,0:11:11.000 पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय 0:11:11.000,0:11:13.000 असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल 0:11:13.000,0:11:15.000 तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून, 0:11:15.000,0:11:17.000 या सबबीवर की तुम्हाला 0:11:17.000,0:11:20.000 या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना? 0:11:20.000,0:11:22.000 संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस; 0:11:22.000,0:11:24.000 कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस. 0:11:25.000,0:11:29.000 हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग 0:11:29.000,0:11:30.000 एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे. 0:11:30.000,0:11:33.000 आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय 0:11:33.000,0:11:34.000 आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला, 0:11:34.000,0:11:37.000 कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून. 0:11:37.000,0:11:39.000 जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था 0:11:39.000,0:11:41.000 जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया 0:11:41.000,0:11:43.000 विद्यापीठीय प्रवेशाची. 0:11:43.000,0:11:46.000 आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान, 0:11:46.000,0:11:48.000 तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही, 0:11:48.000,0:11:50.000 कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते 0:11:50.000,0:11:54.000 त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या. 0:11:54.000,0:11:56.000 आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही. 0:11:56.000,0:11:58.000 येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, 0:11:58.000,0:12:01.000 जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील 0:12:01.000,0:12:03.000 शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा. 0:12:03.000,0:12:05.000 जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल 0:12:05.000,0:12:07.000 आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं - 0:12:07.000,0:12:10.000 तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र 0:12:10.000,0:12:12.000 आणि लोकसंख्येचा विस्फोट. 0:12:12.000,0:12:15.000 एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का? 0:12:15.000,0:12:19.000 माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची. 0:12:19.000,0:12:22.000 तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल. 0:12:22.000,0:12:25.000 आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा) 0:12:25.000,0:12:30.000 पण आता पदवीधर मुलं सहसा 0:12:30.000,0:12:31.000 घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी, 0:12:31.000,0:12:34.000 कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात, 0:12:34.000,0:12:37.000 आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते. 0:12:37.000,0:12:39.000 ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे. 0:12:39.000,0:12:41.000 आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा 0:12:41.000,0:12:43.000 आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल 0:12:43.000,0:12:44.000 आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात. 0:12:44.000,0:12:46.000 आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत. 0:12:46.000,0:12:49.000 पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी 0:12:49.000,0:12:51.000 आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो, 0:12:51.000,0:12:54.000 आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो. 0:12:54.000,0:12:57.000 आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो. 0:12:57.000,0:12:59.000 दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते. 0:12:59.000,0:13:02.000 जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं 0:13:02.000,0:13:05.000 कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून, 0:13:05.000,0:13:07.000 बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे. 0:13:07.000,0:13:10.000 मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत. 0:13:10.000,0:13:13.000 प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया 0:13:13.000,0:13:15.000 नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची - 0:13:15.000,0:13:18.000 बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून 0:13:18.000,0:13:21.000 गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून. 0:13:21.000,0:13:23.000 हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो, 0:13:23.000,0:13:26.000 मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो 0:13:26.000,0:13:28.000 कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो. 0:13:28.000,0:13:30.000 कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं 0:13:30.000,0:13:34.000 बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात. 0:13:34.000,0:13:36.000 कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का? 0:13:36.000,0:13:39.000 कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं. 0:13:39.000,0:13:41.000 माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर - 0:13:41.000,0:13:45.000 सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा) 0:13:45.000,0:13:48.000 पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते - 0:13:48.000,0:13:50.000 तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा, 0:13:50.000,0:13:52.000 ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते, 0:13:52.000,0:13:55.000 ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते, 0:13:55.000,0:13:58.000 ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते. 0:13:58.000,0:14:01.000 जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात, 0:14:01.000,0:14:04.000 फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो. 0:14:04.000,0:14:17.000 मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा) 0:14:17.000,0:14:19.000 वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का, 0:14:19.000,0:14:22.000 जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं, 0:14:22.000,0:14:25.000 तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद? 0:14:25.000,0:14:28.000 मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला 0:14:28.000,0:14:31.000 दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही, 0:14:31.000,0:14:40.000 तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा) 0:14:40.000,0:14:42.000 आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे, 0:14:43.000,0:14:45.000 ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय 0:14:45.000,0:14:47.000 एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही 0:14:47.000,0:14:49.000 लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला 0:14:49.000,0:14:51.000 त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो. 0:14:51.000,0:14:54.000 खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून 0:14:54.000,0:14:56.000 एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी 0:14:56.000,0:14:58.000 कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन, 0:14:58.000,0:15:00.000 तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे 0:15:00.000,0:15:02.000 आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे. 0:15:02.000,0:15:04.000 तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.' 0:15:04.000,0:15:08.000 ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो, 0:15:08.000,0:15:10.000 तुम्ही पहातच आहात कसा. 0:15:10.000,0:15:12.000 असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो, 0:15:12.000,0:15:14.000 "जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली 0:15:14.000,0:15:16.000 मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना, 0:15:16.000,0:15:19.000 खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील, 0:15:19.000,0:15:21.000 तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं 0:15:21.000,0:15:23.000 जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती, 0:15:23.000,0:15:25.000 ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील 0:15:25.000,0:15:29.000 तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं, 0:15:29.000,0:15:32.000 आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता. 0:15:32.000,0:15:35.000 तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा) 0:15:35.000,0:15:39.000 असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती. 0:15:39.000,0:15:43.000 असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये, 0:15:43.000,0:15:46.000 आपल्या आईबरोबर ती गेली, 0:15:46.000,0:15:49.000 आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं, 0:15:49.000,0:15:51.000 आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा 0:15:51.000,0:15:53.000 हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व 0:15:53.000,0:15:57.000 समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी - 0:15:57.000,0:15:59.000 तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं, 0:15:59.000,0:16:01.000 तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही, 0:16:01.000,0:16:04.000 आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले 0:16:04.000,0:16:06.000 जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन, 0:16:06.000,0:16:08.000 मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं 0:16:08.000,0:16:10.000 मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.” 0:16:10.000,0:16:13.000 ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.” 0:16:13.000,0:16:15.000 आणि ते तिला सोडून गेले. 0:16:15.000,0:16:17.000 पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला 0:16:17.000,0:16:19.000 त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते 0:16:19.000,0:16:21.000 खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले, 0:16:21.000,0:16:24.000 फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी 0:16:24.000,0:16:28.000 ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली. 0:16:28.000,0:16:30.000 आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं 0:16:30.000,0:16:33.000 आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले, 0:16:33.000,0:16:37.000 "मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे. 0:16:37.000,0:16:39.000 तिला डान्सक्लासला घेऊन जा." 0:16:39.000,0:16:41.000 मी म्हणालो, “मग काय झालं?” 0:16:41.000,0:16:44.000 ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं. 0:16:44.000,0:16:46.000 आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती 0:16:46.000,0:16:49.000 माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक. 0:16:49.000,0:16:52.000 असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.” 0:16:52.000,0:16:54.000 ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते, 0:16:54.000,0:16:56.000 ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते. 0:16:56.000,0:16:59.000 पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली, 0:16:59.000,0:17:01.000 ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली 0:17:01.000,0:17:03.000 रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली 0:17:03.000,0:17:05.000 रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि 0:17:05.000,0:17:08.000 स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी - 0:17:08.000,0:17:11.000 एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे 0:17:11.000,0:17:13.000 काही सर्वात यशस्वी संगीत नाटक 0:17:13.000,0:17:18.000 निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे, 0:17:18.000,0:17:21.000 आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी 0:17:21.000,0:17:25.000 तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं 0:17:25.000,0:17:27.000 शांत रहायला. 0:17:27.000,0:17:30.000 आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः 0:17:30.000,0:17:32.000 परवा अल् गोअर बोलले 0:17:32.000,0:17:35.000 पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल. 0:17:35.000,0:17:39.000 माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा 0:17:39.000,0:17:42.000 म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं, 0:17:42.000,0:17:46.000 जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या 0:17:46.000,0:17:48.000 मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत. 0:17:48.000,0:17:52.000 आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी 0:17:52.000,0:17:54.000 आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी. 0:17:54.000,0:17:57.000 आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही. 0:17:57.000,0:18:00.000 आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा 0:18:00.000,0:18:02.000 ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत. 0:18:02.000,0:18:06.000 जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक 0:18:06.000,0:18:09.000 पृथ्वीवरुन नाहीसे झाले, 0:18:09.000,0:18:12.000 तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल. 0:18:12.000,0:18:15.000 जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली, 0:18:15.000,0:18:19.000 तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.” 0:18:19.000,0:18:21.000 आणि त्याचं बरोबरच आहे. 0:18:21.000,0:18:24.000 टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान. 0:18:24.000,0:18:28.000 आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान 0:18:28.000,0:18:31.000 सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु 0:18:31.000,0:18:34.000 अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग 0:18:35.000,0:18:38.000 ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून 0:18:38.000,0:18:40.000 तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून 0:18:40.000,0:18:43.000 आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट 0:18:43.000,0:18:46.000 आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील. 0:18:46.000,0:18:49.000 तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही, 0:18:49.000,0:18:52.000 पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं 0:18:52.000,0:18:54.000 त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.