1 00:00:03,141 --> 00:00:05,676 मी आणि माझा जुळा भाऊ. आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. 2 00:00:06,461 --> 00:00:08,925 माझा हा भाऊ खूप प्रेमळ आहे. 3 00:00:09,477 --> 00:00:12,549 आपण जुळ्यांपैकी एक असलो, 4 00:00:12,573 --> 00:00:16,161 की पक्षपातीपणा चट्कन ओळखायला शिकतो. 5 00:00:16,642 --> 00:00:20,809 त्याला माझ्यापेक्षा जरासं मोठं बिस्कीट मिळालं, 6 00:00:21,723 --> 00:00:23,075 की माझे प्रश्न सुरु होत. 7 00:00:23,099 --> 00:00:25,517 तशी माझी काही उपासमार होत नव्हती, हे उघडच आहे. 8 00:00:26,300 --> 00:00:28,302 (हशा) 9 00:00:28,873 --> 00:00:32,996 मोठेपणी मानसशास्त्रज्ञ झाल्यावर एक वेगळा पक्षपातीपणा 10 00:00:33,020 --> 00:00:34,734 माझ्या लक्षात येऊ लागला. 11 00:00:34,758 --> 00:00:39,542 आणि तो म्हणजे, आपण मनापेक्षा शरीराला किती जास्त महत्त्व देतो. 12 00:00:40,187 --> 00:00:46,221 विद्यापीठात नऊ वर्षं परिश्रम करून मी मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवली. 13 00:00:46,245 --> 00:00:50,499 पण तुम्हांला काय सांगू, माझं कार्ड बघून कितीतरी लोक म्हणतात, 14 00:00:50,523 --> 00:00:54,843 अरे ! मानसशास्त्स्त्रज्ञ म्हणजे खरा डॉक्टर नाही.. 15 00:00:56,209 --> 00:00:58,007 म्हणजे कार्डावर तसं छापायला हवं का? 16 00:00:58,031 --> 00:01:00,816 डॉ. गाय विंच. नुसतेच मानसशास्त्रज्ञ. (खरे डॉक्टर नव्हेत.) 17 00:01:00,840 --> 00:01:02,442 (हशा) 18 00:01:02,952 --> 00:01:07,336 आपण शरीराच्या बाजूने पक्षपातीपणा करतो, 19 00:01:07,360 --> 00:01:08,799 हे मला सर्वत्र पाहायला मिळतं. 20 00:01:09,718 --> 00:01:11,385 मी एका मित्राच्या घरी गेलो होतो. 21 00:01:11,409 --> 00:01:13,931 त्यांचा ५ वर्षांचा मुलगा झोपण्यापूर्वी 22 00:01:13,955 --> 00:01:17,560 दात घासण्यासाठी सिंकजवळ स्टूलवर चढला. 23 00:01:17,584 --> 00:01:21,392 तो पाय घसरून पडला, आणि त्याला खरचटलं. 24 00:01:21,996 --> 00:01:24,968 तो मिनिटभर रडला, पण मग उठून 25 00:01:24,992 --> 00:01:28,506 परत स्टूलवर चढला, आणि जखमेवर लावायला 26 00:01:28,530 --> 00:01:30,294 त्याने बँडेड शोधून काढली. 27 00:01:31,050 --> 00:01:34,987 या मुलाला अजून बुटाची नाडीसुद्धा नीट बांधता येत नाही. 28 00:01:35,011 --> 00:01:39,438 पण त्याला ठाऊक आहे, की जखमेवर पट्टी लावली तर जंतुसंसर्ग होणार नाही. 29 00:01:39,462 --> 00:01:42,798 तसंच, दातांची काळजी घेण्यासाठी ते दिवसातून दोनदा घासायला हवेत. 30 00:01:43,425 --> 00:01:46,345 आरोग्याची आणि दातांची काळजी 31 00:01:46,369 --> 00:01:48,884 कशी घ्यावी,हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे, हो ना? 32 00:01:48,908 --> 00:01:51,697 अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून. 33 00:01:52,442 --> 00:01:57,066 पण मानसिक आरोग्याविषयी आपल्याला काय माहिती आहे? 34 00:01:58,070 --> 00:01:59,248 काहीही नाही. 35 00:01:59,778 --> 00:02:03,568 मानसिक आरोग्याविषयी आपण आपल्या मुलांना काय शिकवतो? 36 00:02:04,740 --> 00:02:05,945 काहीही नाही. 37 00:02:06,767 --> 00:02:11,215 जितका वेळ दातांची काळजी घेण्यात घालवतो, 38 00:02:11,595 --> 00:02:13,379 तितकाही आपण मनासाठी देत नाही. असं का? 39 00:02:14,202 --> 00:02:19,012 आपण आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्यापेक्षा 40 00:02:19,036 --> 00:02:20,705 जास्त महत्त्वाचं का मानतो? 41 00:02:21,393 --> 00:02:26,783 मनावरचे आघात शारीरिक जखमांपेक्षा जास्त टिकतात. 42 00:02:26,807 --> 00:02:31,013 उदाहरणार्थ, अपयश, अवहेलना, किंवा एकटेपणा. 43 00:02:31,037 --> 00:02:33,808 त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते वाढत जातात. 44 00:02:33,832 --> 00:02:36,722 आपल्या आयुष्यावर त्यांचा अकल्पित परिणाम होऊ शकतो. 45 00:02:37,285 --> 00:02:41,465 अशा प्रकारच्या मानसिक जखमांसाठी 46 00:02:41,489 --> 00:02:45,382 वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध केलेले उपचार उपलब्ध असूनही 47 00:02:45,803 --> 00:02:46,962 आपण ते वापरत नाही. 48 00:02:47,374 --> 00:02:49,915 तसे ते वापरावेत, असं आपल्याला सुचतसुद्धा नाही. 49 00:02:50,434 --> 00:02:54,491 "नैराश्य आलं आहे का? झटकून टाक ते. काहीतरी भरून घेतलं आहेस डोक्यात." 50 00:02:55,190 --> 00:02:58,067 कल्पना करा, एखाद्याचा पाय मोडला आहे. त्याला आपण सांगतो आहोत, 51 00:02:58,091 --> 00:03:00,677 "चल, झटक पाय, आणि चाल. काहीतरी भरून घेतलं आहेस पायात." 52 00:03:00,907 --> 00:03:02,852 (हशा) 53 00:03:03,249 --> 00:03:06,107 शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य 54 00:03:06,131 --> 00:03:09,219 यामधली दरी बुजवण्याची वेळ आली आहे. 55 00:03:09,243 --> 00:03:11,362 जुळ्या भावंडांप्रमाणे 56 00:03:12,385 --> 00:03:14,203 त्यांना समान लेखण्याची वेळ आली आहे. 57 00:03:15,148 --> 00:03:18,921 सांगायची गोष्ट म्हणजे, माझा भाऊ सुद्धा मानसशास्त्रज्ञ आहे. 58 00:03:18,945 --> 00:03:21,376 म्हणजे तोही खरा डॉक्टर नव्हेच. 59 00:03:21,400 --> 00:03:23,128 (हशा) 60 00:03:23,708 --> 00:03:25,680 पण आम्ही एकत्र शिक्षण घेतलं नाही. 61 00:03:25,704 --> 00:03:30,095 मानसशास्त्रातली डॉक्टरेट मिळवण्यासाठी मी अटलांटिक समुद्र ओलांडून 62 00:03:30,119 --> 00:03:32,865 न्यू यॉर्क शहरात गेलो. 63 00:03:32,889 --> 00:03:34,776 माझ्या आयुष्यातली सर्वात कठीण गोष्ट. 64 00:03:35,698 --> 00:03:38,661 त्यावेळी प्रथमच आमची ताटातूट झाली. 65 00:03:38,685 --> 00:03:41,970 आम्हांला दोघांनाही ती सहन झाली नाही. 66 00:03:42,295 --> 00:03:45,542 निदान तो घरी कुटुंब आणि मित्रांच्या सोबतीतच राहिला, 67 00:03:45,566 --> 00:03:47,623 पण मी तर एका नव्या देशात एकटा राहत होतो. 68 00:03:48,251 --> 00:03:49,971 आम्हांला एकमेकांची फार आठवण येई. 69 00:03:49,995 --> 00:03:53,148 त्यावेळी फोनवरून दुसऱ्या देशात बोलणं प्रचंड महाग होतं. 70 00:03:53,172 --> 00:03:57,601 आम्हांला आठवड्याला फक्त पाच मिनिटं बोलणं परवडत असे. 71 00:03:58,459 --> 00:03:59,985 त्या वर्षी प्रथमच 72 00:04:00,009 --> 00:04:02,561 आम्ही आमच्या वाढदिवसाला एकत्र नव्हतो. 73 00:04:02,585 --> 00:04:03,914 म्हणून आम्ही ठरवलं, 74 00:04:03,938 --> 00:04:06,104 या आठवड्यात चैन करू. १० मिनिटं बोलू. 75 00:04:06,128 --> 00:04:07,421 (हशा) 76 00:04:07,445 --> 00:04:11,509 सकाळभर मी खोलीत येरझारे घालत होतो. त्याचा फोन येण्याची वाट पाहत होतो. 77 00:04:12,154 --> 00:04:13,311 फार वाट पाहिली. 78 00:04:14,103 --> 00:04:15,280 फार वाट पाहिली. 79 00:04:15,817 --> 00:04:17,248 पण फोन आलाच नाही. 80 00:04:18,125 --> 00:04:20,143 दोन्ही देशांतल्या वेळांत फरक असल्यामुळे 81 00:04:20,167 --> 00:04:22,465 मला वाटलं, मित्रांबरोबर गेला असेल. करेल नंतर. 82 00:04:22,489 --> 00:04:23,997 त्या वेळी मोबाईल नव्हते. 83 00:04:24,805 --> 00:04:26,108 पण त्याचा फोन आलाच नाही. 84 00:04:27,171 --> 00:04:31,675 मग वाटलं, १० महिने दूर राहिल्यावर 85 00:04:32,253 --> 00:04:35,088 त्याला माझी तितकीशी आठवण येत नसावी. 86 00:04:36,028 --> 00:04:38,531 सकाळीच यायला हवा होता तो फोन रात्रीपर्यंत आला नाही. 87 00:04:38,555 --> 00:04:43,070 रात्र संपता संपेना. मी तळमळत होतो. 88 00:04:44,717 --> 00:04:46,586 दुसऱ्या दिवशी जाग आल्याबरोबर फोन दिसला, 89 00:04:46,688 --> 00:04:48,335 आणि माझ्या लक्षात आलं, की 90 00:04:48,359 --> 00:04:51,113 आदल्या दिवशी येरझारे घालताना माझ्याच लाथेने 91 00:04:51,137 --> 00:04:52,814 रिसिव्हर खाली पडला होता. 92 00:04:54,612 --> 00:04:56,263 मी धडपडत उठलो, 93 00:04:56,287 --> 00:04:59,500 आणि रिसिव्हर जागेवर ठेवला. पुढच्याच क्षणी फोन वाजला. 94 00:04:59,764 --> 00:05:01,424 हो, माझ्या भावाचाच. 95 00:05:01,448 --> 00:05:03,116 किती चिडला होता तो!= 96 00:05:03,140 --> 00:05:05,344 (हशा) 97 00:05:05,368 --> 00:05:08,618 त्यानेही ती रात्र तळमळत काढली होती. 98 00:05:09,126 --> 00:05:11,537 काय झालं, ते त्याला समजवायचा मी प्रयत्न केला. 99 00:05:11,561 --> 00:05:12,780 "मला हे समजत नाही, की 100 00:05:12,804 --> 00:05:14,719 माझा कॉल आला नाही, 101 00:05:14,743 --> 00:05:17,559 तर तू फोन उचलून मला का केला नाहीस?" 102 00:05:19,057 --> 00:05:20,237 बरोबरच होतं त्याचं. 103 00:05:20,841 --> 00:05:22,354 मी त्याला फोन का केला नाही? 104 00:05:23,187 --> 00:05:24,861 या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी नव्हे, 105 00:05:25,608 --> 00:05:27,059 पण आज मला मिळालं. 106 00:05:27,083 --> 00:05:28,404 आणि ते अगदी सोपं आहे. 107 00:05:29,688 --> 00:05:30,861 एकटेपणा. 108 00:05:31,948 --> 00:05:35,997 एकटेपणा मनावर खोल आघात करतो. 109 00:05:36,021 --> 00:05:39,721 त्यामुळे आकलनशक्ती विपरीत कार्य करते. विचारांचा गोंधळ उडतो. 110 00:05:40,228 --> 00:05:45,498 कोणालाच आपली पर्वा नाही, असं वाटतं. प्रत्यक्षात तसं नसलं, तरीही. 111 00:05:46,034 --> 00:05:48,328 इतरांशी संपर्क साधायची फार भीती वाटते. 112 00:05:48,352 --> 00:05:52,442 कारण, आपण नाकारले जाऊ, मग दुःख होईल. 113 00:05:52,466 --> 00:05:55,519 आधीच दुःख असह्य झालं आहे. आणखी नको. 114 00:05:56,432 --> 00:05:59,515 त्या काळात मला खरोखरच एकटेपणाने गिळून टाकलं होतं. 115 00:05:59,539 --> 00:06:03,408 पण दिवसभर माणसांच्यात वावरत असल्याने ते माझ्या लक्षात आलं नाही. 116 00:06:04,273 --> 00:06:07,892 एकटेपणाची व्याख्या माणसागणिक निराळी असते. 117 00:06:08,415 --> 00:06:14,179 आपल्याला इतरांपासून भावनिक किंवा सामाजिक दृष्ट्या तुटल्यासारखं वाटतं का, 118 00:06:14,203 --> 00:06:15,361 यावर ते अवलंबून आहे. 119 00:06:15,385 --> 00:06:16,542 मला तसं वाटत होतं. 120 00:06:17,249 --> 00:06:22,515 एकटेपणावर पुष्कळ संशोधन झालं आहे. ते फार भयंकर आहे. 121 00:06:23,499 --> 00:06:25,599 एकटेपणामुळे आयुष्य दुःखी होतं. 122 00:06:26,307 --> 00:06:27,457 मृत्यू ओढवू शकतो. 123 00:06:27,790 --> 00:06:28,960 ही थट्टा नव्हे. 124 00:06:28,984 --> 00:06:32,575 दीर्घकाळ एकटेपणा सहन केल्यामुळे अकाली मृत्यूचं प्रमाण 125 00:06:32,599 --> 00:06:34,495 १४ टक्क्यांनी वाढतं. 126 00:06:34,902 --> 00:06:36,267 १४ टक्के! 127 00:06:36,780 --> 00:06:39,595 एकटेपणामुळे रक्तदाब वाढतो. 128 00:06:39,619 --> 00:06:40,784 कोलेस्टेरॉल वाढतं. 129 00:06:40,808 --> 00:06:44,533 शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. 130 00:06:44,557 --> 00:06:48,589 त्यामुळे अनेक आजार आणि रोग होऊ शकतात. 131 00:06:48,613 --> 00:06:52,151 यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढलं आहे, 132 00:06:52,175 --> 00:06:55,831 की हे सर्व दुष्परिणाम लक्षात घेता, दीर्घकाळ एकटेपणा सहन करणं हे 133 00:06:55,855 --> 00:06:58,624 दीर्घायुष्य आणि आरोग्याला 134 00:06:58,648 --> 00:06:59,996 धूम्रपानाइतकंच हानिकारक आहे. 135 00:07:00,464 --> 00:07:04,571 सिगारेट्सच्या पाकिटावर निदान तसा इशारा दिलेला असतो. 136 00:07:05,033 --> 00:07:06,777 पण एकटेपणाचं तसं नाही. 137 00:07:07,405 --> 00:07:09,260 म्हणूनच आपण मानसिक आरोग्याला 138 00:07:09,284 --> 00:07:12,347 अग्रक्रम देऊन 139 00:07:12,371 --> 00:07:15,073 ते सांभाळलं पाहिजे. 140 00:07:15,525 --> 00:07:18,358 कारण मनाला जखम झाली आहे हे कळलंच नाही, 141 00:07:18,382 --> 00:07:20,401 तर तिच्यावर इलाज कसा करणार? 142 00:07:22,076 --> 00:07:24,920 आकलनशक्ती आणि विचार यांच्यावर परिणाम करणारी, 143 00:07:24,944 --> 00:07:27,833 एकटेपणा ही काही एकच मानसिक जखम नव्हे. 144 00:07:28,540 --> 00:07:30,803 अपयशामुळेही तसं होऊ शकतं. 145 00:07:31,818 --> 00:07:34,081 मी एका बालवाडीत गेलो असताना, 146 00:07:34,105 --> 00:07:38,592 तिथे तीन मुलं एकसारखी प्लास्टिकची खेळणी घेऊन खेळत होती. 147 00:07:39,140 --> 00:07:43,179 लाल बटण सरकवलं, की एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू बाहेर यायचं. 148 00:07:43,817 --> 00:07:48,388 एका मुलीने जांभळं बटण सरकवलं. 149 00:07:48,412 --> 00:07:51,206 पिल्लू आलं नाही, 150 00:07:51,230 --> 00:07:53,005 तेव्हा ती रडायच्या बेताला आली. 151 00:07:53,029 --> 00:07:56,080 दुसरा मुलगा 152 00:07:56,104 --> 00:07:59,939 नुसतं तिला पाहूनच रडू लागला. 153 00:08:01,141 --> 00:08:04,583 तिसऱ्या मुलीने सगळी बटणं सरकावून पाहिली. 154 00:08:04,607 --> 00:08:06,391 लाल बटण सरकावल्यावर पिल्लू बाहेर आलं, 155 00:08:06,415 --> 00:08:09,893 आणि ती आनंदाने ओरडू लागली. 156 00:08:10,421 --> 00:08:14,209 अपयशाला तोंड देण्याच्या 157 00:08:14,233 --> 00:08:17,344 तीन मुलांच्या या तीन तऱ्हा. 158 00:08:17,893 --> 00:08:21,788 पहिल्या दोन मुलांना लाल बटण सरकावणं सहज शक्य होतं. 159 00:08:22,455 --> 00:08:25,566 पण त्यांनी तसं केलं नाही. 160 00:08:25,590 --> 00:08:29,265 कारण, त्यांच्या मनाने त्यांची फसगत केली. त्यामुळे त्यांना ते अशक्य वाटलं. 161 00:08:29,920 --> 00:08:33,624 मोठ्या माणसांचीही अशी फसगत होत असते. 162 00:08:34,028 --> 00:08:39,181 प्रत्येक व्यक्तीच्या मनात, भावना आणि समज यांचे ठराविक साचे बनलेले असतात. 163 00:08:39,205 --> 00:08:43,300 अपयश किंवा निराशा पदरी आली, की आपण त्यानुसार वागतो. 164 00:08:43,324 --> 00:08:46,180 तुमचं मन अपयशाला कसा प्रतिसाद देतं, हे तुम्हांला ठाऊक आहे का? 165 00:08:46,783 --> 00:08:48,009 असायला हवं. 166 00:08:48,033 --> 00:08:52,406 कारण, जर तुमच्या मनाने तुम्हाला पटवलं, की हे काम तू करू शकणार नाहीस, 167 00:08:52,430 --> 00:08:53,939 आणि तुम्हांला ते पटलं, 168 00:08:53,963 --> 00:08:57,237 तर त्या दोन मुलांप्रमाणे तुम्ही स्वतःला असहाय मानू लागाल. 169 00:08:57,261 --> 00:09:00,520 मग तुम्ही लगेच प्रयत्न थांबवाल, किंवा मुळात प्रयत्न करणारच नाही. 170 00:09:00,859 --> 00:09:03,943 आणि मग तर तुमची खात्रीच पटेल, की आपण यशस्वी होऊच शकत नाही. 171 00:09:03,967 --> 00:09:08,561 यामुळेच कित्येक लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा पुष्कळ खालच्या दर्जाचं काम करतात. 172 00:09:08,951 --> 00:09:12,235 कारण, पूर्वीच्या एखाद्या अपयशाने त्यांना पटवलेलं असतं, 173 00:09:12,259 --> 00:09:15,687 की आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि ते त्यांना पटलेलं असतं. 174 00:09:16,900 --> 00:09:21,160 आपल्या मनाला एखादी गोष्ट पटली, की तो समज बदलणं फार कठीण असतं. 175 00:09:21,831 --> 00:09:25,674 हे एका कठीण प्रसंगातून मी शिकलो. त्या वेळी मी तरुण होतो, भावासोबत होतो. 176 00:09:26,031 --> 00:09:29,366 त्या रात्री आम्ही काही मित्रांसोबत मोटारीत बसून चाललो होतो. 177 00:09:29,390 --> 00:09:31,070 पोलिसांच्या गाडीने आम्हांला अडवलं. 178 00:09:31,094 --> 00:09:34,657 त्या भागात एक चोरी झाली होती, आणि ते चोरांना शोधत होते. 179 00:09:34,681 --> 00:09:38,425 एका पोलिसाने आमची गाडी चालवणाऱ्या मित्रावर विजेरीचा झोत टाकला. 180 00:09:38,839 --> 00:09:40,847 पुढच्या सीटवरच्या माझ्या भावावरही टाकला. 181 00:09:41,285 --> 00:09:42,451 त्यानंतर मागे, माझ्यावर. 182 00:09:42,475 --> 00:09:44,859 त्याचे डोळे विस्फारले. त्याने विचारलं, 183 00:09:45,283 --> 00:09:47,124 "तुला मी याआधी पाहिलं आहे. कुठे बरं ?" 184 00:09:47,148 --> 00:09:49,761 (हशा) 185 00:09:50,075 --> 00:09:51,226 मी म्हणालो, 186 00:09:51,683 --> 00:09:53,358 "पुढच्या सीटवर." 187 00:09:53,382 --> 00:09:55,869 (हशा) 188 00:09:56,405 --> 00:09:58,525 त्याला काहीही कळलं नाही. त्याला वाटलं, की 189 00:09:58,549 --> 00:10:00,488 मी ड्रग्ज घेतली असली पाहिजेत. 190 00:10:00,512 --> 00:10:02,072 (हशा) 191 00:10:02,096 --> 00:10:04,667 त्याने मला खेचून बाहेर काढलं. माझी झडती घेतली, 192 00:10:04,691 --> 00:10:06,518 आणि मला पोलिसांच्या गाडीजवळ नेलं. 193 00:10:06,542 --> 00:10:10,042 माझ्या नावाचं रेकॉर्ड तपासलं. 194 00:10:10,066 --> 00:10:13,576 एवढं सगळं झाल्यानंतरच पुढच्या सीटवरचा माझा जुळा भाऊ त्याला दिसला. 195 00:10:14,417 --> 00:10:16,189 तरीही मी निघालो, तेव्हा 196 00:10:16,213 --> 00:10:19,201 त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते, की "यात काहीतरी काळंबेरं आहे. 197 00:10:19,225 --> 00:10:21,269 मला फसवून निसटला आहेस तू." 198 00:10:21,293 --> 00:10:22,955 (हशा) 199 00:10:23,293 --> 00:10:26,645 मनात एखादा समज घट्ट झाला, की तो बदलणं फार कठीण असतं. 200 00:10:26,669 --> 00:10:30,109 अपयश आल्यावर खचून जाणं हे स्वाभाविक आहे. 201 00:10:30,133 --> 00:10:31,820 पण आपल्याला कधीच यश मिळणार नाही 202 00:10:31,844 --> 00:10:36,218 असा समज होऊ देता कामा नये. 203 00:10:36,242 --> 00:10:39,090 असहायतेच्या भावनांचा सामना केला पाहिजे 204 00:10:39,114 --> 00:10:42,369 परिस्थितीवर ताबा मिळवला पाहिजे. 205 00:10:42,393 --> 00:10:44,985 हे नकारात्मक चक्र सुरु होण्याअगोदरच 206 00:10:45,009 --> 00:10:46,228 थांबवलं पाहिजे. 207 00:10:46,252 --> 00:10:48,167 [भावनांना आवर घाला.] 208 00:10:48,191 --> 00:10:50,602 मन आणि भावना यांना 209 00:10:50,626 --> 00:10:53,967 आपण आपले विश्वासू मित्र मानतो, पण ते तसे नसतात. 210 00:10:53,991 --> 00:10:56,833 ते एखाद्या लहरी मित्रासारखे असतात. 211 00:10:56,857 --> 00:11:01,540 लहरीनुसार ते आपल्याला पाठिंबा देऊ शकतात, किंवा आपल्यावर उलटूही शकतात. 212 00:11:02,175 --> 00:11:05,858 माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका स्त्रीचं उदाहरण सांगतो. 213 00:11:05,882 --> 00:11:08,287 वीस वर्षांच्या संसारानंतर तिचा घटस्फोट झाला होता. 214 00:11:08,311 --> 00:11:10,548 त्यानंतर तिने आंतरजालावरून 215 00:11:10,572 --> 00:11:12,595 दुसरा जोडीदार शोधला, आणि भेट ठरवली. 216 00:11:12,619 --> 00:11:15,049 तिला तो अतिशय सुस्वभावी, यशस्वी वाटला. 217 00:11:15,073 --> 00:11:18,605 आपण त्याला खरोखर आवडलो आहोत, असंही वाटलं. 218 00:11:18,629 --> 00:11:21,387 आनंदाने तिने नवा ड्रेस खरेदी केला, 219 00:11:21,411 --> 00:11:25,002 आणि न्यू यॉर्क मधल्या एका महागड्या बार मध्ये भेट ठरवली. 220 00:11:25,667 --> 00:11:29,447 दहाव्या मिनिटाला तो उठून उभा राहिला. "आपलं जमेलसं वाटत नाही." म्हणाला, 221 00:11:29,471 --> 00:11:31,330 आणि निघून गेला. 222 00:11:33,798 --> 00:11:36,913 कोणी आपल्याला नाकारणं फार दुःखदायक असतं. 223 00:11:37,500 --> 00:11:39,646 ती हादरून गेली. तिला जागचं हलता येईना. 224 00:11:40,037 --> 00:11:41,801 कसाबसा तिने मैत्रिणीला फोन केला. 225 00:11:42,198 --> 00:11:46,388 मैत्रीण म्हणाली, "मग? तुझी काय अपेक्षा होती? 226 00:11:46,816 --> 00:11:50,088 तुझं वजन किती वाढलं आहे पहा. तुला काही छानसं बोलताही येत नाही. 227 00:11:50,493 --> 00:11:53,027 एखादा देखणा, यशस्वी पुरुष 228 00:11:53,051 --> 00:11:55,259 तुझ्यासारख्या नालायक बाईला कसा स्वीकारेल?" 229 00:11:57,092 --> 00:12:00,103 धक्का बसला ना? मैत्रीण इतकी निर्दयपणे कशी बोलू शकते? 230 00:12:00,531 --> 00:12:03,133 पण मी जर सांगितलं, की हे त्या मैत्रिणीने म्हटलं नसून, 231 00:12:03,157 --> 00:12:05,623 त्या स्त्रीने स्वतःच म्हटलं होतं, 232 00:12:05,957 --> 00:12:07,976 तर तुम्हांला तितकासा धक्का बसणार नाही. 233 00:12:08,893 --> 00:12:10,714 आपण सगळे हे असंच करतो. 234 00:12:11,334 --> 00:12:13,227 खास करून नकार मिळाल्यावर. 235 00:12:13,251 --> 00:12:16,696 आपण आपल्यामधल्या दोष आणि कमतरतांचा विचार करू लागतो. 236 00:12:16,720 --> 00:12:18,886 आपण असे असायला हवे होतो, तसे नसायला हवे होतो.. 237 00:12:18,910 --> 00:12:20,265 स्वतःला नावं ठेवतो. 238 00:12:20,289 --> 00:12:22,775 फार निर्दयीपणे नसेल, पण आपण सगळे असं करतो. 239 00:12:23,274 --> 00:12:24,896 खरं तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. 240 00:12:24,920 --> 00:12:27,783 कारण नकारामुळे आधीच आपला आत्मसन्मान दुखावलेला असतो. 241 00:12:28,189 --> 00:12:30,761 तरीही आपण स्वतःला आणखी का दुखावतो? 242 00:12:31,236 --> 00:12:33,858 शरीराची जखम आपण मुद्दामहून आणखी दुखापत करून वाढवत नाही. 243 00:12:33,882 --> 00:12:36,784 हाताला जखम झाली, तर आपण असं नाही म्हणणार, 244 00:12:36,808 --> 00:12:40,344 "अरे वा! आता सुरीने आणखी कापून बघू, किती खोल कापता येतं ते!" 245 00:12:40,368 --> 00:12:43,949 पण मानसिक जखमा झाल्यावर बरेच वेळा आपण तसं करतो. 246 00:12:43,973 --> 00:12:47,068 का? कारण मानसिक आरोग्याची हेळसांड. 247 00:12:47,442 --> 00:12:50,140 मानसिक आरोग्याला अग्रक्रम न देणं. 248 00:12:50,862 --> 00:12:54,422 डझनावारी संशोधनांनी दाखवून दिलं आहे, की जेव्हा आत्मसन्मान ढासळतो, तेव्हा 249 00:12:54,446 --> 00:12:57,907 ताणतणाव आणि चिंताविकार यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढतं. 250 00:12:57,931 --> 00:13:00,605 अपयशामुळे, नाकारलं जाण्यामुळे जास्त दुःख होतं. 251 00:13:00,629 --> 00:13:02,912 आणि त्यातून बाहेर पडायला जास्त वेळ लागतो. 252 00:13:03,507 --> 00:13:06,759 म्हणून, नाकारलं गेल्यावर प्रथम काय करायला हवं? 253 00:13:06,783 --> 00:13:08,844 आत्मसन्मान बळकट करायला हवा. 254 00:13:08,868 --> 00:13:11,827 खलनायक बनून त्याच्यावर आणखी वार अजिबात करायचे नाहीत. 255 00:13:13,180 --> 00:13:14,936 मनाला दुखापत झाली असेल, 256 00:13:15,459 --> 00:13:18,497 तर स्वतःशी दयाळूपणे वागा. 257 00:13:18,521 --> 00:13:21,154 जवळच्या मित्राने तुमच्याशी जसं वागावंसं वाटत असेल, तसंच. 258 00:13:21,361 --> 00:13:23,249 [आत्मसन्मानाचं रक्षण करा.] 259 00:13:23,273 --> 00:13:27,574 मानसिक आरोग्याला विघातक ठरणाऱ्या सवयी ओळखून त्या बदलायला हव्यात. 260 00:13:27,598 --> 00:13:31,816 यापैकी सर्वत्र आढळणारी एक वाईट सवय म्हणजे रवंथ करणे. 261 00:13:32,228 --> 00:13:34,728 म्हणजे तेच तेच विचार पुन्हा पुन्हा मनात घोळवणे. 262 00:13:34,752 --> 00:13:36,941 नोकरीत वरिष्ठ आपल्यावर ओरडले असतील, 263 00:13:36,965 --> 00:13:39,586 किंवा शिक्षकांनी वर्गात सर्वांसमोर अपमान केला असेल 264 00:13:39,610 --> 00:13:41,859 किंवा मित्राशी मोठं भांडण झालं असेल, 265 00:13:41,883 --> 00:13:45,944 तर तो प्रसंग अनेक दिवस सतत डोक्यात घोळत राहतो. 266 00:13:45,968 --> 00:13:48,357 काही वेळा यात आठवडे निघून जातात. 267 00:13:48,494 --> 00:13:53,493 त्रासदायक घटनांबद्दल रवंथ करण्याची सवय सहज लागू शकते. 268 00:13:53,517 --> 00:13:54,966 तिची मोठी किंमत मोजावी लागते. 269 00:13:55,431 --> 00:14:00,151 कारण नकारार्थी विचार करण्यात इतका वेळ घालवण्यामुळे 270 00:14:00,175 --> 00:14:03,124 अनेक विकार जडण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, 271 00:14:03,148 --> 00:14:04,885 नैराश्य, 272 00:14:05,370 --> 00:14:06,636 दारूचं व्यसन, 273 00:14:06,660 --> 00:14:07,822 अन्नासंबंधी विकार, आणि 274 00:14:07,846 --> 00:14:09,952 हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार. 275 00:14:10,682 --> 00:14:11,874 यातली समस्या अशी आहे, की 276 00:14:11,898 --> 00:14:15,839 विचारांचा रवंथ करण्याची इच्छा प्रबळपणे आणि फार महत्त्वाची वाटू शकते. 277 00:14:15,863 --> 00:14:17,946 त्यामुळे ही सवय मोडणं अतिशय कठीण जातं. 278 00:14:18,804 --> 00:14:20,427 हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. 279 00:14:20,451 --> 00:14:23,987 कारण, साधारण वर्षभरापूर्वी मला स्वतःला ही सवय लागली होती. 280 00:14:24,540 --> 00:14:30,101 माझ्या जुळ्या भावाला कॅन्सरचं निदान झालं होतं. 281 00:14:30,965 --> 00:14:33,109 त्याचा कॅन्सर अतिशय आक्रमक स्वरूपाचा होता. 282 00:14:33,133 --> 00:14:36,199 त्याच्या शरीरावर सगळीकडे सहज दिसतील अशी गळवं आली होती. 283 00:14:36,904 --> 00:14:40,260 त्याला तातडीने जोरदार केमोथेरपी सुरु करणं गरजेचं होतं. 284 00:14:41,627 --> 00:14:45,677 मला सतत वाटत राहिलं, त्याला काय सहन करावं लागत असेल, 285 00:14:46,586 --> 00:14:49,306 त्याला किती त्रास होत असेल. 286 00:14:50,322 --> 00:14:53,591 खरं तर त्याने मुळीच तक्रार केली नव्हती. एकदाही नाही. 287 00:14:54,070 --> 00:14:56,997 त्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक होता. 288 00:14:57,021 --> 00:14:59,508 त्याची मानसिक ताकद अफाट होती. 289 00:15:00,212 --> 00:15:04,327 मी शरीराने सुदृढ असलो, तरी माझं मन दुबळं होतं. 290 00:15:05,303 --> 00:15:06,544 पण मला उपाय ठाऊक होता. 291 00:15:06,568 --> 00:15:11,219 संशोधन सांगतं, की विचारांचा रवंथ करण्याची तीव्र इच्छा मोडायला 292 00:15:11,243 --> 00:15:13,697 दोन मिनिटांचा व्यत्यय देखील पुरेसा होतो. 293 00:15:14,110 --> 00:15:17,758 त्यामुळे दर वेळी नकारात्मक, त्रासदायक, किंवा चिंतादायक विचार मनात आला, 294 00:15:17,782 --> 00:15:22,137 की मी दुसरीकडे लक्ष वळवत होतो. ती इच्छा नष्ट होईपर्यंत. 295 00:15:22,161 --> 00:15:26,626 एका आठवड्यात माझा दृष्टिकोन बदलून 296 00:15:26,650 --> 00:15:29,378 मी जास्त सकारात्मक आणि आशावादी झालो. 297 00:15:29,509 --> 00:15:31,243 [नकारात्मक विचारांचा सामना करा.] 298 00:15:31,267 --> 00:15:35,710 केमोथेरपीनंतर ९ आठवडयांनी माझ्या भावाचा कॅट स्कॅन करण्यात आला. 299 00:15:36,167 --> 00:15:38,524 त्याचा निकाल आला तेव्हा मी त्याच्या जवळ होतो. 300 00:15:39,125 --> 00:15:40,964 त्याची सर्व गळवं नाहीशी झाली होती. 301 00:15:42,297 --> 00:15:45,271 त्याला आणखी तीन वेळा केमोथेरपी करावी लागणार होती. 302 00:15:45,295 --> 00:15:46,875 पण तो बरा होणार होता, हे निश्चित. 303 00:15:47,659 --> 00:15:50,518 हा दोन आठवड्यांपूर्वीचा फोटो. 304 00:15:53,807 --> 00:15:56,312 एकटेपणा घालवण्यासाठी कृती केल्यामुळे, 305 00:15:56,978 --> 00:15:59,698 अपयशाला निराळा प्रतिसाद दिल्यामुळे, 306 00:16:00,225 --> 00:16:02,621 आपला आत्मसन्मान बळकट केल्यामुळे, आणि 307 00:16:02,645 --> 00:16:04,927 नकारात्मक विचारांचा सामना केल्यामुळे 308 00:16:04,951 --> 00:16:08,180 मानसिक जखमा भरून येतात, इतकंच नव्हे, तर 309 00:16:08,204 --> 00:16:10,763 मानसिक लवचिकता वाढते, 310 00:16:10,787 --> 00:16:12,015 आपण भरभरून जगू शकतो. 311 00:16:12,664 --> 00:16:16,700 शंभरेक वर्षांपूर्वी शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याची सुरुवात झाली, 312 00:16:17,267 --> 00:16:21,518 आणि काही दशकांतच 313 00:16:21,542 --> 00:16:23,260 मृत्यूदर ५० टक्क्यांनी खाली आला. 314 00:16:23,947 --> 00:16:28,036 मला वाटतं, आपण सर्वानी मानसिक आरोग्याची काळजी घेणं सुरु केलं, 315 00:16:28,060 --> 00:16:31,369 तर आपल्या आयुष्याचा स्तर असाच वेगाने उंचावेल. 316 00:16:32,194 --> 00:16:34,257 तुम्हांला कल्पना करता येते का? 317 00:16:34,281 --> 00:16:36,817 सर्वांचं मानसिक आरोग्य सुधारलं, तर ते जग कसं असेल? 318 00:16:36,841 --> 00:16:39,762 एकटेपणा कमी झाला, नैराश्य कमी झालं, तर? 319 00:16:40,240 --> 00:16:42,807 लोक अपयशावर मात करायला शिकले, तर? 320 00:16:43,224 --> 00:16:46,489 त्यांचा आत्मसन्मान वाढून, आपण सक्षम आहोत असं त्यांना वाटू लागलं तर? 321 00:16:46,513 --> 00:16:48,914 त्यांना जास्त आनंद आणि समाधान वाटू लागलं, तर? 322 00:16:49,760 --> 00:16:53,037 मी अशी कल्पना करू शकतो. कारण मला अशा जगात राहायचं आहे. 323 00:16:54,021 --> 00:16:57,707 माझ्या भावालाही अशा जगात राहायचं आहे. 324 00:16:58,371 --> 00:17:03,271 आपण सर्वांनी या माहितीचा वापर करून काही साध्या सवयींमध्ये बदल केले, 325 00:17:04,001 --> 00:17:06,358 तर आपण सगळे अशा जगात राहू शकू. 326 00:17:07,373 --> 00:17:08,539 खूप खूप धन्यवाद. 327 00:17:08,563 --> 00:17:11,167 (टाळ्या)