आम्ही युनिव्हर्सल सबटायटल्स सुरु केली कारण आमचा विश्वास आहे की, वेब वरील प्रत्येक व्हिडिओ हा सबटायटल-करण्यायोग्य आहे. लाखो बहिऱ्या(श्रवणदोष असणाऱ्या) आणि ऐकू कमी येणाऱ्या लोकांना व्हिडीओ पर्यंत पोचण्यासाठी सबटायटल्स ची आवश्यकता आहे. चित्रफीत(व्हिडीओ)कर्ते आणि संकेतस्थळे(वेबसाईटस्) यांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. सबटायटल्स त्यांना विस्तृत प्रेक्षकांपर्यंत पोचवतात आणि शोधांत(search) सुद्धा त्यांना चांगले अनुक्रमांक(Rankings) मिळतात. युनिव्हर्सल सबटायटल्स जवळजवळ कोणत्याही व्हिडीओला सबटायटल्स जोडणे अतिशय सोपे करते. वेब वर असलेला एखादा व्हिडीओ घ्या, त्याची URL आमच्या संकेतस्थळावर सादर (submit) करा. आणि मग सबटायटल्स तयार करण्यासाठी संवादानुसार टंकलेखित(टाईप) करा. त्यानंतर ती व्हिडीओला संलग्न करण्यासाठी कीबोर्डवर हलकेच बटन दाबा. झालं-आम्ही तुम्हाला त्या व्हिडीओसाठी एक संलग्न संकेत(कोड) देतो जो तुम्ही कोणत्याही संकेतस्थळावर टाकू शकता. त्या वेळी, प्रेक्षक ती सबटायटल्स वापरू शकतात आणि भाषांतरात सहयोगही देऊ शकतात. आम्ही यूट्यूब, ब्लीप, टीव्ही, यूस्ट्रीम यांवरच्याआणि इतर अनेक व्हिडिओज् ना सहकार्य करतो. शिवाय आम्ही नेहमीच इतर सेवासुद्धा पुरवत असतो. युनिव्हर्सल सबटायटल्स अनेक प्रसिद्ध व्हिडिओ प्रकारांबरोबर काम करते. जसे की, एमपी-४, थिओरा, वेबएम आणि एचटीएमएल -५ च्या पुढे वेब वरील प्रत्येक व्हिडीओसाठी आमचं ध्येय म्हणजे तो सबटायटल करण्याजोगा असणं त्यामुळे, कोणीही ज्याला त्या व्हिडिओबद्दल काळजी आहे तो, तो व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करू शकेल.