WEBVTT 00:00:00.673 --> 00:00:03.055 दृष्टी हे आपले सर्वात महत्त्वाचे 00:00:03.055 --> 00:00:05.643 आणि प्राथमिक इंद्रिय आहे. 00:00:05.643 --> 00:00:07.327 आपण आपल्या भोवतालचं जग 00:00:07.327 --> 00:00:09.101 सतत बघत असतो 00:00:09.101 --> 00:00:11.298 आणि आपण काय पाहिलं हे तात्काळ ओळखून 00:00:11.298 --> 00:00:13.633 त्याचा अर्थ लावत असतो. NOTE Paragraph 00:00:13.633 --> 00:00:15.552 प्रथम आपण याच गोष्टीचं एक उदाहरण घेऊ. 00:00:15.552 --> 00:00:16.825 मी तुम्हाला एका व्यक्तीचं 00:00:16.825 --> 00:00:18.835 छायाचित्र दाखवणार आहे. 00:00:18.835 --> 00:00:20.638 फक्त एक किंवा दोन सेकंदापुरतंच. 00:00:20.638 --> 00:00:22.533 आणि त्याचा चेहरा कोणती भावना दाखवतो 00:00:22.533 --> 00:00:24.672 ते तुम्ही ओळखायचं. 00:00:24.672 --> 00:00:25.900 तय्यार? 00:00:25.900 --> 00:00:28.612 हे बघा. अंत: स्फूर्तीने सांगा. 00:00:28.612 --> 00:00:30.943 काय पाहिलंत तुम्ही? 00:00:30.943 --> 00:00:33.207 तर आम्ही प्रत्यक्षात 00:00:33.207 --> 00:00:35.514 १२० जणांची पाहणी केली. 00:00:35.514 --> 00:00:37.464 आणि आम्हाला मिश्र निष्कर्ष मिळाले. 00:00:37.464 --> 00:00:39.731 या चेहऱ्यावर लोकांनी कोणती भावना पाहिली 00:00:39.731 --> 00:00:42.621 त्याबद्दल त्यांचं एकमत नव्हतं. 00:00:42.621 --> 00:00:44.426 कदाचित तुम्ही अस्वस्थता पाहिली असेल. 00:00:44.426 --> 00:00:46.415 हेच उत्तर आम्हाला 00:00:46.415 --> 00:00:47.670 बहुतेक वेळा मिळालं. 00:00:47.670 --> 00:00:49.759 पण तुमच्या डावीकडची व्यक्ती म्हणू शकते, 00:00:49.759 --> 00:00:52.500 की मी खेद किंवा अविश्वास पाहिला. 00:00:52.500 --> 00:00:54.429 आणि तुमच्या उजवीकडचं कोणीतरी 00:00:54.429 --> 00:00:57.323 आणखी काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगू शकते. 00:00:57.323 --> 00:01:00.143 आशा किंवा समानुभूती, असं काहीतरी. 00:01:00.143 --> 00:01:01.702 परत बघा, आपण सगळे 00:01:01.702 --> 00:01:04.804 याच चेहऱ्याकडे बघत आहोत. 00:01:04.804 --> 00:01:06.232 आपण काहीतरी 00:01:06.232 --> 00:01:08.615 पूर्णपणे वेगळंच बघू शकतो. 00:01:08.615 --> 00:01:11.679 कारण, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. 00:01:11.679 --> 00:01:13.847 आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं, 00:01:13.847 --> 00:01:15.289 ती खरंतर आपल्या स्वतःच्या 00:01:15.289 --> 00:01:17.693 मनातली प्रतिमा असते. NOTE Paragraph 00:01:17.693 --> 00:01:19.946 अर्थात, अशी अनेक उदाहरणं आहेत. 00:01:19.946 --> 00:01:22.361 आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग कसं पाहतो, त्याची. 00:01:22.361 --> 00:01:24.143 मी त्यातली काही सांगणार आहे. 00:01:24.143 --> 00:01:26.803 उदाहरणार्थ, डाएट करणारे लोक. 00:01:26.803 --> 00:01:28.821 यांना सफरचंदं मोठी दिसतात, 00:01:28.821 --> 00:01:31.841 कॅलरीज न मोजणाऱ्या लोकांना दिसतात, त्याहून मोठी. 00:01:31.841 --> 00:01:35.474 मंदीतून बाहेर येणाऱ्या 00:01:35.474 --> 00:01:37.629 सॉफ्टबॉल खेळाडूंना बॉल छोटा दिसतो, 00:01:37.629 --> 00:01:41.173 यशस्वी काळात दिसतो त्याहून छोटा. 00:01:41.173 --> 00:01:44.123 खरं तर, आपल्याला इतर लोक कसे दिसतात, 00:01:44.123 --> 00:01:46.365 अगदी राजकारणीसुध्दा, 00:01:46.365 --> 00:01:48.538 हे आपल्या राजकीय कल्पना ठरवतात. 00:01:48.538 --> 00:01:52.231 तर, मी आणि माझ्या संशोधन गटाने हा प्रश्न विचारात घ्यायचे ठरवले. 00:01:52.231 --> 00:01:55.862 २००८ साली बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढत होते 00:01:55.862 --> 00:01:57.261 अगदी पहिल्या वेळी, 00:01:57.261 --> 00:02:00.243 आणि निवडणुकीच्या एक महिना आधी 00:02:00.243 --> 00:02:02.466 आम्ही शेकडो अमेरिकन लोकांची पाहणी केली. 00:02:02.466 --> 00:02:04.165 या पाहणीत आम्हाला आढळून आलं, की 00:02:04.165 --> 00:02:06.451 काही लोकांना, अमेरिकन लोकांना, वाटत होतं, 00:02:06.451 --> 00:02:08.147 ओबामा या छायाचित्रांत जसे दिसतात, 00:02:08.147 --> 00:02:11.139 तसेच ते प्रत्यक्षात आहेत. 00:02:11.139 --> 00:02:13.761 या लोकांपैकी ७५ टक्के लोकांनी 00:02:13.761 --> 00:02:16.628 खऱ्या निवडणुकीत ओबामांना मत दिलं. 00:02:16.628 --> 00:02:19.796 काही इतर लोकांना मात्र, ओबामा या छायाचित्रांत दिसतात 00:02:19.796 --> 00:02:22.085 तसेच आहेत, असं वाटत होतं. 00:02:22.085 --> 00:02:24.061 या लोकांपैकी ८९ टक्के लोकांनी 00:02:24.061 --> 00:02:25.882 मककीन यांना मत दिलं. 00:02:25.882 --> 00:02:29.388 आम्ही ओबामांची बरीच छायाचित्रं लोकांना दाखवली. 00:02:29.388 --> 00:02:30.985 पण एका वेळी एकच दाखवलं. 00:02:30.985 --> 00:02:33.884 त्यामुळे या छायाचित्रांमध्ये आम्ही काय बदल करत होतो, 00:02:33.884 --> 00:02:35.737 हे लोकांना समजलं नाही. 00:02:35.737 --> 00:02:37.793 आम्ही कृत्रिमरीत्या त्यांची रंगकांती बदलून 00:02:37.793 --> 00:02:40.341 ती फिकट किंवा गडद करीत होतो. NOTE Paragraph 00:02:40.341 --> 00:02:41.901 हे कसं शक्य आहे? 00:02:41.901 --> 00:02:44.736 मी जेव्हा एखादी व्यक्ती, वस्तू, किंवा घटना पाहते, त्यावेळी 00:02:44.736 --> 00:02:46.457 दुसऱ्या कोणाला दिसतं, त्याहून 00:02:46.457 --> 00:02:48.432 मला काहीतरी पूर्णपणे वेगळंच दिसतं. 00:02:48.432 --> 00:02:50.261 हे कसं घडू शकतं? 00:02:50.261 --> 00:02:52.551 तशी कारणं तर पुष्कळ आहेत. 00:02:52.551 --> 00:02:54.802 पण त्यातल्या एका कारणासाठी 00:02:54.802 --> 00:02:57.355 डोळ्यांचं कार्य जास्त समजावून घेतलं पाहिजे. 00:02:57.355 --> 00:02:59.364 तर दृष्टी वैज्ञानिक जाणतात, की 00:02:59.364 --> 00:03:00.847 खरंतर एका क्षणात पाहून 00:03:00.847 --> 00:03:02.718 आपल्याला मिळणारी 00:03:02.718 --> 00:03:04.557 एकंदरीत माहिती 00:03:04.557 --> 00:03:07.254 तशी फारच थोडकी असते. 00:03:07.254 --> 00:03:09.983 जे आपण अगदी सूक्ष्म, 00:03:09.983 --> 00:03:12.160 स्वच्छ, आणि अचूक पाहू शकतो, 00:03:12.160 --> 00:03:14.147 ते केवळ आपल्या लांब धरलेल्या 00:03:14.147 --> 00:03:16.323 हाताच्या अंगठ्याच्या 00:03:16.323 --> 00:03:18.618 पृष्ठफळाइतकंच असतं. 00:03:18.618 --> 00:03:20.757 त्याभोवतीचं सगळं अंधुक असतं, 00:03:20.757 --> 00:03:23.198 त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आलेल्यापैकी 00:03:23.198 --> 00:03:25.842 बरंचसं संदिग्ध जाणवतं. 00:03:25.842 --> 00:03:28.116 पण आपल्याला, आपण काय पाहिलं ते स्पष्ट करून घेऊन 00:03:28.116 --> 00:03:30.364 त्याचा अर्थ लावावा लागतो. 00:03:30.364 --> 00:03:33.749 आणि आपलं मन या गाळलेल्या जागा भरून काढायला मदत करतं. 00:03:33.749 --> 00:03:37.318 यामुळेच, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. 00:03:37.318 --> 00:03:38.777 आणि अशा प्रकारे आपण जे पाहतो 00:03:38.777 --> 00:03:41.005 ते आपल्या मनातलं चित्र असतं. NOTE Paragraph 00:03:41.005 --> 00:03:42.818 तर, मी एक सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे, 00:03:42.818 --> 00:03:44.335 आणि हे असे प्रश्न 00:03:44.335 --> 00:03:46.048 माझं लक्ष वेधून घेतात. 00:03:46.048 --> 00:03:47.699 माणसांतले मतभेद 00:03:47.699 --> 00:03:50.196 मला मुग्ध करतात. 00:03:50.196 --> 00:03:51.893 हे असं का घडत असेल? 00:03:51.893 --> 00:03:54.505 कुणाला पेला अक्षरशः अर्धा भरलेला दिसू शकतो, 00:03:54.505 --> 00:03:55.985 तर कुणाला तो अक्षरशः 00:03:55.985 --> 00:03:57.456 अर्धा रिकामा दिसू शकतो. 00:03:57.456 --> 00:04:00.577 एखाद्या माणसाच्या विचारांत आणि भावनांत 00:04:00.577 --> 00:04:02.124 असं काय असेल, 00:04:02.124 --> 00:04:04.484 की ज्यामुळे त्याला जग पूर्णपणे वेगळं दिसत असेल? 00:04:04.484 --> 00:04:06.947 आणि त्यामुळे खरंच काही फरक पडतो का? 00:04:06.947 --> 00:04:09.998 तर हे प्रश्न हाताळण्याची सुरुवात म्हणून, 00:04:09.998 --> 00:04:12.637 मी आणि माझ्या गटाने एका विषयात 00:04:12.637 --> 00:04:14.487 खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. 00:04:14.487 --> 00:04:16.405 सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा तो विषय 00:04:16.405 --> 00:04:18.128 म्हणजे आपलं आरोग्य आणि धडधाकटपणा. 00:04:18.128 --> 00:04:19.486 जगभरातले लोक 00:04:19.486 --> 00:04:21.888 वजन काबूत ठेवण्यासाठी धडपड करताहेत. 00:04:21.888 --> 00:04:24.102 आणि वजन वाढू न देण्यासाठी 00:04:24.102 --> 00:04:27.459 अनेक प्रकारचे उपाय आपल्या मदतीला हजर आहेत. 00:04:27.459 --> 00:04:30.565 उदाहरणार्थ, आपण अगदी पक्कं ठरवतो, 00:04:30.565 --> 00:04:33.262 सुट्ट्यांनंतर व्यायाम सुरु करण्याचं. 00:04:33.262 --> 00:04:35.860 पण प्रत्यक्षात, बहुतेक अमेरिकन लोकांना 00:04:35.860 --> 00:04:37.902 आपले नवीन वर्षाचे संकल्प 00:04:37.902 --> 00:04:40.958 वॅलेंटाईन डे येईपर्यंत मोडलेले आढळतात. 00:04:40.958 --> 00:04:42.460 आपण स्वतःला 00:04:42.460 --> 00:04:44.154 उत्तेजन देत असतो. 00:04:44.154 --> 00:04:45.987 स्वतःला सांगत असतो, 00:04:45.987 --> 00:04:47.688 या वर्षी नक्कीच पुन्हा आकारात येऊ. 00:04:47.688 --> 00:04:49.530 पण आपलं वजन प्रमाणात आणायला 00:04:49.530 --> 00:04:51.265 तितकं पुरेसं नसतं. 00:04:51.265 --> 00:04:53.101 तर, असं का? 00:04:53.101 --> 00:04:55.184 अर्थात, याला एक साधं उत्तर नाही. 00:04:55.184 --> 00:04:57.947 पण आपल्या विरोधात जाणारी आपल्या मनाची दृष्टी 00:04:57.947 --> 00:04:59.873 हे यामागचं एक कारण आहे, 00:04:59.873 --> 00:05:01.474 असा माझा युक्तिवाद आहे. 00:05:01.474 --> 00:05:04.493 काही लोकांना व्यायाम 00:05:04.493 --> 00:05:06.159 अक्षरशः जास्त कठीण वाटतो 00:05:06.159 --> 00:05:07.973 तर काही लोकांना तो 00:05:07.973 --> 00:05:10.280 अक्षरशः जास्त सोपा वाटतो. NOTE Paragraph 00:05:10.280 --> 00:05:14.028 तर या प्रश्नांची चाचणी घेताना, पहिली पायरी म्हणून 00:05:14.028 --> 00:05:16.291 आम्ही लोकांच्या प्रकृतीची 00:05:16.291 --> 00:05:19.137 वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. 00:05:19.137 --> 00:05:21.479 आम्ही त्यांच्या कमरेचा परीघ मोजला, 00:05:21.479 --> 00:05:24.735 त्यांच्या नितंबांच्या परिघाच्या तुलनेत. 00:05:24.735 --> 00:05:26.204 कंबर-ते-नितंब गुणोत्तर 00:05:26.204 --> 00:05:28.387 जास्त असणं हे तुलनेनं 00:05:28.387 --> 00:05:30.459 कमकुवत आरोग्याचं लक्षण आहे. 00:05:30.459 --> 00:05:32.686 ही मोजमापं गोळा केल्यानंतर 00:05:32.686 --> 00:05:34.499 आम्ही सहभागी लोकांना एका रेषेपर्यंत 00:05:34.499 --> 00:05:36.083 जास्तीचं वजन उचलून 00:05:36.083 --> 00:05:37.966 चालत जायला सांगितलं, 00:05:37.966 --> 00:05:39.123 एक प्रकारची शर्यतच. 00:05:39.123 --> 00:05:40.910 पण तसं करण्याआधी त्यांना 00:05:40.910 --> 00:05:43.350 अंतिम रेषेपर्यंतचं अंतर किती, 00:05:43.350 --> 00:05:45.037 याचा अंदाज बांधायला सांगितला. 00:05:45.037 --> 00:05:47.333 आम्हाला वाटलं, की त्यांना ते अंतर किती भासतं 00:05:47.333 --> 00:05:50.818 हे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर अवलंबून असेल. 00:05:50.818 --> 00:05:52.578 आणि आम्हाला काय आढळलं? 00:05:52.578 --> 00:05:55.286 तर, कंबर-ते-नितंब गुणोत्तर 00:05:55.286 --> 00:05:58.302 या अंतराच्या धारणेचं भाकित करीत होतं. 00:05:58.302 --> 00:06:00.932 शारीरिकदृष्ट्या बेढब आणि अक्षम लोकांना 00:06:00.932 --> 00:06:03.030 अंतिम रेषेपर्यंतचं अंतर खरोखरच 00:06:03.030 --> 00:06:04.193 पुष्कळ जास्त दिसत होतं, 00:06:04.193 --> 00:06:06.084 सुदृढ लोकांना दिसलं त्या तुलनेत. 00:06:06.084 --> 00:06:08.125 लोकांचं स्वास्थ्य, 00:06:08.125 --> 00:06:11.361 त्यांची परिस्थितीबद्दलची धारणा बदलत होतं. 00:06:11.361 --> 00:06:13.477 पण तसंच आपलं मनही ती बदलू शकतं. 00:06:13.477 --> 00:06:15.386 प्रत्यक्षात, आपलं शरीर आणि मन, 00:06:15.386 --> 00:06:17.363 मिळून काम करतात 00:06:17.363 --> 00:06:19.971 आणि त्यानुसार आपली परिस्थितीबद्दलची धारणा बदलतात. NOTE Paragraph 00:06:19.971 --> 00:06:22.066 यावरून आम्हाला असं वाटलं, की 00:06:22.066 --> 00:06:23.344 व्यायामाची प्रबळ प्रेरणा 00:06:23.344 --> 00:06:25.164 आणि जोरदार ध्येय असलेल्या लोकांना 00:06:25.164 --> 00:06:28.336 खरोखरच अंतिम रेषा जवळ दिसत असावी. 00:06:28.336 --> 00:06:32.036 प्रेरणा दुबळी असणाऱ्या लोकांना दिसते त्याहून जवळ. 00:06:32.036 --> 00:06:34.378 तर, प्रेरणांचा आपल्या धारणेवर परिणाम होतो का, 00:06:34.378 --> 00:06:37.730 हे तपासण्यासाठी 00:06:37.730 --> 00:06:39.653 आम्ही दुसरी एक पाहणी केली. 00:06:39.653 --> 00:06:42.334 पुन्हा आम्ही लोकांच्या आरोग्याची 00:06:42.334 --> 00:06:44.338 वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. 00:06:44.338 --> 00:06:46.396 त्यांच्या कमरेचा परीघ मोजला 00:06:46.396 --> 00:06:48.164 आणि त्यांच्या नितंबांचा परीघ मोजला, 00:06:48.164 --> 00:06:51.529 आणि त्यांना आणखी काही आरोग्य चाचण्या करायला लावल्या. 00:06:51.529 --> 00:06:54.072 या चाचण्यांबद्दल आम्ही व्यक्त केलेली मतं ऐकून 00:06:54.072 --> 00:06:55.637 काही सहभागी म्हणाले, की 00:06:55.637 --> 00:06:57.945 याउप्पर आम्हाला व्यायामाची प्रेरणा वाटत नाही. 00:06:57.945 --> 00:06:59.454 आपली आरोग्याची ध्येयं पूर्ण 00:06:59.454 --> 00:07:00.963 झालीत असं त्यांना वाटत होतं. 00:07:00.963 --> 00:07:02.005 आता त्यांना आणखी 00:07:02.005 --> 00:07:03.047 काहीही करायचं नव्हतं. 00:07:03.047 --> 00:07:04.091 या लोकांपाशी प्रेरणा नव्हती. 00:07:04.091 --> 00:07:06.233 इतरांनी मात्र आमची मतं ऐकून, व्यायामाची 00:07:06.233 --> 00:07:08.518 प्रबळ प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. 00:07:08.518 --> 00:07:11.230 अंतिम रेषा गाठणं हे त्यांचं जोरदार ध्येय होतं. 00:07:11.230 --> 00:07:14.227 पण पुन्हा, त्यांना अंतिम रेषेपर्यंत चालायला सांगण्यापूर्वी 00:07:14.227 --> 00:07:16.197 अंतराचा अंदाज बांधायला सांगितला. 00:07:16.197 --> 00:07:17.945 अंतिम रेषा किती दूर असेल? 00:07:17.945 --> 00:07:20.307 आणि पुन्हा, आधीच्या पाहणीप्रमाणेच, 00:07:20.307 --> 00:07:22.141 आढळलं की, कंबर-ते-नितंब गुणोत्तर हे 00:07:22.141 --> 00:07:24.101 अंतराच्या धारणेचं भाकीत करतं. 00:07:24.101 --> 00:07:28.733 अक्षम लोकांना हे अंतर जास्त वाटलं, 00:07:28.733 --> 00:07:30.703 अंतिम रेषा जास्त लांब असल्यासारखी दिसली, 00:07:30.703 --> 00:07:32.650 सुदृढ लोकांना दिसली त्या तुलनेत. 00:07:32.650 --> 00:07:34.659 तरीही महत्त्वाचं म्हणजे, ज्या लोकांपाशी 00:07:34.659 --> 00:07:36.593 व्यायाम करण्याची प्रेरणा नव्हती, 00:07:36.593 --> 00:07:38.212 त्यांच्याच बाबतीत हे घडलं. 00:07:38.212 --> 00:07:39.802 तर दुसऱ्या बाजूला, 00:07:39.802 --> 00:07:42.846 व्यायामाची प्रबळ प्रेरणा असलेल्या लोकांना 00:07:42.846 --> 00:07:45.043 हे अंतर कमी दिसलं. 00:07:45.043 --> 00:07:47.370 अगदी सर्वात अक्षम लोकांना सुध्दा 00:07:47.370 --> 00:07:48.928 अंतिम रेषा 00:07:48.928 --> 00:07:50.432 तितकीच जवळ दिसली. 00:07:50.432 --> 00:07:52.267 कदाचित सुदृढ लोकांना दिसली 00:07:52.267 --> 00:07:54.923 त्याहूनही जवळ. NOTE Paragraph 00:07:54.923 --> 00:07:56.882 तर आपलं आरोग्य, 00:07:56.882 --> 00:07:59.120 अंतिम रेषा किती लांब दिसते, हे बदलू शकतं. 00:07:59.120 --> 00:08:03.039 पण ज्या लोकांनी आपल्या आवाक्यातलं ध्येय ठरवलं होतं, 00:08:03.039 --> 00:08:05.148 जे त्यांना लवकरच पूर्ण करणं शक्य होतं, 00:08:05.148 --> 00:08:07.342 ज्यांना आपण ते पूर्ण करण्यास पात्र आहोत 00:08:07.342 --> 00:08:08.938 असं वाटत होतं, 00:08:08.938 --> 00:08:12.354 त्यांना व्यायाम खरोखरच सोपा वाटत होता. 00:08:12.354 --> 00:08:14.264 यावरून आम्हाला प्रश्न पडला, की 00:08:14.264 --> 00:08:16.681 अशी काही युक्ती आपण वापरू 00:08:16.681 --> 00:08:19.071 किंवा लोकांना शिकवू शकतो का, 00:08:19.071 --> 00:08:21.340 की ज्यामुळे त्यांची अंतराची धारणा बदलेल, 00:08:21.340 --> 00:08:23.821 आणि त्यांना व्यायाम सोपा वाटेल? NOTE Paragraph 00:08:23.821 --> 00:08:26.455 मग आम्ही वळलो दृष्टी विज्ञान साहित्याकडे, 00:08:26.455 --> 00:08:28.201 काय करावं हे शोधण्याकरता. 00:08:28.201 --> 00:08:30.683 आणि या वाचनाच्या आधाराने एक युक्ती आम्ही योजली. 00:08:30.683 --> 00:08:34.061 तिचं नाव ठेवलं, "ध्येयावर लक्ष राहू द्या." 00:08:34.061 --> 00:08:35.872 ही एखाद्या प्रेरणादायी जाहिरातीतली 00:08:35.872 --> 00:08:37.757 घोषणा नव्हे. 00:08:37.757 --> 00:08:40.005 हे प्रत्यक्ष मार्गदर्शक तत्त्व आहे 00:08:40.005 --> 00:08:42.927 आपल्या परिस्थितीकडे कसं पहावं, याबद्दल. 00:08:42.927 --> 00:08:45.219 आम्ही ज्या लोकांना ही युक्ती शिकवली, 00:08:45.219 --> 00:08:49.093 त्यांना सांगितलं, की अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित करा. 00:08:49.093 --> 00:08:50.929 इतरत्र बघणं टाळा. 00:08:50.929 --> 00:08:52.270 अशी कल्पना करा, की 00:08:52.270 --> 00:08:53.883 त्या ध्येयावर एक प्रकाशझोत आहे 00:08:53.893 --> 00:08:56.372 आणि त्याभोवतीचं सगळं धूसर आहे, 00:08:56.372 --> 00:08:58.178 किंवा ते दिसणं अवघड आहे. 00:08:58.178 --> 00:09:00.349 आम्हाला वाटलं, की 00:09:00.349 --> 00:09:02.842 या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागेल. 00:09:02.842 --> 00:09:04.461 या लोकांच्या समूहाची तुलना 00:09:04.461 --> 00:09:06.119 आम्ही एका संदर्भ गटाशी केली. 00:09:06.119 --> 00:09:07.324 त्यांना आम्ही सांगितलं, 00:09:07.324 --> 00:09:08.911 तुमच्या सभोवती पहा, 00:09:08.911 --> 00:09:10.160 अगदी सहज पाहिल्यासारखं. 00:09:10.160 --> 00:09:11.720 तुम्हाला अंतिम रेषा तर दिसेलच, 00:09:11.720 --> 00:09:13.423 पण कदाचित तुम्हाला उजव्या कडेचा 00:09:13.423 --> 00:09:15.292 कचऱ्याचा डबाही दिसेल. 00:09:15.292 --> 00:09:17.578 किंवा डाव्या कडेचा दिव्याचा खांब आणि ती माणसं. 00:09:17.578 --> 00:09:20.263 आम्हाला वाटलं, की ही युक्ती वापरणाऱ्या लोकांना 00:09:20.263 --> 00:09:22.365 ते अंतर दूरचं वाटेल. NOTE Paragraph 00:09:22.365 --> 00:09:24.812 तर मग काय आढळलं असेल आम्हाला? 00:09:24.812 --> 00:09:26.785 त्यांना अंतराचा अंदाज बांधायला सांगितला, 00:09:26.785 --> 00:09:28.533 तेव्हा त्यांची धारणा बदलण्यात 00:09:28.533 --> 00:09:31.033 ही युक्ती यशस्वी ठरली का? 00:09:31.033 --> 00:09:32.231 होय. 00:09:32.231 --> 00:09:34.436 ज्या लोकांनी नजर ध्येयावर ठेवली, 00:09:34.436 --> 00:09:37.485 त्यांना अंतिम रेषा ३० टक्के जवळ दिसली. 00:09:37.485 --> 00:09:39.096 ज्या लोकांनी सहज सभोवती पाहिलं, 00:09:39.096 --> 00:09:40.376 त्यांच्या तुलनेत. 00:09:40.376 --> 00:09:41.684 आम्हाला हे खूप छान वाटलं. 00:09:41.684 --> 00:09:43.566 आम्हाला खरंच खूप आनंद झाला, 00:09:43.566 --> 00:09:45.046 कारण याचा अर्थ असा, की 00:09:45.046 --> 00:09:46.938 या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागला. 00:09:46.938 --> 00:09:48.872 पण महत्त्वाचा प्रश्न असा, 00:09:48.872 --> 00:09:50.709 की यामुळे व्यायाम 00:09:50.709 --> 00:09:52.100 खरोखरच सोपा होईल का? 00:09:52.100 --> 00:09:53.765 यामुळे व्यायामाचा दर्जादेखील 00:09:53.765 --> 00:09:55.646 सुधारू शकेल का? NOTE Paragraph 00:09:55.646 --> 00:09:57.909 यानंतर आम्ही सहभागींना सांगितलं, की आता 00:09:57.909 --> 00:09:59.804 तुम्हाला अंगावर जास्तीचं वजन बाळगून 00:09:59.804 --> 00:10:02.031 अंतिम रेषा गाठायची आहे. 00:10:02.031 --> 00:10:04.051 आम्ही त्यांच्या घोट्यावर वजनं बांधली. 00:10:04.051 --> 00:10:06.748 त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १५ टक्के भरतील एवढी. 00:10:06.748 --> 00:10:08.696 आम्ही त्यांना गुडघे वर उचलून 00:10:08.696 --> 00:10:10.915 जलद चालत अंतिम रेषा गाठायला सांगितलं. 00:10:10.915 --> 00:10:13.075 आम्ही हा व्यायाम अवघड बनवला, 00:10:13.075 --> 00:10:14.797 पण अगदी माफक प्रमाणातच. 00:10:14.797 --> 00:10:16.574 अशक्य कोटीत नव्हे. 00:10:16.574 --> 00:10:17.834 इतर व्यायामांप्रमाणेच, 00:10:17.834 --> 00:10:20.676 जे खरोखरच आपलं आरोग्य सुधारतात. NOTE Paragraph 00:10:20.676 --> 00:10:23.336 तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की, 00:10:23.336 --> 00:10:25.448 ध्येयावर नजर ठेवल्यामुळे आणि 00:10:25.448 --> 00:10:27.780 अचूक अंतिम रेषेवर लक्ष केंद्रित केल्यामुळे 00:10:27.780 --> 00:10:30.545 त्यांचा व्यायामाचा अनुभव बदलला का? 00:10:30.545 --> 00:10:32.140 होय. बदलला. 00:10:32.140 --> 00:10:34.375 ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, 00:10:34.375 --> 00:10:36.189 त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं, 00:10:36.189 --> 00:10:38.284 की त्यांना हा व्यायाम करण्यासाठी 00:10:38.284 --> 00:10:39.954 १७ टक्के कमी श्रम करावे लागले. 00:10:39.954 --> 00:10:43.393 जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत. 00:10:43.393 --> 00:10:45.457 यामुळे त्यांचा व्यायामाचा 00:10:45.457 --> 00:10:47.080 व्यक्तीनिष्ठ अनुभव बदलला. 00:10:47.080 --> 00:10:50.092 तसंच त्यांच्या व्यायामाचं 00:10:50.092 --> 00:10:51.391 वस्तुनिष्ठ स्वरूपही बदललं. 00:10:51.391 --> 00:10:53.639 ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, 00:10:53.639 --> 00:10:56.287 ते प्रत्यक्षात २३ टक्के जास्त जलद चालले, 00:10:56.287 --> 00:10:59.735 जे लोक सहज भोवताली पाहत होते, त्यांच्या तुलनेत. 00:10:59.735 --> 00:11:01.417 याचं यथार्थ चित्रण करायचं झालं तर, 00:11:01.417 --> 00:11:03.090 २३ टक्के वाढ म्हणजे, 00:11:03.090 --> 00:11:06.975 १९८० सालच्या शेव्ही सायटेशन च्या बदल्यात 00:11:06.975 --> 00:11:11.619 २०१५ सालची शेव्हरोले कॉरव्हेट मिळवणं. NOTE Paragraph 00:11:11.619 --> 00:11:14.131 यामुळे आम्ही खूप आनंदित झालो. 00:11:14.131 --> 00:11:16.298 कारण याचा अर्थ असा, की 00:11:16.298 --> 00:11:17.980 या बिनखर्चाच्या युक्तीने 00:11:17.980 --> 00:11:19.747 मोठाच परिणाम केला होता. 00:11:19.747 --> 00:11:21.718 शिवाय ती वापरणंही सोपं होतं, 00:11:21.718 --> 00:11:23.576 लोक सुदृढ असोत की 00:11:23.576 --> 00:11:25.016 अजून त्यासाठी धडपडणारे असोत. 00:11:25.016 --> 00:11:26.573 ध्येयावर नजर ठेवल्यामुळे 00:11:26.573 --> 00:11:29.517 व्यायाम सोपा दिसू आणि वाटू लागला. 00:11:29.517 --> 00:11:32.075 अगदी त्याही वेळी, जेव्हा लोक जास्त जलद चालल्यामुळे 00:11:32.075 --> 00:11:34.294 जास्त मेहनत करीत होते. 00:11:34.294 --> 00:11:37.264 आता, मला ठाऊक आहे, की सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ 00:11:37.264 --> 00:11:39.286 जास्त जलद चालणं नव्हे. 00:11:39.286 --> 00:11:41.471 पण ध्येयावर नजर ठेवणं 00:11:41.471 --> 00:11:43.101 ही एक जास्तीची युक्ती 00:11:43.101 --> 00:11:44.710 तुम्ही वापरू शकता. 00:11:44.710 --> 00:11:47.025 निरोगी जीवनशैली वाढीस लावण्यासाठी. NOTE Paragraph 00:11:47.025 --> 00:11:49.106 आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो 00:11:49.106 --> 00:11:51.626 याविषयी अजूनही तुमची खात्री पटली नसेल, 00:11:51.626 --> 00:11:53.653 तर मी हे एक शेवटचं उदाहरण देते. 00:11:53.653 --> 00:11:57.076 स्टोकहोममधल्या एका रस्त्याचं हे छायाचित्र. त्यावर दोन मोटारी आहेत. 00:11:57.076 --> 00:11:59.267 मागची मोटार पुढच्या मोटारीपेक्षा 00:11:59.267 --> 00:12:00.693 खूप मोठी दिसते. 00:12:00.693 --> 00:12:02.299 पण प्रत्यक्षात, 00:12:02.299 --> 00:12:04.678 या दोन्ही मोटारी एकाच आकाराच्या आहेत. 00:12:04.678 --> 00:12:07.573 पण आपल्याला त्या तशा दिसत नाहीत. 00:12:07.573 --> 00:12:09.697 तर, याचा अर्थ काय? 00:12:09.697 --> 00:12:11.411 आपल्या दृष्टीत बिघाड झाला आहे, 00:12:11.411 --> 00:12:13.981 की आपल्या मेंदूत गडबड आहे? 00:12:13.981 --> 00:12:16.553 नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही. 00:12:16.553 --> 00:12:18.574 आपली दृष्टी अशा प्रकारे काम करते, इतकंच. 00:12:18.574 --> 00:12:21.263 आपल्याला कदाचित जग निराळं दिसेल, 00:12:21.263 --> 00:12:23.035 कधी त्याचा वस्तुस्थितीशी 00:12:23.035 --> 00:12:25.101 मेळ जुळणार नाही. 00:12:25.101 --> 00:12:27.226 पण याचा अर्थ, कुणीतरी एक बरोबर 00:12:27.226 --> 00:12:29.321 आणि दुसरा कुणी चूक ठरतो, असा होत नाही. 00:12:29.321 --> 00:12:31.457 आपण आपापल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो, 00:12:31.457 --> 00:12:34.308 पण आपण स्वतःला ते निराळ्या प्रकारे बघायला शिकवू शकतो. NOTE Paragraph 00:12:34.308 --> 00:12:36.132 जशा, माझ्या आयुष्यातल्या 00:12:36.132 --> 00:12:38.166 वाईट दिवसांच्या आठवणी. 00:12:38.166 --> 00:12:40.562 मी कंटाळलेली, चिडलेली, थकलेली असते. 00:12:40.562 --> 00:12:42.102 अजून पुष्कळ काम शिल्लक असतं. 00:12:42.102 --> 00:12:44.508 आणि माझ्या डोक्यावर एक 00:12:44.508 --> 00:12:45.991 मोठा काळा ढग तरंगत असतो. 00:12:45.991 --> 00:12:47.425 आणि अशा वाईट दिवसांत 00:12:47.425 --> 00:12:49.300 मला माझ्या आजूबाजूचे सगळेच लोक 00:12:49.300 --> 00:12:51.434 खिन्न दिसतात. 00:12:51.434 --> 00:12:53.167 मी एखाद्या कामाला मुदतवाढ मागितली की 00:12:53.167 --> 00:12:55.877 माझा सहकारी चिडलेला दिसतो. 00:12:55.877 --> 00:12:57.855 माझी मीटिंग उशिरा संपल्यामुळं 00:12:57.855 --> 00:13:00.554 मी लंचला उशिरा गेले, की माझी मैत्रीण वैतागलेली दिसते. 00:13:00.554 --> 00:13:02.147 आणि दिवसाअखेरी, 00:13:02.147 --> 00:13:04.173 माझा नवरा निराश दिसतो, 00:13:04.173 --> 00:13:06.706 कारण मला सिनेमाला जाण्याऐवजी झोपायचं असतं. 00:13:06.706 --> 00:13:09.723 आणि या अशा प्रकारच्या दिवसांत जेव्हा मला प्रत्येकजणच 00:13:09.723 --> 00:13:11.731 अस्वस्थ आणि रागावलेला दिसतो, 00:13:11.731 --> 00:13:14.949 तेव्हा मी याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची स्वतःला आठवण करून देते. 00:13:14.949 --> 00:13:18.259 कदाचित माझा सहकारी गोंधळून गेला असेल, 00:13:18.259 --> 00:13:20.695 कदाचित माझ्या मैत्रिणीला काळजी वाटली असेल, 00:13:20.695 --> 00:13:23.962 आणि कदाचित माझ्या नवऱ्याला सहानुभूती वाटत असेल. 00:13:23.962 --> 00:13:25.856 म्हणजेच आपण सगळे 00:13:25.856 --> 00:13:27.682 आपापल्या मनाच्या दृष्टीनं जग बघतो. 00:13:27.682 --> 00:13:29.685 आणि काही वेळा, हे जग 00:13:29.685 --> 00:13:31.093 धोकादायक, अवघड, आणि भयानक 00:13:31.093 --> 00:13:33.630 दिसत असेलही. 00:13:33.630 --> 00:13:36.600 पण सतत तसंच दिसायला हवं, असं नाही. 00:13:36.600 --> 00:13:38.796 ते पहायची वेगळी नजर आपण स्वतःला शिकवू शकतो. 00:13:38.796 --> 00:13:41.462 आणि जग जास्त चांगलं आणि सोपं करण्याचा 00:13:41.462 --> 00:13:43.399 हा मार्ग आपल्याला सापडला, की 00:13:43.399 --> 00:13:45.739 कदाचित खरोखरच ते तसं होईलही. NOTE Paragraph 00:13:45.739 --> 00:13:47.294 धन्यवाद. NOTE Paragraph 00:13:47.294 --> 00:13:50.903 (टाळ्या )