0:00:00.673,0:00:03.055 दृष्टी हे आपले सर्वात महत्त्वाचे 0:00:03.055,0:00:05.643 आणि प्राथमिक इंद्रिय आहे. 0:00:05.643,0:00:07.327 आपण आपल्या भोवतालचं जग 0:00:07.327,0:00:09.101 सतत बघत असतो 0:00:09.101,0:00:11.298 आणि आपण काय पाहिलं हे तात्काळ ओळखून 0:00:11.298,0:00:13.633 त्याचा अर्थ लावत असतो. 0:00:13.633,0:00:15.552 प्रथम आपण याच गोष्टीचं एक उदाहरण घेऊ. 0:00:15.552,0:00:16.825 मी तुम्हाला एका व्यक्तीचं 0:00:16.825,0:00:18.835 [br]छायाचित्र दाखवणार आहे. 0:00:18.835,0:00:20.638 फक्त एक किंवा दोन सेकंदापुरतंच. 0:00:20.638,0:00:22.533 आणि त्याचा चेहरा कोणती भावना दाखवतो 0:00:22.533,0:00:24.672 ते तुम्ही ओळखायचं. 0:00:24.672,0:00:25.900 तय्यार? 0:00:25.900,0:00:28.612 हे बघा. अंत: स्फूर्तीने सांगा. 0:00:28.612,0:00:30.943 काय पाहिलंत तुम्ही? 0:00:30.943,0:00:33.207 तर आम्ही प्रत्यक्षात 0:00:33.207,0:00:35.514 १२० जणांची पाहणी केली. 0:00:35.514,0:00:37.464 आणि आम्हाला मिश्र निष्कर्ष मिळाले. 0:00:37.464,0:00:39.731 या चेहऱ्यावर लोकांनी कोणती भावना पाहिली 0:00:39.731,0:00:42.621 त्याबद्दल त्यांचं एकमत नव्हतं. 0:00:42.621,0:00:44.426 कदाचित तुम्ही अस्वस्थता पाहिली असेल. 0:00:44.426,0:00:46.415 हेच उत्तर आम्हाला 0:00:46.415,0:00:47.670 बहुतेक वेळा मिळालं. 0:00:47.670,0:00:49.759 पण तुमच्या डावीकडची व्यक्ती म्हणू शकते, 0:00:49.759,0:00:52.500 की मी खेद किंवा अविश्वास पाहिला. 0:00:52.500,0:00:54.429 आणि तुमच्या उजवीकडचं कोणीतरी 0:00:54.429,0:00:57.323 आणखी काहीतरी पूर्णपणे वेगळंच सांगू शकते. 0:00:57.323,0:01:00.143 आशा किंवा समानुभूती, असं काहीतरी. [br] 0:01:00.143,0:01:01.702 परत बघा, आपण सगळे 0:01:01.702,0:01:04.804 याच चेहऱ्याकडे बघत आहोत. 0:01:04.804,0:01:06.232 आपण काहीतरी 0:01:06.232,0:01:08.615 पूर्णपणे वेगळंच बघू शकतो. 0:01:08.615,0:01:11.679 कारण, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. 0:01:11.679,0:01:13.847 आपण जे पाहिलं असं आपल्याला वाटतं, 0:01:13.847,0:01:15.289 ती खरंतर आपल्या स्वतःच्या 0:01:15.289,0:01:17.693 मनातली प्रतिमा असते. 0:01:17.693,0:01:19.946 अर्थात, अशी अनेक उदाहरणं आहेत. 0:01:19.946,0:01:22.361 आपण आपल्या मनाच्या दृष्टीने [br]जग कसं पाहतो, त्याची. 0:01:22.361,0:01:24.143 मी त्यातली काही सांगणार आहे. 0:01:24.143,0:01:26.803 उदाहरणार्थ, डाएट करणारे लोक. 0:01:26.803,0:01:28.821 यांना सफरचंदं मोठी दिसतात, 0:01:28.821,0:01:31.841 कॅलरीज न मोजणाऱ्या लोकांना दिसतात, [br]त्याहून मोठी. 0:01:31.841,0:01:35.474 मंदीतून बाहेर येणाऱ्या 0:01:35.474,0:01:37.629 सॉफ्टबॉल खेळाडूंना बॉल छोटा दिसतो, 0:01:37.629,0:01:41.173 यशस्वी काळात दिसतो त्याहून छोटा. 0:01:41.173,0:01:44.123 खरं तर, आपल्याला इतर लोक कसे दिसतात, 0:01:44.123,0:01:46.365 अगदी राजकारणीसुध्दा, 0:01:46.365,0:01:48.538 हे आपल्या राजकीय कल्पना ठरवतात. 0:01:48.538,0:01:52.231 तर, मी आणि माझ्या संशोधन गटाने[br]हा प्रश्न विचारात घ्यायचे ठरवले. 0:01:52.231,0:01:55.862 २००८ साली बराक ओबामा[br]राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढत होते 0:01:55.862,0:01:57.261 अगदी पहिल्या वेळी, 0:01:57.261,0:02:00.243 आणि निवडणुकीच्या एक महिना आधी 0:02:00.243,0:02:02.466 आम्ही शेकडो अमेरिकन लोकांची पाहणी केली. 0:02:02.466,0:02:04.165 या पाहणीत आम्हाला आढळून आलं, की 0:02:04.165,0:02:06.451 काही लोकांना, अमेरिकन लोकांना, [br]वाटत होतं, 0:02:06.451,0:02:08.147 ओबामा या छायाचित्रांत जसे दिसतात, 0:02:08.147,0:02:11.139 तसेच ते प्रत्यक्षात आहेत. 0:02:11.139,0:02:13.761 या लोकांपैकी ७५ टक्के लोकांनी [br] 0:02:13.761,0:02:16.628 खऱ्या निवडणुकीत ओबामांना मत दिलं. 0:02:16.628,0:02:19.796 काही इतर लोकांना मात्र, [br]ओबामा या छायाचित्रांत दिसतात 0:02:19.796,0:02:22.085 तसेच आहेत, असं वाटत होतं. 0:02:22.085,0:02:24.061 या लोकांपैकी ८९ टक्के लोकांनी 0:02:24.061,0:02:25.882 मककीन यांना मत दिलं. 0:02:25.882,0:02:29.388 आम्ही ओबामांची बरीच छायाचित्रं [br]लोकांना दाखवली. 0:02:29.388,0:02:30.985 पण एका वेळी एकच दाखवलं. 0:02:30.985,0:02:33.884 त्यामुळे या छायाचित्रांमध्ये [br]आम्ही काय बदल करत होतो, 0:02:33.884,0:02:35.737 हे लोकांना समजलं नाही. 0:02:35.737,0:02:37.793 आम्ही कृत्रिमरीत्या त्यांची [br]रंगकांती बदलून 0:02:37.793,0:02:40.341 ती फिकट किंवा गडद करीत होतो. 0:02:40.341,0:02:41.901 हे कसं शक्य आहे? 0:02:41.901,0:02:44.736 मी जेव्हा एखादी व्यक्ती,[br]वस्तू, किंवा घटना पाहते, त्यावेळी 0:02:44.736,0:02:46.457 दुसऱ्या कोणाला दिसतं, त्याहून 0:02:46.457,0:02:48.432 मला काहीतरी पूर्णपणे वेगळंच दिसतं. 0:02:48.432,0:02:50.261 हे कसं घडू शकतं? 0:02:50.261,0:02:52.551 तशी कारणं तर पुष्कळ आहेत. 0:02:52.551,0:02:54.802 पण त्यातल्या एका कारणासाठी 0:02:54.802,0:02:57.355 डोळ्यांचं कार्य जास्त[br]समजावून घेतलं पाहिजे. 0:02:57.355,0:02:59.364 तर दृष्टी वैज्ञानिक जाणतात, की 0:02:59.364,0:03:00.847 खरंतर एका क्षणात पाहून 0:03:00.847,0:03:02.718 आपल्याला मिळणारी 0:03:02.718,0:03:04.557 एकंदरीत माहिती 0:03:04.557,0:03:07.254 तशी फारच थोडकी असते. 0:03:07.254,0:03:09.983 जे आपण अगदी सूक्ष्म, 0:03:09.983,0:03:12.160 स्वच्छ, आणि अचूक पाहू शकतो, 0:03:12.160,0:03:14.147 ते केवळ आपल्या लांब धरलेल्या 0:03:14.147,0:03:16.323 हाताच्या अंगठ्याच्या 0:03:16.323,0:03:18.618 पृष्ठफळाइतकंच असतं. 0:03:18.618,0:03:20.757 त्याभोवतीचं सगळं अंधुक असतं, 0:03:20.757,0:03:23.198 त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आलेल्यापैकी 0:03:23.198,0:03:25.842 बरंचसं संदिग्ध जाणवतं. 0:03:25.842,0:03:28.116 पण आपल्याला, आपण काय पाहिलं[br]ते स्पष्ट करून घेऊन 0:03:28.116,0:03:30.364 त्याचा अर्थ लावावा लागतो. 0:03:30.364,0:03:33.749 आणि आपलं मन या गाळलेल्या जागा [br]भरून काढायला मदत करतं. 0:03:33.749,0:03:37.318 यामुळेच, धारणा ही व्यक्तिसापेक्ष असते. 0:03:37.318,0:03:38.777 आणि अशा प्रकारे आपण जे पाहतो 0:03:38.777,0:03:41.005 ते आपल्या मनातलं चित्र असतं. 0:03:41.005,0:03:42.818 तर, मी एक सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे, 0:03:42.818,0:03:44.335 आणि हे असे प्रश्न 0:03:44.335,0:03:46.048 माझं लक्ष वेधून घेतात. 0:03:46.048,0:03:47.699 माणसांतले मतभेद 0:03:47.699,0:03:50.196 मला मुग्ध करतात. 0:03:50.196,0:03:51.893 हे असं का घडत असेल? 0:03:51.893,0:03:54.505 कुणाला पेला अक्षरशः अर्धा भरलेला [br]दिसू शकतो, 0:03:54.505,0:03:55.985 तर कुणाला तो अक्षरशः 0:03:55.985,0:03:57.456 अर्धा रिकामा दिसू शकतो. 0:03:57.456,0:04:00.577 एखाद्या माणसाच्या विचारांत आणि भावनांत 0:04:00.577,0:04:02.124 असं काय असेल, 0:04:02.124,0:04:04.484 की ज्यामुळे त्याला जग [br]पूर्णपणे वेगळं दिसत असेल? 0:04:04.484,0:04:06.947 आणि त्यामुळे खरंच काही फरक पडतो का? 0:04:06.947,0:04:09.998 तर हे प्रश्न हाताळण्याची सुरुवात म्हणून, 0:04:09.998,0:04:12.637 मी आणि माझ्या गटाने [br]एका विषयात 0:04:12.637,0:04:14.487 खोलवर जाण्याचा निर्णय घेतला. 0:04:14.487,0:04:16.405 सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा तो विषय 0:04:16.405,0:04:18.128 म्हणजे आपलं आरोग्य आणि धडधाकटपणा. 0:04:18.128,0:04:19.486 जगभरातले लोक 0:04:19.486,0:04:21.888 वजन काबूत ठेवण्यासाठी धडपड करताहेत. 0:04:21.888,0:04:24.102 आणि वजन वाढू न देण्यासाठी 0:04:24.102,0:04:27.459 अनेक प्रकारचे उपाय [br]आपल्या मदतीला हजर आहेत. 0:04:27.459,0:04:30.565 उदाहरणार्थ, आपण अगदी पक्कं ठरवतो, 0:04:30.565,0:04:33.262 सुट्ट्यांनंतर व्यायाम सुरु करण्याचं. 0:04:33.262,0:04:35.860 पण प्रत्यक्षात, बहुतेक अमेरिकन लोकांना 0:04:35.860,0:04:37.902 आपले नवीन वर्षाचे संकल्प 0:04:37.902,0:04:40.958 वॅलेंटाईन डे येईपर्यंत मोडलेले आढळतात. 0:04:40.958,0:04:42.460 आपण स्वतःला 0:04:42.460,0:04:44.154 उत्तेजन देत असतो. 0:04:44.154,0:04:45.987 स्वतःला सांगत असतो, 0:04:45.987,0:04:47.688 या वर्षी नक्कीच पुन्हा आकारात येऊ. 0:04:47.688,0:04:49.530 पण आपलं वजन प्रमाणात आणायला 0:04:49.530,0:04:51.265 तितकं पुरेसं नसतं. 0:04:51.265,0:04:53.101 तर, असं का? 0:04:53.101,0:04:55.184 अर्थात, याला एक साधं उत्तर नाही. 0:04:55.184,0:04:57.947 पण आपल्या विरोधात जाणारी [br]आपल्या मनाची दृष्टी 0:04:57.947,0:04:59.873 हे यामागचं एक कारण आहे, 0:04:59.873,0:05:01.474 असा माझा युक्तिवाद आहे. 0:05:01.474,0:05:04.493 काही लोकांना व्यायाम[br] 0:05:04.493,0:05:06.159 अक्षरशः जास्त कठीण वाटतो 0:05:06.159,0:05:07.973 तर काही लोकांना तो 0:05:07.973,0:05:10.280 अक्षरशः जास्त सोपा वाटतो. 0:05:10.280,0:05:14.028 तर या प्रश्नांची चाचणी घेताना,[br]पहिली पायरी म्हणून 0:05:14.028,0:05:16.291 आम्ही लोकांच्या प्रकृतीची 0:05:16.291,0:05:19.137 वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. 0:05:19.137,0:05:21.479 आम्ही त्यांच्या कमरेचा परीघ मोजला, 0:05:21.479,0:05:24.735 त्यांच्या नितंबांच्या परिघाच्या तुलनेत. [br] 0:05:24.735,0:05:26.204 कंबर-ते-नितंब गुणोत्तर 0:05:26.204,0:05:28.387 जास्त असणं हे तुलनेनं 0:05:28.387,0:05:30.459 कमकुवत आरोग्याचं लक्षण आहे. 0:05:30.459,0:05:32.686 ही मोजमापं गोळा केल्यानंतर 0:05:32.686,0:05:34.499 आम्ही सहभागी लोकांना एका रेषेपर्यंत 0:05:34.499,0:05:36.083 जास्तीचं वजन उचलून 0:05:36.083,0:05:37.966 चालत जायला सांगितलं, 0:05:37.966,0:05:39.123 एक प्रकारची शर्यतच. 0:05:39.123,0:05:40.910 पण तसं करण्याआधी त्यांना 0:05:40.910,0:05:43.350 अंतिम रेषेपर्यंतचं अंतर किती, 0:05:43.350,0:05:45.037 याचा अंदाज बांधायला सांगितला. 0:05:45.037,0:05:47.333 आम्हाला वाटलं, की त्यांना [br]ते अंतर किती भासतं 0:05:47.333,0:05:50.818 हे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर [br]अवलंबून असेल. 0:05:50.818,0:05:52.578 आणि आम्हाला काय आढळलं? 0:05:52.578,0:05:55.286 तर, कंबर-ते-नितंब गुणोत्तर 0:05:55.286,0:05:58.302 या अंतराच्या धारणेचं भाकित करीत होतं. 0:05:58.302,0:06:00.932 शारीरिकदृष्ट्या बेढब आणि अक्षम लोकांना 0:06:00.932,0:06:03.030 अंतिम रेषेपर्यंतचं अंतर खरोखरच 0:06:03.030,0:06:04.193 पुष्कळ जास्त दिसत होतं, 0:06:04.193,0:06:06.084 सुदृढ लोकांना दिसलं त्या तुलनेत. 0:06:06.084,0:06:08.125 लोकांचं स्वास्थ्य, 0:06:08.125,0:06:11.361 त्यांची परिस्थितीबद्दलची [br]धारणा बदलत होतं. 0:06:11.361,0:06:13.477 पण तसंच आपलं मनही ती बदलू शकतं. 0:06:13.477,0:06:15.386 प्रत्यक्षात, आपलं शरीर आणि मन, 0:06:15.386,0:06:17.363 मिळून काम करतात 0:06:17.363,0:06:19.971 आणि त्यानुसार [br]आपली परिस्थितीबद्दलची धारणा बदलतात. 0:06:19.971,0:06:22.066 यावरून आम्हाला असं वाटलं, की 0:06:22.066,0:06:23.344 व्यायामाची प्रबळ प्रेरणा 0:06:23.344,0:06:25.164 आणि जोरदार ध्येय असलेल्या लोकांना 0:06:25.164,0:06:28.336 खरोखरच अंतिम रेषा जवळ दिसत असावी. 0:06:28.336,0:06:32.036 प्रेरणा दुबळी असणाऱ्या लोकांना दिसते [br]त्याहून जवळ. 0:06:32.036,0:06:34.378 तर, प्रेरणांचा आपल्या धारणेवर [br]परिणाम होतो का, 0:06:34.378,0:06:37.730 हे तपासण्यासाठी 0:06:37.730,0:06:39.653 आम्ही दुसरी एक पाहणी केली. 0:06:39.653,0:06:42.334 पुन्हा आम्ही लोकांच्या आरोग्याची 0:06:42.334,0:06:44.338 वस्तुनिष्ठ मोजमापं गोळा केली. 0:06:44.338,0:06:46.396 त्यांच्या कमरेचा परीघ मोजला 0:06:46.396,0:06:48.164 आणि त्यांच्या नितंबांचा परीघ मोजला, 0:06:48.164,0:06:51.529 आणि त्यांना आणखी काही [br]आरोग्य चाचण्या करायला लावल्या. 0:06:51.529,0:06:54.072 या चाचण्यांबद्दल [br]आम्ही व्यक्त केलेली मतं ऐकून 0:06:54.072,0:06:55.637 काही सहभागी म्हणाले, की 0:06:55.637,0:06:57.945 याउप्पर आम्हाला [br]व्यायामाची प्रेरणा वाटत नाही. 0:06:57.945,0:06:59.454 आपली आरोग्याची ध्येयं पूर्ण 0:06:59.454,0:07:00.963 झालीत असं त्यांना वाटत होतं. 0:07:00.963,0:07:02.005 आता त्यांना आणखी 0:07:02.005,0:07:03.047 काहीही करायचं नव्हतं. 0:07:03.047,0:07:04.091 या लोकांपाशी प्रेरणा नव्हती. 0:07:04.091,0:07:06.233 इतरांनी मात्र आमची मतं ऐकून, व्यायामाची 0:07:06.233,0:07:08.518 प्रबळ प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं. 0:07:08.518,0:07:11.230 अंतिम रेषा गाठणं हे त्यांचं [br]जोरदार ध्येय होतं. 0:07:11.230,0:07:14.227 पण पुन्हा, त्यांना [br]अंतिम रेषेपर्यंत चालायला सांगण्यापूर्वी 0:07:14.227,0:07:16.197 अंतराचा अंदाज बांधायला सांगितला. 0:07:16.197,0:07:17.945 अंतिम रेषा किती दूर असेल? 0:07:17.945,0:07:20.307 आणि पुन्हा, आधीच्या पाहणीप्रमाणेच, 0:07:20.307,0:07:22.141 आढळलं की, कंबर-ते-नितंब गुणोत्तर हे 0:07:22.141,0:07:24.101 अंतराच्या धारणेचं भाकीत करतं. 0:07:24.101,0:07:28.733 अक्षम लोकांना हे अंतर जास्त वाटलं, 0:07:28.733,0:07:30.703 अंतिम रेषा जास्त लांब असल्यासारखी दिसली, 0:07:30.703,0:07:32.650 सुदृढ लोकांना दिसली त्या तुलनेत. 0:07:32.650,0:07:34.659 तरीही महत्त्वाचं म्हणजे,[br]ज्या लोकांपाशी 0:07:34.659,0:07:36.593 व्यायाम करण्याची प्रेरणा नव्हती, 0:07:36.593,0:07:38.212 त्यांच्याच बाबतीत हे घडलं. 0:07:38.212,0:07:39.802 तर दुसऱ्या बाजूला, 0:07:39.802,0:07:42.846 व्यायामाची प्रबळ प्रेरणा असलेल्या लोकांना 0:07:42.846,0:07:45.043 हे अंतर कमी दिसलं. 0:07:45.043,0:07:47.370 अगदी सर्वात अक्षम लोकांना सुध्दा 0:07:47.370,0:07:48.928 अंतिम रेषा 0:07:48.928,0:07:50.432 तितकीच जवळ दिसली. 0:07:50.432,0:07:52.267 कदाचित सुदृढ लोकांना दिसली 0:07:52.267,0:07:54.923 त्याहूनही जवळ. 0:07:54.923,0:07:56.882 तर आपलं आरोग्य, 0:07:56.882,0:07:59.120 अंतिम रेषा किती लांब दिसते, [br]हे बदलू शकतं. 0:07:59.120,0:08:03.039 पण ज्या लोकांनी [br]आपल्या आवाक्यातलं ध्येय ठरवलं होतं, 0:08:03.039,0:08:05.148 जे त्यांना लवकरच पूर्ण करणं शक्य होतं, 0:08:05.148,0:08:07.342 ज्यांना आपण ते पूर्ण करण्यास पात्र आहोत 0:08:07.342,0:08:08.938 असं वाटत होतं, 0:08:08.938,0:08:12.354 त्यांना व्यायाम खरोखरच सोपा वाटत होता. [br] 0:08:12.354,0:08:14.264 यावरून आम्हाला प्रश्न पडला, की 0:08:14.264,0:08:16.681 अशी काही युक्ती आपण वापरू 0:08:16.681,0:08:19.071 किंवा लोकांना शिकवू शकतो का, 0:08:19.071,0:08:21.340 की ज्यामुळे त्यांची अंतराची धारणा बदलेल, 0:08:21.340,0:08:23.821 आणि त्यांना व्यायाम सोपा वाटेल? 0:08:23.821,0:08:26.455 मग आम्ही वळलो दृष्टी विज्ञान साहित्याकडे, 0:08:26.455,0:08:28.201 काय करावं हे शोधण्याकरता. 0:08:28.201,0:08:30.683 आणि या वाचनाच्या आधाराने [br]एक युक्ती आम्ही योजली. 0:08:30.683,0:08:34.061 तिचं नाव ठेवलं, "ध्येयावर लक्ष राहू द्या." 0:08:34.061,0:08:35.872 ही एखाद्या प्रेरणादायी जाहिरातीतली 0:08:35.872,0:08:37.757 घोषणा नव्हे. 0:08:37.757,0:08:40.005 हे प्रत्यक्ष मार्गदर्शक तत्त्व आहे 0:08:40.005,0:08:42.927 आपल्या परिस्थितीकडे कसं पहावं, याबद्दल. 0:08:42.927,0:08:45.219 आम्ही ज्या लोकांना ही युक्ती शिकवली, 0:08:45.219,0:08:49.093 त्यांना सांगितलं, की अंतिम रेषेवर [br]लक्ष केंद्रित करा. 0:08:49.093,0:08:50.929 इतरत्र बघणं टाळा. 0:08:50.929,0:08:52.270 अशी कल्पना करा, की 0:08:52.270,0:08:53.883 त्या ध्येयावर एक प्रकाशझोत आहे 0:08:53.893,0:08:56.372 आणि त्याभोवतीचं सगळं धूसर आहे, 0:08:56.372,0:08:58.178 किंवा ते दिसणं अवघड आहे. 0:08:58.178,0:09:00.349 आम्हाला वाटलं, की 0:09:00.349,0:09:02.842 या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागेल. 0:09:02.842,0:09:04.461 या लोकांच्या समूहाची तुलना 0:09:04.461,0:09:06.119 आम्ही एका संदर्भ गटाशी केली. 0:09:06.119,0:09:07.324 त्यांना आम्ही सांगितलं, 0:09:07.324,0:09:08.911 तुमच्या सभोवती पहा, 0:09:08.911,0:09:10.160 अगदी सहज पाहिल्यासारखं. 0:09:10.160,0:09:11.720 तुम्हाला अंतिम रेषा तर दिसेलच, 0:09:11.720,0:09:13.423 पण कदाचित तुम्हाला उजव्या कडेचा 0:09:13.423,0:09:15.292 कचऱ्याचा डबाही दिसेल. 0:09:15.292,0:09:17.578 किंवा डाव्या कडेचा दिव्याचा खांब [br]आणि ती माणसं. 0:09:17.578,0:09:20.263 आम्हाला वाटलं, की [br]ही युक्ती वापरणाऱ्या लोकांना 0:09:20.263,0:09:22.365 ते अंतर दूरचं वाटेल. 0:09:22.365,0:09:24.812 तर मग काय आढळलं असेल आम्हाला? 0:09:24.812,0:09:26.785 त्यांना अंतराचा अंदाज बांधायला सांगितला, 0:09:26.785,0:09:28.533 तेव्हा त्यांची धारणा बदलण्यात 0:09:28.533,0:09:31.033 ही युक्ती यशस्वी ठरली का? 0:09:31.033,0:09:32.231 होय. 0:09:32.231,0:09:34.436 ज्या लोकांनी नजर ध्येयावर ठेवली, 0:09:34.436,0:09:37.485 त्यांना अंतिम रेषा ३० टक्के जवळ दिसली. 0:09:37.485,0:09:39.096 ज्या लोकांनी सहज सभोवती पाहिलं, 0:09:39.096,0:09:40.376 त्यांच्या तुलनेत. 0:09:40.376,0:09:41.684 आम्हाला हे खूप छान वाटलं. 0:09:41.684,0:09:43.566 आम्हाला खरंच खूप आनंद झाला,[br] 0:09:43.566,0:09:45.046 कारण याचा अर्थ असा, की [br] 0:09:45.046,0:09:46.938 या युक्तीमुळे व्यायाम सोपा वाटू लागला. 0:09:46.938,0:09:48.872 पण महत्त्वाचा प्रश्न असा, 0:09:48.872,0:09:50.709 की यामुळे व्यायाम 0:09:50.709,0:09:52.100 खरोखरच सोपा होईल का? 0:09:52.100,0:09:53.765 यामुळे व्यायामाचा दर्जादेखील 0:09:53.765,0:09:55.646 सुधारू शकेल का? 0:09:55.646,0:09:57.909 यानंतर आम्ही सहभागींना सांगितलं,[br]की आता 0:09:57.909,0:09:59.804 तुम्हाला अंगावर जास्तीचं वजन बाळगून 0:09:59.804,0:10:02.031 अंतिम रेषा गाठायची आहे. 0:10:02.031,0:10:04.051 आम्ही त्यांच्या घोट्यावर वजनं बांधली. 0:10:04.051,0:10:06.748 त्यांच्या शरीराच्या वजनाच्या [br]१५ टक्के भरतील एवढी. 0:10:06.748,0:10:08.696 आम्ही त्यांना गुडघे वर उचलून 0:10:08.696,0:10:10.915 जलद चालत अंतिम रेषा गाठायला सांगितलं. 0:10:10.915,0:10:13.075 आम्ही हा व्यायाम अवघड बनवला, 0:10:13.075,0:10:14.797 पण अगदी माफक प्रमाणातच. 0:10:14.797,0:10:16.574 अशक्य कोटीत नव्हे. 0:10:16.574,0:10:17.834 इतर व्यायामांप्रमाणेच, 0:10:17.834,0:10:20.676 जे खरोखरच आपलं आरोग्य सुधारतात. 0:10:20.676,0:10:23.336 तर आता महत्त्वाचा प्रश्न असा की, 0:10:23.336,0:10:25.448 ध्येयावर नजर ठेवल्यामुळे आणि 0:10:25.448,0:10:27.780 अचूक अंतिम रेषेवर [br]लक्ष केंद्रित केल्यामुळे 0:10:27.780,0:10:30.545 त्यांचा व्यायामाचा अनुभव बदलला का? 0:10:30.545,0:10:32.140 होय. बदलला. 0:10:32.140,0:10:34.375 ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, 0:10:34.375,0:10:36.189 त्यांनी नंतर आम्हाला सांगितलं, 0:10:36.189,0:10:38.284 की त्यांना हा व्यायाम करण्यासाठी 0:10:38.284,0:10:39.954 १७ टक्के कमी श्रम करावे लागले. 0:10:39.954,0:10:43.393 जे लोक सहज भोवताली पाहत होते, [br]त्यांच्या तुलनेत. 0:10:43.393,0:10:45.457 यामुळे त्यांचा व्यायामाचा 0:10:45.457,0:10:47.080 व्यक्तीनिष्ठ अनुभव बदलला. 0:10:47.080,0:10:50.092 तसंच त्यांच्या व्यायामाचं [br] 0:10:50.092,0:10:51.391 वस्तुनिष्ठ स्वरूपही बदललं. 0:10:51.391,0:10:53.639 ज्या लोकांनी ध्येयावर नजर ठेवली होती, 0:10:53.639,0:10:56.287 ते प्रत्यक्षात २३ टक्के जास्त जलद चालले, 0:10:56.287,0:10:59.735 जे लोक सहज भोवताली पाहत होते, [br]त्यांच्या तुलनेत. 0:10:59.735,0:11:01.417 याचं यथार्थ चित्रण करायचं झालं तर, 0:11:01.417,0:11:03.090 २३ टक्के वाढ म्हणजे, 0:11:03.090,0:11:06.975 १९८० सालच्या शेव्ही सायटेशन च्या बदल्यात 0:11:06.975,0:11:11.619 २०१५ सालची शेव्हरोले कॉरव्हेट मिळवणं. 0:11:11.619,0:11:14.131 यामुळे आम्ही खूप आनंदित झालो. 0:11:14.131,0:11:16.298 कारण याचा अर्थ असा, की 0:11:16.298,0:11:17.980 या बिनखर्चाच्या युक्तीने 0:11:17.980,0:11:19.747 मोठाच परिणाम केला होता. 0:11:19.747,0:11:21.718 शिवाय ती वापरणंही सोपं होतं, 0:11:21.718,0:11:23.576 लोक सुदृढ असोत की 0:11:23.576,0:11:25.016 अजून त्यासाठी धडपडणारे असोत. 0:11:25.016,0:11:26.573 ध्येयावर नजर ठेवल्यामुळे 0:11:26.573,0:11:29.517 व्यायाम सोपा दिसू आणि वाटू लागला. 0:11:29.517,0:11:32.075 अगदी त्याही वेळी, जेव्हा [br]लोक जास्त जलद चालल्यामुळे 0:11:32.075,0:11:34.294 जास्त मेहनत करीत होते. 0:11:34.294,0:11:37.264 आता, मला ठाऊक आहे, की [br]सुदृढ आरोग्य म्हणजे केवळ 0:11:37.264,0:11:39.286 जास्त जलद चालणं नव्हे. 0:11:39.286,0:11:41.471 पण ध्येयावर नजर ठेवणं 0:11:41.471,0:11:43.101 ही एक जास्तीची युक्ती 0:11:43.101,0:11:44.710 तुम्ही वापरू शकता. 0:11:44.710,0:11:47.025 निरोगी जीवनशैली वाढीस लावण्यासाठी. 0:11:47.025,0:11:49.106 आपण आपल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो 0:11:49.106,0:11:51.626 याविषयी अजूनही तुमची खात्री पटली नसेल, 0:11:51.626,0:11:53.653 तर मी हे एक शेवटचं उदाहरण देते. 0:11:53.653,0:11:57.076 स्टोकहोममधल्या एका रस्त्याचं हे छायाचित्र.[br]त्यावर दोन मोटारी आहेत. [br] 0:11:57.076,0:11:59.267 मागची मोटार पुढच्या मोटारीपेक्षा 0:11:59.267,0:12:00.693 खूप मोठी दिसते. 0:12:00.693,0:12:02.299 पण प्रत्यक्षात, 0:12:02.299,0:12:04.678 या दोन्ही मोटारी एकाच आकाराच्या आहेत. 0:12:04.678,0:12:07.573 पण आपल्याला त्या तशा दिसत नाहीत. 0:12:07.573,0:12:09.697 तर, याचा अर्थ काय? 0:12:09.697,0:12:11.411 आपल्या दृष्टीत बिघाड झाला आहे, 0:12:11.411,0:12:13.981 की आपल्या मेंदूत गडबड आहे? 0:12:13.981,0:12:16.553 नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही. 0:12:16.553,0:12:18.574 आपली दृष्टी अशा प्रकारे काम करते, इतकंच. 0:12:18.574,0:12:21.263 आपल्याला कदाचित जग निराळं दिसेल, 0:12:21.263,0:12:23.035 कधी त्याचा वस्तुस्थितीशी 0:12:23.035,0:12:25.101 मेळ जुळणार नाही. 0:12:25.101,0:12:27.226 पण याचा अर्थ, [br]कुणीतरी एक बरोबर 0:12:27.226,0:12:29.321 आणि दुसरा कुणी चूक ठरतो, [br]असा होत नाही. 0:12:29.321,0:12:31.457 आपण आपापल्या मनाच्या दृष्टीने जग पाहतो, 0:12:31.457,0:12:34.308 पण आपण स्वतःला [br]ते निराळ्या प्रकारे बघायला शिकवू शकतो. 0:12:34.308,0:12:36.132 जशा, माझ्या आयुष्यातल्या 0:12:36.132,0:12:38.166 वाईट दिवसांच्या आठवणी. 0:12:38.166,0:12:40.562 मी कंटाळलेली, चिडलेली, थकलेली असते. 0:12:40.562,0:12:42.102 अजून पुष्कळ काम शिल्लक असतं. 0:12:42.102,0:12:44.508 आणि माझ्या डोक्यावर एक 0:12:44.508,0:12:45.991 मोठा काळा ढग तरंगत असतो. 0:12:45.991,0:12:47.425 आणि अशा वाईट दिवसांत 0:12:47.425,0:12:49.300 मला माझ्या आजूबाजूचे सगळेच लोक 0:12:49.300,0:12:51.434 खिन्न दिसतात. 0:12:51.434,0:12:53.167 मी एखाद्या कामाला[br]मुदतवाढ मागितली की 0:12:53.167,0:12:55.877 माझा सहकारी चिडलेला दिसतो. 0:12:55.877,0:12:57.855 माझी मीटिंग उशिरा संपल्यामुळं 0:12:57.855,0:13:00.554 मी लंचला उशिरा गेले, की [br]माझी मैत्रीण वैतागलेली दिसते. 0:13:00.554,0:13:02.147 आणि दिवसाअखेरी, 0:13:02.147,0:13:04.173 माझा नवरा निराश दिसतो, 0:13:04.173,0:13:06.706 कारण मला सिनेमाला जाण्याऐवजी [br]झोपायचं असतं. 0:13:06.706,0:13:09.723 आणि या अशा प्रकारच्या दिवसांत[br]जेव्हा मला प्रत्येकजणच 0:13:09.723,0:13:11.731 अस्वस्थ आणि रागावलेला दिसतो,[br] 0:13:11.731,0:13:14.949 तेव्हा मी याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची [br]स्वतःला आठवण करून देते. 0:13:14.949,0:13:18.259 कदाचित माझा सहकारी गोंधळून गेला असेल, 0:13:18.259,0:13:20.695 कदाचित माझ्या मैत्रिणीला [br]काळजी वाटली असेल, 0:13:20.695,0:13:23.962 आणि कदाचित माझ्या नवऱ्याला [br]सहानुभूती वाटत असेल. 0:13:23.962,0:13:25.856 म्हणजेच आपण सगळे 0:13:25.856,0:13:27.682 आपापल्या मनाच्या दृष्टीनं जग बघतो. 0:13:27.682,0:13:29.685 आणि काही वेळा, हे जग 0:13:29.685,0:13:31.093 धोकादायक, अवघड, आणि भयानक 0:13:31.093,0:13:33.630 दिसत असेलही. 0:13:33.630,0:13:36.600 पण सतत तसंच दिसायला हवं, [br]असं नाही. 0:13:36.600,0:13:38.796 ते पहायची वेगळी नजर [br]आपण स्वतःला शिकवू शकतो. 0:13:38.796,0:13:41.462 आणि जग जास्त चांगलं आणि सोपं करण्याचा 0:13:41.462,0:13:43.399 हा मार्ग आपल्याला सापडला, की 0:13:43.399,0:13:45.739 कदाचित खरोखरच ते तसं होईलही. 0:13:45.739,0:13:47.294 धन्यवाद. 0:13:47.294,0:13:50.903 (टाळ्या )