Return to Video

केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता

  • 0:00 - 0:07
    सुप्रभात. कसे आहात? खूप छान चाललंय, नाही का?
  • 0:07 - 0:11
    मी एकंदर या प्रकारानं खूप प्रभावित झालो आहे.
  • 0:11 - 0:15
    खरं तर, मी निघालोय. (हशा)
  • 0:15 - 0:19
    तीन विषय आहेत, नाही का,
  • 0:19 - 0:23
    या शिबिरात बोलले जाणारे, जे संबंधित आहेत
  • 0:23 - 0:25
    मला जे सांगायचं आहे त्याच्याशी.
  • 0:25 - 0:29
    एक म्हणजे मानवी निर्मितिक्षमतेचा असामान्य पुरावा
  • 0:29 - 0:32
    जो आपल्या सर्व प्रेझेन्टेशन्समधून दिसतो
  • 0:32 - 0:35
    आणि इथल्या सर्व लोकांमध्ये दिसतो. फक्त त्यात वैविध्य आहे
  • 0:35 - 0:38
    आणि वेगळे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे
  • 0:38 - 0:41
    आपण अशा ठिकाणी येऊन ठेपलो आहोत जिथं काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही,
  • 0:41 - 0:43
    भविष्याबाबत. काही कल्पना नाही
  • 0:43 - 0:45
    यातून काय घडेल.
  • 0:45 - 0:48
    मला शिक्षणक्षेत्रामध्ये स्वारस्य आहे -
  • 0:48 - 0:51
    खरं तर, मला असं दिसतं की प्रत्येकालाच शिक्षणामध्ये रस असतो.
  • 0:51 - 0:53
    नाही का? मला हे खूप गमतीशीर वाटतं.
  • 0:53 - 0:56
    तुम्ही एखाद्या डिनर पार्टीला गेलात, आणि सांगितलंत
  • 0:56 - 0:59
    की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता -
  • 0:59 - 1:06
    खरं सांगायचं तर, तुम्ही डिनर पार्ट्यांना जात नसाल, जर तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करत असाल
  • 1:06 - 1:09
    (हशा) तुम्हाला बोलावलं जात नाही.
  • 1:09 - 1:14
    आणि परत परत तर नक्कीच नाही. आश्चर्य आहे.
  • 1:14 - 1:16
    पण जर तुम्ही जात असाल, आणि तुम्ही कोणालातरी म्हणालात,
  • 1:16 - 1:18
    म्हणजे, त्यांनी विचारलं, “तुम्ही काय करता?”
  • 1:18 - 1:20
    आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही शिक्षणक्षेत्रात काम करता,
  • 1:20 - 1:24
    तुम्हाला त्यांचा चेहरा थिजलेला दिसेल. जसं काही
  • 1:24 - 1:30
    बाप रे, “माझ्याबरोबरच असं का? सबंध आठवड्याभरात एकमेव पार्टी मिळाली होती.” (हशा)
  • 1:30 - 1:32
    पण जर तुम्ही त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल विचाराल,
  • 1:32 - 1:34
    ते तुम्हाला भिंतीत चिणून मारतील. कारण हे त्या गोष्टींपैकी एक आहे
  • 1:34 - 1:37
    ज्या लोकांना प्रचंड संताप आणतात, बरोबर ना?
  • 1:37 - 1:40
    धर्म, आणि पैसा आणि अशा इतर गोष्टींप्रमाणं.
  • 1:40 - 1:44
    मला शिक्षणक्षेत्रात खूपच स्वारस्य आहे, आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच आहे.
  • 1:44 - 1:46
    त्यामध्ये आपले खूप मोठे हितसंबंध गुंतलेले आहेत,
  • 1:46 - 1:49
    काही अंशी यामुळं की शिक्षणच अशी गोष्ट आहे
  • 1:49 - 1:52
    जी आपल्याला अनिश्चित भविष्यात तारणार आहे.
  • 1:52 - 1:55
    तसा विचार केला तर, या वर्षी शाळेत जाऊ लागणारी मुलं
  • 1:55 - 2:01
    २०६५ मध्ये निवृत्त होतील. कुणालाच कल्पना नाही -
  • 2:01 - 2:04
    गेले चार दिवस कितीही तज्ञ प्रदर्शन चालू असलं तरी -
  • 2:04 - 2:06
    की हे जग कसं असेल
  • 2:06 - 2:08
    पाच वर्षांनंतर. आणि तरीही आपल्याला करायचं आहे
  • 2:08 - 2:11
    त्यांना त्यासाठी प्रशिक्षित. तर ही अनिश्चितता, माझ्या मते,
  • 2:11 - 2:13
    विलक्षण आहे.
  • 2:13 - 2:15
    आणि यापैकी तिसरी गोष्ट अशी की
  • 2:15 - 2:20
    आपण सर्वांनी मान्य केली आहे,
  • 2:20 - 2:23
    मुलांची खरोखर विलक्षण क्षमता -
  • 2:23 - 2:25
    त्यांची नावीन्यपूर्ण क्षमता. म्हणजे बघा, सिरेना काल रात्री किती उत्कृष्ट बोलली,
  • 2:25 - 2:28
    नाही का? काय काय करु शकली ती.
  • 2:28 - 2:33
    आणि ती अपवादात्मक नमुना आहे, पण मला नाही वाटत, खरंच,
  • 2:33 - 2:36
    की ती बालजगतामध्ये अपवादात्मक आहे.
  • 2:36 - 2:39
    तुम्ही पाहताय एक विलक्षण समर्पित व्यक्ती
  • 2:39 - 2:41
    जिला नैसर्गिक देणगी मिळाली. आणि माझं म्हणणं आहे की,
  • 2:41 - 2:43
    सर्व मुलांकडं प्रचंड कौशल्यं असतात.
  • 2:43 - 2:45
    आणि आपण चक्क निर्दयपणे ती वाया घालवतो.
  • 2:45 - 2:48
    म्हणून मला बोलायचं आहे शिक्षणाबद्दल आणि
  • 2:48 - 2:51
    मला बोलायचं आहे निर्मितीक्षमतेबद्दल. माझा मुद्दा असा आहे की
  • 2:51 - 2:54
    आज निर्मितीक्षमता ही साक्षरतेइतकीच महत्त्वाची आहे शिक्षणामध्ये,
  • 2:54 - 2:58
    आणि आपण तिला समान दर्जा दिलाच पाहिजे.
  • 2:58 - 3:06
    (टाळ्या) धन्यवाद. तर, मला एवढंच सांगायचं होतं.
  • 3:06 - 3:10
    खूप आभारी आहे. (हशा) तर, १५ मिनिटं राहिलीत अजून.
  • 3:10 - 3:17
    तर, माझा जन्म झाला... नको. (हशा)
  • 3:17 - 3:21
    नुकतीच मी एक अफलातून गोष्ट ऐकली - मी आवडीनं ती सांगतो -
  • 3:21 - 3:25
    एका छोट्या मुलीची, जी चित्रकलेच्या वर्गात बसली होती. सहा वर्षांची ती
  • 3:25 - 3:27
    मागे, चित्र काढत बसली होती,
  • 3:27 - 3:29
    आणि शिक्षकेचं म्हणणं होतं की या मुलीचं इतर कधीही
  • 3:29 - 3:33
    लक्ष नसतं, आणि या चित्रकलेच्या तासाला मात्र असतं.
  • 3:33 - 3:35
    त्या शिक्षिकेला आश्चर्य वाटलं आणि ती त्या मुलीकडं गेली
  • 3:35 - 3:38
    आणि म्हणाली, “तू कशाचं चित्र काढत आहेस?”
  • 3:38 - 3:41
    आणि ती मुलगी म्हणाली, “मी देवाचं चित्र काढतीय.”
  • 3:41 - 3:44
    ती शिक्षिका म्हणाली, “पण देव कसा दिसतो ते कुणालाच ठाऊक नाही.”
  • 3:44 - 3:51
    "मग एक मिनिट थांबा", ती मुलगी म्हणाली.
  • 3:51 - 3:52
    (हशा)
  • 3:52 - 3:57
    जेव्हा माझा मुलगा इंग्लंडमध्ये चार वर्षांचा होता -
  • 3:57 - 4:00
    खरं तर, तो सगळीकडंच चार वर्षांचा होता. (हशा)
  • 4:00 - 4:06
    अगदी अचूक सांगायचं झालं तर, कुठेही गेला तरी, तो त्या वर्षी चार वर्षांचा होता.
  • 4:06 - 4:08
    त्यानं नॅटिव्हिटी नाटकात भाग घेतला होता.
  • 4:08 - 4:11
    तुम्हाला आठवतीय का ती गोष्ट? नाही, ती मोठी होती.
  • 4:11 - 4:14
    एक दीर्घ गोष्ट. मेल गिब्सन यानं त्याचा उत्तरार्ध बनवला होता.
  • 4:14 - 4:19
    तुम्ही तो पाहिला असेलः नॅटिव्हिटी २. पण जेम्सला जोसेफची भूमिका मिळाली होती,
  • 4:19 - 4:22
    ज्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती.
  • 4:22 - 4:24
    हे मुख्य पात्रांपैकी एक आहे अशी आमची समजूत होती.
  • 4:24 - 4:26
    टी-शर्ट मधल्या मुलांनी आमची जागा खच्चून भरली होतीः
  • 4:26 - 4:29
    जेम्स रॉबिन्सन जोसेफच्या भूमिकेत! (हशा)
  • 4:29 - 4:31
    त्याच्या तोंडी संवाद नव्हते, पण तुम्हाला माहितीय तो प्रवेश
  • 4:31 - 4:34
    जिथं ते तीन राजे येतात.
  • 4:34 - 4:36
    आणि ते घेऊन येतात गोल्ड, फ्रॅन्किन्सेन्स आणि मर्ह.
  • 4:36 - 4:38
    हे खरोखर घडलं. आम्ही बसलो होतो
  • 4:38 - 4:40
    आणि मला वाटतं त्यांचा क्रम चुकला,
  • 4:40 - 4:42
    कारण आम्ही नंतर त्या छोट्या मुलाशी बोललो आणि आम्ही म्हणालो,
  • 4:42 - 4:44
    "तुला त्याचं काही वाटत नाही ना?” आणि तो म्हणाला, “नाही, का? काही चुकीचं होतं का?
  • 4:44 - 4:46
    ते फक्त चुकीच्या क्रमानं आले, एवढंच.”
  • 4:46 - 4:47
    असो, तर ती तीन मुलं आली -
  • 4:47 - 4:49
    चार वर्षांची मुलं, डोक्यावर छोटं कापड गुंडाळून -
  • 4:49 - 4:52
    आणि त्यांनी ती खोकी खाली ठेवली,
  • 4:52 - 4:54
    आणि पहिला मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू गोल्ड.”
  • 4:54 - 4:57
    आणि दुसरा मुलगा म्हणाला, “आय ब्रिन्ग यू मर्ह.”
  • 4:57 - 5:11
    आणि तिसरा मुलगा म्हणाला, “फ्रॅन्क सेन्ट धिस.” (हशा)
  • 5:11 - 5:13
    या गोष्टींमधील साम्य हे आहे की मुलं धोका पत्करुन काम करतात.
  • 5:13 - 5:16
    त्यांना माहिती नसेल तर ते अंदाज बांधतील.
  • 5:16 - 5:19
    बरोबर ना? त्यांना चुकण्याची भिती वाटत नाही.
  • 5:19 - 5:24
    आता, माझं असं म्हणणं नाही की चुका करणं आणि निर्मितिक्षम असणं एकच आहे.
  • 5:24 - 5:25
    आपल्याला हे माहितच आहे की,
  • 5:25 - 5:28
    तुमची चुकायची तयारी नसेल, तर
  • 5:28 - 5:31
    तुम्ही कधीही काहीही नवीन करु शकणार नाही.
  • 5:31 - 5:34
    तुमची चुकायची तयारी नसेल, तर. आणि प्रौढत्वाप्रत येईपर्यंत
  • 5:34 - 5:36
    बहुतांश मुलं ही क्षमता गमावून बसतात.
  • 5:36 - 5:39
    त्यांना चुकण्याची दहशत बसते.
  • 5:39 - 5:41
    आणि जाता जाता सांगतो, आपण आपले उद्योग असेच चालवतो.
  • 5:41 - 5:44
    आपण चुकांना बोल लावतो. आणि आता आपण चालवतो
  • 5:44 - 5:47
    राष्ट्रीय शिक्षण यंत्रणा जिथं
  • 5:47 - 5:50
    चुका करणं सर्वात खराब समजलं जातं.
  • 5:50 - 5:53
    आणि परिणामतः आपण लोकांना शिक्षित करतोय
  • 5:53 - 5:56
    त्यांची निर्मितिक्षमता घालवून. पिकासो एकदा असं म्हणाला.
  • 5:56 - 5:59
    तो म्हणाला की सर्व मुलं जन्मतःच कलाकार असतात.
  • 5:59 - 6:03
    समस्या आहे ती वाढत्या वयाबरोबर कलाकार म्हणून टिकून रहायची. माझा यावर ठाम विश्वास आहे,
  • 6:03 - 6:05
    की आपण निर्मितीक्षमतेसहित वाढत नाही,
  • 6:05 - 6:08
    आपण तिच्याशिवाय वाढतो. किंवा असं म्हणा, आपण तिला सोडून शिकत राहतो.
  • 6:08 - 6:10
    तर हे असं का आहे?
  • 6:10 - 6:14
    सुमारे पाच वर्षांपूर्वीपर्यंत मी स्ट्रॅटफोर्ड - ऍव्हॉन इथं रहात होतो.
  • 6:14 - 6:16
    खरं तर, आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलीसला रहायला आलो.
  • 6:16 - 6:20
    यावरुन तुम्हाला कल्पना येईल किती निर्विघ्न संक्रमण असेल ते.
  • 6:20 - 6:22
    (हशा) खरं तर,
  • 6:22 - 6:24
    आम्ही स्निटरफील्ड नावाच्या गावी रहायचो.
  • 6:24 - 6:26
    स्ट्रॅटफोर्ड च्या बाहेरच, जिथं
  • 6:26 - 6:31
    शेक्सपियरच्या वडिलांचा जन्म झाला. काहीतरी वेगळं वाटतंय का? मला वाटलं.
  • 6:31 - 6:33
    शेक्सपियरचे वडील ही कल्पनाच कधी केली नव्हती, होय ना?
  • 6:33 - 6:35
    बरोबर ना? कारण तुम्ही हीदेखील कल्पना केली नव्हती
  • 6:35 - 6:37
    की शेक्सपियर कधी लहान मूल होता, होय ना?
  • 6:37 - 6:40
    सात वर्षांचा शेक्सपियर? मी कधीच कल्पना नव्हती केली. म्हणजे, तो असेल
  • 6:40 - 6:42
    कधीतरी सात वर्षांचा. तो असणार
  • 6:42 - 6:51
    कुणाच्यातरी इंग्रजीच्या वर्गात, नाही का? किती त्रासदायक असेल ते?
  • 6:51 - 7:05
    (हशा) “अजून प्रयत्न करायला हवेत.” त्याचे वडील त्याला झोपायला लावत असतील,
  • 7:05 - 7:08
    शेक्सपियरला, “झोपून टाक, लगेच,”
  • 7:08 - 7:10
    विल्यम शेक्सपियरला, “आणि पेन्सिल ठेवून दे.
  • 7:10 - 7:18
    आणि असलं बोलणं बंद कर. ते कुणालाच कळत नाहीय.”
  • 7:18 - 7:23
    (हशा)
  • 7:23 - 7:26
    असो, तर आम्ही स्ट्रॅटफोर्ड वरुन लॉस ऍँजेलिस ला आलो,
  • 7:26 - 7:30
    आणि खरं तर, मला या बदलाबद्दल एका शब्दात सांगायचं आहे.
  • 7:30 - 7:33
    माझ्या मुलाला यायचं नव्हतं.
  • 7:33 - 7:36
    मला दोन मुलं आहेत. तो आता २१ चा आहे; माझी मुलगी १६ ची.
  • 7:36 - 7:38
    त्याला लॉस ऎंजेलिस ला यायचं नव्हतं. त्याला इथं आवडत होतं,
  • 7:38 - 7:43
    पण इंग्लंडमध्ये त्याची एक मैत्रीण होती. त्याच्या आयुष्यातलं प्रेम होती ती, सारा.
  • 7:43 - 7:45
    तो तिला एक महिन्यापासून ओळखत होता.
  • 7:45 - 7:48
    लक्षात घ्या, त्यांनी चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली होती,
  • 7:48 - 7:52
    कारण १६व्या वर्षी हे खूप प्रदीर्घ वाटतं.
  • 7:52 - 7:54
    असो, तर तो विमानामध्ये खूपच नाराज होऊन बसला होता,
  • 7:54 - 7:56
    आणि म्हणत होता, “मला सारासारखी मुलगी परत कधीच भेटणार नाही.”
  • 7:56 - 7:58
    आणि खरं सांगायचं तर, आम्हाला याच गोष्टीचा आनंद होता,
  • 7:58 - 8:10
    कारण तीच मुख्य कारण होती आम्ही देश सोडण्यामागं.
  • 8:10 - 8:13
    (हशा)
  • 8:13 - 8:16
    पण तुमच्या काहीतरी लक्षात येईल, अमेरीकेत आल्यावर
  • 8:16 - 8:18
    आणि जगभर प्रवास केल्यावरः
  • 8:18 - 8:22
    जगातील प्रत्येक शिक्षणपध्दतीमध्ये विषयांची समान श्रेणीरचना आहे.
  • 8:22 - 8:24
    प्रत्येक. कुठेही गेलात तरी.
  • 8:24 - 8:26
    तुम्हाला वाटेल की हे चुकीचं असेल, पण तसं नाही.
  • 8:26 - 8:29
    एकदम वर आहेत गणित आणि भाषा विषय,
  • 8:29 - 8:31
    मग मानवशास्त्र, आणि तळाशी आहेत कला विषय.
  • 8:31 - 8:33
    जगात सर्वत्र.
  • 8:33 - 8:36
    आणि बहुतेक प्रत्येक पद्धतीमध्ये हीदेखील आहे,
  • 8:36 - 8:38
    कला विषयांमधील श्रेणीरचना.
  • 8:38 - 8:40
    कला व संगीताला सहसा वरचा दर्जा दिला जातो शाळांतून
  • 8:40 - 8:43
    नाट्य व नृत्यापेक्षा. जगात एकही शिक्षण पध्दत अशी नाही
  • 8:43 - 8:45
    जी दररोज मुलांना नृत्य शिकवते
  • 8:45 - 8:48
    जसं आपण त्यांना गणित शिकवतो. का?
  • 8:48 - 8:50
    का नाही? मला वाटतं हेच जास्त महत्त्वाचं आहे.
  • 8:50 - 8:53
    माझ्या मते गणित अतिशय महत्त्वाचं आहे, पण मग नृत्यदेखील.
  • 8:53 - 8:56
    मुलांना नाचू दिलं तर ती सदासर्वकाळ नाचतात, आपण सगळेदेखील.
  • 8:56 - 8:59
    आपल्या सर्वांकडं शरीर आहे, नाही का? माझी एखादी मिटींग चुकली का?
  • 8:59 - 9:03
    (हशा) खरंच, काय होतं तर,
  • 9:03 - 9:05
    मुलं मोठी होऊ लागली की, आपण त्यांना शिकवू लागतो
  • 9:05 - 9:08
    कमरेपासून हळूहळू वरवर. आणि मग आपण त्यांच्या डोक्यांवर लक्ष केंद्रीत करतो.
  • 9:08 - 9:10
    आणि थोडंसं एका बाजूला.
  • 9:10 - 9:14
    जर तुम्ही तटस्थपणे शिक्षणाकडं पाहिलंत
  • 9:14 - 9:17
    आणि विचारलंत, “सार्वजनिक शिक्षण कशासाठी?”
  • 9:17 - 9:19
    माझ्या मते तुम्ही या निष्कर्षापर्यंत याल - अंतिम परिणाम पाहता,
  • 9:19 - 9:21
    यातून नक्की कोणाला यश मिळतं,
  • 9:21 - 9:23
    प्रत्येकानं करायला हव्यात त्या गोष्टी कोण करतं,
  • 9:23 - 9:26
    कुणाला चांगले गुण मिळतात, कोण विजेता ठरतं -
  • 9:26 - 9:29
    मला वाटतं तुम्ही या निष्कर्षाप्रत याल की सार्वजनिक शिक्षणाचा एकंदर उद्देश
  • 9:29 - 9:30
    जगभरातून
  • 9:30 - 9:34
    आहे, विद्यापीठातील प्राध्यापक तयार करणं. नाही का?
  • 9:34 - 9:36
    हेच लोक असतात वरच्या श्रेणीत उत्तीर्ण होणारे.
  • 9:37 - 9:40
    आणि मी त्यापैकी एक होतो, म्हणून सांगतोय. (हशा)
  • 9:40 - 9:44
    आणि मला हे युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स आवडतात, पण माहितीय का,
  • 9:44 - 9:48
    आपण त्यांना मानवी यशस्वीतेचं सर्वोच्च परिमाण मानलं नाही पाहिजे.
  • 9:48 - 9:50
    तो आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे,
  • 9:50 - 9:52
    इतर अनेक मार्गांसारखाच. पण ते जरा जास्त जिज्ञासू असतात,
  • 9:52 - 9:54
    आणि मी हे त्यांच्यावरच्या प्रेमातून म्हणतोय.
  • 9:54 - 9:57
    माझ्या अनुभवानुसार, या प्राध्यापक लोकांचं काहीतरी गूढ असतं -
  • 9:57 - 10:00
    सर्वच नाही, पण साधारणपणे - यांचा जीव डोक्यात असतो.
  • 10:00 - 10:02
    ते तिथं वरच राहतात, आणि थोडं एका बाजूला.
  • 10:02 - 10:06
    आणि माहितीय का, ते अक्षरशः थोडेसे शरीराबाहेरच असतात.
  • 10:06 - 10:08
    ते आपल्या शरीराला समजतात
  • 10:08 - 10:17
    आपल्या डोक्याला वाहून नेणारं साधन, नाही का?
  • 10:17 - 10:24
    (हशा) ते एक साधन असतं, त्यांचं डोकं मीटींगपर्यंत पोचवण्याचं.
  • 10:24 - 10:27
    तुम्हाला जर अशारीर अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा हवा असेल,
  • 10:27 - 10:30
    तर सहज, एखाद्या निवासी शिबिराला जा
  • 10:30 - 10:32
    ज्येष्ठ शिक्षणतज्ञांच्या,
  • 10:32 - 10:35
    आणि शेवटच्या रात्री डिस्कोमध्ये डोकावून पहा.
  • 10:35 - 10:39
    (हशा) आणि तिथं तुम्हाला दिसतील - प्रौढ पुरुष आणि स्त्रिया
  • 10:39 - 10:43
    विचित्रपणे, अनियंत्रितपणे तडफडणारे,
  • 10:43 - 10:47
    हे संपायची वाट पहाणारे, जेणेकरुन ते घरी जाऊ शकतील आणि यावर निबंध लिहू शकतील.
  • 10:47 - 10:53
    आता आपली शिक्षण पध्दती आधारली आहे शैक्षणिक क्षमतेच्या कल्पनेवर.
  • 10:53 - 10:56
    आणि त्याला एक कारण आहे.
  • 10:56 - 10:58
    ही सबंध व्यवस्था बनवली गेली - जगभरामध्ये, कुठेही
  • 10:58 - 11:00
    १९व्या शतकापूर्वी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था नव्हत्या, खरंच.
  • 11:00 - 11:03
    त्या सर्व बनवल्या गेल्या
  • 11:03 - 11:04
    औद्योगिकीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी.
  • 11:04 - 11:07
    तर ही श्रेणीव्यवस्था आधारीत आहे दोन गोष्टींवर.
  • 11:07 - 11:11
    पहिली, कामाच्या दृष्टीनं सर्वात उपयुक्त असे विषय
  • 11:11 - 11:13
    असतील सर्वात वर. त्यामुळं तुम्हाला कदाचित नकळत परावृत्त केलं गेलं असेल
  • 11:13 - 11:15
    तुमच्या लहानपणी शाळेमध्ये, तुमच्या आवडत्या गोष्टींपासून,
  • 11:15 - 11:17
    या सबबीवर की तुम्हाला
  • 11:17 - 11:20
    या गोष्टी करुन नोकरी मिळू शकणार नाही. बरोबर ना?
  • 11:20 - 11:22
    संगीत शिकू नकोस, तू काही संगीतकार होणार नाहीस;
  • 11:22 - 11:24
    कला शिकू नकोस, तू काही कलाकार होणार नाहीस.
  • 11:25 - 11:29
    हितकारक सल्ला - आता, नितांत चुकीचा. संपूर्ण जग
  • 11:29 - 11:30
    एका क्रांतीमध्ये वेढलं गेलं आहे.
  • 11:30 - 11:33
    आणि दुसरी गोष्ट आहे शैक्षणिक क्षमता, जिनं पूर्ण व्यापून टाकलंय
  • 11:33 - 11:34
    आपल्या बुद्धीमत्तेच्या कल्पनेला,
  • 11:34 - 11:37
    कारण विद्यापीठांनी ही यंत्रणा घडवली त्यांच्या नजरेतून.
  • 11:37 - 11:39
    जरा विचार केलात तर, ही सबंध व्यवस्था
  • 11:39 - 11:41
    जगभरातील सार्वजनिक शिक्षणाची, आहे एक प्रदीर्घ प्रक्रीया
  • 11:41 - 11:43
    विद्यापीठीय प्रवेशाची.
  • 11:43 - 11:46
    आणि याचा परिणाम म्हणजे कित्येक प्रतिभावान,
  • 11:46 - 11:48
    तल्लख बुद्धीच्या, निर्मितिक्षम लोकांना वाटतं आपण असे नाही,
  • 11:48 - 11:50
    कारण शाळेमध्ये ते ज्या गोष्टीत चांगले होते
  • 11:50 - 11:54
    त्यांची किंमत नव्हती, किंवा त्या खरंतर वर्ज्य होत्या.
  • 11:54 - 11:56
    आणि माझ्या मते ही पद्धत चालू ठेवणं आपल्याला परवडणारं नाही.
  • 11:56 - 11:58
    येत्या ३० वर्षांमध्ये, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार,
  • 11:58 - 12:01
    जगभरातून अधिक लोक पदवीधर होतील
  • 12:01 - 12:03
    शिक्षणातून, इतिहासाच्या प्रारंभापासून झाले असतील त्यापेक्षा.
  • 12:03 - 12:05
    जास्त लोक, आणि हे मिश्रण असेल
  • 12:05 - 12:07
    आपण बोललेल्या सर्व गोष्टींचं -
  • 12:07 - 12:10
    तंत्रज्ञान आणि त्यामुळं कामांचा कायापालट, आणि लोकसंख्याशास्त्र
  • 12:10 - 12:12
    आणि लोकसंख्येचा विस्फोट.
  • 12:12 - 12:15
    एकाएकी, पदव्यांचं महत्त्व संपून गेलंय. नाही का?
  • 12:15 - 12:19
    माझ्या विद्यार्थीदशेत, पदवी असली की नोकरी मिळायची.
  • 12:19 - 12:22
    तुम्हाला नोकरी नसेल तर ती तुम्हाला करायची नाही म्हणून नसेल.
  • 12:22 - 12:25
    आणि स्पष्ट सांगायचं तर, मलाही नव्हती करायची. (हशा)
  • 12:25 - 12:30
    पण आता पदवीधर मुलं सहसा
  • 12:30 - 12:31
    घरीच परततात, व्हिडीओ गेम खेळत बसण्यासाठी,
  • 12:31 - 12:34
    कारण ज्या कामासाठी पूर्वी बीए चालत तिथं आता एमए लागतात,
  • 12:34 - 12:37
    आणि अजून कुठल्या कामासाठी पीएचडी लागते.
  • 12:37 - 12:39
    ही शैक्षणिक फुगवट्याची प्रक्रीया आहे.
  • 12:39 - 12:41
    आणि ती सूचित करत आहे की संपूर्ण शिक्षण यंत्रणा
  • 12:41 - 12:43
    आपल्या पायाखालून सरकत आहे. आपल्याला आमूलाग्र बदल करावा लागेल
  • 12:43 - 12:44
    आपल्या बुद्धीमत्ताविषयक दृष्टीकोनात.
  • 12:44 - 12:46
    आपल्याला बुद्धीमत्तेविषयी तीन गोष्टी माहिती आहेत.
  • 12:46 - 12:49
    पहिली, वैविधता. आपण जगाचा विचार करतो सर्व प्रकारांनी
  • 12:49 - 12:51
    आपल्या अनुभवानुसार. आपण दृश्य विचार करतो,
  • 12:51 - 12:54
    आपण ध्वनीतून विचार करतो, आपण स्पर्शज्ञानातून विचार करतो.
  • 12:54 - 12:57
    आपण काल्पनिक गोष्टींतून विचार करतो, आपण चेतनेतून विचार करतो.
  • 12:57 - 12:59
    दुसरी, बुद्धीमत्ता गतिमान असते.
  • 12:59 - 13:02
    जर तुम्ही मानवी मेंदूचे व्यवहार पाहिलेत, जसं आपण ऐकलं
  • 13:02 - 13:05
    कालच्या अनेक प्रेझेन्टेशन्समधून,
  • 13:05 - 13:07
    बुद्धीमत्ता ही कमालीची परस्परसंबंधी आहे.
  • 13:07 - 13:10
    मेंदूचे वेगवेगळे भाग पाडलेले नाहीत.
  • 13:10 - 13:13
    प्रत्यक्षात, निर्मितिक्षमता - माझ्या मते जी आहे प्रक्रीया
  • 13:13 - 13:15
    नवनवीन मौल्यवान कल्पना सुचण्याची -
  • 13:15 - 13:18
    बहुतेक वेळा घडून येते परस्परसंबंधातून
  • 13:18 - 13:21
    गोष्टींकडे बघण्याच्या विविधांगी मार्गांतून.
  • 13:21 - 13:23
    हा मेंदू मुद्दामच - जाता जाता सांगतो,
  • 13:23 - 13:26
    मेंदूच्या दोन भागांना जोडणारा नसांचा एक दांडा असतो
  • 13:26 - 13:28
    कॉर्पस कलॉजम नावाचा. स्त्रियांमध्ये तो अधिक दाट असतो.
  • 13:28 - 13:30
    कालच्या हेलनच्या म्हणण्यानुसार, मला वाटतं
  • 13:30 - 13:34
    बहुतेक यामुळंच स्त्रिया एकावेळी अनेक कामं करण्यात अधिक कुशल असतात.
  • 13:34 - 13:36
    कारण तुम्ही तसं करु शकता, नाही का?
  • 13:36 - 13:39
    कित्येक संशोधनं चालू आहेत, पण मला हे माझ्या खाजगी आयुष्यातून कळालं.
  • 13:39 - 13:41
    माझी पत्नी घरी जेवण बनवत असेल तर -
  • 13:41 - 13:45
    सुदैवानं जे नेहमी घडत नाही. (हशा)
  • 13:45 - 13:48
    पण माहितीय का, ती करत असते - नाही, काही गोष्टी ती चांगल्या करते -
  • 13:48 - 13:50
    तर ती स्वयंपाक करीत असते तेव्हा,
  • 13:50 - 13:52
    ती लोकांशी फोनवर चर्चा करीत असते,
  • 13:52 - 13:55
    ती मुलांशी बोलत असते, ती छताला रंग देत असते,
  • 13:55 - 13:58
    ती तिथंच ओपन-हार्ट सर्जरी देखील करीत असते.
  • 13:58 - 14:01
    जेव्हा मी स्वयंपाक करतो, तेव्हा दार बंद असतं, मुलं घराबाहेर असतात,
  • 14:01 - 14:04
    फोन जागेवर असतो, मध्येच ती आली तर मला राग येतो.
  • 14:04 - 14:17
    मी म्हणतो, “टेरी, प्लीज, मी इथं एक अंडं उकडायचा प्रयत्न करतोय. मला एकटं सोड.” (हशा)
  • 14:17 - 14:19
    वास्तविक, तुम्हाला ती जुनी म्हण माहिती आहे का,
  • 14:19 - 14:22
    जंगलात एखादं झाड पडलं आणि कुणाला ऐकू नाही गेलं,
  • 14:22 - 14:25
    तर ते खरंच घडलं का? आठवतो हा शिळा विनोद?
  • 14:25 - 14:28
    मी अगदी अलीकडं एक मस्त टी-शर्ट पाहिला ज्यावर होतं, “जर एखादा पुरुष मनातलं बोलला
  • 14:28 - 14:31
    दूर जंगलात, आणि कुठल्याच स्त्रीनं ऐकलं नाही,
  • 14:31 - 14:40
    तरी त्याचं चूकच असतं का?” (हशा)
  • 14:40 - 14:42
    आणि बुद्धीमत्तेविषयी तिसरी गोष्ट म्हणजे,
  • 14:43 - 14:45
    ती सुस्पष्ट असते. मी सध्या एका नव्या पुस्तकावर काम करतोय
  • 14:45 - 14:47
    एपिफनी' नावाच्या, जे आधारीत आहे काही
  • 14:47 - 14:49
    लोकांच्या मुलाखतींवर, त्यांना कसा शोध लागला
  • 14:49 - 14:51
    त्यांच्या प्रतिभेचा. हे कसं घडलं ते पाहून मी विस्मयचकित झालो.
  • 14:51 - 14:54
    खरंच हे सुचलं माझ्या एका संभाषणातून
  • 14:54 - 14:56
    एका जबरदस्त स्त्रीबरोबरच्या, जिच्याबद्दल बर्याच लोकांनी
  • 14:56 - 14:58
    कधीच ऐकलं नसेल, तिचं नाव आहे जिहलियन लीन,
  • 14:58 - 15:00
    तुम्ही ऐकलं आहे का? काहीजणांनी ऐकलंय. ती एक नृत्यदिग्दर्शक आहे
  • 15:00 - 15:02
    आणि तिचं कार्य बहुश्रुत आहे.
  • 15:02 - 15:04
    तिनं बसवले 'कॅट्स,' आणि 'फॅण्टम ऑफ द ऑपेरा.'
  • 15:04 - 15:08
    ती उत्कृष्ट आहे. मी इंग्लंडमध्ये, रॉयल बॅलेट च्या मंडळात असायचो,
  • 15:08 - 15:10
    तुम्ही पहातच आहात कसा.
  • 15:10 - 15:12
    असो, तर जिहलियन आणि मी एकदा जेवायला गेलो आणि मी म्हणालो,
  • 15:12 - 15:14
    "जिहलियन, तू डान्सर कशी काय झालीस?" आणि ती म्हणाली
  • 15:14 - 15:16
    मजेशीर गोष्ट आहे, ती शाळेत असताना,
  • 15:16 - 15:19
    खरोखर मठ्ठ होती. आणि शाळेनं, ३०च्या दशकातील,
  • 15:19 - 15:21
    तिच्या पालकांना पत्र पाठवलं आणि म्हटलं, “आम्हाला वाटतं
  • 15:21 - 15:23
    जिहलियनला लर्निंग डिसऑर्डर आहे.” ती लक्ष केंद्रित करु शकत नव्हती,
  • 15:23 - 15:25
    ती चुळबूळ करायची. मला वाटतं आता ते म्हणतील
  • 15:25 - 15:29
    तिला एडीएचडी होता. नाही का? पण हे १९३० मध्ये घडलं,
  • 15:29 - 15:32
    आणि तोपर्यंत एडीएचडी चा शोध लागला नव्हता.
  • 15:32 - 15:35
    तो पर्याय त्यावेळी उपलब्ध नव्हता. (हशा)
  • 15:35 - 15:39
    असं काहीतरी आपल्याला असू शकतं याची लोकांना जाणीव नव्हती.
  • 15:39 - 15:43
    असो, तर ती तज्ञांना दाखवायला गेली. तर, या ओक-पॅनल्ड खोलीमध्ये,
  • 15:43 - 15:46
    आपल्या आईबरोबर ती गेली,
  • 15:46 - 15:49
    आणि तिला एका कोपर्यातल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आलं,
  • 15:49 - 15:51
    आणि ती २० मिनिटं हाताची घडी घालून बसली जेव्हा
  • 15:51 - 15:53
    हा इसम तिच्या आईसोबत बोलत होता त्या सर्व
  • 15:53 - 15:57
    समस्यांबद्दल, ज्या जिहलियनला शाळेमध्ये होत्या. आणि सरतेशेवटी -
  • 15:57 - 15:59
    तिचा इतरांना त्रास होत असल्यामुळं,
  • 15:59 - 16:01
    तिचा गृहपाठ नेहमी उशीरा होत असल्यामुळं, आणि असं बरंच काही,
  • 16:01 - 16:04
    आठ वर्षांची चिमुरडी - अखेर, ते डॉक्टर जाऊन बसले
  • 16:04 - 16:06
    जिहलियनपुढं आणि म्हणाले, “जिहलियन,
  • 16:06 - 16:08
    मी त्या सर्व गोष्टी ऐकल्या आहेत ज्या तुझ्या आईनं
  • 16:08 - 16:10
    मला सांगितल्या, आणि मला तिच्याशी एकांतात बोलायचं आहे.”
  • 16:10 - 16:13
    ते म्हणाले, “इथंच थांब, आम्ही परत येऊ, आम्ही फार वेळ नाही लावणार.”
  • 16:13 - 16:15
    आणि ते तिला सोडून गेले.
  • 16:15 - 16:17
    पण खोलीतून बाहेर जाताना, त्यांनी रेडीओ चालू केला
  • 16:17 - 16:19
    त्यांच्या डेस्कवरील. आणि जेव्हा ते
  • 16:19 - 16:21
    खोलीच्या बाहेर पडले, ते तिच्या आईला म्हणाले,
  • 16:21 - 16:24
    फक्त उभं राहून तिचं निरीक्षण करा. आणि ते खोलीमधून बाहेर पडल्याक्षणी
  • 16:24 - 16:28
    ती म्हणाली, ती उठली, त्या संगीतावर थिरकू लागली.
  • 16:28 - 16:30
    आणि त्यांनी थोडा वेळ तिचं निरीक्षण केलं
  • 16:30 - 16:33
    आणि ते तिच्या आईकडं वळून म्हणाले,
  • 16:33 - 16:37
    "मिसेस लीन, जिहलियन रुग्ण नाही, ती डान्सर आहे.
  • 16:37 - 16:39
    तिला डान्सक्लासला घेऊन जा."
  • 16:39 - 16:41
    मी म्हणालो, “मग काय झालं?”
  • 16:41 - 16:44
    ती म्हणाली, “तिनं तसंच केलं. तुम्हाला काय सांगू ते किती छान होतं.
  • 16:44 - 16:46
    आम्ही त्या खोलीत प्रवेश केला आणि ती भरली होती
  • 16:46 - 16:49
    माझ्यासारख्या लोकांनी. एका जागी स्थिर बसू न शकणारे लोक.
  • 16:49 - 16:52
    असे लोक ज्यांना हालचाल केल्याशिवाय विचारदेखील करता येत नव्हता.”
  • 16:52 - 16:54
    ते बॅलेट करत होते, ते टॅप करत होते, ते जॅझ करत होते,
  • 16:54 - 16:56
    ते मॉडर्न करत होते, ते आधुनिक नृत्य करत होते.
  • 16:56 - 16:59
    पुढं तिची रॉयल बॅलेट स्कूलसाठी चाचणी झाली,
  • 16:59 - 17:01
    ती एकपात्री कलाकार बनली, तिची खूप छान कारकीर्द घडली
  • 17:01 - 17:03
    रॉयल बॅलेट मध्ये. पुढं तिनं पदवी प्राप्त केली
  • 17:03 - 17:05
    रॉयल बॅलेट स्कूलमधून आणि
  • 17:05 - 17:08
    स्वतःची संस्था स्थापन केली - द जिहलियन लीन डान्स कंपनी -
  • 17:08 - 17:11
    एँड्र्यू लॉईड वेबर ला भेटली. ती कारणीभूत आहे
  • 17:11 - 17:13
    काही सर्वात यशस्वी संगीत नाटक
  • 17:13 - 17:18
    निर्मितीला, इतिहासातील, तिनं लक्षावधी लोकांना आनंद दिला आहे,
  • 17:18 - 17:21
    आणि ती लक्षाधीश आहे. दुसर्या कुणीतरी
  • 17:21 - 17:25
    तिच्यावर औषधोपचार केले असते आणि तिला सांगितलं असतं
  • 17:25 - 17:27
    शांत रहायला.
  • 17:27 - 17:30
    आता, मला वाटतं... (टाळ्या) मला जे वाटतं ते असं आहेः
  • 17:30 - 17:32
    परवा अल् गोअर बोलले
  • 17:32 - 17:35
    पर्यावरणाबद्दल, आणि रॅशेल कार्सननी चेतवलेल्या क्रांतीबद्दल.
  • 17:35 - 17:39
    माझा विश्वास आहे की आपली भविष्यातील एकमेव आशा
  • 17:39 - 17:42
    म्हणजे मानवी पर्यावरणाच्या नव्या संकल्पनेचा स्वीकार करणं,
  • 17:42 - 17:46
    जिथं आपण सुरुवात करु पुनर्घडणीची आपल्या संकल्पनेच्या
  • 17:46 - 17:48
    मानवी क्षमतेच्या संपन्नतेबाबत.
  • 17:48 - 17:52
    आपल्या शिक्षण पद्धतीनं आपली मनं उकरुन काढली आहेत जशी
  • 17:52 - 17:54
    आपण खणून काढतो जमीनः एखाद्या विशिष्ट उपयुक्त वस्तूसाठी.
  • 17:54 - 17:57
    आणि भविष्यात, ती आपल्याला काही देऊ शकणार नाही.
  • 17:57 - 18:00
    आपल्याला पुनर्विचार केला पाहिजे मूलभूत तत्त्वांचा
  • 18:00 - 18:02
    ज्यायोगे आपण आपल्या मुलांना शिक्षण देत आहोत.
  • 18:02 - 18:06
    जोनास साल्कचं एक छान वचन होतं, “जर सर्व कीटक
  • 18:06 - 18:09
    पृथ्वीवरुन नाहीसे झाले,
  • 18:09 - 18:12
    तर ५० वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टी संपुष्टात येईल.
  • 18:12 - 18:15
    जर सर्व माणसं पृथ्वीवरुन नाहीशी झाली,
  • 18:15 - 18:19
    तर ५० वर्षांत सर्व प्रकारच्या जीवांची भरभराट होईल.”
  • 18:19 - 18:21
    आणि त्याचं बरोबरच आहे.
  • 18:21 - 18:24
    टेड' साजरं करीत आहे मानवी कल्पनाशक्तीचं वरदान.
  • 18:24 - 18:28
    आपल्याला आता काळजी घ्यायला हवी की आपण वापरु हे वरदान
  • 18:28 - 18:31
    सूज्ञपणे, आणि काही परिस्थितींचं निवारण करु
  • 18:31 - 18:34
    अशा परिस्थिती ज्यांबद्दल आपण बोललो. आणि तो एकमेव मार्ग
  • 18:35 - 18:38
    ज्यायोगे आपण हे करु तो म्हणजे आपली निर्मितिक्षमता ओळखून
  • 18:38 - 18:40
    तिच्या संपन्नतेवरुन, आणि ओळखून
  • 18:40 - 18:43
    आपली मुलं त्यांच्यावरच्या आशेवरुन. आणि आपलं उद्दिष्ट
  • 18:43 - 18:46
    आहे त्यांना सर्वांगीण शिक्षण देणं, म्हणजे ते भविष्याला सामोरे जाऊ शकतील.
  • 18:46 - 18:49
    तसंही - आपण कदाचित उद्या पाहू शकणार नाही,
  • 18:49 - 18:52
    पण ते पाहतील. आणि आपलं काम आहे मदत करणं
  • 18:52 - 18:54
    त्यांना, त्यातून काहीतरी घडविण्यात. अतिशय आभारी आहे.
Title:
केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता
Speaker:
Sir Ken Robinson
Description:

सर केन रॉबिन्सन एका मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण संभाषणातून मांडत आहेत संकल्पना एका अशा शिक्षण व्यवस्थेची जिथं निर्मिताक्षमता (दडपली जाण्याऐवजी) जोपासली जाते.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
19:00
Mandar Shinde added a translation

Marathi subtitles

Revisions